(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • गोमुत्राचे फायदे

    भारतीय संस्कृतीमधे गाईला फार महत्व आहे. गाय असा एकमेव प्राणी आहे, जिला “गोमाता” म्हटले जाते. आईच्या खालोखाल गाईला स्थान दिले गिले आहे. प्रथम गाईला पुजल्याशिवाय कोणताही धार्मिकविधी सुरु होऊ शकत नाही. गाय असा प्राणी आहे, जिचे सर्व उत्पादने व अवयव मनुष्याला जीवन, आरोग्य, सुख, शांती, आनंद, समाधान देतात. तिच्या शेण, गोमुत्र, दूध, दही, तूप, या पाच उत्पादनांपैकी एकमात्र “गोमूत्र” याची माहिती आज आपण घेणार आहोत.

    गोमुत्रात पोट्याशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटयाश, अमोनिया, क्रिटेनिन, नायट्रोजन, सोडियम, कार्बोलिक अॅसिड्स, लॅक्टोज, पाचकरस, हार्मोन्स व अनेक खनिजद्रव्यं असतात, जी मनुष्याची शरीरशुद्धि व पोषण करतात.

    १. दातांच्या रोगात दात स्वछ करून, गोमूत्र थोडावेळ तोंडात धरुन ठेवल्याने दंतरोग हमखास बरे होतात. हे त्यातल्या कार्बोलिक अॅसिडमुळे होते.
    २. लहान मुलांची हाडे कमजोर असल्यास, सकाळी अनोशापोटी, नियमित 50 मिली गोमूत्र घेतल्याने काही दिवसात हाडे बळकट होतात.
    ३. गोमुत्रातील लॅक्टोज मुले व वृद्ध यांना प्रोटीन्स देते.
    ४. गोमूत्र, आपल्या हृदयाच्या पेशींना टोन अप करते.
    ५. गोमूत्र, वृद्धावस्थामधे मेंदूला दुर्बल होऊ देत नाही.
    ६. गोमूत्र, महिलांच्या “हिस्टिरिया” जनिक मानसिक रोगांना रोखते.
    ७. सिफलिस, गनेरियासारख्या यौन रोगांना “गोमूत्र” नष्ट करते. ८. उपाशिपोटि अर्धा कप गोमूत्र नियमित घेतल्याने, सर्व यौनरोग हमखास बरे होतात.
    ९. महत्वाची बाब म्हणजे गोमुत्राने बरा झालेला आजार पुन्हा लवकर होत नाही, हे गोमुत्राचे वैशिष्ठ्य आहे.
    १०. गोमुत्रातील, कार्बोलिक अॅसिड हाडे, मज्जा व विर्याला शुद्ध करते.
    ११. नियमित गोमुत्र प्यायल्याने, एक महिन्यात २ ते ३ किलो अतिरिक्त वजन कमी होते.
    १२. गोमुत्र, त्वचारोगांसाठी सर्वोत्तम औषध आहे.
    १३. गोमुत्राने एक्सेस कोलेस्टेरॉल नष्ट होते.
    १४. गोमुत्र थायरॉइड मधे ही फायदा देते.
    १५. गोमुत्राने बद्धकोष्ठता हा आजार पूर्ण बरा होतो.
    १६. गोमुत्राने पाइल्स, मुळव्याध बरा होतो.
    १७. हार्ट मधील ब्लॉकेज, गोमुत्राने हळू हळू ओपन होतात.
    १८. 5 पाने तुळशीची, 5 चमचे गोमूत्र, नियमित घेतल्याने प्राथमिक स्थितीतील कैंसर, टीबी, बरा होतो.
    १९. नियमित गोमुत्र घेतल्याने बॅक्टेरियल व व्हायरल इंफेक्शन कधीही होत नाही.
    २०. 30 मिली गोमुत्रात 3 चमचे मध घालून पाजल्याने लहान मुलांच्या पोटातील थ्रेडवर्मस, सुत्रकृमी एक आठवड्यात नाहिसे होतात. मूल निरोगी होते.
    २१. बेकरीचे पदार्थ, वड़ापाव, भजी, फास्टफूड अशा पदार्थांनी गॅसेस, आंबट ढेकर, अॅसिडिटी यासारखे आजार हमखास होतात. यावर डॉक्टर गोळ्या किंवा सिरप देतात. याने आजार पूर्ण बरे न होता कायमचे जडतात. यावर गोमुत्र रामबाण उपाय आहे.
    २२. पक्वाशयाच्या सुजेमुळे अल्सर झाल्यावर ऑपरेशन करायला सांगतात. असे ऑपरेशन नियमित गोमूत्र सेवनाने हमखास टळते.
    २३. जे लोक कायम गोमूत्र घेतात, त्यांची पचनव्यवस्था उत्तम असते. पोटाचे रोग असलेल्यांनी नियमित गोमूत्र घेत रहावे.
    २४. गोमुत्राने जखमा लवकर बऱ्या होतात व धनुर्वात होण्याचा धोका टळतो.
    २५. चमचाभर गोमुत्रामधे 2 थेंब मोहरीचे तेल मिसळून नाकात टाकल्याने बंद नाक त्वरित मोकळे होते. श्वास घेणे सोपे होते.
    २६. गोमूत्रात थोड़े गाईचे तूप व कापूर मिसळून कपड़ा ओला करून छातीवर ठेवल्याने कफ विरघळून छाती मोकळी होते.
    २७. सायटिका, गुडघे, कोपर, पोटऱ्या, मांसपेशींमधे दुखणे, सूज आल्यास गोमुत्रापेक्षा मोठे दुसरे औषध नाही.
    २८. संधिवात, हाडे ठिसुळ होणे, रुमेटिका फिव्हर आणि अर्थ्रायटिसमधे सर्व औषधे निष्फळ ठरतात. अशा 80 प्रकारच्या वातरोगांमधे गोमूत्र एकमात्र औषध आहे. यासाठी अर्धा कप गोमुत्रात 2 ग्रॅम शुद्ध शिलाजीत, 1 चमचा सुंठचूर्ण, शुद्ध गुग्गुळ किंवा महायोगराज गुग्गुळच्या 2 गोळ्या मिसळून पाजा. हाडांचे आजार बरे होतात.
    २९. शौचाला साफ़ न होण्याने सर्व रोगांना निमंत्रण मिळते. गोमूत्र, लघवीचे आजार, शौच म्हणजे मलावरोध दोघांना मोकळे करते. अशा वेळेला गोमूत्र दोन्ही वेळा 50-50 मिली घ्यावे.
    ३०. गोमुत्रात एरंड तेल अथवा बादाम रोगन 1 चमचा मिसळून दिल्याने जुलाब साफ़ होतात.
    ३१. लहान मुलांना शौचाचा त्रास होत असल्यास गोमुत्रात 2 चमचे मध मिसळून पाजावे.
    ३२. गाईच्या दुधात 2 चमचे तूप मिसळून पाजल्याने गर्भवती महिलांचा मलावरोध नाहिसा होतो.
    ३३. डायबिटिसमधे गोमूत्र फार उपयुक्त आहे. गोमूत्र डायबिटीस कंट्रोलमधे ठेवते.
    ३४. यकृतरोग, काविळ, जॉण्डिस या रोगांमधे गोमूत्र व पुनर्नवा मंडूर घ्यावे. कोरफडीच्या 30 मिली रसात 50 मिली गोमूत्र मिसळून प्यायल्याने पचनसंस्थेचे सर्व अवयव रोग मुक्त होतात.
    ३५. 2 ग्रॅम ओवाचूर्ण किंवा जायफळ वाटून गोमुत्रात मिसळून पाजल्याने पोटाचे दुखणे, मुरडा, आव, भूक न लागणे असे आजार ठीक होतात.
    ३६. मुळव्याधीच्या कोणत्याही तक्रारीमधे 50 ते 100 मिली गोमूत्र प्यायल्याने फायदा होतो.
    ३७. खरुज, एक्झिमा, पांढरे डाग, कुष्ठरोग यामधे गोमुत्रात गुळवेलीचा रस मिसळून सकाळ संध्याकाळ प्यायल्याने असे आजार त्वरित बरे होतात. त्वचेवर बटमोगऱ्याच्या तेलात गोमूत्र मिसळून मालीश करावे.
    ३८. हृदयविकारामधे गोमूत्र प्यायल्याने, रक्तातील गुठळया विरघळतात.
    ३९. हाय ब्लडप्रेशर व लो ब्लडप्रेशरमधे गोमुत्रातील लॅक्टोज, जबरदस्त परिणाम करते. हृदयरोगात गोमूत्र उत्तम टॉनिक आहे. ४०. गोमूत्र, शिरा व धमन्यांमधे कोलेस्टेरॉल साठू देत नाही.
    ४१. किडनी काम करत नसेल तर गोमूत्र घ्या.
    ४२. प्रोस्टेट ग्रन्थी वाढलेली असेल तर गोमूत्र घ्या.
    ४३. किडनी व प्रोस्टेट ग्रन्थिंचे कार्य गोमुत्रामुळे सुधारते.
    ४४. गोमुत्र व तुळस सर्व वास्तुदोष घालवतात.

    गोमुत्रासारखे दूसरे कुठलेही औषध नाही, जे लहान मुलांपासून वृद्धांपर्यन्त, कोणत्याही रोगांशिवायही नियमित घेऊ शकता.

    गोमुत्र नेहमी 8 पदरी सुती कापडाने गाळून घ्या. गोमूत्रात मध घालून ठेवल्याने ते जास्त दिवस टिकून रहते. एक महिन्याने व्यायला येणाऱ्या आणि व्यायल्यानंतर 1 महिना गोमुत्र घेऊ नये. आजारी गाईचे गोमूत्र घेऊ नये. ताजे गोमुत्र मिळत नसल्यास, गोधनअर्क घ्यावा व त्यासोबत गोमुत्र वटी जरूर घ्यावी.

    -- WhatsApp वरील आरोग्यदूत या ग्रुपवरुन साभार

      October 21, 2016


  • बकवास नियोजनातील फोलपणा

    गेल्या आठवड्यात पावसाने वऱ्हाडाचा तुरळक भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरश: झोडपून काढले. मुंबई आणि कोकण या किनारपट्टीवरील प्रदेशात तर पावसाने विनाशकारी तांडवनृत्य केले. गेल्या 140 वर्षांचा विक्रम मोडणाऱ्या पावसाने मुंबईचे तथाकथित सौंदर्य पार धुऊन काढले.

      July 31, 2005


  • कोकण कलावंतांची खाण

    कलावंतांशी तुलना करताना आम्हा राजकारणी लोकांचे जीवन हे अगदी सामान्य आहे. आपल्या लोकांचे जीवन थोडेफार अधिक सुखकारक करण्याचे काम आम्ही करत आहोत. अशा विश्वासापोटी काळाच्या वाळूर आम्ही आमची नावे कोरण्याचा व्यर्थ प्रयत्न करतो, पण त्यात काही अर्थ नाही. कलाकार, संगीतकार, कवी, लेखक हेच केवळ अजरामर राहतात.

      January 27, 2023


  • क्रिकेटपटू कॉली स्मिथ

    कॉली स्मिथ याने त्याच्या तिसऱ्या फर्स्ट क्लास क्रिकेट सामन्यामध्ये जमेका कडून खेळताना १९५४-५५ साली टूरवर आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध त्याने १६९ धावा केल्या. त्याने त्याचा पहिला कसोटी सामना खेळला तो २६ मार्च १९५५ रोजी ऑस्ट्रलिया विरुद्ध म्हणजे त्याच वर्षी खेळला.

      August 22, 2021


  • श्री विष्णू भुजंगप्रयात स्तोत्रम् – १४

    भगवंतांच्या विविध नावांच्या सोबत स्वाभाविकच भक्ताच्या मनात जागृत होत असतात भगवंताच्या विविध लीला. त्या त्या अवतार लीलांच्यासोबत काही नावांचे संदर्भ जुळलेले आहेत. येथे अशाच काही अवतारांचे वर्णन आहे.

      October 15, 2020


  • भिकाऱ्यांचे डॉक्टर

    वेदनेला आणि दुःखाला गळ्याला लावायला कोणाला आवडेल? दुसऱ्यांचं दुःख पाहायला सुद्धा काही लोकांना आवडत नाही. रस्त्यावरच्या भिकाऱ्यांचे दुःखं समजून त्यांनी आणलेली भीक सुद्धा त्यांच्याबरोबर खाऊन त्यांना आपलेसे करणारे व असे काही भिकारी जे अनेक दिवस एका जागेवर सर्व विधी करणारे व त्यामुळे त्यांच्या हातापायांना संसर्ग झालेला असला तरी त्या हाताने खाणारे व संसर्ग हातात नसून मनात असतो असे मानणारे आगळे वेगळे डॉक्टर केवळ त्या भिकाऱ्याविषयी सहानुभूती दाखवत नाहीत तर त्यांच्या वर उपचार करून योग्य त्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून, त्यांनां नातेवाईकांनी सोडले असले तरीही पुन्हा आयुष्यात आणणारे व वेळ प्रसंगी एखाद्याला पुढील आयुष्य जगण्यासाठी स्वतःच्या पायावर उभा करणारे डॉक्टर अभिजीत सोनवणे हे झपाटलेलं व्यक्तिमत्व आजही कार्यरत आहे.

      June 27, 2026


  • अंजिराच्या शेतीतुन समीर डोंबेचे “पवित्रक” ब्रँडनेम  

    समीर डोंबे याचा इंजिनिअर ते अंजीर किंग असा गेल्या सहा वर्षांचा प्रवास. दौंड तालुक्यातील खोर गावच्या युवा शेतकऱ्याने इंजिनिअरिंगचे लॉजिक शेतात वापरुन अंजिरांच्या शेतीतून मोठी कमाई केली. विशेष म्हणजे, लॉकडाऊनच्या काळातही त्याने तब्बल 20 टन अंजीर विकले.

      October 22, 2021


  • बंदूक कलाशनिकोव्हची

    मातृभूमीच्या रक्षणासाठी जनरल निखाइल कलाशनिकोव्ह यांनी ज्या ‘ एके -४७ ‘ चा शोध लावला .. दुर्दैवाने ती आता अतिरेक्यांचे लाडके शस्त्र बनली आहे . या ‘ एके -४७ ‘ च्या जन्माची ही कहाणी .

      August 10, 2023


  • होत्याचे नव्हते!

    काळाच्या प्रवाहासोबतच मनुष्याची जीवनशैली बदलत चालली आहे आणि त्या बदलामागचे प्रमुख कारण ठरत आहे वैज्ञानिक प्रगती! वैज्ञानिक प्रगतीच्या खऱ्या वेगाला चालना मिळाली ती जेम्स वॅटने वाफेच्या इंजिनाचा शोध लावल्यानंतर . जागतिक औद्योगिकीकरणाचा तो आरंभबिंदू होता.

      October 9, 2005


  • श्वासाची दुर्गंधी

    मौखिक अस्वच्छता हे श्वासाला दुर्गंध येण्याचे एक कारण असू शकते. किंबहुना दात, जीभ, हिरड्या यांच्या म्हणजेच तोंडाच्या स्वच्छतेची काळजी न घेणे, हे श्वाेसाच्या दुर्गंधीचे मुख्य कारण असते. काहीही खाल्ल्यानंतर दातात अन्नाचे छोटे मोठे कण अडकतात. तोंडातील जीवाणूंद्वारे त्या कणांचे विघटन होऊन दुर्गंधीयुक्त रासायनिक पदार्थ आणि वायू तयार होतात. या रासायनिक पदार्थांमुळे आणि वायूंमुळे तोंडाचा वास येऊ लागतो. शिवाय त्यांच्यामुळे दात किडतात आणि हिरड्या सुजून त्यात पू भरतो. दात आणि हिरड्यांच्या या जंतुसंसर्गामुळे हा वास अधिकच दुर्गंधीयुक्त बनतो. अनेकदा दातांची कवळी, काही दातांची डेन्चर्स, दातांना बसवलेल्या तारा ज्या व्यक्ती वापरतात, त्यांनी त्या त्या गोष्टींची स्वच्छता न बाळगल्याने त्यांना श्वचसन दुर्गंधीची बाधा होते. दातांमध्ये अन्नाचे कण अडकतात तर जिभेवर द्रवपदार्थांचा साका जमा होतो. जिभेवर हा अन्नपदार्थांचा साका जमा होऊन त्यामध्ये जंतूंचा शिरकाव होतो आणि त्याचा वास येऊ लागतो. श्वावस दुर्गंधीच्या या कारणाला आळा घालण्याकरिता दररोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना दात घासावेत. दातांबरोबर जीभसुद्धा घासून स्वच्छ करावी. काहीही खाल्ल्यानंतर स्वच्छ पाण्याने गुळण्या कराव्यात. अधूनमधून "डेंटल फ्लॉस‘ वापरून दातांच्या फटीतले अन्नकण काढावेत. वर्षातून किमान एकदा दंत वैद्याकडून दातांच्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी.

    विशिष्ट अन्नपदार्थ आणि पेयपान
    लसूण, कांदा, मसाल्याचे पदार्थ असे तीव्र वासाचे पदार्थ खाण्यात आले तर तोंडाला वास येतोच. चहा, कॉफी, मद्यपान अशा पेयांच्या सेवनानेसुद्धा श्वासाला दुर्गंध येतोच. मद्यसेवनानंतर उच्छवासात येणारा त्याचा अंश "ब्रेथ ऍनॅलायझर‘ या यंत्राच्या साह्याने पोलिसही तपासतात. या घन आणि द्रवपदार्थांच्या सेवनाने येणारा दुर्गंध जर टाळायचा असेल तर ते खाणे (किंवा पिणे) टाळणे हाच त्यावरचा उपाय असतो. कारण कितीही ब्रश केला किंवा गुळण्या केल्या तरी, कांदा-लसणाचा किंवा दारूचा वास सहजी नाहीसा होत नाही. याउलट दिवसभरात पाणी कमी पिणाऱ्या व्यक्तींचे तोंड कोरडे पडून त्यांच्या श्वाससामध्येसुद्धा दुर्गंध जाणवू शकतो.

    तंबाखूजन्य पदार्थ
    धूम्रपानाचा वास हादेखील मद्याप्रमाणे उच्छवासातून येत असतो. तंबाखू, गुटखा, पान यांच्या सेवनानंतर त्यांच्यापासून निघणारा रस तोंडातील लाळेमध्ये मिसळतो. हा मिश्र द्रव तोंडातील दात, गालाची आतली बाजू, जीभ, हिरड्या यांच्यावर एक पातळ थर निर्माण करतो. त्याचा वास येत राहतो. त्याशिवाय विडी-सिगारेटच्या धुराचा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा तोंडातील दात, हिरड्या, टाळू आणि जीभ यांच्यावर रासायनिक परिणाम होऊन दातांवर लालसर काळ्या रंगाचे किटण तयार होते. त्याचाही कायमस्वरूपी दुर्गंध येत राहतो. या गोष्टींच्या व्यसनापासून मुक्त होणे, हाच या दुर्गंधावर मात करण्याचा ठोस उपाय आहे.

    फॅड डाएट
    व्यायाम करून वजन कमी करण्याऐवजी काहीतरी नवीन जाहिरातबाजी करणाऱ्या "विशेष आहाराच्या‘, डाएटच्या, उपाशी राहण्याच्या नादी लागण्याकडे आजकाल बहुसंख्य लोकांचा कल असतो. अशा डाएटमध्ये पिष्टमय पदार्थ अत्यल्प खायला आणि साखर पूर्णपणे वर्ज्य करायला सांगितलेली असते. हा सल्ला अतिशय अशास्त्रीय असतो. कारण शरीराला पिष्टमय पदार्थ हे दैनंदिन जीवनात लागणारी ऊर्जा निर्माण करण्यासाठी अत्यावश्यसक असतात. ते कमी मिळाल्यामुळे शरीरातील चरबी वितळून तिच्यापासून ऊर्जा मिळवली जाते. या प्रक्रियेत शरीरात "कीटोन्स‘ नावाचे दूषित पदार्थ निर्माण होतात. यांचा एक वेगळाच गोडसर वास श्वासाला येत राहतो. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेची पातळी खूप जास्त प्रमाणात राहिली तर असाच वास येत राहतो.

    औषधे
    काही ठराविक औषधांच्या नियमित वापरानंतर श्वाासाला दुर्गंध येऊ शकतो. यात छातीतल्या दुखण्यावर घेतल्या जाणाऱ्या नायट्रेट्‌स, केमोथेरपीमध्ये वापरली जाणारी काही औषधे, फिनोथायाझिन गटातली चिंतानाशक औषधे येतात. याशिवाय ऍसिडिटी कमी करणारी अल्सरविरोधी औषधे. उच्च रक्तदाबावरील, अर्धशिशीवरील, रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करणारी काही औषधेदेखील अशीच त्रासदायक ठरू शकतात. डोके आणि मानेच्या भागात एखाद्या अवयवाचा कर्क असेल तर त्या रुग्णाला दिल्या जाणाऱ्या किरणोपचारांमध्येसुद्धा असेच घडते.

    काही आजार
    काही विशिष्ट आजारांमध्ये तोंडाला दुर्गंधी येणे प्रकर्षाने आढळते.
    पोटाचे आजार- एच. पायलोरी नावाच्या जंतूचा संसर्ग जठर आणि लहान आतड्याच्या सुरवातीच्या हिश्या आजात होतो. यामुळे हायपरऍसिडिटी, पोट दुखणे अशा प्रकारच्या त्रासांसमवेत तोंडाला दुर्गंधी येण्याचे आणि करपट ढेकर येण्याची लक्षणे आढळतात. हाच प्रकार जी.ई.आर.डी. या आजारात होतो. यामध्ये पोटातील आम्ल हे अन्ननलिकेत येत राहते.

    श्वासनसंस्थेचे आजार- सर्दीने नाक चोंदणे, सर्दी पिकणे, सायन्युसायटीस, घशाला सूज तसेच जंतुसंसर्ग होणे, टॉन्सिलायटिस, ब्रॉन्कायटिस, ब्रॉंकिएकटॅसिस अशा श्वेसन संस्थेच्या आजारात श्वावसाला हमखास दुर्गंधी येते.

    झीरोस्टोमिया- या आजारात तोंडात लाळ तयार होत नाही. त्यामुळे तोंडातील जंतूंची बेसुमार वाढ होते, शिवाय सर्वसामान्य लोकांच्या तोंडात आढळणाऱ्या जंतूंव्यतिरिक्त इतर प्रकारचे जंतूदेखील नव्याने तयार होतात. त्यांचा अन्नकणांशी संपर्क होऊन, सातत्याने खूपच दुर्गंधी येत राहते.

    स्योग्रेन्स सिंड्रोम- या स्वयंप्रतिकार रोगात (ऑटोइम्युन डिसीज) रुग्णाची लालोत्पादक पिंडे नष्ट होतात. त्यामुळेसुद्धा तोंड कोरडे पडून दुर्गंधी येत राहते.
    "हॅलिटोफोबिया‘ या मनोविकारात रुग्णाला सतत आपल्या तोंडाला दुर्गंध येतोय असं वाटत असतं. प्रत्यक्षात तसा तो येतच असतो असेही नाही, पण अशा व्यक्ती इतरांच्या साध्या बोलण्याचा तसा अन्वयार्थ लावतात. "आपल्या तोंडाची दुर्गंधी टाळणे‘ हा एक विचार त्यांच्या मनात पक्के घर करतो, त्यामुळे सतत दात घासणे, फ्लॉस करणे, च्युईंग गम खाणे, माउथ फ्रेशनर्स वापरणे अशा गोष्टी ते सतत अकारण करत राहतात. आजच्या जमान्यात "सेल्फ इमेज‘ किंवा स्वयं प्रतिमा या गोष्टीला खूप महत्त्व दिले जाते. चांगले दिसण्यासाठी अनेकजण धडपडत असतात. पण यामध्ये वेशभूषा, केशभूषा, स्वतःला नटवण्यासाठी अनेक प्रसाधने वापरणे एवढेच केले जाते. पण तोंडाचे आणि पर्यायाने शरीराचे आरोग्य टिकवणाऱ्या मौखिक आरोग्याकडे लक्ष दिल्यास, श्वास दुर्गंध तर जाणवणार नाहीच; पण व्यक्तिमत्त्वदेखील उजळून जाईल.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- डॉ. अविनाश भोंडवे

      January 18, 2017