वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
पावसाळ्याच्या दिवसात अस्वच्छता आणि पाण्याच्या डबक्यांमुळे मच्छरांची पैदास अधिक वाढते. प्रवासादरम्यान बाहेर फिरताना, रेल्वेमध्ये, घरामध्ये हाता-पायांवर डास डंख मारतात. पण काही विशिष्ट लोकांना डास चावण्याचे प्रमाण आजूबाजूच्या व्यक्तींपेक्षा थोडे अधिक असते.
त्यामागची वैज्ञानिक कारणं.
*तुमचा रक्तगट ‘O’ असल्यास*Journal of medical entomology च्या 2004 सालच्या अहवालानुसार, इतर रक्तगटांच्या व्यक्तींच्या तुलनेत डास ओ रक्तगटाच्या व्यक्तींकडे अधिक आकर्षित होतात.
या अभ्यासानुसार डास सर्वप्रथम ओ रक्तगट त्यानंतर ए रक्तगट त्यानंतर बी रक्तगट आणि सगळ्यात शेवटी एबी रक्तगटाच्या व्यक्तींकडे आकर्षित होतात. त्यामुळे ओ रक्तगटाच्या व्यक्तींनी डासांपासून स्वतः चा बचाव करण्यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कारण डासांमुळे मलेरिया, डेंगी, चिकनगुनिया, झिका यासारख्या आजारांचा धोका वाढतो.
गर्भवती स्त्रिया वयोवृद्ध किंवा लहान मुलांच्या तुलनेत गर्भवती स्त्रियांमध्ये डासांचा डंख होण्याचा धोका अधिक असतो. the annals of tropical medicine and parasitology 2004 च्या अभ्यासानुसार सामान्य स्त्रियांच्या तुलनेत गर्भवती स्त्रियांना डास चावण्याचा धोका दुप्पट असतो. मेटॅबॉलिक रेट अधिक असणार्यांयमध्ये कार्बन डायऑक्साईडच्या निर्मितीचे प्रमाणही अधिक असते. त्यामुळे त्यांच्याकडे डास आकर्षित होतात. गर्भवती स्त्रियांचे मेटॅबॉलिझम वाढलेले असते त्यामुळे त्यांना डास चावण्याची शक्यताही वाढते.
तुमची जनुकं mosquito magnet असल्यास तुमच्या शरीरातील जनुकं तुम्हांला mosquito magnet बनवतात.the journal Infections, Genetics and Evolution 2013 सालच्या अभ्यासानुसार शरीरातील काही विशिष्ट जनुकं डासांना आकर्षित करतात.the journal Infections, Genetics and Evolution नामक ही जनुकं शरीराच्या वासामध्ये असतात. त्यामधील केमिकल्समुळे डास अधिक जवळ येतात. तसेच डास विशिष्ट भागावर चावतात. ‘Olfaction in Mosquito-Host Interactions’ या पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार डेंग्युला कारणीभूत असणारे डास (Aedes aegypti) डोक्याजवळ अधिक चावतात.
श्री.संजीव, वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.thehealthsite.com
December 27, 2016
कुटुंबे समृद्धी बाग तयार करताना जमिनीचे सपाटीकरण, बांधबंदिस्ती वगैरे जमिनीला खत देण्यापूर्वीच करावे. जमीन हलकी असेल तर किमान १५ ते २० सेंटिमीटर खोल माती राहील इतकी गाळाची वा काळी कसदार माती या क्षेत्रात टाकून घ्यावी. शेणखताबरोबरच तिसरा हिस्सा कोंबडी खत व तिसरा हिस्सा लेंडी खत मिसळून टाकले तर अधिक फायदा होईल.
November 5, 2023
सक्षम होणे, सामर्थ्यवान होणे, जीवन आपल्या पद्धतीने जगण्याचे स्वातंत्र्य मिळणे, सन्मानाने जीवन जगणे या बाबींचा आर्थिक स्थैर्याशी आणि आर्थिक स्वातंत्र्यांची जवळचा संबंध आहे. महिलांना जर खरोखरच सक्षम आणि सामर्थ्यवान व्हायचे असेल तर त्यांची अर्थसाक्षरता वाढवत त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
January 26, 2023
देवाची करणी अन् नारळात पाणी असे म्हणतात. नारळपाणी हे उत्कृष्ट नैसर्गिक पेय आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शहाळ्याचे पाणी गर्भवती महिलांसाठी पोषक मानले जाते.
November 5, 2023
मी पीसीओडीच्या मानसिक हेतुंबद्दल लिहायला सुरवात केली आणि छान मंथन झाले.
काही स्तुती करणाऱ्या, तर काही अत्यंत कटू जहाल, तर काही अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया मिळाल्या. काहींचा सूर फक्त स्त्री मुक्तीवादी होता, काहींना यात धार्मिक वास आला, तर काही अगदी गंमतीशीर होत्या. म्हणजे हे तुम्ही आम्हालाच का सांगता, पुरूषांना देखील सांगा ना ! इथपर्यंत !!
काल मी संप्राप्ती सांगण्याचा प्रयत्न केला, पण ही संप्राप्ती चुकीची / बरोबर असे कुणीही वैद्य बोललेच नाही.
स्त्रीत्व आणि मासिक पाळी पाळणं हे दोन्ही विषय वेगळे आहेत. आधी बंद होत आलेली मासिक पाळी सुरू तर होऊ देत, मग पाळायची /नाही पाळायची/ कशी पाळायची/ का पाळायची/ आम्हीच का म्हणून, हे विषय घेऊ चर्चेसाठी ! पीसीओडी हा विषय एवढा गंभीर आहे, असं मला म्हणायचंय !
असो.
एक विचार मंथन सुरू झाले ही चांगली गोष्ट आहे. काही छान विचार वाचायला मिळाले. ज्ञानात खरंच भर पडली.
मुळात हा आपल्या आयुर्वेद शास्त्रात अनुक्त प्रकारात बसणारा व्याधी.
त्याचे हेतु, त्याचे निदान त्याची चिकित्सा, त्याची दोषदूष्य संमूर्च्छना, संप्राप्ती भेद इ. वर आणखी सखोल विचार व्हायला हवाय.
एक अत्यंत गंभीर आजार ज्याचे उत्तर अॅलोपॅथीमधे आजतरी अंधेरे मे तीर असेच आहे.
पण आपण आयुर्वेदाचे दृष्टीकोन वापरला तर, हा पीसीओडी रोग थांबवू शकतो का ? त्याचे उत्तर "होय" असेच आहे. एखाद्या रोगाच्या हेतुशोधनापासून अपुनर्भवपर्यंत विचार कसा करावा, याचे प्रात्यक्षिक पहायला मिळेल.
मी "थांबवू" शकतो का असा शब्द मुद्दामच वापरला, विचारकक्षा आणखी वाढवल्या तर घालवू शकतो का ?, असा शब्दही वापरता येईल.
हाच विचार अन्य सर्व कधीही बऱ्या न होणाऱ्या व्याधींसाठी करावा लागेल.
जर रोगाचा हेतु शारीरिक असेल तर चिकित्सा शारीरिक
जर हेतु मानसिक असेल तर चिकित्सा मानसिक
जर हेतु आध्यात्मिक असेल तर उपाय आध्यात्मिक करावा लागेल. आणि हेतु सामाजिक असेल तर चिकित्सा देखील सामाजिक करावी लागेल. आणि सर्वच हेतु कारणीभूत असतील तर सगळ्या हेतुंचा विचार एकदम करावा लागेल.
जर आपले शास्त्र हे तीनही शामाआ. सा सुद्धा. मानत असेल तर त्याच्यापर्यंत पोचले पाहिजे. शारीरिक हेतुंचा विचार केला तर बदललेली जीवनपद्धती, व्यायामाचा अभाव, अतिरिक्त पोषण, हेच शारीरिक हेतु मिळतात. जे सगळ्यांना माहिती आहेत.
मानसिक हेतुंचा विचार केला तर मी अगोदर म्हटले तसे, स्त्रीत्वापासून लांब जाणे, तिटकारा वाटणे, वाढता ताणतणाव, नोकरी छोकरी या दोन्ही आघाड्यांवर काम करणे, हे हेतु मिळतात.
आध्यात्मिक हेतुंचा विचारही करावाच लागेल, आध्यात्मिक हा आणखी एक वादाचा मुद्दा होईल, पण जे आहे त्याचा अभ्यास तर करायचाच हवा ना. आईने गर्भावस्थेमधे कुपथ्य करणे, नकोत तेवढ्या गोळ्या खाणे, इ. हेतुंमुळे मुलीला होणारा पीसीओडी हा त्या मुलीसाठी आध्यात्मिक दुष्टीहेतु ठरू शकेल. तिचा काहीही दोष नसताना, तिला पूर्ण आयुष्यभर हा रोग सांभाळत जगावं लागणं, हे तिचं नशीब, असे अनेक रोग आहेत, ज्याची कारणं आध्यात्मिक आहेत.
आणि नोकरीच्या ठिकाणी असणाऱ्या समस्या, जेवायला पुरेसा वेळ न मिळणे, किवा जेवणाची वेळ नोकरीमुळे पाळता न येणे, जीवनात शांतपणा नसणे, नवरा किंवा बाॅसची हुकुमशाही, घरातील काही कारणाने घ्याव्या लागलेल्या पाळी पुढे जाणाऱ्या गोळ्या, सक्तीने घ्याव्या लागलेल्या ओसी पिल्स, या सामाजिक कारणामुळे पीसीओडी दिसतो.
पाश्चात्य विचारसरणीच्या तज्ञांनी याचा विचार फक्त शारीरिकपुरता अधिक केला आहे. काही कारणाने होणारा हार्मोन्समधील बदल याचा विचार केला आहे. पण हे हार्मोन्समधील बदल घडवायला, मन, इंद्रिये, कारणीभूत आहेत, हा अधिकचा विचार आपणाला करता येणार आहे. कारण आपण तो शिकलोय. आणि त्याची चिकित्सा आपल्याला आपल्या पद्धतीने चांगली करता येणार आहे.
( मी असं म्हटलेलं नाही, की फक्त कुंकु, बांगड्या आणि पैंजण घालून पीसीओडी बरा होईल. पीसीओडीचा एक हेतु मन आहे, हे विसरून चालणारच नाही. आणि स्त्रीयांविषयी माझ्या मनात प्रचंड आदर आहे, हे मी आधी नियमितपणे लिहित असलेल्या आरोग्यटीप मधून आपल्या लक्षात आले असेलच.
ज्या मुली कुंकू, बांगड्या, पैंजण वापरतात, आणि ज्यांना पीसीओडीची लक्षणे दिसतात, त्यांचे इतर हेतु शोधावेच लागतील. अव्यायाम, रसायनांचा अति वापर, अवेळी जेवण, लवकर वयात येणे, जीवनशैली ही सर्व कारणे आहेतच ना ! त्याची वेगळी चिकित्सा करावी लागणारच !
मी गेली दहा वर्ष या आजारात जसे कारण (हेतु) तशी चिकित्सा देतोय. माझा संमोहन हा आवडीचा विषय असल्यामुळे मानस हेतु शोधणे, आणि मानस चिकित्सा देणे, त्यामधेही आश्वासन, योगासन, संमोहित अवस्थेत सूचना देणे, नंतर दररोज त्याचा रुग्णाला अभ्यास करायला लावणे, हे मला आवडते. याचा खूप चांगला परिणाम दिसून येतोय. काही रुग्ण मी मुद्दाम फक्त मनोवह स्रोतस शुद्धीचे वेगळे ठेवले आहेत, ज्यांना संमोहनाव्यतिरिक्त फक्त आहारातील पथ्ये आणि योगासने सांगतो. कोणतीही औषधे देत नाही. कुंकु, बांगड्या, पैजण त्याच रुग्णांना सुचवतो, ज्यांनी कधी ते घातलेच नाहीत. त्यांनी हे उपाय केले तरी परिणाम दिसतात. यांची पुढे मासिक पाळी नियमितपणे होताना दिसते.
शमन औषधांचा आणि शोधन चिकित्सेचा परिणाम सुद्धा दिसतो, पण तो काही काळच टिकतो, पुनः कुपथ्य झाले तर किंवा कालाच्या प्रभावाने पुनः अनुपशय दिसतो. जेवढे आपण सूक्ष्मत्वाकडे जाऊ तेवढी शक्ती वाढत जाते,या न्यायाने, शरीरापेक्षा, मन सूक्ष्म आहे, तिथे केलेली चिकित्सा लवकर परिणाम दर्शवते. आत्मा तर त्याहीपेक्षा सूक्ष्म आहे. त्याचा अभ्यास गुरूकृपा झाल्याशिवाय सुरूच होत नाही. म्हणून मला असे वाटते,
( मला असे वाटते, म्हणजे मी अहंकाराने म्हणत नाही हो, ) की, सर्वच व्याधींचे हे तीनही हेतु शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न व्हावा, मी जे काम करतोय ते आपणासमोर ठेवण्याचा मी प्रयत्न करतोय.
पूर्वीच्या काळी देखील स्त्रीयांना मानसिक ताणांना जास्त सामोरे जावे लागत होते. पण पीसीओडीचे प्रमाण एवढे नव्हते. कारण, त्यांची शारीरिक कामेदेखील तेवढीच प्रचंड कष्टांची होती. विहिरीतील पाणी ओढून काढणे, ते घागरीतून कमरेवर घेऊन येणे, सरपण गोळा करणे, चुल फुंकणे, इथपासून, सडा सारवण, रांगोळी काढणे, वाकून केर काढणे, जात्यावर दळणे, कांडणे, उकीडवे बसून कपडे धुणे, भांडी घासणे, पाट्या वरवंट्याने वाटणे, गाई गुरांचे करणे, जमिनीवर डावी मांडी दुमडून जेवणे, ओणव्याने वाढणे, पुनः उष्टशेण करणे, हे सग्गळं तिला एकटीलाच करावं लागत होतं. कोणताही पुरूष मदतीला जात नव्हता. त्यात पोरांकडे तिलाच लक्ष द्यायचं होतं.
तिची करमणूक म्हणजे झिम्मा, फुगड्या, पिंगा, हे सर्व व्यायाम प्रकारच होते. वेगळे योगासनाचे क्लास लावावे लागत नव्हते.
या सर्व प्रकारात तिचे पोट अक्षरशः पिळले जात होते, पिळवटले जात होते, खऱ्या अर्थाने स्त्रीची "पिळवणूक" होत होती. अशा कामामुळे पीसीओडी कशाला होईल ? आज पीसीओडी वाढलेला दिसतोय कारण ही सर्व कामे बंद झाली. मी पुनः एकदा सांगतोय, स्त्रीला कामाला लावायचा माझा हेतु बिलकुल नाही, पण आपण हेतुंचा विचार करतोय, म्हणून जुन्या भारतीय कामांची फक्त आठवण करून दिली.
अन्नाचा दर्जाही उत्तम प्रतीचा होता. कमी खाल्ले तरी (आजच्या भाषेतील पोषणमूल्ये पुरेशी होती. मी आयुर्वेदाचा कट्टर पुरस्कर्ता असल्यामुळे मला म्हणे, असे माॅडर्न टर्मिनाॅलाॅजी असलेले शब्द वापरायची सुद्धा बंदी. ) पोटभर नसले तरी पुरेसे होते.
भरपूर काम करायचं आणि काय खायचं, असा एक जमाना भोगलाय स्त्रीनं. आणि आज हे समीकरण बदलत बदलत, व्यायाम-काम कमी करायचं, आणि काय काय खायचं, असा प्रश्न भरल्या घरात पडतोय. चीज, पनीर, चायनीज, पंजाबी या खाण्याबद्दल मी बोलतच नाही.....
एकंदरीत आज स्त्रीयांची शारीरिक पिळवणूक कमी, आणि मानसिक जास्त असं झालंय.
म्हणजे पुनः स्त्रीयांची शारीरिक पिळवणूक करा, असं शब्दशः मला म्हणायचं नाहीये.
आणि मी फक्त स्त्रीयांना म्हणतोय, कारण लेखाचा विषय पीसीओडी आहे. मी पुरूषांच्या बाजूने बोलतोय, असा (गैर) समज कृपया करून घेऊ नये.
आणि हो, ही सर्व फक्त आपल्या प्रिय भारत देशातलीच वैशिष्ट्य सांगतोय बरं का !
भारतात पीसीओडीचे थैमान आत्ता वीस पंचवीस वर्षातील. पण पाश्चात्य देशात हा आजार त्यांच्या यांत्रिक (सेडेंटरी) जीवनशैलीमुळे चाळीस पन्नास वर्षे तरी जुना असावा.
हा आजार भारतातून हद्दपार करणे, आपल्याला शक्य आहे, कारण त्यांचे निदान हेतू आपणाला आयुर्वेदानुसार शोधता येतील, माहिती आहेत.
गाडी जर चुकीच्या रस्त्याने गेली तर तसंच आणखी पुढे जायचं का ? ज्या रस्त्याचं भविष्य आपणाला माहितीच नाही. तिथून परत मागे फिरणे योग्य नाही का ?
हेतु सेवन बंद झाल्याशिवाय कायमचा संप्राप्तीभंग कसा होईल ? नाहीतर कायमच्या घ्याव्या लागणाऱ्या व्याधींच्या यादीत आणखी एक नाव अॅड होईल.
बघा विचार करून..
वैद्य सुविनय दामले
कुडाळ सिंधुदुर्ग.
March 12, 2017
भारताच्या समुद्रकिनार्यालगत एका सरकारी अहवालानुसार १.४ कोटी कोळी समाज रहात आहेत. यापैकी ४० लाख कोळी बांधव हे समुद्रात मासेमारी करिता जातात असा अंदाज आहे. अडीच ते तीन लाख मासेमारी करणार्या बोटींच्या साहाय्याने ते ही मासेमारी करतात.
December 17, 2016
शिकेकई म्हणजे शास्त्रीय भाषेत अकेशिया कॉन्सिन्ना, एक नैसर्गिक शाम्पू.
शिकेकईची फळे वाळवून दळून, त्याची पावडर वापरली जाते. किंवा शिकेकईचा ओला पाला पट्यावर वाटून तो केसांसाठी वापरला जातो.
शिकेकईचा केस दणकट व्हायला, तजेलदार व्हायला खूपच मदत होते. ही वनस्पती उष्ण आणि कोरड्या कटिबंधात वाढणारी आहे. केसामधे कोंडा न होण्यासाठी शिकेकईचा खूपच उपयोग होतो. आजच्या युगात आपण इतके साबण शाम्पू विकत घेत असतो, पण शिकेकई हे एक नैसर्गिक बॉडी केअर आणि हेअर केअर प्रॉडक्टच आहे. त्याची सर कोणत्याही शाम्पू कंडिशनरला नाही.
शिकेकईमुळे केस काळे रहातात. शाम्पू वापरल्याचे दुष्परिणाम म्हणजे मानव निर्मित रसायना मुळे केस लवकर पांढरे होणे, केस गळणे इत्यादि. शिकेकई मधे नैसर्गिक तेल, नैसर्गिक शाम्पू आणि नैसर्गिक कंडिशनर असते.
शिकेकई मधे खूप प्रमाणात सॅपोनियन हे नैसर्गिक द्रव्य आहे. ह्या द्रव्यामुळे फेस निर्माण होतो. त्यामधे स्वच्छतेला हातभार लावतील असे अंश असतात. हे रसायन नंतर साबण उत्पादनासाठी वापरले जाते.
शिकेकईचा वापर उन्हाळ्यात खूपच प्रभावी ठरतो. त्यामुळे डोक्याला एक थंडाई येते. शिकेकईच्या बरोबरीनी नागरमुथा, वाळलेली संत्राची साले, वाळवलेली मेंदीची पाने, ह्या गोष्टीही वाटल्या जातात. शिकेकई वापरायची असल्यास दळून आणलेली शिकेकई आदल्या दिवशी रात्रीच लोखंडाच्या भांड्यात भिजवून ठेवतात. सकाळी नहाण्यापूर्वी ती भांड्यातील शिकेकई उकळून घेतात. म्हणजे त्याचे सर्व सत्व एकजीव होते आणि त्याचा केसांवर खूप छान परिणाम होतो.
-- प्रमोद तांबे
May 19, 2017
तुम्हाला सर्वांना हे तर माहीतच आहे कि कुठलेही दूधजन्य पदार्थ हे आरोग्यासाठी लाभदायकच असतात त्यातीलच एक आहे दही, दही खाणे हे आरोग्यासाठी नेहमीच हितकारक मानले जाते. दह्यामधील विशिष्ट गुणधर्मामुळे दुधाच्या तुलनेत ते लवकर पचते, तसेच ज्यांना पोटासंबंधित त्रास जसे अपचन, गॅस सारख्या समस्या असतील त्यांच्यासाठी दही एक उत्तम उपाय आहे.
July 11, 2019
घोरणे म्हणजे झोपेत जीभ, टाळू आणि पडजीभ, इ. स्नायू सैल पडल्याने हवेच्या मार्गातील कंपनाने होणारा आवाज आहे. मात्र हा हवेच्या मार्गात अडथळा असल्याने झोपेत शरीरावर याचे दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणूनच याचे वैद्यकीय महत्त्व आहे. हवेच्या अडथळयाच्या प्रमाणानुसार शरीरातील रक्तातल्या प्राणवायूचे प्रमाण निम्म्याच्या खाली जाऊन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. ब-याच जणांना झोपेत घोरण्यामुळे श्वास अडून आचके येतात. काही लोक यामुळे उठून बसतात किंवा काहीजण कुस बदलून झोपतात. कुस बदलल्यामुळे बहुधा हा अडथळा थांबून श्वास सुरळीत होतो.
घोरण्याबरोबर अनेक आजारांशी नाते आढळून येते. घोरणा-या व्यक्तींना अतिरक्तदाब, हृदयविकाराचा झटका किंवा मेंदूचा आघात झाल्याने पक्षाघात होऊ शकतो. घोरण्यामागे अनेक प्रकारची कारणे असू शकतात. घोरणे हे काही अंशी आनुवंशिक असू शकते. मात्र लठ्ठपणा, मधुमेह, धूम्रपान, मद्यपान, मान जाड असणे, गरोदरपणा, उतारवय, नाकातील मार्गामध्ये अडथळा, थायरॉईड संप्रेरकांची कमतरता, इ. निरनिराळी कारणे यामागे असतात. वयानुसार स्नायूंमध्ये ढिलाई येते व घोरणे सुरु होते. लठ्ठपणामध्ये स्नायूंमध्ये चरबी साठून स्नायू दुबळे होतात. हे आजार नसतील तर उतारवयातील घोरण्यापासून ही व्यक्ती मुक्त असू शकते. घोरण्यामुळे श्वास अडून आचके येत असतील तर डॉक्टरकडे नक्की दाखवले पाहिजे. यासाठी काही तपासण्या करून घोरण्याचे कारण आणि प्राणवायू प्रमाणाची कमतरता निश्चित करता येते. छातीच्या डॉक्टरकडून तपासणी केल्यास रात्रभराचा घोरण्याचा आलेख व कार्डिओग्राम (ईसीजी) काढता येतो. यावरून निश्चित निदान करता येते. यातील बहुतेक लोकांना जीभ जडावल्यामुळे घोरण्याचा त्रास होत असतो. कारणाप्रमाणे यावर वेगवेगळे उपचार उपलब्ध आहेत. जीभ जागच्या जागी रहावी म्हणून प्लॅस्टिकची आधारपट्टी किंवा शस्त्रक्रियेने घोरणे दुरुस्त करता येते. योग्य आहार, व्यायाम, प्राणायामाचे काही प्रकार (उज्जायी व भस्त्रिका) वजन कमी करणे, कुशीवर झोपणे, या साध्या साध्या उपायांनी घोरण्याचा त्रास बराच कमी होऊ शकतो.
यातून उपाय न झाल्यास व त्रास जास्त असल्यास डॉक्टरकडे अवश्य गेले पाहिजे. डॉक्टरकडे जाण्या आधी काही उपाय करून पहिले पाहिजेत. उताणे झोपण्या एवजी एका कुशीवर झोपावे. विशेषतः डाव्या कुशीवर झोपणे हितकारक असते. त्यामुळे घशातले स्नायू एका बाजूला पडतात. आणि घोरण्याची गरज पडत नाही. झोपण्यापूर्वी नाकपुडीमध्ये एक स्प्रे फवरला जातो. त्यामुळे सुद्धा तात्पुरता दिलासा मिळू शकतो. झोपण्यापूर्वी चार तास आधी मद्यपान न करणे हाही एक घोरण्यावरचा सोपा उपाय आहे. मर्यादेपेक्षा अधिक धुम्रपान करण्याने सुद्धा घोरणे वाढते. तेव्हा सिगरेटच्या संख्येत घट करणे हा घोरण्यावरचा एक उपाय आहे. मर्यादेपेक्षा अधिक वजन असणे हेही घोरण्याच्या बाबतीत धोकादायक असते. तेव्हा वजन मर्यादित असणे हा एक चांगला उपाय आहे. घोरण्यावरचा आणखी एक उपाय म्हणजे थोड्याश्या उंच उशा वापरणे. घोरणार्याण व्यक्तीने, टाळूच्या विरुद्ध दिशेला जीभेचे टोक मागे वळवण्याचा प्रयत्न करावा. जीभ टाळूवर घासून खालच्या बाजूला आणण्याचा प्रयत्न करा. घोरण्याच्या समस्येनी पीडित लोकांनी जीभेच्या पुढच्या टोकाला टाळूच्या दिशेनं दाबावं त्यानंतर जीभेला पुन्हा खेचून घ्यावं. आता जीभेच्या पुढच्या बाजूने दातांना स्पर्श करत जीभेच्या मागील भागास टाळूच्या दिशेला दाबावे आणि ‘ए’ उच्चार करावा. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ केंटुकी कॉलेज ऑफ मेडिसिनचे मेडीकल डिरेक्टर बारबार फिलीप्स यांच्यानुसार, घोरण्याच्या समस्येसंबंधी अनेक लोकांना दिलासा देण्यासाठी हे संशोधन उपायकारक आणि विना शस्त्रक्रिया आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 5, 2017
सकाळचा उत्तराखंडातल्या नैनीताल जिल्ह्यातील रामनगर ते जुनी दिल्ली असा प्रवास, ‘रामनगर -दिल्ली संपर्क क्रांती लिंक एक्सप्रेस’ अशा त्या रेल्वेसारख्याच लांबलचक नांवाच्या रेल्वे गाडीनं केला. उत्तर प्रदेश-बिहारकडच्या रेल्वेप्रवासातील गर्दीच्या काही फिल्म्स डिस्कव्हरी-नॅशनल जिओग्राफीक चॅनलवर पाहील्या होत्या, त्या प्रत्यक्ष अनुभवल्या.
May 29, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti