वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
काही इंधने रंगाने काळसर असतात, म्हणून त्यास ‘काळी तेले’ (ब्लॅक ऑइल) असे म्हटले जाते. पेट्रोलियम खनिज तेलाचे उर्ध्वपातन होताना न उकळणारा जो अवशिष्ट भाग उरतो, त्याचाही इंधन म्हणून वापर करता येतो. खनिज तेलाच्या काही उर्ध्वपातित भागात या अवशिष्ट भागाचा अंश मिसळून जे इंधन तयार होते त्याला एलडीओ (Light Diesel Oil) म्हणतात.
March 8, 2023
येथे फक्त ज्या वैध नोटा बॅंकेत परत आल्यात त्याचाच विचार केला आहे. ज्या नोटा वैध नव्हत्या व बॅंकेत आल्या नाहीत त्याचा विचार केलेला नाही. अशा नोटांची संख्या ही कोणत्याही वेळी १० टक्के पेक्षा जास्त होती हेही विसरून चालणार नाही.
September 4, 2018
क्वांटम कॉम्प्युटर हा अशा प्रकारचा संगणक असतो ज्यात क्वांटम मेकॅनिक्स म्हणजे पुंज यांत्रिकीचा थेट वापर केलेला असतो. सुपरपोझिशन व एन्टँगलमेंट अशी दोन तत्त्वे वापरून त्यात माहितीचे संस्करण केले जाते.
September 30, 2023
अंगावरच्या दुधातील सुरुवातीचे दूध बाळाची तहान भागवते तर नंतर येणारे दूध भूक भागवते. सुरुवातीच्या ८ ते १० मिनिटांत येणाऱ्या दुधांत मेद कमी असते व पाणी जास्त असते. त्यात दुग्धशर्करा, प्रथिने जीवनसत्त्वे व खनिजे जास्त प्रमाणात असतात. नंतरच्या दुधात चरबीचे प्रमाण वाढते बाळाची भूक भागते. बाळाला ऊर्जा मिळते. यामुळे सर्व घटक मिळण्यासाठी एका बाजूचे स्तन पूर्णपणे रिक्त होईपर्यंत पाजून मगच दुसऱ्या स्तनाला घ्यावे.
April 20, 2023
आयुर्वेद म्हणजे फक्त आरोग्यच नाही. तर जीवन जगण्याचे शास्त्र आहे. त्यामुळे जगण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते ते सर्व आयुर्वेदात वर्णन केलेले आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय करावे, हे दिनचर्येमधे सांगितले आहे. सकाळी आह्निके आटोपून, शुचिर्भूत होऊन, मग आपला धन मिळवण्यासाठी जो धंदा नोकरीउद्योग आहे तो करावा. कारण दीर्घ आयुष्य असले तरी जवळ धन नसेल तर, असे आयुष्य निंदीत मानले आहे. समर्थ रामदास स्वामी देखील सांगितात, प्रपंची पाहिजे धन !
September 1, 2017


सध्याची युवा पिढी भरकटली आहे, हे सगळेच मान्य करतात. या पिढीच्या भरकटण्यामागे अनेक कारणेदेखील सांगितली जातात आणि त्यातील सर्वाधिक महत्त्वाचे कारण असते ते या युवा पिढीसमोर कोणताही आदर्श नसणे. अर्थात हे कारण महत्त्वाचे आहे यात वादच नाही, परंतु याचा अर्थ समाजातील आदर्श संपलीच आहेत असाही होत नाही.
March 16, 2003
कोणत्याही रोगाचे निर्मूलन करताना लोकशिक्षणाची गरज हा मुख्य घटक असतो . Prevention is better than cure असे म्हणणे सोपे आहे परंतु त्याची पूर्णपणे अंमलबजावणी करणे तितकेच कठीण आहे . मलेरिया हा रोग होण्यास डास हा मुख्यतः जबाबदार असल्याने त्याच्या निर्मूलनाच्या विविध पद्धती दाखविणारे तक्ते , व्हिडीओ फिल्म्स् या शाळा , कॉलेजे , ऑफिसेस् व वस्त्यांमधून दाखविणे आवश्यक आहे . शहरामध्ये शेकडोंनी बाहेर गावाहून येणारे मालवाहू ट्रक्स् , बसेस् तसेच रेल्वेचे डबे हे डेपोत व यार्डात जातात . त्यावेळी त्या गाड्या व डब्यांखालील चेसिस् व चाकांच्या खोबणीत असंख्य डास लपलेले असतात . त्यांच्यामुळे आजूबाजूच्या नागरी वस्त्यांमधून मलेरिया रोगाचा फैलाव होतो . मलेरिया झालेल्या रुग्णांना त्यावरील औषधे योग्य वेळी व योग्य प्रमाणात मिळणे अत्यंत गरजेचे आहे . जे प्रवासी मलेरियाचा प्रादुर्भाव नसलेल्या प्रदेशातून मलेरिया ग्रस्त भागात जातात तेव्हा त्यांना रोगप्रतिबंधक औषधे त्या प्रदेशात शिरण्यापूर्वीच दिली जाणे अत्यंत गरजेचे आहे . मलेरिया या रोगासंबधी सामान्य लोकांना प्राथमिक स्वरुपाची माहिती देणारा एक तक्ता मुंबई महानगरपालिकेने प्रसिद्ध केला होता . त्याचा हा नमुना
मलेरिया
महत्त्वाची लक्षणे प्रतिबंधक उपाययोजना
ताप घराच्या आजूबाजूस पाण्याची डबकी
हुडहुडी व थंडी तयार न होऊ देण्याची खबरदारी घ्यावी .
डोकेदुखी पाणी साठविण्याची पिंपे व भांडी
अंग दुखणे झाकून ठेवावीत
उलटी व उमासे येणे
खोलीमध्ये Indoor residual spray ( IRS ) कीटकनाशकाचा फवारा मारावा. जास्त काळ टिकणाऱ्या व कीटकनाशक रसायनाचा लेप असलेल्या मच्छरदाण्या वापराव्यात . ( Long lasting insecticidal ( LLIN ) गरोदर स्त्रिया व लहान मुले यांनी वरील प्रकारच्या मच्छरदाणीत झोपणे अत्यावश्यक आहे.)
-डॉ. अविनाश वैद्य
November 2, 2022
मुंबईच्या आदर्श गृहनिर्माण संस्थेतील घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना तातडीने राजीनामा देण्यास सांगितले. त्यामळे पुढे काय होणार याकडे सार्यांचे लक्ष लागले होते. पण एकूण राजकीय घडामोडी लक्षात घेता चव्हाणांची गच्छंती लांबणीवर पडल्याचे दिसते. या प्रकरणी नेमलेल्या समितीला चौकशीसाठी लागणारा वेळ आणि ओबामांचा मुंबई दौरा लक्षात घेऊन चव्हाणांना तूर्तास मुदतवाढ मिळाली आहे.
November 3, 2010
चक्रस्थेऽचपले चराचरजगन्नाथे जगत्पूजिते
आर्तालीवरदे नताभयकरे वक्षोजभारान्विते ।
विद्ये वेदकलापमौलिविदिते विद्युल्लताविग्रहे
मातः पूर्णसुधारसार्द्रहृदये मां पाहि मीनाम्बिके ॥ २ ॥
आई जगदंबा मीनाक्षीच्या स्वरूपाचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात,
चक्रस्थे- आई जगदंबेचे यंत्र स्वरूप असणाऱ्या श्रीयंत्रा मध्ये निवास करणाऱ्या,
अचपले- अतीव स्थिर. शांत. चंचलता अर्थात कृतीचा संबंध आहे काहीतरी प्राप्त करण्याशी. आपण तीच गोष्ट प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो जी आपल्या जवळ नसते. वेगळ्या शब्दात प्राप्तीचा प्रयत्न हे अपूर्णतेचे लक्षण आहे. आई जगदंबा परिपूर्ण असल्याने, तिला काहीच मिळवायचे नाही. त्यामुळे तिच्या ठिकाणी चंचलता नाही. ती स्थिर आहे.
चराचरजगन्नाथे- चर आणि अचर संपूर्ण जगाची सम्राज्ञी. जगत्पूजिते- संपूर्ण विश्व जिच्या चरणकमलांचे पूजन करते अशी,
आर्तालीवरदे- आर्त अर्थात दुःखाने ग्रस्त झाल्याने शरणागता आलेल्या, अली म्हणजे भक्तांच्या रांगांना, समूहाला त्यांच्या मनोवांछित वरदानाने आनंदित करणाऱ्या,
नताभयकरे- विनम्र भावाने नमन करणाऱ्यांना अभय प्रदान करणाऱ्या, वक्षोजभारान्विते - विश्वतृप्तीकारक स्तनांच्या भाराने संयुक्त.
विद्ये- सकळविद्या अर्थात ज्ञानाचे मूलभूत अधिष्ठान शक्ती असणाऱ्या. वेदकलापमौलिविदिते- वेदकलाप अर्थात वेदांचा समुदाय. प्रत्येक वेदात संहिता, ब्राह्मण,आरण्यक आणि उपनिषद अशा चार प्रकारचे ग्रंथ असतात. हे सगळे एकत्रित वेदकलाप. यातील सगळ्यात वर, मौली असणारे ग्रंथ उपनिषद. त्यामुळे त्यांना वेदकलापमौली असे म्हणतात. त्या उपनिषदातील तत्त्वज्ञानाच्या द्वारे जिला जाणता येते अशी.
विद्युल्लताविग्रहे- विद्युल्लता अर्थात विजेप्रमाणे अत्यंत तेजस्वी असणाऱ्या.
मातः- हे आई जगदंबे ! पूर्णसुधारसार्द्रहृदये- सुधारस अर्थात अमृतमय करुणा रसाने जिचे हृदय पूर्ण आर्द्र आहे अशा
मां पाहि मीनाम्बिके- हे आई मीनाक्षी माझे रक्षण कर.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
May 26, 2020
नेहमीच्या वापरातील मसाल्याच्या तिखट पदार्थांच्या यादीतील एक प्रमुख औषधी घटक म्हणजे मिरी.
जिथे मिरची वापरता येणार नाही, अशा ठिकाणी मिरी वापरावी, एवढी तिखट. हिच्या तिखटपणापेक्षा भगभगीतपणा लक्षात रहातो. तोंडाची, जीभेची हायहुय करत, सर्वांना हाऽय् हाऽय् म्हणायला लावणारी, डोळ्यातून पाणी वाहायला भाग पाडणारी ही काळी मिरी आता जगप्रसिद्ध झाली आहे. सूप असो वा सॅलेड, मिरीशिवाय चवच नाही.
दिसायला बारीक सुरकुतलेली जरी दिसली, तरी जिभेवर चुरूचुर निर्माण करणारी चव काही औरच असते.
त्रिकटू या आयुर्वेदीय प्रक्षेप द्रव्यातील सुंठ आणि पिंपळीच्या मधे बसलेली ही मिरी कच्चीच वापरली जाते, हे बहुधा पाश्चात्य मंडळींनी पाहिले, तेव्हापासून ते काळी मिरीची पावडर सूप सॅलेडमधे वापरू लागले. मिरची वापरण्याएवढी आपली योग्य प्रकृती नाही, हे जेव्हा त्यांच्या लक्षात आले तेव्हा मिरचीची तहान त्यांनी मिरीवर भागवली बहुतेक !
आजारपणातून उठल्यावर पहिला घासाच्या तूपभातावर मिरी हवीच. सकाळी दात घासण्याच्या दंतमंजनापासून, पापड आणि ऊसळीपर्यंत तर असतेच. पण अगदी आमरसाच्या वाटीत जावून तुपाच्या बरोबरीने विराजमान होणारी ही मिरी.
सणसणीत उष्ण तीक्ष्ण गुणाची, उत्तम दीपक म्हणजे भूक वाढवणारी, पाचक म्हणजे पचन घडवणारी, घाम आणून ताप कमी करणारी, ह्रदयाला हितकर, उत्तम जंतुघ्न, कृमींचा नाश करणारी, स्रोतसांमध्ये असलेला आमाचा चिकट अडथळा स्वशक्तीने दूर करणारी, आतून जखम स्वच्छ करणारी, सर्दी खोकल्यापासून डायबेटीस आणि ह्रदयरोगापर्यंत अप्रतिम रिझल्ट देणारी, वात कफावर विजय मिळवणारी आणि पित्ताला वाढवणारी असते. सर्व रोगांचे मूळ असलेल्या, मंद अग्निला वाढविणारी असल्यामुळे, वैद्यप्रिया बनलेली आहे.
जिथे पाणी, आंबटपणा, गोडपणा जास्त असतो, तिथे मिरी वापरली जाते. म्हणून कदाचित कोकणात जास्त वापरली जाते. कोकणात उत्पन्न होत असल्याने कोकणी प्रकृतीला सहजपणे मानवणारी, तसाच स्वभाव बनवणारी, पण अंतिमतः सुखकर ठरणारी, ही मिरी म्हणजे अगदी कोकणप्रिया. कोकणी महिलेला आपल्या गळ्यामधील मंगळसूत्रातील जणु काळे मणीच वाटावेत, एवढी प्रिय.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
18.11.2016
November 18, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti