(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • श्रद्धा असावी पण ती अंधश्रद्धा होऊ नये !

    त्याची पत्रिका मी माझ्या पद्धतीने पाहिल्यावर माझ्या लक्षात आले त्याचा जन्म सत्तावीस नक्षत्रातील सर्वात विषारी समजल्या जाणाऱ्या आश्लेषा नक्षत्रात झालेला होता त्यामुळेच त्याच्यावर हे आकस्मित संकट ओढावले होते त्याला निमित्त मात्र त्याच्या वडिलांचे बिडी पिणे आणि त्यामुळे झालेला कर्करोग होता भविष्य कोणालाही टाळता अथवा बदलता येत नाही ज्योतिष शास्त्रामुळे फक्त त्याचा अंदाज घेता येऊ शकतो इतकंच …

      July 3, 2017


  • कुठलंही काम, तुमच्या जीवापेक्षा मोठं नाही

    तुमच्या आयुष्यासाठी नोकऱ्या, आहेत, त्यांच्यासाठी तुमचं आयुष्य नाही.
    कृपा करून जमेल व झेपेल एवढंच काम हातात घ्या; त्यासाठी आग्रह धरा.
    प्रतिष्ठा, पोस्ट, वाढत्या पगाराच्या नादाने किंवा वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याच्या हव्यासाने न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊ नका.
    खर्च आटोपशीर ठेवा.
    तुमच्या जीवापेक्षा मौल्यवान काहीही नाही, याचं भान ठेवा.
    कुटुंबाला वेळ द्या. घरच्या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम कामावर होतो आणि घरचं आनंदी वातावरण कामासाठी प्रोत्साहन देते.
    स्वतःवर स्वतःच मर्यादा घालून घ्या. ही भयानक स्पर्धा कधीही न संपणारी आहे. तुम्ही कुठं थांबायचं हे तुम्ही ठरवा.
    कितीही ताण असला, कुठलीही परिस्थिती ओढवली तरी घरी नीट समजावून सांगा.
    तुमच्या जीवापेक्षा त्यांनाही अधिक काही नाही, याबद्दल खात्री बाळगा.
    ज्यांच्या सगळ्या आशा-अपेक्षा तुमच्यावर आहेत ते आई-वडील, जीवनभराच्या साथीची अपेक्षा करणारी बायको आणि ज्यांना तुमचा हात धरून आपली चिमुकली पावलं टाकायची आहेत ते चिमणे जीव यांना तुमची नितांत गरज आहे याची जाणीव ठेवा.

    हे सगळं सगळ्यांनाच माहिती असतं. तरीही आपण धावतो- ऊर फुटेस्तोवर आणि एक दिवस हातात काहीच उरत नाही....
    त्यासाठी तुम्ही दीर्घायुषी, निरोगी आणि आनंदी राहणं गरजेचं आहे. तणाव नियोजनासाठी तुमच्या आवडी-निवडी जपा, स्वतःसाठी थोडातरी वेळ काढा.
    संगीत, व्यायाम, योगासने, वाचन इ. चा उपयोग करा.
    सुट्टीचा आनंद आपल्या प्रियजनांसोबत लुटा...

    सर्वेपि सुखिनः सन्तु।
    सर्वे सन्तु निरामयः।
    सर्वे भद्राणि पश्यन्तु।
    मा कश्चिद दुःख माप्नुयात॥

    आज ७ एप्रिल,
    जागतिक आरोग्य दिन…
    आपण आणि आपल्या प्रियजनांना निरोगी व आनंदी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा…!

      April 7, 2017


  • सत्य ठरलेलं स्वप्न – कोकण रेल्वे – भाग एक 

    अवघ्या कोकणवासीयांचं स्वप्न असलेला ‘कोकण रेल्वे’ हा स्वतंत्र भारतातला ‘भारतीय रेल्वे’चा सर्वांत लांब, बांधण्यास महाकठीण असलेला प्रकल्प होता. या बांधणीचं दिव्य स्वप्न ३० ते ३५ वर्ष कागदावरच धूळ खात पडलं होतं. १९९० च्या सुमाराला भारतीय रेल्वेच्या आधिपत्याखाली ‘कोकण रेल्वे बोर्ड’ ही एक स्वायत्त कंपनी स्थापन झाली. कोकण रेल्वे हा भारतानं संपूर्णपणे स्वत:चं तंत्रज्ञान वापरून बांधलेला सर्वांत मोठा प्रकल्प आहे.

      June 15, 2022


  • विजयआनंद उर्फ गोल्डी यांचा ज्वेलथीफ

    विजयआनंद उर्फ गोल्डी यांचा ज्वेलथीफ हा सर्वकालीन सर्वोत्तम रहस्यपट २७ ऑक्टोबर १९६७ रोजी प्रदर्शित झाला. देव आनंद यांच्या कारकिर्दीतील हा सर्वोत्तम रहस्यरंजक चित्रपट म्हणून ओळखला जातो. या चित्रपटाची जादू आजही कायम आहे.

      November 4, 2022


  • श्री गणेशाला दूर्वा वहाण्याचे कारण आणि पद्धत !

    गणपतीला दूर्वाच का वाहतात? आणि त्या कशा वहाव्या ?

      July 8, 2017


  • ऐन तारुण्यात हार्ट अटॅक येण्याची कारणे

    बऱ्याच वेळेला पेपरचं पान उघडलं की कोणाच्या तरी अचानक मृत्यूची बातमी आपलं लक्ष वेधून घेते. इतक्या लहान वयात असं कसं झालं? नुकतंच लग्न झालं होतं. लहान मुलं देखील आहेत, आता त्यांचं कसं होणार? यासारख्या विचारांनी त्याच्या कुटुंबियांबद्दल आपल्या प्रत्येकाच्या मनात एक सहानुभूतीची भावना निर्माण होते. त्याच्या जागी आपणही असू शकतो या जाणिवेने एक थंड शिरशिरी डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला अक्षरशः थिजवून जाते. एखाद्या दिवशी ऑफिसला गेल्यानंतर घरी परत येऊ का? असा अपशकुनी विचारही मनात येऊन जातो. नेमका काय हा प्रकार आहे?

      June 2, 2019


  • मजेमजेचे खेळ

    आज हे खेळ राहिले नाहीत. . . कुठेच. मुलांच्या बालपणातही दडपणाने शिरकाव केलेला आहे. टिव्ही, मोबाईल, गेम याकडे आकर्षित झाली आहेत मुले. खूप हुशार असलेली ही पिढी मात्र प्रचंड तणावाखाली दिसत आहे. यांना भरकटत जाण्या अगोदर त्यांच्यातल्या सर्जनशीलतेला समृद्ध करण्यासाठी जाणीव पूर्वक भयमुक्त वातावरण निर्मितीची आवश्यकता आहे. . .

      May 3, 2021


  • सशस्त्रसेना ध्वज दिन

    ‘हिमालयाच्या शिखरावरूनी सांगू जगाला सा-या गर्जुनी। खबरदार जर इथे याल, तर सांडतील रक्ताचे सागर’, अशी गर्जना करीत तळहातावर शिर घेऊन झुंजणा-या सैनिकांना आदरांजली वाहण्याचा आजचा दिवस. घरादाराला आणि आप्तस्वकीयांना दूर सारून देशासाठी, स्वबांधवांच्या रक्षणासाठी कोसळत्या पावसात आणि गोठविणा-या थंडीत लढणा-या सा-या लढवय्यांचाच आज स्मरणदिन.

    आजच्या ध्वजदिनाच्या निमित्ताने त्या सर्व वीरांचा स्मृतिदिन. राष्ट्राच्या स्वातंत्र्य रक्षणार्थ रणांगणात देह ठेवणा-या वीरांच्या स्मृती जागत्या ठेवण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सढळ हाताने मदत करणे, हे त्यांचे.. आपले, सर्वाचे कर्तव्यच आहे. आज जमा होणारा निधी म्हणजे त्या नरवीरांना आदरांजली वाहण्याचीच एक संधी आहे. म्हणूनच आज एका व्यक्तीचा नाही, तर देशरक्षणार्थ आपल्या प्राणांची कुरवंडी करणा-या सा-या वीरपुत्रांचाच स्मृतिदिन. त्या वीरमरण पत्करलेल्या वीरांचे स्मरण करून आजही आपले सैनिक म्हणताहेत, ‘शिंग फुंकिले रणी, वाजतात चौघडे। सज्ज व्हा उठा चला, सैन्य चालले पुढे।।’

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

      December 7, 2021


  • नो स्मोकिंग डे

    वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या (WHO) मते धूम्रपान आणि तंबाखूमुळे दरवर्षी 7 दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो.

      March 9, 2022


  • झांझीबारवासियांची लाडली ‘डालाडाला’

    जगभरच्या सरकारने प्रवासी-सेवा ताब्यात घेतल्या. मात्र सरकारी व्यवस्थापनातली गलथानता अनुभवल्यावर ओरड सुरू झाली. ‘‘सरकारकडे प्रशासनाचे व कायदा-कानूच्या अंमलबजावणीचे काम करण्याऐवजी बस आणि आगगाड्या चालवायच्या फंदात कशाला पडायचं? खाजगीकरणामुळे सरकारी अंमलाचे घुमजाव युग आले.

      December 9, 2023