(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • तुकारामांच्या अभंगांचं गारूड

    तुकारामांचं व्यक्तित्त्व अंतर्मुख होतं. वाचन-मनन-चिंतन परिशीलन हा त्यांचा स्व-भाव होता. म्हणूनच त्यांच्या अभंगांना सुभाषितांची कळा लाभली आहे. कथा-कीर्तन-प्रवचनांप्रमाणे या अभंगांचा सर्रास प्रयोग केला जातो. साध्यासुध्या या अभंगांचा सर्रास प्रयोग केला जातो.

      September 1, 2022


  • बोलीभाषेची कुचेष्टा करूं नका

    प्रमाण, लिखित भाषा वेगळी आणि बोली भाषा वेगळी. आपलीच बोली शुद्ध आणि त्यांची (म्हणजे नक्की कोणा कोणाची आणि कुठली कुठली) अशुद्ध, हे असं कसं ? नुकसान, नुसकान कीं लुस्कान ? चिकटवणे कीं चिटकवणे ? बादली कीं बालदी ? यांतलं शुद्ध अशुद्ध आपण कोण ठरवणार ? आपल्याला तो अधिकार आहे कां ?

      October 14, 2019


  • सिंधुदुर्गातले सुपुत्र – “बाबी कलिंगण”

    दळणवळणाची अपुरी साधने आणि शेतीवर पोट असलेल्या या कलावंतांने अखेरपर्यंत कलेची कास सोडली नाही. काही वर्षांपूर्वीच पडद्याआड गेलेले बाबी नालंग आणि बाबी कलिंगण हे दोन दशावतारी कलेचे शिलेदार होते. “श्री. बाबी कलिंगण यांना राज्यस्तरीय लोककला पुरस्काराने गौरविण्यात आले होते “.सिंधुदूर्गात दशावतारी म्हणजे ” रात्री राजा आणि सकाळी कपाळावर बोजा ” अशी स्थिती एके काळी होती. त्या वेळपासून लोककलेची सेवा हाच परमधर्म असे समजून हा कलाकार राबला त्याची शासनाने दखल घेतली हे बरं झालं.

      September 21, 2017


  • श्री आनंद लहरी – भाग ८

    मानवी जीवनात प्राप्तव्य अशा चार अत्यंत श्रेष्ठ गोष्टींना पुरुषार्थ असे म्हणतात. अर्थ म्हणजे मिळवण्याची गोष्ट. पुरुष अर्थात जीवाने मिळवण्याच्या या चार गोष्टी. धर्म-अर्थ-काम-मोक्ष अशा या चारही पुरुषार्थांना प्रदान करणाऱ्या आई जगदंबेचे वैभव आचार्यश्री या श्लोकात वर्णन करीत आहेत.

      February 12, 2020


  • सरकारी कर्मचाऱ्याची संघटित दादागिरी!

    आपला देश तसा अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे, अर्थात ही गौरवाची बाब आहे की खेदाची हा वेगळ्या चर्चेचा विषय होऊ शकेल, परंतु केवळ आपल्या देशाची म्हणून अशी अनेक खास वैशिष्ट्ये आहेत, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. त्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे जागोजागी उभ्या असलेल्या, उभ्या होणाऱ्या संघटना. हा देश संघटनांचा देश आहे.

      March 25, 2007


  • डी. बी. के. रेल्वे प्रकल्प

    हा रेल्वे मार्ग बांधणी म्हणजे इंजीनियरिंगचा एक पराक्रम म्हणून त्याकडे पाहिले जाते. रेल्वेने १९६३ च्या सुमारास या खडतर विभागातून ११० किमी अंतराची कठिण रेल्वे लाईन बांधली. समुद्रसपाटी पासून सुरु होणारा हा मार्ग अनंतगिरी घाटमार्ग पार करत अराकू हिल स्टेशन पर्यंत गेलेला आहे.

      January 3, 2019


  • आज १८ मार्च – जागतिक निद्रा दिवस

    आज १८ मार्च – जागतिक निद्रा दिवस

    दरवर्षी १८ मार्च हा दिवस ‘जागतिक निद्रा दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी निद्रेविषयी आजारांची जनजागृती करण्यात येते. झोप न लागणे हा आजार आहे, याविषयी सामान्य जनता अनभिज्ञच आहे. त्यामुळे झोप न येणाऱ्या एकूण व्यक्तींपैकी फक्त एकचतुर्थांश व्यक्तीच झोप येत नसल्यामुळे डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेतात. सर्व शारीरिक क्रियांप्रमाणेच झोप ही क्रियादेखील अत्यंत महत्त्वाची आहे. झोपेमुळे शरीराचे कार्य चांगल्या पद्धतीने होण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने ६ ते ९ तास झोपणे आवश्यक असल्याचे अनेक मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर सांगतात. स्लीप हायजिन’ पाळणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. प्रत्येक मानवी शरीरात घड्याळ (बायोलॉजिकल क्लॉक) असते. हे घड्याळ सूर्योदय आणि सूर्यास्ताप्रमाणे सुरू असते. त्यामुळे सूर्योदयापूर्वी उठणे आणि सूर्यास्त झाल्यावर झोपणे ही शरीराची शिस्त आहे. त्यामुळे सकाळपासून सायंकाळपर्यंत शरीर विशिष्ट रसायने तयार करीत असते. त्यामुळे व्यक्ती जागी राहू शकते. सूर्यास्तानंतर शरीरातील विशिष्ट रसायने कमी झाल्याने झोप येऊ लागते. पण, कृत्रिम प्रकाशामुळे रात्री उशिरापर्यंत जागण्याची सवय स्वत:च शरीराला लावल्याने अन्य आजारांना निमंत्रण मिळू शकते. रसायन प्रक्रिया बिघडल्याने शरीरावर परिणाम होत असतो. काही महिन्यांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने शांत, पूर्ण वेळ, चांगली झोप हा मूलभूत अधिकार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे झोपेकडे योग्य लक्ष द्यावे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

    हल्ली व्हॉट्सअप, फेसबुकसह विविध समाजमाध्यमांनी तरुणांसह सर्वच वयोगटातील नागरिकांना आपल्या कवेत घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत ही माध्यमे सोबत बाळगल्याने रात्रीच्या झोपेवर त्याचा दुष्परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे. रात्री उशिरा झोपणे, सकाळी उशिरा उठणे, झोप अपुरी झाली तर दिवसभर आळसावणे, असे हे चक्र सलग पाच ते सात वर्षे राहिल्यास मधुमेह, रक्तदाबासह विविध आजाराचा गंभीर धोका ‘आ’ वासून आपल्यासमोर उभा राहणार हे एका अभ्यासातून पुढे आले आहे. प्रत्येक माणसाला रात्री किमान ८ तासांची गुणात्मक झोप आवश्यक असते. अशी झोप मिळाली नाही तर मधुमेह, रक्तदाब, यासह कर्करोगासारखे बरेच आजार जडण्याची शक्यता असल्याचे विविध अभ्यासातून पुढे आले आहे. जगभरात ३५ ते ४५ टक्के नागरिकांना निद्रानाशाचा आजार आहे. आपल्या झोपेच्या चार अवस्था असतात.

    त्यात रेम अवस्था महत्त्वाची असून १, २, ३ आणि रेम या चारही अवस्थेचे चक्र ९० मिनिटांचे असते. एक व्यक्ती सरासरी ६ तास झोपली तर तिच्या झोपेची चार चक्र पूर्ण होतात. रेम अवस्थेत मेंदूतल्या पेशी उत्तेजित होतात. या अवस्थेत जिथे गरज आहे, तिथल्या भागात मेंदूची दुरुस्ती होते, परंतु हल्ली रात्री तरुण पिढीमध्ये व्हॉट्सअप, फेसबुकसह समाज माध्यमांचा वापर वाढला असून त्यामुळे त्यांच्या झोपेवर विपरीत परिणाम होत आहे. भारतात मध्यरात्री १२ ते ३ वाजेपर्यंत सर्वात जास्त गाढ झोपेची वेळ असते. यावेळी मेंदूत मिलॅटोनीम हार्मोन्सचे प्रमाण वाढते. या हार्मोन्समुळे झोप येते. या मिलॅटोनीमचा संबंध सूर्याशी असतो. सूर्यास्त झाल्यावर हे हार्मोन्स मेंदूत सक्रिय होतात, परंतु रात्री व्हॉट्सअप, फेसबुकचा जास्त वापर करणाऱ्यांमध्ये हे हार्मोन्स तयार होण्याचे प्रमाण मंदावलेले असते. साहजिकच अशा व्यक्तींमध्ये हळूहळू निद्रानाशाचा आजार बळावू लागतो आणि हेच चक्र सातत्याने पाच ते सात वर्षे सुरू राहिल्यास रक्तदाब, हृदय, कर्करोगासह सगळेच आजार बळकावण्याचा धोकाही वाढतो. शालेय विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक स्पर्धा वाढली आहे. त्यांच्या शाळा, शिकवण्या याबरोबरच वाढलेल्या अभ्यासक्रमांमुळे त्यांची जीवनशैलीही बदलली आहे. तेव्हा या मुलांमध्ये निद्रानाशाचा आजार लहानपणीच सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

    झोपेची सायकल म्हणजे?

    झोपेच्या चार अवस्था असतात. त्यात रेम अवस्था महत्त्वाची असते. १,२,३ आणि रेम अशा ४ अवस्थांची एक सायकल होते. ही सायकल ९० मिनिटांची असते. पहिल्या ३ अवस्था ७० मिनिटांच्या आणि रेमची अवस्था वीस मिनिटांची असते. एक व्यक्ती जर सरासरी ६ तास झोपेल तर ४ सायकल पूर्ण होतात. रेम अवस्थेत मेंदूतल्या पेशी चार्ज होतात. जिथे गरज आहे, तिथल्या भागात या अवस्थेत मेंदू दुरुस्ती करतो. ही तंदुरुस्तीची नैसर्गिक प्रक्रिया खंडित होते. त्यामुळे आजार बळावततात, असे झोपेचे वैद्यकशास्त्र म्हणते. प्रत्येकाने किमान आठ तासांची आणि वयाची पन्नासी गाठलेल्यांनी किमान साडेसात तासांची झोप घेणे महत्त्वाचे आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      March 18, 2017


  • मडेलिना सेरसूओलो दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

    मडेलीना चा जन्म 2 फेब्रुवारी 1920 रोजी नेपल्स इटली येथे एका मध्यमवर्गीय कामगारांच्या पोटी झाला.तिचे वडील कारलो कूक होते. ते एका कंपनीत काम करत होते ती कंपनी बंड पडली. त्यानंतर त्यानी स्वताचे पिझ्झाचे दुकान काढले. जेव्हा दुसरे महायुद्ध सुरू झाले तेव्हा मडेलिना एका बुटांच्या कंपनीत काम करत होती.

      December 22, 2022


  • टिप्पणी – इच्छामरण

    बातमी : डच गव्हर्नमेंट पासेस् अ लॉ फॉर असिस्टेड डेथ् फॉर दि हेल्दी

    संदर्भ – हल्लीहल्लीची, पाश्चिमात्य देशातील एका टी.व्ही. चॅनलवरील बातमी.

    • आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भारतात आत्महत्या हा एक गुन्हा मानला जातो. कांहीं काळापूर्वी सरकारनें Euthanasia म्हणजेच दयामरण या विषयावर मतें मागवली होती. ( याविषयी मी सरकारला पाठवलेला माझा, ‘Dayamaran and Ichchhamaran’ हा इंग्रजी लेख, जिज्ञासूंनी माझी वेबसाईट www.subhashsnaik.com येथें वाचावा ).
    • थोडक्यात मुद्दा असा आहे की, दयामरण हे त्या पेशंट्स् साठी असतें जे terminal disease ने पीडित असतात, व / किंवा brain-dead असतात. पण मुख्य गोष्ट अशी की, माणूस हा एक thinking animal आहे, आणि म्हणून स्वत:च्या जीवितावर व मरणावर त्याचा अधिकार असायला हवा. म्हणजें, दयामरण तर हवेंच,पण इच्छामरण मान्य असणारा कायदाही अस्तित्वात यायला हवा.
    • जे लोक acutely depressed असतात व आत्महत्येचा प्रयत्न करतात, त्यांची गोष्ट वेगळी ; ती चर्चा इथें अभिप्रेत नाहीं. त्यांना psychiatrist च्या मदतीची आवश्यकता आहे. ( म्हणून, सरकारनें आता पूर्वीचा, आत्महत्या हा गुन्हा असण्याचा , कायदा बदलला, हें स्तुत्यच आहे) .
    • पण आपण मुख्यत्वें बोलत आहोत अशा लोकांबद्दल जे वृद्ध आहेत , आणि ज्यांना dignified death ची इच्छा आहे. असें इच्छामरण त्यांच्या स्वत:च्या हातात असायला हवें. ती आत्महत्या नाहीं, व गुन्हा तर नाहींच नाहीं. कायदा त्याला ‘बेकायदेशीर’ भले ही म्हणो, पण तें कृत्य अनैतिक (immoral) खासच नाहीं.
    • महाभारतातील भीष्मांना इच्छामरणाचा वरच मिळालेला होता. भीष्मांनी, पालनासाठी महाकठीण अशी प्रतिज्ञा केली होती, फार मोठा त्याग केला होता ; म्हणून त्यांना इच्छामरणाचा वर मिळाला. यावरून, अगदी पुरातन काळापासून इच्छामरणाला भारतीय संस्कृतीत असलेला उच्चकोटीचा सन्मान व महत्व आपल्या ध्यानात येतें.
    • तसेंच, भारतीय संस्कृतीत इच्छामरणासाठी प्रायोपवेशन, संथारा असे पर्याय गेली अनेक शतकें उपलब्ध आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर, आचार्य विनोबा भावे यांनी प्रायोपवेशन केलें होतें, व त्यांच्या या कृत्याबद्दल अतिशय आदरानें बोललें जातें. कांहीं जैन मुनी संथारा करतात, व तेंही अतिश्रेष्ठ मरण मानलें जातें. हल्लीच एक मुनी असा संथार करत होते. (म्हणूनच, संथारा म्हणजे आत्महत्या नाहीं व त्याला परवानगी दिली जावी, यासाठी कांहीं जैन संघटनांनी सुप्रीम कोर्टात केस दाखल केलेली आहे).
    • इच्छामरण स्वीकारणार्‍या व्यक्ती थोर होत्या हें खरेंच ; पण माझ्या माहितीत अशीही उदाहरणें आहेत जिथें ‘तथाकथित सामान्य’ व्यक्तींनी प्रायोपवेशन अथवा संथारा केलेला आहे ; किंवा असें कांहींही ‘फॉर्मल’ नांव न देतां अन्न व नंतर पाणीही वर्ज्य करून, dignified, सन्माननीय, मरण स्वीकारलेलें

    आहे ; जसें की, माझ्या घरासमोर रहाणार्‍या जैन गृहस्थाचा काका, माझ्या एका मित्राचे सासरे, माझ्या

    पत्नीचे ज्येष्ठ चुलतभाऊ.

    ( मी या लोकांना ‘तथाकथित सामान्य’ असें म्हणालो, कारण स्वहस्तें विचारपूर्वक मरण स्वीकारणारी व्यक्ती ‘साधारण’ असूंच शकत नाहीं ). Kudos to them !

    • मला या ठिकाणी, माझी स्वत:ची दिवंगत पत्नी डॉ. स्नेहलता हिचेंही उदाहरण द्यावेसें वाटतें. २०१४ मध्ये तिला कॅन्सर डिटेक्ट झाला तेव्हां रोगाचें मेटास्टॅसिस झालेलें होतें, व रोग ‘स्टेज ४’ मध्ये गेलेला होता. स्नेहलतानें मानसशास्त्रात पीएच्. डी. केलेलें असल्यामुळे म्हणा, किंवा मन खंबीर असल्यामुळे म्हणा, अथवा दृष्टिकोन अतिशय प्रॅक्टिकल असल्यामुळे म्हणा, किंवा गेली अनेक वर्षें एकूणच तिचें मत इच्छामरणाच्या बाजूनें होतें, म्हणून म्हणा, पण स्वत:ला हा रोग झाल्याची बातमी आणि रोगाची सीरियस लेव्हल कळल्यापासूनच तिनें आपल्या भावी मृत्यूचा अगदी सहजपणें स्वीकार केला होता. Hats off !

    त्यामुळे, कांहीं महिन्यांनंतर जेव्हां तिचा रोग अधिक बळावला, शक्ती कमी कमी होऊं लागली, थोडेंफार परावलंबित्व येऊं लागलें , तेव्हां तिनें शांतपणें डॉक्टरांकडे पृच्छा केली की, सहजपणें क्षणार्धात पेशंटला वेदनारहित मरण येईल असा कांहीं उपाय डॉक्टरांकडे असतो कां ? आणि, हें संभाषण तिनें अतिशय संतुलितपणें आणि विचारपूर्वक केलें. तिचा प्रश्न ऐकून डॉक्टर किंकर्तव्यमूढ झाले, काय बोलावें तें क्षणभर त्यांना सुचेना.

    मला जरी भावनिक पातळीवर तिच्या प्रश्नानें बेचैन केलें , तरी बौद्धिक पातळीवर मला आश्चर्य वाटलें नाहीं, कारण तिचें गेल्या अनेक वर्षांपासूनचें याबद्दलचें मत मला माहीत होतें. ( आणि, इच्छामरणाच्या बाबतीत माझेंही मत स्नेहलतासारखेंच आहे, त्यामुळे, तिचे विचार मी समजून घेऊं शकलो).

    अर्थातच, डॉक्टर या विषयात कांहींही करूं शकत नव्हते, ते केवळ रोग contain करण्याचा (विफल ) प्रयत्न करूं शकत होते, आणि तो प्रयत्न त्यांनी अखेरपर्यंत केलाही.

    स्नेहलताचें भाग्य थोर की तिला खितपत न पडतां, त्रास न होतां, अल्पावधीत मरण आलें. ती bed-ridden झाली नाहीं, धरून-कां-होईना पण चालूं शकत होती, शेवटपर्यंत बोलत होती, आणि अखेरच्या दिवशीही तिची विनोदबुद्धी शाबूत होती.

    स्नेहलताला नैसर्गिकरीत्या ‘इच्छामरण’ प्राप्त झाले कां, मला माहीत नाहीं. पण, ज्या रात्रीं ती गेली, त्या दिवशी सकाळीच तिनें मला, ‘मी चालले आहे’ असें सांगितलें होतें .

    ( त्या वेळी , तिच्या विधानाची सीरियसनेस मला कळली नाहीं, याबद्दल मला आतां कायमच खंत वाटते ; कारण , नाहीतर मी नक्कीच तिच्या अखेरच्या दिवशी अधिक वेळ तिच्या सोबत घालवला असता !)

    मात्र, स्नेहलतामुळे मला वारंवार, इच्छामरणाच्या विषयाची आठवण येत असते, हें खरें.

    • भारतात अजून इच्छामरणाचा कायदा झालेला नाहीं. मात्र, हॉलंडमध्ये तसा कायदा केला गेला ही फार चांगली गोष्ट आहे. ( अर्थात्, त्या सरकारनें त्या कृत्यासाठी कांहीं सेफगार्डस् निर्माण केले असतीलच. तें ठीकच आहे ).

    हॉलंडबद्दलची बातमी वाचून मला, या प्रगतीबद्दल आनंद तर वाटलाच ; पण टर्मिनल-डिझीझ नसतांनाही मरणेच्छा करणार्‍यांना आतां इच्छामरणासाठी नुसती संमतीच नाहीं, तर, मदतही प्राप्त होऊं शकेल, असा कायदा करणार्‍या सरकारबद्दल ( म्हणजेच, जनतेनें निवडून दिलेल्या रिप्रेझेंटेटिव्हज् बद्दल ) मला अतीव आदर वाटतो आहे. त्या सरकारच्या या कृतीवरून आपल्याला डच जनतेची सांस्कृतिक maturity, विचारांचा पुढारलेपणा आणि बुद्धिवादी वृत्ती दिसून येते.

    • अखेरीस असें आहे की, वृद्धत्वामुळे म्हणा, किंवा दुर्धर व्याधीमुळे म्हणा, किंवा कांहीं अन्य कारणामुळें म्हणा, जर एखाद्या व्यक्तीला सन्मानपूर्वक-मरण हवें असेल, तर निश्चितच तो त्या व्यक्तीचा अधिकार आहे , व त्या व्यक्तीला डिग्निफाइड मृत्यू स्वीकारूं देणें यासारखें दुसरें सत्कृत्य नाहीं.

    + + +

    -- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik

    सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.

    Ph- Res- (022)-26105365. M – 9869002126

    eMail : vistainfin@yahoo.co.in

    Website : www.subhashsnaik.com,

    www.snehalatanaik.com.

      October 27, 2016


  • लोकमान्य टिळक, भाऊ रंगारी आणि गणेशोत्सव

    हल्लीचा जो hot topic आहे तो म्हणजे गणेशोत्सव कुणी साजरा करायला सुरुवात केली…?? एक- दोन पुस्तकात श्री. भाऊ रंगारी यांचा उल्लेख मिळतो की श्री. भाऊ रंगारी यांनी सुरुवात केली तर काही इंग्रजी लेखकांच्या पुस्तकात श्री. लोकमान्य टिळक यांनी या उत्सवाची सुरुवात केली असे लिहिलेले आढळून येते. इथे जर पाहायला गेलो तर श्री. भाऊ रंगारी यांचा असा उद्देश कुठेही दिसत नाही की या उत्सवाला लोकचळवळीचे स्वरूप द्यायचे म्हणून त्यामुळे फार फार तर घरातल्या गणपतीला दारात आणून बसवला असे या कृतीचे वर्णन करता येईल.

      August 29, 2017