(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • प्लास्टिक

    प्लास्टिक हा आता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, त्यामुळे त्याच्यापासून सुटका नाही. प्लास्टिकमुळे अनेक अशक्य गोष्टी शक्य झाल्या तसेच यूज अँड थ्रो साधनांना चालना मिळाली.

      October 29, 2023


  • डिसेंबर १३ : सर्वात छोटा यष्टीरक्षक शतकवीर अजय रात्रा आणि कोलिन कौड्रीला ‘कॉल’

    यष्टीरक्षक अजय रात्राचा जन्म आणि वयाच्या बेचाळिसाव्या वर्षी कसोटी खेळण्यासाठी कौड्रीला आलेला कॉल

      December 11, 2010


  • ‘मूव्हेबल मेटल टाईप’ छपाई तंत्रज्ञानाची अंतर्गत रचना आणि त्याचा भारतात झालेला रंजक प्रवेश

    योहान्स गुटेनबर्गने १४५० च्या दशकात शोधलेले ‘मूव्हेबल मेटल टाईप’ (फिरते धातूचे टाईप) हे तंत्रज्ञान मानवी इतिहासातील सर्वात क्रांतिकारी शोधांपैकी एक मानले जाते. या तंत्रज्ञानाने केवळ पुस्तके हाताने लिहिण्याचे कष्टच संपवले नाहीत, तर अवघ्या काही दिवसांत हजारो प्रती छापणे शक्य करून दाखवले.

      June 15, 2026


  • तोंडाच्या दुर्गंधीवर सोपे उपचार

    कधी - कधी असं होतं की आपल्या समोर उभी असलेली व्यक्ती आपल्याशी बोलण्यासाठी तोंड उघडते तर तिचे तोंड उघडताक्षणी तिच्या तोंडातून दुर्गंधीचा एक तीव्र दर्प आपल्या श्वासांना भिडतो आणि आपण हैराण होता. अशा वेळी आपण मोठ्या संकटात सापडता कारण त्या समोरच्या व्यक्तीला तिच्या तोंडातून येणाया दुर्गंधी बद्दल सांगूही शकत नाही आणि तिच्या तोंडातून येणाया घाण दर्पाला सहनही करू शकत नाही. लोकांना याबद्दल असे वाटते की उन्हाळ्याचे दिवस असल्याने श्वासातून घाण दर्प निघण्याची समस्या होते, परंतु हे खरे कारण नाही. कोणताही ऋतु असेल तरी ही समस्या उद्भवू शकते.

    श्वासांच्या दुर्गंधी ची अनेक कारणे असू शकतात. जसे - पचन क्रियेत बिघाड झाल्याने, दात कुजल्याने, पोटात काही गडबड झाल्याने, तोंडात किंवा हिरड्यात कोणत्याही प्रकारचे संसर्ग झाल्याने.

    जर संतुलित आहार असलेले जेवण केले, कॅल्शियम, प्रोटीनयुक्त खाद्य पदार्थ आणि मिनरल्स आदींचे योग्य सेवन केले तर आपल्यासमोर ही दातांची समस्या उद्भवू शकत नाही. योग्य आहाराच्या सेवनाने आपण सहजरीत्या दातांच्या समस्येपासून मुक्ती मिळवू शकतो.

    पाणी खूप प्यावे

    जर आपण योग्य प्रमाणात पाणी पितो तर कधीही रोग ग्रस्त होणार नाही. पाणी पिण्याने आपल्याला बरेच फायदे होतात. त्यात एक फायदा हा आहे की पाणी आपल्या तोंडाची स्वच्छता करण्यात मदत करतो. पाणी तोंडाच्या आत क्लींजरचे काम करतो. त्यामुळे तोंडाचा घाण वास दूर होतो. संपूर्ण दिवस आपण काही तरी खात असतो, त्यामुळे आपल्या तोंडात पूर्वीपासूनच जे बॅक्टीरिया असतात, ते बॅक्टीरिया आपल्या हिरड्या आणि दातांवर प्रहार करीत असतात. आपण कमी पाणी पिण्याने आपल्या तोंडात निर्माण होणाया लाळेमध्ये अशा बॅक्टीरियाचे प्रमाण खूप वाढते, जे आपल्या दातांचे शत्रू असतात. त्यामुळे आपल्या तोंडातून दुर्गंधी येऊ लागते. अशा वेळी वारंवार पाणी पिण्याने तोंडाच्या दुर्गंधीतून बर्‍याच प्रमाणात मुक्ती मिळविता येते. त्याचबरोबर जेव्हा आपणास वाटेल की तोंडातून घाण वास येत आहे तर पाण्याने चूळ भरून घ्यावी. असे केल्याने तोंडातून बॅक्टीरियायुक्त लाळ बाहेर निघून जाते.

    दह्याचे सेवन करावे

    अनेक संशोधनांनी हे सिद्ध झाले आहे की दही खाण्यानेही आपल्या तोंडाच्या दुर्गंधीपासून मुक्ती मिळू शकते. दह्यात बॅक्टीरिया उत्पन्न होतात, परंतु हे असे बॅक्टीरिया असतात जे आपल्या शरीरासाठी फायदेकारक आहेत. दह्याचे सेवन केल्याने श्वासांच्या घाण दर्पापासून सुटका होऊ शकते. दह्यामुळे असे कसे होते, याबाबत वैज्ञानिक जास्त माहिती मिळवू शकलेले नाहीत. खरंतर तेल व मैद्याने बनलेले चिप्स, बिस्कीट आदी स्नेक्सच्या सेवनापेक्षा ताज्या दह्याच्या सेवनाने जास्त फायदा मिळू शकतो.

    संत्री खावी

    संत्री व्हिटॅमिन 'सी'चे मुख्य स्रोत असते. याच्या सेवनाने आपली त्वचा सुंदर आणि कांतीवानच होत नाही तर याच्या सेवनाने श्वासांच्या घाण दर्पापासूनही सुटका होऊ शकतो. संत्री खाण्याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की ते आपल्या तोंडात उपस्थित बॅक्टीरियाला लढा देण्यासाठी मुख्य भूमिका निभावते. संत्र्याव्यतिरिक्त व्हिटॅमिन सी' युक्त इतर फळांच्या सेवनानेही आपण श्वासांच्या दुर्गंधी पासून मुक्ती मिळवू शकतो. टॉमेटो, लिंबू, द्राक्षाच्या सेवनाने आपण श्वासातील घाण दर्प घालवू शकता.

    बडी शोप खावी

    जेवण झाल्यावर जर थोडीशी बडी शोप खाल्ली तर चांगले होईल. त्याने एक तर जेवणाचे पचन होते, त्याचबरोबर श्वासांची दुर्गंध घालविण्यात मदत करते. बडी शोप दोन भाग करून एक भाग थोडा भाजून घ्यावा. आता दोन्ही भाग एकत्र करावे. ही शोप दररोज जेवण झाल्यावर खावी. असे केल्याने आपण श्वासाच्या दुर्गंधी पासून मुक्ती मिळवू शकता.

    लहान वेलची खावी

    हिरव्या वेलचीत अँटीसेप्टिक गुण असतात. त्याच्या सुवासिक चवीमुळे आपल्याला दुसर्‍यांसमोर लाजिरवाणे होणार नाही. या वेलचीला तोंडात ठेवून हळूहळू चावून त्याचा रस चोखत राहावे.

    लवंग सेवन करावे.

    लवंगाचे जे ऍरोमेटिक फ्लेवर असते, ते तोंडाची दुर्गंध दूर करते. त्यामुळे जेवणात त्याचे वापर अवश्य करा.

    दालचीनीचे सेवन करा

    दालचीनीची गोड चव भाज्यांना चवीष्ट तर करतेच, त्याचबरोबर यात जे अँटीसेप्टिक गुण असतात त्यामुळे आपल्या तोंडात उत्पन्न होणारे बॅक्टीरिया नष्ट होतात त्यामुळे आपल्याला श्वासांच्या दुर्गंधीपासून मुक्ती मिळते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

      January 11, 2017


  • नेत्र लागता पैलतीरी

    नोकरीच्या किंवा घराच्या जबाबदार्यांत गुंतल्यामुळे काही छंद जोपासता आले नसतील तर ते आता जोपासता येतील. तेही काही कारणांनी आता शक्य नसेल तर नवीन छंद लावून घ्यावेत. आपल्यात एखादी कला असेल तर ती एखाद्या इच्छुकाला शिकवावी. आपल्यापेक्षा वृद्ध, असाहाय्य आणि गरजू व्यक्तींसाठी, शेजार्यांसाठी काय करता येईल, ह्याचा विचार करून तसा मदतीचा हात त्यांना द्यावा.

      April 15, 2023


  • कोर्सेस

    एक वर्षाचा प्री सी ट्रेनिंग कोर्स पूर्ण केल्यावर जोपर्यंत जहाजावर नोकरी करायची आहे तोपर्यंत जहाजावर आणि घरी असताना सुध्दा कोर्सेस करावे लागतील याची फारशी कल्पना नव्हती.

      October 16, 2019


  • अमेरिकेतील शाळा

    अमेरिकेत शहराशहरात सरकारी आणि स्वतंत्ररित्या चालवलेल्या शाळा असतात. स्वतंत्रपणे चालवलेल्या शाळांमध्ये फी अधिक असते. तुलनेने सरकारी शाळांमध्ये कमी. श्रीमंत व्यक्ती आपल्या मुलांना खाजगी शाळांमध्ये घालतात.

      June 5, 2023


  • देवपूजेतील साधन – पानसुपारी

    देवपूजेतील साधन – पानसुपारी

    देवपूजेचे वेळी देवापुढे नागवेलीची पाने व त्याच्यावर सुपारी ठेवण्याचा कुलाचार आहे. लग्न, मुंज आदी मंगलकार्यप्रसंगी देखील अतिथींना पान सुपारी देण्याची प्रथा आहे.

    नागवेलीच्या पानांना विड्याची पाने व पोफळी झाडाच्या फळाला सुपारी म्हणतात. देठासहित असलेले विड्याचे पान आपल्या हृदयाचे प्रतीक म्हणून समजले जाते. हे पान हिरवेगार असून मनाला अल्हाद देणारे असते. विड्याच्या पानाला त्यात सुपारी व कात टाकून तो विडा भोजनानंतर मुखशुध्दिसाठी खाल्ला जातो. कारण विडा हा वातहारक व जंतनाशक असतो.

    सुपारी ही मांगल्याचे व प्रेमभावाचे प्रतीक मानले जाते. विशेष म्हणजे अखंड सुपारी ही गणपती देवाची प्रतिमा समजून तिची पूजा करतात.

    पत्निचे देहावसान झाले असता पती आपल्या कनवटीला सुपारी लावून धार्मिक कृत्य करतो. कारण सुपारी ही त्याची प्रतिधिनिक स्वरुपातील पत्नी मानली जाते.

    सुपारीचे अनेक प्रकार आहेत त्यांपैकी मसालेदार सुपारी ही सर्वांना आवडते. सुपारी चघळण्यामुळे लाळ रस उत्पन्न होतो.

      March 21, 2016


  • बाळक्रीडा अभंग क्र.३८

    संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.

      September 18, 2018


  • जानेवारी ०७ : प्रोटिअन अपडेट आणि बिनबाद ४१३

    कालची अनिर्णित कसोटी आणि सलामीच्या जोडीचा भारतीय कसोटी विक्रम.

      January 7, 2011