(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ॲरिस्टोटलचं थडगं

    इतिहासाचा शोध घेताना त्यासंबंधीच्या प्रत्येक वस्तूला महत्त्व द्यावं लागतं. कारण, ती वस्तू म्हणजे भूतकाळ आणि भविष्यकाळ यांना जोडणारा दुवा असते. एका संशोधकाला, चोवीस शतकांपूर्वीच्या इतिहासाशी नातं सांगणारा एक दुवा सापडला आहे. हा दुवा म्हणजे चक्क एक थडगं आहे. पण हे थडगं सामान्य व्यक्तीचं नाही. हे थडगं आहे ते पुरातन काळच्या ग्रीक साम्राज्यातल्या ॲथेन्सचा प्रख्यात तत्त्वज्ञ ॲरिस्टोटल याचं!

      December 13, 2022


  • व्हॉट्सएप चा वापर कमी करा

    सध्या सर्वत्र सोशल मेडियाचा धुमाकुळ आहे. त्यातल्या त्यात व्हॉटस एप चा बोलबाला आहे.
    सोशल मेडियाने सर्वांना एकत्र आणण्याचे काम उत्तम रित्या केले आहे, म्हणतात सोशल मेडियामुळे जग जवळ आले आहे. हे काही अंशी खरे ही आहे, मात्र चांगल्या फायेदेशीर बाबींचा गैरवापर कसा करावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे व्हॉट्सएप आहे.
    * या व्हॉट्सएप मुळे लोकांची क्रय शक्ती कमी झाली.
    * काम-व्यवसाय सोडून सर्व जण दिवसातील आपला बहूमोल वेळ व्हॉटसएप चाटींग मध्ये खर्ची घालतात.
    * लोकांना व्हॉट्सएप चे व्यसन लागले आहे.
    * तंबाखू - दारू पेक्षाही हे व्हॉट्सएप चे व्यसन जास्त घातक आहे.
    * या व्हॉट्सएप मुळे मनाची बेचैनी वाढली आहे.
    * या व्हॉट्सएप मुळे अस्वस्थपणा वाढला आहे.
    * एक - दोन तास जरी व्हॉटस एप सुरु नसेल तर मनाची घालमेल व्हायला सुरुवात होते.
    * जेवणाच्या ताटावर - शौचालयाच्या कमोड वर - गाडी चालविताना - एका हातात अभ्यासाचे पुस्तक दुसरया हातात व्हॉटसएप वापरणारे महाभाग आपणास सर्वत्र दिसतील.
    * कुठेही जा, कोणत्याही दुकानात-ऑफिसमध्ये जा लोक या व्हॉट्सएप वरच दिसतील.
    * चार - चौघे एकत्र बसून गप्पा मारण्याचे दिवस दुर्मीळ झाले आहेत, चार- चौघे एकत्र असतील तर चौघांच्या ही हातात व्हॉट्सएप दिसेल.
    * त्या व्हॉटसएप मुळे अतिरिक्त काम करायला कंटाळा यायला लागला आहे, जागेवरून उठणे नकोसे वाटायला लागले आहे.
    * रात्री उठून सुध्दा बेचैनीमुळे लोक व्हॉट्सएप चेक करतात.
    * हा व्हॉट्सएप म्हणजे प्रत्येक आई-बापाच्या जीवाला ताप झाला आहे, मुलं-मुली अभ्यास न करता तासन् तास लपून छपून व्हॉट्सएप वर चाट करत असतात.
    * या व्हॉटसएप वर सर्व जातीचे- धर्माचे वेगवेगळे ग्रुप तयार झालेले आहेत, त्या ग्रुप मध्ये जातीयता-कट्टरता वाढविण्याचे छुपे संदेश दिले जातात. अश्लिल चाटिंग चे, होदौस, भडास सारखे ग्रुप तयार झाले आहेत.
    * आजीबाईच्या बटव्यासारख्या विविध ग्रुप वर गुळ खा मधुमेह कमी होते असे मेसेज फिरतात. तेथे सर्वजण डॉक्टर झालेले असतात, माझ्या मुलाला खुप जुलाब होत आहेत काय उपाय करु असे प्रश्न असतात.
    * रिकाम्या व हौसी लोकांनी विविध ग्रुप बनवून त्यात लोकांना अडकवून ठेवण्याचे काम सुरु आहे.
    * परिस्थिती अशी झाली की एका ग्रुप मधून बाहेर पडा - लगेच कोणी तरी दुसरया गूप मध्ये एड करते. समाजात ज्याचे नाव आहे, ज्यांच्या भरपूर ओळखी आहेत, ज्यांचा मोबाईल नंबर सर्वत्र गेला आहे, त्यांना तर व्हॉटसएप चा काहीही फायदा होत नाही, तासाला हजारच्या वर मेसेज येतात. शक्य आहे का हे मेसेज वाचणे ??
    * सतत व्हॉट्सएप वापरल्यामुले मेंदू मध्ये बधीरता यायला लागली आहे.
    * सतत व्हॉट्स्एप वापरल्यामुळे मोबाईल च्या सुक्ष्म लहरीमुळे मेंदूंमध्ये मुंग्या येत आहेत की काय असे जाणवायला लागले आहे. डोके गरगरल्या प्रमाणे वाटणे-डोके जड वाटणे असे व्हायला लागले आहे.
    * झोप कमी व्ह्यायला लागली आहे.
    * सतत व्हॉट्स्एप वापरल्यामुळे मोबाईल च्या सुक्ष्म लहरीमुळे डोळ्यांना अपरिमित हानी होत आहे, डोळ्यामध्ये आग होणे, डोळे जळजळ करणे, डोळ्यांना कमी दिसने असे प्रकार सर्रास दिसून येत आहेत.
    सतत व्हॉट्स्एप वापरल्यामुळे कित्येकांमध्ये एकाकीपणा यायला लागला आहे.
    *वरील सर्व मुद्दे सत्य आहेत-यात कोठेही अतिशयोक्ति नाही, मी व्यवसायाने डॉक्टर आहे, माझे कडे मागील ४-५ महिन्यात आलेल्या शेकडो रुग्णांना चौकशी करुन ही सर्व माहीती संकलित केली आहे, तुम्ही स्वता व्हॉटस एप वापरत असाल तर व्हॉतसएप पासून दुर रहा, व्हॉट्सएप चा एक टक्का फायदा आहे तर ९९ टक्के नुकसान आहे*

    -- डॉ. पवन लड्डा
    लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालय
    लातूर (महाराष्ट्र)
    मो. ०९३२६५११६८१

    माहीती आवडली असेल तर लेखकांचे नाव न कापता ती इतरांना पाठवून त्यांना व्हॉटसएपच्या भयंकर दुष्परीणामाची माहीती द्या

      October 22, 2017


  • प्रमुख आहारसूत्र – आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग चार

    आयुर्वेदीय चिकित्सा म्हणजे अॅलोपॅथीला पर्याय. असा जर कोणाचा समज असेल तर तो गैरसमज आहे. पॅरासीटामोलच्या ऐवजी आयुर्वेदात काय आहे असे विचारणे म्हणजे मोहोरीच्या ऐवजी बेसन आहे का असे विचारल्यासारखे आहे.

    यांची तुलना कधीही करू नये. प्रत्येक पॅथीची स्वतःची अशी खास वैशिष्ट्य असतात. प्रत्येक शास्त्राचे स्वतःचे सिद्धांत असतात. त्यांचा योग्य तो आदर राखलाच पाहिजे. बीकाॅम झालेल्या विद्यार्थ्यांनी म्हणावे, बीएस्सी करून काय होणारे, बीएस्सी करत असलेल्यांनी म्हणावे आर्टस् शिकण्याची काही आवश्यकताच नाही. हे योग्य नव्हे.

    मधुमेहा सारख्या आजारात रुग्णाला नेमकेपणाने काय होते आहे, त्याला काय हवेय हे प्रत्येकाचे निकष वेगळे असतात. भविष्यात अमुक होईल म्हणून आत्ता असे वागले पाहिजे ही भीती अवाजवी आहे.

    नखाला भविष्यात चुकुन होणारे नखुर्डे हे कॅन्सरमधे रूपांतरीत होऊ शकते, हो किंवा नाही. या दोन पर्यायांपैकी एकच पर्याय निवडायला सांगितला तर दुर्दैवाने याचे उत्तर हो असेच द्यावे लागते, असे आजचे वैद्यक शास्त्र सांगते. नियमावर बोट ठेवले तर भविष्यात होणारा नखाचा कॅन्सर टाळण्यासाठी आपण नखच काढून टाकूया, असा विचार करणे योग्य होईल का ? जे अस्तित्वातच नाही, त्याची भीती निर्माण करून आपली पोळी भाजून घ्यायची ? प्रत्येकाची आळीमिळी गुपचिळी. प्रत्येकाचा बिझनेस. प्रत्येकाला स्वतःची काळजी.

    रक्तातली साखर वाढली तर किडनी, डोळे इ. अवयवांवर विपरीत परिणाम होतात, असे एक वैद्यक शाखा म्हणते. अवयवांवर विपरीत परिणाम होतो तो, रक्तातली साखर वाढली म्हणून की, त्यासाठी कायमस्वरूपी घ्याव्या लागणाऱ्या औषधांचे ते दुष्परिणाम आहेत, यावर अजूनही संशोधन सुरूच आहे. शिवाय मनात निर्माण झालेली भीती देखील हाॅर्मोन्स मधे बदल घडवित असतेच.

    मधुमेहामधे रक्तातली साखर तपासणी, किंवा तत्सम रासायनिक तपासण्या करणे, हाच एकमेव योग्य निकष आहे, असे म्हणण्याची काहीच आवश्यकता नाही. त्या वैद्यकामधे अजूनही संशोधन सुरूच आहे. त्याचे निकष अजूनही बदलत आहेत.

    आणि रक्तातल्या साखरेचा निकष खरं सांगायचं तर आयुर्वेदात सांगितलेलाच नाही. त्यामुळे मधुमेहामधे रक्तातली साखर नाॅर्मल करणे हा आयुर्वेदीय चिकित्सेचा उद्देश असूच शकत नाही. हे वैद्यांच्याच अजून ध्यानात येत नाही तर सामान्य लोकांनी तशी अपेक्षा करणे चुक नव्हे.

    हा विचार समजून घेणे आवश्यक आहे. ज्या पद्धतीने निदान केले जाते, त्याच पद्धतीने चिकित्सा, पथ्य अपथ्य, योग, प्राणायाम यांचा विचार केला तर चिकित्सा पूर्णत्वाला जाईल. जे सिद्धांत आयुर्वेदात वर्णन केलेले आहेत, ते अन्य पॅथीमधे कसे बसवता येतील ? असे करणे म्हणजे गोल भोकात चौकोनी पाचर ठोकण्यासारखे आहे. कृपया असा विचार सुद्धा करू नये. नाहीतर जे पाहिजे ते (आरोग्य ) आपल्याला कधीही पूर्णत्वाने मिळणार नाही. आणि औषधे मात्र कायमस्वरूपी पूर्णपणे घ्यावी लागतील.

    जर आपल्याला घोडा बनवायचा असेल तर त्याचे डोके, पोट, आयाळ तोंड आणि अगदी शेपूट देखील घोड्याचीच बनवली पाहिजे. तरच त्या कलाकृतीला घोडा असे म्हणता येईल. नाहीतर तोंड करायचे घोड्याचे, आयाळ करायची सिंहाची, पोट करायचे वाघाचे, आणि शेपूट लावायचे शेळीचे. कसा दिसेल हा प्राणी ? त्याला पूर्णत्व येणार नाही.

    प्रत्येक शास्त्राची स्वतःची एक परिभाषा असते. त्याच परिभाषेत ते सिद्धांत समजून घ्यावे लागतात. तसे केले नाही तर आपल्याला जे पाहिजे ते पूर्ण स्वास्थ्य कदापि मिळणार नाही.

    निदान करायचे अॅलोपॅथीनुसार, तपासण्या करून घ्यायच्या रसायनशास्त्राप्रमाणे, चिकित्सा ठरवायची आयुर्वेदानुसार, पथ्य करायचे निसर्गोपचारानुसार, आणि औषध घ्यायचे होमियो पद्धतीनुसारच्या !
    याशिवाय पुष्पादिदिचे सल्ले, स्वामीजीनी सांगितलेले उपाय, वाॅटसप महाराजांचे नुस्खे आहेतच.

    अशा भीतीच्या पायावर उभारलेल्या विचारसरणीने रोग कसा बरा होईल ? हे रुग्णांनी लक्षात ठेवले पाहिजे.
    .....आणि वैद्यांनी सुद्धा !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    14.02.2017

      February 14, 2017


  • शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी

    ९०% आजार हे पोटातून होतात, पोटात अॅसिडीटी, कब्ज नसला पाहिजे, पोट स्वच्छ, साफ तो आरोग्याचा राजा.

      November 21, 2016


  • सौभाग्यलेणं – बाजूबंद

    पूर्वी दंडात घालण्याच्या दागिन्यात अंगद व केयूर हे दोन दागिने प्रमुख असत. हे अलंकार रत्नजडित सुवर्णाचे असत. यांतल्या काहींचा आकार वेलींसारखा व काहींचा मकरासारखा असून वरची बाजू टोकदार असे. काहीच्या दोन्ही तोंडास सिंहाचे मस्तकही घडविलेले असत .

      March 6, 2024


  • ब्रेकिंग न्यूज

    तरन्नुम या सौंदर्यवती बारबालेच्या आलिशान फ्लॅटवर धाड पडली आहे .एक कोटींची रक्कम ,सोनाटा गाडी , कित्येक लाखांचे दागिने हे सगळं अचानक एका रात्रीत तिला गिफ्ट करणारा कॅबिनेट मंत्र्याच्या मुलाचे फोटो … बातमी लीक झाली आहे आणि ती कव्हर करण्यासाठी इलेट्रॉनिक्स मीडिया टपून बसला आहे .

      May 25, 2025


  • संस्कृत भाषा व संस्कृती : भाग – (४)/११

    • सुशिम कांबळे यांच्या प्रतिक्रियेबद्दल :
    • ‘कॉलोनियल-इरा’मधील इंग्रजांची बाजू घेण्याचें मला कांहींच कारण नाहीं. मात्र, इंग्रजांनी मुद्दाम मोजक्या लोकांना(च) इंग्रजी शिकवली, असें म्हणणें बरोबर नाहीं. जे लोक socio-economically एका विशिष्ट, upwardly mobile वर्गात होते (जात कुठलीही असो) , ते अशा भाषा शिकतातच, मग ती संस्कृत असो, मध्य-युगात फारसी असो, वा आधुनिक काळात इंग्रजी, (किंवा गोव्यात पोर्तुगीझ, व पाँडिचेरीला फ्रेंच ) . त्या लोकांना स्वत:च्या प्रगतीसाठी ते आवश्यक वाटतें, म्हणून ते ती भाषा शिकतात, हेंच खरें आहे.

    ( आणि, आज तर भारतावर इंग्रजांचें राज्य नाहीं. तर मग, आज जे upwardly mobile लोक सॉफ्टरेअरच्या कामासाठी व आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी इंग्लिश शिकतात, त्याचें काय ? ).

    • तसेच संस्कृतचेंही आहे. वैदिकेतरांना गुलाम बनवण्यासाठी संस्कृत मुद्दाम मोजक्याच लोकांना शिकवली गेली, असें म्हणणें म्हणजे सत्याचा विपर्यास आहे.
    • पुरातन व मध्य युगात अनेक राजांना संस्कृत येत नव्हती (एका सातवाहन राजाची गोष्ट तर प्रसिद्धच आहे). पण ते गुलाम नव्हते, तर राजे होते. असे अनेक क्षत्रिय, वैश्य व अन्य राजे, जसें की शक, कुषाण, हूण , यांना संस्कृत येत नव्हती, पण ते निश्चितच गुलाम नव्हते.
    • जैन व बौद्ध जन हे वैदिक नव्हते ; ते तत्कालीन प्राकृत भाषांमध्ये व्यवहार करीत, त्यांच्यातील जनसाधारणांना संस्कृत येत नव्हते; पण त्यातील कोणीही गुलाम नव्हता. जैनांमध्ये तर मोठमोठे ‘श्रेष्ठी’ (धनवंत व्यापारी) होते, वीर-सेनापती होते ; गुलाम कोण होता ?
    • शूद्रांबद्दलही तेंच म्हणतां येईल. नरहर कुरुंदकर सांगतात (संदर्भ : वर उल्लेखलेला लेख), की , शूद्र म्हणजे गुलाम हे समीकरणही चुकीचें आहे. (पुरातन काळात ) ‘प्रत्येकाच्या जवळील विकत घेतलेले गुलाम’ हा वेगळा वर्ण आहे. गणिकांना शूद्र मानलें गेलेलें आहे, पण त्यांच्याकडे मोठा नोकरवर्ग असे, गुलामही असत. तसेंच, आधी जे शूद्र होते, ते नंतर क्षत्रिय होण्याची, आणि, शूद्र असूनही राजे असण्याची उदाहरणें आहेत. (जिज्ञासूंनी , नरहर कुरुंदकर या साम्यवादी असलेल्या , पण निष्पक्ष विचारांच्या विचारवंताचें लिखाण मुळातूनच वाचावें. कित्येक अपसमज दूर होतील).
    • खरें तर, हिंदूंमधेही, (खास करून , नंतरच्या काळात) किती जनसाधारणांना संस्कृत येत होती ?
    • त्यामुळे, संस्कृत येणें न येणें व गुलामगिरी यांचा अर्थाअर्थी कांहींही संबंध नव्हता.
    • इतरेजनांची भाषा संस्कृतपेक्षा हजारो वर्षें जुनी आहे , ही statement सुद्धा वास्तवाला धरून नाहीं. भाषाविषयक चर्चा आपण आधी केलेलीच आहे, तिच्या पुनरावृत्तीची आवश्यकता नाहीं. संस्कृत ही येथील भाषांची ‘जननी’ आहे किंवा कसें, याबद्दलही आपण चर्चा केलेली आहे.
    • अश्वघोषाचा उल्लेख करून, कांबळे म्हणतात की ‘संस्कृत पंडितांनी वैदिक धर्म सोडून जैन वा बौद्ध धर्मात प्रवेश केला होता ’. कांहीं जणांनी कदाचित तसें केलेंही असेल. मात्र, हिंदु धर्मातही वेदप्रामाण्य न मानणारी ‘दर्शनें’ आहेत, जसें सांख्य, योग, वैशेषिक, लोकायत. त्यामुळे, हिंदु धर्माचा भाग राहूनही वेदप्रामाण्याच्या दायर्‍याबाहेर सहज रहाता येत असे. त्यामुळे, संस्कृत पंडितांन आपला धर्म सोडायची कांहींही जरूर नव्हती.

    मात्र, जैनांनी व बौद्धांनी संस्कृतमध्ये रचना करण्याचें कारण तें नव्हे. जैन किंवा बौद्ध विद्वानांनी प्राकृतात लिहिलें, तसेच प्रादेशिक भाषांमध्ये लिहिलें, व संस्कृतातही लिहिलें. त्या कारणांचा ऊहापोह आपण आधी केलेलाच आहे.

    • संस्कृत समाजाची भाषा होऊं शकली नाहीं, मग तिनें ऐक्य प्रस्थापित कसें झालें ? ( इति कांबळे ) -

    प्रागैतिहासिक काळीं आर्ष-संस्कृत ही एका पूर्ण-समाजाचीच भाषा होती. परंतु, शेकडो वर्षें लोटल्यावर तिचें रूप, संपर्क-भाषा, ज्ञान-भाषा, दुवा-भाषा (Link Language) अशा स्वरूपाचें झालें. त्यामुळे विविध विषयांमधील ज्ञान---- मग तें, तत्वज्ञान असो, अध्यात्म असो, खगोलशास्त्र असो, वैद्यक असो, गणित असो, साहित्य-कला असो, किंवा इतर कांहींही असो, ------ संस्कृतमुळेच भारताच्या विविध भागांमध्ये पोचलें ; भारतातच नव्हे तर पूर्व-आशियातील अनेक देशापर्यंतही पोचलें.

    • ज्ञानेश्वर हे यादवकालीन आहेत. त्यावेळी, (त्यांच्या किमान १५०-२०० वर्षें आधी, म्हणजे मुकंदराजांच्याही आधी), प्राकृतातील, ----- महाराष्ट्री, अपभ्रंश अशा क्रमानें, ----- ‘मराठी’ हें, (प्राकृत) भाषिक रूप उदयाला आलें होतें. म्हणून ज्ञानेश्वरांनी जनसामान्यांच्या मराठीत लिहिलें. भाषिक बदलांच्या प्रक्रियेची चर्चा आपण आधी केलेलीच आहे. संस्कृत ही त्या काळात केवळ Link-Language म्हणून, ज्ञानभाषा म्हणूनच, राहिलेली होती.
    • आपण युरोपचें उदाहरण घेऊं. लॅटिन ही आधीच्या काळीं रोमन-समाजाची भाषा होती. बर्‍याच नंतरच्या काळात, तिचें स्वरूप केवळ , ज्ञानभाषा व दुवा-भाषा म्हणूनच राहिले. मध्य युगात विविध प्रादेशिक भाषा पुढारल्या होत्या , जसें फ्रेंच, इंग्लिश, स्पॅनिश, पोर्तुगीज, इटालियन, वगैरे. पण, मध्ययुगात ज्ञानग्रंथ लॅटिनमध्येंच लिहिले जात. त्यामुळे, अन्य भाषाभाषियांनाही त्यांना सहजपणें समजूं शकत. तरीही प्रादेशिक भाषांमध्ये रचना होतच होत्या. उदा. इंग्रजीत मिल्टन, शेक्सपियर, वगैरे.
    • मध्य-युगात संस्कृतचेंही तेंच झालें. परंतु, वृथाभिमानी ब्राह्मण-जन, प्रादेशिक भाषेला ‘ज्ञानभाषा’ म्हणून मानेनात. ( ध्यानात घ्या, इथें आपला रोख ‘ज्ञानभाषे’बद्दल आहे. मराठीत रचना करायला आक्षेप घेणारे ब्राह्मणही घरीदारीं मराठीच बोलत, याचा उल्लेख आपण आधी केलेलाच आहे ). म्हणूनच, एकनाथांना असें खडसावून विचारावें लागलें की , ‘ मराठी काय चोरापासून झाली?’
    • पुरातनकालातील व मध्ययुगातील कांहीं परंपरांचेही तेंच आहे. त्या समर्थनीय नाहींतच. पण, त्याचा दोष जातो, तो समाजातील घटकाला किंवा घटकांना, एखाद्या भाषेला नव्हे, हें आपण पूर्वीच चर्चिलें आहे.

    ( पुढे चालू )

    - सुभाष स. नाईक. Subhash S. Naik

    सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.

    Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126

    eMail : vistainfin@yahoo.co.in

    Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

      September 25, 2016


  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – २२

    यदा दुर्निवारव्यथोऽहं शयानो
    लुठन्निःश्वसन्निःसृताव्यक्तवाणिः |
    तदा जह्नुकन्याजलालंकृतं ते
    जटामंडलं मन्मनोमंदिरे स्यात् ‖ २२ ‖

    मृत्युसमयी भगवंताचे स्मरण भवसागरातून नि:संशयरीत्या पार करणारी नौका आहे.
    अन्य समयी माणसाने भगवंताचे नामस्मरण करणे तशी तुलनेने सोपी गोष्ट आहे. मात्र सामान्य कष्ट पडले तरी भगवंत अनुसंधानाचा विसर पडतो. पूजा, अर्च्या बाजूला पडते. नामस्मरण थांबून जाते. काहीवेळा तर चक्क त्यालाच नावे ठेवली जातात. इतके सगळे करून काय उपयोग? असा परम अविवेकी प्रश्न, बौद्धिकतेचा आव आणून मांडला जातो.
    जिथे सामान्य व्यथेची ही अवस्था तेथे मृत्युसमयीच्या व्यथे बद्दल काय बोलावे? मात्र आचार्यश्री त्यावेळी कृपा करण्याबाबत प्रार्थना करीत आहेत.

    यदा - ज्यावेळी
    दुर्निवारव्यथ- दूर करण्यास असंभव असणाऱ्या, अंतिम पीडेने,
    अहं- मी, ग्रसित झालो असल्याने,
    शयानो- झोपलो असताना, खाटेला खिळलो असताना,
    लुठन्- लोळत असताना, वेदनेने तडफडत असताना,
    निश्वसन्- धाप लागली असताना,
    नि:सृताव्यक्तवाणिः - अव्यक्त वाणी काढत असतांना, माणसाच्या अंतिम समयी त्याला अनेक गोष्टी बोलायच्या असतात. पण बोलण्याची शक्ती संपली असल्याने, तोंडातून केवळ घर् घर् असा आवाज निघतो त्यावेळी अर्थात अंतिम घरघर लागली आहे अशा अवस्थेत,
    तदा- त्यावेळी जह्नुकन्या - राजा जह्नुची कन्या अर्थात देवी गंगा.
    जलालंकृतं - तिच्या जलाने अलंकृत झालेले,
    ते- आपले
    जटामंडलं- जटेचा विस्तार,
    मन्मनोमंदिरे स्यात् - माझ्या मंदिरात स्थिर असावा.

    अर्थात त्या वेळी मी त्याचेच ध्यान करीत असावे. आपलेच ध्यान करीत असावे.
    ती पीडा शरीराला असावी. मनात आपले चिंतन असावे. अशी अद्भुत प्रार्थना आचार्य करीत आहेत.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      July 1, 2020


  • जागतिक वन्यजीव दिवस

    नामशेष होण्याचा धोका असलेल्या वन्य सृष्टीच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर बंधन आणणारा कायदा (CITES) ३ मार्च १९७३ रोजी १८० देशांनी मान्य केला म्हणून या दिवसाला महत्व आहे.

      March 3, 2022


  • सप्टेंबर २४ – जिमी अमरनाथ आणि विसविशीत विश्वविजय

    भारतीय संघातून क्रिकेट खेळणे ही ज्यांच्या घराण्याची एके काळी मिराशी बनली होती (असे म्हणण्यासारखी परिस्थिती होती) त्या घराण्यात २४ सप्टेंबर १९५० रोजी मोहिंदरचा जन्म झाला. ‘जिमी’ हे त्याचं लाडाचं नाव. जिमीचे वडील लालाजी आणि जिमीचा भाऊ सुरिंदर हेही कसोटीपटू होते. राजिंदर हा जिमीचा आणखी एक भाऊ. तो प्रथमश्रेणी खेळला.

      September 24, 2010