(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • गौरीदशकम् – ३

    चन्द्रापीडानन्दितमन्दस्मितवक्त्रां
    चन्द्रापीडालंकृतनीलालकभाराम् ।
    इन्द्रोपेन्द्राद्यर्चितपादाम्बुजयुग्मां
    गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे ॥ ३॥

    आई जगदंबेच्या या जगन्मोहन स्वरूपाचे अधिक वर्णन करतांना पूज्यपाद आचार्यश्री म्हणतात,
    चन्द्रापीडानन्दितमन्दस्मितवक्त्रां- चंद्रापीड अर्थात ज्यांनी आपल्या मस्तकावर चंद्र धारण केला आहे असे, म्हणजे भगवान शंकर. त्यांना आनंद देणारे मंद स्मितहास्य जिचा वदनावर विलसत आहे अशी.

    वास्तविक भगवान शंकर म्हणजे योगीराज शिरोमणी. कोणाच्याही व्यावहारिक सुखात, आकर्षणात ते अडकणारच नाहीत. पण त्यांनाही आनंद देणारे , आकर्षित करणारे असे आईचे हास्य आहे. किती सहज शब्दात आचार्यश्री आई जगदंबेचे लोकोत्तर स्वरूप वर्णन करीत आहेत. सामान्य माणूस आकर्षित झाला तर आश्चर्य काय? वैराग्य शिरोमणी असणारे भगवान शंकर आपली सहजसमाधी अवस्था सोडून आईच्या हास्याचा आनंद घेतात. वेगळ्या शब्दात आईचे हास्य समाधीच्या आनंदाच्या समतुल्य आहे.

    चन्द्रापीडालंकृतनीलालकभाराम् - आईने देखील आपल्या, मस्तकावर चंद्र धारण केला आहे. त्या चंद्राने जिने आपल्या नीलवर्णीय अलकभार म्हणजे केश संभाराला अलंकृत केले आहे केले आहे अशी.

    स्निग्ध अर्थात तेल लावलेल्या, काळ्याशार केसांवर अत्यंत तेजस्वी असा पांढरा शुभ्र प्रकाश पडला तर त्या काळ्या रंगाच्या ऐवजी तेथे किंचित निळी छटा पसरते. आचार्य श्रींचे हे सूक्ष्म निरीक्षण किती मनोहारी आहे.

    इन्द्रोपेन्द्राद्यर्चितपादाम्बुजयुग्मां- इंद्र म्हणजे देवराज इंद्र. उपेंद्र म्हणजे भगवान विष्णू. आदी म्हणजे अन्य सर्व देवतांच्या द्वारे जिच्या चरणकमलांची अर्चना केली जाते अशी.

    गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे - अशा कमलाप्रमाणे नेत्र असणाऱ्या त्या जगदंबा गौरीचे मी स्तवन करतो.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      April 30, 2020


  • के. एल. एम. (रॉयल डच एअर लाईन)

    ७ ऑक्टोबर १९१९ साली स्थापन झालेली के.एल.एम. ही सध्या कार्यरत असलेली जगातील सर्वात जुनी विमान कंपनी आहे.

      October 7, 2021


  • मुंबईकरांच्या एकात्मतेला सलाम !

    मुंबईकरांनी आत्तापर्यंत बऱ्याच चांगल्या/वाईट गोष्टी अनुभवल्या आहेत, त्याची झळ सोसली आहे. त्याच्या कारणांनी एकमेकांशी वैर साधलेले बघितले आहे, अबोला बघितला आहे, दंगली अनुभवल्या आहेत. पण कालच्या पावसाने मुंबईकरांचे आणि चाकरमान्यांचे जे हाल झाले आणि त्यातून त्यांना झालेला मनस्ताप, गैरसोयींना सामोरे जातांना बघितले आणि क्षणभर वाटले हाच तो मुंबईकर का?

      September 19, 2017


  • ऑक्टोबर २४ – रजाचा छोटासा विक्रम आणि दोन अंकी बंधू-पुराण

    १९९६ : सर्वात छोट्या कसोटीवीराचे पदार्पण. नाकाखाली वारीक सुतासारखी मिसरूडे दिसत असणार्‍या हसन रजाचे वय १४ वर्षे २२७ दिवस इतके होते.

      October 18, 2010


  • घालीन लोटांगण

    ज्योत्स्ना प्रकाशनाच्या विकास परांजपे ह्यांच्या फेसबुक वॉल वरुन

    घालीन लोटांगण ही नामदेवांची एक सुंदर रचना आहे. त्याला 'त्वमेव माता...' ही संस्कृत रचना (बहुधा शंकराचार्यांची) कोणी चिकटवली व का हे कोडे मला सुटले नाही. मी आजपर्यंत अनेकांना विचारले. उत्तर मिळत नाही. कोण सांगू शकेल काय ?

    या माझ्या प्रश्नावर माझा मित्र रवी अभ्यंकर याने संदर्भासह विस्तृत माहिती पुरवली ती पुढे देत आहे.

    रविला भेटलो की ‘लोटांगण’ नाही घातले तरी ‘प्रेमे आलिंगीन’ नक्की !!!

    -- रवी उवाच

    विकास,

    'घालीन लोटांगण' हे कॉकटेल काव्य आहे, ह्यातली पाच कडवी कुठल्या तरी भक्ताने इथून तिथून जमवून त्यांचं मिश्रण केलं आहे.

    (१) पहिलं कडवं 'घालीन लोटांगण' हे तू लिहिल्याप्रमाणे नामदेवांचं आहे. त्याला बिचाऱ्याला कल्पना नसेल पुढे त्याच्या काव्याला किती ठिगळं लागणार आहेत त्याची.

    (२) दुसरं कडवं 'त्वमेव माता च पिता त्वमेव' हे गणपती किंवा कुठल्या देवाला उद्देशून नसून तो गुरुस्तोत्राचा भाग आहे. शंकराचार्यांनी श्रीगुरुस्तोत्रं लिहिलं, ज्यात आपल्याला माहिती असलेला 'गुरुर्ब्रह्मा गुरुर्रविष्णु' श्लोक समाविष्ट आहे.

    (३) तिसरं कडवं 'कायेन वाचा' हे श्रीमद्भागवतपुराणातलं आहे. एकूण अठरा पुराणांपैकी हे एक, व्यासांनी लिहिलेलं. कायेन वाचा हा श्लोक स्कंध ११, अध्याय २ ह्यामध्ये ३६ वा श्लोक आहे.

    (४) चौथं कडवं 'अच्युतम केशवं' हे 'अच्युताष्टकम्' ह्या शंकराचार्यांच्या काव्यातून घेतलं आहे. मजा म्हणजे काव्याचं नाव जरी 'अच्युताष्टकम्' आहे तरी त्यात नऊ श्लोक आहेत.

    (५) पाचवं आणि शेवटचं कडवं 'हरे राम हरे राम' सर्वात सोपं. ते 'कलिसन्तरण' ह्या उपनिषदातलं आहे. ह्या उपनिषदाची सुरुवात 'ॐ सह नाववतु । सह नौ भुनक्तु । सह वीर्यंकरवावहै । तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै । ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ।' आपल्या सर्वांनाच माहिती आहे.

    तर अशी ही प्रार्थना जी आपण गणपतीसमोर म्हणतो, त्यातलं एकही कडवं गणपतीला उद्देशून नाही.

    -- रवी अभ्यंकर

    ज्योत्स्ना प्रकाशनाच्या विकास परांजपे ह्यांच्या फेसबुक वॉल वरुन

      September 12, 2016


  • धम्मचक्र प्रवर्तन दिन

    दीक्षाभूमीवर येणाऱ्यांमध्ये दरवर्षी ३० टक्के नवीन लोकांचा समावेश असतो. यामध्ये बहुतांश तरुणाई असते. ही तरुणाई बाबासाहेबांचे विचार समाजामध्ये पसरवण्यासाठी येथून प्रेरणा घेत असते.

      October 14, 2021


  • निंब

    कडूनिंबाचा उपयोग आपण बऱ्याच प्रसंगी करतो.आपले हिंदू नव वर्ष अर्थात गुढी पाडवा ह्या दिवसाची सुरूवात नाही का आपण कडूनिंबाचा रस पिऊन करत.आपल्या शास्त्रात किती महत्त्व आहे पाहीलेत ना कडूनिंबाला.

    ह्याचे १४-१६ मीटर उंच वृक्ष असतो.खोड टणक,सरळ वाढणारे असते पाने विषमपक्ष असून २०-३५ सेंमू लांब असतात पत्रकाच्या कडा दंतूर असतात.फुले मंजीरी स्वरूपात असतात पांढरी.फळ लांबट गोल १.२५-२ सेंमी लांब,पिकल्यावर पिवळे व कच्चे असताना हिरवे कडवट व उग्रगंधी असते.ह्यात १ बी असते.

    ह्याचे उपयुक्तांग आहे फुले,पाने,त्वचा,बीज व तैल.हा चवीला कडू,तिखट,तुरट असून थंड गुणाचा असतो तसेच हा हल्का व रूंक्ष आहे.कडूनिंब कफपित्तनाशक व वातकर आहे.

    चला आता आपण ह्याचे काही उपयोग जाणून घेऊयात:

    १)जखम धुवायला निंब सालीचा काढा उपयोगी आहे.

    २)कडूनिंबचा पाला घरात जाळल्यास घरातील किटक जंतू ह्याचा नाश होतो.

    ३)पोटात कृमी झाल्या असल्यास निंबसालीचा रस मधासोबत देतात.

    ४)ताप येऊन त्यामुळे हातापायांची जळजळ होत असल्यास निंबाचा कल्क त्या जागी लेप करतात.

    ५)खरजेवर निंबाच्या बिया तीळ तेलात वाटून तिथे लेप लावतात.

    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      August 27, 2017


  • मत आणि मन

    साहित्य, राजकारण, समाजकारण अशा परस्पर भिन्न क्षेत्रामधली समान गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे मतभेद. जीवनाच्या ज्या ज्या क्षेत्रात चार वेगवेगळी माणसे एकत्र येऊन काम करतात तिथे मतभिन्नता, मतभेद आलेच. अगदी स्वातंत्र्य चळवळीपासून ते साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाच्या निवडीपर्यंत ही गोष्ट अनुभवायला मिळते. आणि त्यात काही गैरही नाही. मतभेद असने हे समाजाच्या जीवंतपणाचे लक्षण मानले जाते. पण गेल्या काही दशकात जे चित्र महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही समाजकारणात, राजकारणात पहायला मिळते आहे ते चिंताजनक आहे.

    पूर्वी एखाद्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक घडामोडीवर, घटनेवर समाजाच्या विविध थरातले मान्यवर मतप्रदर्शन करीत तेव्हा आपली.. भूमिका स्पष्टपणे व ठामपणाने मांडीत. परंतु सध्या हा ठामपणा, स्पष्टपणा अभावानचे आढळतो. परस्परामध्ये गुंतलेल्या हितसंबंधांमुळे सार्वजनिक जीवनात एक प्रकारचा बोटचेपेपणा बोकाळलेला दिसतो. आपल्या हितसंबंधाचे रक्षण करण्यासाठी किंवा नविन हितसंबंध जोपासण्यासाठी सावध, वरवरच्या आणि भूमिकाहीन प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातात. मनातले मतभेद उघडपणे व्यक्त करण्याची जोखीम कोणी पत्करत नाही.

    या हिशोबी, गुळमुळीत भूमिकेच्या अगदी विरूद्ध टोकाची भूमिका घेणारा वर्गही समाजात निर्माण झालेला आढळतो. एखाद्याच्या वक्तव्याबद्दलचे, कृत्याबद्दलचे मतभेद तीव्रपणे जाहिररित्या व्यक्त करण्याची नवीन शैली या मंडळीनी विकसीत केली आहे. त्या व्यक्तीचे पुतळे जाळण्यापासून ते त्या व्यक्तीशी संबंधही नसलेल्या जनतेला रास्ता रोको करून वेठीला धरण्यापर्यंत कोणत्याही थराला ही मंडळी जाताना दिसतात. अशा तीव्र मतभेद प्रदर्शनामध्ये अनेकदा आपण मुद्द्यांना उत्तर गुद्द्यांनी ' देतोय याचेही भान संबंधितांना राहत नाही. कार्यशैली वा घेतलेल्या निर्णयाबाबतचे मतभेद व्यक्त करताना त्या व्यक्तीचे चारित्र्यहनन करून, त्याच्या खाजगी आयुष्यावर अतिक्रमण केले जाते.

    अशा दोन्ही पद्धतीच्या अतिरेकी वृत्तींमुळे समाजाचा तोल ढासळतो आहे. कोणत्याही समाजाची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी विधायक विरोध किंवा मतभेद आवश्यकच असतात. पण सध्याच्या काळात मतभेद व्यक्त करण्याचे स्वातंत्र्यच कोणी मानायला तयार नाही. एखादया विषयावरील मतभेदामुळे उसळलेल्या तात्विक व सात्विक वादाचा धुरळा खाली बसल्यानंतर त्या विषयाचे अधिक नेमके व नेटके रुप लोकांना दिसते. पण आज विरोधाचा लहानसा सूर ही तात्काळ दाबला जात असल्याने, परिस्थितीचे नेमके आकलनच होत नाही. परिणामी, अनेक निर्णय बहुमताने पण आंधळेपणाने घेतले जातात. हे निरोगी समाजाचे लक्षण नव्हे.

    मतभेदांमुळे मते दुरावतात आणि मने दुखावतात हे जरी खरे असले तरी हा दुरावा कायमचा नसतो हे ध्यानात घेतले पाहिजे. टिळक आणि आगरकर या महापुरूषांमधील मतभेद याचेच उदाहरण म्हटले पाहिजे. सामाजिक सुधारणांना अग्रक्रम द्यावा का स्वातंत्र्याच्या मागणीला यावरून त्यांच्यात मतभेद होते पण वैर नव्हते हे विसरता कामा नये, आज मतभेद असणे म्हणजे वैर असणे असाही गैरसमज करून घेतला जातो. आणि वैर टाळण्यासाठी मतभेद लपविले जातात. या विचारसरणीमुळे समाजात आपोआप एक घातक पायंडा पडत चालला आहे. तो म्हणजे वाईट गोष्टींना (मूक) संमती देणे व चांगल्याला (खुला) पाठिंबा न देणे. केवळ इतरांची मने दुखवली जातील म्हणून समाजविघातक रुढी, परंपरांना विरोध केला जात नाही. आणि अशा गोष्टींचा प्रसार होत रहातो.

    राजा नागडा आहे हे सांगणारा मुलगा काय किवा राघोबांना देहांत प्रायश्चित सुनावणारे रामशास्त्री काय, ही मंडळी केवळ कल्पनेच्या जगातच शिल्लक राहिली आहेत. ठाम विचारांनी सौम्यपणे, समोरच्याचा योग्य आदर राखून मतभेद व्यक्त करणारे सुजाण, सुसंस्कृत लोक आज हवे आहेत. विरोधी शेरे- ताशेऱ्यांना न घाबरता, त्यांचे सभ्यपणे खंडन करणारे लोक आज हवे आहेत, समाजातील बुद्धिजीवी वर्गात ही शक्ती सुप्त स्वरूपात आजही आहे. गरज आहे ती त्यांनी आपली जबाबदारी ओळखून, ती धैर्याने पार पाडण्याची. मतभेत असणे आणि ते मोकळेपणाने व्यक्त करता येणे हे समाजाच्या सहिष्णुपणाचे लक्षण आहे. हे लक्षण लोप पावणार नाही याची खबरदारी आपण सर्वानी घेतली पाहिजे.

    --चिंतामणी कारखानीस

      November 11, 2015


  • विच्छा माझी पुरी करा नाटकाचा पहिला प्रयोग

    “विच्छा माझी पुरी करा” या नाटकाने ही विचारसरणी बदलण्याचं फार मोठं कार्य करत लोकनाट्य शहरी पांढरपेशी समाजापर्यंत पोहोचवले.कुठलीही कला जितकी आत्यंतिक लोकल असते, तितकेच तिला ग्लोबल अपील असते कारण ती जनसामान्यांच्या संवेदनांशी नाते सांगते. हीच गोष्ट पुन:पुन्हा कराव्याश्या वाटण्या-या “विच्छा माझी पुरी करा”या नाटकाने सिद्ध केली आहे.

      December 21, 2021


  • शिव’शाई’ झाली शतायुषी

    आज बाबासाहेबांनी शंभराव्या वर्षात पदार्पण केले आहे. आम्हा पुणेकरांचे, ते एक ‘ऐतिहासिक वैभव’च आहे! आमच्या तीन पिढ्यांनी त्यांच्या तोंडून छत्रपतींचे चरित्र ऐकले, पाहिले.

      July 29, 2021