वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
म्हातारपण म्हणजे झाडाचे सुकलेले पण वादळ आल कि कधी गळून पडेल काही सांगता येत नाही मग त्यांना अपेक्षित असलेले प्रेम त्यांना का मिळू नये म्हातारपण म्हणजे भिजलेल्या पापण्याचेच का असते ? हृदयात असंख्य दुखाचे आसवे का वाहतात ?शेवटी आईवडील म्हातारे झाले म्हणून ते दुल्क्षित करू नका या जगात निस्वार्थी प्रेम करणारे तेच आहेत त्यांच्या आयुष्याचे शेवटचे पण दुखाचे नको तर सुखाचे बनवा
June 26, 2019
को जागरति?---- a scientific approach about कोजागिरी पौर्णिमा
आपल्याकडे साजरा होणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी ह्या स्वास्थ्याशी निगडीत असतात. गुढीपाडव्याला कडूनिंबाची पाने खाणे असो किंवा दिवाळीचे अभ्यंग स्नान असो,प्रत्येकात स्वास्थ्य जपणे उद्देश सापडतोच!
शरद ऋतूत येणारी “शारदीय पौर्णिमा” अथवा “कोजागिरी पौर्णिमा” साजरा करण्यामागे देखील स्वास्थ्याशी निगडीत हेतू सापडतो. कोजागिरी म्हंटले कि डोळ्यसमोर येते ते “मसाला दुध”! चंद्राच्या चांदण्यात वेलची पूड,बदाम वगैरे टाकून थोडेसे आटवलेले दुध गार करायचे आणि रात्री सेवन करायचे!!!
दुध गार करून पिणे एव्हढाच हेतू अपेक्षित नाहीये तर चंद्राच्या प्रकाशात ते गार करणे अपेक्षित आहे.
शरद ऋतू हा पित्ताच्या प्रकोपाचा काळ असतो. पित्ताची उष्णता वाढल्यामुळे शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. स्वस्थ राहण्यासाठी ऋतू प्रमाणे आचरण करणे गरजेचे असते. रात्र आणि दुध दोन्ही गोष्टी स्वभावत: शीत म्हणजेच थंड गुणधर्माचे असतात. पौर्णिमेचा चंद्र आणि त्याचे चांदणे तर शीतलता देण्यास अधिक उपयुक्त असतात. स्वभावत: शीत गुणाचे दुध जर अशा शीतल चंद्रप्रकाशात ठेवले तर या “संस्कारांमुळे” त्याची गुणवृद्धीच होते आणि असे दुध शरीरास शीतलता देऊन पित्ताची उष्णता कमी करण्यास मदत करते.
या रात्रीस पूर्ण चंद्राचे चांदणे अनुभवण्यासाठी जागणे अनिवार्य असते.असे म्हणतात कि देवी रात्री संचार करत विचारत असते “ को जागरति? कोण जागे आहे??” जो जागा असेल त्याला समृद्धी देणार! या अख्यायीकेमागे देखील लोकांनी जागे राहून चंद्र चांदण्यांनी सिद्ध दुध घ्यावे असाच प्रांजळ हेतू सापडतो. देवादिकांच्या आशीर्वादाचे आमिष अथवा कोपाचे भय हे चातुर्मासाप्रमाणे इथेही लागू पडते!
आता हा हेतू च माहिती नसल्यामुळे त्याचे
“ we must meet and celebrate!!!!” होते आणि त्यात भेळ, पावभाजी अथवा इतर yummy पदार्थांसोबत “मसाला दुध” अशी theme असते. याने होते एकच की “वैद्याकडे रुग्ण वाढतात”!
जिथे चंद्राचा थंडावा अपेक्षित आहे तिथे रक्त बिघडवणारे भेळ ,पावभाजी इत्यादी पदार्थ मनसोक्त खायचे आणि मग रिवाज म्हणून त्यावर मसाला दुध प्यायचे हे सगळेच विपरीत आहे!
म्हणूनच खऱ्या अर्थाने “शारदीय कोजागिरी पौर्णिमा” साजरी करायची असेल तर काय केले पाहिजे हे वेगळे सांगायला नको, नाही का???
वैद्य ज्योत्स्ना पेठकर
परिवर्तन आयुर्वेद
October 16, 2016
पुण्याजवळील मुठा नदीच्या आंबी या उपनदीवरील पानशेत हे धरण फुटल्यामुळे पुण्यात आलेल्या पुरात सुमारे १,००,००० लोक विस्थापित झाले. नदीकाठचे तीन मजली वाडे पूर्णपणे बुडाले होते. आजही अशा इमारती पूररेषेच्या आठवणी सांभाळून आहेत. भांबावलेल्या अनेकांनी गणरायाचे पूजन करून पुन्हा प्रपंच उभारले.
July 12, 2021


पावसाळी ढगांतील पाण्याचे थेंब हे विद्युतभारित असतात. किंबहुना, धूळ किंवा हवेतील तत्सम पदार्थांवरील विद्युतभार पावसाळी ढगांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावतो. तसंच ढगातील पाण्याच्या थेंबांच्या आकारावरही या विद्युतभाराचा परिणाम होत असल्यानं, या विद्युतभारावर पावसाची तीव्रता अवलंबून असते. हवामानाचा अभ्यास करणारे संशोधक या विद्युतभाराचा आणि पावसाचा संबंध स्पष्ट करण्याचा प्रयत्न पूर्वीपासून करीत आहेत. अलीकडेच केल्या गेलेल्या एका संशोधनासाठी, इंग्लंडमधील बर्कशायर येथील रीडिंग विद्यापीठातील संशोधकांनी वेगळाच मार्ग अवलंबला. या संशोधकांनी आधार घेतला, तो शीतयुद्धाच्या काळातील अणुचाचण्यांचा.
शीतयुद्धाच्या काळात मोठ्या प्रमाणात अण्वस्त्रांच्या चाचण्या केल्या गेल्या. अशा चाचण्यांच्या मुख्य जागा म्हणजे अमेरिकेतलं नेवाडा किंवा त्याकाळच्या रशियातलं कझाकस्तान. जेव्हा अणुस्फोट घडवला जातो, तेव्हा त्यातून मोठ्या प्रमाणावर किरणोत्सर्ग निर्माण होऊन विद्युतभारित कणांची निर्मिती होते. हे विद्युतभारित कण वातावरणात पसरून दूरपर्यंत पोचतात. धूळीप्रमाणेच हे कणसुद्धा, पावसाच्या थेंबांच्या आकारावर परिणाम घडवून असण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. रीडिंग विद्यापीठातील संशोधकांनी या परिणामाचा अभ्यास करण्यासाठी १९६२-६४ हा काळ निवडला. स्कॉटलंडच्या उत्तरेकडील, शेटलँड या दूरच्या बेटावरील लेरविक येथील हवामानाच्या नोंदींचा त्यांनी अभ्यास केला. प्रदूषणात निर्माण होणारी धूळ व इतर पदार्थ हे ढगाच्या निर्मितीला हातभार लावतात. शेटलँड हे बेट मानवी दळणवळमापासून दूर असल्यामुळे, इथल्या पावसाच्या निर्मितीचा मानवी प्रदूषणाशी संबंध नव्हता. याच काळात लंडन जवळच्या क्यू येथील वेधशाळेतल्या, वातावरणातील विद्युतभाराच्या नोंदीही त्यांनी तपासल्या. लंडनजवळची ही जागा काय किंवा शेटलँड बेट काय, ही दोन्ही ठिकाणं अणुस्फोटाच्या जागांपासून खूप दूर असल्यानं अणुस्फोटामुळे निर्माण झालेला विद्युतभार हा या दोन्ही ठिकाणी सारखाच असणं, अपेक्षित होतं.
या संशोधकांनी अणुस्फोटामुळे निर्माण झालेला वातावरणातील विद्युतभार आणि शेटलँड बेटावरील पावसाच्या प्रमाणाची सांगड घातली. या सांगडीद्वारे त्यांना त्यांतील अन्योन्यसंबध स्पष्टपणे दिसून आला. अणुस्फोटामुळे जेव्हा वातावरणातील विद्युतभाराचं परिणाम वाढलं होतं, तेव्हा शेटलँड बेटावरील ढगांचं आच्छादन अधिक दाट झालं होतं. इतकंच नव्ह तर, त्यावेळी तिथल्या पावसाचं प्रमाणसुद्धा सरासरीपेक्षा चोवीस टक्क्यांनी वाढलं होतं. म्हणजे वातावरणातील वाढलेला विद्युतभार पावसाचं प्रमाण निश्चितपणे वाढवत होता. इतकंच नव्हे तर, अणुस्फोटामुळे दूरवरच्या ठिकाणच्या हवामानातसुद्धा बदल होऊ शकतो हे या संशोधनावरून दिसून आलं.
रीडींग विद्यापीठातील संशोधकांचं हे संशोधन भविष्यात अत्यंत उपयुक्त ठरू शकतं. कारण, विद्युतभार निर्माण करणाऱ्या एखाद्या साधनाद्वारे जर ढगांतील विद्युतभार वाढवला, तर त्याची कृत्रिम पाऊस पाडण्यासही मदत होऊ शकेल.
-- डॉ. राजीव चिटणीस.
छायाचित्र सौजन्य: Federal Government of the United States
November 28, 2021


डिसेंबर महिना चालू झाला की ‘संकल्पाचे’ वारे सुरू होतात . मी सुद्धा पंधराव्या वर्षापासून काही ना काही संकल्प करायचा ठरवीत असे . पण अनेक वेळा जानेवारी महिना संपण्यापूर्वीच तो मोडलेलाच असायचा. संकल्प करणे म्हणजे काय? संकल्प म्हणजे ‘कृती’ नव्हे. ती गोष्ट प्रत्यक्षात आणता आली पाहिजे.
शाळेत असताना खूप अभ्यास करून खूप खूप गुण मिळवायचे असा माझा संकल्प असे . पण गणपती ,नवरात्र , दिवाळी आणि डिसेंबर मधल्या सहली , स्नेहसंमेलन , क्रीडा स्पर्धा यात मी इतकी गुंतली जात असे की , मी केलेल्या संकल्पाचा मलाच विसर पडत असे .
महाविद्यालयात गेल्यावर इंग्रजी माध्यम असणार , तेव्हा आपल्याला इंग्रजीचे ज्ञान असणं आवश्यकच आहे . म्हणून मी इंग्रजी- मराठी शब्दकोशातून पाच-सहा शब्द , त्यांचा उच्चार आणि अर्थ जाणून लक्षात ठेवत असे . हळू हळू हा संकल्प सुद्धा अर्धवटच सोडला गेला .
आई पोळी भाजी करायला मुद्दाम सांगत असे . पण रोज रोज तेल – मोहरी – हिंग- हळद घालून तीच , तीच फोडणी चार दिवस शिकल्यावर मला अगदी कंटाळा आला . म्हणून स्वयंपाक घरातील कोणत्याही संकल्पाचा विचार करायचाच नाही , असं मी त्याचवेळी ठरविलं.
थोडी मोठी झाल्यावर ‘संकल्प’ म्हणताच , मला १२ जून १९२९ रोजी जन्मलेल्या नेदरलँड्सच्या ‘ॲना फ्रँकची’ आठवण यायची. ॲडॉल्फ हिटलर आणि नाझी पक्षाने जर्मनीवर नियंत्रण मिळवल्यानंतर, ज्यूंचा छळ चालू केला, नाझी सैनिकांच्या अत्याचारापासून स्वतःच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी ॲन फ्रँकच्या वडिलांनी कुटुंबासह ६ जुलै १९४२ ला अॅम्स्टरडॅममध्ये एका बिल्डींगमधील सिक्रेट खोलीमध्ये लपून बसण्याचा निर्णय घेतला. राहत्या घरात लपून बसलेल्या फ्रॅंक कुटुंबाला भयानक जीवन जगावे लागले.
July 3, 2025
सामाजिक बांधिलकीची जाणीव बालपणापासूनच लहान मुलांमध्ये निर्माण करणं जरुरीचं असतं, त्याचं भान त्यांच्याकडून राखलं जातं का? हे पाहणं गरजेचं असतं. आजची लहान मुलंच ह्या देशासाठी उद्याची संपत्ती असल्याचं आपण बोलतो, ऐकतो; त्यानुषंगाने मुलांचा विकास झाला तरंच राष्ट्राची प्रगती होईल.
June 11, 2026
आपल्याला पहिला मुलगाच हवा, मुलगा म्हणजे कुळाचा उध्दारकर्ता , मुलगी काय परक्याचं धन असले विचार तर आम्हा दोघांच्याही मनाला कधी शिवले नाहीत. मुलीच्या जन्मानंतर आठ वर्षांनी आमच्या घरात एका गोड लेकाचा जन्म झाला, ही गोष्ट वेगळी.
August 25, 2022
आयुर्वेदातील हळद हे एक महत्त्वाचा घटक आहे. हळदीला आयुर्वेदामध्ये ” हरिद्रा ” म्हणतात. हळदीला आर्थिक, धार्मिक, औषधी व सामाजिकदृष्टया अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.
October 7, 2021
(श्राद्ध हा हिंदू धर्मशास्त्रातील एक जटील आणि गहन असा विषय आहे. या विधीचा साकल्याने विचार एका छोट्या लेखात करणे शक्य नाही. त्यामुळे प्रातिनिधीक रूपात विषयाचा परिचय करून देण्याचा हा अल्प प्रयत्न.)
हिंदू धर्म संस्कृतीमधील एक महत्वाची संकल्पना म्हणजे धार्मिक आचार. नामकरण, मुंज, विवाह अशा विधींच्या जोडीनेच हिंदू जीवनप्रणालीत श्राद्धविधीचे महत्व विशेषत्वाने आहे.
श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय. श्राद्धाच्या विविध व्याख्या धर्मशास्त्रकारांनी सांगितल्या आहेत. त्यामध्ये दिवंगत पूर्वजांच्या प्रती श्रद्धा व्यक्त करण्यासाठी देश काळ आणि पात्रता विचारात घेता ब्राह्मणाला काही देणे याला श्राद्ध म्हणतात. श्राद्धामध्ये दिवंगत व्यक्तीला अनुसरून पिंडदान केले जाते. ब्राह्मण व गरजू व्यक्तीना भोजन व दान दिले जाते. अशी एकूण ९६ प्रकारची विविध श्राद्धे करणे विहित मानले जाई. आता या सर्व श्राद्धविधींचे आचरण करणे काळाच्या ओघात शक्य नसले तरी व्यक्तीच्या निधनानंतर केले जाणारे श्राद्ध, वर्षश्राद्ध असे काही निवडक श्राद्धविधी आजही समाजात केले जातात. त्यापैकीच एक म्हणजे महालय श्राद्ध-
भाद्रपद महिन्यात अनंत चतुर्दशीला सार्वजनिक आणि काही कौटुंबिक गणपतींचे विसर्जन होते. अनंताची पूजा काही कुटुंबांमध्ये श्रद्धेने केली जाते. प्रौष्ठपदी पौर्णिमा गणेश विसर्जनाची धामधूम संपविते आणि दुस-या दिवशी सुरु होतो पितृपक्ष. भाद्रपद महिन्याचा कृष्णपक्ष म्हणजे प्रतिपदा ते अमावास्या हा काल हिंदू धर्म-परंपरेत पितृ पंधरवडा म्हणून ओळखला जातो. या महिन्यात सर्वसामान्यपणे शुभ कार्य करीत नाहीत, त्याविषयी बोलणी करीत नाहीत आणि खरेदीही करीत नाहीत !
महालयाचा काळ
या काळात महालय करणे न जमल्यास आश्विन अमावास्येला दिवे लावून हे श्राद्ध करावे. या श्राद्धात विश्वेदेव तसेच धुरिलोचन नावाच्या पितरांना पिंडदान केले जाते.
महालयश्राद्धाचा गौण काळ आश्विन शुद्ध प्रतिपदेपर्यंत मानण्यात आला आहे.
( याविषयी धर्मशास्त्रीय ग्रंथात विपुल चर्चा आढळते, तरी येथे केवळ निवडक संदर्भच नोंदविले आहेत. जिज्ञासूंनी याविषयी अधिक माहिती अवश्य घ्यावी. )
महालयाचे वेगळेपण- वसुधैव कुटुंबकम।
महा म्हणजे मोठे आणि आलय म्हणजे घर. आपले दिवंगत पूर्वज/ पितर या काळात पितृलोकातून पृथ्वीवर येतात आणि त्यांची पूजा या दिवसात केली जाते म्हणून हा काल शुभ मानला जात नाही !
महालय श्राद्धात आपण आपल्या कुटुंबातील दिवंगत व्यक्तींचे स्मरण –पूजन पिंडरूपाने करतो.यामध्ये आपले दिवंगत आई- वडील, आजी, आजोबा , पणजोबा, सावत्र नातेवाईक, भाऊ-बहिण , काका-काकू, मामा-मामी, मावशी , आत्या ,सासू-सासरे, व्याही, विहीण अन्य नातेवाईक या सर्वाना उद्देशून पिंडदान करतो. आपण विविध गुरूंकडून आयुष्याभर काही ना काही शिकत असतो, आणि काही लोकांना आपण शिकवत असतो. त्यामुळे असे आपले गुरु आणि शिष्य जे निधन पावले असतील त्यांचेही आपण स्मरण करतो. आपले हितचिंतक, स्नेही, अन्य आप्त , आपल्या घरी मदतनीस म्हणून राहिलेल्या व्यक्ती, आपल्या घरातील पाळीव प्राणी हे दिवंगत असतील तर त्यांचेही यात स्मरण होते. याखेरीज जगाच्या पाठीवर दिवंगत असलेल्या आपल्या ओळखीच्या एवढेच नव्हे तर अनोळखी असलेल्या दिवंगत व्यक्तीना उद्देशून आपण हे श्राध्द करतो. अनेक लोकांवर निधनानंतर कोणताही संस्कार केला जात नाही. त्यांच्याप्रतीही आपण कृतज्ञता व्यक्त करतो .आपल्या नकळत झाडे तोडली जातात, कीड-मुंगी-कीटक आपल्या हातून नकळत मारले जातात . त्यांचीही आठवण आपण यावेळी करतो.सारांश,आपल्या जवळचे असोत वा दूरचे असोत, हे विश्वचि माझे घर या न्यायाने आपण सर्वच दिवंगत लोकांचे स्मरण महालय श्राद्धात करतो. चारही दिशांना असलेल्या ज्ञात अज्ञात अशा सर्वासाठी श्रद्धेने पुष्प अर्पण करण्याचे हे दिवस. तसेच माझया कुटुंबाचा "वंशवृक्ष" आठवण्याची संधी. त्यानिमित्ताने कुटुंबाचेही संघटन !
ज्या काळात समाजात विधवा महिलांचे स्थान हे निम्न दर्जाचे होते त्या काळात पती जिवंत असताना सुवासिनी असताना मृत्यू येणे हे महिलेच्या सामाजिक आयुष्यात फार महत्वाचे होते. त्यामुळे अर्थातच सवाष्ण गेलेल्या महिलेसाठी अविधवा नवमीचा स्वतंत्र दिवस योजला गेला असावा.
जसे गणपती, गौरी यानिमित्ताने सर्व घर एकत्र येते त्याचप्रमाणे श्राद्धविधीच्या निमित्ताने सर्व कुटुंबीय एकत्र येतात. आपल्या कुटुंबातील दिवंगत व्यक्तींच्या एकत्र स्मरणाने आपल्याला आपला वंशवृक्ष समजतो. त्यानिमित्ताने आपण कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांची माहिती करून घेतो. त्यांनी केलेली विशेष कामे, समाज व कुटुंबासाठीचे त्यांचे योगदान याबद्दल आपल्याला माहिती मिळते. त्यांच्या अभिमानास्पद कामगिरीने आपलाही आत्मविश्वास वाढतो व आपल्या पूर्वजांनी केलेल्या चांगल्या कामातून आपल्यालाही प्रेरणा मिळत राहते. आपल्या दैनंदिन जीवनात आपण ज्या सामाजाची मदत घेत असतो त्यांच्याबद्दलची कृतज्ञताही यानिमित्ताने व्यक्त करण्याची संधी आपल्याला मिळते. निसर्गातील पशु-पक्षी, झाडे यांचेही निसर्गचक्रात महत्वाचे स्थान असते. त्यांच्यामुळेही आपल्या नकळत का होईना आपण चांगल्या गुणवत्तेचे आयुष्य जगत असतो. त्यांच्याविषयी आपुलकी व्यक्त करण्याचे माध्यम म्हणूनही महालयाकडे पाहता येऊ शकेल.
आधुनिक काळातही असे अनुभवास येते की या काळात सोन्याची खरेदी, घराची खरेदी या गोष्टी करणे पितृपक्षात शक्यतो टाळले जाते. शुभकार्याची चर्चाही या काळात केली जात नाही. खरं म्हणजे आपले दिवंगत पूर्वज या काळात पृथ्वीलोकात येवून आपल्या सर्व गोष्टींचे अवलोकन करीत असतील तर आपल्या कार्याला त्यांचे आशीर्वाद लाभले आहेत असा विचार का करू नये ?
भारतातील संस्कृती ही कृषी आधारित आहे. त्यामुळे शेतीची कापणी' होऊन पहिले पीक हाती आल्यावर मगच कदाचित कृषीवलाला आर्थिक स्थिरता मिळे ज्यामुळे तो काही आवर्जून खरेदी करू शकत असे. पण ज्या काळात पिके अजून शेतातच कापणीसाठी वाट पाहत उभी आहेत त्या काळात खरेदी करणे टाळणे इष्ट असावे. त्यातूनच कदाचित या काळात खरेदी करू नये असा संकेत रूढ झाला असावा.
ज्यांच्यामुळे आपले अस्तित्व आहे त्या आपल्या पूर्वजांचे आपल्या वंशजांसाठी आशीर्वाद असावेत असा सकारात्मक विचार आपण करायला हवा. श्राध्द म्हणजे श्रद्धेने केले जाणारे दिवंगत व्यक्तींचे स्मरण . त्यामुळे पितृपक्षात सर्व दिवंगत पूर्वजांच्या सामूहिक स्मरणाची संधी अवश्य घ्यावी आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी.
आधुनिक वेगवान काळात महालय श्राद्ध विधीपूर्वक करणे शक्य झाले नाही तरी आपल्या कुळातील तसेच ज्ञात अज्ञात अशा दिवंगत व्यक्तींच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करताना गरजूला दान देणे, समाजाच्या आणि पर्यावरणाच्या हितार्थ उपक्रमाला हातभार लावणे किंवा आपल्या शक्ती बुद्धीनुसार आणि आवडीनुसार कोणत्यातरी विधायक उपक्रमाला हातभार लावण्याची संधी श्रद्धापूर्वक अवश्य घ्यावी.
-- आर्या आशुतोष जोशी
June 26, 2019
हा वृक्ष २५ ते ३० फुट वाढणारा असून तो आकाराने मोठा आहे. उभ्या व लांबट अशा त्याच्या खपल्या पडतात. त्याची पाने ही ऋतूपर्णी, चामड्यासारखी १३ ते २० से.मी. वाटूळकी व देठाकडे निमुळती होणारी असतात. शेंडे पिवळसर असतात. त्याची फळे ही २.५० ते ५ से.मी. लांब चामड्या सारखी जाड पंख, निमुळती व त्यावर आडव्या रेषा व त्याला पंचाकृती आवरण असते.
August 19, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti