वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आज आपल्या देशात विकलांग चिकित्सा करताना सर्वसाधारणपणे आढळून येणारी बाधा म्हणजे गुडघा या सांध्याचा दाह. स्त्रियांमध्ये या रोगाचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात दिसते. स्थुलता हे एक महत्त्वाचे कारण यामागे आहे. विशेषतः ५५ ते ६० या वयोवर्यादेनंतर अशा व्याधीचा त्रास जाणवू लागतो. वजन पेलणाऱ्या या गुडघ्याच्या सांध्यातील कास्थी झिजतात व सांध्यातील हाडांची टोके एकमेकांवर घासू लागतात.
June 16, 2023
शीर्षक वाचून यू ट्यूब वरचा एखादा व्हिडिओ समोर आल्यासारखे वाटले का ? यू ट्यूब म्हणा किंवा इतर कोणतेही सोशल मिडियाचे माध्यम असेल , सगळीकडेच काही मिनिटात काही तासात किंवा काही दिवसात एखादा आजार दूर करण्यासाठी सांगितलेल्या हजारो अफलातून कल्पना सुचवलेल्या आढळतील .
October 22, 2022
वर्षातले ४० ते ४५ दिवस पाऊस पडतो. ते पाणी बाकीच्या ३२५ दिवसांत काटकसरीने सर्व प्रकारच्या कामासाठी वापरावे लागते, म्हणून जलसाठे करणे भाग पडते.
July 12, 2023
शरीराचं तापमान वाढतं ते या यंत्रणेला विविध मार्गांनी संदेश मिळतात म्हणून. जंतूजन्य आजारात शरीरात जंतूंच्या अस्तित्वामुळं आणि लढाईमुळं जे काही रासायनिक बदल होतात, त्यामुळे या संस्थेला तापमान वाढवण्याचे संदेश मिळतात व तपमान वाढवलं जाते.
या वाढवलेल्या तापमान जंतूंच्या शरीरातल्या अनेक रासायनिक क्रिया बंद पडतात व त्याचा परिणाम म्हणून ते अर्धमेले होतात किंवा वाढू शकत नाहीत.
यासाठी शरीराला येणारा ताप हा उपयुक्तच समजला पाहिजे. मात्र हे तापमान असंच वाढत गेलं तर आपल्याच शरीराला त्याचा त्रास होऊ लागतो आणि कधी कधी मेंदूला हे तापमान सहन न झाल्यानं झटके येतात. यालाच ‘तापातले झटके’ असे म्हणतात. काही मुलांमध्ये एखाद्या आजारात पटकन् ताप वाढण्याची ठेवण असते तर काही मुलांची तापमान योग्य राखण्याची यंत्रणा चांगली काम करत रहाते, म्हणून ताप वाढत नाही. दोन्ही गोष्टी फारशा चांगल्या नाहीत. पहिल्या बाबतीत मुलाला तापाचा प्रत्यक्ष त्रास होतो. तर दुसऱ्यात, आजार नक्की कोणता हे चटकन् समजून न आल्यानं त्याचा अप्रत्यक्षपणे त्रासच होतो. म्हणूनच माफक प्रमाणात ताप येणं दोन्ही दृष्टीनं चांगलं असतं असं समजायला हरकत नाही. तापाच्या तीव्रतेवर आजाराची तिव्रता ठरत नसते. मला खूप रडल्यानं ताप येतो ही चूकीची समजूत आहे. बाळ ताप आल्यामुळं खूप रडतं आणि नंतर ते आपल्या लक्षात येतं.
ताप हा आपल्या शरीराचा मित्रच आहे.
ताप हे अनेक आजारांचं प्राथमिक लक्षण असतं. याउलट कितीतरी गंभीर आजारांत ताप फार चढलेला दिसत नाही, तरीही ते प्राणघातक असू शकतात. मात्र जास्त ताप चढलेलं मूल ताप असतांना तरी जास्त गंभीर रीतीनं आजारी असल्यासारखं दिसतं. म्हणून आजाराचं खरं स्वरूप मुलाचा ताप उतरवल्यानंतरच पहावं.
ताप येणा-या मुलाचा हा ताप कशामुळं येतोय हे शोधण्याचा प्रयत्न करावा. त्याच्या प्रत्येक अवयव संस्थेचं काम व्यवस्थित होतंय ना हे पहावं. तसंच तापाच्या जोडीला काही अवयव किंवा संस्थेच्या बिघाडाची लक्षणं दिसताहेत का हे पहावं. उदा. सर्दी खोकला - श्वास मार्ग, फुफ्फुसं यांचा बिघाड दाखवतात. तर उलटी जुलाब पोट, आतडी लिव्हर यांच्यातला बिघाड सुचवतात आणि लघवीचा त्रास मुत्रमार्गाचा बिघाड. बाळाचा दैनंदिन कार्यक्रम कसा आहे त्यावरून म्हणजे, त्याचं खाणं, पिणं, शू चं प्रमाण, उलटी इ. गोष्टींवरूनही आजाराचा गंभीरपणा दिसतो.
ताप कसा मोजावा?
हातानं कपाळ किंवा पोटाचं तापमान पाहणं हे अगदी प्राथमिक तपासणं झालं. पण याने आपण तापाचा एक साधा अंदाज मांडू शकतो. ताप खरं तर शरीराच्या आतल्या भागातला मोजायला हवा. शी च्या जागी थर्मामीटर घालून किंवा तोंडात जिभेखाली धरून. मुलं खूप कपडयात गुंडाळल्यानं गरम लागतात, तर उघडी ठेवल्यास गार पडलेली असतात म्हणून आतून तपमान मोजणंच योग्य.
जी मुलं थर्मामीटर चावण्याची शक्यता असते त्यांच्यात शक्यतो शीच्या जागेचं तापमान मोजावं. सर्वच मुलांचा ताप अशा तऱ्हेने मोजायची जरूरी नाही पण वरून ताप लागत नाही तरीही मूल मलूल वाटतंय अशी अवस्था असेल तर मुलाला ताप आहे की नाही हे नक्की करण्यासाठी असा ताप पहाणं आवश्यक आहे. इतर वेळी काखेत घाम नसल्यास काखेतलं किंवा मोठया मुलांचं काही गार किंवा गरम न खाता पिता तोंडातलं तापमान मोजावं. थर्मामीटर १ पूर्ण मिनिट जागेवर धरून ठेवावा लागतो. तो त्वचेला निट लागून राहिला नाही तर तापमान नोंदीत चूक होते आणि १ पूर्ण मिनिट मुलांच्या काखेत थर्मामीटर धरून ठेवणं अवघड जातं म्हणून मुलांचा ताप मोजणं अवघड वाटतं. म्हणून मुलांचा ताप मोजणं हे कौशल्याचं काम आहे.
त्वचेपेक्षा काखेतलं आणि काखेपेक्षा आतल्या भागाचं तापमान १-१ डिग्रीनं जास्त असतं.
तापातले झटके:
मेंदूला एकदम वाढणारा जास्त ताप सहन न झाल्यानं झटके येतात. पूढे हळू हळू मेंदू जस जसा वाढतो तसतशी त्यात हे तपमानाचे बदल पचवायची शक्ती येऊन मग असे तापातले झटके येणं बंद होतं. हे झटके येण्याचं नेहमीचं वय म्हणजे ६ महिन्यापासून ते ६ वर्षांपर्यंत. एखाद्या कुटुंबांत हे प्रमाण अनुवंशिकही दिसतं या झटक्यांनंतर मुलाला मोठेपणी फिटस् किंवा एपिलेप्सी असा आजार राहू शकेल का, याची काळजी पालकांना लागलेली असते. मुलाला फक्त तापातच झटके आले असतील आणि घरात फिटस् मुळं त्याच्या बुध्दीवर किंवा वाढीवर कोणताच विपरित परिणाम होणार नसतो हे समजावून घेतलं तर आई वडिलांच्या मनातली भीती आणि काळजी आपोआप कमी होईल.
मुलाला तापात झटका आला तर काय करावं?
सर्वप्रथम त्याला सुरक्षित ठिकाणी निजवून शरीराला इजा होत नाही ना बघवं. लाळ येत असेल तर पुसावी. थोडयाच सेकंदात किंवा मिनिटात झटका थांबतो. त्याची वाट पहावी. झटका थांबत असतांना श्वास नीट होतोय ना हे पहावं. मूल काळं निळं पडलं असेल तर आता रंग झपाटयानं बदलून गुलाबी होतोय ना हे पहावं. शुध्दीवर येतोय ना, हे पहावं, आणि मग अंग पाण्यानं पुसत ताप उररवायला सुरूवात करावी.
थोडयाच वेळात मूल हालचाल करू लागतं. कण्हू लागतं किंवा रडू लागतं. हीच तो शुध्दीवर येत असल्याची खूण आहे. अशावेळी त्याला चिमटा काढला तर ते दुखल्याचं त्याच्या चेहऱ्यावर दिसतं, म्हणजेच त्याला आता समजू लागलंय असं आपल्याला समजतं. हा वेळ मोजायचा प्रयत्न करावा. या सर्वाची नीट नोंद घेऊन सर्व अचूक माहिती डॉक्टरांना देण्याचा प्रयत्न करावा. या माहितीचा डॉक्टरांना उपचारांसाठी उपयोग होतो.
अशा मुलांना ताप न उतरवल्यास पुन्हा झटका येण्याची शक्यता असते. म्हणून ताप औषधांनी, इंजेक्शननी , अंग पुसून कसाही पण जलद उतरवावा. स्पजिंग करतांना शरीराचा जेवढा भाग मिळेल तितका कोमट काटामोड पाण्यानं पुसून आपोआप कोरडा होवून द्यावा. त्यामुळं शरीरातील उष्णता हे पाणी वाळवायला वापरली गेल्यानं तपमान उतरायला मदत होते.
ताप उतरवण्यासाठी बर्फाचं पाणी वापरू नये. कोमट पाणी वापरावे.
या कामासाठी बर्फाचं पाणी वापरू नये. त्याचा उपयोग कमी होतो आणि त्याचा त्रास झाल्यानं मूलही पुसू देत नाही. तसंच नुसत्या कपाळावर घडया ठेवण्यापेक्षा सर्व अंगाचा पृष्ठभाग वापरला तर ताप झटकन् उतरतो. या दोन गोष्टी लक्षात ठेवाव्यात. पुसत रहाण्याचं काम १५ ते २० मिनिटं केलं म्हणजेच ताप उतरतो. म्हणून एकदा पुसून थांबू नये.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
January 6, 2017
‘रॅन्समवेअर व्हायरस’ म्हणून ओळखला गेलेला आत्तापर्यंतचा सर्वात मोठा सायबर हल्ला झाल्यान शुक्रवारचा दिवस हा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी काळा दिवस ठरला. ‘वन्नाक्राय’ या रॅन्समवेअर व्हायरसने अक्षरश: धुमाकूळ घातला. सायबर सिक्युरिटी फर्म ‘अव्हास्ट’ने सांगितले की, भारतासहशंभराहून अधिक देश या हल्ल्याचे शिकार झाले.
या हल्ल्याचा सर्वात जास्त फटका इंग्लडला बसला. इंग्लडमधील हॉस्पिटल्स आणि टेलिफोन यंत्रणा यामुळे खिळखिळी झाली. अनेक हॉस्पिटल्समध्ये तर रुग्णांचे आॅपेरेशन आणि अपॉइंटमेन्ट देखील रद्द करावे लागले तर अनेक ठिकाणी रुग्णांचा डेटा नसल्यामुळे डॉक्टरांवर कागद व पेन घेऊन रुग्णांचा चार्ट तयार करण्याची वेळ आली.
हा व्हायरस पसरू नये यासाठी रेनॉल्ट या फ्रेंच मोटार उत्पादक कंपनीस फरान्स व स्लोवेनियामधील कारखाने बंद ठेवावे लागले. अमेरिकेत ‘फेडएक्स’ या सामानाची वाहतूक करणाऱ्या बलाढ्य कंपनीलाही याच्या दुप्रभावापासून वाचण्यासाठी पावले उचलावी लागली. रशियात बँका आणि रेल्वे यंत्रणेच्या संगणक प्रणालीला या व्हायरसचा प्रादुर्भाव जाणवला. तसेच जर्मनीतही दॉएच्च बाह्न या रेल्वे प्रशासनाला याचा फटका बसला.
’रॅन्समवेअर’ म्हणजे काय ?
‘रॅन्समवेअर’मध्ये कुणीतरी सायबर गुन्हेगार अज्ञात ठिकाणाहून तुमचा संगणक किंवा लॅपटॉप हॅक करतो आणि तुमच्याकडे खंडणीची मागणी करतो.एखाद्या दिवशी तुम्ही तुमचा संगणक किंवा लॅपटॉप चालू करायला जाता आणि त्यावर एक मेसेज तुम्हाला दिसतो की तुमचा संगणक किंवा लॅपटॉप आम्ही हॅक केला असून तुमचा संपूर्ण डेटा तुम्हाला हवा असल्यास स्क्रीनवर दिसत असलेल्या ‘पेमेंट’ आॅप्शनला क्लिक करून अमुक इतकी रक्कम या बँक खात्यात पुढील अमुक इतक्या तासांत जर ही जमा झाली नाही तर तुमचा सर्व डेटा डिलिट होईल. तुमच्या स्क्रीनवर एका बाजूला तुम्हाला दिलेल्या वेळेचे काउंटडाऊन सुद्धा चालू झालेले असते.
अर्थात तुमच्या संगणक किंवा लॅपटॉपचा संपूर्ण ताबा या हॅकर्सने घेतलेला असतो. या मेसेजच्या पुढे तुमचा संगणक किंवा लॅपटॉप जातच नाही. अर्थात, तुमची आॅपरेटिंग सिस्टम चालूच होत नाही. या प्रकारच्या सायबर गुन्हेगारीला ‘रॅन्समवेअर’ असे म्हणतात. असे प्रकार जगात अनेक ठिकाणी उघडकीस आलेले आहेत. जगाच्या कुठल्या तरी कानाकोपऱ्यात बसून तुमचा डेटा नष्ट करण्याचे उद्योग हे ‘सायबर भामटे’ करायला लागले.
काय काळजी घ्यावी ?
सगळ्यात आधी तुमच्या संगणक किंवा लॅपटॉपमध्ये चांगला अॅण्टीव्हायरस असणे तसेच अॅण्टीव्हायरस नियमति अपडेट असणे आवश्यक आहे.
इंटरनेट वापरताना नेहमी सुरक्षित वेबसाईटलाच भेट द्या. कुठल्याही मोफत भूलथापाना बळी पडून चुकीच्या वेबसाईटला किंवा अनोळखी लिंकला क्लिक करू नका.
संगणक किंवा लॅपटॉपची आॅपरेटिंग सिस्टमही नेहमी अपडेट असावी; कारण अपडेटमध्ये बऱ्याच वेळा काही प्रॉब्लेम्सवर सोल्युशन उपलब्ध असते. जसे की ‘रॅन्समवेअर’साठी पॅच मायक्र ोसॉफ्टने दोन महिन्यापूर्वीच जारी केला होता .
तुमच्या संगणक किंवा लॅपटॉपचा नियमति डेटा कॉपी करून दुसऱ्या हार्डडिस्कवर ठेवावा. म्हणजे तुमचा संगणक हॅक झाला आणि तुमच्या डेटाच्या बदल्यात हॅकरने तुमच्याकडे पैसे मागितले तरी तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.
May 17, 2017
एलियन्स या विश्वात कुठे राहतात हा एक माणसाच्या दृष्टीने असलेला व्यापक चर्चेचा विषय आहे. त्यांचे अस्तित्वात या विश्वात आहेत की नाही, ते आपल्याला पाहत आहेत की नाही, ते पृथ्वीवर आहेत का, असे काही प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात आहेत. एका स्वयंघोषित 'टाईम ट्रॅव्हलर'नुसार, एलियन ८ डिसेंबर रोजी पृथ्वीवर उतरतील. खरच टाईम ट्रॅव्हलची व्याख्या करायची झाली तर एखादी व्यक्ती जी भूतकाळातील किंवा भविष्यातील वेगवेगळ्या काळात फिरू शकतो त्याला प्रामुख्याने टाईम ट्रॅव्हलर म्हणतात.
TikTok वापरकर्ता एनो अलारिक, जो एक स्वयंघोषित 'टाइम ट्रॅव्हलर' देखील आहे, याने कॅप्शनसह एक व्हिडिओ पोस्ट केला: "सावधान! होय, मी २६७१ सालचा एक वास्तविक-वेळ प्रवासी आहे, येणाऱ्या या पाच तारखा लक्षात ठेवा." असे या टाईम ट्रॅव्हलरने कमेंट द्वारे हे विधान केले आहे.
स्वयंघोषित टाइम ट्रॅव्हलरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाच अंदाज शेअर केले आहेत. या वर्षी डिसेंबरमध्ये मानव एलियनशी संवाद साधू शकतो, असे सर्वात लक्ष वेधून घेणारे विधान त्यांनी केले आहे . त्यांच्या म्हणण्यानुसार, ८ डिसेंबर रोजी एलियन पृथ्वीवर एका महाकाय उल्कामध्ये येऊ शकतात. मार्च २०२३ मध्ये अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीला ७५० फूट मेगा-त्सुनामीचा सामना करावा लागेल, असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे. हा माणूस २६७१ सालचा असल्याचा दावा करतो. .
एलियन लँडिंग व्यतिरिक्त, अलारिकने इतर अनेक गोष्टींचा अंदाज लावला. त्याने पुढील सहा महिन्यांत घडणाऱ्या इतर चार घटनांचाही अंदाज लावला, त्यातील पहिली घटना ३० नोव्हेंबरला घडण्याची शक्यता आहे. त्या दिवशी पृथ्वीचे अनुकरण करणारा एक नवीन ग्रह जेम्स वेब दुर्बिणी शोधून काढेल असे त्याने सांगितले. त्यानंतर, 8 डिसेंबर रोजी एलियनशी संवाद होईल.
तिसरा डावा हा ६ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार आहे, जिथे किशोरांचा एक गट इतर आकाशगंगांमध्ये वर्महोल उघडण्यासाठी एक उपकरण शोधेल. पुढच्या वर्षी मार्च महिन्यात, अलारिकने मारियाना ट्रेंचमध्ये प्राचीन प्रजातीचा शोध लागण्याचा अंदाज वर्तवला आहे. अमेरिकेच्या पश्चिम किनार्यावरील रहिवाशांना, विशेषत: सॅन फ्रान्सिस्को, 750 फूट मेगा-त्सुनामीचा तडाखा बसेल, असे त्याच्या शेवटच्या भविष्यवाणीत म्हटले आहे.
जरी या स्वयंघोषित टाइम ट्रॅव्हलरने अंदाज व्यक्त केले असले. तरी आतापर्यंत घोषित केलेल्या अनेक टाईम ट्रॅव्हलर्सचे विधानसिद्ध झालेली नाहीयेत . त्यामुळे या टाईम टेबल चे विधान खरे होते की नाही हा एक मोठा चर्चेचा विषय आहे !
-- अथर्व डोके
सूचना - वरील लेखाशी लिहिणारा लेखक सहमत असेलच असे नाही.
December 29, 2022
आपण मराठी म्हणून ओळखले जाण्यात आपल्या भाषेचा मोठा भाग असतो. आपलं समाजातील अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आपली भाषा टिकवणं क्रमप्राप्त होतं आणि हे टिकवण शालेय शिक्षणातूनच जास्त शक्य होतं. म्हणून आपल्या मुलांचं किमान प्राथमिक शिक्षण आपल्या मातृभाषेतून होणं आपल्यासाठी आणि त्या मुलांसाठीही महत्वाचं असतं.
June 24, 2018
पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक हिंदुंवर अत्याचार केले जात आहेत. इम्रान खान यांच्या पक्षातील एक माजी आमदार बलदेव कुमार यांनी भारतात आश्रय मागितला आहे. भारताने बलुचिस्तान, सिंध, पश्तून आणि आझाद काश्मीर प्रांतातिल मानवधिकाराचा मुद्दा सातत्याने आंतरराष्ट्रिय स्तरावर उठवत राहावा.त्यांना नैतिक/मानसिक समर्थन देत राहावे. आता पाकव्याप्त काश्मीरवरूनही भारताला आक्रमक धोरण अवलंबावे लागेल. पाकिस्तान दहशतवादाला कशा रितीने पोसतो, हे सगळ्यांना कळले पाहिजे. माहिती युध्दाचा वापर करुन हा चेहरा जगासमोर येणे काळाची गरज आहे.
October 28, 2019
इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
ज्ञानकर्मसंन्यासयोग नावाचा चौथा अध्याय.
May 28, 2022
नवरात्रामध्ये भातशेती फुलो-यात असते.त्यानंतर शिवारातुन बांधावरून सकाळी किंवा दुपारनंतर फेरफटका मारताना एक वेगळीच मजा असते.वारा भणभणत असतो.त्या वा-याबरोबर भाताचा सुंदर सुवास दरवळत रहातो.शिवारामध्ये अनेक जातीचे भातपीक लावलेले असते.परंतू प्रत्येक खाचराच्या बांधावरून चालताना वा-याबरोबर सुंदर असा सुगंध येत रहातो.जणू त्या खाचरातील भात पीक आपल्या अस्तीत्वाची जाणीव करून देत असते.
May 11, 2024
Copyright © 2025 | Marathisrushti