वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
कापूस हे प्रमुख व्यापारी पीक आहे, जे ६ दशलक्ष शेतकऱ्यांना उपजिविका प्राप्त करुन देते. भारत कापूस उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमाकांवर आहे आणि जगातील सर्वात मोठा कापसाचा ग्राहक आहे.
October 7, 2021
भ्रष्टाचार, काळा पैसा, बनावट नोटांवर प्रहार करून दहशतवादी कारवायांना मिळणारी रसद संपविण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला ८ नोव्हेंबर रोजी दोन वर्ष पूर्ण झाली. या निर्णयामुळे देशाने काय साध्य केले, याचं स्पष्टीकरण अद्याप पंतप्रधान किंव्हा सरकारने दिलेलं नाही. देशाच्या एकंदर जडणघडणीसाठी नोटबंदीच्या निर्णयाला ऐतिहासिक ठरविण्यात आले होते.
November 15, 2018
माता सरस्वतीची, आपल्या कुलदेवतेची मनापासून ध्यानधारणा करणाऱ्या एका सुखी दाम्पत्याच्या घरी पुत्रसुख नव्हते. सुखाचा संसार हा सुरूच होता. आणि एके दिवशी मातेच्या ध्यान-आशीर्वादामुळे पती-पत्नी कैलासनाथ आणि उमा यांना कन्यारत्नाचा लाभ झाला. साक्षात देवीचा प्रसाद म्हणुन या कन्येचे खूप लाडामध्ये संगोपन झाले. तिचे नामकरण झाले. नाव ठेवले शिवानी…
May 28, 2021
शांती एकांबरम ह्या भारताच्या आर्थिक उद्योगातील सर्वात प्रभावशाली महिलांपैकी एक आहेत. प्रगतीला चालना देण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेमुळे बँकांची प्रचंड वाढ झाली आहे. एकांबरम ह्या डिजिटल बँकिंग सेवा सुरू करणे, नवीन बाजारपेठांमध्ये बँकांचा विस्तार करणे आणि ग्राहकांसाठी नाविन्यपूर्ण उपायांचा परिचय यासह अनेक धोरणात्मक उपक्रमांमध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
September 11, 2025
डिमेंशिया - अवमनस्कता ही एक अशी अवस्था आहे की ज्यात मानसिक क्षमता इतकी कमी झालेली असते की ज्याचा असर आपल्या दैनदिन आयुष्यावर होतो. स्मरणशक्ती कमी होणे, वैचारीक कसब किंवा कौशल्य कमी होणे ह्या सारखी लक्षणे डिमेंशिया मध्ये आढळतात. ही लक्षणे एवढी जास्त प्रमाणात असतात की त्या व्यक्तीला त्याचे रोजचे व्यवहार ही नीट करता येत नाहीत. विस्मरण किंवा विस्मृती होणे हे त्याचेच उदाहरण आहे. डिमेंशिया मध्ये अल्झायमर नावाचा रोग जास्त प्रमाणात आढळतो. अल्झायमर मध्ये मेंदूतील बिघाडामुळे स्मृती, बोलणे, हलचाल करणे इत्यादी क्रिया हळूहळू मंदावत जातात किंवा बंद पडतात. ह्या रोगाचे प्रमाण वृद्ध व्यक्ती मधे जास्त प्रमाणात आढळते.
स्मरण / स्मृती आणि आहाराचा काही संबंध आहे का?
नक्कीच आहार आणि स्मृति ही एकमेकांशी निगडीत आहेत. एखाद्या व्यक्तीचा आहार अपूर्ण / अपुरा असेल तर त्याचा त्या व्यक्तीच्या स्मृतीवर परिणाम होतो असे प्रयोग दाखवतात. ह्या विस्मृयीचा परिणाम म्हणून त्या व्यक्तीला अल्झायमर होण्याची शक्यता बळावते. आहार एक असा सहज बदल करता येण्यासारखा घटक आहे की ज्याच्या बदलामुळे विस्मृती किंवा विस्मरण होणे टाळता येऊ शकते किंवा तो उशीरा होण्यास उपयुक्त ठरू शकतो. गेल्या काही वर्षात आहार पद्धती, आहार, संज्ञानीक र्हास ( cognitive decline) आणि विस्मरण ह्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे ह्या विषयावर बरेच प्रयोग होताना आढळत आहेत,
Ondine Van de Rest et al ह्यांनी "आहार पद्धती cognitive decline आणि विस्मरण" ह्या विषयी सर्वागीण आढावा (systematic review) केला आहे. त्यांनी मे 2014 पर्यंत cognitive decline आणि विस्मरण ह्या विषयावर केलेल्या प्रयोगांचा ह्या सर्वांगीण आढाव्यात समावेश केला आहे.
6 पैकी 4 छेदीक विशलेषण (cross sectional) शोध प्रबंधात, 12 पैकी 6 अनुदैर्घ्य ( longitudinal) शोध प्रबंध, 1 चाचणी प्रयोग आणि 3 meta analysis ह्यांचा समावेश केला. पहाणी अंती असे आढळले की Mediterranean आहार पद्धतीचे सेवन केलेल्या व्यक्तींमधे cognitive decline, डिमेंशिया, किंवा अल्झायमर चे प्रमाण कमी आढळले. Mediterranean आहार पद्धती ही एक अधूनिक आहार पद्धती असून ती Gŕeece, Southend Italy, आणि Spain ह्या देशात पारंपरिक पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या आहार पद्धती वर आधारित आहे. प्रयोगात असे आढळले आहे कि Mediterranean आहाराच्या सेवनाने आप्णा निरोगी राहू शकतो.
6 cross sectional शोध प्रबंधात आणि 8 पैकी 6 longitudinal शोध प्रबंधात अनुभव पूर्व (priori) वाढते अनुभवोत्तर (posteriori) प्रयोगात आरोग्यदायी आहार पद्धतीच्या (healthy diet) सेवनामुळे cognitive decline आणि /किंवा डिमेंशिया ची जोखीम कमी झालेली आढळली. अनुभव पूर्व ह्यात आरोग्यदायी आहार पद्धतीचा इंडेक्स (उल्लेख सूची, हेल्दी डाइट इंडीकेटर आणि National Nutrition Sante' guideline score कार्यक्रम व अनुभवोत्तर ह्यात factor analysis, cluster analysis, आणि reduce rank regression गोष्टीचा समावेश केला होता. ह्या प्रयोगाचा निश्कर्ष " Applied in Nutrition an international review journal" March 2015: vol 6, 154 -1 68, 201 ह्यात प्रसिद्ध करण्यात आला. त्या मध्ये असे ही नमूद करण्यात आले की cognitive decline टाळण्यास किंवा तो विलंबाने कसा होईल ह्या बद्दलच्या तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी अशा प्रकारचे जास्तीतजास्त प्रयोग होणे गरजेचे आहे
मेंदू योग्य प्रकारे कार्यरत राहण्यास त्याला उर्जा लागते. चांगल्या प्रकारची फॅट, फळे, भाज्या, लिन प्रथिने, आणि योग्य प्रमाणात जीवनसत्व व खनिज ह्यांचे सेवन स्मृति, स्मरण वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात. एखाद्या पदार्थाचे सेवन कमी जास्त केल्यास त्याचा मेंदू च्या कार्यावर तर परिणाम होतोच पण स्मरणशक्ती वर ही त्याचा परिणाम होताना दिसतो. काही पदार्थांचे सेवन योग्य प्रमाणात केल्यास स्मरण वाढते, तर काहीं पदार्थांच्या सेवनाने अल्झायमर चा धोका वाढतो असे प्रयोगात आढळले आहे. काही पदार्थांच्या सेवनाने शरीरात हानीकारक घटक तयार होतात ज्यामुळे शरिरा अंतर्गत सूज वाढीस लागते. ह्या संदर्भात आपण आधीच्या लेखात समजावून घेतले आहेच. ही अंतर्गत सूज मेंदूत प्लाक निर्माण करतात आणि त्याचा परिणाम म्हणून cognitive function मध्ये बिघाड होण्यास सुरुवात होते.
विस्मरण निर्माण करणारे पदार्थ - प्रक्रिया केलेले चीज (processed cheese), प्रक्रिया केलेले मटण (processed meat), beer, सफेद रंगाचे पदार्थ जसे की पास्ता, साखर, सफेद तांदूळ, सफेद ब्रेड, पापकर्म इत्यादि
स्मरण वृद्धिंगत / वाढवणारे पदार्थ - पालेभाज्या, सॅलमन नावाचा मासा, तसेच थंड पाण्यातील मासे, (cold water fish) बेरी फळ जसे की करवंद, गडद सालीची फळ, काॅफी, चाॅकलेट, एक्सट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल, आणि कोल्ड व्हर्जिन खोबरेल तेल
April 17, 2015
सॅनफ्रान्सिस्को प्रत्येक शहराला त्याचा असा इतिहास असतो. त्याला स्वतःचा चेहरा मोहरा असतो. त्याची खास राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, ऐतिहासिक आणि भौगोलिक परंपरा, पार्श्वभूमी आणि संदर्भ असतात. शिवाय त्याला जसा भूतकाळ असतो, तसाच वर्तमानही असतो.
December 16, 2023
पुत्र असावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा, या उक्तीची जाणीव मा. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून जाणवू लागली, व 8 नोव्हेंबरला ती खऱ्या अर्थाने सार्थ ठरली. 125 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात, घडवली जाणारी महत्वाची घटना, फक्त 2 लोकांनी नियोजित करून, रात्री 8 वाजता, लोकांच्या समोर ठेवणे, हि निश्चितच धाडसी कृतीच म्हणावी लागेल.
आपले नशीब फार चांगले म्हणूनच मोदींना 284 चे स्पष्ट बहुमत मिळाले, आणि एक पांगळे सरकार देशावर लादण्याची नामुष्की टळली. 70 वर्षात वारेमाप काळा पैसा जमावणाऱ्यांची पहिल्यांदा झोप उडाली आहे. कर बुडवून अफाट मालमत्ता गादीखाली, माळ्यावर, भिंतीत, जमिनीत ठेवणारी जमात, खडबडून जागी झाली आहे. मोदींच्या जीवाला ह्याच लोकांचा मोठा धोका आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही.
या देशाचा हजारो वर्षाचा इतिहास आहे, घरचा भेदी हा देशावर लागलेला शाप आहे, या वेळेस असे भेदी मिळणारच नाहीत याची खात्री देता येणार नाही. रात्र वैऱ्याची आहे, त्यामुळे डोळ्यात तेल घालून जागे राहण्याला पर्याय नाही.
मोठया प्रमाणात जंगम व स्थावर मालमत्ता करणाऱ्यांच्यावर सुद्धा येणाऱ्या काही दिवसात दणका बसू शकतो. कित्तेक लोक बेनामी संपत्ती करून बसले आहेत, त्याचा हि पर्दाफाश काही दिवसात होऊ शकेल. आजपर्यंत 97 टक्के पैसा फक्त आडव्या वर्तुळात फिरत राहिला ज्याने दुबळ्या अर्थकारणाला जन्म दिला व पैसा फक्त तीन टक्के लोकांच्या हातात राहिला. तो उभ्या वर्तुळात फिरला तरच,तळागाळात मोठया प्रमाणात पैसा पोहोचतो व सुदृढ अर्थव्यवस्था तयार होते.
भारतीय लोकांना घाईच फार, ट्रेन जरी स्टेशनवर अर्धातास थांबणार असली तरी, आरक्षित डब्यातुन उतरण्यास व चढण्यास घाई करतील, तीच परिस्थिती, उच्च वर्गीय लोक विमानातून उतरताना करतात. पायलट कुर्सी कि पेटी छोड दे असे म्हणताच, लोक तडक उभे राहतात, व वरती ठेवलेल्या ब्यागा काढण्याची घाई करतात. इतके करून बाहेर जाऊन मात्र कनवेअर बेल्टवर समान येण्याची वाट पाहत 20-25 मिनिटे घालवतात. तीच गत पैसे बद्दलणाऱ्यांची बँकेत दिसली. 30 डिसेंबर पर्यंत सवलत असतानाही, पहिले 3-4 दिवस बँकेत झुंबड करण्याची काही आवश्यकता न्हवती. पण आमभारतीयांची मानसिकता प्रत्येक ठिकाणी घाई करण्याची असते, ते इथेही सिद्ध झाले. अशीच घाई मात्र टॅक्स भरण्यासाठी मात्र करताना दिसत नाहीत. थकवलेली वीज, पाणी, यांची बिले जेव्हा कापायची नोटीस येते तेव्हाच भरली जातात हे चित्र कमी अधिक प्रमाणात देशात सगळीकडे सारखेच आहे.
इंदिराजी नंतर मोदीजी हेच सर्वार्थाने या देशाला धडाडीचे पंतप्रधान म्हणून लाभले, असे आपण म्हणू शकतो. बँकेत लांबच लांब रांगा रहाणे हे मोदींचे अपयश नसून, काही शाखेतील कर्मचाऱ्यांची नियोजनाची बेजबाबदार वृत्ती म्हणू शकतो, हे मी उदाहरणाने सांगू शकतो.
काही शाखेत 10 तारखेला 10 वाजता नोटा वाटप सुरु झाले, एकूण किती लाखाच्या नोटा त्या शाखेत सरकारने दिल्या आहेत, या वरून तेथील प्रबंधक नोटा बदलीसाठी लागलेल्या रांगेतील अंदाजे किती लोकांना नोटा मिळतील, हे सांगून इतरांना दुसऱ्या दिवशी येण्यास सांगू शकले असते, व लोकांची ससेहोलपट थांबवू शकले असते. 12.30 ला कॅश संपली व मी प्रबंधकाना 1 वाजता, कधी कॅश येणार असे विचारल्यावर, त्यांनी 4 वाजता येईल असे उत्तर दिले, हेच त्यांनी रांगेतील लोकांना सांगितले असते तर लोक घरी निघून गेले असते. मी केबिन बाहेर येऊन लोकांना असे सांगितले, तशी गर्दी ओसरू लागली. या मुळे फक्त पैसे भरणारे लोकच बँकेत थांबले, आणि गर्दी आटोक्यात राहिली. जे काम व्यवस्थापकाचे होते, ते मला करावे लागले. काही शाखेत दोन चार महिन्यात रिटायर होणारे कर्मचारी नोटा बदलण्यासाठी नियुक्त केले, त्यांना फक्त एक बोटाने किबोर्ड चालवता येत होता, त्यामुळे चार हजार बदलीसाठी प्रती व्यक्ती अंदाजे 5 मिनिटे खर्ची होत होती, जे काम 23-25 वयाच्या व्यक्तीला दिले असते तर अडीच मिनिटात झाले असते, व रांगा लवकर संपल्या असत्या.
काही मोजक्याच बँक शाखेत खूप चांगले चित्र होते, रांगेतील लोकांना पाणी, चहा वाटप करण्यात आले. कर्मचारी वर्ग अदबीने वागत होता, तसेच जेष्ठ नागरिकांना मदत दिली जात होती. नोटा बदलण्याचा वेग हि अपेक्षित असा चांगलाच होता.
असे छोटे छोटे निर्णय घेतले असते तर, टीव्ही वर बातम्यात दिसणाऱ्या लांबच लांब रांगा दिसल्या नसत्या, लोकांची छळणूक झाली नसती, व विरोधी नेत्यांची ओरड दिसली नसती. अश्या बाळबोध युक्त्या अमलात आणल्या असत्या तर, नाहक काही लोकांचा बळी गेला नसता.
-- विजय लिमये
November 29, 2016
रंगांसंबंधी आपण गेल्या तीन लेखांद्वारे माहिती घेतली. या लेखात आपण सत्तावीस नक्षत्रांपैकी पहिल्या क्रमांकाचे नक्षत्र “अश्विनी”याचा मानवी जीवनावर कसा परिणाम होत असतो त्यावर माहिती मिळवु.
ह्या नक्षत्रावर ज्या व्यक्तिचा जन्म झालेला असेल त्या व्यक्तिने दैनंदिन व्यवहारात कोणकोणत्या बाबींचा विचार केल्यास अधिक सकारात्मक तसेच होकारात्मक वातावरण तयार होऊन स्वतःच्या कामांना अधिक गतिमान करता याचा विचार करावा…!!
September 14, 2018
सिंगापूर हुन येताना श्रीलंकेच्या गॅले बंदरावर क्रु चेंज साठी अर्धा तास थांबून जहाज सौदी अरेबियाच्या बंदरावर निघालं होतं. पहिल्यांदाच 1 लाख टनापेक्षा जास्त कार्गो नेणाऱ्या तेलवाहू जहाजावर जॉईन झालो होतो. यापूर्वीची जहाजे 35 ते 40 हजार टन क्षमतेची होती. त्यांची लांबी 180 मीटर असायची पण आताच्या जहाजाची लांबी 250 मीटर पेक्षा जास्त होती तसेच उंची आणि रुंदी सुद्धा खूपच जास्त होती. एवढ्या मोठ्या जहाजाच्या इंजिन, इतर मशिनरी तसेच पंपिंग सिस्टीम वर यापूर्वी कामाचा अनुभव नव्हता.
October 19, 2019
संपूर्ण “खेल खेल में ” महाविद्यालयीन जोशाने भरलेला ! हा, नीतू आणि राकेश रोशन – रॅगिंग , स्टेजवरील धमाका , थोडीशी रहस्य फोडणी , ” आजा मेरी बाहो में आ ” वाली अरुणा . बाहेर आलो तेव्हा खऱ्या अर्थाने तरुण झाल्यासारखं वाटलं.
May 7, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti