(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अनुभव वास्तुतज्ज्ञाचे

    व्यवसायातले अनुभव म्हणजे एक प्रकारचे शिक्षणच आहे. म्हणतात ना, अनुभवातून माणूस शिकतो, सावरतो, कधी शहाणपण येते तर कधी सर्किटही बनतो, मात्र संवेदना जागृत होऊन सिंहावलोकन ही करता येते आयुष्याचे..

      November 25, 2024


  • लढा सीमेचा – लढा अस्मितेचा !! (भाग ७)

    ३ मे १९५९ पासून मराठी भाषिक प्रदेशात साराबंदीचा प्रचार करण्यात आला. सीमा भागातील १५० गावात साराबंदीचे आंदोलन सुरू करण्याचे ठरविण्यात आले. परंतु हे आंदोलन करतांना दोन महत्वाचे निर्णय घेण्यात आले. साराबंदी आंदोलन करताना मराठी व कानडी भाषिकांत संघर्ष होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी व साराबंदीचा निर्णय गावच्या जनतेने स्वयंस्फुर्तीने घ्यावा, असे ते दोन निर्णय होते. त्याला लोकांचा प्रतिसादही मिळाला.

      September 13, 2021


  • शिकेकाई – बहुगुणी वनस्पती

    ही परिचित व उपयुक्त काटेरी वेल भारतात सर्वत्र ओलसर जंगलात (दख्खन, कोकण व उ. कारवार, आंध्र प्रदेश, आसाम व बिहार), तसेच चीन, मलाया व म्यानमार या देशांत आढळते. बाजारात ‘शिकेकाई’ या नावाने तिच्या शेंगा मिळतात.

    ⇨ बाभूळ, ⇨ खैर व ⇨ हिवर इत्यादींशी शिकेकाई समवंशी असल्याने त्यांच्या अनेक शारीरिक लक्षणांत सारखेपणा आढळतो. ह्या वनस्पतींच्याअॅकेशिया ह्या प्रजातीतील एकूण ७०० जातींपैकी भारतात फक्त सु. २५ आढळतात.

    शिकेकाईचे खोड जाडजूड असून फांद्यांवर लहान पांढरट ठिपके [छिद्रे; वल्करंध्र] व टोकास वाकडे लहान काटे असतात. पाने एकाआड एक, संयुक्त व पिसासारखी असून मध्यशिरेवर बारीक वाकडे काटे व देठाच्या मध्यभागी खालच्या बाजूस ग्रंथी असतात.

    दलांच्या ४-८ जोड्या व दलकांच्या १०-२० जोड्या असतात. फुले गोलसर झुपक्यात [स्तबकासारख्या; → पुष्पबंध] येतात. ती लहान व पिवळी असून मार्च ते मे महिन्यांमध्ये येतात.

    फुलांची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ लेग्युमिनोजी कुलात (अथवा शिंबावंत कुलात) व मिमोजॉइडी अथवा शिरीष उपकुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. शुष्क फळ (शेंग) चपटे, जाड, ७·५-१२·५ X २-२·८ सेंमी., लालसर पिंगट, सुरकुतलेले व काहीसे गाठाळ असते. बिया ६-१०, काळ्या व गुळगुळीत असून फळे तडकून त्या बाहेर पडतात.

    शिकेकाईची पूड पाण्यात उकळून स्नानाकरिता वापरतात. केसातील दारुणा व उवा यांचा त्यामुळे नाश होतो आणि केसांची वाढ चांगली होते.

    त्वचा कोरडी पडत नाही. रेशमी व गरम कपडे आणि डाग पडलेली चांदीची भांडी व उपकरणे धुण्यास ती पूड चांगली असते.

    खोडाची साल ही मासे पकडण्याची जाळी व दोर रंगविण्यास आणि त्यांचा टिकाऊपणा वाढविण्यास वापरतात.

    हळद व शिकेकाईची पाने यांपासून हिरवा रंग मिळतो.

    कोवळ्या पानांची चटणी (मीठ, चिंच व तिखट घालून केलेली) अथवा पाने काळ्या मिरीबरोबर खाण्यास काविळीवर चांगली; पानांचा रस आंबट व सौम्य रेचक आणि हिवतापावर गुणकारी असून शेंगांचा काढा पित्तनाशक, कफोत्सारक (कफ पातळ करून पाडून टाकणारा), वांतिकारक (ओकारी करविणारा) व रेचक (जुलाब करविणारा) असतो.

    शिकेकाईची पूड घालून केलेले मलम त्वचारोगांवर लावतात.

    चीनमध्ये व जपानात मूत्रपिंडाच्या व मूत्राशयाच्या विकारांवर शेंगा वापरतात.

    बिया सुलभ प्रसूतीकरिता देतात.

    गुरांना विषबाधा झाल्यास शिकेकाई बियांसह ताकात वाटून पाजावी.

    बाजारात शिकेकाईची सुगंधी पूड मिळते.

    शिकेकाईचे काही गुणधर्म रिठ्याप्रमाणे असतात [→ रिठा], कारण शेंगात सॅपोनीन हे ग्लायकोसाइड ५% असते. शिकेकाईयुक्त साबण बाजारात उपलब्ध आहेत. ‘सप्तला’ ह्या नावाने सुश्रुतसंहितेत शिकेकाईचा निर्देश शाकवर्गात केलेला आढळतो.

    -- सुषमा मोहिते
    ( आरोग्यदूत व्हॉट्सअॅप ग्रुपच्या सौजन्याने )

      March 13, 2017


  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग अठरा

    अवयवांना आपले काम करायला एक विशिष्ट स्पेस हवी असते. जी स्पेस या गॅसच्या दबावामुळे मिळत नाही, आणि चांगले निरोगी असलेले अवयव देखील काऽही काम करू शकत नाही.

      April 2, 2017


  • कपालभातीचा परिणामकारक चमत्कार

    कपालभातीकड़े आजार घालवणारा प्राणायाम म्हणून पाहिलं जातं. कपालभाती करून जे कुबड्यांशिवाय चालू शकत नव्हते ते कुबड्यांशिवाय पळू लागलेले मी पाहिले आहेत. कपाभातिमुळे साधक आत्मनिर्भर होतो. स्वयमपूर्ण होतो.

      October 7, 2017


  • जानेवारी ३० : कर्टली अ‍ॅम्ब्रोजचे एका धावेत सात बळी !

    अ‍ॅलन बॉर्डर ज्या चेंडूवर बाद झाला तो चेंडू पहिला मानून जो एन्जेल (पदार्पणवीर) बाद झाला तिथपर्यंतचे कर्टली अ‍ॅम्बोजने टाकलेले चेंडू मोजल्यास ते अवघे ३२ भरतात आणि या बत्तीस चेंडूंवर अ‍ॅम्ब्रोजने केवळ एक धाव दिलेली होती !!

      January 30, 2016


  • चांगल्या कळफलकाच्या निकषांपेक्षा सर्व-स्वीकृत कळफलक अभ्यासणे गरजेचे.

    मराठी जनमाणसात मराठीचा जास्तीत जास्त वापर संगणकावर व्हावा या हेतूने वरील लेखाचे प्रयोजन केलेले आहे. त्यात इंस्क्रिप्ट कळफलक रचना व युनिकोड अक्षरवळणांचा वापर ही दोन तत्वे वापरण्याचा आग्रह केलेला आहे.

      December 28, 2010


  • बँक ऑफ महाराष्ट्रचा स्थापना दिन

    मराठी लोकांची आणि या लोकांच्या घराघरात पोचलेली एक राष्ट्रीयीकृत बॅंक म्हणून बॅंक ऑफ महाराष्ट्रची एक वेगळी ओळख आहे. तिचे मुख्यालयही पुण्यासारख्या शहरात दिमाखदारपणे उभे आहे.

      September 16, 2021


  • सदगुरुंच्या बोधाचं पालन हीच खरी नीती

    सद्गुरू सगुण देहात नसले तरी ते बोध करतात आणि त्या बोधाचं पालन हीच खरी नीती. कारण जीवनातली सर्व अनीतीच ती थोपवते!

      July 9, 2017


  • पक्षीपरिचय १६

      October 4, 2015