वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
ਟੀव्हीवरील जाहिरातींच्या भडिमारात एका health drink ची अॅड सुरू होती व ” इससे दूध की शक्ति बढती है । ‘ ‘ असा दावा जाहिरातदार करीत होते त्यावेळी मनात कुतूहल निर्माण झाले की ,“ दूध हे पूर्णान्न आहे ” मग त्याची शक्ती कशी काय वाढणार ? दूधाच्या सेवनानेच तर शक्ती येते
October 25, 2022
ह्याचा वृक्ष असतो ज्याची साल पांढरी धुसर असते.पाने बारीक व मेंदीच्या पानांसारखी असतात.फुले लहान व पांढरी असतात.फळाची साल कडक व रंग भुरकट पांढरा असतो.आतील गर पिवळा काळसर असतो व ह्यात भरपूर बिया असतात.
ह्याचे कच्चे फळ उष्ण आंबट,तुरट व वातपित्तकर व कफनाशक असते.
ह्याचे पिकलेले फळ गोड,आंबट,तुरट,थंड व त्रिदोष शामक असते.
आता ह्याचे औषधी उपयोग पाहूया:
१)पिकलेल्या फळाचा मगज साखर घालून खाल्ल्यास वाढलेले पित्त कमी होते.
२)अन्न सेवनाची इच्छा नसल्यास २ चमचे कवठाचा गर हा सुंठ मिरी व पिंपळी चुर्ण एकत्रित पणे १/२ चमचा,१ चमचा मध,१ चमचा साखर घालून खावा.
३)कोरडा खोकला येत असल्यास कवठाचा गर जुना गुळ घालून खावा.
४)पोटात भुक असणे पण तोंडास रूची नसणे ह्यात कवठाची गुळ घातलेली चटणी १-३ चमचे खावे व लगेच जेवावे.
५)उचकी वारंवार लागत असल्यास कवठाचा कोळ व गुळ हे चाटण चाटून खावा.
६)थुकीतून रक्त पडणे आवळकाठी चुर्ण १ चमचा,१ चमचा कवठाचा गर ,१चमचा मध हे मिश्रण घेतल्यास उत्तम लाभ मिळतो.
कवठाचे फळ अतिमात्रेत खाल्ल्यास बद्धकोष्ठाचा त्रास होऊ शकतो.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
December 18, 2016
व्यवहारात सर्वसामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकमध्ये लो डेन्सिटी पॉलिथिलिन (एलडीपीई), हाय डेन्सिटी पॉलिथिलिन पॉलिव्हीनाइल क्लोराईड, पॉलिकार्बोनेट पॉलिस्टायरीन (पीएस), पॉलियुरेथीन (पीयू), पॉलिलीप्रॉपीलीन (पीपी), पॉलिथिलीन-टेरेथेलेट (पेट) हे प्रकार येतात. अनेक पॉलिमरमध्ये कार्बन आणि हायड्रोजन असतो. पीव्हीसीमध्ये क्लोरीन असतो. नायलॉनमध्ये नायट्रोजन असतो.
October 22, 2023
जीवनात विजय आहे, तसा पराजयही आहे. पानगळ झाली तरी झाड कुठे निराश होतं? पुन्हा नव्याने अंगाखांद्यावर पाने, फुले घेऊन बहरत असतं. नैराशाचे विचार, आत्महत्येचे विचारही पानगळच असते. काळे ढग निघून जातात तसे तेही जातात. जे धीर धरतात तेच जगतात.
July 11, 2026
चीन मधून पळून गेलेल्या एक कोटी झुरळांच्या बाबत असं घडू शकत नाही का? असं बघा की,एक आटपाट नगर आहे. त्या नगरात एक थोर राजा राज्य करीत आहे. त्या थोर राजाला तितकीच थोर राणी आहे. राणीला नुकतच डोहाळे लागले आहेत. ती राणी असल्याने तिला कशाचेही डोहाळे लागू शकतात.
February 10, 2013
आमची संवेदनशीलता अशी दिशाहीन आहे. मनात क्रोध आहे, पण तो नको तिथे व्यक्त होणारा. मनात शांती आहे, परंतु ती सुध्दा नको तिथे आपले अस्तित्व दाखविणारी. मनात उत्साह आहे, पण तो भलतीकडेच ओसंडून वाहतोय. मनात देशभक्ती आहे, पण ती केवळ भक्ती म्हणून उरली आहे. देश कुठेतरी गहाण आहे.
August 24, 2003
सजीव, त्यांची पुनरुत्पादन यंत्रणा आणि त्यांचा जन्म, या विषयी विचार करता करता काही कवितां स्फुरल्या. त्यापैकी काही येथे देत आहे. कारण त्या, माझ्या … आत्म्याचा आनुवंशिक तत्व सिध्दांताशी संबंधीत आहेत.
माझा जन्म.....
माझा जन्म हा ….
माझ्या आअीबाबांचा निर्णय होता.
या पृथ्वीवर ….
जन्म घेण्याशिवाय
मला
दुसरा पर्यायच नव्हता ....
प्रत्येक सजीवाच्या बाबतीत हे अगदी खरं आहे. नराचा शुक्राणू आणि मादीचं पक्व बीजांड यांचं संयोग झाला म्हणजे अपत्य पिढीच्या सजीवाचा गर्भपिंड निर्माण होतो, मादीच्या गर्भाशयात त्याची वाढ होते आणि प्रजातीनुसार, ठरलेल्या काळानंतर, अपत्य पिढीचा अेक सजीव, मादीच्या शरीराबाहेर येअून, या पृथ्वीवर स्वतंत्रपणं जगू लागतो. यात, अपत्य पिढीच्या सजीवाला काहीही पर्याय नसतो. निसर्गनियमानुसार त्याचा जन्म होतो.
वनस्पतींच्या बाबतीतही हे खरं आहे. पुंकेसर आणि स्त्रीकेसर यांचा संयोग होअून, फुलातून, त्या प्रजातीचं फळ निर्माण होत.
जनक पिढीचा जन्मही याच प्रकारानं झालेला असतो. त्यांना तरी कोणता पर्याय होता? त्यांच्या आअीबाबांनी त्यांना जन्माला घालून या पृथ्वीवर आणलं होतं. मागच्या पिढीचा जन्म, मागच्याच्या मागच्या पिढीचा जन्म, मागच्याच्या मागच्याच्या मागच्या पिढीचा जन्म ……
ही साखळी अशीच चालू होती.
मागच्या पिढीशिवाय पुढच्या पिढीचा जन्म होत नाही हे विज्ञानीय सत्य आहे.
आता कवितेचं दुसरं कडवं वाचा.
बाबांचा शुक्राणू...
त्यांच्या मातापित्यांच्या ....
अनेक पूर्वपिढ्यांतील ....
आनुवंशिक तत्वाचा ठेवा घेअून आला ...
आअीचं बीजांड ...
तिच्या मातापित्यांच्या .....
अनेक पूर्वपिढ्यांतील ....
आनुवंशिक तत्वाचा ठेवा घेअून आलं ...
बाबांचा शुक्राणू ... आअीचं बीजांड
....माझा जन्म
आणि …
आअीबाबांच्या आनुवंशिक तत्वाचा ....
पुनर्जन्म..
मागच्या अनेक पिढ्यातून माझ्या पिढीपर्यंत अेक चेतना संक्रमीत होत आली हे ही विज्ञानीय सत्य आहे.
सजीव, वयात आला … म्हणजे जननक्षम झाला …. म्हणजे तो पुढच्या पिढीला जन्माला घालतो. पुढची पिढी आणखी पुढच्या पिढीला जन्माला घालते, पुढच्याच्या पुढची पिढी, पुढच्याच्या पुढच्याच्या पुढच्याच्या पुढची पिढी ….. ही साखळी, जोपर्यंत या पृथ्वीवर, सजीवांच्या अस्तित्वाला पोषक अशी परिस्थिती आहे तो पर्यंत चालू राहणार आहे आणि तोपर्यंत दोन जिवंत शरीरातून अेक चेतना, तिसर्या जिवंत शरीरात संक्रमित होत राहणार आहे हे ही विज्ञानीय सत्य आहे.
गजानन वामनाचार्य
शनिवारचा सत्संग - 2
शनिवार 3 डिसेंबर 2016
December 3, 2016
परनिंदा करण्यासारखे पाप नाही. निंदेची सवय फार वाईट असते; तिच्यामुळे आपले स्वतःचेच नुकसान होते.
दुसर्याला दुःख व्हावे म्हणून माणूस परनिंदा करतो, पण ती ऐकायला तो हजरच कुठे असतो ? म्हणजे मग आपण यात काय साधले ?
निंदेमुळे आपलेच मन दूषित होते. दूषित मन किंवा दुष्कर्म हे माणसाला परनिंदेला प्रवृत्त करते.
ज्याला परनिंदा गोड वाटते, त्याने समजावे की आपल्याला भगवंत अजून फार दूर राहिला आहे.
तिखट तिखटाप्रमाणे लागू लागणे ही जशी सापाचे विष उतरल्याची खूण आहे, त्याचप्रमाणे परनिंदा गोड वाटेनाशी झाली की देव जवळ येत चालला असे समजावे. म्हणून, ज्याला स्वतःचे हित करून घ्यायचे असेल त्याने परनिंदा सोडून द्यावी आणि जिव्हा नामाला वाहावी.
भगवंताच्या मार्गाने जाणार्याने, दुसर्याच्या ठिकाणी दिसणार्या दोषांचे बीज आपल्यामध्ये आहे हे ध्यानात ठेवून वागावे, आणि अवगुणाचे तण आपल्या अंतःकरणातून काढून टाकून तिथे भगवंताच्या नामाचे बीज पेरावे.
पुष्कळ वेळा आपले दोष आपल्याला कळतात, ते भगवंताचा आड येतात हे देखील कळते, पण त्याला आपला इलाज नसतो. उदाहरणार्थ, काही लोकांची दृष्टी फारच बाधक असते. एखादी चांगली वस्तू किंवा गोष्ट त्यांनी बघितली की ती बिघडते. असे दोष पुष्कळ वेळा ज्याचे त्याला सुधारता येत नाहीत. पण सत्संगती जर लाभली तर मात्र असले दोषदेखील सुधारतात. हाच संतांच्या संगतीचा महिमा आहे.
मनुष्य स्वभावतः आपले दोष वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे त्याचे जीवन सुखमय होत नाही. तो दुसर्याला त्याचा दोष दाखवून देईल, पण त्याला स्वतःला आपला दोष कळणार नाही.
विद्या ही बरेच वेळा मनुष्याला भगवंतापासून दूर नेते. वारकरी पंथातले अडाणी लोक 'विठ्ठल विठ्ठल' म्हणता म्हणता भगवंताला ओळखतात, पण शहाणे लोक परमार्थाची पुस्तके वाचूनही त्याला ओळखीत नाहीत.
घरात बदाम आणि खारका यांची पोती भरून ठेवली, तरी ते पदार्थ जोपर्यंत हाडामांसात जाऊन रक्तांत मिसळत नाहीत तोपर्यंत त्यांचा उपयोग नाही. त्याचप्रमाणे, पुस्तकीज्ञानाचे पर्यवसान आचरणात झाले नाही तर ते व्यर्थ जाते.
भगवंताकरिता कुणीही कष्ट करून नका; कष्टाने साध्य होणारी ती वस्तू नव्हे. ती वस्तू सात्त्विक प्रेमाने साध्य होणारी आहे; आणि प्रेमामध्ये झालेले कष्ट मनुष्य चटकन विसरून जातो.
तुम्ही भगवंताच्या प्रेमाने अगदी भरून जा, आपापसांत प्रेम वाढवा, म्हणजे मग सर्व जग आनंदमय, प्रेममय दिसू लागेल, आणि शेवटी तुम्हाला स्वतःचा विसर पडेल.
निंदा ही आपल्या साधनाची होळी करते.
-- सुमंत आचार्य
October 30, 2016
कुडा हा लहान पानझडी वृक्ष आहे. त्याचे शास्त्रीय नाव होलॅर्हिना अँटीडिसेंटेरिका: (Holarrhena Antidyscenterica) आहे. फुलझाडापैकी ॲपोसयनेसी Apocynaceae कुळामध्ये कुडा ह्या वनस्पतीचा समावेश होतो.
May 24, 2025
थंडीच्या दिवसांत त्वचेची काळजी जास्त घ्यावी लागते. केस त्वचा कोरडी होते. अशा वेळी काही घरगुती उपचार करा.
वाटीत खोबरेल तेल घेऊन ते गरम करावे. नंतर कापसाच्या बोळ्याने तेल संपूर्ण डोक्याला लावावे. हलक्या हाताने मालीश करावे. उथळ भांडयात पाणी गरम करून वाफ घ्यावी. गरम पाण्यात टॉवेल बुडवून घट्ट पिळून डोळ्यांभोवती गुंडाळावा व दहा मिनिटांनी पुन्हा मालीश करावे.
गाजर या दिवसात मुबलक मिळते. त्याचा रस घेतल्याने डोळ्यांना उपयुक्त ठरते.
डोळ्यांभोवतालची त्वचा कोरडी पडली असल्यास बदामाचे तेल लावावे किंवा बदाम उगाळून लावावा.
साय किंवा तुप थोड़े कोमट करून थोड़े ओठांना लावावे.
दुधाच्या सायीमध्ये ग्लिसरीनचे काही थेंब व लिंबाचा किंचित रस घालून ते मिश्रण चेहऱ्याला, मानेला लावावे.
ग्लीसरीन, गुलाबपाणी आणि लिंबाचा रस चमाचभर मिसळून हातापायाना लावावे. हातपाय स्वच्छ व मऊ राहतात.
हात साबण लावून धुतल्यावर लगेचच खोबरेल तेल लावावे. मऊ राहतात.
हे उपचार करण्याबरोबर थंडीच्या दिवसात भरपूर पाणी प्यावे.
लहान मुलांना बदामाच्या गराचे बारीक बारीक तुकडे करून ते मधाबरोबर खायला द्यावेत म्हणजे थंडीच्या दिवसात उद्धभवणा-या विकाराबरोबर त्यांचे रक्षण होते.
तुळशीचा रस व मध घेतल्यास थंडीमुळे येणारा ताप उतरतो.
पुदिन्याचा रस व मध मिसळून घेतल्यास ताप उतरतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
January 2, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti