वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

पांढरट पदार्थ कसले आहेत हे कळल्यानंतर, या हिऱ्यातले काळे पदार्थ काय असावेत, याची उत्सुकता आता निर्माण झाली होती. काळे पदार्थही अर्थातच क्ष-किरणांद्वारे अभ्यासले जात होते. आश्चर्य म्हणजे, काळ्या पदार्थांच्या या विश्लेषणात, हे पदार्थ आतापर्यंत निसर्गात न सापडलेलं एक खनिज असल्याचं आढळलं. परॉवस्काइट या गटात मोडणारं हे खनिज, कॅल्शियम आणि सिलिकॉन या मूलद्रव्यांपासून बनलेलं आहे.
January 15, 2022
‘जसे कराल तसे भराल ’ हा कर्माचा अटळ सिद्धांत आहे परंतु प्रत्यक्ष व्यवहारात आपला अनुभव असा की जो माणूस न्याय-नीती-धर्माने वागत असतो, त्याला जीवनात खूप दुःखे भोगावी लागतात. उलट अधर्म अनीतीने वागणारे, काळाबाजार आणि तस्करी करणारे, जीवनात मौज-मजा करत असतात. गाडी, बंगला इत्यादी सर्व तऱ्हेच्या सुखसोयी यांची त्यांच्या जीवनात रेलचेल असते.
November 11, 2021
अफगाणिस्तानात अमेरिकेने हस्तक्षेप केला त्याला अकरा वर्षे झाली. अलीकडच्या काळात अमेरिकेला सर्वाधिक काळापर्यंत गुंतवून ठेवणारे हे युद्ध ठरले. अगदी व्हिएतनामचे युद्धदेखील यापेक्षा कमी काळ चालले होते आणि त्यात झालेला खर्चदेखील अफगाणिस्तानच्या युद्धापेक्षा कमी होता.
June 24, 2013
असे नेहमीच म्हणतात की प्रत्येक माणसाच्या आनंदाचा मार्ग हा त्याच्या पोटातून जातो. पण ह्याच आनंदावर विरझण घालण्याचे काम आपल्या हल्लीच्या चुकीच्या आणि वेळीअवेळी खाण्याच्या सवयीमुळे तयार होणारा गॅस करतो. म्हणूनच हल्ली अनेकांना गॅसच्या समस्येने ग्रासलेले दिसून येते. बरेच लोकं गॅस ही किरकोळ गोष्ट आहे असे मानतात.
March 14, 2019
अलीकडे ग्राहकांची फसवणूक करण्याला वैद्यकीयक्षेत्रही अपवाद राहिलेले नाही. डॉक्टरांकडे किवा मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणार्या रुग्णाची फसवणूक झाल्याच्या किवा त्याला मानसिक, आर्थिक त्रास सहन करावा लागल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. अशा तक्रारींना आळा घालायचा तर त्या संदर्भात ग्राहक मंच वा विविध न्यायालयांनी दिलेल्या निर्णयांवर नजर टाकायला हवी.
December 21, 2010
नानायोगिमुनीन्द्रहृन्निवसतीं नानार्थसिद्धिप्रदां
नानापुष्पविराजितांघ्रियुगलां नारायणेनार्चिताम् ।
नादब्रह्ममयीं परात्परतरां नानार्थतत्वात्मिकां
मीनाक्षीं प्रणतोऽस्मि संततमहं कारुण्यवारांनिधिम् ॥ ५॥
आई श्रीमीनाक्षीच्या मूलचैतन्यस्वरूपी आदिशक्ती स्वरूपाचे विशेष वर्णन करताना जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
नानायोगिमुनीन्द्रहृन्निवसतीं - कर्म,भक्ती तथा ज्ञानाच्याद्वारे भगवंताशी जुळतात त्यांना योगी असे म्हणतात. जे भगवंताच्या दिव्य स्वरुपाचे मनन करतात त्यांना मुनी असे म्हणतात. अशा असंख्य योगी आणि मुनी श्रेष्ठांच्या हृदयामध्ये निवास करणाऱ्या,
नानार्थसिद्धिप्रदां- आपल्या उपासकांना अनेक प्रकारच्या सिद्धी प्रदान करणाऱ्या,
नानापुष्पविराजितांघ्रियुगलां- नानाविध पुष्पांचा द्वारी चरणकमले सुशोभित केलेली आहेत अशी.
पुष्पां साठी सुंदरतम शब्द आहे सुमन. भक्तांची, सज्जनांची सु-मने हीच आई जगदंबेच्या चरणाची सेवा करणारी खरी पुष्पे. त्या सु-मनांनी चरणकमले सुशोभित असणाऱ्या,
नारायणेनार्चिताम् - भगवान श्री नारायणांच्याद्वारे अर्चना केली जात असणाऱ्या,
नादब्रह्ममयीं- नादब्रह्म हे स्वरूप असणाऱ्या,
शास्त्रात ओंकार नाद असा शब्द आहे. जगात जे ऐकु येते त्याला ध्वनी असे म्हणतात. ध्वनीचे संयोगज आणि वियोगज असे दोन प्रकार आहेत. दोन गोष्टींच्या एकत्र येण्यातून वा दूर जाण्यातून ते प्रगटतात. कोणत्याही शब्दासाठी देखील हेच प्रयत्न करावे लागतात.
मात्र ओंकाराच्या उच्चारात कशाचाच संयोग किंवा वियोग होत नाही. त्यामुळे त्याला अनाहत नाद असे म्हणतात. ते जिचे स्वरूप आहे अशी.
परात्परतरां- सर्व अधिक श्रेष्ठ असणाऱ्या नानार्थतत्वात्मिकां- विविध प्रकारच्या तत्त्वांनी अर्थात शास्त्र सिद्धांतांनी युक्त्य असणाऱ्या,
मीनाक्षीं प्रणतोऽस्मि संततमहं कारुण्यवारांनिधिम् - कारुण्याचा जणू काही महासागर असणाऱ्या आई मीनाक्षीचे मी सतत वंदन करतो.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
May 14, 2020
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.
September 8, 2018
रोग झाला की, वैद्य आठवावा, गरजेपुरता त्याला वापरावा. त्याने दिलेला औषधसल्ला पाळावा. नंतर रोग विसरावा. (आणि वैद्य देखील !) म्हणून तर आपल्याकडे म्हण पडली आहे, गरज सरो, वैद्य मरो !
July 27, 2017
श्री गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा. श्री स्वामी समर्थांमध्ये या तिन्ही रूपांचा समावेश होतो. खरंतर स्वामींकडे तुम्ही ज्या भावनेने पाहता तेच रूप तुम्हाला त्यांच्यात दिसेल म्हणूनच स्वामींच्या काही मठांमध्ये आपल्याला त्यांची स्त्री देवतेच्या रूपातली आदिशक्ती मूर्ती प्रतिमा दृष्टीस पडते. निदान ते रूप पाहून तरी आपण त्या शक्तीचा आदर केला पाहिजे.
August 19, 2022
सहजच म्हंटल जातं. “आमक्या कडे इतकं असून सुद्धा त्याला अजिबात Ego नाही”(पैसा, बुद्धी, सौदर्य, कला किंवा काहीही) म्हणजे इतरांपेक्षा कुणा कडे काही जास्त असेल तरच त्याला Ego ची मुभा असते का ?
September 3, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti