लेखसंग्रह

सामाजिक बांधिलकीची जाणीव

Category:

 

सामाजिक बांधिलकीची जाणीव बालपणापासूनच लहान मुलांमध्ये निर्माण करणं जरुरीचं असतं, त्याचं भान त्यांच्याकडून राखलं जातं का? हे पाहणं गरजेचं असतं. आजची लहान मुलंच ह्या देशासाठी उद्याची संपत्ती असल्याचं आपण बोलतो, ऐकतो; त्यानुषंगाने मुलांचा विकास झाला तरंच राष्ट्राची प्रगती होईल.

  June 11, 2026


बाबासाहेबांची पत्रकारिता
इ-पुस्तके

बाबासाहेबांची पत्रकारिता

Category:

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्याच्या ६५ पैकी सुमारे ३६ वर्षे पत्रकारिता केली. ते उच्च दर्जाचे पत्रकार होते. त्यांची पत्रकारिता मूकनायकच्या माध्यमातून आवाजहीनांचा आवाज बनून सुरू झाली आणि प्रबुध्द भारताच्या माध्यमातून प्रबुध्द भारत घडवण्याचे स्वप्न घेऊन संपली. मूकनायक ते प्रबुध्द भारत हा त्यांचा प्रवास विचार आणि संघर्ष या दोन्हींचा होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वर्तमानपत्रे आसपासच्या घटनांची माहिती देणारे व्यासपीठ नव्हते. वसाहती काळातील सामाजिक, राजकीय आणि धार्मिक जीवनाशी वाटाघाटी करणाऱ्या त्या चळवळी होत्या, वंचितांचे आवाज होते.

या आवाजांचा परिणाम राजकीय सक्रियता आणि विविध संघटनांच्या विचारांमध्ये दिसून आला, ज्यामुळे विचारांचे स्फटिकीकरण झाले.

  August 23, 2025


लेखसंग्रह

संवादाचं सुख

Category:

 

परस्परांतील सूर जेव्हा संवादाच्या माधमातून जुळायला सुरुवात होते, तेव्हाच त्याच्यावर ताल देखील धरला जातो. ह्यासाठी एकमेकांचं ताळतंत्र, थोडं का होईना पण सांभाळायला लागतं. संवादाचं सुख ही ज्याची त्यानी अनुभूती घेण्याची बाब असते.

  March 23, 2022


लेखसंग्रह

मौखिक व अमौखिक संवाद

Category:

 

दोन व्यक्तींमधील संवादात सहसा तिसरी व्यक्ती सामील झालेली नसते. हा संवाद व्यक्तिगत, थेट आणि निकटता निर्माण करणारा असतो, ज्यात शब्द, देहबोली यांचा अंतर्भाव असतो. या संवादामुळे व्यक्तीचं मन वळवणे, एखाद्यावर प्रभाव निर्माण करणे शक्य होतं. या संवादामध्ये मौखिक, अमौखिक संवाद शक्य असतो. त्याचबरोबर अशा संवादात तात्काळ प्रतिसादही मिळत जातो.

  March 22, 2022


लेखसंग्रह

संवाद हीच अंतर्मनाची गरज

Category:

 

“संवाद” म्हणजे नुसतं बोलणं नाही, तर विचारांचं आदानप्रदान, एकमेकांना भावनिक आणि मानसिक पातळीवर समजून घेणं. ह्या संवादांत दुसऱ्याचं बोलणं, विचार, मत समजण्यासाठी ऐकून घेणं जरुरीचं असतं.

  March 21, 2022


लेखसंग्रह

विचारांना वाट करून देण्याची गरज

Category:

 

मनांत येणाऱ्या अनेक विचारांना वाट करून देण्याची गरज असते, त्यांना मोकळं करण्याची जरुरी असते. बोलून दाखवलेल्या मनांतील विचारांमुळे मनावरचा ताण हलका होतो. आपल्या मेंदूत साठवलेले, आठवलेले अनेक विचार, विषय ड्रेन करण्याची आवश्यकता असते.

  March 19, 2022


लेखसंग्रह

लहानपणातलं बालपण

Category:

 

अनेकदा अगदी लहानपणापासूनच बाल मनावर आपण, कदाचित अनावधानानं असेल, पण आघात करत असतो, दबाव टाकत असतो. त्यांच्या स्वातंत्र्यावर अनेकदा आपण गदा आणत असतो. प्रत्येक बाब आपण आपल्याच मनाप्रमाणे त्यानं करावी ही केवळ अपेक्षाच नाही, तर सक्ती सुद्धा करत असतो. शिस्तीच्या नावाखाली आपण बाळाची गळचेपी करत असतो. त्यांच्या लहानपणी त्यांचं बालपण टिकवून ठेवणं आपापल्या हातात असतं.

  March 18, 2022


लेखसंग्रह

बालमनाला सांभाळणे आवश्यक

Category:

 

मी आणि माझं, आपण आणि आपलं या वैचारीकतेमुळे कुटुंबातील सदस्यांनी आपल्या स्वतः भोवती जणू लक्ष्मणरेषा आखून घेतल्याप्रमाणे वर्तन आणि विचार अंगीकारल्याचं दिसत आहे. सामाजिकदृष्ट्या आपणच आपलं अध:पतन तर करत नाहीत ना, हा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

  March 17, 2022


लेखसंग्रह

बालमनाची निरागसता

Category:

 

बालमन अत्यंत निरागस असतं, हे आपल्याकडून केवळ बोललं जातं; पण त्याचा अनेकदा आपल्या विचारांत आणि वर्तनांत उपयोग केल्याचं दिसून येत नाही. बालमन हे अनुकरणप्रिय असतं; निरपेक्ष, निरागस, नि:स्वार्थी आणि निरपराधी असतं.

  March 14, 2022


लेखसंग्रह

प्रसारमाध्यमांव्दारे जाहिरात करणे फायद्याचेच

Category:

 

जाहिरातदारांच्या उत्पादनाच्या विक्री वृद्धीसाठी आवश्यक असणारी पहिली गुंतवणूक म्हणजे प्रसारमाध्यमांव्दारे केलेली जाहिरात होय. अनेकदा उद्योजक जाहिरातीवर आर्थिक गुंतवणूक करायला तयार नसतात. मुळातच जाहिरात ही गुंतवणूक न समजता खर्च समजला जातो. त्यामुळेच त्यांचा जाहिरातीवर होणारा खर्च अनेकदा जाहिरात करण्यापासून त्यांना रोखणारा पहिला अडथळा ठरत असतो.

  March 4, 2022