(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जरा हसून पाहा !

    आपण पाहातो, अनुभवतो की मानसिक ताणतणावामुळे प्रथम मनाचं आणि नंतर शरीराचं आरोग्य धोक्यात येतं. कारण ताणतणाव हे मानसिक अनारोग्याचं लक्षण आहे. एकदा अंतरंगातच बिघाड झाला तर त्याचे विपरीत परिणाम शरीरावर दिसायला कितीसा वेळ लागणार?

    मग या ताणतणावाच्या अगदी विरुद्ध क्रिया केली तर? आपलंच शरीर आणि मन. त्यात दोन वेगवेगळ्या भावनांच्या प्रभावाने जर दोन वेगळे परिणाम मिळणार असतील तर?

    आपणच आपले डॉक्टर व्हायला काय हरकत आहे?

    ताणतणावामुळे जर सगळंच बिघडत असेल तर जरा हसून पाहा काय होतं ते !

      March 15, 2016


  • बेरियम टेस्ट

    हे फोटो काढण्यास क्ष किरण तज्ञांना आधी भेटणे जरुरीचे आहे कारण यासाठी पुन्हा उपाशी पोटी जावे लागते. व आदल्या दिवशी जुलाबाचे औषधही घ्यावे लागते. जर बेरियम टेस्ट फक्त पोटासाठी (स्टमक, ड्युओडेनम) असले तर फक्त १५ मिनिटेच लागतात व यात स्पेशल डबल कॉंन्ट्रास्ट स्टडी म्हणजे हवा व बेरियम मिश्रण करुन पोटाचे अल्सरसाठी फोटो काढले जातात.

      September 9, 2010


  • जातीयवाद आणि अस्पृश्यतेला मुठमाती

    हल्ली वर्तमानपत्रात महिन्यातून एक-दोन तरी ठळक बातम्या येतात की जातीबाह्य विवाह केला म्हणून तसा विवाह करणाऱ्या मुला-मुलीला जिवंत जाळलं, ठार मारलं किंया मग त्या संपूर्ण कुटूंबाची लहान-मोठं न बघता जाहीर विटंबना केली..

      April 22, 2016


  • ऊन्हाळा ईतका तीव्र का होतोय

    मादागास्कर येथून भारतात आलेल्या गुलमोहराने, ऑॅस्ट्रेलियातून भारतात आणल्या गेलेल्या निलगिरी, १९७२ साली आयात केलेल्या गव्हा ( मिबलो ) बरोबर भारतात आलेली सुबाभूळ, पेल्ट्रोफोरम, अकेशिया, स्पॅथोडिया, कॅशिया, ग्लिरिसिडीया, फायकस, सप्तपर्णी, रेन ट्री या झाडांनी आज हजारो एकरांवर डेरा जमवून आपल्या आम्लयुक्त पानांमुळे आपल्या आसपासची जमीन नापीक केली आहे.

      June 9, 2026


  • याला जीवन ऐसे नाव भाग ३९

    प्रशंसनीय पाणी भाग चार

    आपण म्हणता, पाणी कमी प्यायचे, पण.....
    काही जणांना शंका येतेय, आम्हाला मुतखड्याचा त्रास आहे, मग काय करायचे ?
    आम्हाला उष्णतेचा त्रास आहे मग आम्ही काय करायचे ?

    हो. नक्कीच पाणी गरजेप्रमाणे प्यायचे. धने जिरे घातलेले पाणी, गोड ताजे ताक, पिकलेल्या नारळाचे पाणी, बारली धान्याचे पाणी, लाह्या शिजवलेली खीर, वेगवेगळी सरबते, रसदार फळे, इ. अनेक उत्तम पदार्थ आपल्या देशात उपलब्ध आहेत.
    आणि हे पर्याय सुद्धा लिमिटेडच प्यायचे हा. नाहीतर याचेच अजीर्ण व्हायचे. म्हणून वैद्याच्या सल्ल्यानेच हे वापरले तर अधिक चांगले !

    उष्णता किंवा मुतखड्यासाठी कोल्ड्रींक्स पिणे किंवा बियर मारणे(?) ही कल्पना अभारतीय आहे. जिथे ऋतुनुसार बाराही महिने फळे मिळतील, अशा भारतात विषारी कार्बन डाय ऑक्साईड घातलेली पेय किंवा मद्यार्क अक्षरशः ढोसली जाताहेत, यापेक्षा दुर्दैव ते काय ? प्यायचंय ते पाणी. कोल्ड्रींक्सही नको, किंवा हाॅटड्रिंक्स !

    गरजेएवढे पाणी घेतले तर किडनींना सुद्धा तेवढीच विश्रांती! नाहीतर जास्त ढोसलेल्या पाण्याचा निचरा करता करता, तिचा बिचारीचा जीव अगदी मेटाकुटीला येत असेल.

    पाणी कमी प्यायला हवं असं नाही. पण जास्ती नको. एवढंच सांगायच आहे. पाण्याविषयी इतके गैरसमज, एवढ्या कमी काळात वाढतील असं वाटलं नव्हतं.

    सावकाश जेवावे, असे आपण म्हणतो, ते कृतीने अपेक्षित नाही तर अवकाशाने अपेक्षित आहे. पोटाचे चार भाग कल्पिले तर त्यातील दोन भाग घन अन्नाने, एक भाग द्रव आहाराने तर एक भाग अवकाश म्हणजे मोकळा ठेवावा. तरच पुढे अन्न छान घुसळले जाते. घुसळण्याच्या प्रक्रियेत पाणी आणि आकाश महत्वाचे आहे.

    मधे मधे पाणी प्यावे म्हणजे प्रत्येक घासाला पाणी प्यायलेच पाहिजे असेही नाही हं. इतके पाणी प्यावे की पोटाला अन्न चिकटूनही राहाणार नाही किंवा एकदम पुढे वाहूनही जाणार नाही. दोन भाग घन आहारात एक भाग पाणी हे प्रमाण सर्वसाधारणपणे लक्षात ठेवले की झाले.

    हे पाणी सुद्धा मधेमधे घातले तर अन्नरस नीट तयार होतो.

    पारंपारिक देवपूजेमध्ये नैवेद्य दाखवताना पाणी ताटाभोवती फिरवायला सांगतात. कृती नीट आठवून पहा. मधेच पाणी खाली सोडायला सांगतात.
    मधे पाणी कशासाठी ?
    मध्ये पानीयं समर्पयामी. याचा भाव असा आहे की नैवेद्य दाखवताना देवासाठी मधेमधे पाणी प्यायला द्यावे. जे देवासाठी करतो ते उत्तमात उत्तम असते.
    जे जे देवासाठी ते ते देहासाठी. हा नियम मान्य केला तर सगळे प्रश्न आपोआपच सुटतात.

    वैद्य सुविनय दामले,
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    15.01.2017

      January 15, 2017


  • अंदमान द्वीपसमूह : भारताचा निसर्गरत्न

    अंदमान व निकोबार बेटे हिंद महासागरात, बंगालच्या उपसागराच्या आग्नेयेस पसरलेली आहेत. या द्वीपसमूहात एकूण ५७२ बेटे आहेत, त्यापैकी फक्त ३८ बेटांवरच लोकवस्ती आहे. ह्या ५७२ बेटांमध्ये अंदमान बेटे ३२५ हून अधिक आहेत आणि मुख्यत्वे पर्यटनासाठी प्रसिद्ध. निकोबार बेटे त्यामानाने तुलनेने अलिप्त व तिथे मुख्यत्वे तिथल्या मूळ निवासी लोकांचे वसतयव असल्यामुळे पर्यटकांसाठी खुली नाहीयेत. अंदमान निकोबार बेटांचा समूह उत्तर–दक्षिण ८०० किलोमीटर पर्यंत पसरलेला आहे. येथे उष्णकटिबंधीय हवामान असून वर्षभर ऊन–पाऊस यांचा खेळ चालतो. ऑक्टोबर ते मे – पर्यटनासाठी उत्तम कालावधी आणि जून ते सप्टेंबर – मान्सून; पाऊस जास्त असल्याने, फारसे पर्यटक येत नाहीत.

      February 28, 2026


  • श्रीमद्भगवद्गीता मराठीत श्लोकबद्ध – अध्याय सहावा – आत्मसंयमयोग

    इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी आत्मसंयमयोग नावाचा सहावा अध्याय.

      June 28, 2022


  • रेल्वेमधील फेरीवाले

    अपरिहार्यपणे रेल्वेचाच भाग असल्यासारखे वावरणारे रेल्वेतील फेरीवाले म्हणजे संपूर्ण समाजातील विविध गटांच्या सामुदायिकत्वाचा आरसाच असतो. त्यांत तरुण, मुलं, मुली, बायका, लहान मुलं, म्हातारे, इतकंच नव्हे, तर तुणतुणं वाजवून गाणी म्हणणारे अंधजन हे सर्व जण सामावलेले आहेत. ते सारे आपापल्या परीने हुशार व रेल्वेच्या वातावरणाशी अगदी मिसळून गेलेले असतात. संपूर्णत: बेकायदेशीर असलेल्या या विक्रेत्यांकडे एम.बी.ए.ची पदवी नाही, परंतु त्यांना 'विक्री कौशल्या'चं उत्तम ज्ञान असतं. कोणत्या वस्तूंची रेल्वेप्रवाशाला गरज आहे याचा सखोल अभ्यास त्यांनी केलेला असतो. ते खरे ‘सपनोंके सौदागर' असतात. गाडीतील प्रवाशांना आपल्याजवळील माल दाखविताना त्यांचा बोलण्यातील चतुरपणा, उत्तम भाषेत बोलण्याचा सराव, एखादं लक्षवेधी वाक्य, कधीकधी हातातील सामानाचा एकमेकांवर घासून काढलेला आवाज या सर्वांच्या परिणामी अगदी डुलकी घेणारा प्रवासीसुद्धा जागा होऊन उत्सुकतेनं माल पाहण्यास सुरुवात करतो. प्रवाशांमधील सामान नक्की विकत घेणारे कोण व नुसते पाहून, हाताळूनही न घेणारे कोण याचं ज्ञान त्यांना जणू उपजतच असतं. सतत चालत्या गाडीतून फिरावयाचं, परतण्यासाठी उतरून पुन्हा परतीची गाडी पकडावयाची. सकाळपासून सायंकाळी सात-आठ वाजेपर्यंत धंदा करायचा. त्या प्रमाणात पोलिसांना हप्ता द्यायचा व उरलेल्या कमाईत संपूर्ण कुटुंब पोसायचं असा यांचा जीवनक्रम-दिनक्रम असतो. यांच्यापैकी बहुतेकांनी शाळा, कॉलेज सोडून दिलेलं असतं; परंतु वाममार्ग आचरण्याऐवजी हा कष्टाचा धंदा त्यांनी पत्करलेला असतो.

    शांत चित्ताने चार-पाच तासांचा प्रवास करीत असताना संपूर्ण बाजारपेठ तुमच्या पायाशी आणणारे फेरीवाले साधारणपणे गोड बोलत, न कंटाळता, माल दाखवितात. यांच्याजवळ कंगवे, शिवणकामाचं साहित्य, स्त्रियांसाठी अनेक प्रकारची सौंदर्यप्रसाधनं, पुस्तकं, मासिकं, लहान मुलांच्या गोष्टींची पुस्तकं, काय काय म्हणून बघण्यास मिळतं! पुष्कळदा डब्यात विकावयास येणाऱ्या अशा काही वस्तू असतात, ज्या बाजारात सहजासहजी दिसतही नाहीत. 'दाम कम', 'वापरा आणि फेकून द्या' हे तत्त्व धरूनच मालाची विक्री केली जाते.

    रेल्वेमध्ये एकाचवेळी मिळणारी खाण्याच्या पदार्थांची विविधतासुद्धा दुसरीकडे कुठेही मिळण्याची शक्यता कमीच असते. रेल्वेच्या पॅन्ट्रीकारपेक्षा वेगळे खाद्यपदार्थ निवडून पुरवले जात असतात. त्यांत प्रत्येक प्रांतातील स्टेशनची खासियत निरनिराळी असते. लोणावळा म्हणजे चिक्की, कर्जतचा बटाटेवडा, शेगावची कचोरी, दिल्लीची आलूरस्सा-पुरी किंवा आगऱ्याचा पेठा... प्रवासीदेखील या सर्व गोष्टींची आतुरतेनं वाट पाहत असतात. चटपट भेळ ते कुल्फी, नाना त-हेची शीतपेयं, भारतभर मिळणारा चहा आणि दक्षिणेतली कॉफी... हजारो, लाखो प्रवाशांच्या चवींचे चोचले पुरविले जातात ते केवळ रेल्वेफेरीवाल्यांच्या सुविधेमुळे! त्यावरच फेरीवाल्यांची हजारो कुटुंबं सुखाने जगतात. या विक्रीव्यवसायात लाखो रुपयांची उलाढाल चालते. त्यांचे ना बुक ऑफ अकांऊट, ना त्यांना जागेचे भाडं आणि सर्वच व्यवहार रोख, उधारीचा सवालच नाही. रात्री डेक्कनक्वीनमधून पुण्याला नियमित जाणारे प्रवासी घरच्यांकरता रेल्वेत विकत मिळणारी कुल्फी हमखास घरी नेतात.

    अतिपूर्वेकडील राज्यांत व दक्षिणेत चक्क चादरी, शाली व साड्यासुद्धा विक्रीस येतात. गुजरात व कर्नाटकच्या प्रवासात लहान मुलांसाठी उत्तम खेळणी मिळतात.

    बेकारी वाढत आहे, तसं फेरीवाल्यांचं प्रमाण जास्त होत आहे. त्यांच्या बेसुमार वाढीनं प्रवास करणं नकोसं वाटतं. मध्येच कधीकधी रेल्वे अधिकारी धाडी घालतात व एखाद्या भागातील विक्रेते तात्पुरते नाहीसे होतात; परंतु अखेर सगळेच एकमेकांवर अवलंबून असतात. कायद्याचा बडगा दाखविणारे रेल्वेअधिकारी, पोलीस व फेरीवाले यांच्यातील परस्परसंबंध हे एक अजब रसायन असतं.

    डब्याडब्यातून फिरत सिनेमांतील गाणी-भजनं गाऊन पैसे मिळविणारे, नुसते भीक मागणारे हा आणखी एक निराळाच वर्ग असतो. निव्वळ सहानुभूती मिळवून हे लोक पोट भरतात.

    बरेच अंध-फेरीवाले विविध त-हेच्या वस्तू विकण्याचं कामही करतात. दयेपोटी प्रवासी त्यांना जास्त पैसे देतात, परंतु त्यांच्या अंधपणाचा फायदा घेऊन वस्तू चोरणारे वा कमी पैसे देणारे ग्राहकही बरेच असतात. अंध मुली, तरुण स्त्रिया यांची छेड काढली जाते; पण पोलिसांना त्यांच्याकडून हप्ते मिळत नाहीत या निरुपयोगी लोकांच्या तक्रारींकडे पोलीसही लक्ष देत नाहीत. त्यांचं सामान फेकून दिल्यावर ते उचलणंही त्यांना शक्य नसतं.

    एकदा अतिपूर्वेकडील गाडीच्या दुसऱ्या वर्गाच्या वातानुकूलित डब्यात एकावेळी ६० फेरीवाले घुसले. त्यांतील काही गुंडच होते. टी.सी. व प्रवासी सर्व जण स्वस्थपणे बसून, हवालदिल झालेले! गाडीत एकमेव पोलीस, आणि त्याला बोलाविल्यास परिस्थिती अधिकच गंभीर होईल ही भीती; त्यामुळे टी.सी. काहीच करू शकला नाही. नंतर याविरुद्ध बऱ्याच तक्रारी नोंदविल्या गेल्या. तृतीयपंथीयांचा त्रासही असतोच. हे सगळे सहानुभूतीपूर्वक अनुभवतानाही मधूनमधून फेरीवाल्यांवर मर्यादा आणणं गरजेचं आहे हे जाणवत राहतं. त्याची अंमलबजावणी करणं कठीण आहे हे खरं असलं, तरी गाडीमध्ये प्रवाशांच्या गरजेपेक्षा फारच अधिक गोष्टी विकावयास येतात ही वस्तुस्थिती नजरेआड करता येत नाही.

    डॉ. अविनाश वैद्य

      July 30, 2022


  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग सत्तेचाळीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 2

    जसे आचमनातून आपल्याला कळले की अनावश्यक पाणी फक्त पळीभरच म्हणजे चमचाभरच प्यायचे असते. अन्यथा नाही. आयुर्वेदात हेच सांगितले आहे.

    लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, नित्य म्हणजे नियमाने करायच्या कर्मांमधे देवपूजा सांगितलेली आहे. यात ठराविक वेळ पाळणे अत्यंत आवश्यक आहे. 'मला सवड झाली की देवपूजा' असं करू नये. नियमितपणा म्हणजेच देव. सूर्याने जर नियमितपणा सोडला तर ? आणि देवपूजा करताना श्रद्धेने आणि भक्तीयुक्त अंतःकरणाने केली तरच शांती मिळते. नाहीतर ते केवळ कर्मकांड होते. तसे न व्हावे.

    आचमन झाल्यावर प्राणायाम केला जातो.
    काही मंडळी याला थोतांड म्हणतात. या कर्मकांडात काऽही काही अर्थ नाही, असे म्हणतात. प्राणायाम करणे हे पण एक कर्मकांडच आहे. त्याला देवपूजेमधे सर्वात पहिले स्थान दिले आहे, हे विसरून चालणार नाही.

    प्राणायाम कसा करावा, ते सुद्धा धर्मशास्त्रात सांगितलेले आहे. जसे योगशास्त्रामधे वर्णन केलेले आहे, तशीच कृती धर्मश्स्त्रातील कर्मकांडामधे वर्णन केलेली आहे. हा केवळ योगायोग समजावा का ? नक्कीच नाही.
    ही सर्व शास्त्रे जगण्यासाठी आवश्यक ते मुलभुत नियम सांगायला बनवली गेली आहेत. समाजाचे धारण करतो, तो धर्म अशी व्याख्या देखील केलेली आहे.

    प्राणायाम करण्यापूर्वी आचमन सांगितलेले आहे हा क्रम देखील विसरून चालणार नाही. आधी प्राणायाम नंतर आचमन असे नाही सांगितलेले ! घसा, श्वसनमार्ग आचमन करून, जरासा ओला करून घ्यावा म्हणजे, नंतर केल्या जाणाऱ्या जाणीवपूर्वक श्वासोच्छ्वासाने घश्यामधे कोरडेपणा निर्माण होऊन त्रास होऊ नये. यासाठी हा क्रम महत्त्वाचा !

    आचमन झाल्यावर डाव्या नाकपुडीने श्वास भरून घ्यावा. उजवी नाकपुडी बंद करावी. भरून घेतलेला श्वास फुफ्फुसामधे रोखून धरावा. म्हणजे दोन्ही नाकपुड्या बंद कराव्यात. आपली श्वास रोखून धरण्याची शक्ती संपली की, श्वास हळूहळू सोडून द्यावा. श्वास सोडताना उजव्या नाकपुडीने सोडावा. आणि श्वास न घेता काही वेळ थांबावे. याला अनुक्रमे पूरक, अंतःकुंभक, रेचक आणि बहिर्कुंभक म्हणतात. हे कर्मकांड का करायचे ? आणि देवपूजेमधे सुरवातीला महत्त्व दिले जावे, एवढे काय आहे या प्राणायामात ?

    असा प्रश्न विचारणारा, कदाचित अभारतीय असावा. एवढे याचे महत्त्व महर्षी पतंजलींपासून आजमितीपर्यंत सर्व योगतज्ञांनी आपल्याला वेळोवेळी सांगितलेले आहे. प्राण धारण करण्याची शक्ती वाढवणे, शरीर आतून शुद्ध स्वच्छ ठेवणे, मन आत्मा इंद्रिये यांना शुद्ध ठेवणे, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जगण्यावरील विश्वास वाढवणे, यासाठी प्राणायाम करावा. हे तर सर्वांनाच माहिती आहे. त्यासाठी वेगळा वेळ आणि जागा फुकट घालवायवा नको. आणि आत्ता तर आपण जागतिक स्तरावर योगदिन साजरा करतो.
    त्यामुळे माहिती नसेल तर लवकरात लवकर हे ज्ञान मिळवावे.

    नियमितपणे प्राणायाम करावा, म्हणजे श्वसनासंबंधी कोणत्याही समस्या निर्माण होत नाहीत, आणि निर्माण झालेल्या असल्या तरी त्या दूर होतात. एवढे समजले तरी आज पुरेसे आहे.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    27.05.2017

      May 27, 2017


  • ताळमेळ हवा!

    भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा जगातील अनेक देशांनी भारताच्या भवितव्याविषयी काळजी व्यक्त केली होती. विविधतेने नटलेला एवढा मोठा देश भारतीय नेते सांभाळू शकतील की नाही, याबद्दल अनेकांच्या मनात शंका होती. चर्चिलने तर ब्रिटिश पालर्मेंटमध्ये भारतीय लोक स्वतंत्र राहण्याच्या योग्यतेचे नाही, देशाचा कारभार त्यांना चालवता येणार नाही, 50 वर्षांतच भारताच्या स्वातंत्र्याच्या ठिकऱ्या उडतील, असे परखड मत मांडले होते.

      August 7, 2005