(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • पाकिस्तानचे ‘सर्जिकल ऑपरेशन’ सुरूच ठेवायला हवे

    सर्जिकल स्ट्राईक’चे गांभीर्य कळायला उरी येथील लष्कराच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे गांभीर्य कळायला हवे. 18 सैनिकांचा जीव घेणारा हल्ला झाल्याने संपूर्ण भारतात संतापाची लाट पसरली.तेव्हा लष्कराच्या मानसन्मानाला ठेच लागली.

      October 13, 2016


  • प्रत्येक “जाणं” सारखंच असतं !

    काल रात्रीच भूपेंद्र सिंग यांच्या जाण्याची बातमी वाचली. इतकं आगंतुक आणि न सांगता -सवरता जाणं वाटलं की खूप वेळ मी अस्वस्थ होतो. नुक्तीच त्यांच्या आणि सुवर्णा माटेगावकरांच्या “बिती ना बिताई ” वर मी पोस्ट लिहिली होती.

      July 20, 2022


  • ओळख मूल्यांकाची भाग ३ – मूलांक ३

    अंकज्योतिष शास्त्रात प्रत्येक अंकाचं विशेष महत्त्व आहे. अंकशास्त्रानुसार (Numerology), व्यक्तीचा स्वभाव, त्याचं भविष्य तसेच, व्यक्तीच्या आवडी निवडी यांचा अंदाज लावता येतो. या ठिकाणी आपण आज मूलांक 3 (Mulank) च्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत. मूलांक ३ चा शासक ग्रह गुरू असून हा सात्विक, शुद्ध आणि सौम्य ग्रह मानला जातो.

      February 28, 2026


  • चांगेरी

    जमिनीवर पसरणारे कडे कपारीत उगवणारे क्षुप आहे.ह्याचा तीन पानांचा खंड एकमेकांना खालच्या भागात जोडलेला असतो.पर्ववृन्त लांब असून त्यास उपपत्र चिकटलेले असतात.फुले लहान व पिवळ्या रंगाची असतात.फळे लांबट व रोमश असतात.

    ह्याचे उपयुक्तांग पंचांग आहे.ह्याची चव आंबट,तुरट असून चांगेरी उष्ण गुणाची आहे व हल्की व रूक्ष आहे.चांगेरी कफ व वातनाशक असून पित्त वाढविते.

    आता आपण हिचे उपयोग पाहूयात:

    १)वेदना व सुजेवर चांगेरीचा लेप लावावा.

    २)त्वचारोगात देखील चांगेरीचा लेप लावावा.

    ३)मुळव्याधी मध्ये देखील चांगेरी उपयुक्त आहे.

    ४)चांदेकर रक्तवाहीन्यांचा संकोच करून रक्तस्राव थांबवायला मदत करते.

    ५)गुदभ्रंशात चांगेरीचे तूप खायला देतात व चांगेरी सिद्ध तेलाचा पिचू गुद भागी ठेवतात.

    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      August 17, 2017


  • गणेशाची साडेतीन पीठे

    वेदकालापूर्वी आणि सृष्टीची निर्मिती करण्यापूर्वी ॐकार गणेशाने शून्य मंडळात किंवा हवेच्या पोकळीत स्व-आनंदासाठी एक स्थळ निर्माण केले, ते क्षेत्र म्हणजे ‘स्वानंदपूर’ आणि आत्ताच्या काळातील ‘मोरगाव.’ सृष्टीनिर्मितीचे कार्य करून ॐकार या स्थळी येऊन राहिला.

      October 8, 2023


  • हर घर तिरंगा अभियान काय आहे

    प्रस्तावना :-

    भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात या स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक/ क्रांतीकारक/ स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी, या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमान पूर्वक संस्मरण करण्यासाठी “आजादी का अमृत महोत्सव” अर्थात “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत दिनांक 11 ऑगस्ट 2022 ते दिनांक 17 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये केंद्र शासनाच्या सूचनेनुसार "हर घर झंडा" हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

    भारताच्या स्वतंत्रता दिवसाच्या 75 व्या वर्ष निमित्त लोकांनी आपल्या घरी तिरंगा फडकवावा म्हणून लोकांना प्रोत्साहीत करण्यासाठी स्वतंत्रता दिनाच्या अमृत महोत्सवा निमित्त भारत सरकारचे 'हर घर तिरंगा' हे एक अभियान आहे.
    तिरंगा घरी आणून फडकवावा ही एक व्यक्तिगत बाब नसून राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे . लोकांमध्ये देशभक्ती ची भावना जागृत करण्यासाठी सरकारने उचललेले हे एक पाऊल आहे.

    हर घर तिरंगा अभियान चा कालावधी किती आहे :

    हर घर तिरंगा कार्यक्रमा अंतर्गत दि 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान झेंडा फडकवण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. या व्यतिरिक्त वर्चुअल स्वरूपात खाली दिलेल्या वेबसाईटवर पिन करून झेंडा फडकवून त्यासोबत एक सेल्फी काढून पोस्ट सुद्धा करू शकतो.

    https://harghartiranga.com
    Azadi ka amrut mahotsav banner

    हर घर तिरंगा अभियानात ऑनलाइन भाग घेण्यासाठी पद्धत :

    • हर घर तिरंगा ऑफिशियल वेबसाईट ओपन करा
    https://harghartiranga.com
    • पुढे जाण्या आधी आपल्या मोबाईल चे लोकेशन ऑन करा.
    • पिन ए फ्लॅग बटन वर क्लिक करून प्रवेश करा.
    • नंतर तुमचे नाव, मोबाईल नंबर, व फोटो अपलोड करा.
    • नंतर तुमचे लोकेशन सिलेक्ट करा
    • नंतर फ्लॅग वर पिन करा.
    • तुमचा फ्लॅग पिन झाल्याबरोबर तुमचे सर्टिफिकेट जनरेट होईल .डाउनलोड करून ते तुमच्या सोशल मीडिया साईट वर अपलोड करू शकता.
    How to pin flag

    प्रत्यक्ष अभियानात भाग घेण्यासाठी हे करा :

    हर घर अभियान अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑगस्ट पासून लोकांना आपल्या सोशल मीडिया प्रोफाइल वर तिरंगा लावण्याचे आवाहन केले आहे.

    • अमृत महोत्सवी अभियान प्रत्यक्षात 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान असेल.
    • झेंडा फडकवताना झेंड्याचा अवमान होणार नाही याची काळजी घेण्यात यावी.
    • फ्लॅग कोड ऑफ इंडिया च्या नियमांतर्गत येणाऱ्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे.
    • या नियमानुसार झेंडा उलटा किंवा जमिनीला लागून नसावा.तसेच सिंगल फ्लॅग पोल वर झेंडा फडकवू नये.
    • तिरंग्याला रुमाल स्वरूपात किंवा शरीराला लपेटून वापर करू नये.

    इन्स्टाग्राम वर हर घर तिरंगा फिल्टर कसा वापरावा :

    • इन्स्टाग्राम अँप ओपन करा
    • @amritMahotsav च्या प्रोफाइल वर जा
    • bio मध्ये दिलेल्या लिंक ला ओपन करा
    • रेकॉर्ड वर प्रेस करा आणि ध्वज साठी स्क्रीन वर टॅप करा
    • आपली स्टोरी / पोस्ट ला #HarGharTiranga सोबत पोस्ट करा
    • स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या प्रोफाइल पिक्चर वर लावा
    How to use har ghar tiranga filter on instagram

    हर घर तिरंगा अभियानानिमित्त महाराष्ट्र सरकारने जी आर काढला आहे

    जी आर डाउनलोड करण्यासाठी लिंक वर क्लिक करा :

    https://www.mediafire.com/file/ilcz1znhhkw7a7v/हर+घर+तिरंगा.pdf/file

    हर घर तिरंगा अभियानाचा व्हिडीओ :

    https://youtu.be/CJw1iIF_AC0

      August 15, 2022


  • आकाशदीप

    सर्वपित्रीत तृप्त झालेले पितर कोजागिरी ते अष्टमी या काळात पवित्र होऊन कराष्टमीपासून ध्रुवाकडे मार्गस्थ होतात. त्यांना मार्गदर्शनासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून सूर्यास्तानंतर एक प्रहारानंतर ते सुर्योदयापर्यंत घराबाहेर आकाश दिशेने एक तेलदिवा जळता ठेवतात तोच आकाशदीप.

    पृथ्वीपासून ध्रुवापर्यंतचे अंतर कापायला आत्म्यांना दहा दिवस लागतात. सतत प्रकाशाने त्यांचे मार्गक्रमण सुकर व्हावे यासाठी या दिवसापासून दिपोत्सवास (दिपावली) प्रारंभ होतो.

      October 30, 2016


  • श्री गणेशाकडून गुंतवणुकीचे १० धडे

    गणपतीला ‘नवीन आरंभाची देवता’ म्हणून ओळखले जाते आणि हे आपल्याला आठवण करून देते की कोणत्याही प्रवासाचा सर्वात महत्वाचा भाग प्रथम सुरू करणे आहे. म्हणूनच लोक सहसा ‘श्री गणेशा करूया’ असे म्हणतात ज्याचा अर्थ ‘चला सुरू करा’ असा होतो. इथेच आम्ही आमचा पहिला धडा शिकतो की जेव्हा पैसे कमवायचे असतात तेव्हा तुम्ही तुमचे पैसे गुंतवण्याचे पहिले पाऊल उचलले पाहिजे

      November 26, 2022


  • शनिवारवाडय़ाच्या वास्तुशांतीला २८६ वर्षे पूर्ण

    मराठी दौलतशाहीची शान असलेल्या आणि अटकेपार झेंडा फडकविणाऱ्या कर्तबगार पुरुषांची मालिका पाहण्याचे भाग्य लाभलेल्या शनिवारवाडय़ाच्या वास्तुशांतीला आज २२ जानेवारी रोजी २८६ वर्षे पूर्ण झाली.

      January 22, 2018


  • भारतातला शेक्सपिअर  – राम गणेश गडकरी

    भारतात सुद्धा एक शेक्सपिअर जन्माला आला होता आणि त्यांचे नाव – राम गणेश गडकरी ! पण मला हे ‘भेटले’ ते ‘भेटले’ अशी अशुद्ध भाषा बोलणारी पैदास मोठ्या संख्येने वैचारिक गोंधळ घालत आहेत. त्यांना त्यांचे काय महत्व कळणार. यांच्या पैकी किती जणांनी गडकरींचे वाङ्मय वाचले आहे. गडकरींची हि कविता फक्त वाचावी आणि साहित्य संमेलनात फक्त हजार मतदानात निवडून आलेल्यांनी आपण कुठे बसतोय याचे आत्मशोधन करावे.

      January 4, 2017