वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
मराठीतून बोलणं मागासलेपणाचं लक्षण आहे असं आपण मराठी माणसांनीच ठरवून टाकलंय त्यामुळे, ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी…’ या ओळीला एक सुंदर ओळ या पलीकडे काहीच अर्थ उरत नाही. या ओळीत अर्थ भरणं सर्वस्वी आपल्या हातात आहे.
February 27, 2016

October 9, 2015
‘काय दादानू? कसल्या गजाली चलल्यात?’ मनोहरच्या प्रश्नाने दोघेही आपल्या विचारचक्रातून बाहेर आले. ‘काही नाही रे, संध्याकाळ झाली की जरा एकटेपणा वाटतो.’ संजय म्हणाला. ‘दिवस जातो मजेत. पण संध्याकाळला कातरवेळ म्हणतात ते उगीच नाही. मन सैरभैर होतं, कारणाशिवायच.’ सुजाताही म्हणाली.
April 5, 2023

शिवमहिम्न स्तोत्र – भाग ४ मराठी अर्थासह
महेशान्नापरो देवो महिम्नो नापरा स्तुतिः ।
अघोरान्नापरो मन्त्रो नास्ति तत्त्वं गुरोः परम् ।।३५।।
मराठी- सदाशिव सोडून दुसरा (कोणीही श्रेष्ठ) देव नाही. महिम्न स्तोत्राहून अन्य (कोणतेही श्रेष्ठ) स्तुतीस्तोत्र नाही. अघोर मंत्राहून दुसरा श्रेष्ठ मंत्र नाही. गुरू (शिव) पेक्षा श्रेष्ठ असे दुसरे तत्त्व नाही.
सर्वश्रेष्ठ शिव स्थानी, श्रेष्ठ स्तोत्र महिम्न से ।
अघोरापरि ना मंत्र, श्रेष्ठ तत्त्व गुरू असे ॥ ३५ ॥
टीप- शैव उपासकांमध्ये – ‘ॐ अघोरेभ्योऽथ घोरेभ्यः घोर घोरतरेभ्यः सर्वतः सर्व सर्वेभ्यो नमस्ते अस्तु रुद्र रुपेभ्यः’ हा अघोर मंत्र प्रचलित आहे. काही अभ्यासकांच्या मते ‘ ॐ नमः शिवाय ’ हा अघोर मंत्र आहे.
दीक्षा दानं तपस्तीर्थं ज्ञानं यागादिकाः क्रियाः।
महिम्नः स्तवपाठस्य कलां नार्हन्ति षोडशीम् ।।३६।।
मराठी- (गुरूंकडून) घेतलेला उपदेश, (केलेला) दानधर्म, शरीर कष्टवून केलेली तपस्या, तीर्थयात्रा, अभ्यासातून मिळवलेले ज्ञान, होमा हवन इत्यादी कर्मे ह्या सार्या गोष्टी महिम्न स्तोत्र पाठाच्या सोळाव्या कलेच्याही योग्यतेच्या नाहीत.
तपस्या दान वा तीर्थे होम अभ्यास कर्मही ।
पासंगा न पुरे पाठा महिम्नाच्या कलेसही ॥ ३६ ॥
टीप- कला म्हणजे एक सोळांश भाग. चंद्राच्या प्रतिपदा ते पौर्णिमा अशा १५ आणि सोळावी अमावास्या.
कुसुमदशननामा सर्वगन्धर्वराजः
शिशुशशधरमौलेर्देवदेवस्य दासः।
स खलु निजमहिम्नो भ्रष्ट एवास्य रोषात्
स्तवनमिदमकार्षी दिव्यदिव्यं महिम्नः ।। ३७।।
मराठी- ज्याच्या मस्तकी बालचंद्र आहे असा देवांचा देव शंकर. गंधर्वांचा राजा पुष्पदंत त्याचा दास (होता). खरोखर, त्याच्या (शंकराच्या) क्रोधाने (तो पुष्पदंत राजा) आपल्या अधिकारपदापासून पिटाळला गेला. तेव्हा त्याने या अत्यंत दिव्य स्तोत्राची रचना केली.
सुरगण-गवयांचा भूप त्या पुष्पदंता
शशिशिखर शिवाचा क्रोध हो चूक होता ।
नृपपद हटवीले स्थान गेले तयाचे
रचुन शिवमहिम्ना धन्य तो दिव्य साचे ॥ ३७ ॥
सुरवरमुनिपूज्यं स्वर्गमोक्षैकहेतुं
पठति यदि मनुष्यः प्राञ्जलिर्नान्यचेताः ।
व्रजति शिवसमीपं किन्नरैः स्तूयमानः
स्तवनमिदममोघं पुष्पदन्तप्रणीतम् ।। ३८।।
मराठी- जो कोणी मनुष्य हात जोडून आणि एकाग्र चित्त होऊन स्वर्ग आणि मोक्षाचे एकमेव साधन असलेले, पुष्पदंताने रचलेले, स्वर्ग आणि मोक्षाचे अमोघ साधन असलेले हे स्तोत्र पठण करतो, तर किन्नरांकडून स्तुती केला गेलेला तो शिवाच्या जवळ पोचतो.
सुर-मुनि स्तुति चाले, लाभती स्वर्ग-मुक्ती
कर मन जुळवोनी भक्त जे स्तोत्र गाती ।
हयमुख स्तुति गाती, शंभु सन्नीध नेती (हयमुख- घोड्यासारखे तोंड असणारे, तुंबरु, किन्नर)
शिव स्तुति रचली ही भक्तिनें पुष्पदंती ॥ ३८ ॥
आसमाप्तमिदं स्तोत्रं पुण्यं गन्धर्वभाषितम् ।
अनौपम्यं मनोहारि शिवमीश्वरवर्णनम् ॥ ३९ ॥
मराठी- असे हे गंधर्वाने रचलेले (सुरुवातीपासून) शेवटपर्यंत पावन, अनुपम, आनंददायी, शंकराच्या वर्णनाचे स्तोत्र पूर्ण झाले.
पूर्ण झाली स्तुती रम्य, सुरगायक गातसे ।
अतुल्य शिवरूपाचे त्यात वर्णन जे असे ॥ ३९ ॥
त्येषा वाङ्मयी पूजा श्रीमच्छङ्करपादयोः ।
अर्पिता तेन देवेशः प्रीयतां मे सदाशिवः ।।४०।।
मराठी- ही अशी शब्दरूपी पूजा (मी) भगवान शंकराच्या पायावर वाहिली आहे. या पूजेने तो महेश माझ्यावर संतुष्ट होवो.
शब्दांची ही अशी पूजा वाहिली मी शिवापदी
तेणे संतुष्ट होवो तो भूतनाथ मजप्रती ॥ ४० ॥
तव तत्त्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वर ।
यादृशोऽसि महादेव तादृशाय नमो नमः ॥४१॥
मराठी- हे शंकरा, तुझे खरे स्वरूप मला ठाऊक नाही. तू कसा आहेस (हेही ठाऊक नाही). तुझे स्वरूप जसे आहे, तशाच तुझ्या रूपाला माझा पुनः पुनः नमस्कार !
तुझे रूप नसे ठावे, कसा आहेस शंकरा ।
आहेस तुजला जैसा, प्रणाम मम साजरा ॥ ४१ ॥
एककालं द्विकालं वा त्रिकालं यः पठेन्नरः।
सर्वपापविनिर्मुक्तः शिवलोके महीयते ॥४२॥
मराठी- जो मनुष्य दिवसातून एकदा, दोनदा वा तीनदा या स्तोत्राचे पठण करील तो सर्व पापांपासून मुक्त होऊन शिवलोकात महान होईल.
एकदा दोनदा किंवा तीनदा स्तोत्र गायने ।
शिवलोकी थोर होई, पापनाशार्थ कारणे ॥ ४२ ॥
श्रीपुष्पदन्त-मुखपङ्कज-निर्गतेन
स्तोत्रेण किल्विषहरेण हरप्रियेण।
कण्ठस्थितेन पठितेन समाहितेन
सुप्रीणितो भवति भूतपतिर्महेशः ।।४३।।
मराठी- – श्री पुष्पदंताच्या मुखकमलातून निघालेले, पापांचा नाश करणारे व शिवाला प्रिय असणारे हे स्तोत्र जो मुखोद्गत करून एकाग्र चित्ताने पठण करील, त्यावर भूताधिपती महादेव प्रसन्न होईल.
श्रीपुष्पदंत वदनांबुज दिव्य गीता
जे दोष नाश करिते, प्रिय भूतनाथा ।
गाती मुखोद्गत तसे प्रतिबद्ध चित्ता
त्यासी प्रसन्न शिवशंकर मुक्तिदाता ॥ ४३ ॥
इति शिवमहिम्न स्तोत्रम् ।
*************************
-- धनंजय बोरकर.
(९८३३०७७०९१)
August 25, 2022
कोकणवासीयांचे आराध्य दैवत म्हणून सर्व थरातून फार वर्षांपासून गणेशाची उपासना कोकण प्रांतात होते. आंबा, नारळ, फणस, सुपारीसारख्या प्रसिद्ध फळांप्रमाणेच कोकणातला गणेशोत्सव फार मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक कोकणी माणूस या उत्सवाला तरी हटकून आपल्या गावी जाणारच. परशुरामाने स्थापन केलेल्या या कोकणभूमीमध्ये काही प्रसिद्ध गणेशस्थाने आहेत. त्याचा प्रचार आणि प्रसार जरी मोठ्या प्रमाणात झाला नसला तरी ती स्थाने अत्यंत सुंदर, देखण्या मूर्ती असलेली व अत्यंत पवित्र स्थाने आहेत.
May 28, 2024
गेल्या ४० ते ५० वर्षांत हृदय रोगाचे प्रमाण खूपच वाढले आहे . गेल्या ४ ते ५ दशकांमध्ये लोकसंख्या खूपच वाढली आहे . तसेच पूर्वी आपल्या देशाचे सरासरी वय होते ३५ वर्षे होती . जसजशा सुधारणा घडत गेल्या , औषधोपचार पद्धतींत खूपच बदल होत गेले व नवनवीन चाचण्या येऊ लागल्या व रोगांचे निदान अचूक होऊ लागले व त्यांचे उपचार चांगल्या रीतीने होऊ लागले
November 12, 2022
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.
August 18, 2018
मानवाला मानवपण मिळण्यास महत्वाचे कारण ठरली ती भाषा. जगभरात देशानुरूप वेश, संस्कृती व भाषा विकसित झाल्या. संपर्कमाध्यमानुसार भाषेत बदल होत गेले. शब्दमर्यादा पाळता-पाळता त्याचे कालमर्यादेत रुपांतर झाले. वेळ नाही या कारणाने लांब वाक्य, चार-पाच शब्दांचे समुह यांच्या जागी संक्षिप्त रूपे आली. ‘एक चित्र हजार शब्दांच्या बरोबर असते’ या उक्तिनुसार आता चित्रांची चलती आहे. आता ‘इमोजी’ मान्यता पावली आहे. वाक्यरचना, व्याकरण, भावना व्यक्त करणार्या शब्दांची निवड मागे पडू लागली आहे. सांकेतिक प्रणाली रूढ होते आहे.
June 14, 2020
जसा ईसीजी हृदयाचे आरोग्य सांगतो, तसेच इलेक्ट्रोएनसेफलोग्राफ हा मेंदूचे आरोग्या कसे आहे हे सांगतो. मेंदूतील विद्युत प्रक्रियेची नोंद करणाऱ्या यंत्राला इलेक्ट्रोएनसेफलोग्राफ असे म्हणतात. मेंदूविषयक रोगांच्या निदानासाठी त्याचा उपयोग होतो. मेंदूला गाठ, पक्षाघात अशा आजारात प्राथमिक निदानासाठी ईईजी वापरला जातो. पण आता एमआरआय (मॅग्नेटिक झोनन्स इमेजिंग) व सिटीस्कॅनमुळे ईईजीचा वापर तुलनेने कमी केला जातो.
October 22, 2022
बातमी : क्रिकेट कोच : ‘I am disappointed’ – Ravi Shastri
संदर्भ : टाइम्स् ऑफ इंडिया व इतर वृत्तपत्रें
भारतीय टीमचा क्रिकेट कोच म्हणून सिलेक्शन झालें नाहीं म्हणून रवी शास्त्री डिसअपॉइंट झाला.
हा हन्त हन्त ! संदीप पाटीलनें तर कांहींच प्रतिक्रिया दिली नाहीं. अनिल कुंबळे कोच म्हणून सिलेक्ट झाला त्यावद्दल त्याचें अभिनंदन . कुंबळे हा कोच म्हणून इतरांपेक्षा जास्त चांगला असेल किंवा कसें, याबद्दल ही टिप्पणी नाहीं . एक तर, तो विषय क्रिकेटमधील एक्सपर्ट लोकांचा आहे ; आणि दुसरें म्हणजे, त्याचा परफॉर्मन्स कसा आहे तें काळच दाखवेल . पण , इथें आपण पहाणार आहोत तें म्हणजे , हा ,
‘कोच सिलेक्शनचा प्रोसेस’.
एकतर , जुन्या एस्टॅब्लिश्ड प्लेअर्सना कोचच्या जागेसाठी अॅप्लाय् करायला लावणें , हें कितपत योग्य आहे ? हा कांहीं सरकारी नोकरीसाठी किंवा म्हाडाच्या जागांसाठी करायचा अर्ज नव्हे. कोच म्हणून अॅप्लाय् करणें हें जुन्या-जाणित्या लोकांना खचितच ऑकवर्ड वाटलें असणार. तरीही त्यांनी अर्ज केलें. खरें म्हणजे, BCCI नेंच योग्य लोकांची शॉर्ट-लिस्ट करून मग त्या लोकांना प्रेझेंटेशन द्यायला बोलवायला हवें ; आणि त्या प्रझेंटेशनच्या वेळी सीनियर लोक , तसेच अॅडमिनिस्ट्रेशनमधील कांहीं लोक हजर असायला हवेत. पण BCCI मधील अॅडमिनिस्ट्रेटर्स हे ‘at an arm’s distance’ अशी पॉलिसी मानतात. म्हणजे, आपण नामानिराळें रहायचें व टीका झाल्यास, सिलेक्शन कमिटीकडे बोट दाखवायचें !
दुसरें म्हणजे, सचिन, सौरभ व लक्ष्मण हे जरी श्रेष्ठ खेळाडू असले, आणि आजच्या टीममधील प्लेअर्सपेक्षा जरी ज्येष्ठ असले , तरी, कोच म्हणून अॅप्लाय् करणार्या शास्त्री, संदीप पाटील, कुंबळे यांच्यापेक्षा ते ज्येष्ठ आहेत काय, ही बाब महत्वाची आहे. त्यांच्यापुढे इंटरव्यू द्यायचा, ही तर, त्यांच्याहून सीनियर प्लेअर्ससाठी नक्कीच ह्युमिलिएटिंग वाटणारी गोष्ट आहे. त्यातून, कुठल्याही कारणानें कां असेना, (अगदी कितीही जस्टिफाइड कारण असलें, तरीही) , पण शास्त्रीच्या ‘इंडरव्हू’ला सौरव नें हजर नसणें ही शास्त्रीला अधिकच ह्युमिलिएट करणारी गोष्ट आहे, हें नक्की.
असें इतर क्षेत्रांमध्ये होतें की ! कंपनीच्या मूळ चेअरमनचा मुलगा ( म्हणजे मालकाचा मुलगा) नंतर चेचअरमन किंवा एम्. डी. होतो, तेव्हां जुन्या सीनियर मॅनेजर्सना त्याचें ऐकावेंच लागतें, कारण तो त्यांचा बॉस झालेला असतो. आधीच्या राजाचा पुत्र राजा बनतो, तेव्हांही असेंच होतें. एक उदाहरण म्हणून आपण शिवाजी व संभाजी यांच्याकडे पाहूं या. ( त्यांचा एकेरी उल्लेख , हा केवळ लेखनसोयीसाठीच आहे, याची नोंद घ्यावी ). शिवाजीच्या मृत्यूनंतर संभाजी राजा व्हावा किंवा नाहीं याबद्दल अष्टप्रधानांमध्ये एकमत नव्हतें. पुढे संभाजी राजा झाला. त्यानंतरही अण्णाजी दत्तो वगैरे मंत्र्यांना आणि हिरोजी फर्जंद याच्यासारख्या ज्येष्ठांना संभाजीबरोबर काम करणें पटलें नाहीं, व त्यांनी संभाजीविरुद्ध बंड करायचा प्रयत्न केला. ( हें आपण विसरतां कामा नये की, आग्याहून शिवाजी पळाला, तेव्हां त्याच्या जागी हिरोजी झोपला होता. केवठी मोठी रिस्क ही ! ). एक ज्येष्ठ लेखक (बहुधा कुरुंदकर) म्हणतात की, या सीनियर लोकांच्या वर्तनावरून, शिवाजीच्या ‘माणसें पारखण्याबद्दल’च प्रश्नचिन्ह निर्माण होतें. पण, मला तसें वाटत नाहीं, हा पिढ्यांचा फरक आहे. शिवाजीच्या काळी विश्वासानें महत्वाच्या जबाबदार्या अंगावर घेणार्यांना, संभाजीसारख्या तरुण, आणि स्वत:पेक्षा वय व अनुभवानें ज्युनियर अशा माणसाबरोबर काम करणें कठीणच गेलें असणार !
बी.सी. सी. आय्. च्या कोच-सिलेक्शनबद्दलही, ज्येष्ठ प्लेअर्स व नवे लोक यांचा असाच विचार करणें प्राप्त आहे. गावसकर, कपिल देव, मोहिंदर अमरनाथ वगैरे मंडळी सिलेक्शन कमिटीत असती तर गोष्ड वेगळी, ती सीनियर मंडळी आहेत. पण, मग, शिर्के यांनी आजच्या सिलेक्शन कमिटीला जी ‘समज’ दिली की, ‘तुमचें काम फक्त , मुख्य कोच सिलेक्ट करणे, एवढेंच आहे ; बॅटिंगचा कोच सिलेक्ट किंवा रेकमेंड करणें, हें नाहीं’ , (संदर्भ : वृत्तपत्रीय बातमी) ; तसें ते सीनियर्सचा समावेश असलेल्या कमिटीसमोर करूं शकले असते काय ? ( ध्यानात असूं द्या की, आपण शिर्के यांच्या बोलण्याच्या योग्यायोग्यतेची चर्चा करत नाहीं आहोत ; तर, फक्त प्रोसेसबद्दल बोलत आहोत).
असो. आपण काय करायचें तर, रवी शास्त्रीची संयत प्रतिक्रिया, संदीप पाटीलची चुप्पी, यातून बोध एवढाच घ्यायचा की, ‘सत्तेपुढे शहाणपण चालत नाहीं’.
- सुभाष स. नाईक.
June 28, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti