वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
पूर्वी जेवणाची पंगत घरातील असो किंवा सार्वजनिक समारंभातील असो, त्याचे बरेचसे पैलू हे Eco friendly असत. जेवणासाठी पत्रावळ किंवा केळीचे पान वापरले जाई. पान वाढल्यावर नैवेद्य दाखवताना पानाभोवती दोनवेळा ( मंत्रांसह ) पाणी फिरवले जाई. ( पितृकार्यामध्ये पानाभोवती थोडेथोडे भस्म टाकले जाई ). काहीजण याबरोबरच आपल्या उजव्या हाताला, भाताच्या छोट्याछोट्या राशी, चित्राहुती म्हणून घालत असत. या ” शास्त्रा ” मागील ” शास्त्र आणि अन्य गोष्टी ” पाहू या.
December 23, 2017

आपण जीवनभर इतरांच्या उपयोगी पडत असतो. आपण मृत्यूनंतरही इतरांच्या उपयोगी पडू शकतो. त्यासाठी उपाय आहे अवयवदान किंवा देहदान!
आपल्या मृत्यूनंतर आपले , चांगल्या स्थितीत असलेले अवयव , दुसऱ्याला दान करण्याची किंवा संपूर्ण मृतदेह दान करण्याची व्यवस्था तुम्ही करू शकता. त्याबद्दल सांगत आहेत निरेन आपटे.
March 2, 2026
वजन कमी करण्यासाठी वाढलेल्या वजनाने हैराण झालेली प्रत्येक व्यक्ती काहीना काही प्रयत्न सतत करीतच असते. काही लोक दुसऱ्यांकडून सल्लाही घेतात. पण जो उपाय समोरच्या व्यक्तीला लागू होतो किंवा फायद्याचा ठरतो तोच आपल्यालाही लागू पडेल असे नाही. आपल्या प्रत्येकाच्या शरीराची रचना वेगळी असते, त्यामुळे त्यानुसार वजन कमी करण्याचा पर्याय निवडणे हे अत्यंत गरजेचे आहे.
April 8, 2019
मंगळ म्हणजे जातीवंत लढवय्या ! अन्यायाचा प्राणपणाने प्रतिकार..! न पटणारी गोष्ट कोणत्याही परिस्थितीत करणार नाहीत. एखादा गुंड मंगळाच्या प्रभावाखाली असू शकतो तसाच एखादा निष्णात सर्जनही..! मंगळाचे हे गुणधर्म आपल्या सर्वांच्याच कुंडलीत असतात पण ज्यांना मंगळ आहे असे म्हटले जाते त्या व्यक्तीत या क्वालिटी उठावदारपणे असतात एवढंच !
January 17, 2015
लक्ष्यॆषु सत्स्वपि कटाक्षनिरीक्षणानां
आलॊकय त्रिपुरसुन्दरि मां कदाचित् ।
नूनं मया तु सदृशः करुणैकपात्रं
जातॊ जनिष्यति जनॊ न च जायतॆ वा ॥ १० ॥
भक्ताच्या आणि भगवंताचे नाते माता पुत्रासमान असते. इथे तर भगवती आई जगदंबेचाच विषय आहे. त्या पुत्र वात्सल्याचे विविध पैलू आचार्यांच्या विवेचनात प्रकट होत आहेत. आईला अनेक लेकरे असतात. सगळेच तिला प्रिय असतात. पण त्यातही जे लेकरू थोडे दुर्बल असते, असहाय्य असते, हतबल असते, त्यावर आईचे थोडे अधिक लक्ष असते. व्यवहारातील मातेचा हा स्वभावविशेष येथे आधार करीत आचार्य श्री आई जगदंबे ला स्वतःकडे लक्ष द्यायला सांगत आहेत.
आईच्या विश्वजननी स्वरूपाला मान्य करत ते आरंभी म्हणतात,
लक्ष्यॆषु सत्स्वपि कटाक्षनिरीक्षणानां
आलॊकय त्रिपुरसुन्दरि मां कदाचित् - आई जगदंबेच्या कृपाकटाक्षाने निरीक्षण करावे असे असंख्य जीव असले तरी ही त्रिपुरसुंदरी माझ्याकडे कदाचित पाहील.
अर्थात तिच्या कृपेला पात्र जगात असंख्य लोक आहेत. त्या सगळ्यांच्या तुलनेत मी अत्यंत सामान्य आहे. त्यामुळे पहिल्या आवेगात माझ्याकडे लक्ष जाणार नाही हे ठीक आहे. पण तरी ती त्रिपुरसुंदरी माझ्याकडे पाहील.
हा एक तर माझा विश्वास आहे आणि दुसरा माझा नाईलाज.
विश्वास यासाठी की ती जगज्जननी आहे तर मग माझा अव्हेर कसा करेल? आणि नाईलाज यासाठी की तिच्या शिवाय मला आहे तरी कोण?
आई जशी हतबल लेकराकडे अधिक पाहते तशी ती माझ्याकडे पाहणारच. कारण,
नूनं - खरोखरच
मया तु सदृशः- माझ्या समान.
करुणैकपात्रं- करूणेला पूर्णपणे पात्र.
जातॊ जनिष्यति जनॊ न च जायतॆ वा - आजवर कोणी जन्माला आला नसेल किंवा कदाचित भविष्यात जन्माला येणार ही नाही.
मग माझी आई ! तुला माझ्याकडे दुर्लक्ष करून कसे चालेल?
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
April 21, 2020
" Everybody must be alert of Fake Phone Calls"
पनवेल फ्लायओव्हरवर काम करीत असतांना २०१२ ला मी कामोठे, नवी मुंबई येथे रेडी पझेशन घर बुक केलं. त्यासाठी आयडीबीआय बँकेतुन लोन घेतलं होतं आणि त्यासाठी नेरूळच्या शाखेत खातं ऊघडलं होतं.लोनचा हप्ता मोठा होता आणि तो चुकू नये म्हणून मी माझ्या खात्यात पाच सहा हप्त्यांची तरतूद करून ठेवली होती.रक्कम मोठी होती. एप्रिलमध्ये मी ईकडे रहायला आलो.
जूनमध्ये फ्लायओव्हरचं ऊद्घाटन झालं आणि माझी बदली वडाळ्याला ईस्टर्न फ्री वे वर झाली.
सप्टेंबरमधल्या एके दिवशी आॅफिसमध्ये बसलो होतो. दुपारची वेळ असेल आणि मला एक फोन आला.
"क्या मेरी बात सारंगजीसे हो रही है?"
"हां जी बोलिये, आप कौन?"
"सर, आयडीबीआय बँकसे एक्झिकेटीव्ह रिंकु बर्मन बोल रहा हूँ|"
"बोलिये"
"सर, आपका हमारी नेरूल ब्रँचमे अकांउंट है, उस सिलसिले में रूटीन व्हेरिफिकेशन करना है|"
असं म्हणुन त्याने माझा अकांउंट नंबर ,जन्मतारीख, पत्ता, फोन नंबर, नॅामिनीचंं नांव सर्व गोष्टी सांगितल्या. त्यानंतर माझ्या अकांउंट मधला बॅलन्स, मागचे चारपाच ट्रान्झॅक्शनस् वगैरे सर्व माहिती दिली आणि हे सर्व बरोबर आहे का विचारलं,मी हो म्हणून सांगितलं. माझी खात्री झाली होती कीं हा बँकेचाच माणूस आहे. हे सर्व सांगितल्यावर तो म्हणाला "सर आपका व्हेरिफिकेशन हो गया है, अब आपके मोबाईलपर एक व्हेरिफिकेशन कोड नंबर आयेगा, मै दूबारा आपको फोन करूंगा आप मुझे वह नंबर बता देना फिर यह प्रोसेस पुरा हो जायेगा|हो सकता है आपको एेखादा डेबिट क्रेडिटका मेसेज आयेगा लकिन ऊसको ईग्नोर करना|"
त्याने सांगितल्याप्रमाणे कोड नंबरचा मेसेज आला त्यानंतर त्याचा फोन आला आणि मी तो नंबर त्याला सांगितला. कांही वेळानंतर माझ्या खात्यातून पन्नास हजार रूपये डेबिट झाल्याचा मेसेज आला. त्याने ईग्नोर करायला सांगितलं होतं तरी मला शंका आली, मी त्याला लगेच त्याला फोन लावला पण फोन बंद होता. मी नेरूळ ब्रँचमध्ये फोन लावला पण ब्रँच बंद झालेली होती.
दुस-या दिवशी सकाळी मी नेट बँकींगने माझं अकांउंट तपासलं आणि हादरलोच खात्यातून खरोखरच पन्नास हजार रूपये गेले होते.एका दिवशी एकावेळी पन्नास हजारची लिमिट असल्यामुळे तेव्हढेच गेले होते. लगेेच परत मी रिंकू बर्मनला फोन लावला पण तो बंदच होता. मी ब्रँचमध्ये फोन लावला आणि मॅनेजरशी बोललो,मॅनेजरने ऐकुन सांगितलं की तुमचं अकांउंट हॅक झालं आहे आणि तुम्ही तात्काळ ब्रँचमध्ये या. मी जायला निघालो आणि परत पन्नास हजार रूपये गेल्याचा मेसेज आला.अश्या त-हेने माझ्या खात्यातून एक लाख रूपये गेले होते.
मी बँकेत पोहचलो, मॅनेजरच्या केबिन मध्ये गेलो, त्याला सर्व गोष्टी सांगितल्या आणि माझं नेट बँकिंग आधी बंद करायला सांगितलं.खरंतर आजची पन्नास हजारांची लिमिट संपली होती त्यामुळे अजून पैसे जाण्याची शक्यता नव्हती. मॅनेजरचे आणि माझे बरेच वाद झाले.त्याचं म्हणणं होतं कीं तो नंबर सांगुन तुम्ही चूक केली. मी त्याला म्हणालो कीं तुमची सिस्टिमच फुलप्रुफ नाही. माझं अकांउंट हॅक झालंच कसं? त्याने ईंत्यंभूत माहिती बरोबर दिली त्यामुळे तो बँकेचाच कर्मचारी असल्याची खात्री पटल्यामुळे मी तो नंबर त्याला दिला.
सर्व खातं बघिल्यावर लक्षात आलं कीं रिंकु बर्मनने लोखंडवाला कॅाम्प्लेक्समधील ओरिएंटल बँक अॅाफ कॅामर्सच्या शाखेतून हे व्यवहार केले होते.आयडीबीआय बँकेच्या मॅनेजरने तिकडे त्वरीत फोन करून त्यांना सर्व घटना सांगितली आणि रिंकु बर्मनच्या खात्यावरचे सर्व व्यवहार बंद करण्याची विनंती केली.हे खुप त्वरेने झालं पण तोपर्यंत त्या ठगाने एटीएमद्वारे ७६००० हजार रूपये काढून घेतले होते.मी पोलीस केस केली तर पुढेे सर्व सहकार्य करू अशी मॅनेजरने मला खात्री दिली आणि तेथून मी निघालो.मॅनेजरने माझ्या खात्यात गैरव्यवहार झाल्याचं मला लिहून दिलं.
तेथुन निघुन मी तडक सीबीडी बेलापूरचं नवी मुंबई पोलीस मुख्यालय गाठलं आणि सायबर सेलमध्ये जाऊन तक्रार नोंदवली एफआयआर केला. त्यांनी लवकरात लवकर तपास करायचं आश्वासन दिलं.
एकदा गेलेले पैसे परत मिळण्याची शक्यता नाहीच, ते अक्कलखाती जमा करून टाकायचे असं ठरवुन टाकलं आणि कामाला लागलो. एक लाख रक्कम कांही कमी नव्हती. मनात रूखरूख होतीच.एकदोन दिवसांनी माझे एक हितचिंतक आणि आर्थिक सल्लागार श्री. दिपक लाला यांच्या कानावर ही गोष्ट घातली, त्यांनाही ऐकून धक्काच बसला पण त्यांनी रिझर्व बँकेच्या 'बँकिंग ओम्ब्डसमॅन' (लोकायुक्त)कडे मला आॅनलाईन तक्रार करून ठेवण्यास सांगितलं. मी त्याप्रमाणे सर्व कागदपत्र स्कॅन करून अपलोड करून तक्रार नोंदवली.
ईस्टर्न फ्री वे चं काम जोरात चालू होतं, रोज कोणाची न कोणाची तरी व्हिजिट असायची. हळुहळु कामाच्या रामरगाड्यात मी पैश्यांचं विसरून गेलो होतो. एक दोन वेळा पोलीस स्टेशनमध्ये चौकशी केली आणि तपासाचा आढावा घेतला पण हाती कांही लागलं नाही. रिंकुु बर्मनच्या अकांउंटमध्ये दिलेल्या कळव्याच्याा पत्त्यावर पोलीस जाऊून आले पण तो ही बोगस निघाला.
डिसेंबरमध्ये एके दिवशी साईटवर एमएमआरडीएचे कमिश्नर आले होते, कामाची पाहणी चालू होती आणि अचानक माझा फोन वाजला,आवाज महिलेचा होता, त्यांनी मला सांगितलं कीं मी बँकिंग ओम्ब्डसमॅन बोलतेय.तुमच्या बँक खात्यात झालेल्या गैरव्यवहाराची आम्ही चौकशी केली आहे आणि त्यात आम्हाला तथ्य आढळुन आलंय.आम्ही ओरिएंटल बँक अॅाफ कॅामर्स लोखंडवाला शाखेला तुमचे एक लाख रूपये देण्याचे निर्देश दिलेले आहेत.तुम्ही तिकडे जावून तुमचे पैसे कलेक्ट करा. ते ऐकुन मला आश्चर्याचा धक्काच बसला.मी त्यांच्याकडे फक्त आॅनलाईन तक्रार केली होती पण त्यांनी सखोल कार्यवाही करून मला माझे पैसे परत मिळण्याचे निर्देश दिले होते.
दुस-या दिवशी सकाळी मी तिकडे गेलो. तिथल्या बँक मॅनेजरने माझ्याकडून ईंडेम्निटी बाँड लिहून घेतला आणि एक लाखाचा डिमांड ड्राफ्ट मला दिला.
त्या घटनेनंतर मी सतर्क झालो आणि कोणत्याही अनोळखी कॅालला मी आता कोणताही रिस्पॅान्स देत नाही. प्रत्येकाने हे पथ्य पाळावेत हीच माझी ईच्छा आहे.
The main reason of sharing this experience is that by mistake if anything goes wrong everybody should know about "Banking Ombudsman"
- सारंग प. चपळगांवकर. मुंबई. (मुळगाव - बीड )
-- संकलन : अमित कुलकर्णी
मला आवडलेले फेसबुक आणि WhatsApp वरचे पोस्ट मी शेअर करत असतो..
June 14, 2017
२०१८ हे वर्ष भारतीय न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेवर आघात करणारे ठरत आहे. वर्षाच्या प्रारंभीच सर्वोच्च न्यायालयाच्या चार ज्येष्ठ न्यायमूर्तीनी माध्यमांसमोर येऊन देशाच्या सर्वोच्च न्याय व्यवस्थेत सर्व काही ‘‘ऑलवेल’’ नसल्याची बाब समोर आणल्यानंतर न्यायदेवतेच्या प्रतिष्ठेला पहिला धक्का बसला. या धक्यातून सावरण्याचा प्रयत्न सुरु असतानाच आता देशाच्या इतिहासात प्रथमच भारतीय सरन्यायधीशांविरुद्ध महाभियोग चालविण्यासंदर्भात नोटीस देण्यात आली आहे.
April 24, 2018
इथे वापरलेला सम शब्द हा सर्वधर्मसमभाव यामधल्या सम पेक्षा थोडा वेगळा आहे. समभाव हवाच, पण नको त्या ठिकाणी नको. इतर जण जर सम भावाने पाहात असतील, कृती करत असतील तर समभाव आपणही जरूर दाखवावा. नको त्या ठिकाणी समभाव दाखवत गेलो तर अबू चे रूपांतर बाबूत होते आणि नंतर हे डोक्यावर चढून बसतात.
July 30, 2017
मला वाडा ह्या प्रकारच प्रचंड कुतूहल आहे. वाडा हा गावं आणि लहान शहर याचा अविभाज्य अंग असतो .वाडे नाहीत असे गावं किवा लहान शहर सापडत नसे वाडा हा नुसता नसून त्याला स्वताची ओळख असते..
June 4, 2024
एक जेमतेम शिकलेला पिता. नांव त्याचं शिवशंकर कोळी. सोलापूर शहरात राहत होते. त्यांना शिवपार्थ नावाचा लहान मुलगा माध्यमिक शाळेत शिकत होता. चुणचुणीत आणि तल्लख बुद्धीचा.खेळाची आवड होती. त्यात तो फुटबॉल खेळण्यात अत्यंत निष्णात. गेल्या काही दिवसापूर्वी शिवपार्थ मैदानात फुटबॉल खेळत होता. रखरखतं ऊन होत. सूर्य आग ओकत होता. खेळता खेळता शिवपार्थ उष्माघाताने कोसळला. उपचारासाठी जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी, मेंदूला जबर धक्का बसल्याने त्याचे वाचणे कठीण असल्याचे नातेवाईकांना सांगितले. तरीही शेवटचे प्रयत्न म्हणून सोलापूरचे डॉक्टर त्या लहानश्या जीवाला वाचविण्याचे आटोकाट प्रयत्न करीत होते. पण अखेर शिवपार्थला ब्रेन डेड घोषित करण्यात आले. खेळायच्या अगोदर ‘ सांग ना आई, मी कसा खेळतो ...!’ विचारले होते. ती धाय मोकलून रडत होती. ममता तडफडत होती. तिचा बाळ रुग्णालयाच्या खाटेवर निजला होता. मोकळं ढाकळ बोलणारा त्यांचा शिवपार्थ त्यांना सोडून गेला होता. त्यामातेची अवस्था कशी झाली असेल. विचार करा. बाप मात्र ती स्थिती बघून हबकला होता. कळवलेले डोळे मूक रडत होते. फक्त चेहर्यावर दिसत नव्हते. पण तो बाप त्याचा खोलखोल रुतत चाललेला स्वर दुर्दैवी घटनेचे मनावर प्रहार सहन करीत होता. मुलाच्या सुंदर आठवणींनी मन सैरावैरा धावू लागले होते.
काय केले रे देवा..! म्हणून समस्त नातेवाईक देखील अश्रू ढाळू लागले होते. रुग्णालय गर्दीने भरले होते. कटू वास्तव्याचे हलाहल पूर्णत: पचविले अन दु;खित अ:तकरणाने बाप जागेवरून उठला आणि रडत असलेल्या बाळाच्या आईला म्हणाला. शिवपार्थच्या आठवणी जपायच्या असतील तर आपल्याला वेगळा निर्णय घ्यावा लागेल. त्याने आपल्या मुलाचे अवयव दान करण्याचा निर्णय बोलून दाखवला. आईने देखील होकार दर्शविला. डॉक्टरांना निर्णय सांगितला गेला. सोलापूर वैद्यकीय क्षेत्र लगेच कामाला लागले. शिवपार्थचे चार अवयव .... हृदय, यकृत आणि दोन मूत्रपिंड काढण्यात आली. हृदय हे हवाई मार्गाने पुण्याच्या रुबी हॉस्पिटलला पाठविण्यात आले. एक मूत्रपिंड आणि यकृत रुग्णवाहिकेने पुण्याच्या मंगेशकर आणि नोबेल हॉस्पिटलला पाठविण्यात आले. एका मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण सोलापुरात अश्विनी हॉस्पिटलमध्ये एका इंजिनिअरींग शिकत असलेल्या विद्यार्थ्यावर करण्यात आले. जो दोन वर्षापासून दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे डायलिसीस वर जीवन कंठत होता.
एक जीव गेल्याचे दु:ख नक्कीच पण त्या जीवामुळे चार जीवांना जीवनदान मिळाले ते केवळ शिवपार्थच्या आई वडिलांनी घेतलेल्या क्रांतीकारी निर्णयामुळे. डॉक्टरांची तत्परता दाखविलीच शिवाय अनेक हात या निर्णयासाठी मदतीला पुढे आले. ते पोलीस असो वा समस्त सोलापुरी माणसं. त्यांना सलाम करायला हात उत्सुक आहेत. एक विचारसरणी बदलणारी ही घटना. त्या मायबापावर अकस्मात ओढवलेल्या संकटाने व्यथित होऊनही अन्य चार जणांच्या आयुष्यात आनंद फुलविण्याचा खरा आकार दिला.
दान ही आपली संस्कृती तर भोग ही प्रकृती. श्रध्देने दिलेले दान किंवा ऐपतीनुसार केलेलं दान. अनेकजण देहाची विटंबना नको म्हणून माघारी परतले असते. असो ... शंभरात एक शूर जन्माला येतो. तर सहस्त्रामध्ये एक ज्ञानी असतो. तर दशसहस्त्रामध्ये एक वक्ता निर्माण होतो. पण शिवपार्थच्या वडिलांसारखा दाता हा क्वचितच लाभतो. दानी म्हटले की, त्या पुरुषाचे हात वर असतात तर याचक याचे हात नेहमीच खाली असतात.
देशात आजच्या घडीला लाखो हृदयरोगी आहेत. पण हृदयदाते प्रमाण अल्प आहे. तर दीड ते दोन लाख मूत्रपिंडाचे रुग्ण आहेत पण केवळ 5000 शस्त्रक्रिया झाल्याचं निदर्शनास आले आहे. यकृतरोगींचा आकडा 30000 असताना केवळ 1000 यकृत रोग्यावर शस्त्रक्रिया झाल्याचे आढळून आले आहे. गरजे इतके दाते आज तरी मिळत नाहीत. याचाच अर्थ ज्याच्यावर शस्त्रक्रिया होत नाहीत ते कसेबसे आयुष्य जगत आहेत. वेळ आली की, जगाचा निरोप घेत आहेत. शिवपार्थच्या बाबांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा मानस नाही. पण त्यांनी दाखविलेले धाडस हे कौतुकास्पद आहे. शिवपार्थच्या देहाचे त्यांनी खरोखर सार्थक केले. त्यासाठी मनापासून त्यांना सलाम करावासा वाटत आहे.
अशोक भेके
घोडपदेव समूह
April 20, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti