(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ब्रह्मा-विष्णू-महेश मंदिर, गोळप, रत्नागिरी

    ब्रह्मा-विष्णू-महेशाच्या या मूर्ती सुबक असून त्या एकाच कलाकाराने कोरलेल्या दिसून येतात.

      June 30, 2025


  • स्त्री-पुरुष समानतेच्या दिशेने

    भारतासह जगभरात ठिकठिकाणी दरवर्षी आंतरराष्ट्रीय ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने जागतिक स्तरावर स्त्रियांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय कामगिरींचा उत्सव साजरा केला जातो. सध्याच्या मार्केटिंगच्या जमान्यात तर महिला दिनाचा प्रचार नामांकित ब्रँडच्या वस्तू खपविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो.

      November 25, 2023


  • श्री अन्नपूर्णाष्टकम् – ५

    दृश्यादृश्यविभूतिवाहनकरी ब्रह्माण्डभाण्डोदरीलीलानाटकसूत्रभेदनकरी विज्ञानदीपाङ्कुरी ।
    श्रीविश्वेशमनःप्रसादनकरी काशीपुराधीश्वरी
    भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥५॥

    आई जगदंबेचे वैभव वेगवेगळ्या अंगाने प्रस्तुत करताना आचार्यश्री म्हणतात,

    दृश्यादृश्यविभूतिवाहनकरी- दृश्य अर्थात दिसू शकणारे आणि अदृश्य अर्थात न दिसणारे. आपल्या आकलनाच्या ही पलीकडे असणारे. विभूती अर्थात वैभव. संपत्ती. आपल्या भक्तांना जी दृश्य आणि अदृश्य स्वरूपातील अद्वितीय वैभव प्रदान करते त्या आदिशक्तीला दृश्यादृश्यविभूतिवाहनकरी असे म्हणत असतात.

    ब्रह्माण्डभाण्डोदरी- या संपूर्ण ब्रह्मांडांचा पसारा जिच्या उदरात राहतो, अर्थात जिच्या उदरातून जन्माला येतो त्या विश्वजननीला ब्रह्माण्डभाण्डोदरी असे म्हणतात.

    लीलानाटकसूत्रभेदनकरी- या संपूर्ण जगाच्या संचालनासाठी जसा एखादा कळसूत्री बाहुल्यांचा खेळ करणारा आपल्या हातातील दोऱ्यांचा वेगवेगळ्या उपयोग करतो. हालचाली करतो. भेद म्हणजे बदल करतो. त्यानुसार खालील बाहुल्यांना आपल्या तालावर नाचवतो. त्याप्रमाणे विश्वाचे संचालन करणारी.

    विज्ञानदीपाङ्कुरी- विज्ञान अर्थात विशेष ज्ञान. ब्रह्मज्ञान. त्याचा दीपाचा अंकुर असणारी. अर्थात जिच्या आधारावरच ब्रह्मज्ञान उजळते अशी. समाधीदायक कुंडलिनी शक्ती स्वरूपिणी.

    श्रीविश्वेशमनःप्रसादनकरी- भगवान श्री विश्वनाथांच्या मनाला अत्यंत आनंद प्रदान करणारी.

    काशीपुराधीश्वरी- काशीनगरीची सम्राज्ञी.

    भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी- सकल कृपेचा आधार असणाऱ्या हे माते अन्नपूर्णे मला भक्ती, ज्ञान,वैराग्यरूपी भिक्षा प्रदान कर.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      March 2, 2020


  • हिरवं ग्रीनलँड

    ग्रीनलँड हा पृथ्वीवरचा अतिउत्तरेकडचा प्रदेश आहे – उत्तर ध्रुवाजवळचा! या प्रदेशाचा उत्तरेकडचा भाग म्हणजे एक शीत मरुभूमी आहे. अत्यंत कोरडी आणि थंड हवा असणारा हा प्रदेश अगदी वैराण आहे. इथल्या जमिनीतलं पाणी हे सतत गोठलेल्या अवस्थेत असतं. इथल्या अतिप्राचीन काळातील वनस्पतींची आणि प्राण्यांची फारशी माहिती उपलब्ध नाही.

      February 11, 2023


  • आपण सुसंस्कृत मुखवटे घातलेले विकृत माणसं

    आपण सुसंस्कृत मुखवटे घातलेले विकृत माणसं

    वासुदेव, पिंगळा, पोतराज इत्यादी पात्रे मला कधीच संस्कृती वाटली नाही..उलट भटक्यांच्या पिळवणुकीची सांस्कृतिक व्यवस्थाच वाटत आलीय.

      January 14, 2024


  • वाणिज्य शाखेतील डॉक्टरेटची पदवी

    Ph.D. या पदवीसाठीचे महाराष्ट्रातील नियम बदलत आहेत. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील सर्वोच्च अशा या पदवी परीक्षेसंदर्भात बरेच विचारमंथनही चालू आहे. नियमांच्या चौकटीशिवाय खरा प्रश्न असतो तो विद्यारर्थ्याला कार्यप्रेरित करण्याचा, त्याला प्रोत्साहन देण्याचा ! संशोधनाच्या कार्याचा उद्देश विद्यार्थी उच्चविद्याविभूषित होणे हा आहेच, परंतु त्याचा अभ्यास हा समाजाला उपयोगी, हितकारक कसा बनेल हे पाहणेदेखील आवश्यक आहे. डॉक्टरेट करणार्‍या विद्यार्थ्याला प्रेरणा मिळावी, या दृष्टीकोनातून लिहिलेला लेख……..

      July 31, 2010


  • श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ३९

    भगवंताच्या अत्यंत सुकुमार आणि उन्नत अशा कपोल प्रदेशांचे वर्णन केल्यानंतर, आचार्य श्रींची दृष्टी त्या दोन कपोलांच्या मध्ये असणाऱ्या, अत्यंत नयनमनोहर अशा नासिकेवर खिळते. तिच्या सौंदर्याचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात,

      January 11, 2021


  • फोन टॅपिंग

    एखाद्या आरोपीने गुन्हा केल्यानंतर त्याच्या मनात अपराधीपणाची भावना असते, तिचा शोध मेंदूच्या आरेखनातून घेण्याचा प्रयत्न ब्रेन मॅपिंग चाचणीत केला जातो. या चाचणीला पी-३०० असेही म्हणतात.

      October 18, 2022


  • सर्व्हिस मोटार ते लक्झरी

    काळाबरोबर जगणं धावपळीचं बनलं होतं. घरातून बाहेर पडलं की लगेच गाडी मिळायला पाहिजे, अशी मनोवृत्ती बनत होती. खासगी वाहतूक पुन्हा सुरू झाली होती. एसटीही आपलं रूपडं बदलू लागली. एशियाड सेवेनं शहर जोडली. ‘शिवनेरी’, ‘अश्वमेध’ यासारख्या गाड्या दिमाखात धावत खासगी आरामगाड्यांशी स्पर्धा करू लागल्या. एसटीचा विकास आणि विस्तार होत राहिला. खासगी वाहतुकीचाही विस्तार होत राहिला…

      April 29, 2024


  • इये ’स्वाहिली’चिये नगरी – ब्रह्मविद्येचा सुकाळू करी

    आफ्रिकन काव्यात स्थित्यंतरे चालूच आहेत. हल्लीची गीते, कथानके-कथाकथने, नृत्ये या माध्यमांतून हा बदल दिसून येतो. त्यातच आता नव्या विद्युत् माध्यमांचा प्रभावही पडत आहे. यात गेल्या दहा पंधरा वर्षातील उभरते व विश्र्वव्यापक ‘इंटरनेट’च्या माध्यमात प्रसिध्द होणाऱ्या साहित्याचा या क्रांतीमध्ये सिंहाचा वाटा आहे. ‘वोल सोयिंका’ हे नायजेरियन कवी. बरीच वर्षे त्यांना देशाबाहेर राहावे लागले. स्वातंत्र्यासाठी व लोककल्याणासाठी झगडण्यात त्यांनी जीवन व्यतीत केले. १९८६ साली त्यांना नोबेल पारितोषक मिळाले. म्हणजे ते नायजेरियाचे ‘रविंद्रनाथ’ आहेत. आईवरची आफ्रिकन कविता वात्सल्यरसाने ओथंबली आहे. पण आफ्रिकन कवितेच्या आढाव्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे, की मराठी व आफ्रिकन माणसाची काव्यावरची माया व जातकूळ सारखीच आहे.

    – अरुण मोकाशी

    परिवहन तज्ज्ञ अरुण मोकाशी यांच्या झांझिबार डायरी या इ-पुस्तकातील लेखाचा हा अंश.

    हा संपूर्ण लेख तसेच त्यांचे या पुस्तकातील सर्व २५ लेख वाचण्यासाठी हे पुस्तक खरेदी करा.

    हे इ-पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...
    https://marathibooks.com/books/zanzibar-diary/

    किंमत : रु.२००/
    सवलत किंमत : रु.५०/-

      January 7, 2025