वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
हिंदूंचा एक प्रमुख सण असलेला दसरा (विजयादशमी) या सणाचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व आहे. दसरा शब्दाची एक व्युत्पत्ती दशहरा अशीही आहे. दश म्हणजे दहा आणि हरा म्हणजे हरल्या आहेत. दसर्याच्या आधीच्या नऊ दिवसांच्या नवरात्रात दाही दिशा देवीच्या शक्तीने भारलेल्या असतात. नियंत्रणात आलेल्या असतात, म्हणजेच दाही दिशांतील दिक्भव,गण इत्यादीं वर नियंत्रण आलेले असते, दाही दिशांवर विजय मिळालेला असतो. दुर्गानवरात्र संपल्यानंतर लगेच हा दिवस येतो; म्हणून याला ‘नवरात्रीच्या समाप्तीचा दिवस’ असेही मानतात.’
October 10, 2017
कोणी म्हणतोय भाजप जिंकला,
कोणी म्हणतोय शिवसेना हरली,
कोणी म्हणतोय राष्ट्रवादी पुढे तर,
कोणी म्हणतोय कॉंग्रस मागे,
कोणी म्हणतोय मनसेची वाट लावली...
पण लक्षात ठेवा इथे फक्त "जिंकलाय" आणि पुढे गेलाय तो...
गुजराथी,
मारवाडी,
भैया,
मद्रासी,
सिंधी,
पंजाबी,
आणि
हरलाय आणि तो फक्त माझा "महाराष्ट्र"... आणि माझ्या महाराष्ट्रातील "मराठी माणूस"...
आपण कोणत्याही पक्षाचे असाल आपल्याला हे मान्य करावंच लागेल ...
महाराष्ट्रात राहून जर परप्रांतीय समाज एकत्र होऊ शकतो तर आपण का नाही ?
मुंबईची आणि पुण्याची स्थिति...
हिरा मार्केट - गुजराती
कपडा मार्केट - मारवाडी आणि गुजराती
लकडा मार्केट - मुस्लिम
शेयर मार्केट - गुजराती, मारवाडी
स्टील मार्केट - मारवाडी आणि गुजराती
हाॅटेल लाईन - शेट्टी, आणि पय्याडे
वाईन मार्केट - शेट्टी, पंजाबी
मच्छी मार्केट - मुस्लिम, उत्तर भारतीय ..
मराठी माणुस.... आहे कुठे ?
वडापावच्या गाडीवर.. !!
हसण्यावर घेऊ नका. 'लाज'' वाटण्यासारखी गोष्ट आहे.
रिकाम्या बाटल्या विकत घेणारांनी बंगले बांधले ...
तर बाटल्या रिकाम्या करणारांनी जमिनी विकल्या ......!!!
February 6, 2017
वंदीतो मी ध्रुवबाळ, भक्ति सामर्थ्याचे बळ,
मिळवी पद अढळ विश्वामध्यें ।।१।।
असोनी लहान बालक, वाकविले विश्वचालक,
हेच तपाचे प्रतीक, प्रभूचे राज्यीं ।।२।।
प्रभू प्राप्तीचे फळ, ह्यासी न लागे काळवेळ,
श्रद्धा आणि तपोबल, अंतर्मनी पाहिजे ।।३।।
ब्रह्माचा खेळ न्यारा, बहूत त्याच्या रंगधारा,
समज न येई हा पसारा, प्रभूच्या लिलेचा ।।४।।
खेळाच्या ठेवल्या मर्यादा, बसणे पळणे चालूं सदा,
खेळाचे चक्र फिरे सर्वदा, अवितरपणे ।।५।।
प्रत्येकाचे आयुष्यमान, कमी जास्त असून,
जीवन मर्यादा पडून, काल क्रमणा होई ।।६।।
कुणी राही क्षणभर, कुणाचे आयुष्य शंभर,
कांहीं जगती वर्षे सहस्त्र, हीच निसर्गाची विविधता ।।७।।
लाखो वर्षे राही तारे, इंद्रादी देवही जाती सारे,
सर्वांच्या मर्यादा ठरे, प्रभू शक्तिमुळे ।।८।।
उदाहरण अपवादात्मक, अढळ पदाचे प्रतिक
ध्रुव तारा एक, होई या ब्रह्मांडी ।।९।।
ध्रुव कथा मनोहर, भक्ति तपसिद्धी आधार,
इंद्र शक्तिची माघार, होई ध्रुवभक्तिपुढे ।।१०।।
उत्तानपाद राजा आसूर, दोन राण्यांचा संसार,
राज्य करी प्रजेवर, प्रेमळपणे ।।११।।
सुरुचि राणी आवडती, उत्तम तिचा मुलगा होता,
सुनीती ठरे नावडती, ध्रुव बाळाची आई ।।१२।।
ध्रुव एके दिनी दरबारी, चढूनी सिंहासनावरी,
राज्याच्या मांडीवरी, आनंदाने बसला ।।१३।।
हे न पटले सुरुचीला, खेचले खालती ध्रुवाला,
आहे तो मान उत्तमाला, असूनी तिचा मुलगा मोठा ।।१४।।
ध्रुव जाई रडत, आईसी दु:ख सांगत,
कुणी न मजसी खेळत, राग करी सारे ।।१५।।
नावडता म्हणून, न देई कुणी स्थान
हकलून देती सारेजण, प्रत्येक स्थानाहुनी ।।१६।।
माता सुनिती, हतबल होती,
न देखे दु:ख ती, ध्रुवाच्या ।।१७।।
आई करी ध्रुवाचे सांत्वन, प्रभूची महीमा महान,
त्यास प्राप्त करून, जीवन होई सुखी ।।१८।।
न सांगता कुणाला, ध्रुव जाई वनाला
शोधी परमेश्वराला, सर्व ठीकाणी ।। १९।।
भयाण जंगलात, प्रभू नामे टाहो फोडीत,
भाव भक्तिचे मनात, ठेवून बोलावती प्रभूला ।।२०।।
नारद भेटले ध्रुवासी, बघूनी भाव भक्तीसी
आशीर्वाद देई त्यासी, यश मिळण्याबाळा ।।२१।।
उपदेश नारद करी, श्रद्धा ठेवावी प्रभूवरी,
तोच सर्वांचा तारण हरी, त्यास करावे पावन ।।२२।।
प्रसन्न करावे प्रभूला, अर्पूनी भक्ती त्याला
त्याच्या इच्छे जाई फळाला, जीवनातील सर्व गोष्टी ।।२३।।
ॐ नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपत राहाय
तोच तुझा आधार होय,प्रभू मिळे पर्यंत ।।२४।।
प्रभू मिळणे नाही सोपे, प्रयत्न करावे बहूत तपे
श्रद्धेने त्याचे नाम जपे तेव्हाची पान होई ।।२५।।
ऐकूनी नारदाचा उपदेश, मनी बिंबला ईश,
पावन करण्याची आस, ध्रुवास लागली ।।२६।।
नारदाचा आशिर्वाद घेवूनी, ध्रुव जाई वनी,
आसन झाडाखाली मांडूनी, तप करण्या बसला ।। २७।।
बालक ते लहान, मनी विश्वास महान
विसरोनी भूक तहान, मंत्राचा जप करी ।।२८।।
असे जेथे श्रद्धा प्रभू सदा,
मिळेल त्याच्या आशिर्वादा जीवनातील समाधान ।।२९।।
मंत्रोपचारास लागली वाणी, तरंगे त्याची बनूनी
चक्रगती त्यास मिळूनी, फिरू लागली देहा भवती ।।३०।।
मंत्र ऊर्जा मिळून, चेतना जागृत ठेवून
देह जिवंत राहून तप करी बहूत काळ ।।३१।।
मंत्र चक्र गती, ऊर्जा निर्माण करती
त्याचे तेजोलय बनती, देहा प्रकाशी ।।३२।।
मंत्र लहरी तेजोवलय, दिव्यती वाढत जाय
जैसे तप महान होय, बाळ ध्रुवाचे ।।३३।।
तपसिद्धीची शक्ती, प्रभूसी जागृत करती
चित्त त्याचे ओढती ध्रुव बाळाकडे ।।३४।।
इंद्र सर्व देवा संगे, ध्रुवचे तपसामर्थ्य बघे
निरनिराळ्या शक्ति सोडून अंगे, ध्रुव बाळाच्या ।।३५।।
अग्रीच्या ज्वाळा, वायूच्या वादळा
वरूणाचा पावसाळा, निष्प्रभ ठरली ध्रुवापुढे ।।३६।।
इंद्र शक्तीचा मारा, न तोडी तेजोलय चक्रा
रक्षण कवचाची धुरा मजबूत असे ध्रुवा भोवती ।।३७।।
संपता इंद्र शक्ती प्रदर्शन, प्रभू देई दर्शन
बाळ ध्रुवासी उठवूनी जवळ घेई त्याला ।।३८।।
प्रभू विचारी ध्रुवाला ,का शीनविसी बाल देहाला
सांग तपाचे कारण मला, देईन तुज मी ते ।।३९।।
निश्चीत नाही मज स्थान, सारेजण करी अपमान
उठविती सर्व पदाहून, ध्रुव सांगे प्रभूला ।। ४०।।
दूर घ्यावा निवारा, गगनातील एक तारा
मिळोनी प्रभूचा सहारा, कुणी न हलवावे मला ।। ४१।।
'वर'दिला प्रभूनी, अस्थिरता जाई निघूनी
पद ध्रुवाचे अढळ होवूनी कुणी न घेई त्यासी ।। ४२।।
कुणी न राही एके जागी, फिरत असे सदा मार्गी
स्थिरता फक्त ध्रुवतारा अंगी या विश्वमंडळामध्ये ।। ४३ ।।
।। शुभं भवतू ।।
डॉ. भगवान नागापूरकर
१५- २७११८३
January 15, 2018
आपल्या देशाच्या राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांना, नॅशनलांईज्ड बॅंकांना-जरी त्या राष्ट्राच्या असल्या तरी- जसं त्यांच्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रांतांवरून ओळखतात, तसं बनवून टाकलं आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे किंवा मराठ्यांचे, राणा प्रताप राजस्थानचे किंवा राजपुतांचे, गुरु गोविंदसिंह पंजाब्यांचे किंवा पंजाबचे, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर दलितांचे, स्वातंत्र्यवीर सावरकर ब्राम्हणांचे वगैरे वगैरे…
January 5, 2018
विसाव्या शतकामधे अमेरिकन शेती व्यवसाय आणि एकंदरीतच ग्रामीण जीवनात आमूलाग्र बदल झाले आहेत. विसाव्या शतकाच्या सुरवातीस अमेरिकेची एकूण लोकसंख्या होती ७६ दशलक्ष. या पैकी निम्याहून अधिक वस्ती ही ग्रामीण भागातच एकवटलेली होती. त्यावेळी शेती व्यवसाय हा प्रामुख्याने, प्रचंड मोठ्या संख्येने असलेल्या लहान लहान फार्म्सवर व्हायचा. (अमेरिकन शेतीच्या संदर्भात, ‘फार्मिंग’ ही संज्ञा किंवा संकल्पना लवचिकपणे वापरायची आहे. धान्योत्पादन आणि पशुपालन हे परस्परांशी संलग्न किंवा पूरक उद्योग असल्यामुळे बरेच फार्म्स हे संमिश्र स्वरूपाचे असतात. त्यामुळे ह्या दोन्ही क्षेत्रांशी निगडीत अशा उत्पादनाला ‘फार्मिंग’ अशा ढोबळ संज्ञेने संबोधले जाते). विसाव्या शतकाच्या सुरवातीस शेती आणि ग्रामीण भागाची अजोड अशी सांगड होती. एकंदर काम करणार्या लोकांपैकी ४०% लोक शेती व्यवसायात होते. या प्रचंड मनुष्यबळाला, शेतांवर राबणार्या सुमारे २२ दशलक्ष जनावरांची (मुख्यत्वे घोडे, खेचरं, बैल) जोड होती. बहुतेक फार्म्सवर त्या त्या ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीनुसार काही धान्यं, कुठे तेलबिया, कुठे फळं, भाजीपाला, जोडीला वराहपालन, दुग्धोत्पादन, कुक्कुटपालन, अशा चार पांच तरी वैविध्यपूर्ण गोष्टींचे संमिश्र उत्पादन व्हायचे.
याच्या उलट विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून, शेती व्यवसाय हा दिवसेंदिवस संख्येने कमी, परंतु आकारमानाने मोठमोठ्या अशा फार्म्सवर एकवटत चालला आहे. फार्म्सचे संमिश्र उत्पादनाचे स्वरूप लोप पावत चालले आहे आणि त्यांना एका ठरावीक साच्याच्या, यांत्रिक उत्पादन करणार्या कारखान्याचे रूप येत चालले आहे. फार्म्सची उत्पादकता कैक पटींनी वाढली आहे. मनुष्य आणि पशुबळाच्या जागी यांत्रिकीकरणाने आपले हात पाय पसरले आहेत. एकविसाव्या शतकातल्या एकूण काम करणार्या लोकांपैकी आज केवळ २% लोक शेतीव्यवसायात आहेत. हे मर्यादित मनुष्यबळ सुमारे ५ दशलक्ष ट्रॅक्टर्सच्या मदतीने, पूर्वी जे काम २२ दशलक्ष घोडे, खेचरं आणि बैल करत होते, त्यापेक्षा कित्येक पटीने अधिक आणि कमी वेळात करत आहेत. दिवसेंदिवस तरूण वर्ग शेतीपासून दुरावत चालला आहे आणि ग्रामीण भागातून, उच्च शिक्षणासाठी, नोकरी व्यवसाया निमित्त शहराकडे जाणार्यांचा ओघ वाढतच चालला आहे. याचाच परिणाम म्हणजे, एकेकाळी मुख्यत्वे ग्रामीण स्वरूपाच्या असलेल्या अमेरिकेत आज ग्रामीण भागात जेमतेम २०% लोक उरले आहेत. एके काळी ग्रामीण भागातील बहुतेक सर्व जिल्हे (counties) हे मोठ्या प्रमाणात शेती व्यवसायावर अवलंबून असायचे. परंतु २००० साली, एकूण ग्रामीण, निम-ग्रामीण जिल्ह्यांपैकी केवळ २०% जिल्हे मुख्यत्वे शेतीवर अवलंबून होते.
एक गोष्ट निर्विवाद आहे ती म्हणजे अमेरिका हा दानशूर देश आहे. दुसर्या महायुद्धापासून, जगाच्या कान्याकोपर्यात नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, उपासमारी सारखी संकटे जिथे जिथे उद्भवली आहेत, तिथे तिथे अमेरिकेएवढी सातत्याने सढळ हाताने मदत फारच कमी देशांनी केलेली आहे. यामागील राजकारण, अर्थकारण, व्यापारी वृत्ती, युध्दपिपासू भूमिका, वगैरे छटांचा विचार बाजूला ठेवला तर सामान्य अमेरिकन माणसाच्या दानीपणाबद्दल शंका घेण्याचं काहीच कारण नाही. अर्थात अमेरिकन माणसाचे खिसे जगातील इतर अनेक सामान्य माणसांच्या खिशापेक्षा गरम आहेत ही गोष्ट खरी. परंतु केवळ खिशात पैसे असून चालत नाही; सत्कारणी दान देण्यासाठी तशी वृत्ती देखील लागते आणि ती सामान्य अमेरिकन माणसात निश्चितच आहे.
दुसर्या महायुद्धाच्या पूर्वी ही मदत मुख्यत्वे सर्व सामान्य नागरिकांकडून होत असे. महायुद्धानंतर बेचिराख झालेल्या युरोपियन देशांना मदत करण्यासाठी, राष्ट्राध्यक्ष ट्रुमन यांच्या प्रशासनाला, एखाद्या मोठ्या केंद्रवर्ती संस्थेची गरज भासू लागली. त्यावेळी गाजलेल्या ‘मार्शल प्लॅन’ अंतर्गत, अमेरिकेने युरोपला तब्बल १३ अब्ज डॉलर्सची मदत केली. पुढे याच ‘मार्शल प्लॅन’च्या धर्तीवर परंतु लहान प्रमाणात, आफ्रिका, एशिया आणि मध्य व दक्षिण अमेरिकेतील गरीब देशांना मदत पुरवण्याचा उपक्रम जारी करण्यात आला. त्यानंतर आलेल्या विविध राष्ट्राध्यक्षांच्या प्रशासनांनी देखील हा मदतीचा ओघ अव्याहत चालू राखण्याची काळजी घेतली. या मदतीमधे आर्थिक पाठबळ आणि तंत्रज्ञानाबरोबरच अन्नपदार्थांचा देखील मोठाच वाटा असायचा.
अमेरिकेत नैसर्गिक साधन संपत्तीची काही कमतरता नाही. अफाट पसरलेली सुपीक जमीन, मुबलक पाणी, पोषक हवामान, आधुनिक वैज्ञानिक संशोधनाचे भक्कम पाठबळ आणि एकंदरीत कृषी / पशुपालनाचे कित्येक दशकांपासून होत आलेले यांत्रिकीकरण, यामुळे अमेरिकेने कृषी / पशुपालनाच्या क्षेत्रांमधे जगामधे अव्वल स्थान पटकवावे यात काही नवल नाही. या अफाट कृषी उत्पादनाच्या जोरावर अमेरिका जणू काही जगाचे धान्य कोठारच बनून गेली. त्यामुळे जगाला मदत पुरवण्याच्या भव्य – दिव्य योजनांमधे, अमेरिकन शेतकर्यांनी उगवलेल्या धान्य आणि पशुजन्य अन्नपदार्थानी सिंहाचा वाटा उचलावा ही गोष्ट ओघाने आलीच. गेल्या ५०-६० वर्षांत या मूळ कल्पनेचा गाभा जरी तोच राहिला असला तरी त्यात फरक हा झाला आहे की, १९६० साली एक अमेरिकन शेतकरी जगातील सुमारे २६ लोकांना खाऊ घालत होता तर २००८ सालचा एक अमेरिकन शेतकरी जगातील सुमारे १४४ लोकांना पुरेल एवढं अन्न उत्पादन करत आहे.
October 20, 2015
करोना विषाणूची साथ हे दुसऱ्या महायुद्धानंतरचे जगासमोरचे मोठे संकट आहे. मानवी जीवनाच्या सर्वच बाजूंवर या संकटाने प्रभाव टाकला आहे. या काळात जगात शिक्षण क्षेत्रासमोर बरीच आव्हानं निर्माण झाली आहेत. ऑनलाईन शिक्षणासोबतच इतर नवनवीन पर्याय शोधण्याचा जेणेकरून अधिकाधिक विद्यार्थी शिकू शकतील, प्रयत्न शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना अजून करावा लागणार आहे.
July 22, 2021
प्रथमपासून संघ राजकीय नाही असेच सतत सांगत राहिला. अश्या प्रकारे संघाने स्वतःची एक ‘विशिष्ठ प्रतिमा’, ‘खास चारित्र’ निर्माण केले आहे.
September 27, 2021
माणसाच्या आवडीतून काय कलाकृती घडेल काही सांगता येत नाही.. काळ्या कुळकुळीत बेढब अशा दगडातूनही शिल्प घडत ते या माणसाच्या याच आवडीने … अशाच एका अवलियाला वेगवेगळे दगड गोळा करण्याचा छंद होता..
January 6, 2019
दर वर्षागणिक गणेशोत्सव साजरा करण्याचे प्रमाण वाढते आहे. स्वातंत्र्यानंतर गणेशोत्सवाचा उपयोग लोकप्रबोधनासाठी होऊ लागला. पण गर्दी जमते आहे हे पाहिल्यावर त्याचा फायदा उपटण्यासाठी, राजकीय नेते आणि जाहिरातदार व्यापारी तेथे घुसले. आणि नेमकी येथेच एका धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेची वाट लागायला सुरुवात झाली.
September 4, 2017

असा कोणता माणूस नाही ज्याला प्रॉब्लेम नाही, आणि असा कोणताही प्रॉब्लेम नाही जो सुटत नाही….
नाही, नाही…हे कोणत्याही ज्योतिषाचं किंवा काउन्सेलरच वाक्य नाही. कारण प्रॉब्लेम सुटतो की नाही, माहित नाही. पण त्याच्याकडे तटस्थपणे पाहून थोडा वेळ हसू शकता.
एक माणूस सिनेमा थिएटरमध्ये मोठी पगडी घालून बसला होता. मागच्या माणसाला प्रॉब्लेम झाला. कारण सिनेमा दिसत नव्हता. त्याने प्रॉब्लेम कसा सोडवला पहा?
पुढे पगडी घालून बसलेल्या माणसाला सांगितलं. अधून मधून सिनेमात काय चाललं आहे मलाही सांगा!! पगडीवाल्याला त्या बोलण्याचा अर्थ काळला आणि त्याने पगडी काढली.
March 15, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti