आठवडी बाजार
लेखसंग्रह

आठवडी बाजार

Category:

 

रत्नागिरी जिल्ह्यातलं राजापूर तालुक्यातलं ताम्हाणे हे आमचं बारा वाड्यांचा छोटस गाव. आमच्या गावाला रोज लवकरच जाग येते तरीही दर बुधवारी आमच्या गावात जरा जास्तच गजबज जाणवायला लागते. हा दिवस असतो आमच्या आठवडी बाजाराचा. आमच्या गावापासून नऊ किलोमीटरवर पाचल नावाच्या गावी हा बाजार दर बुधवारी भरतो. फक्त आमच्याच नाही तर पाचलची पंचवीस किलोमीटरच्या परिसरातील गावांमधून लोक या बाजारासाठी येतात.

अध्यात्म रामायण – संक्षिप्त परिचय
लेखसंग्रह

अध्यात्म रामायण – संक्षिप्त परिचय

Category:

 

परमेश्वराच्या ठिकाणी भक्तीभाव कसा ठेवावा याचे मार्गदर्शन करणारा ग्रंथ म्हणून अध्यात्म रामायणाचे विशेष महत्व आहे. यामध्ये रामायणाच्या कथानकातच प्रसंगानुरूप रामाच्या तत्वज्ञानात्मक रूपाचे वर्णन केलेले दिसून येते.ब्रह्मांड पुराणाचा एक भाग असलेल्या अध्यात्म रामायणात ज्ञान आणि भक्ती यांचा समन्वय झालेला दिसून येतो.यालाच अध्यात्मरामचरित किंवा आध्यात्मिक रामसंहिता असेही म्हणतात.या ग्रंथाची ७ कांडे आणि १५ सर्ग आहेत.

साहित्य - ललित

कृषी पराशर ग्रंथातील सण आणि उत्सव

Category:

 

भारतीय संस्कृती ही प्रामुख्याने कृषी संस्कृती आहे. सर्व प्राणिमात्रांची मूलभूत गरज म्हणजे अन्न. त्यामुळे मानवी जीवनात अन्न-धान्याचे महत्व अविवाद्य असल्याने आपल्या पूर्वजांनी त्यासंबंधी विशेष विचार केलेला आढळून येतो. कृषि-पराशर हा पराशरांनी लिहिलेला शेतीविषयक ग्रंथ म्हणून मान्यता पावलेला आहे. प्राचीन भारतीय कृषीशास्त्राचा तो एक महत्वाचा ग्रंथ म्हणून ओळखला जातो. या ग्रंथाच्या शैलीवरून तो ८ व्या शतकातील असावा असे मानले जाते.

परिचय - परिक्षण

गोष्ट एका खर्‍या इडियटची (पुस्तक परिचय )

Category:

 

शालेय शिक्षण संपून महाविद्यालयीन जीवन सुरु होताना आपल्या मनात आपल्या भावी आयुष्याविषयी खूप वेगवेगळ्या कल्पना असतात. पैकी काही स्वप्नाळू असतील तर काही वास्तववादी! स्वप्नाळू वाटत असलेल्या कल्पना जर प्रत्यक्षात उतरवायच्या असतील तर त्यासाठी स्वत:च्या  विचारांची आपल्या स्वत:ला खात्री असणं आणि आपल्या निर्णयाबद्दल आत्मविश्वास असणं फार महत्वाचं ठरतं. असाच एक स्वप्नाळू वाटणारा, सरधोपट वास्तवाशी फारकत घेणारा निर्णय एक युवती घेते… आणि त्यानंतर काय काय घडतं तिच्या आयुष्यात याचा पट मांडला आहे “गोष्ट एका खर्‍या इडीयट ची’ या पुस्तकात!

आश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो…
लेखसंग्रह

आश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो…

Category:

 

आश्विन शुक्ल  प्रतिपदेला होणारी घटस्थापना ह एक काम्य व्रत आहे. काळाच्या ओघात या व्रताला अनेक कुटुंबात कुलाचाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. देवीचे नवरात्र हे वसंत(चैत्र) आणि शरद(आश्विन) या दोन ऋतूमध्ये साजरे केले जाते. त्यापैकी शारदीय नवरात्री याविषयी हा संक्षिप्त परिचय

लेखसंग्रह

देव दिवाळी – उत्सव देवदेवतांचा – प्रकाशाचा

Category:

 

भारताच्या विविध प्रांतात देव दिवाळी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी होते. महाराष्ट्रात विशेषतः कोकण भागात मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेला देव दिवाळी साजरी केली जाते. या दिवशी आपल्या कुलदेवतेला विशेष नैवेद्य दाखविला जातो. धर्मसिंधु आणि कार्तिक मास महात्म्य या ग्रंथात देव दिवाळीच्या व्रताचे महत्व नोंदविलेले आहे.

लेखसंग्रह

पंप रामायण

Category:

 

उत्तर भारतातील घराघरात तुलसी रामायणाचे वाचन होते, ते सार्वजनीन आहे. परंतु पंप रामायणाचा परिचय समाजाला न झाल्याने ते लोकाभिमुख न होता केवळ साहित्य वर्तुळातच  प्रसिद्ध पावले. या रामायणाचा कर्ता नागचंद्र  याचा काळ इ.स. १०७५ ते ११०० असावा असे मानले जाते. चालुक्य व होयसळ राजांनी नागचंद्राचा सन्मान केला असे मानले जाते. नागचंद्र जैन परंपरेचे उपासक  व गुरुभक्त असून जैन परंपरेविषयी निष्ठा व भक्ती त्यांच्या साहित्यातून दिसून येते.

लेखसंग्रह

मोद भरल्या कौमुदीने मोद बहरो जगभरी….

Category:

 

सा-या  भूतलावर शरदाचे चांदणे  बरसवीत येते आश्विन पौर्णिमा. या पौर्णिमेला  आपण “कोजागिरी” पौणिमा असे म्हणतो. सर्वाना आनंद वाटणा-या या रात्रीचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व जाणून घेऊया…. कोजागरी, कौमुदी जागर, दीपदान जागर अशा विविध नावांनी ही रात्र ओळखली जाते.