वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
दहाची नोट म्हणे कांद्याला
येतो का माझा संगे बाजारा
कांदा म्हणे ऐटीत
पन्नासची नोट, बघतेय वाट
जातो मी तिच्या संगे बाजारा
-- विवेक पटाईत
February 19, 2011
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये प्राचार्य डॉ. विश्वास पाटील यांनी लिहिलेला हा लेख
महाराष्ट्राच्या संत परंपरेचे रहस्य आपल्या अभंगातून मांडताना बहिणाबाईंनी सार्थपणे असे म्हटले आहे की ज्या वारकरी धर्माचा पाया ज्ञानोबांनी घातला त्याच्या कलश स्थानी तुकोबा आहेत. तुकोबांचा अभ्यास म्हणजे एका महायात्रेच्या प्रस्थानासाठी सिद्ध होणे आहे. ही आंतरिक अशी यात्रा आहे. ही धरणीवरल्या माणसाला आकाशाची हाक आहे. एकाच वेळी धरणी आणि आकाशावर प्रीत करायची जीवनशैली ही तुकोबा-जीवनशैली आहे. ते म्हणतात 'आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तिथे मन क्रीडा करी ।' केवढा व्यापक पैस तुकोबा आपल्यासाठी आखतात. ते स्वतःला अगदी अणुरेणूहूनि थोकडा मानत असले तरी प्रत्यक्षात मात्र ते आकाशाएवढे सिद्ध झाले. त्यांच्या मते संतजन ही फार मोठी सिद्धी होती. लब्धी होती. साधु संत ज्या दिनी घरी येतील तो त्यांच्यासाठी दिवाळी दसरा होता. संतजन म्हणजे सर्वत्र पसरलेले गगन आहे असे ते सार्थपणे म्हणतात.
तुकोबांनी वेदनेचा वेद वाचला व प्रेमाचे उपनिषद अभ्यासले. यामुळेच तर त्यांचे अभंग विचार प्रमेय बनलेत. यामुळेच तर ते धरणी-आकाशाच्या नात्याच्या मिलनाची महन्मंगल कथा मांडू शकले. सतराव्या झंझावाती शतकात तुकोबांचा तारा गगनात विलसतो. त्यांचा काळ हा १६०८ ते १६५० असा आहे. ही तुकोबांच्या जगण्याची, झुंजण्याची आणि समर्पित होण्याची बेचाळीस वर्षे आहेत. हा काळ इतिहासाच्या पटलावरचा अत्यंत संक्षिप्त असा काळ आहे पण असाच काळ तर शंकराचार्य काय आणि ज्ञानेश्वर काय यांना लाभला होता. किती जगलो यापेक्षा कसे जगलो याला महत्त्व आहे. तुकोबांची जीवनगाथा साधक, कवी, समाजसुधारक अशा त्रिपदा गायत्रीवर मंडित आहे. तुकोबा या त्रिवेणीवरील जंगम तीर्थ आहेत. त्यांचे आठवे पूर्वज विश्वंभरबुवा हे नामदेवांच्या समकालीन होते. ते वारीला नियमितपणे जात असत. या ठिकाणी नामदेव महाराजांच्या आदेशावरून तुकोबांनी केलेल्या अभंग रचनेचे रहस्य उकलते.
तुकोबा हे नाव फार अद्भुत आहे. तुकणे म्हणजे तोलणे, वजन करणे. तुकणारा तो तुका. तुकोबांच्या आईचे नाव कनकाई असून वडिलांचे नाव बोल्होबा असे होते. त्यांना दोन भाऊ होते. मोठा सावजी तर धाकटा कान्होबा. दोन बहिणी होत्या. त्यांचे आई-बाबा निवर्तले आणि भाऊ सावजी गोसावी झाले. भावजय वारल्या. पहिली पत्नी रुखमा गेली. पुत्र संतोबा गेले. अन्नान्न दशा झाली आणि घरातल्या परिचित जनांच्या चिता धडधडताना बघाव्या लागल्या होत्या. तुकोबांची मशाल मात्र पेटती राहिली. वयाच्या तेविसाव्या वर्षी दुसरा विवाह करावा लागला. पत्नी जिजाबाई म्हणजे आवली. तुकोबांच्या समोर संघर्षाच्या जळत्या वाटा संतप्त होत्या. दिवाणी दावा अंगावर कोसळला होता. घरादारावर जप्ती आली होती. बहिष्कार होता. गाव सोडून जायचा हुकूम झालेला. अशा प्रकारे तुकोबा निराधार झाले. तुकोबांना दुष्काळाने गाठले. त्यांचे दिवाळे निघाले. एकूणच उद्ध्वस्त जीवनाची ही दशा होती. इतिहासाची पाने फडफडत होती. तिकडे दक्षिणेत भयावह अशांतता होती. बहामनी मोगल संघर्ष वातावरणात दहशत पेरत होता. धाकदपटशा आणि अश्वारोहींच्या धुळीने जनजीवन माखलेले होते.
तुकोबांच्या पारंपरिक गतानुगतिक आयुष्याचा पट हा असा आहे सगळा. त्यांना ना जातीचे पाठबळ, ना गुरुंचा आसरा, ना कुणी मार्गदर्शक, ना हितकर्ता, ना कवडी ना चावडी म्हणजे ना पैसा ना अधिकार. वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक तिन्हीही स्तरावर उपासमार होती. एक पराभूत आणि लज्जित जीवन वाट्याला आले होते पण तुकोबांनी प्रत्येक संकटावर आंतरिक सामर्थ्याने मात केली. कठोर आत्मपरिक्षणाचा जळता वणवा सभोवती असताना चेहऱ्यावरील स्मितरेखा पुसू दिली नाही. प्रत्ययकारी आत्मसन्मानाची उजळती ज्योत असे त्यांचे जीवन राहिले. आंतरिक प्रतिभेचा स्वच्छ-निर्मळ प्रवाह वहाता होता. त्यांच्या ठायीच्या प्रकाश जाणिवा विरक्तीने झोडपल्या गेल्या पण आंतरिक उजेड मात्र कायम होता. कोवळी भाव संवेदना जळती आणि उजळती होती. ते म्हणत होते 'अंतरी पेटता ज्ञानज्योत धवळेल जगदाकार.'
तुकोबांसाठी जगण्याचा अर्थ झुंजणे होता आणि संदर्भ समर्पित होण्याचा होता. आपल्या जीवनातील कुरुक्षेत्राला त्यांनी धर्मक्षेत्रात परिवर्तित केले. 'रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग आंतर्बाह्य जग आणि मन' हे अंतरंगातील सत्य तुकोबांनी परखडपणे मांडले. कुठल्याही परिस्थितीत ना शरणागती स्वीकारली ना परिस्थितीशरण बनले. 'न दैन्यं पलायनं' हा गीताबोध ध्यानी घेऊन ते जळत्या पायवाटेवर अनवाणी प्रवास करत राहिले नि मळलेली पायवाट चालत राहिले. एक अनवट व अवघड वाट चालणारा हा फकीर अक्षरशः पंख मिटून बसलेल्या गरुडासारखा उज्ज्वल उद्याची वाट बघत राहिला होता.
तुकोबांना आपल्या मूळाचा नेमका शोध लागलेला असल्यामुळेच ते म्हणू शकत होते 'आम्ही मूळचे वैकुंठीचे, तुका म्हणे आम्ही विधीचे जनीते स्वयंभू आहोत केले नव्हे' या प्रमाणे त्यांना आपल्या स्वप्नांना जागरणाचा संदर्भ सहजीच देता येत होता. बाबाजी चैतन्य त्यांच्या अध्यात्म साधनेचे अधिष्ठान होते. आपल्याला संत नामदेवांनी कविता कार्य सोपवले आहे याची खूणगाठ हे त्यांच्या कवित्व साधनेचे बलस्थान होते. तुकोबांनी आपल्या गुरुच्या आज्ञेने गीता भाष्य लिहिले एकूणच परंपरा नाकारणारे बंडखोर असे मन त्यांना लाभले होते. हिंदी भाषेत असे मन कबीर यांना तर गुजराती भाषेत असे मन नरसी मेहता यांना लाभले होते. या वैष्णव वीरांनी शास्त्रसत्ता नाकारली. ग्रंथ सत्ता झुगारून दिली. कबीर ठामपणे म्हणाला होता 'तू कहता कागज की लेखी में कहता आँखन को देखी. ' तुकोबा यामुळेच तर केवळ आपण वेदांचा अर्थ जाणतो असे हिंमतीने म्हणू शकत होते. कबीराच्या शैलीत तुकोबा माळा-टिळा-जानवे-ज्योतिष-कर्मकांड नाकारून कर्मयोगाचा स्वीकार करतात. ज्ञानसाधना आचरतात आणि दंभ व अहंकारापासून मुक्त होतात. भक्तिला कधीही विभक्त न होण्याची दीक्षा देत देखावा नाकारतात. पंचांची सत्ता नाकारत असल्यामुळेच ठणकावून सांगतात 'सत्य असत्यासी मन केले ग्वाही मानियेले नाही बहुमत.' तुकोबांच्या जाणीवांचे असे स्वनिर्मित विश्व आहे. यामुळे ते थोर महाकवी ठरतात. थोर महाकविचे रहस्य समजून घ्यायला हवे. असे कवी खोल मानवी आस्था, गहिरे करुणामूल्य, मानवतेची असहाय आर्तता व दुःखाला काव्यात्म परिमाण देण्याची क्षमता बाळगतात. प्रज्ञासंपन्न कविची शब्दसत्ता ही खरे तर त्याची अर्थसत्ता आहे. शब्दांचा अर्थ त्यांनाच कळतो जे अनुभवाचा ईसार देतात. बाकी लोकांना शब्दांचे पर्याय कळत असतात. शब्द मारतो अर्थ तारतो हे तुकोबांनी मनात जाणून घेतले होते. शब्दांचे शिक्षक असतात पण अर्थाचे आचार्य असतात अशा आचार्यांना हे पुरते ज्ञात असते की शब्द पुस्तकात असून अर्थ जीवनात शोधावा लागतो. तुकोबांच्या कवितेला यामुळे एक दृढता येते. ते म्हणतात 'वेदांचा अर्थ तो आम्हासीच ठावा येरांनी वहावा भार माथा.' शब्द आपल्या जीवाचे जीवन असल्यामुळे आपण जनलोकांसाठी शब्द वाहतो. आपल्या घरी धन शब्दांचीच रत्ने असल्याचा अभिनव साक्षात्कार त्यांना घडतो. तुकोबा यत्नपूर्वक मग शब्दांचीच शस्त्रे करतात. क्रांतिकारक, वैज्ञानिक, जीवन सन्मुख आणि ऋषी या चार लोकांचीच शब्दांवर सत्ता असते. तुकोबा या चारी वृत्ती-प्रवृत्तीचे प्रतीक-प्रतिनिधी होते. आपला अनुभव आपले मित्र शत्रू होण्याचा आहे तर तुकोबांना आपले शत्रू मित्र झाल्याचा अनुभव आला. कवितेमुळे जन्मजात वैर विस्मरणात जाण्याची सिर्द्ध लाभते असा संकेत गोस्वामी तुलसीदास यांनी दिला आहे. तुकोबांना हा अनुभव प्रत्यक्षात झेलता आला. त्यांचे शत्रू मित्र झाले. धर्मपीठावरून धर्माज्ञा करणाऱ्या रामेश्वर भट यांनी तुकोबांचे शिष्यत्व पत्करले. तुकोबांची आरती रचली.
तुकोबांची कविता समजून घेताना त्यांचे जीवन धडपणे समजून घ्यावे लागते. ते समजून घेण्यात जर गफलत झाली तर मग त्यांची वचने सामान्य बुद्धिच्या माणसांना अहंकार भरली वाटू लागतील. तुकोबा म्हणतात 'आजि म्यां पांडुरंग पाहिला.' आपल्या अध्यात्म अनुभवाचा असा जाहीरपणे डंका मिरवणारे तुकोबा कमालीचे निरलस आणि विनम्र आहेत. 'मऊ मेणाहुनि आम्ही विष्णुदास.' असा आपला परिचय करून देणारे तुकोबा मग 'लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा' अशी संताघरची खूण सांगतात. सकलांच्या पाया दंडवत करतात याचे कारण आपापली चित्ते शुद्ध करा असा त्यांचा आग्रह असतो. तुकोबांचे पाईकाचे अभंग तर सैनिकाची आचारसंहिता आहे. शिवकल्याण राजा मावळतीच्या प्रदेशातील उजळते मावळे सोबत घेऊन एक क्रांती करू जात होता. त्याला धर्मसत्तेचा आशीर्वाद मिळवताना आणि मिरवताना संत रामदास यांच्या सोबत तुकोबांच्या स्नेहाचे गाठोडे घेऊन चालावे लागते हा चमत्कार केवळ महाराष्ट्र देशीच घडला असे नाही तर एकूणच संत परंपरेत राजसत्ता आणि धर्मदंडाची ही जुगलबंदी आपल्याला बघायला मिळते.
तुकोबांचे निवेदन यामुळे अतिशय परखड, स्पष्ट आणि कुणाचीही भीड मुर्वत न ठेवणारे आहे. त्यांना मुक्तीची चाड नाही. कधीतरी या धरतीवर शंकराचार्य बोलले होते 'न मे मोक्षस्याकांक्षा' त्याच चालीवर तुकोबा म्हणतात 'नाही देवापाशी मोक्षाचे गाठोडे आणून वेगळे देईल जो' आणि आपल्या आनंदलोकाचा परिचय या शब्दात करून देतात 'तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी' आणि त्यांनी व्यक्तवलेला 'तुका म्हणे आम्ही मृत्युलोकी भले' हा समंजस सूर जीवन आणि ईश्वर या दोन संकल्पना मुळातून समजून घेण्याचा परिपाक आहे. मागणे काय तर ते लई नाही असे ते म्हणतात. पोटापुरते मागतात पण तुकोबांचे खरे सांगणे तर हे आहे 'हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.'
तुकोबांची कविता अमर आत्मतत्त्वासारखी दृढ प्रतिज्ञ आहे. तिचा पोत गीतेच्या आत्मतत्त्वा सारखा आहे. 'नैनं छिदंति शस्त्राणि' अशी ही कविता असल्यामुळे मंबाजीचे शस्त्रास्त्र तिजवर काही परिणाम करू शकत नाहीत. पंडित क्षोभाचे अग्निदिव्य तुकोबा पत्करतात आणि गाथेचे जलदिव्य साधले जाते. इंद्रायणीने तुकोबांची गाथा तारली की नाही हे काही माहित नाही पण लोककंठात ती सुरक्षित राहिली होती हे मात्र खरे. याचे कारण असे होते की ही गाथा कालोचित, कालसंमत आणि काळाला उत्क्रांत करणारी कविता आपल्या काळजाशी वागवून होती. कधी काळी उत्तरेत रामानंद साधुचा डंका वाजला होता 'जातिपाँति पुछे नहीं कोई हरि को भजे सो हरिका होई.' याचा आधार घेत कबीर बोलला होता 'जाति न पूछो साधु की. ' तुकोबांनी या वचनांना मराठी पोशाख देत म्हटले 'विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. ' या वचनांच्या मागे तुकोबांची कळकळ होती. ते म्हणाले होते 'उपदेसी तुका मेघवृष्टिने आईका, 'बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणऊनि. ' तुकोबांनी रोकडा व्यवहार I शिकवला. स्वर्गाचे ना आकर्षण दाखवले ना भय दाखवले. त्यांनी हा ईहलोक भावसमृद्ध केला. ते म्हणाले होते 'जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, न लगे हा लौकिक सांडावा वेव्हार घ्यावे वनांतर भस्म दंड.' ते अंधश्रद्धायुक्त समाज जीवनाला सश्रद्ध जीवनाचा आधार देत राहिले. अगदी सोप्या उदाहरणांनी समजावून सांगितले की बाबांनो 'मंत्राकारणे पुत्र होती तरी का करणे लागे पती. ' समाज जीवन ढवळून निघाले. त्यांच्या मते धर्मपालनाचा अर्थ होता पाखंड खंडन. धर्मनीतीचा संकेत होता अखंड सावधान असणे. ते म्हणतात 'तुका सावधान हेचि देवाचे भजन' या विचार मांडणीत कुठेही भोंगळपणा नाही, भोळसटपणा नाही. या उलट अगदी स्पष्टपणे 'नाठाळाचे माथा हाणू काठी' अशी प्रतिज्ञा आहे आणि 'ऐशा नरा द्याव्या पैजारा मोजूनि' असा सल्ला आहे. ते शिवपिंडीवरच्या विंचवाला वहाणेने ठेचावे असे सांगत होते.
तुकोबांनी माणूसपणाची व्याख्या आपल्या अभंगांमधून मांडली. 'जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले,' 'बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. 'साधूची व्याख्या करताना तुकोबा म्हणाले 'अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ त्याचे गळा माळ असो नसो.' त्यांना अपेक्षित होता वैष्णव धर्म. सारे जग विष्णुमय व्हावे अशी आशा त्यांच्या मनाला लागून राहिली होती. त्यांनी समाज जीवनाचे ऊर्धीकरण मांडले. हा नूतन युगधर्माचा संदेश होता. सामान्य माणूस व देव यांच्यातील दलालीचा हक्क सांगणारा शोधक पुरोहित वर्ग तुकोबांनी नाकारला, थांबवला आणि संपवला. त्यांनी कमालीचे तीक्ष्ण प्रश्न उपस्थित केले. 'कोणे केले बाळा दुधाची उत्पत्ती ऊष्ण काळमासी फुटे तरुवर कोण तयासी जीवन देई.' हे प्रश्न पडले की 'कोण सांगावयासी गेले होते देशोदेश नेले वाऱ्याहाती माप समर्थ तो माझा बाप, ' 'मुंगिचिया घरी कोण धाडी मूळ.
तुकोबा म्हणाले होते 'आम्ही जातो आमुच्या गावा आमुचा राम राम घ्यावा । तुमची आमची भेटी येथूनिया जन्मतुटी. ' या जन्मतुटीबाबत विद्वानांचे मन आणि मत शंकांनी भरलेले आहे. 'तुकोबांचे सदेह वैकुंठगमन की खून' हा श्री. सुदाम सावरकर यांचा ग्रंथ यावर फार भेदक प्रकाश टाकतो. मीरा मुरलीधराच्या मूर्तीत सामावली हे पटत नाही. ती त्या मंदिराच्या मागे लहरणाऱ्या सागरात विलीन झाली असे अधिक तीव्रतेने वाटते. हे असे उदाहरण यापूर्वी नव्हते आणि नंतरही दिसले नाही. तुकोबा गेले निघून हे तर वाईट होतेच पण सर्वांत वाईट हे होते की त्यांची कविता बेपत्ता झाली. इंद्रायणीच्या डोहात बुडवूनही तिला बुडवता न आल्याचा शोक करणाऱ्यांनी हे पापकृत्य केले. एक शतक लोटले. थोर तुकारामभक्त वारकरी त्रिंबक कासार ४० वर्षे हिंडले आणि त्यांनी विखुरलेली मौखिक कविता गोळा केली. १९६९ साली तुकाराम भक्त इंग्रज अधिकारी सर अलेक्झांडर ग्रांट याने पुढाकार घेतला आणि ४५०० अभंगांची गाथा सिद्ध केली. ही गाथा पूर्णपणे निर्दोष नसली तरी अधिकृत आहे हे मात्र खरे. एकटा माणूस समाजपुरुष बनतो आणि तुका आकाशाएवढा बनतो हा एक आध्यात्मिक प्रवास आहे.
- प्राचार्य डॉ. विश्वास पाटील
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मधून)
September 8, 2022

अनादी काळापासून भारतीय संस्कृती ही श्री दत्त अवतारांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. त्यांच्या आत्मज्ञानाचा, ब्रह्मज्ञानाचा संजीवन प्रवाह विश्वाच्या स्पंदनातून, चराचरातुन अखंड अविरतपणे धर्मरक्षणासाठी कार्य करीत आहे. श्री. दत्तात्रेयांचा पहिला अवतार सत्ययुगात महान तपस्वी श्री. अत्रीऋषी आणि महापतिव्रता साध्वी श्री. अनसुया यांच्या तपोबलामुळे झाला. व तो अखंड, शाश्वत. चिरंतन अवतार असल्याने त्याच परंपरेत त्यांचा अवतार मानले जाणारे अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज हे श्री. दत्तात्रेयांच्या तीन प्रमुख अवतारा पैकी श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती आणि श्री. स्वामी समर्थ महाराज एक आहेत. परंतु त्यांचे सर्वच चरित्र अद्भुत, अगम्य व दैवी आहे.
पहीला दत्त अवतार हा प्राचीन असुन सत्ययुगामध्ये (त्रेतायुग) आहे. अशा या अनादीकालापासुन असलेल्या योगिराज दत्तात्रेयांनी कलियुगात प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ शके १२४२ (इ.स.१३२०) निर्वाण शके १२७२ (इ.स.१३५०) व दुसरा अवतार श्रीगुरू नृसिंहसरस्वती शके १३०० (इ.स.१३७८) व त्यांची अवतार समाप्ती शके १३८० (इ.स. १९४५६) आहे. श्री गुरुचरित्रात श्री गाणगापुर येथून निघून त्यांनी गुरुप्रतिपदा (माघ प्रतिपदा) शुक्रवारी शके १३८० रोजी निजानंदगमन केले. त्याचा उल्लेख गुरुचरित्र अध्याय ५१ व ओवी क्र. ४८ मध्ये “आम्हा सांगितले मुनी। आपण जातो कर्दळीवनी । सदा वसो गाणगाभुवनी। ऐसे सांगा म्हणितले।” म्हणजेच नृसिंह सरस्वतीनी देहत्याग न करता ते कर्दळीवनी अदृश्य झाले. नंतर संचार करीत उत्तरपंथी झाले व श्री. नृसिंहसरस्वतीनी काही काळ समाधिस्त रहावे म्हणून ते एका प्रशस्त, निर्वात व योगी जनांचे तपोधाम म्हणून घनदाट अरण्यात गेले. तेथे जवळजवळ ३०० वर्षे समाधिस्त अवस्थेत दिर्घकाळ राहील्याने त्यांच्या शरीरात अर्तंबाह्य पालट घडून आल्यने शरीरावर प्रचंड वारुळ तयार झाले व एकदा एक लाकुडतोड्या त्या ठिकाणी आला असता कुऱ्हाडीचा घाव वारूळात बसून समाधिष्ठीत राहीलेल्या नृसिंहसरस्वतीच्या मांडीपर्यंत पोहचला व त्यांची समाधि उतरल्याने तेच दत्त अवतार श्री. स्वामी समर्थ असे अद्भूत चैत्र शुध्द द्वितीय शके १८३७ च्या सुमारास मंगळवेढ्यास प्रथम प्रकट झाले. त्यांचे अद्भुत प्रकटीकरणाचा इतिहास स्वामी भक्तांना ज्ञात आहे.
श्री स्वामी समर्थ असतांना ब्रह्मनिष्ठ श्री. वामनबुवा (बांबोटीकर) यांनी “श्री समर्थ गुरुलिलामृत" ग्रंथ लिहीला त्याचे आधारे श्री स्वामी समर्थ मंगळवेढे या गावी शके १७६० मध्ये अचानक प्रकट झाले तेथे १२ वर्षे साधना केल्यावर ते अक्कलकोट क्षेत्री येवून खंडोबाचे देवळातील कट्ट्यावर आसनस्थ झाले. त्यांचे अजानबाहु, धिप्पाड, उंच व तेजपुंज शरीर व डोक्यातील प्रखर तेज पाहून गावकरी आश्चर्यचकीत झाले. गावकऱ्यांनी त्यांना सन्मानाने गावात आणले आणि त्यांना कोठून आले विचारले असता ते म्हणाले, “आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण, नाव नृसिंहभान कर्दळीवनातून आलो. मूळ वटवृक्ष दत्तनगर हे धाम, साक्षात अंबा आमचे गुद धूत होती". या श्री स्वामी समर्थाच्या उद्गारावरून ते श्री. भगवान नृसिंहसरस्वतीचा अवतार होते याची जाणीव स्वामीभक्तांना झाली. तेव्हा अक्कलकोट क्षेत्राचे मूळचे नाव प्रज्ञापुरी होते. कालांतराने श्री. स्वामी समर्थ च्या वास्तवामुळे ते तीर्थक्षेत्र झाले. व तेथेच स्वामीचे वास्तव्य वटवृक्ष स्वामी महाराज मठ, बाळप्पा मठ, जोशीबुवा मठ, राजेराय मठ व संस्थानिक मालोजीराव यांचा वाडा या सर्व ठिकाणी संचार व अद्भुत लीला करीत लोकांच्या आत्मोद्वाराचे अनमोल कार्य केले. त्यांच्या भक्तांच्या कथा व लिला स्वामीभक्तांना ठाऊक असल्याने येथे द्विरुक्ती करीत नाही.
स्वामी अवतारकालाचे अलौकिकत्त्व - श्री स्वामी समर्थ यांचा अवतार व कार्य अलौकिक व दैवी असल्याने त्यांच्या वयाच्या व ठिकाणाच्या आगमनाबद्दल त्यांच्या मुखातून प्रकट झालेली दैवीवाणी व ते असताना नगरचे सुप्रसिध्द पिंगळा ज्योतिषी श्री. नाना रेखी यांनी बनविलेली कुंडली पत्रिका व साक्षात त्या खरेपणाबद्दल श्री स्वामीचे उद्गार “क्या देखता है। नौबत बजाऔ ।" हे एकताच नाना दर्ग्यातील नौबतीजवळ जावून ती वाजवू लागले व साक्षात दक्षिणा म्हणून समर्थानी नानांच्या उजव्या हातावर दक्षिणा म्हणून समर्थांनी हातावर आत्मलिंगाचा प्रसाद दिला. नानांच्या हातावर निळ्या रंगाचे लहानसे विष्णुपद उमटले ते त्यांच्या हातावर शेवटपर्यंत होते.
श्री नानारेखी यांनी बनविलेल्या कुंडलीचा पत्रिकेच्या अर्थावरून श्री स्वामी अवतार शके १०७१ चैत्र शुध्द द्वितीया, वार गुरुवार, रास अश्विनी नक्षत्र, दुसरे चरण, प्रतियोग, प्रातःकाली दोन घटिका दिवस, नाडी आघ-गण-देव, यजुर्वेद, काश्यप गोत्र (टोपण नाव नृसिंहभान जन्म नाव-चैतन्यस्वामी मेष राशी (स्वामी मंगळ) हस्तिनापुराजवळील १२ कोसावर छेलेखेडा ग्रामी वडाच्या झाडाखाली धरणी दुभंगून अष्टवर्षीय स्वरुपात म्हणजे बटु रुपात स्वामी प्रकट झाले. (सदर पत्रीका व कुंडली अहमदनगरच्या स्वामी मठात आहे.) स्वामीचा जन्मवेळी लखलखीत अशी शेंदरी कांती जणू गजाननच मूर्तीरूपाने स्वरूपात प्रकट झाले असे चित्तवेधक वर्णन ग्रंथात आहे. या माहिती वरून असे दिसते की, श्री नृसिंह सरस्वती निर्वाण शके १३८० व श्री. स्वामी समर्थांनी घेतलेली समाधी शके १८०० मध्ये यावरून स्वामीचे आयूष्य ७२९ वर्षाचे ठरते. हे सर्व अघटीत, अलौकीक व दैवी आहे. हे मान्य करावे लागेल त्यांच्या जवळजवळ ८०० वर्षांचा कालखंडाचा शोध व सस्तुनिष्ठ आढावा घेण्याचे कार्य अनेक स्वामी चरित्राकारांनी प्रदान केले आहेत. त्या प्रसंगी लेखकापैकी श्रीपाद शास्त्री किंजवडेकर यांचे स्वामी चरित्र कार्य खंड तसेच श्री स्वामी चरित्रांचे सविस्तर तीन खंडात चरित्र लेखन करणाऱ्या स्वामी अभ्यासक विदुषी प्रा. नम्रता भट, आशीर्वादाने करीत आहेत व श्री समर्थ गुरुलिलामृत या ग्रंथातही एक इंग्रज बॅरिस्टर व त्यांचेबरोबर आलेले पारशी गृहस्थ यांनी अक्कलकोट येथे मोदी वाड्यात भेट घेतल्याच प्रसंगी, त्यांनी श्री स्वामींना विचारले की, आपण कोठून आलात? तेव्हा स्वामींनी त्यांना सविस्तर कालखंड उलगडून दाखवितांना सांगितले की ते कर्दळीवन, कलकत्ता, बंगाल, गंगातटाक हरिद्वार, केदारेश्वर, गोदावरी, हैद्राबाद व मंगळवेढ्याची प्रकट हकीकत सांगितली आहे. त्या वरून त्याचे अवतारकार्य दैवी आहे.
श्री स्वामी महाराजांचे अलौकिक रुप व लीला - श्री स्वामी महाराजांची कांती दिव्य व शरीराचा वर्ण तेज:पुंज व ते आजान बाहू होते. त्यांच्या शरीरावर इतके तेज प्रखर असे की त्यांच्याकडे एकसारखी दृष्टी लावून कोणी पाहू शकत नसत. त्यांची काया सुंदर होती. गंडस्थळ शोभिवंत, नासिका सरळ, भिवया उत्तम, नेत्रकमळ दिव्य व कपाळ भव्य होते. कमरेस मेखलेची शोभा असे. ते कौपीन नेसत. त्यांच्या मांड्या केळीच्या खांबासारख्या दिसत. डोक्यात कधी वुलनाची गोल टोपी असे. हाताचे तळवे व त्यांचे चरण कमलासारखे कोमल होते. कान मोठे व ऊर विशाल होते. पोट लंबोदरासारखे. त्यांची अवस्था बालपिशाच्य अवधूत योग्यासारखी असे. त्यांचे चालणे तेज असे. त्यांच्या बरोबर चालणाऱ्याला धावावे लागे. त्यांचे लांब पायाचे आसन जमिनीशी समांतर असे. त्यांच्या चलन वलनाला स्थळ काळाचे बंधन नसे. देहक्रीडा विक्षीप्त होत्या. कधी सामान्य माणसासारखे बोलत. तर कधी लहान मुलासारखे निरागस, तर कधी रागीट मुद्रा धारण करीत. हातात अंगठी व विश्वरुप गोटी होती. ती हातात घेवून क्रीडा करीत. कधी लंगोटी फेकून देत तर मुखी खेटर लाव, जुते मारेंगे म्हणत कधी आरती पालथी करीत पुराणे प्रवचने बंद करीत. रागात कधी कुणी दर्शन घेणाऱ्याला छाटी, जोडे फेकून मारीत पण भक्तांना मात्र तो कृपाप्रसाद असे. त्यांच्या सामान्याच्या, अहंकारी दांभिक योगीयांचा पाणउतारा करण्याच्या तहा विचीत्र असत. सर्व जण त्यांना वचकून असत ते ईश्वर चिंतनात सदा मग्न असत ते शांतीब्रह्म, दया करूणा क्षमेचे सागर होते. ते नेहमीच अंर्तयामी निजानंदी, नित्य- जागृत व स्वतःच्या मायेत रमत. त्यांना भक्ताकडून निर्मळ प्रेम व, श्रध्दा हवी असे. त्यांना नामाचे महत्व अपार असे कारण ते स्वत: ईश्वर चिंतनात राहून स्वत: देखील “जय शिवशंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो” असा जप करीत.
स्वामी कार्य व उद्देश - श्री. स्वामी महाराज असतांना त्यांच्या दर्शनास अनेक राजे, शास्त्रीपंडीत, कीर्तनकार, प्रवचनकार, योगी व क्रांतीकारक देशभक्त येत असत. त्यांच्या मनातील भाव ओळखुन ते वर्तन करीत व उपदेश देत त्यांच्या निःसीम सेवेत श्री बाळप्पा, चोळप्पा, सुंदराबाई, मालोजीराजे हे असत. त्यांच्या प्रभावात आलेले अनेक शिष्य पुढे लोकोत्तर संत झाले व त्यांनी स्वामीमठ बांधून अनमोल कार्य केले त्या मध्ये श्री. तात महाराज, श्री. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, श्री. शिवराम बावडेकर, श्री रामानंद बीडकर, ब्रह्मनिष्ठ श्री वामन बुवा, आळंदीचे श्री. नृसिंह सरस्वती, श्री. गोपाळ रामचंद्र केळकर, क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके इ. सत्पुरुषांचा समावेश आहे. त्यांची कठोर परीक्षा घेवून नंतरच त्यांचेवर कृपा केली.
त्यांच्या कार्याचा उद्देशच मुळी सामान्यांना दु:खापासून दिलासा व उन्मत्त व अहंकारी, दांभिकाना वठणीवर आणण्याचा असे हे ईश्वरी अवतार असल्याने त्यांना अनेक सिध्दी प्राप्त होत्या पण लोककल्याणासाठी त्यांनी वापर केला. त्यांनी लोकांना अंधश्रध्दा दूर करुन त्यांना खऱ्या भक्ती मार्गाला लावले. त्यांना सोवळे- ओवळ्यास कर्मकांड, कोंबडे-बकऱ्याचे बळी देण्यास प्रखर विरोध असे. उदाहरणादाखल एक कथा सांगतो. अक्कलकोट शहरात सारसबागेत एक खोलगट दगड होता. अक्कलकोट निवासी त्या दगडाला गानदेवी म्हणत. ती गानदेवी नवसाला पावते असे समजून लोक कोंबड्या बकऱ्याचा बळी देत. स्वामीनी त्या दगडाचा शौचकूप म्हणून उपयोग करण्यास सुरुवात केली व लोकांना तो दगड गानदेवी नसून घाणदेवी आहे हे पटवून दिले. बुवाबाजी, भोंदुगिरी, जादुटोणा, मंत्रतंत्र करणाऱ्या भोंदु साधूंना ते सळो की पळो करुन सोडत. एके दिवशी स्वामीचा सेवेकरी चोळप्पा याच्या घरात घुबड शिरले ते अपशकून मानून चोळप्पाने घरी जाणे बंद केले. स्वामींना कळल्यावर स्वामी चोळप्पाच्या घरी जावून राहीले व घुबडाला हातात घेवून सोडून दिले.
अशा रितीने स्वामीचे सर्वच चरित्र अदभुत व दैवी आहे. लोकांच्या आत्मोउद्दारासाठी त्यांचा अवतार होता.
त्यांनी शके १८०० चैत्र वैद्य १३ ला अवतार समाप्त केला तरी त्यांच्या केवळ श्रध्देने "श्री स्वामी समर्थ " या सिध्द नाम जपाने लोकांना आजही अनेकांना प्रत्यक्ष दर्शन देवुन “हम गया नही जिंदा है ।” ही दिव्यत्वाची प्रचीती येते. त्यांच्या पुण्यतीथी निमीत्त साक्षात त्रिवार वंदन.
-- श्री. उमेश जाधव.
मो: ९६६४८८८७१३
सौजन्य: गुरुतत्व मासिक, वर्ष ३ रे, अंक १ ला.
July 25, 2022
कार्यकारणभाव, विज्ञान यांकडे दुर्लक्ष करु नये. एखाद्या कथित ‘चमत्कारामागील कार्यकारणभाव समजला, की तो चमत्कार – “चमत्कार” राहत नाही, ती केवळ घटना ठरते. मात्र, आज हे होताना दिसत नाही…
January 12, 2019
भारतीय संस्कृतीमध्ये या दिवसाला फार महत्वाचे स्थान आहे. वास्तविक तिळगुळ देण्यामागील भाव असा आहे की तीळ हे अतिशय सूक्ष्म असलेल्या मनुष्य आत्म्याचे प्रतीक आहे आणि गुळाची गोडी हे आत्मिक प्रेमाचे प्रतीक आहे.
January 14, 2022
गडकरी यांची ओळख मुख्यत्वे करुन नाटक आणि कविता वरुन होते.... परंतु त्यांच्या या पैलु विषयी फार थोड्या रसिकांना माहिती असेल.
चिमुकली इसापनिती हे गडकर्यांचे सर्वांत छोटे म्हणजे जेमतेम १० पानांचे पुस्तक बालकांसाठी आहे. त्यात मुलांसाठी इसापनितीतल्या गोष्टी गडकर्यांनी लिहील्या आहेत. त्या गोष्टींचं वैशिष्ट्य म्हणजे गडकर्यांनी जाणीवपूर्वक एकही जोडाक्षर आपल्या ह्या लिखाणात येऊ दिलेलं नाही. त्यातील काही कथा--
कथा-१
कथा पहिली
एका उंदराची एका बेडकाशी फार ओळख होती. उंदीर एका घरातील कोठीत राहात होता व बेडकाचे घर एका नदीत होते. एकदा उंदराने बेडकाला आपले घरी जेवावयास बोलाविले होते. पुढे बेडकाने उंदराला आपले घरी बोलाविले. पण नदीतून उंदराला बेडकाचे घरी जाता येईना. कारण उंदराला मुळीच पोहता येत नाही. मग बेडकाने एक तोड काढली. उंदराचे पाय आपले पायास बांधले आणि आपण पोहू लागला. यामुळे उंदीर बुडाला नाही खरा; पण नाका-तोंडात फार पाणी जाऊ लागले आणि निंमे वाटेतच बिचारा उंदीर तडफडून मेला. परंतु उंदराचे पाय बांधले होते आणि बेडूक सारखा पोहत होता. यामुळे तो मेलेला उंदीर तळाशी बुडाला नाही. पण तसाच वर तरंगत होता. हे वरून एका गरुडाने पाहिले. लागलीच गरुडाने खाली झेप टाकली आणि तो उंदरास वर नेऊ लागला. पण बेडकाचे पायही उंदराला बांधलेले होते; यामुळे तोही उंदराबरोबर वर गेला. गरुडाने दोघांनाही घरी नेले आणि खाऊन टाकले. पहा, भलती संगत केली यामुळे असे झाले. बेडूक नदीत राहणारा आणि उंदीर जमिनीवर राहणारा. यामुळे या दोघांची मेजवाणी एका बाजूस राहिली आणि गरुडाची बरीक मेजवानी झाली. यासाठी संगत फार विचाराने करावी.
कथा दुसरी
रामा व हरी या नावाचे दोघे सोबती रानातून वाट चालत होते. रामा अंगाने बराच बोजड होता; पण हरी अगदीच सडपातळ व चपळ होता. झाडीतून एखादे जनावर येईल आणि आपणाला खाईल अशी रामाला सारखी भीती वाटत होती. हरी फार बढाईखोर होता. तो रामाला फुशारकीने उगीच धीर देत होता. तो एकसारखा रामाला हसत होता आणि सांगत होता की, ''रामा, तू फार भितोस बुवा! अरे, एखादा वाघ आला तरी मी आहे ना! मी ताबडतोब तुझे रक्षण करीन.'' असे बोलत ते चालले आहेत तोच झाडीतून एक मोठी आरोळी ऐकू आली. आरोळी ऐकताच दोघेही फार घाबरले. हरी सडपातळ आणि चपळ होता; रामाला तसाच टाकून तो भरभर एका झाडावर चढून गेला. बिचारा रामा बोजड होता. तो हरीसारखा झाडावर कसा चढणार? मग तो तसाच डोळे मिटून जमिनीवर पडला! जसा काही तो मेलेलाच आहे. रामाला माहीत होते की, सिंहाला मेलेली शिकार आवडत नाही. लौकरच झाडीतून एक भला मोठा सिंह बाहेर आला. रामाला पाहताच सिंह जवळ आला आणि रामाचे नाक-कान हुंगू लागला. तो भयंकर सिंह इतका जवळ आला तरी रामाने अगदी हालचाल केली नाही व नाकातून वाराही बाहेर जाऊ दिला नाही. हरी झाडावरून हे सारे पाहात होता. अखेर, रामा मेलेला आहे असे सिंहाला वाटून तो निघून गेला. लागलीच हरी खाली उतरला व दोघेही फिरून वाट चालू लागले. आपण रामाला फसविले याची हरीला लाज वाटतच होती; पण ते सारं हशांवारी घालवावयासाठी हरीने रामाला विचारले, ''काय रे, सिंहाने एवढे तुला कानात काय सांगितले?'' रामा बोलला, ''हरीसारखा लबाड सोबती कामाचा नाही; बढाईखोर माणसावर भरवसा ठेवू नये, असे सिंहाने मला सांगितले आहे.'' हे ऐकून हरी फारच खजील झाला.
कथा ३
एका माणसाजवळ एक गाढव होते. तो माणूस वाणी होता. तो परगावी सामान विकत घेई आणि गाढवावर लादून आपले घरी आणी. एकदा तो वाणी गाढवावर मिठाची गोणी लादून ती घरी आणीत होता. वाटेत एक लहानशी नदी होती. नदीतून जाताना गाढवाचा पाय घसरला आणि ते नदीत पडले, तोच पाणी मिठाचे गोणीत शिरले व बरेच मीठ विरघळून गेले. फार मीठ विरघळले होते यामुळे गाढवाचे ओझे अगदी हलके झाले. पुढे काही दिवसांनी वाणी मिठाची दुसरी खेप घेऊन आला. नदीजवळ येताच गाढवाला मागील खेपेची आठवण झाली. लागलीच ते जाणूनबुजून पाय चुकवून नदीत पडले. पुन्हा मीठ विरघळून ओझे हलके झाले. आणखी दोन-चार वेळा गाढवाने तसेच केले. शेवटी गाढवाची ही लबाडी मालकाला कळून चुकली. दुसरे खेपेस गाढवावर खूपसा कापूस लादून तो घरी येऊ लागला. पुन्हा नदीजवळ येताच गाढव खाली पडले. पण या वेळेस कापूस विरघळून भार कमी झाला नाही; उलट पाणी कापसात शिरून ओझे जड बरीक झाले. मोठे ओझे पाठीवर पडून ते लबाड गाढव भाराखाली चेंगरून गेले. मुलांनो, याकरिता आपले काम नेहमी इमानाने करावे. लबाडी केली तर ती कधीतरी उघडकीस येते व आपणास फारच मोठी शिक्षा घडते.
कथा चौथी
एकदा उंटाने देवाजवळ तक्रार केली की, ''देवा, तू बाकीची जनावरे किती चांगली केली आहेस; कोणाला नखे दिली आहेस, कोणाला सुळे दात दिले आहेस आणि कोणाला शिंगे दिली आहेस, यामुळे ती जनावरे आपापले रक्षण करितात; पण मला तेवढे काहीच दिले नाहीस; मग मी आपले रक्षण कशाने करावे? बरे तर देवा, मला निदान शिंगे तरी दे.''देवाने सांगितले की, ''बाबा रे, तू चांगला मोठा आहेस. तुला पाहूनच दुसरी जनावरे भिऊन पळून जातील; तुला शिंगे काय करावयाची आहेत?'' देवानी अशी समजूत घातली; पण उंट आपला हेका सोडीना. अखेर देवाला कंटाळा आला तरी उंटाची कुरकूर चाललीच होती, हे पाहून देवाने उंटाला शिंगे तर दिली नाहीतच; पण मूळचे उंटाचे मोठाले कान बरीक कापून टाकले. उंटाचे कान लहान असतात याचे कारण हेच. मुलांनो, हा अधाशीपणाचा परिणाम बरे! यासाठी नेहमी समाधानाने रहावे.
संदर्भ :- रामगणेश गडकरी यांचे संकेत स्थळ
संकलन - समीर सप्रे
June 14, 2017
कपालभातीकड़े आजार घालवणारा प्राणायाम म्हणून पाहिलं जातं. कपालभाती करून जे कुबड्यांशिवाय चालू शकत नव्हते ते कुबड्यांशिवाय पळू लागलेले मी पाहिले आहेत. कपालभातिमुळे साधक आत्मनिर्भर होतो. स्वयंपूर्ण होतो.
कपालभातीने हार्टमधले ब्लाॅकेज पहिल्या दिवसापासून उघडू लागतात व् 15 दिवसात पूर्ण ओपन होतात. कोणतेही औषध न घेता. कपालभाती करणार्याच्या हार्टची कार्यक्षमता वाढते. हार्टची कार्यक्षमता वाढवणारे कोणतेही औषध उपलब्ध नाही. हार्ट फंक्शन नॉर्मल रहातं. अजुन एक सांगते, कपालभाती करणाऱ्याचं हार्ट कधीच बन्द पडत नाही. हल्ली 70 ते 80 टक्के लोक हार्ट बन्द पडल्याने मरतात.
कपालभाती केल्याने शरीरांतर्गत व शरीरावरील कोणत्याही प्रकारची गाठ डीझाॅल्व होते. कपालभातीने शरीरात हिट जनरेट होते त्यामुळे गाठी विर्घळतात. मग ती ब्रेस्ट मधली असो अथवा चेस्ट मधली असो. ब्रेनमधला ट्यूमर असो अथवा ओव्हरी मधले सिस्ट असो अथवा यूटेरस मधले फाइब्रॉइड असो. नाव अनेक असले तरी गाठी होण्याची टेंडेंसी एकच असते.
कपालभातीने वाढलेलं कोलेस्टेरोल कमी होते. मुख्यबाब ही आहे की कपालभाती करू लागल्यावर पहिल्याच दिवशीपासून कोलेस्टेरोलची गोळी बंद करायला सांगतात.
कपालभातीने वाढलेलं ईएसआर, यूरिक एसिड, एसजीओ, एसजीपीटी, क्रिटेनिन, टीएसएच, हार्मोन्स, प्रोलक्टीन लेव्हल नॉर्मल होऊ लागते. कपालभाती केल्याने हीमोग्लोबिन एका महिन्यात 12% पर्यन्त पोचते. हीमोग्लोबिन वाढीच्या एलोपेथिच्या गोळ्या खाऊन कधीही कोणाचे हीमोग्लोबिन वाढलेले पाहिले नाही. एका वर्षात 16 ते 18 पर्यन्त जाते. महिलांच हीमोग्लोबिन 16 व् पुरुषांच्ं 18 असायला हवे. हे उत्तम लक्षण मानले जाते.
कपालभातिमुळे महिलांच्या पिरिएड्सच्या सर्व तक्रारी एका महिन्यात सामान्य होतात. हे पहाण्यात आले आहे.
कपालभातिमुळे थायरॉइडचे आजार एका महिन्यात गायब होतात. याच्याही गोळ्या पहिल्या दिवसापासून बन्द करायला सांगितले जाते. हे कपालभातीमुळे होते.
एवढंच नाही तर, कपालभाती करणारा 5 मिनिटात मनाच्या पलीकडे जाता. गुड़ हार्मोन्स क्रिएट होऊ लागतात. स्ट्रेस हार्मोन्स गायब होतात. मनाचा व् शरीराचा थकवा नाहिसा होतो. कपालभातीने जी एकाग्रता येते ती इतरत्र येत नाही. किती विशेष आहे पहा.
कपालभातीने प्लेटलेट्स वाढतात. WBC. व्हाईटब्लड सेल्स, RBC. रेडब्लड सेल्स कमी किंवा जास्त झाल्या असतील तर त्या करेक्ट होतात. बैलन्स होतात.
कपालभातीने सर्व बैलन्स होते. कुणी अंडरवेट रहात नाही नी कुणी ओव्हरवेट रहात नाही. दिवसाला एक एक किलो वजन कमी होते. वजन कमी किंवा वाढवण्यासाठी कपालभाती सारखा दुसरा उपाय नाही. कपालभातीने शरीर संतुलित रहते. अंडरवेट असणं जसा आजार आहे तसं ओव्हरवेट असणं ही आजारच आहे.
कपालभातीने कोलायटिस, अल्सरीटिव्ह कोलायटिस, अपचन, मंदाग्नि, संग्रहणि, जीर्ण संग्रहणि, आव असे शौच लागणार आजार बरे होतात. कोंस्टीपेशन, गैसेस, एसिडिटी हेही बरे होतात. समस्त पोटाच्या तक्रारी कपालभातीने दूर होतात.
कपालभातीने पांढरेडाग, सोरायसिस, एक्झिमा, लिकोडर्मा, स्कियोडर्मा असे त्वचारोग बरे होतात. स्कियोडर्मा वर जगात औषध नाही, जो कपालभातीने बरा होतो. पोट खराब असल्यानेच त्वचारोग येत असतात. जस जसे पोट ठीक होत जाते तस तसे त्वचारोगही बरे होत जातात.
अर्थ्राइटिस मधला अजुन एक प्रकार र्होमिटाइड अर्थ्राइटिस म्हणजे आर ऐ फैक्टर पॉझिटिव्ह होणं. अर्थात इथे हाडांमधे विकृति येते. हाडांमधे टॉक्सिसिटी वाढते. एस्ट्रो अर्थ्राइटिस म्हणजे, हाडांमधल्या कुशन्सची झिज होते, कार्टिलेज तुटतात, लिगैमेट्स झिजतात, सांधे झिजतात. एस्ट्रो अर्थ्राइटिस मधे डॉक्टर्स औषध म्हणून स्टीरॉयड देतात. मेडिक्लसायन्स सागतं, स्टिरोइड मुळे एस्ट्रो पोरोसिस होतो. म्हणजे हाडं कमजोर होतात, ठिसुळ होतात. गम्मत बघा, एस्ट्रो अर्थरायटिसमधे स्टिरोइड दिल्याने हाडं ठिसुळ होतात व् त्याच रुग्णास स्टिरोइड दिल्याने एस्ट्रो पोरोसिस होतो. म्हणजे एक आजार जात नाही व् दूसरा आजार निर्माण केला जातो. असं आहे मेडिकलसायंस. विज्ञानाच्या नावावर अज्ञान आहे की नाही.
कपालभातीने छोटी इंटेस्टाइनला संपूर्ण व्यायाम होतो. व्यायामाने अन्न पचु लागतं. अन्न पचल्याने, कैल्शियम, मैग्नेशियम, फॉस्फर्स, प्रोटीन्स आतड्यात शोषल जातात. कैल्शियम, मैग्नेशियम, फॉस्फर्स, प्रोटीन्स अव्हेलेब्ल झाल्याने , कुशन्स, लिगैमेंट्स, हाडं बनु लागतात व् 3 ते 9 महिन्यात, अर्थ्राइटिस, एस्ट्रो अर्थ्राइटिस, एस्ट्रो पोरोसिस यासारखे हाडांचे आजार कायमचे बरे होतात.
लक्षात ठेवा कैल्शियम, प्रोटीन्स, हीमोग्लोबिन, व्हिटैमिन्सच्या गोळ्या न पचताच शरीर बाहेर टाकते कारण केमिकल्स द्वारे बनलेल्या गोळ्या शरीरात शोषण्याची व्यवस्था नाही. आपल्या शरीरात रोज 10% बोनमास चेंज होत असते. ही क्रिया जन्मापासून मृत्यु पर्यन्त अखण्ड चालु असते. ती काही कारणाने बंद पडली की हाडांचे आजार येतात. कपालभाती ही क्रिया बंद पडु देत नाही. त्यासाठी कपालभाती नियमित केलीच पाहिजे.
विचार करा प्राणायामामधली एक क्रिया किती फायदे देते. एवढे फायदे एकाच ठिकाणी दुसरीकडे कुठेही मिळत नाहीत, म्हणून प्राणायाम सर्वश्रेष्ठ आहेत.
एक महत्वाची गोष्ट की आजारी, रोगी यांनी प्राणायाम योग्य, अनुभवी तज्ञाकडूनच शिकले पाहिजेत. अन्यथा गड़बड़ होऊ शकते.
करा योग रहा निरोग.
-- डॉ. गौरी पाटील
निसर्गोपचार तज्ञ
9820584716
April 25, 2017
भारताची लोकसंख्या बेसुमार वाढत आहे आणि त्याला आळा घालण्यासाठी कुटुंब नियोजनाच्या दृष्टीने ही घोषवाक्य काळानुसार रचली गेली. सध्या सुशिक्षित वर्गात एक अपत्य किंवा फार तर दुसरे अपत्य असते असे प्रत्यक्षात आढळते. क्वचित प्रसंगी मनोवृत्ती पण दिसून येते. म्हणजे शिवाय सरोगसी पण आता प्रचलित होऊ लागली आहे. ऐहिक सुखांच्या उपभोगासाठी मुले न होऊ देण्याची ही प्रवृत्ती निसर्गचक्राच्या विरुद्ध आहे.
November 25, 2024
देवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ उर्जा असते.
देवळे म्हणजे जणू काही ब्रम्हांडाचा/भोवतालचा पंचमहाभूतांसहीत असलेला छोटासा तुकडाच जणू.
सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त शुभ उर्जेची जागा निश्चित झाली की तिथे खड्डा खणून त्यात एक तांब्याचा तुकडा टाकला जाई. तांबे हे वीज वचुंबकीय उर्जेचे उत्तम वाहक ( good conductors) आहेत हे आपल्याला माहित आहेच. त्यामुळे जास्तीत जास्त शुभ चुंबकिय वैश्विक उर्जा स्वतःत सामावून घेऊन नंतर ती भोवताली रेडीएट करणे हा तांब्याचा तुकडा मुर्तीखाली ठेवण्यामागचा प्रमुख उद्देश.
त्यानंतर विधीपूर्वक मुर्तीची प्रतिष्ठापना केली जाई व त्यानंतर त्याभोवती मंदिर बांधले जाई.
आता देवळात जातांना काय करावे, कसे दर्शन घ्यावे ह्याबाबत आपण जे नियम पूर्वापार पाळत आलो आहोत त्यातही 100% विज्ञान कसे आहे ते पाहू.
1) देवळात जाण्यापूर्वी आपण चपला/बूट काढून पाय धूवून मगच मंदिरात प्रवेश करतो........
ह्यामागे स्वच्छतेचे कारण आहेच, की आपण चपला/बूट घालून सर्वत्र फिरत असतो. मंदिरातील शुभ व पवित्र व्हायब्रेशन्स (positive & pure vibrations) दुषित होऊ नयेत हा एक उद्देश. पण त्याहीपेक्षा एक मोठे वैज्ञानिक सत्य यामागे दडलेले आहे. मंदिराच्या मध्यभागातील फरशी अशी निवडलेली असे ( उदा. संगमरवर ) की ती मंदिरातील शूभ उर्जेची ती उत्तम वाहक ती असेलच पण आपण जेव्हा तिच्यावरुन अनवाणी (bare footed) चालू तेव्हा तळपायावर असलेल्या एनर्जी पाॅइंटस् मधून ती आपल्या शरिरात प्रवेश करेल.
जर तुमची पंच ज्ञानेद्रिये receiving mode मध्ये असतील तरच मदिरातील शुभ उर्जा तुम्ही स्वतःमध्ये सामावून घेउ शकाल,तेव्हा पुढचे नियम त्याकरीता..
2) मंदिराच्या गर्भगृहात/मूलस्थानात प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशव्दाराशी असलेली घंटा वाजवणे......
ह्यामागेही दोन उद्देश आहेत.. पहिला म्हणजे.. ह्या घंटा विशिष्ट सप्तधातू योग्य प्रमाणात घेऊन बनविल्या जातात. घंटा वाजविल्यानंतर ती तीव्र परंतू किमान सात सेकंद रहाणारा प्रतिध्वनित नाद निर्माण करतील अशा बनविल्या जातात. घंटा वाजवून पुढे निघून न जाता तिच्या खाली उभे राहून नादाची व्हायब्रेशन्स स्वतःमध्ये सामावून घेणे. ह्यामुळे आपली सप्तचक्र तर उद्दीपित होतातच,पण आपला उजवा व डावा मेंदू एकतानतेने ( inco-ordination) काम करु लागतात. तसेच आपल्या मनातील नकारात्मकविचारांचा निचराही होतो. गर्भगृहातील मूर्तीमध्येही ही व्हायब्रेशन्स शोषली जातात.
3) आपले पांच sences म्हणजे दृष्टी, ऐकणे, स्पर्श, चव घेणे, वासघेणे. यापुढील रुढी हे पांच सेन्सेस उद्दीपित करतात.
अ. कापूर जाळणे -- दृष्टी
ब. कापूरारतीवर हात फिरवून ते डोळ्याना लावणे... स्पर्श
क. मुर्तीवर फुले वाहणे...फुलांच्या अरोमामुळे वास.
क. कापूर व तुळशीपत्र घातलेलेतीर्थ प्राशन करणे..चव.
हे तीर्थ तांब्याच्या / चांदीच्या भांड्यात 8 तास ठेवलेले असते, त्यामुळे कफ- ताप असे आजारही जातात.
ड. घंटानाद व मंत्रोच्चरण....ऐकणे.
अशाप्रकारे उद्दीपित अवस्थेत व reveiving mode मध्ये आपण गर्भगृहातील आवश्यक तेवढी शुभ उर्जा स्वतःत सामावून घ्यायची असते.
मूर्तीच्या मागील बाजूस व भोवताली पसरलेली उर्जाही मिळावीम्हणून प्रदक्षिणेचे प्रयोजन..
पूर्वसुरी म्हणतात, हे सगळे केल्यावर पटकन गजबजाटात जाऊ नका. मंदिरात जरा वेळ टेका. शरिरात उर्जेला समावायला, settle व्हायला वेळ द्या आणि अत्यंत शांत मनाने, आनंदाने, उर्जापूर्ण अवस्थेत आपल्या कामाला जा.
मित्रमैत्रिणींनो आपल्या पुढच्या पिढीला देवळात कां जायचे हा मोठ्ठा प्रश्न पडलेला असतो. ह्यापुढे देवळात जाण्यामागचा उद्देश लक्षात घेऊनच मंदिरात जा आणि पुढच्या पिढीपर्यत हे ज्ञान पोहोचवण्यासाठी मदत कराल हिच अपेक्षा..
मुळात हिंदू धर्म हा एकमेव असा धर्म आहे जो science वर आधारित आहे
|| श्री स्वामी समर्थ ||
-- WhastApp वरुन
August 16, 2017
“रेझोनांस” म्हणजे काय ....? आणि त्याची शक्ती काय आहे
मित्रानो
सोशल मिडीयावर एप्रील मे मध्ये एक मेसेज खुप व्हायरल झाला होता
सर्वानी एक प्रार्थना करा किंवा आशी चर्चा करा यांदा खुप पाऊस पडनार आहे व त्या पद्धतीचे मेसेज फाँरवर्ड करा
त्या मागचा वैदिक विचार एव्हढाच होता की पोझिटिव्ह एनर्जी तयार होऊन पावसासाठी पोझिटिव्ह वातावरण तयार होईल
आणी तसेच होऊन आज चोहीकडे छान पाऊस पडतोय
पूरातण वैदीक पद्धती या विज्ञानावरच आधारीत आसुन या मध्ये पोझिटिव्ह लहरी निर्मान होऊन मनुष्य जिवनाला त्याचा फायदाच होतो
आपण जेव्हा एकट्याने प्रार्थना करत असतो, उपासना करत असतो तेव्हा त्या उपासनेला व्यष्टी अथवा व्यक्तिगत केलेली उपासना म्हणतात. ही उपासना नित्य म्हणजे प्रतिदिन [ अरबी फारसी शब्द “रोज” ] केली जाणारी प्रार्थना, नैमित्तिक म्हणजे विशिष्ट कार्यासाठी केली जाणारी उपासना हे यातले मुख्य दोन प्रकार आहेत. हेच दोन्ही प्रकार समष्टी म्हणजे सामुहिक प्रार्थनेला सुद्धा लागू होतात. पण सध्या हिंदू बांधव सामुहिक प्रार्थना करणे विसरले आहेत. आणि कधी केलीच तर ती आरतीच्या स्वरूपात. आणि तीही आरडा ओरडा करत, चुकीच्या पद्धतीने आणि चुकीचे शब्द म्हणत. हिंदू प्रार्थनेला एकत्र येत नाहीत ही अत्यंत वाईट आणि घातक गोष्ट आहे.
सर्वप्रथम आपण रेझोनांस म्हणजे काय ते पाहू. रेझोनांस....अर्थात एका वस्तूचे, अणूचे किंवा कोणत्याही एका गोष्टीचे स्पंदन दुसऱ्या एखाद्या गोष्टीशी जुळणे याला रेझोनांस असे म्हणतात.
१] मायक्रोवेव्ह च्या फ्रिक्वेन्सी बरोबर अन्नातील पाण्याची फ्रिक्वेन्सी जुळवली जाते आणि रेझोनांस उत्पन्न होऊन उष्णतेची निर्मिती होते आणि अन्न शिजते.
२] रेझोनांसचे हेच तंत्र संगीतातही वापरले जाते. ज्या वेळेस दोन तारांच्या कंपन पावणाऱ्या Frequency किंवा वारंवारीता जुळते त्या वेळेस दुसरीही तार आपोआप कंप पावू लागते.
३] MRI अर्थात Magnetic Resonance Imaging या तंत्रज्ञानातही रेझोनांसचाच वापर केला जातो. पेशंटला ज्या Scanner खाली झोपवतात तो Scanner पृथ्वीच्या Magnetic Field ८००० पट जास्त शक्तीचे Magnetic Field उत्पन्न करतो. पेशंटच्या शरीरातील हायड्रोजनचे अणूतील Protons या MF बरोबर अलाईन होतात म्हणजे MF च्या प्रमाणे जुळवून घेतले जातात. नंतर जेव्हा Redio -Frequency त्यांच्यावर सोडली जाते त्यावेळेस हे Protons MF च्या उभ्या दिशेत फिरायला लागतात. आणि Protons ची ही सगळी माहिती Redio -Frequency च्या Coil कडे पाठवली जाते. ह्या Protons चे वेगवेगळ्या प्रकारच्या पेशीतील वर्तन हे वेगवेगळे असते. हे Protons पाण्यात मेद किंवा चरबीपेक्षा कमी वेगाने शांत होतात. ही माहिती साठवली जाते, ताडून पाहिली जाते आणि मग पेशंटला काय विकार असेल त्याचे निदान केले जाते.
आता आपण धर्मातील रेसोनांस कडे वळू.
जेव्हा भजन, प्रार्थना, उपासना यासाठी एका विशिष्ट देवाच्या मंदिरात, विशिष्ट गुरुंच्या दरबारात एका भावनेने जमलेले लोक प्रार्थना करतात तेव्हा तेथे जितके लोक असतील त्यांची शक्ती कमी न होता ती भूमिती श्रेणीने एकमेकांना मिळते. अर्थात ती १+१= २ अशी वाढत न जाता तेथे चार जण प्रार्थना करत असतील तर ४*४=१६ म्हणजे चार चोक सोळा पटीत वाढत जाते. याचा एकत्रित प्रार्थना करणारयांना इतक्या प्रचंड प्रमाणात लाभ होतो. याच तत्वाचा काही धर्मांमध्ये फार सुंदर उपयोग करून घेतला आहे. हिंदू धर्मातील आरतीमध्ये हेच अपेक्षित आहे. परंतु त्यात भक्तीपेक्षा गोंधळ आणि चुकीच्या आरत्या म्हणणे यामुळे फायदा होताना दिसून येत नाही. ओम सहनाववतु .....या प्रार्थनेत एकत्र येऊन कार्य करण्याविषयीच सांगितले गेले आहे. त्यात ऋषी म्हणतात की आपण एकत्र येऊन प्रार्थना करू, एकत्र भोजन करू, एकत्र कार्य करू आणि एका विद्वेषरहित समाजाची निर्मिती करून खूप मोठी कार्ये पार पाडू. पराक्रम करू. ही शिकवण आज आपण विसरलो आहोत. रस्त्यावरून जाता जाता एका हातानेच देवाला नमस्कार करून आपण आपले "कर्तव्य" पार पाडायला लागलो आहोत.
मन:शक्तीच्या परमपूज्य श्री विज्ञानानंदांनी [ पूर्वाश्रमीचे श्री. भिडे ] रेझोनांसचे फार छान उदाहरण दिले आहे. एकदा अमेरिकेतील एका शहरात लष्कराचे संचलन चालू असते. आणि हे संचलन करता करता हे जवान एका लष्करी पुलावरून जावू लागतात. आणि हा शक्तिशाली पूल जो प्रचंड मोठ्या, अवजड लष्करी वाहनांनी आणि रणगाड्यांनीही पडला नाही तो या एका सुरात, एका तालात, एका ध्येयाने प्रेरित झालेल्या सैनिकांच्या संचलनाने पडला. यातही कारणीभूत आहे हा रेझोनांसच .......
मला असे नेहमी वाटते की ज्ञानेश्वरांनी जेव्हा त्यांना कोणीच मडके दिले नाही तेव्हा स्वत:च्या पाठीवर मांडे भाजले होते तेव्हा हे रेझोनांसचे तत्व किंवा शरीरातील स्थिर विद्युत यापैकी कशाचा तरी वापर केलेला असावा. स्थिर विद्युत निर्माण होताना त्या विद्युत निर्माण करणारया वस्तुत उष्णता निर्माण न होता ती जी वस्तू जवळ आहेत त्यात होत असते. श्री ज्ञानेश्वर हे एक महान योगी होते. त्यांना हे अशक्य नक्कीच नव्हते. आपल्याला त्याचे कारण न कळल्याने तो चमत्कार वाटतो. तसेच ज्ञानेश्वरांचे स्वत:चे लग्न अर्थात विवाह झालेला नसूनही त्यांनी स्त्री, पुरुष, प्रणय, फुले, भुंगे अशा अनेक उपमा दिल्या आहेत. प्रेम प्रसंग आणि अशाच अनेक गोष्टींचे वर्णन केले आहे. फुलांच्या मनातले सांगितले आहे. ते त्यांना या सर्वांशी समस्पंद गती अर्थात रेझोनांस करता येत असल्यामुळेच होय. म्हणजेच ते इतर व्यक्ती आणि वस्तू यांच्याशी त्यांची स्वत:ची स्पंदगती जुळवू शकत होते.
मित्रांनो अशी ही शक्ती आपण चांगल्या कामासाठी उपयोगात आणणार आहोत का? मित्रांनो आपण भीमरुपी, रामरक्षा, तुळशीदासांचे बजरंग बाण, हनुमान चालीसा,, सप्तशती मधील काही मंत्र, गायत्री मंत्र मृतसंजीवनी मंत्र अशा अति शक्तिशाली मंत्रांचे एकत्रित पठण केले तर फार मोठी शक्ती निर्माण करू शकतो. नुसत्या चुकीच्या आरत्या ओवाळण्यापेक्षा असे काही केले तर फार चांगले होईल. एक शक्ती संपन्न समाज निर्माण होईल.
Always B ++
जय हिन्द
August 7, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti