(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मंदिरात दोष पाहु नयेत

    एकदा श्री टेंबे स्वामी तथा वासुदेवानंद सरस्वती मंदिरात पूजेस बसले असता कुणी तरी मंदिरात नैवेद्यासाठी प्रसादाचे पंचपक्वानांचे ताट आणून दिले.

    प्रसादाचे ताट पाहून तेथील ब्राह्मण पुजा-याचा मोह अनावर झाला. त्याने ते नैवेद्याचे ताट त्वरित खाऊन टाकले. तेंव्हा श्री टेंबे स्वामी फार चिडले. त्याला खूप बडबडले व नंतर पुजेस बसले.

    पुजा संपल्यावर श्रीगुरु दत्ताञेय गाभाऱ्यातून निघून जाताना त्यांनी पाहिले. त्यानंतर तीन दिवस त्यांना श्री गुरु दत्ताञेयांनी दर्शन दिले नाही. ते बैचेन झाले. त्यांना कळले मी पुजा-याला टाकून बोललो म्हणून श्रीगुरु दत्ताञेयांना राग आला असणार.

    तेव्हा श्री टेंबे स्वामी सरस्वतींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तसेच त्यांच्या मुखातून करुणा ञिपदीचे बोल बाहेर पडले. 'शांत हो श्रीगुरु दत्ता, मम चित्ता शमवी आता ।। शांत हो श्रीगुरु दत्ता, मम चित्ता शमवी आता ।।' करुणा ञिपदीचे हे बोल ऐकून श्रीगुरु दत्ताञेय श्री टेंबे स्वामी सरस्वतींच्या समोर उभे राहिले.

    तेव्हा श्री टेंबे स्वामी म्हणाले, "देवा माझे काही चुकले असे मला वाटत नाही. तुला नैवैद्य दाखवायच्या अगोदर त्या पुजा-याने तो खाऊन टाकला".

    तेव्हा श्री गुरु दत्ताञेयांनी प्रश्न केला, " इथे सत्ता कोणाची ? " ह्या प्रश्नावर श्री टेंबे स्वामी म्हणाले, " देवा इथे सत्ता तुमची आहे. इथे सारे तुमच्या इच्छेने चालते ". त्यावर श्री गुरु दत्ताञेय म्हणाले, "अरे तो पुजारी गेली तीन दिवस उपाशी होता. त्याच्या साठी मी ते ताट पाठवले होते. ते त्याने खाल्ले. त्यात तुझे काय गेले ?" त्यावर श्री टेंबे स्वामी सरस्वतींना आपली चूक कळली व श्री गुरु दत्ताञेय अंतर्धान पावले.

    या अध्यात्मिक मार्गात प्रामाणिक पणे वाटचाल करणाऱ्या माणसाची देवाकडून गुरु कडून क्षणाक्षणाला परीक्षा बघितली जाते. इतका हा मार्ग कठीण आहे.

    टेंबे स्वामी हे अधिकारी पुरुष होते एका रागामुळ्ये त्यांची ही अवस्था झाली. आपण तर सामान्य माणस आपण जर राग आवरु शकलो नाही तर आपली आयुष्यभराची साधना व्यर्थ ठरु शकते.

    ??आपण ज्या मंदिराला जातो तेथे एकच गोष्ट लक्षात ठेवावी, त्या मंदिरात त्या देवाची सत्ता असते. तिथे काय घडते ते पाहू नये. तिथे चालणाऱ्या सर्वच गोष्टींकडे त्या देवतेचे लक्ष असते. मंदिरातील सेवेकरी, पुजारी, विश्वस्त यांचे सर्व कृत्य त्या देवाला माहीत असते.

    ज्या ठिकाणी ईश्वरी शक्तीचे सत्तेचे अधिष्ठान असते तेथे सामान्य माणसाने फक्त ईश्वरी इच्छेचा आदर करावा.............

      October 17, 2016


  • निरंजन – भाग ३१ – माता कालीरात्री

    कालीरात्री हा दुर्गामातेचा सातवा अवतार आहे. कालचा अर्थ आहे मृत्यू आणि रात्रीचा अर्थ आहे काळोख, अंधकार, अज्ञान…. अज्ञानरूपी काळोखाला मॄत करण्यासाठी स्वतः दुर्गामातेने कालीरात्रीचे रूप धारण केले. जगाच्या संरक्षणाकरीता मातेचा हा रक्षणरुपी अवतार…..

      October 30, 2020


  • सिनेमा बनताना – बॉम्बे टू गोवा

    ”दिल तेरा है, मै भी तेरी हु सनम “ या गाण्याच्या वेळी अमिताभ बच्चन याचे गुडघे सोलवटले होते, पण सांगणार कोणाला? नवखा होता ना, त्याही परिस्थितीत त्याने गुडघ्याला रुमाल बांधून शुटींग केले. “देखाना हाय रे सोचाना “ गाण्याच्या वेळी अमिताभ बच्चनला १०२ ताप होता. एक दिवस शुटींग थांबले. पण शुटींग जास्त थांबवून चालणार नव्हते म्हणून मेहमूदने त्याला सांगितले तुला जमतील तश्या स्टेप्स कर, व सहकलाकारांना  त्याला प्रत्येक सीन नंतर टाळ्या वाजवून प्रोत्साहन द्या असे सांगितले. तरीही त्याने असा काही डान्स केला कि शंकाही येत नाही कि त्याने तापामध्ये शुटींग केले असेल.

      September 1, 2022


  • अनाहूत कॉल्स व एसएमएस पासून मुक्तता

    मोबाईल ग्राहकांची नको असलेल्या कॉल्स व एसएमएस पासून मुक्तता करण्यासाठी दूरसंचार नियामक मंडळाने म्हणजेच ‘ट्राय’ने आता नवीन नोंदणी प्रक्रिया सुरु केली आहे. याचे वैशिष्ट्य असे की, यात सात प्रकारात वर्गीकृत केलेल्या आपल्या आवडीच्या वर्गातले एसएमएस पूर्णतः किंवा अंशतः प्राप्त करण्याचे अथवा बंद करण्याचे पर्याय उपलब्ध केले असून आठवा पर्याय वापरून सर्वच कॉल्स व एसएमएस बंद करता येतील.

      February 8, 2011


  • घटस्फोट आणि भारतीय संस्कार…

    आपल्या देशात हल्ली घटस्फोटाचं प्रमाण वाढू लागलयं हा कित्येकांसाठी चिंतनाचा आणि चिंतेचा विषय ठरू लागलेला आहे.

    आपल्या देशातील हे वाढतं घटस्फोटाचं प्रमाण दिवसेन- दिवस वाढतच जाणार आहे त्यामुळे भविष्यात आपल्या देशातील घटस्फोटाचं प्रमाण कमी होईल या भ्रमात कोणीच राहाता कामा नये आणि ते प्रमाण कमी व्हाव म्ह्णून प्रयत्न करणे म्ह्णजे उंठावरून शेळ्या हाकण्यासारखे आहे. त्यामुळे घटस्फोटाच्या वाढत्या प्रमाणामुळे भविष्यात उद्भवणार्‍या समस्यांना सामोर जाण्यासाठी समाजाची मानसिकता तयार व्हायला हवी.

    प्रेमविवाहाचं वाढत प्रमाण आणि घटस्फोटाचं वाढत प्रमाण याचा परस्पराशी काहीही संबंध नाही तो संबंध विनाकारणच लावला जातो. स्त्री-परुष समानतेच वारं, स्त्रियांची झालेली सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगती, पुरुषांची ढासळती नैतिकता, समाजातील वाढता स्वैराचार आणि होत चाललेला सांस्कृतिक र्‍हास या वाढत्या घटस्फोटाच्या मुळाशी आहे. आज आपल्या देशात घटस्फोट रोखण्यासाठी जो काही आटा - पिटा केला जातोय तो निरर्थकच म्हणावा लागेल.

    आज आपल्या देशात समलैंगिक विवाहांना, लिव्ह-ईनला जवळ – जवळ स्वीकारलं आहे ना मग तसचं आज ना उद्या घटस्फोटांनाही स्वीकारावं लागणारचं आहे. पूर्वीच्या काळी फक्त शरीर सुखासाठी लग्न होत नसतं पण आता ती फक्त शरीर सुखासाठीच होतात हे मान्यच करावं लागेल कारण आज आपल्या देशात होणार्‍या घटस्फोटासाठी जोडीदार शरीरसुख देण्यास असमर्थ अथवा त्याचे असणारे विवाह बाहय संबंध अथवा त्याची व्यसनाधिनता अशी कारणेच पुढे केली जातात. ही सर्व कारणे पूर्वी अस्तित्वात नव्हती का ? होती ना ? पण त्यावेळी सामाजिक दबावामुळे सहसा कोणी घटस्फोट घेण्याच्या भानगडीत पडत नसे आणि तेंव्हा पत्नी – पतीकडून घटस्फोट मागण्याचे प्रमाण कमी होते. आज जर नवर्‍याने बायकोला घटस्फोट दिला तर तिला अबला म्हटले जाते. आणि बायकोने नवर्‍याला घटस्फोट दिला तर त्याला नामर्द समजले जाते.

    आज आपल्या देशात घटस्फोटाचं प्रमाण वाढतय त्याला स्त्री- पुरूष दोघेही सारखेच जबाबदार आहेत हे ही लक्षात घ्यायला हवे. वाढत्या घटस्फोटाला फक्त पुरूषांनाच दोष नाही देता येणार. स्त्रियांच्या व्यसनाधिनतेच आणि ढासळत्या नैतिकतेच प्रमाण समाजात मोठ्या प्रमाण वाढू लागलेल आहे सध्या समाजात घडणार्‍या गुन्हयात स्त्रियांचा सहभाग दखल घेण्याजोगा दिसू लागला आहे. घटस्फोट हे प्रकरण हल्ली कित्येकांच्या जीवावरही बेतू लागलेलं आहे.

    विवाहसंस्था ज्या उद्देशाने अस्थित्वात आलेली होती आता तो उद्देशच नाहिसा झालेला आहे. समर्पण, त्याग, विश्वास, नात्याशी बांधिलकी हया गोष्टी लग्न संस्थेतून हद्दपार झालेल्या आहेत. आज काही लग्न बरीच वर्षे टिकतात तेंव्हा लोकांना आश्चर्य वाटत पण ती लग्न खरोखरचं टिकलेली असतात की टिकवलेली असतात हे जाणून घेण्याचा कोणी प्रयत्न करतो का ? पुर्वी जेंव्हा संस्कार शाबूत होते तेंव्हा नवरा- बायको दोघेही शेवटच्या श्वासापर्यत लग्न टिकविण्याचा प्रयत्न करत असत. नवरा – बायकोसारखे संबंध नसताना फक्त जगासाठी नवरा-बायको म्ह्णून एका छताखाली राहात असत फक्त आपल्या मुलांसाठी ! पण आता स्त्रियांची मुलांबाबतची ती बांधीलकी ही ढासळू लागली आहे.

    पाश्चात्यांच वाढत अंधानुकरण या बाबतीत आपल्या गळ्याशी येणार आहे कारण पाश्चात्यांची घटस्फोट पचविण्याची मानसिकता कधीच तयार झालेली आहे पण आपल्याकडे ती मानसिकता तयार करण्याऐवजी आपण उगाच घटस्फोटाचं प्रमाण कमी करण्यासाठी झटतो आहोत.

    नवरा बायको या दोघांपैकी एकाला जेंव्हा घटस्फोट हवा असतो तेंव्हा तो एकानं नाकारण म्ह्णजे मुर्खपणा आहे कारण त्यातून मनस्ताप आणि आयुष्यभराची फरफड याशिवाय काहीही साध्य होत नाही. पूर्वी पुरूषांना एकापेक्षा जास्त विवाह करण्यास समाज मान्यता होती त्यामुळे पूर्वी घटस्फोटाच प्रमाण कमी होत असं नाही म्ह्णता येणार कारण आपल्या संस्कृतीने घटस्फोट कधी मान्यच केलेला नव्हता. आता फक्त घटस्फोट घेऊन प्रश्न सुटत नाही कारण त्यानंतर घटस्फोट घेणारे वेगवेगळ्या जोडीदारांसोबत पुन्हा विवाह करतात त्यातून जन्माला येणारी मुलं आणि पूर्वीच्या विवाहातून जन्माला आलेली मुलं यामुळे अत्यंत गंतागुंतीचे नातेसंबंध निर्माण होतात त्यामुळे पुढची पिढी गुन्हेगारी प्रवृत्तीची म्ह्णून पुढे येण्यास हातभार लागतो.

    आता आपल्या देशातील वाढत्या घटस्फोटाचं प्रमाण रोखण्यापेक्षा आपली भारतीय संस्कृती आणि संस्कार जपण्यासाठी प्रयत्न होण्याची अधिक आवश्यकता आहे नाही का ?

    लेखक – निलेश बामणे.
    मो. 8652065375 / 8692923310

      March 15, 2016


  • सक्रांतीचं अढळपद

    वास्तविक आपले सण असे नियमितपणे एका ठराविक तारखेला कधीच येत नाहीत. त्यांच्यात वर्षागणिक बदल होत असतात. मग ती गणेश चतुर्थी असो, दसरा असो, गुढी पाडवा असो की दिवाळी असो.

      April 21, 2011


  • प्रमुख आहारसूत्र – आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग दहा

    लॅबची कमाल, रिपोर्ट ची धमाल भाग 6

    एकदा दवाखान्यात एक जोडपे आले. बायको एकामागून एक तक्रारी सांगत होती.
    माझे डोके दुखते, चक्कर आल्यासारखे वाटते, डोळ्यासमोर काळोख येतो, छातीत धडधडते, घशाला कोरड पडते, पोटात ढवळते, हात पाय वळतात, झोप लागत नाही. पायाची बोटे सुन्न होतात....... इ.इ. पायापासून डोक्यापर्यंत सर्व अवयवांच्या तक्रारी एकामागून एक सांगत गेली. म्हटलं, सर्व शरीर तपासून घेऊया. एक कागद फाडून दिला. माझं काम संपलं.

    .......रुग्णांना पण हौस खूप असते, असल्या तपासण्या करून घेण्याची. आणि काहीवेळा काहीजण तर इतके अतिहुशार असतात आणि डाॅ. गुगुल यांच्याकडून मिळवून, "हे घ्या एम आर आय पर्यंतचे सर्व रिपोर्टस्." असं म्हणून टेबलावर आपटतात.

    एखाद्या नवविवाहितेला तिच्या दागिन्यांचे एवढे कौतुक नसेल, तेवढे हे केलेले मेडीकलचे रिपोर्टस् दाखवण्यात काही जणांना असते.
    असो.

    .......तर त्या बायकोला कोण आनंद झाला, तपासणी करण्याचा. म्हणाली, "बरं झालं, एकदा कळेल, काय झालं आहे मला ते ! "
    नवरा बिचारा गप्प होता. म्हणाला, "मला पण तो रिपोर्ट काढायचा कागद द्या. कंपनीकडून तपासणीसाठीचे पैसे मिळणार आहेत, घेतो तपासून !" त्याला दुसरा कागद फाडून दिला, माझं काय जात होतं ?

    संध्याकाळी दोघंही परत आली, वहिनींचा चेहरा पडलेला, "काय हो झालं ? काही रिपोर्ट मधे काही गंभीर गडबड कळली का ? " मी सहजपणे (पण चेहेऱ्यावर तेवढाच गंभीर भाव आणून) विचारलं.
    ती तोंड एवढंस करत म्हणाली, " कशातच दोष मिळाला नाही."
    "बरं झालं ना मग."
    "एवढे पैसे खर्च केले पण कुठेच दोष मिळाला नाही, असं कसं ?" आता मात्र मला हसू आले, "अहो, चांगलंच आहे. त्यात वाईट काय ? "
    म्हणाली,
    "मला हे एवढे ढीगानी आजार. पण रिपोर्ट सगळे नाॅर्मल. पण ह्यांना काय सुद्धा होत नाय्ये, पण यांचे सगळे रिपोर्ट अॅबनाॅर्मल. असं कसं ?"

    बघितलं तर खरंच नवऱ्याचे जवळपास सर्व रिपोर्ट अॅबनाॅर्मल होते. त्रास काहीही नव्हता, सहज म्हणून रिपोर्ट केलेले, ते अॅबनाॅर्मल.

    आता माझ्या समोर मोठ्ठा प्रश्न होता,
    औषधे कोणाला द्यायची ?
    जिला त्रास आहे पण रिपोर्ट नाॅर्मल आहेत तिला, की ज्याला काहीही त्रास नाही, पण रिपोर्ट नाॅर्मल नाहीत, त्याला ?????

    शेवटी लॅबवरील रिपोर्ट वरूनच खरं उत्तर मिळाले. त्यावर तीन शब्द लिहिले होते..
    Please correlate clinically.
    कृपया जुळवून बघा क्लिनिकली.
    म्हणजे रुग्ण सांगतोय त्या तक्रारीशी जर लॅबचा रिपोर्ट जुळला तर औषध. नाहीतर नको.

    म्हणजे यंत्र काहीही सांगूदेत, जर त्याचा त्रास रुग्णाला जाणवत नसला किंवा तशी शंका नसली तर यंत्र काय सांगतेय, ते महत्त्वाचे नाही. शरीर काय सांगते ते जास्त महत्वाचे !

    सुटले कोडे मिळाले उत्तर!
    आणि फक्त वहिनींनाच औषध दिले.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    20.02.2017

      February 20, 2017


  • ऑफसेट छपाईची प्लेट करण्याच्या पद्धती

    एग अल्युमिनियम, गम डीप एच, वॉटर डीप एच, पीएस फ्लेटस,सीटीपी इत्यादी पद्धतींनी फ्लेटस तयार करता येते. ह्यापैकी काही ठिकाणी वॉटर डीप एच ही पद्धत लहान फ्लेट्स बनविण्यासाठी वापरतात. बाकी पद्धतींपैकी फक्त पीएस फ्लेट्स व सीटीपी आता वर्तमानपत्रात वापरल्या जातात.

      May 26, 2023


  • पंतप्रधान आले अन् गेले!

    हा लेख तुमच्या हातात पडेपर्यंत पंतप्रधानांचा विदर्भ दौरा आटोपला असेल, या दौऱ्याची फलश्रुती तुमच्या समोर असेल; परंतु हा लेख लिहीत असताना पंतप्रधानांचा दौरा सुरू झालेला नव्हता. त्यामुळे पंतप्रधानांच्या या दौऱ्याने विदर्भाला काय मिळेल, ते कितपत परिणामकारक ठरेल याचा इथे केवळ अंदाज करणे शक्य आहे. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या पंतप्रधानांना कुठेतरी अस्वस्थ करून गेल्या आणि म्हणूनच त्यांनी इथल्या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा, इथल्या लोकांच्या समस्या थेट त्यांच्याकडूनच समजून घेण्याचा निर्णय घेतला यात शंका नाही.

      July 2, 2006


  • निरंजन – भाग १८ – निंदा

    एखाद्याने केलेली निंदा ही ऐकणार्‍याने सकारात्मकतेने ऐकली तर बरे… नाहीतर एखादी व्यक्ती आधीच स्वत:च्या विचारांनी व्यापलेली असेल तर्…काही चांगले न होता त्याच्याकडुन बरेच असे वाईट घडुन जाते. म्हणुनच खरेतर ही म्हण “निंदकाचे घर नसावे शेजारी” अशी असायला हवी. 

      July 13, 2020