(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • श्रद्धा असावी पण ती अंधश्रद्धा होऊ नये !

    त्याची पत्रिका मी माझ्या पद्धतीने पाहिल्यावर माझ्या लक्षात आले त्याचा जन्म सत्तावीस नक्षत्रातील सर्वात विषारी समजल्या जाणाऱ्या आश्लेषा नक्षत्रात झालेला होता त्यामुळेच त्याच्यावर हे आकस्मित संकट ओढावले होते त्याला निमित्त मात्र त्याच्या वडिलांचे बिडी पिणे आणि त्यामुळे झालेला कर्करोग होता भविष्य कोणालाही टाळता अथवा बदलता येत नाही ज्योतिष शास्त्रामुळे फक्त त्याचा अंदाज घेता येऊ शकतो इतकंच …

      July 3, 2017


  • शासकीय दरोडा!

    प्रकाशन दिनांक :- 19/10/2003
    ब्रिटिशांच्या जोखडातून हिंदुस्थानला मुक्त करण्यासाठी असंख्य ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या सर्वस्वाची आहुती दिली. आज आपण स्वतंत्र आणि सार्वभौम देशात मुक्तपणे श्वास घेत आहोत ते या लोकांच्या बलिदानामुळेच. स्वातंत्र्यवीरांच्या समरगाथा आम्हाला नेहमीच स्फूर्तिदायक वाटत आल्या आहेत.

      October 19, 2003


  • मिशन इंपॉसिबल

    मिशन इंपॉसिबल

    तगडा हँडसम टॉम क्रुज तसा आधीच टॉप गन पासून ॲ‍क्शन हिरो म्हणून लोकांना खूप आधीपासूनच आवडला होता. पण MI ने जगभर इतकी जबरदस्त कमाई केली की स्वतः टॉमने MI Franchise चे हक्क घेत 1996 ते 2018 या 22 वर्षात MI-2, MI-3, MI-Ghost Protocol, MI-Rogue Nation, MI-Fallout असे तब्बल सहा सिनेमे या फ्रँचाइज अंतर्गत काढलेत.

      September 11, 2022


  • गजरा…

    "हे घे गजरा,माळ तुझ्या केसात."..मी माझ्या 'so called Modern'समजणार्‍या मैत्रीणीला 'offer' केले..

    "ओह..गजरा,No way,सुमेधा,its so old fashioned!!...इति माझी मैत्रीण..
    तिचे हे उद्गार ऐकून मी २सेकंद तिच्याकडे टकामका पाहू लागले..

    "काय झालं?वाईट वाटलं का तुला?"..माझ्या मैत्रीणीचे हे वाक्य ऐकून मला तिची किवच आली..मनात म्हणलं,वाईट कसलं वाटतयं,हसू येतयं..गजरा,old fashioned?म्हणे...आधुनिकतेच्या नावाखाली आपण आपल्या जुन्या,चांगल्या गोष्टी पण टाळू लागलो आहोत..

    'गजरा' हा शब्द उच्चारला तरी कसं आल्हाददायक वाटतं ना!!सोळा शृंगारामध्ये गजऱ्याचा समावेश आहे..गोवा,कर्नाटकातील ९०% स्त्रीया आजही रोज गजरा माळल्याशिवाय नोकरीला जात नाहीत. गजरा-सौंदर्य हा संबंध सर्वश्रुत आहेच.माझ्या मनात मात्र गजरा-आरोग्य याविषयी विचार सुरु झाले होते.

    सध्या तीव्र उन्हाळा सुरु आहे.पण निसर्गात पाहिल तर 'मोगरा,चाफा,बकुळ ' यांना बहर आला आहे.बघा,किती काळजी आहे निसर्गाला आपली.या सर्वात जास्त सुगंध पसरविणाऱ्या फुलांची योजना उन्हाळ्यातचं केली गेली आहे.आयुर्वेदाच्या दृष्टीने ही सर्व फुले शीत गुणाची आहेत.म्हणजे उष्णतेची तीव्रता कमी करायला याचा आपण उपयोग करायलाच हवा, नाही का?कसा?तर सर्वात सोपा उपाय म्हणजे गजरा माळणे.केसातल्या गजऱ्याचा तो मंद वास दिवसभर तजेला देत रहातो.मन शांत करतो.अर्थातच फक्त उन्हाळ्यातच नाही तर प्रत्येक ऋतूत त्या त्या वेळी येणाऱ्या फुलांचा गजरा महिलांनी माळावाच..

    स्त्री शरीर हे मुख्यतः उष्ण धर्माचे मानले जाते.दोन भुवयांमध्ये आतील बाजूस असलेल्या pituitary gland च्या अधिपत्याखाली स्त्री शरीरात विविध स्त्राव वहात असतात.त्यावरच स्त्री चे आरोग्य अवलंबून असते.गजरा,किंवा फुलाच्या वास नाकाद्वारे जेव्हा घेतो,त्यावेळी शिरोभागातील पित्त शमन होते,शिवाय ग्रंथी चे कार्य व्यवस्थित रहाण्यास मदत होते.परिणामी स्त्रीयां मधील संतुलन रहाण्यास मदत होते.मनोरोगात तर फुलांना खूप महत्व आहे.स्त्रीयांमध्ये दर महिन्याला होणाऱ्या संप्रेरकांच्या चढ उतारामुळे होणाऱ्या चिडचिडीमध्ये गजरा घातला तर नक्कीच फायदा होतो..(म्हणून तर सिनेमातील नवरोबा बायको ला प्रेमाने गजरा माळताना दाखवतात)..शिवाय गजरा करायच्या पध्दती पाहिल्या तर त्या पण concentration,motor development करणाऱ्याच आहेत.परदेशातील बाक थेरपी,अरोमा थेरपी या काय आहेत?फुलांच्या वर आधारित चिकित्साच आहेत.पण आपलं कसंय,'घर की मुर्गी...'भरगच्च पैसे देऊन अरोमा थेरपी घेऊ..पण गजरा माळून old fashioned होणार नाही..असो..

    असे सगळे विचार मनात येत होते,तेवढ्यात मैत्रीण म्हणाली,"सुमेधा,चल catch u later..."
    मी म्हटलं,"हो,गं Spa ला जायचं असेल ना तुला.."..

    "OMG तुला कसं कळलं..so sweet of u,येतेस का तु पण?मस्त जोजोबा oil चा वास तो...wow"
    "नको बाई,गजरा आहे माझ्याकडे मस्त वासाचा.."

    ती काहीशी हसतं हसतं मला bye करुन निघून गेली..:)

    वैद्य.सुमेधा रानडे.

      April 12, 2017


  • प्रथम आम्ही भारतीय आहोत..!

    प्रथम आम्ही भारतीय आहोत..! पहले हम भारतीय है..! First We R Bhartiy…!

    भारतात राहणाऱ्या तमाम भारतीयांना, आपल्या भारतमातेच्या विविधतापूर्ण गुणवैशिष्ट्यांवर अगाढ प्रेम आहे. या देशात सांस्कृतिक, ऐतिहासिक, धार्मिक, भाषिक, शैक्षणिक अशा अनेकबाबतीत विविधता असली तरी, सर्वांचे एकमत आहे की, ‘आम्ही सर्व भारतीय आहोत.’

    भारतमातेचे सुख आणि दुःख आम्ही आपले मानतो. भारतमातेची उन्नती आणि अवनती ही आमची उन्नती –अवनती आहे, हे आम्हा सर्वांना ज्ञात आहे.आम्हाला कितीही जन्म मिळाले तरी, मातृभूमिचे ऋण मात्र आम्ही फेडू शकत नाही. परंतु त्या ऋणांची जाणीव ठेवून, मातृभूमीसाठी काही करता आले तर, ʻʻस्वातंत्र्ययज्ञात प्राणाहुती देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांना श्रद्धांजली ठरेल .ʼʼ

    भारतमातेच्या प्रेमापोटी प्रत्येकाच्या हृदयात लक्ष-लक्ष भावनांचे हिमालय उचंबळून येतात. आपल्या भावनांचे प्रकटीकरण करण्यासाठी हक्काचे स्थान असले की, राहवत नाही. हृदयातील प्रेमभरतीला शब्दांचे स्वरूप प्राप्त होते. हेच शब्द आपल्या विचारांचे प्रकटीकरण ठरावे. हे प्रकटीकरण कोणावर आरोप-प्रत्यारोप करणारे, अश्लील, असभ्य नसावे. तसेच भारताची एकता, एकात्मता, अखंडता, सुरक्षितता, संप्रभूता, विविधता, सार्वभौमिकता यांना बाधा पोहचविणारे नसावे ही मनापासून अपेक्षा आहे.

    -- नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश

      February 12, 2016


  • मानसिक स्वास्थ्य कसे हाताळावे ?

    आज जर आपल्याला चांगले आयुष्य हवे असेल तर आपल्याला व्यायाम, डाएट या सगळ्याचं काटेकोरपणे पालन हे केलंच पाहिजे पण मुख्य म्हणजे मानसिक आरोग्य, त्याचं नियंत्रण कसे करायचे? हा प्रश्न बहुतांश जणांना भेडसावतोय, तर मानसिक स्वास्थ्य कसं सुधारावं याविषयी काही टिप्स.

      July 22, 2019


  • गणपती पूजेच्या मागची अवधारणा

    येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात निवडणूक होणार आहे. प्रजातान्त्रिक पद्धतीने महाराष्ट्रातील जनता राज्याचा प्रमुख निवडणार आहे. श्री गणेशाची पूजा करताना, गणेशाचे किती गुण निवडणूकीत उभे राहणाऱ्या नेत्यांमध्ये आहे याचा विचार करून जनतेने राज्याचा प्रमुख निवडला पाहिजे. असे केल्यास राज्याची भरभराट होईल. प्रजा सुखी आणि समृध्द होईल.

      August 29, 2014


  • बाप -लेक

    यू ट्यूब वर राज्य सभा चॅनेलवरील “विरासत “हा एस डी वर (बर्मनदा ) बनविलेला कार्यक्रम बघत होतो. एकदम एस डी -आर डी ही पिता -पुत्रांची जोडी आठवली. कार्यक्षेत्र एक पण स्पर्धा नाही, कारण दोघांची संगीतावर स्वतंत्र नाममुद्रा ! प्रत्येकाचे गाणे ओळखू येते. नातं रक्ताचं असलं तरी रचना परक्या !

      April 12, 2022


  • डॉ.अनिरुद्ध धैर्यधर जोशी, एक बहुआयामी व्यक्तिमत्व

    रत्नाच्या आकाराचा विचार करून त्यासाठी कोंदण बनविले जाते परंतू येथे डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी नावाच्या हिऱ्याला कोंदणात बसवितांना कोंदणांचा आकार बदलावा लागत नाही तर स्वत: हिराच कोंदणाच्या आकाराचा होतो. डॉ. अनिरुद्ध जोशी ह्यांचे बालपण म्हणजे जोश्या, डॉ.अनिरुद्ध धैर्यधर जोशी ते परमपूज्य सदगुरु श्री. अनिरुद्ध बापू हा प्रवास विविध कंगोर्यांनी आणि पैलूंनी भरलेला असल्याचे सर्व लेख वाचतांना लक्षात येते. बहुआयामी हा शब्दसुद्धा जेथे फिका पडतो, आणि सर्व विशेषणे कमी पडतात. पावित्र्य हेच प्रमाण आणि मर्यादेची चौकट अंगी बाणलेल्या डॉ. अनिरुद्ध जोशींचे विविध पैलूंनी भरलेले व्यक्तिमत्व हीच एक मोठी व्याख्या आहे, चौकट आहे, मर्यादा आहे, सत्य, प्रेम व आनंदाने खचाखच भरलेला देवयान पंथ आहे. जीवनाच्या सर्व व्याख्या, पायऱ्या, ध्येय, उद्दिष्ट, आणि मर्यादा येथूनच सुरु होतात असे गर्वाने म्हणावेसे वाटते. || ॐ मन:सामर्थ्यदाता श्री.अनिरुद्धाय नम: ||

      January 16, 2012


  • शास्त्रीय संगीत मानसिक स्वास्थ्यासाठी सर्वोत्तम

    आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी शास्त्रीयदृष्ट्या संगीत महत्वाचं असल्याचं आपण समजून घेतलं पाहिजे. दररोज रात्री झोपण्यापूर्वी १५ मिनिटं संगीत ऐकल्याने आपण व्याधीमुक्त होऊ शकतो. शांत झोप लागू शकते, झोपेमध्ये शारीरिकच आणि मानसिक शांततेची तसेच विश्रांतीची देखील जरुरी असते.

      February 21, 2022