(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • प्रवास; एक समृद्ध करणारा अनुभव..

    सकाळचा उत्तराखंडातल्या नैनीताल जिल्ह्यातील रामनगर ते जुनी दिल्ली असा प्रवास, ‘रामनगर -दिल्ली संपर्क क्रांती लिंक एक्सप्रेस’ अशा त्या रेल्वेसारख्याच लांबलचक नांवाच्या रेल्वे गाडीनं केला. उत्तर प्रदेश-बिहारकडच्या रेल्वेप्रवासातील गर्दीच्या काही फिल्म्स डिस्कव्हरी-नॅशनल जिओग्राफीक चॅनलवर पाहील्या होत्या, त्या प्रत्यक्ष अनुभवल्या.

      May 29, 2017


  • माघ महिन्यातील गणेश जयंती उत्सव 

    गणपतीचे एकंदरीत तीन अवतार मानण्यात येतात. या तिन्ही अवतारांचे जन्मदिवस वेगवेगळे आहेत. पहिला वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस, दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा पार्थिव गणेश जन्मदिवस आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थीचा श्रीगणेश जयंतीचा दिवस !

      January 22, 2018


  • वृत्तीदोष

    स्वार्थी माणसे प्रत्येक ठिकाणी आपला स्वार्थ पहातात. जिथे फायदा तिथेच लक्ष देतात. स्वार्थापुढे इतर बाबींचा ते विचार करत नाहीत.त्याची दृष्टी कावळ्यांची असते.सावज शोधणारी नजर असते. स्वार्थी माणूस नीतिमत्ता बाळगत नाही.

      September 10, 2023


  • मदर इंडिया’ हिंदी चित्रपटसृष्टीतील गाजलेला चित्रपट

    १९२७ साली एक अमेरिकन लेखकाने याच नावाचे एक वादग्रस्त पुस्तक लिहून भारतीय स्त्री यांच्या पुराणातील विधानांचा आधार घेऊन, स्त्री प्रतिमेला बदनाम करण्याची उठाठेव केली होती. त्यावर उत्तर देण्यासाठी, भारतीय स्त्री जशी सोशिक तशीच कशी धाडसी व कणखर असू शकते याचा प्रत्यय आणून देण्यासाठी त्याने आपल्या औरतच्या पुनरावृत्तीला ‘मदर इंडिया’ असे शीर्षक दिले.

      October 25, 2021


  • ताप का येतो?

    शरीराचं तापमान वाढतं ते या यंत्रणेला विविध मार्गांनी संदेश मिळतात म्हणून. जंतूजन्य आजारात शरीरात जंतूंच्या अस्तित्वामुळं आणि लढाईमुळं जे काही रासायनिक बदल होतात, त्यामुळे या संस्थेला तापमान वाढवण्याचे संदेश मिळतात व तपमान वाढवलं जाते.

    या वाढवलेल्या तापमान जंतूंच्या शरीरातल्या अनेक रासायनिक क्रिया बंद पडतात व त्याचा परिणाम म्हणून ते अर्धमेले होतात किंवा वाढू शकत नाहीत.
    यासाठी शरीराला येणारा ताप हा उपयुक्तच समजला पाहिजे. मात्र हे तापमान असंच वाढत गेलं तर आपल्याच शरीराला त्याचा त्रास होऊ लागतो आणि कधी कधी मेंदूला हे तापमान सहन न झाल्यानं झटके येतात. यालाच ‘तापातले झटके’ असे म्हणतात. काही मुलांमध्ये एखाद्या आजारात पटकन् ताप वाढण्याची ठेवण असते तर काही मुलांची तापमान योग्य राखण्याची यंत्रणा चांगली काम करत रहाते, म्हणून ताप वाढत नाही. दोन्ही गोष्टी फारशा चांगल्या नाहीत. पहिल्या बाबतीत मुलाला तापाचा प्रत्यक्ष त्रास होतो. तर दुसऱ्यात, आजार नक्की कोणता हे चटकन् समजून न आल्यानं त्याचा अप्रत्यक्षपणे त्रासच होतो. म्हणूनच माफक प्रमाणात ताप येणं दोन्ही दृष्टीनं चांगलं असतं असं समजायला हरकत नाही. तापाच्या तीव्रतेवर आजाराची तिव्रता ठरत नसते. मला खूप रडल्यानं ताप येतो ही चूकीची समजूत आहे. बाळ ताप आल्यामुळं खूप रडतं आणि नंतर ते आपल्या लक्षात येतं.

    ताप हा आपल्या शरीराचा मित्रच आहे.

    ताप हे अनेक आजारांचं प्राथमिक लक्षण असतं. याउलट कितीतरी गंभीर आजारांत ताप फार चढलेला दिसत नाही, तरीही ते प्राणघातक असू शकतात. मात्र जास्त ताप चढलेलं मूल ताप असतांना तरी जास्त गंभीर रीतीनं आजारी असल्यासारखं दिसतं. म्हणून आजाराचं खरं स्वरूप मुलाचा ताप उतरवल्यानंतरच पहावं.

    ताप येणा-या मुलाचा हा ताप कशामुळं येतोय हे शोधण्याचा प्रयत्न करावा. त्याच्या प्रत्येक अवयव संस्थेचं काम व्यवस्थित होतंय ना हे पहावं. तसंच तापाच्या जोडीला काही अवयव किंवा संस्थेच्या बिघाडाची लक्षणं दिसताहेत का हे पहावं. उदा. सर्दी खोकला - श्वास मार्ग, फुफ्फुसं यांचा बिघाड दाखवतात. तर उलटी जुलाब पोट, आतडी लिव्हर यांच्यातला बिघाड सुचवतात आणि लघवीचा त्रास मुत्रमार्गाचा बिघाड. बाळाचा दैनंदिन कार्यक्रम कसा आहे त्यावरून म्हणजे, त्याचं खाणं, पिणं, शू चं प्रमाण, उलटी इ. गोष्टींवरूनही आजाराचा गंभीरपणा दिसतो.

    ताप कसा मोजावा?

    हातानं कपाळ किंवा पोटाचं तापमान पाहणं हे अगदी प्राथमिक तपासणं झालं. पण याने आपण तापाचा एक साधा अंदाज मांडू शकतो. ताप खरं तर शरीराच्या आतल्या भागातला मोजायला हवा. शी च्या जागी थर्मामीटर घालून किंवा तोंडात जिभेखाली धरून. मुलं खूप कपडयात गुंडाळल्यानं गरम लागतात, तर उघडी ठेवल्यास गार पडलेली असतात म्हणून आतून तपमान मोजणंच योग्य.

    जी मुलं थर्मामीटर चावण्याची शक्यता असते त्यांच्यात शक्यतो शीच्या जागेचं तापमान मोजावं. सर्वच मुलांचा ताप अशा तऱ्हेने मोजायची जरूरी नाही पण वरून ताप लागत नाही तरीही मूल मलूल वाटतंय अशी अवस्था असेल तर मुलाला ताप आहे की नाही हे नक्की करण्यासाठी असा ताप पहाणं आवश्यक आहे. इतर वेळी काखेत घाम नसल्यास काखेतलं किंवा मोठया मुलांचं काही गार किंवा गरम न खाता पिता तोंडातलं तापमान मोजावं. थर्मामीटर १ पूर्ण मिनिट जागेवर धरून ठेवावा लागतो. तो त्वचेला निट लागून राहिला नाही तर तापमान नोंदीत चूक होते आणि १ पूर्ण मिनिट मुलांच्या काखेत थर्मामीटर धरून ठेवणं अवघड जातं म्हणून मुलांचा ताप मोजणं अवघड वाटतं. म्हणून मुलांचा ताप मोजणं हे कौशल्याचं काम आहे.

    त्वचेपेक्षा काखेतलं आणि काखेपेक्षा आतल्या भागाचं तापमान १-१ डिग्रीनं जास्त असतं.

    तापातले झटके:
    मेंदूला एकदम वाढणारा जास्त ताप सहन न झाल्यानं झटके येतात. पूढे हळू हळू मेंदू जस जसा वाढतो तसतशी त्यात हे तपमानाचे बदल पचवायची शक्ती येऊन मग असे तापातले झटके येणं बंद होतं. हे झटके येण्याचं नेहमीचं वय म्हणजे ६ महिन्यापासून ते ६ वर्षांपर्यंत. एखाद्या कुटुंबांत हे प्रमाण अनुवंशिकही दिसतं या झटक्यांनंतर मुलाला मोठेपणी फिटस् किंवा एपिलेप्सी असा आजार राहू शकेल का, याची काळजी पालकांना लागलेली असते. मुलाला फक्त तापातच झटके आले असतील आणि घरात फिटस् मुळं त्याच्या बुध्दीवर किंवा वाढीवर कोणताच विपरित परिणाम होणार नसतो हे समजावून घेतलं तर आई वडिलांच्या मनातली भीती आणि काळजी आपोआप कमी होईल.

    मुलाला तापात झटका आला तर काय करावं?

    सर्वप्रथम त्याला सुरक्षित ठिकाणी निजवून शरीराला इजा होत नाही ना बघवं. लाळ येत असेल तर पुसावी. थोडयाच सेकंदात किंवा मिनिटात झटका थांबतो. त्याची वाट पहावी. झटका थांबत असतांना श्वास नीट होतोय ना हे पहावं. मूल काळं निळं पडलं असेल तर आता रंग झपाटयानं बदलून गुलाबी होतोय ना हे पहावं. शुध्दीवर येतोय ना, हे पहावं, आणि मग अंग पाण्यानं पुसत ताप उररवायला सुरूवात करावी.

    थोडयाच वेळात मूल हालचाल करू लागतं. कण्हू लागतं किंवा रडू लागतं. हीच तो शुध्दीवर येत असल्याची खूण आहे. अशावेळी त्याला चिमटा काढला तर ते दुखल्याचं त्याच्या चेहऱ्यावर दिसतं, म्हणजेच त्याला आता समजू लागलंय असं आपल्याला समजतं. हा वेळ मोजायचा प्रयत्न करावा. या सर्वाची नीट नोंद घेऊन सर्व अचूक माहिती डॉक्टरांना देण्याचा प्रयत्न करावा. या माहितीचा डॉक्टरांना उपचारांसाठी उपयोग होतो.

    अशा मुलांना ताप न उतरवल्यास पुन्हा झटका येण्याची शक्यता असते. म्हणून ताप औषधांनी, इंजेक्शननी , अंग पुसून कसाही पण जलद उतरवावा. स्पजिंग करतांना शरीराचा जेवढा भाग मिळेल तितका कोमट काटामोड पाण्यानं पुसून आपोआप कोरडा होवून द्यावा. त्यामुळं शरीरातील उष्णता हे पाणी वाळवायला वापरली गेल्यानं तपमान उतरायला मदत होते.

    ताप उतरवण्यासाठी बर्फाचं पाणी वापरू नये. कोमट पाणी वापरावे.

    या कामासाठी बर्फाचं पाणी वापरू नये. त्याचा उपयोग कमी होतो आणि त्याचा त्रास झाल्यानं मूलही पुसू देत नाही. तसंच नुसत्या कपाळावर घडया ठेवण्यापेक्षा सर्व अंगाचा पृष्ठभाग वापरला तर ताप झटकन् उतरतो. या दोन गोष्टी लक्षात ठेवाव्यात. पुसत रहाण्याचं काम १५ ते २० मिनिटं केलं म्हणजेच ताप उतरतो. म्हणून एकदा पुसून थांबू नये.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      January 6, 2017


  • मिस तनकपुर हाजीर हो !

    म्हशीचं नांव “तनकपुर ” आणि तेही “मिस ” म्हटल्यावर अपेक्षेप्रमाणे चित्रपट निघाला- यंत्रणांवर कोरडे मारणारा ! फार पूर्वी “जाने भी दो यारो ” नामक ब्लॅक कॉमेडी कॅटॅगिरीतील चित्रपट निघाला होता – त्यांतील लक्षणीय “भक्ती ” आता लोपलीय. मात्र ” मिस तनकपुर ” एक पाऊल पुढे टाकत आपल्या पोलीस आणि न्याय यंत्रणेवर कोरडे ओढतो. तसं तर अलीकडे “गंगाजल “मध्येही पोखरलेल्या कायदा -सुव्यवस्थेच्या “खांबांवर” बोट ठेवलं होतं. इथेही सगळे कोळून प्यायलेले यच्चयावत महाभाग भेटतात.

      July 3, 2022


  • रहस्यमय जगन्नाथ पुरी

    जगातली सर्वात मोठी रथयात्रा पुरीमध्ये भरते. पंढरपूरपेक्षा खूप अधिक भक्त ईथे एकत्र येतात. पुरीचे आणि इथल्या जगन्नाथाचे न उलगडलेले रहस्य आणि भक्तांची श्रद्धा…

      July 25, 2017


  • सांगेन गोष्टी हिताच्याच चार – भाग तेरा

    जगण्याची साधी सोपी सूत्रे - एकशे पंचावन्न
    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - भाग तेरा
    सांगेन गोष्टी हिताच्याच चार - भाग तेरा

    आपले अवयव जरी आपले असले तरी त्या अवयवांना सार्वजनिक ठिकाणी प्रकट करू नये. अशी कृती आपल्याकडून होऊ नये, जी सार्वजनिक क्षेत्रात निंद्य मानली आहे.

    जसे सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मल मूत्र विसर्ग करणे, चुकीचे आहे. यासाठी सरकारने तशी बंद व्यवस्था ठिकठिकाणी निर्माण करून देणं, हा सरकारी व्यवस्थापनाचा भाग आहे. मुंबई सारख्या गजबजलेल्या ठिकाणी मल विसर्जनासाठी जीव धोक्यात घालून रेल्वे रुळावर यावे लागते, ही शरमेची बाब आहे.

    शरीराच्या मूलभूत गरजा आणि जागेची उपलब्धता यापेक्षा शासनाची पराभूत मानसिकता आणि लोकप्रतिनिधींचे गांधारी धोरण, हे सार्वजनिक स्वच्छता मोहिमेतील मोठ्ठे अडथळे आहेत. केंद्रसरकारचे यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत, ही समाधानकारक बाब आहे.

    परदेशात रस्त्यावरून स्वतःचे कुत्रे फिरवताना देखील त्यांनी केलेली शी शू मालकाला उचलावी लागते. पण भारतात मात्र मर्सीडीज गाडीची काच खाली करून रस्त्यावर थुंकणारे महाभाग देखील कमी नाहीत.

    जे अवयव झाकले जाणे अपेक्षित आहे, ते जाणुनबुजुन दिसतील आणि अंग प्रदर्शन होईल असे कपडे सार्वजनिक ठिकाणी न घालणे, हा नियम पुरुष आणि महिला दोघांसाठी लागू आहे.

    प्रत्येक देशाच्या परंपरा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. ब्राझील सारखा देश, अमेरिकेसारखा देश आणि भारतासारखा देश या देशांच्या सभ्यता आणि परंपरा वेगवेगळ्याच असणार. मुस्लिम महिला बुरखा घालणे ही सभ्यता मानतील, भले ती इतराकरीता कट्टर असेल. मुसलमान तरूण मिशी भादरून टाकतील तीच मिशी भारतात प्रतिष्ठेची गोष्ट ठरते. उत्तर भारतात डोक्यावरून पदर घेणं ही सभ्यता आहे, तर दक्षिण भारतात कमरेखाली महावस्त्र आणि खांद्यावर उपवस्त्र घेणं प्रतिष्ठेची बाब समजली जाते.
    भारतातील काही भागात घागरा आणि चोळी हा मुख्य पोशाख आहे तर दक्षिणेकडील काही भागात चोळी वापरलीच जात नाही.

    सांगायचे काय तर या संस्कृती सभ्यता ज्या त्या प्रदेशाच्या सांस्कृतिक अस्मितेच्या गोष्टी आहेत. त्या तशाच पाळल्या जाव्यात. जागतिकीकरणाच्या किंवा ग्लोबलायझेशनच्या गोंडस नावाखाली, मोर नाचतो म्हणून लांडोरीने नाचावे का ? हा प्रश्न आहे.

    हात, पाय, ओठ, पोट, कंबर, डोळे, छाती अथवा जननेंद्रिये यांचे प्रदर्शन होऊ नये. याकरीता पालकांनी जागरूक राहून आपल्या कुटुंबाच्या हितासाठी काही कठोर निर्णय वेळोवेळी घेणे आवश्यक आहे.

    कायदे आणि नियम करून किंवा सेन्साॅर बोर्डची स्थापना करून हे प्रश्न सुटतील, असे वाटत नाही. त्यासाठी आपल्या कुल परंपरा, प्रदेश विचार आणि नीतीच्या मर्यादेचे लहानपणापासूनच प्रशिक्षण गरजेचे आहे.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.
    १३.०९.२०१७

      September 13, 2017


  • सुभाषित रत्नांनी – भाग ९

    या भागाची सुरवात आपण शंकराचार्य यांच्या प्रसिद्ध श्लोकाने करणार आहोत.

      July 16, 2023


  • हेल्मेट (लघुकथा)

    सर विमानात बसले. दिवस बराच हेक्टिक होता. उद्यापासून दिल्लीचे त्याहीपेक्षा हेक्टिक वेळापत्रक सुरु होणार होते. नव्यानेच सुरु झालेल्या बी -स्कूल ते संचालक म्हणून नुक्तेच रुजू झाले होते. पहिल्या बॅचमधील विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटचे आव्हान त्यांच्या नजरेसमोर होते. त्यावरच पुढील वर्षाचे प्रवेश आणि बी स्कूलची पायाभरणी होणार होती.

      October 29, 2022