(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • हार्ड डिस्क

    पूर्वीच्या काळी जे शब्द फक्त विज्ञान किंवा तंत्रज्ञान शिकलेल्या माणसांच्या तोंडी असायचे ते आता सर्वांनाच परिचयाचे झाले आहेत. संगणक क्षेत्राशी संबंधित असलेला असाच एक शब्द म्हणजे हार्ड डिस्क. हार्ड डिस्क म्हणजे आपल्या टेबलवर असलेल्या संगणकाचे हृदय असते, ते बंद पडले तर संगणक कामच करू शकत नाही.

      September 5, 2023


  • भ्रष्टाचारावर उपाय आहे, पण तो करायची आपली तयारी आहे काय?

    आपल्या जीवावर निवडून आलेल्या राज्यकर्त्यांकडून आणि आपल्याच पैशांवर मिळणाऱ्या सातव्या-आठव्या वेतन आयोगाच्या पगारावर पोसली जाऊनही पुन्हा आपल्यालाच लुबाडायला तयार असणाऱ्या नोकरशाहीकडून आपण ‘डंके की चोट’पर नागवले जातोय हे कळतंय, पण आता नेमकं काय करावं, हे न कळल्याने निर्माण झालेल्या असहाय्यतेतून, सार्वजनिक यंत्रणाविषयीची सामान्य जनतेच्या मनातली पराकोटीची चीड मी गेले दोन-तिन दिवस अनुभवतोय. या सर्वाॅचा मला एकच प्रश्न होता, की हे संपणार आहे की नाही? संपणार असेल, तर कधी? आणि कसं?… हेच सुचवणारा माझ्या ‘अस्वस्थ मन’ या नविन सदरातील पहिला लेख.

      January 3, 2018


  • डॉ. जॉन हेशॅम गिबन (ज्युनिअर) – ‘हार्ट-लंग’ मशीनचे जनक

    ‘हार्ट-लंग’ मशीनच्‍या विकासामुळे ‘ओपन हार्ट’ शस्त्रक्रियेची गरज अधिकांशाने पूर्ण झाली. डॉ. जॉन हेशॅम गिबन (ज्‍युनिअर) यांच्‍याकडे या प्रणालीच्‍या विकासाचे जनकत्‍व जाते. दि. ६ मे १९५३ रोजी डॉ. गिबन यांनी ‘हार्ट-लंग’ मशीनच्‍या सहाय्याने शस्‍त्रक्रिया केली. यशस्‍वीपणे पार पडलेली ही पहिली ‘ओपन हार्ट’ शस्‍त्रक्रिया मानली जाते.

      February 20, 2019


  • ‘सैराट’ चित्रपट प्रदर्शित झाला

    या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर धूमाकुळ घातला होता. ‘सैराट’चित्रपटाने ‘दणदणीत १०० कोटींचा गल्ला जमवला होता. सैराटला अजय-अतुल यांचे संगीत होते. नागराज मंजूळे यांची उत्कृष्ट पटकथा व लेखक होते. ‘सैराट’ चित्रपटाची जादू पाहून बॉलिवूड चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने हिंदी रिमेक करण्याचा निर्णय घेतला होता.

      April 30, 2022


  • केळ्यांतली गुंतागुंत

    केळ्याचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न बराच पूर्वीपासून सुरू आहे. लागवड केली जाणारी आजची केळी ही केळ्यांच्याच विविध जाती-उपजातींत झालेल्या संकरातून निर्माण झाली आहेत. आजच्या मुसा अ‍ॅक्युमिनाटापासून निर्माण झालेल्या केळ्यांत, या जातीच्या जनुकांबरोबरच इतर काही जंगली केळ्यांतील जनुकही अस्तित्वात असल्याचं पूर्वीच माहीत झालं आहे.

      December 6, 2022


  • हेडफोन

    हेडफोनने श्रवणाच्या क्षेत्रात मोठीच क्रांती केली आहे यात शंका नाही. आजकाल आपण मोबाइल फोन, एमपी ३ प्लेयर यातही हेडफोनचा वापर करतो त्यामुळे फोन कानाला लावायची गरज राहात नाही.

      September 29, 2023


  • कोकणातील सागरी मासेमारी

    महाराष्ट्र राज्याला विशेषतः कोकणामध्ये खारे, गोडे आणि निमखारे पाणी असे तिन्ही प्रकारचे नैसर्गिक जलस्रोत उपलब्ध आहेत. या उपलब्ध असलेल्या नैसर्गिक जलस्रोतांच्या सुयोग्य नियोजनाद्वारे मत्स्य उत्पादन वाढवून नीलक्रांती घडविणे ही काळाजी गरज आहे. देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासात मत्स्य व्यवसायाचा महत्त्वाचा वाटा आहे. कोकणामध्ये सागरी मासेमारी व्यवसायामुळे  आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गातील लोकांकरिता स्वस्त व पोषक अन्न उपलब्ध होते. त्याचबरोबर रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात. या अनुषंगाने या लेखामध्ये कोकणातील सागरी मासेमारी या विषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.

      April 14, 2023


  • आधुनिक हृदयशल्यचिकित्सा: एक प्रवास

    आधुनिक हृदयशल्यचिकित्सा: एक प्रवास

    आज जरी आपल्याला यातील बऱ्याच शस्त्रक्रिया अगदी सोप्या ‘रुटीन’ वाटत असल्या तरी शंभर काय अगदी पन्नास वर्षांपूर्वीची परिस्थिती फारच निराळी होती. हृदय-प्रत्यारोपण ही सगळ्यात वरची पायरी होती पण तेथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याआधी बरेच प्रयत्न झाले. खरेतर १८९६ मध्येच पहिली हृदय-शस्त्रक्रिया करण्यात आली.

      March 12, 2018


  • दातदुखीवर नैसर्गिक उपाय

    लवंगेचे तेल उर्फ क्लोव ऑइल हा दातदुखीवरचा सर्वात प्रभावी नैसर्गिक उपाय मानला जातो. लवंगेचे थोडे तेल काळ्या मिर्या्सोबत मिसळा व ते कापसाच्या बोळ्यावर घेऊन दुखणार्या दातावर ठेवा.

    मोहरीच्या तेलाने देखील दातदुखी कमी होते. हे तेल व मिठाचे मिश्रण हिरडीच्या दुखर्या भागावर चोळा.

    लिंबाच्या रसाच्या थेंबांनी देखील दातदुखी कमी करता येते.

    दुखर्या दातावर किंवा हिरडीवर कांद्याचा ताजा कापलेला तुकडा ठेवल्याने ही दातदुखी कमी करता येते.

    दातदुखीवर उपयोगी झाडपाल्याचे अर्क वापरून आपणही घरच्याघरी माउथवॉश बनवू शकता – कॅलेंड्युला (कॅलेंड्युला ऑफिसिनालिस), मर्र (कॉमिफोरा मर्रा), सेज (साल्विया ऑफिसिनालिस). बेसिल, मार्जोराम किंवा ऍसाफेटिडासारख्या इतर वनस्पतींचाही वापर ह्यासाठी करता येईल.

    दुखर्यान दाताला बाहेरील बाजूने (गालावर) बर्फाचा खडा दाबून धरल्यानेही दातदुखीपासून थोडा आराम मिळू शकतो.

    अचानक दातदुखी सुरू झाल्यास अति गरम, अति गार तसेच अति गोड पदार्थ खाणे कटाक्षाने टाळा अन्यथा दुखणे वाढेल.

    आहाराच्या सवयी बदलणे, भाज्या तसेच फळे भरपूर प्रमाणात खाणे आणि विशेषतः जंक फूड न खाणे ह्याने दातदुखी टाळता येते.

      April 10, 2017


  • विरोधाभास आवडीचा

    मला जुनी हिंदी गाणी आवडतात.अगदी सिनेमा भारतात आला तेव्हापासून आत्तापर्यंत!अर्थात आत्ताची काही निवडक गाणी आवडतात. सत्तरच्या दशकापर्यंत आणि आत्ता यांच्या तुलनेत अगोदरची गाणी जास्त आवडतात. गाणी आवडतात म्हटलं की त्याचे गायक, गायिका,संगीतकार, गीतकार, त्यात अभिनय करणारे कलाकार हे ही आवडतातच की!!

      January 24, 2024