वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आपल्या सर्वांच्या परिचयाची आणि ब-याचं मंडळीच्या आवडीची हि हिरवीगार भाजी.ताजी टवटवीत असताना दिसते देखील सुरेख नाही का?
आपण ह्याचे बरेच पदार्थ खाण्या करीता बनवतो.पालक पनीर तर ब-याच जणांच्या आवडीचे,आलूपालक,पालकाची भजी,पालकाचे सूप,पालकाची शेव इ.
पण हाच पालक काही आजारांमध्ये आपण घरचा वैद्य म्हणून देखील वापरू शकतो बरे का!
पालकाचे लहान हातभर उंचीचे क्षुप असते.आणी ह्याची पाने भाजीसाठी वापरतात.हा चवीला गोड,कडू व थंड असतो.त्यामुळे तो शरीरात वात व कफ दोष वाढवतो व पित्त कमी करतो.
चला मग ह्याचे औषधी उपयोग पाहूयात ना!
१)ज्या आजारांत ताप येतो जसे घसा फुलणे,फुफ्फूसांत कफ भरणे,श्वासनलिकेस सुज येणे ह्यात ह्याच्या पंचांगाचा काढा वापरतात.
२)१/४ कप पालकाच्या पंचांगाचा रस+४ चमचे ब्राम्हीचा रस+ १ चमचा साखर हे मिश्रण रोजरात्री जेवल्यावर साधारण २ १/२ तासांनी व झोपायच्या पुर्वी १/२ तास नियमीत घेतल्यास मानसिक थकवा कमी होतो व बुध्दीची धारणा शक्ती वाढते.
३)घशात जळजळ होत असल्यास पालकाच्या पानांच्या रसांच्या गुळण्या कराव्यात.
४)खोकला येऊन कफसुटत नसल्यास पालकाच्या पानांचा चहा १ कप+१ चमचा मेथी पूड+१/२ चमचा मध हे मिश्रण काही दिवस घ्यावे.
५)ज्यांना वारंवार चमचमीत खाऊन शरीरात पित्त वाढते आणी अंगाचा दाह,हातपायांची जळजळ,पोटात आग होणे अशा तक्रारी होतात त्यांनी १/४ कप पालकरस + शहाळ्याचे पाणी १/२ कप हे मिश्रण रोज सकाळी उपाशी पोटी व संध्याकाळी ४ वाजता घ्यावे फायदा होतो.
पालकाच्या अतिवापराने युरीकअॅसीड वाढते.
-- वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
October 19, 2016
वारकरी संप्रदायाची व भजनाची महान परंपरा असलेल्या महाराष्ट्रात ‘महायोगपीठे तटे भीमरथ्या’ ही भजनाच्या पंचपदीची ओळ कानावर पडली नाही असा मनुष्य सापडणे विरळाच. हे श्रीमद् शंकराचार्यांनी रचलेले अत्यंत भक्तिपूर्ण पांडुरंगाष्टकम् भुजंगप्रयात वृत्तात गुंफलेले असून गावयासही सोपे आहे.
July 17, 2021
डॉ. श्रीराम लागू, संध्या, नीळू फुले, वत्सला देशमुख यांच्या यांनी आपल्या अभिनयाने हा चित्रपट उंचीवर नेऊन ठेवला. या सिनेमाने रसिक प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. ‘पिंजरा’ ही एका तत्वनिष्ठ व ब्रम्हचारी शिक्षकाची केवळ एका वारांगनेच्या क्षणीक मोहाच्या पिंजऱ्यात अडकून झालेल्या त्याच्या नैतीक, आत्मीक व सामाजीक अध:पतनाची कथा आहे.
March 31, 2022
इंग्लंडमध्ये १९९० साली ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात त्याने यजमानांबरोबरच्या कसोटी सामन्यात पहिले शतक झळकावले होते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिले द्विशतक फटकावण्याचा मानही सचिनच्याच नावावर आहे. १९९९ साली सर डॉन ब्रॅडमन यांनी सचिनवर स्तुतिसुमनांचा वर्षांव करत त्याला भेटीसाठी बोलावले होते.
November 15, 2021
महाराष्ट्र राज्याच्या अन् पर्यायाने देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासातील सहकार क्षेत्राचे महत्व ओळखून, सहकार चळवळीच्या निकोप वाढीसाठी ठोस उपाययोजना करण्याचा विचार गेल्या दोन दशकांपासून सुरू आहे.
१९०४ मध्ये सर्वप्रथम भारतात सहकार कायदा अस्तित्वात आला. त्यानंतर अनेकवेळा कायद्यात बदल झाले. १९०४ नंतर १९१२ मध्ये को-ऑपरेटिव्ह सोसायटी अॅक्ट अस्तित्वात आला.
या पार्श्वभूमीवर नुकतेच संसदेने सहकारविषयक १११ वी घटना दुरुस्ती मंजूर केल्याने, त्यानुसार प्रत्येक राज्याला आपल्या कायद्यात योग्य ते बदल करावे लागणार आहेत. संबंधित घटना दुरुस्ती विधेयक हे जरी डिसेंबर २०११ मध्ये मंजूर झालेले असले, तरी त्याची सुरुवात डिसेंबर १९९०-९१ मध्येच झालेली होती. प्रस्तुत पुस्तकात श्री. विद्याधर अनास्कर यांनी हा प्रवास अत्यंत सोप्या आणि ओघवत्या भाषेत मांडला आहे. सहकार क्षेत्रातील प्रत्येकाने आणि इतरांनीही हा प्रवास जाणून घेणे आवश्यक आहे. एखादे विधेयक मंजूर झाल्यानंतर आपण त्या अंतिम विधेयकामधील वाक्यरचनेचाच विचार करतो. परंतु त्यामागील शासनाचा उद्देश आणि त्यासंबंधात झालेल्या चर्चेचा अभ्यास केल्यास कायदा करणार्यांच्या मनामध्ये नेमके काय आहे ते समजाऊन घेणे सोपे जाते. तसेच एखादे विधेयक मंजूर होते म्हणजे नेमके काय होते, त्याची प्रक्रिया कशी चालते. त्यामागे कितीजणांचे हातभार लागतात, याची कोणतीच माहिती सामान्यांना नसते.
संसदेच्या दोन्ही सभागृहांत मंजूर झालेल्या या घटना दुरुस्ती विधेयकामधील तरतुदींनुसार ज्यावेळी राज्याचा कायदा दुरुस्त करण्याची वेळ येईल, त्यावेळी या सहकार क्षेत्रातील सामान्यातील सामान्य कार्यकर्त्यांने त्यामध्ये आपल्या विचारांचे योगदान देणे आवश्यक आहे. परंतु हे कधी शक्य होईल? ज्यावेळी या कार्यकर्त्यांना या घटना दुरुस्ती मागील संपूर्ण पार्श्वभूमी समजेल त्याचवेळी हे शक्य होईल आणि हे महत्त्वाचे काम प्रस्तुत पुस्तकाने केले आहे.
लेखक श्री. विद्याधर अनास्कर यांनी आपल्या मनोगतामध्येच १९०४ पासूनच्या सहकार कायद्यांचा आढावा घेतला आहे. सध्याच्या कायद्याविषयी स्पष्ट मतप्रदर्शन केले आहे. विधेयकाच्या २२ वर्षांच्या प्रवासाचे चित्र रेखाटताना थोडक्यात परंतु अत्यंत प्रभावीपणे हा प्रवासपट आपल्या डोळ्यांसमोर उभा केला आहे. स्थायी समितीचे कामकाज, विधेयकातील मुद्यांवर होणारी चर्चा, उच्चस्तरीय समितीसह इतरांचे अहवाल, निष्कर्ष, केंद्रशासनाची भूमिका व शेवटी संसदेच्या सभागृहांचा कौल इत्यादी वर्णने त्यांनी प्रभावीपणे रेखाटली आहेत.
तसेच या पुस्तकात संदर्भासाठी लेखकाने उच्चस्तरावरील समितीच्या अहवालापासून स्थायी समितीचा अहवाल, सदस्यांमध्ये व शासकीय अधिकार्यांमध्ये प्रत्यक्ष झालेली चर्चा सारांश रूपाने दिली आहे. तसेच या घटना दुरुस्तीसंबंधात लेखकाने केलेली अभ्यासपूर्ण चिकित्सा हे देखील या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. अशा प्रकारे एका विधेयकायचे प्रवास वर्णन रेखाटणारा हा पहिलाच प्रयत्न असावा.
या पुस्तकाला महाराष्ट्र राज्याचे सहकार व संसदीय कार्य मंत्री मा. श्री हर्षवर्धन पाटील यांची प्रस्तावना लाभली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुस्तकावर अभिप्राय दिलेला आहे.
हे पुस्तक सहकार क्षेत्रातील सर्व अभ्यासकांना, तसेच सहकार विभागातील अधिकार्यांना, जागृत सभासदांना आणि विद्यार्थ्यांसह सामान्य नागरिकांनाही अत्यंत उपयुक्त ठरेल, यात शंकाच नाही.
मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी आणि महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील तमाम कार्यकर्त्यांसाठी श्री विद्याधर अनास्कर यांनी हे पुस्तक इ-बुक स्वरुपात मोफत उपलब्ध केले आहे. हे इ-पुस्तक जरुर डाउनलोड करा.
प्रकाशक
दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. मुंबई
भारतीय क्रिडा मंदिर, चौथा मजला, वडाळा
मुंबई - ४०००३१.
आवृत्ती पहिली : जून २०१२
आवृत्ती दुसरी : जून २०१२
किंमत : रु. १५०/-
-- मराठीसृष्टी व्यवस्थापन
December 25, 2013
भारतीय रेल्वेमधील स्वप्ननगरीचं सुख अनुभवावयाचं असेल, तर ‘पॅलेस ऑन व्हील्स’ या एकमेव अतिश्रीमंत गाडीचं नाव समोर येतं. देशाचा अभिमान, असलेली ही राजेशाही गाडी नवी दिल्लीहून निघून पुढे जैसलमेर, जयपूर, जोधपूर, रणथंबोर (व्याघ्र प्रकल्प), आग्रा असा आठ दिवसांचा आरामदायी व आनंददायी प्रवास घडविते. या गाडीचा प्रत्येक डबा म्हणजे पारंपरिक भारतीय पद्धतीनं सजविलेला महालच आहे.
June 7, 2022
भारत ब्रिटिशअंमलमुक्त झाल्यानंतरच्या कालचक्रातील 16 वार्षिक आवर्तने पूर्ण झाल्याच्या दिवशी कसोटी सामन्यांमधील गोलंदाजाचे पहिले त्रिशतक पूर्ण झाले. (सतरावा किंवा आजचा तथाकथित ’त्रेपन्नावा स्वातंत्र्यदिन’ असे म्हणणे ही शब्दांची क्रूर थट्टा तर आहेच…
August 15, 2010
अकंठेकलंकादनंगेभुजंगाद-
पाणौकपालादफालेऽनलाक्षात् |
अमौलौशशांकादवामेकलत्राद-
हंदेवमन्यं न मन्ये न मन्ये ‖ ३५ ‖
एखाद्या कवीच्या प्रतिभेला अचानक बहर येतो. एखादी सुंदरतम कल्पना साकार होते. ही कल्पना इतकी रम्य असते ती स्वतः कवीच तिच्या प्रेमात पडतो. पुन्हा तशीच रचना करण्याची स्वाभाविक ऊर्मी जागृत होते. या सिद्धांतानुसार तयार झालेला हा श्लोक.
आचार्यश्री म्हणतात,
अकंठेकलंकात्- ज्यांच्या गळ्याला कलंक म्हणजे डाग नाही,
अनंगेभुजंगात्- ज्यांच्या हातामध्ये दंडामध्ये सर्प बांधलेले नाहीत,
अपाणौकपालात् - ज्यांच्या हातामध्ये कपाल म्हणजे भगवान ब्रह्मदेवांच्या कापलेल्या मस्तकाच्या कवटीचा भाग नाही,
अफालेऽनलाक्षात् - ज्यांच्या मस्तकावरील नेत्रातून अग्नी उसळत नाही,
अमौलौशशांकात् - ज्यांच्या मौली वर अर्थात मस्तकावर चंद्र विलसत नाही,
अवामेकलत्रात्- ज्यांच्या डाव्या अंगावर पत्नी विराजमान नाही,
अहं देवमन्यं न मन्ये न मन्ये - अशा अन्य कोणालाही मी देव मानतच नाही.
मागील श्लोकातील गुणवैशिष्ट्यामध्ये भर घालत हलाहल विष प्राशन केल्यामुळे आलेले नीलकंठत्व आणि ब्रह्मदेवांच्या मस्तकाचे हाती धरलेले कपाल या भगवान शंकरांच्या दोन गुणवैशिष्ट्यांचे वर्णन त्याच शैलीत आचार्यश्री करतात.
हे नसेल तर तो देवच नाही यातून त्यांच्या अविभाज्य लक्षणांचे वर्णन केले. कारण यांच्याशिवाय भगवान शंकरांचे स्वरूप पूर्ण होत नाही. तसेच या गोष्टी भगवान शंकरां शिवाय अन्य कोणतीच देवता बाळगतही नाही.
त्यामुळेच या गोष्टींचे आणि याशिवाय मी देवाला मानत नाही या उच्चारातून आचार्य श्री स्वतःच्या एकनिष्ठेची घोषणा करीत आहेत.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
July 14, 2020
राखेतून फिनिक्स पक्ष्याचा जन्म होतो, असे म्हणतात. मात्र कचऱ्यातून एखाद्या राष्ट्राची अर्थव्यवस्था बळकट होऊ शकते किंवा एखाद्या राष्ट्राचा उकीरडाही होऊ शकतो. आज भारतात अशीच परिस्थिती आहे.
June 20, 2004
आपण कुटुंबप्रिय व समाजप्रिय आहोत. दैनंदिन जीवनात आपले अनेकां बरोबर संबंध येत असतात. कुटुंबातील सदस्यांनी जशी काही बंधने पाळायची असतात, तसेच अमुक एका परिस्थितीत कसे वागावे याचे काही निकष समाजाने स्वीकारलेले असतात. यापेक्षा वेगळी वागणुक दिसून आली तर ती समाजमान्य नसते. मग असं वागणार्याला ‘वेडा’ ठरविलं जातं ते योग्य आहे का, असा मला प्रश्न पडतो. याचे उत्तर देण्याआधी काही उदाहरणे देतो.
March 26, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti