(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • द्वादशलिंग स्तोत्रम् – ३

    आपल्या विश्व प्रसिद्ध असणाऱ्या मेघदूतम् नावाच्या काव्यात महाकवी कालिदास यांनी ज्या नगरीचे वर्णन करताना, वाट वाकडी करावी लागली तरी चालेल पण या नगरीला निश्चित जा.

      September 6, 2020


  • जेवण संस्कृती

    आपल्याला बोलायला देत नाही म्हणून वाईट वाटायचं, क्वचित रागही यायचा. पुढे मोठं झाल्यावर यामागचा आईचा उद्देश कळायला लागला. आपल्या पोटात पुरेसं अन्न जावं, गप्पांच्या नादात खाण्याकडे दुर्लक्ष होऊन आपण अर्धपोटी राहू नये हा स्वच्छ निखळ हेतू असायचा आ.मु.जे. ब. च्या मागचा. घरातल्या स्त्रिया आज्जी, आई, ताई सकाळपासून स्वयंपाकघरात कामात असायच्या.

      January 8, 2023


  • शिवधनुष्य प्रशासकीय सुधारणांचे

    आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणावरुन राज्य मानवी हक्क आयोगाचे सदस्य के. लाला यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपवला. त्यानंतर राज्यात मोठे प्रशासकीय फेरबदल होणार असल्याचे संकेत मिळाले. वास्तविक प्रशासकीय सुधारणा ही केवळ निवड-नियुक्ती या पुरती मर्यादित बाब नाही. त्यासाठी अनेक गोष्टींचा विविध पातळ्यांवर विचार करावा लागेल. तरच हे शिवधनुष्य पेलणे शक्य होईल.

      January 10, 2011


  • याला जीवन ऐसे नाव भाग २७

    पाणी शुद्धीकरण भाग सात

    आपण मागे बघितले की ज्या नद्या खळाळत वाहातात, त्यांचे पाणी संथ वाहाणाऱ्या नदीच्या पाण्यापेक्षा जास्त शुद्ध असते.

    हे मूळ सूत्र ग्रंथकारांनी सांगितले. आता याच सूत्राने आपल्याला पाणी शुद्ध करता येईल का ?
    ज्या नद्यांचे पाणी मोठाल्या दगडावर आपटत खाली येते, उंचावरून खाली पडते, तुषार उडवणारे असते, जोरात वाहाणारे असते, ते जर शुद्ध होते, तर पाणी शुद्ध करण्यासाठी हीच पद्धत वापरता येईल.

    म्हणजेच पाण्याला घुसळून वापरणे..
    दह्याचे ताक करताना जसे घुसळले जाते, तसे पाणी घुसळले तर त्यातील अशुद्धी खाली बसतात. त्यातील सूक्ष्म जीव नष्ट होतात, आणि पाणी शुद्ध होते.
    दही घुसळताना जी शक्ती वापरली जाते, त्या शक्तीच्या सहाय्याने दह्यातील सूक्ष्मत्व वेगळे होत जाते. त्यातील लोण्याचा घन भाग एकत्र येत जातो आणि वर तरंगतो, तसेच पाणी घुसळले गेल्यावर त्यातील अशुद्ध द्रव्याचा घनभाग एकत्र येतो आणि तळात एकत्रित होतो.

    या प्रक्रियेत आणखी एक फायदा असा होतो, तो म्हणजे वातावरणातील प्राणशक्ती पाण्यात जास्त प्रमाणात मिसळली जाते. आणि पाण्यातील अतिरिक्त वायु महाभूत निघून जाते.

    एखादे द्रव्य महाभूतांचा विचार करता पांचभौतिकच असते. फक्त तरतम भावांचा विचार करता, प्रत्येक द्रव्यातील संघात वेगवेगळा होतो, त्यावर ते द्रव्य घन वायु द्रव आकाशीय, तेजस बनणे अवलंबून असते.
    तसे पाण्यात असलेला घन, वायु आणि आकाशीय भाग कमी करत गेला की शुद्ध जल महाभूताकडे आपण जातो. आपल्याला जे द्रव्य ज्या स्वरूपात हवे आहे, ते महाभूत त्यामधे शिल्लक ठेवून अन्य महाभूतांचे प्रमाण कमी करीत जाणे. हीच खरी शुद्धी.

    हाच नियम कुठेही वापरू शकतो. अगदी सोन्याच्या बाबतीतही. मग सोन्यातील अन्य महाभूते कमी करत सोन्यातील फक्त शुद्ध पृथ्वी महाभूत शिल्लक ठेवण्यासाठी जे संस्कार सोन्यावर केले जातात, ती सोन्याची शुद्धी !

    उंचावरून खाली पडणारे पाणी शुद्ध असते. थोडसं संयुक्तिक वाटणार नाही पण समजण्यासाठी सांगतो, चहा "चढवला" कि त्याची चव बदलते ना ? चढवणे म्हणजे लांऽऽब करणे. उंचावरून खाली ओतणे, या उंचावरून ओतण्यामुळे त्यातील घन द्रवता बदलत जाते.चहाची चवही बदलते. तसेच आहे. पाणी उंचावरून ओतून घुसळण्याच्या प्रक्रियेतून अशुद्ध द्रव्ये घनीभूत होतात. नंतर ती गाळून वेगळी करता येतील.

    घरातील पाणी शुद्ध करण्यासाठी पाणी मिक्सरमधून काही काळ फिरवून बघा. वेळ असेल तर ताकाच्या रविने घुसळा...
    रविचे घुसळणे आणि मिक्सरमधून घुसळणे यातही खूप फरक आहे, पण पाणी घुसळून पहा तर खरं, पाण्यातील अशुद्धी कश्या तळात जमा होतात त्या !

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021

    03.01.2017

      January 3, 2017


  • लाइफस्टाइलने जगण्यासाठी

    शिक्षणावर शहरी माणूस सर्वात जास्ती खर्च करतो, शिक्षणाचा रोजचा माणशी खर्च दीडशे रुपयांच्या आसपास जातो. स्पेशल ट्युशन्स लावल्या, काही कला किंवा खेळाचे प्रशिक्षण घेतले तर तो खर्च कितीही वाढू शकतो. यामध्ये चार जणांचे कुटुंब गृहीत धरलेले आहे.माणशी रोजचा खर्च पावणे पाचशे ते साडेसहाशे इतका येतो.याच्या पुढचे उत्पन्न हे गुंतवणूक म्हणून वापरता येऊ शकते.

      October 28, 2023


  • विज्ञानीय दृष्टीकोनातून भगवत् गीता – अ. २  श्लो १२

    विज्ञानीय दृष्टीकोनातून भगवत् गीता – अ. २ श्लो १२

    आपण, म्हणजे वर्तमानकाळातील पिढी आणि महाभारतकाळातीलही पिढी, आपल्या म्हणजे त्यांच्याही पूर्वजांच्या रुपात अस्तित्वात होते, महाभारतकाळातील माणसेही, त्यांच्या वंशजांच्या स्वरूपात आजही अस्तित्वात आहेत आणि आपण सर्वजण, पृथ्वीवर सजीव जगू शकतात तो पर्यंत, आपल्या उत्क्रांत झालेल्या वंशजांच्या स्वरूपात अस्तित्वात असणारच आहोत, हे खर्‍या अर्थाने समजणे कठीण आहे असे मला वाटते. यासंबंधीच या लेखात चर्चा केली अअहे.

      December 17, 2016


  • एकमेकांना मदत करतात तीच खरी माणसं

    माझा घराजवळचा एक नेहमीचा भाजीवाला आहे. मारवाडी आहे. एका किराणामालाच्या दुकाना बाहेर आपलं दुकान थाटलंय. सकाळी सात ते रात्री अकरा त्याचं दुकान चालू असतं. भाजी घेऊन पैसे देऊन झाले की पिशवीत आलं, लिंबं, कढीपत्ता काहीतरी प्रेमानं आणि आग्रहानं भरून देतो...

    आज संध्याकाळी त्याला विचारलं की 'शेटजी, सुट्ट्या नोटांचं काय करताय तुम्ही?'... तर म्हणाला की मोठ्या शेटशी (म्हणजे त्याच्या मागचा किराणामालाचा दुकानदार) टाय-अप केलंय... इथून भाजी विकत घ्या आणि त्यांच्याकडे कार्डनी पेमेंट करा...!

    मी खुष झालो. भाजी घ्यायला लागलो. तेवढ्यात मोठ्या शेटनी ओरडून सांगितलं की 'सर्वर डाऊन आहे. कार्ड पेमेंट चालत नाहीयेत'. मी थांबलो. भाजीवाल्या मारवाड्याला विचारलं 'काय करू?'

    तो म्हणाला, 'आप जो चाहिये लेके जाओ. पैसा बाद में देना.'

    तो तसं म्हणाला तरी मलाच धजवेना. मी अगदी गरजे पुरती एक दिवसाचीच भाजी घेतली. शंभराच्या आतलीच. खिशातली एकमेव शंभराची नोट काढून त्याला द्यायला लागलो तर म्हणला, 'रहने दो सहाब ये नोट इमर्जन्सी के लिए. मुझे बाद मे देना पैसा. मै भी यहीं हूं और आप भी यहीं होगे'

    मी नाईलाजानं ती नोट पुन्हा खिशात ठेवली... त्याला म्हणालो, 'लिहून ठेव'... तर म्हणाला, 'तुम्हीच लक्षात ठेवा आणि जमतील तेंव्हा द्या...'

    कट टू

    पलिकडच्याच एका वाईन शॉपमध्ये शुक्रवार संध्याकाळ निमित्त झुंबड उडली होती. तिथे कार्ड घेतात, पण 'सर्वर डाऊन' मुळे कार्डं घेतली जात नव्हती. खिशात नव्या किंवा सुट्या नोटा नसलेले लोक दुकानदाराशी हमरीतुमरीवर येत होते... अन दुकानदार कधी शांतपणे तर कधी मग्रूरपणे 'कॅश टाका अन दारू घ्या' हे गिऱ्हाईकांना ऐकवत होता...

    कट टू

    घरी आलो. इस्त्रीवाला आधीचे कपडे घेऊन आला होता. त्याचे दोनेकशे रुपये झाले होते. खिशात शंभराच्य दोन नोटा नव्हत्या. 'काय करुया?' असं त्यालाच विचारलं. 'पाचशे झाले की चेक द्या' असं तो म्हणाला आणि पुढचे कपडे घेऊन गेला...

    ******

    या सगळ्या काल संध्याकाळी घडलेल्या १००% सत्य घटना...

    आता यांना द्यायचाच तर काहीही Spin देता येईल

    *******

    पहिला Spin: भाजीवाले, इस्त्रीवाले आणि बहुसंख्य छोटे व्यावसायिक देशभक्तिपोटी आर्थिक झळ सोसत आहेत...

    दुसरा Spin: भाजीवाले, इस्त्रीवाले आणि बहुसंख्य छोट्या व्यावसायिकांची भीषण ससेहोलपट होत आहे...

    तिसरा Spin: काही दुकानं, विशेषतः दारूची वगैरे, इथे भीषण वादावादी, हमरी-तुमरी आणि भांडणं होत आहेत....

    ********

    माझा Spin: अस्मानी संकटं आणि सुल्तानी संकटं सांगून येत नाहीत... पण ही संकटं आलीच तर एकमेकांना मदत करतात तीच खरी माणसं.... तीच खरी नाती....

    अशी किती माणसं आपण जोडली आहेत?.... अशी किती नाती आपण रुजवली आणि फुलवली आहेत....?

    *********

    खिशात 'आज' पुरेशा नोटा नसतानाही मला जगण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी मिळू शकतात... त्या केवळ मी जोडलेल्या माणसांमुळे आणि नात्यांमुळे...

    मी जगातला सर्वांत जास्त श्रीमंत माणूस आहे!!

    Forwarded post

      November 29, 2016


  • निसर्ग मित्र व्हा – झाडे लावा

    भविष्यात शेती करायची असेल तर यावर्षी शेतात प्रती एकर कमीतकमी २० झाडे लावा.अन्यथा हवामान बदलामुळे शेती बरबाद होईल.

      May 15, 2019


  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – ३

    स्वशक्त्यादिशक्त्यंत सिंहासनस्थं
    मनोहारि सर्वांगरत्नोरुभूषम् |
    जटाहींदुगंगास्थिशम्याकमौलिं
    पराशक्तिमित्रं नमः पंचवक्त्रम् ‖ ३ ‖

    भगवान श्री शंकरांच्या दिव्य स्वरूपाचे वर्णन करताना जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
    स्वशक्त्यादिशक्त्यंतसिंहासनस्थं- स्वतःची शक्ती अर्थात चैतन्यसत्ता असणाऱ्या आदिशक्ती परांबेच्या सोबत भगवान शंकर आपल्या सिंहासनावर आरूढ असतात.
    आचार्यश्री या सिंहासनाकरिता शक्त्यंतसिंहासन असा शब्दप्रयोग करतात. याचा अर्थ ज्यांच्यावर कोणाची शक्ती चालत नाही. कोणाची सत्ता चालत नाही. जिथे अन्य सर्व शक्तींचा लय होतो असे सिंहासन. परमसत्ता.
    मनोहारि- अत्यंत आकर्षक अशा, सर्वांगरत्नोरुभूषम् - उरु म्हणजे विपुल, प्रचुर, श्रेष्ठ, मूल्यवान. तशा रत्नांनी बनविलेली आभूषणे ती रत्नोरुभूष. भगवंतांनी सर्व अंगावर अशी आभूषणे धारण केली आहेत.
    जटाहींदुगंगास्थिशम्याकमौलिं- या शब्दामध्ये जटा,अहि,इंदु, गंगा, अस्थि, शम्याक आणि मौली अशा शब्दांचे एकत्रीकरण आहे.
    जटा म्हणजे तुमच्या वर बांधलेले केस. अहि म्हणजे सर्प. इंदू म्हणजे चंद्र.गंगा. अस्थि म्हणजे नरमुंडक्यांची माला. शम्याक म्हणजे बहाव्याच्या फुलांची माळ. या सगळ्या गोष्टी मौली म्हणजे मस्तकावर, गळ्यात धारण केल्या आहेत असे. यातील गंगा, चंद्र, सर्प या थंड वस्तू , समुद्रमंथनातून निघालेले हालाहल प्राशन केल्याने होणारा भयानक दाह शमविण्यासाठी भगवान धारण करतात.
    पराशक्तिमित्रं - पराशक्ती जगदंबेचे स्नेहपात्र. तिच्या सोबत सर्व वेदांतरहस्य उलगडून दाखविणारे.
    नमः पंचवक्त्रम् - अशा पंचमुखधारी भगवान श्रीशंकरांना नमस्कार असो.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      June 12, 2020


  • काळा पैसा, चलन आणि सामान्य माणूस

    काळा पैसा निर्माण करण्यात सामान्य माणसाचा प्रमुख सहभाग आहे.

      November 28, 2016