(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • माहिती आधारित व्यवस्थापन

    हल्ली “data” असा शब्द ऐकला की पटकन डोळ्यासमोर software किंवा माहिती तंत्रज्ञान हे जग डोळ्यासमोर येते. प्रत्यक्षात मात्र डेटा म्हणजे कुठलीही संकलित केलेली माहिती जिच्यावर कुठलेही संस्कार / विश्लेषण झालेले नसते. असा डेटा विश्लेषण करण्यासाठी वापरण्यासाठी उपयुक्त ठरतो, ज्यातून पुढे कृती करून अपेक्षित परिणाम घडवून आणता येतात. बहुतेक कंपन्या समस्या सोडविण्याच्या वेगवेगळ्या कौशल्यांचे प्रशिक्षण त्यांच्या कर्मचाऱ्यांना सतत देत असतात. पण त्या शिक्षणाचा पुरेसा उपयोग करून घेतांना दिसत नाहीत. प्रत्यक्षात असे आढळून येते की अगदी क्वचितच डेटाचा उपयोग विश्लेषण करण्यासाठी वापरला जातो.

      August 7, 2026


  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – ११

    अयं दानकालस्त्वहं दानपात्रं
    भवानेव दाता त्वदन्यं न याचे |
    भवद्भक्तिमेव स्थिरां देहि मह्यं
    कृपाशील शंभो कृतार्थोऽस्मि तस्मात् ‖ ११ ‖

    भगवंताला आपण देव म्हणतो. त्याचा शास्त्रीय अर्थ जरी दिव्यतायुक्त असा असला तरी श्रद्धावानांच्या मनातील अर्थ जो देतो तो देव असा साधा-सोपा असतो. भगवंताच्या या दातृत्वाचा विचार आचार्यश्री या श्लोकात आधारभूत मानत आहेत.
    ते म्हणतात,
    अयं दानकाल:- हा दानाचा काळ आहे. कारण आत्ता मी आपल्यासमोर याचक स्वरूपात उभा आहे. मला आत्ता आपल्या कृपेची आवश्यकता आहे. त्यामुळे कोणी मागणारा असेल, आणि त्याला ज्या वेळी आवश्यकता असेल तीच दानाची खरी वेळ. या हिशोबात ही दानाची वेळ आहे.
    त्वहं दानपात्रं- मी दानास पात्र आहे. दान नेहमी पात्र व्यक्तीलाच द्यावे. ज्याच्याजवळ एखादी गोष्ट नसते तो ती गोष्ट प्राप्त करण्यास पात्र आहे. हे भगवंता माझ्यावर आपली कृपा झालेली नाही. त्यामुळे मी कृपेला पात्र आहे.
    भवानेव दाता- आपण दाता आहात. आपल्याजवळ देण्याची क्षमता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दातृत्वाची भाव अर्थात देण्याची इच्छा देखील आहे.
    त्वदन्यं न याचे - आपल्या शिवाय अन्य कोणालाही मी मागत नाही.
    आता इतक्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या नंतर आपण मला कृपेचे दान देणार नाही तर कुणाला देणार?
    भवद्भक्तिमेव स्थिरां देहि मह्यं- मला आपली स्थिर भक्तिप्रदान करा. भगवंताच्या चरणी नेमके काय मागायचे? हेच आचार्यश्री येथे सांगत आहेत. त्या चरणाशी व्यवहारातील सामान्य गोष्टी नव्हे तर भगवंताच्या भक्तीची मागणी हीच एकमेव योग्य मागणी आहे.
    कृपाशील - हे कृपाशील अर्थात कृपा हा ज्यांचा स्वभाव आहे अशा भगवंता.
    शंभो - हे कल्याणकारका !
    आपण माझ्यावर अशी कृपा केली की,
    कृतार्थोऽस्मि तस्मात- त्यामुळे मी कृतार्थ होईल. मग माझ्या आयुष्यात करण्यासारखे काहीही उरणार नाही. माझे जीवन सफल होईल.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      June 20, 2020


  • ८१ वर्षांची राणी..दख्खनची राणी

    पुणे मुंबई प्रवास करणार्‍या प्रत्येकाच्या मनाचा एक कोपरा दख्खनच्या राणीने व्यापलायं. दख्खनची राणी हे बिरूद मिरविणारी मुंबई-पुणे डेक्कन क्वीन आज (१ जून २०११ रोजी) ८१ वर्षांची झाली…कोळशाच्या जागी विजेवर धावणारे इंजिन जोडण्यात आले, प्रवासी संख्येबरोबर डब्यांची संख्या वाढत गेली, रंगसंगती बदलली.. आणि दिवसेंदिवस ही दख्खनची राणी तरूणच होत गेली…

      June 1, 2011


  • विचार, विचार करण्यायोग्य किंवा विचार करण्याजोगे …………

    आपल्या आयुष्याला घडविणारे जे विचार थोरामोठ्यांनी प्रगट केलेत, तेच विचार थोड्या वेगळ्या पद्दतीनी पाहिल्यास त्यातुन प्रगत्नारे विचार दर्शन.

      December 3, 2010


  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग चौसष्ट

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 20-धूपं समर्पयामी-भाग एक

    षोडशोपचार पूजेमधील पुढील उपचार आहे, धूप दाखवणे. देवासाठी धूप दाखवणे. निर्गुण रूपातल्या ईश्वराला सगुण रूपातील मूर्तीमधे स्थापन करून त्या देवत्वाला धूप दाखवणे. असा हा उपचार !

    वनस्पतिरसोद्भूतो गंधाढ्यो गंध उत्तमः।
    आघ्रेयः सर्व देवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम् ।।

    असा मंत्र म्हणत धूप दाखवायचा आहे.
    उत्तम वनस्पतीच्या उत्तम रसापासून निर्माण झालेला, सुगंधी द्रव्यांमध्ये उत्तम गंध असलेला, सर्व देव देवतांना ज्याचा गंध आवडतो असा धूप मी तुला अर्पण करतो, त्याचा तू स्विकार कर, अशी प्रार्थना करायला सांगितलेली आहे.

    या सुगंधी धुपातून तयार होणाऱ्या धुराच्या वासाने वातावरणातील अनिष्ट आणि अदृश्य शक्ती नष्ट होतात. वातावरण सुगंधीत व्हावे, प्रसन्न व्हावे, याकरीता देवाच्या नावे हा धूप सर्व घरामधे पसरवला जातो.

    आजच्या भाषेत सर्व घर "फ्युमिगेट" केले जाते. फ्युमिगेशन ही प्रक्रिया आजही ऑपरेशन थिएटर निर्जंतुकीकरणामधे जगभरात वापरली जाते. जे न देखे रवि ते देखे कविच्या स्टाईल मधे जिथे कोणतेही स्थूल द्रव्य अथवा द्रव द्रव्य पोचू शकत नाही, अशा लपलेल्या ठिकाणी हे सूक्ष्म वायुरूप औषध त्वरीत पोचते आणि तेथील छुपलेल्या सूक्ष्म आणि स्थूल दोन्ही जीवजंतुंना बाहेर काढते. देवाला धूप का दाखवायचा ? या प्रश्नाचे हे आहे एका वाक्यातले उत्तर.

    खरंच आहे. साधे घर साफ करायचे असेल तर प्रथम केर काढला जातो. स्थूल रूपातील म्हणजे डोळ्यांना सहज दिसतात असे पाल, उंदीर, असे मोठे जीव आणि ढेकूण, किडे, डास, चिलटे, कोळी, मुंगी, वाळवी, असे घरात लपलेले उपद्रवी छोटे छोटे किटक बाहेर काढले जातात. ( आपले रहाते घर, ज्याला मी 'माझे माझे' म्हणत असतो, पण या माझ्याशिवाय कितीतरी जण या माझ्या निवासस्थानात रहात असतात, हे सांगताना, अनेक प्रकारच्या किड्यांचे वर्णन समर्थांनी दासबोधामधे केलेले आहे.)
    तर असे हे छोटे मोठे किटक केरसुणीने घराबाहेर काढता येतात. पण जमीनीखाली, किंवा फरशीवर चिकटलेले काही जीवजंतु केरसुणीने काढता येत नाहीत, यासाठी गोमूत्र कालवलेल्या शेणाने सारवून घेणे, पाण्यात विभूती, गोमूत्र टाकून सर्व काचा दरवाजे, तावदाने पुसुन घेणे, शेणखळा किंवा सडा टाकणे, अगदी आजही फिनेल, डेटाॅल, सॅव्हेलाॅन, हार्पिक, लायझाॅल इ.इ. द्रव द्रव्य म्हणजेच सॅनिटायझर वापरून उरलेले, चिकटून राहिलेले जंतु धुवुन टाकले जातात. घराची, जमिनीची जेवढी स्वच्छता करता येईल तेवढी आपण करीत असतो. यासाठी घन, द्रव पदार्थ वापरत असतो. परंतु एवढ्या उपायांनी पूर्ण घर स्वच्छ शुद्ध होत नाही. छत आणि जमिन यांच्यामधेही काही भाग शिल्लक असतो, जिथे शुद्धी करणारे घन अथवा द्रव पदार्थ पोचू शकत नाहीत. इथे धूर उपयोगी होतो.

    भिंतीना पडलेल्या सूक्ष्म भेगा, कपाटांच्या मागे, बेडच्या खाली, उशी, बेडशीट, गाद्यांच्या मधे, कौलारू घरात कौलांच्या मधे लपलेले सापासारखे स्थूल जीव, किंवा फ्रीजच्या मागे, टीव्हीच्या मागे, स्पीकर बाॅक्सच्या मागे, पुस्तकाच्या कपाटातील कसर, केरसुणीने पण जाणार नाही किंवा तिथे सॅनिटायझर पण वापरता येणार नाही. अशा सर्व ठिकाणी धूपं समर्पयामी.
    जिथे इतर कोणतेही घन अथवा द्रव द्रव्य पोचू शकणार नाही, अशा ठिकाणी जंतुनाशक म्हणून वायुरूप द्रव्य सहज पोचते आणि जंतुनाशनाचे काम करते.

    आले का काही लक्षात ? कोणत्या देवासाठी धूप घालायचा आहे तो !
    खरं तर हा धूप देवासाठी नाहीच आहे, तो आहे दानवांसाठी ! पण "मिडीयाला" कसे सांगणार ? देवाला आवडतो म्हणून देवासाठी आम्ही धूप जाळतो, असं सांगितले की सगळेच खुश !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    13.06.2017

      June 13, 2017


  • आऊ यांग्लिनची अग्नी परीक्षा !

    दैनिक प्रत्यक्षच्या विश्वगंगेच्या तीरावरील सदरात ‘आऊ यांग्लिन’च्या जीवन संघर्षाचा सिद्धार्थ नाईक यांनी उलगडून दाखविलेला क्लेशदायक पण जिद्दी जीवनपट वाचण्यात आला.

      November 28, 2015


  • टॉकीज चा जन्म

    ३ मे १९१३ रोजी गिरगावातील 'कॉरोनेशन सिनेमा' च्या परिसरात जमलेल्या गर्दीनं एक अद्भुत क्षण अनुभवला. दादासाहेब फाळके निर्मित "राजा हरिश्चंद्र" हा भारतीय चित्रपट जगतातील पहिला चित्रपट या दिवशी दाखवण्यात आला आणि ह्या मूकपटाच्या प्रदर्शनानं भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासाचा श्रीगणेशा झाला. दादासाहेब फाळके यांनी "राजा हरिश्चंद्र‘ या चित्रपटाद्वारे प्रथमच "हलत्या चित्रां‘चे दर्शन घडवीत भारतीयांच्या "चित्रपट वेडाची‘ मुहूर्तमेढ रोवली. गेल्या शंभर वर्षांत हिंदी चित्रपटसृष्टीने मोठी भरारी घेतली असतानाच मराठी, तमीळ व बंगालीसारख्या प्रादेशिक भाषांतील चित्रपटांनीही आपलं महत्त्वपूर्ण योगदान दिलं. "हलत्या चित्रांचा विजय असो,‘ म्हणत फाळक्यांनी लावलेल्या वृक्षाचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे. परदेशामध्ये फिल्मच्या मदतीने पडद्यावर हलते चित्रपट दाखविण्याचा प्रयोग होऊ लागला व हे तंत्रज्ञान भारतात आणण्यासाठी दादासाहेब फाळके या अवलियानं कंबर कसली व "राजा हरिश्चंद्र" च्या रूपानं भारतात मोठ्या पडद्यावर हलती चित्रे दिसली. "भस्मासुर मोहिनी‘ फाळकेंच्या दुसऱ्या चित्रपटात अभिनेत्रीचा प्रवेश झाला आणखी एक इतिहास घडला. फाळकेंकडून प्रेरणा घेऊन अनेक निर्माते व दिग्दर्शक चित्रपट निर्मितीकडे वळले.

    १९१८ मध्ये इंडियन सिनेमॅटोग्राफ कायदा पास झाला व मुंबई, कलकत्ता, मद्रास व लाहोर बोर्ड १९२० मध्ये सुरू झाले. कलकत्त्यामध्ये धीरेन गांगुली व मुंबईमध्ये चंदुलाल शहा यांनी ब्रिटिश आणि जर्मनांची मदत घेत चित्रपट आधुनिक करण्यास सुरवात केली. हिमांशू रॉय यांनी "द लाइट ऑफ एशिया‘ची निर्मिती करीत भारतीय सिनेमाला आंतरराष्ट्रीय दर्जा दिला. १९२९ मध्ये प्रभात फिल्म कंपनीची स्थापना झाली. याच दरम्यान इम्पिरिअल फिल्म कंपनीने १४ मार्च १९३१ ला "आलम आरा‘ या भारतातील पहिल्या बोलपटाची निर्मिती केली. या चित्रपटात प्रथम गाण्यांचा समावेश केला गेला व चित्रपटाच्या यशामुळे भारतीयांच्या गाणी व संवादांच्या आवडीचं बीज रोवलं गेलं! चलचित्रांबरोबरच आवाजही आल्यानं "टॉकीज‘चा जन्म झाला.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      May 4, 2017


  • तुम्ही महिला आहात म्हणून…

    तुम्ही परंपरा समजून मंगळसूत्र घालता का ? की सौभाग्याचं लेणं म्हणून ….स्त्रीच्या गळ्यात मंगळसूत्र असलं म्हणजे तिचं रक्षण होतं असं कुठे आहे भर दिवसा विवाहित स्त्रीच अपहरण बलात्कार होतोच आहे . मग शहर असो की खेडे दिल्ली पासून गल्लली पर्यंत हे वावटळ थांबलेलं नाही ….

      August 18, 2018


  • खजूर

    एक अत्यंत पौष्टिक आणि संपूर्ण जीवनसत्त्वे, खजिने असलेले म्हणजे खजूर खजूर हे म्हणजे अरबस्तानातील नाईल नदीच्या तीरावर आढळतात. अरबस्तानातील जवळ जवळ सर्वच लोक अगदी नियमितपणे खजूर खातात कारण त्यामुळे प्रत्येकाची काम करण्याची शक्ती प्रचंड वाढते.

      December 10, 2023


  • ज्ञात अज्ञात पंढरपूर १ – चंद्रभागा मंदिर

    पंढरी क्षेत्राची नगर परिक्रमा करताना चंद्रभागा घाटावर चढून वर आले कि सुमारे ५० टाळकरी उभारतील एवढ्या दगडी सपाचे पश्चिम बाजूस पुर्वाभिमुख असलेले हे छोटे खानी पण सुंदर दगडी उत्तर पेशवाई थाटाचे मंदिर दिसते. शिखराची मोड तोड झालेली, भिंतींचा अन् शिखराचाही रंग उडालेला असे हे दुर्लक्षित अज्ञात मंदिर. मात्र दुर्दैवाने याची कुणाला माहितीच नाही. गावकऱ्याना हे मंदिर चंद्रभागेचे आहे हे ज्ञात नाही तर महाराष्ट्र अन् परराज्यातील गावोगावातून भक्तांना काय कळणार?

      July 13, 2020