वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवरून भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या लष्कर-ए-तोयबा या पाकपुरस्कृत दहशतवादी संघटनेच्या सुमारे सात ते आठ दहशतवाद्यांचा मार्ग रोखून लष्करी जवानांनी त्यांना शरण येण्याचे आदेश दिल्यानंतर झडलेल्या भीषण चकमकीत, कर्नल संतोष महाडिक यांना वीरमरण आले. अन्य चार जवान जखमी झाले आहेत. ते मूळचे साताऱ्याचे होते. जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात १७/११/२०१५ला दहशतवाद्यांसोबत त्यांची चकमक झाली.
November 24, 2015
लहानपणी मी समुद्र मंथनाची पौराणिक कथा वाचली होती. या कथे मध्ये जेव्हा समुद्रातून अमृताची प्राप्ती होते तेव्हा राक्षसांना अमृत प्राप्ती होऊ नये म्हणून भगवान विष्णू मोहिनीचे रूप धारण करून अमृत वाटप करण्याचे ठरवतात. हे वाटप करत असताना मोहिनी रुपात भगवान विष्णू प्रत्यक्षात देवांना खरे अमृत तर राक्षसांना अमृताच्या नावाने फक्त जल देत असतात.
January 15, 2024
स्थापनेपासूनच जनसंघाचे कार्य महाराष्ट्रात सुरु झाले. अर्थात विविध राजकीय विचारधारा, विशेषतः काँग्रेसची विचारधारा, महाराष्ट्रात प्रचलित असल्याने हे काम तेवढेसे सोपे नव्हते. येथील वाटचालीत जनसंघासमोरील आव्हाने जेवढी मोठी होती, तेवढीच मोठी आव्हाने दुसऱ्या स्वातंत्र्यानंतर १९८० मध्ये स्थापन झालेल्या भारतीय जनता पार्टी (भाजपा) समोरही होती. पुर्वी जनसंघ असतांना जनसंघाचा दिवा घरोघरी लावा. असे कार्यकर्ते म्हणायचे. कारण पूर्वीच्या जनसंघाची निशाणी दिवा (पणती) होती. त्यावेळी विरोधक (कॉँग्रेस) जनसंघ व दिव्याची खिल्ली उडवायचे. त्यावेळी विजय दूरच परंतु उमेदवार मिळणे कठीण जायचे. आता निवडणूक जिंकल्यानंतर कार्यकर्त्याना जसा आनंद होतो तसाच आनंद तेव्हा जनसंघाला उमेदवार मिळाल्यानंतर व्हायचा. महाराष्ट्रात त्यावेळी स्व. उत्तमराव पाटील, स्व. रामभाउ म्हाळगी , स्व. रामभाउ गोडबोले, स्व. मोतीराम लाहने यांनी खूप कष्ट करून जनसंघ वाढवला. कॉँग्रेसला योग्य पर्याय म्हणूनही भाजपाचे नाव त्या वेळी होऊ लागले. याचबरोबर भाजपा एका-एका राज्यात सत्तेत येऊ लागला व अन्य पक्षांचे लोक भाजपात येऊ लागले.
April 6, 2022
महाराष्ट्रात विदर्भ आणि विदर्भात वऱ्हाड. म्हणजे पूर्वीचे लोक म्हणत सोन्याची कुऱ्हाड. असा आमचा प्रदेश. महाराष्ट्राच्या मध्यभागी वसलेला बुलडाणा जिल्हा. त्यात खामगाव तालुका. आमच्या जिल्ह्याचे वैशिष्टये म्हणजे, भौगोलिक दृष्ट्या एकसंघ नाही. काही भाग घाटावर तर अर्धा भाग घाटाखाली. त्यामुळे सरळ सरळ जिल्ह्याचे दोन भाग पडलेले आहेत.
दुसरे वैशिष्ट्ये म्हणजे, बुलडाणा जिल्हा विदर्भात असला तरी अगदी पश्चिम विदर्भात शेवटच्या टोकावर आहे. यालाच आम्ही वऱ्हाड म्हणतो. पूर्वी इंग्रज लोक बेरार म्हणत होते. जिल्ह्याचा दक्षिण भाग मराठवाड्याला लागून आहे. जालना आणि हिंगोली हे जिल्हे आहेत. इकडे पश्चिमेकडून जाईचा देव असलेला मराठवाड्यातील औरंगाबाद आणि खानदेशातील जळगाव जिल्हा लागून आहे. उत्तरेकडून मध्यप्रदेश राज्य आहे. पूर्वी आमचा बुलडाणा जिल्हाही याच राज्यात म्हणजे मध्यप्रदेशात होता. तेव्हा आमच्या सीपी अँड बेरार या प्रांताची राजधानी नागपूर होती. त्यामुळे जिल्ह्यातील लोकांची बोलीभाषा एक नाही. घाटावरचे म्हणजे, चिखली, मेहकर, देऊळगावराजा, सिंदखेडराजा, लोणार तालुक्यातील लोकांवर मराठवाड्यातील भाषेचा प्रभाव आहे. त्याला आम्ही घाटावरची भाषा म्हणतो. तर इकडे मलकापूर, नांदुरा, मोताळा, जळगाव जामोद तालुक्यातील लोकांवर खानदेशी बोलीभाषेचा प्रभाव आहे. त्यांच्या बोलण्यात वेगळीच ढब आहे. तर खामगाव, शेगाव, संग्रामपूरचा भाग घाटाखाली असून अकोल्याला लागून आहे. त्यामुळे इकडचे लोक प्युअर वऱ्हाडी बोलतात. बरेच वर्षे आमचा खामगाव विधानसभा मतदारसंघ अकोला लोकसभेतच समाविष्ट होता. आता कुठे बुलडाणा झाला आहे. तर तिकडचे मलकापूर आणि नांदुरा हे तालुके आता जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघाला जोडले आहेत. त्यांचे बहुतांश व्यवहार जळगाव खांदेशशी आहेत. तर बुलडाणा, माेताळा तालुकाही भावनिक, सांस्कृतिकदृष्ट्या तिकडेच जोडलेला आहे. एकंदरित चित्र जर पाहिले तर जिल्ह्यातल्या जिल्ह्यातही अनेकांचे नातेसंबंध नाहीत. दीडशे किमी अंतरावर अमरावती जिल्ह्याशी अनेकांचे नातेसंबंध असू शकतात. पण घाटाखालचे आणि घाटावरचे असे नाते अलिकडच्या काळापर्यंतही जुळू शकलेले नाहीत. शहरांनी ही सीमा कधीचीच ओलांडली आहे. विषय ग्रामीण भागाचा आहे. कारण बुलडाणा जिल्हा खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातच आहे.
उदाहरणच द्यायचे झाले तर खामगाव तालुक्यातील बऱ्याच ग्रामस्थांनी कधी जिल्ह्यातील सिंदखेडराजा पाहिलेले नाही. आणि घाटावरच्या लोकांनी कधी जळगाव जामोद, संग्रामपूर पाहिले नसावे. असा हा विरोधाभास आहे. हे फक्त ग्रामीण लोकांनाच लागू पडते अशातला भाग नाही. तर पोलिस विभागालाही लागू होऊ शकते अशी परिस्थिती आतापर्यंत होती. कारण इकडे तामगाव पोलिस स्टेशनचा कर्मचारी कधी किनगावराजा पोलिस स्टेशनला बदलीवर जाण्यास तयार होत नव्हता. तर डोणगावचा कर्मचारी इकडे जळगाव जामोद किंवा बोराखेडी पोलिस स्टेशनला येण्यास तयार नव्हता. तसे पाहिले तर जिल्हा तीन भागात विखुरलेला आहे. खानदेश, मराठवाडा आणि विदर्भ यामुळे कुणाचे विचार वेगळ्या विदर्भाच्या बाजूचे आहेत, तर कुणाचे विरोधात आहेत.
राजकारणी लोकांनी सुरुवातीपासूनच विदर्भाचा मुद्दा ताटकळत ठेवला आहे. जे आतापर्यंत विदर्भ राज्य व्हावे असे बाेंबलत होते, ते भाजपच्या काळात मूग गिळून चूप बसले आहेत. त्यांना विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आता आवाज तर करता येतच नाही. पण पाठिंबाही देता येत नाही. यात बहुधा काँग्रेसीच अधिक आहेत. आपल्याला काँग्रेसवर टीका करायची नाही. पण भाजप विदर्भाची मागणी करत असताना विदर्भातील जनतेच्या सोयीसाठी आपल्या पक्षश्रेष्ठीकडे मुद्दा रेटून धरण्यात गैर आहे काय?
याउलट परिस्थिती उर्वरित महाराष्ट्रातील नेत्यांची आहे, जे आतापर्यंत विदर्भातील लोकांचा केवळ द्वेषच करत आले, ते अजूनही द्वेषच करत असून अखंड महाराष्ट्राची भाषा बोलत आहेत. विदर्भाचे वेगळे राज्य झाल्यास महाराष्ट्र काय नकाशातून गायब होणार आहे काय ? उत्तर भारतात एका हिंदी भाषेचे अनेक राज्य आहेत. आपल्या मराठी भाषेचे दोन राज्य झाली तर आभाळ कोसळणार आहे काय ? उलट आतापर्यंत देशात एकच मराठी भाषिक राज्य होते, आता दोन होतील.
दुसरे असे की, लोकांना आपल्या गावात गट ग्रामपंचायत असली तर स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी असे वाटते. ग्रामपंचायत असेल तर त्याचे रुपांतर नगरपंचायतीत किंवा नगरपालिकेत व्हावे असे वाटते. एखादे मोठे गाव असेल तर तेथे तालुका व्हावा यासाठी मागणी केली जाते. खामगावसारखे मोठे शहर असेल तर जिल्हा व्हावा, अशी मागणी केली जाते. पण एखादा प्रांत जर मोठा असेल तर त्याचे राज्य व्हावे असे म्हटले की, बऱ्याच जणांच्या पोटात दुखते.
ग्रामपंचात, तालुके, जिल्हे आणि राज्याची निर्मिती ही प्रशासनाच्या सोयीसाठी केली जाते, हे शहाण्यांच्या लक्षात येत नाही. सत्तेचे विकेंद्रीकरण हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून काळानुरुप बदल होणे आवश्यक आहे. छोटी राज्ये ही भाजपचे धोरण आहे. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात झारखंड, उत्तराखंड आणि छत्तीसगड ही नवी राज्ये निर्माण झाली. हे सर्वांच्या सोयीसाठी. तसेच विदर्भाचे राज्य व्हावे, हे सुद्धा सर्वांच्या सोयीसाठी. पण उर्वरित महाराष्ट्रातील लोकांचा किंवा विदर्भातील लोकांचा विरोध कशासाठी होतोय ? हेच कळायला मार्ग नाही.
- जनार्दन गव्हाळे,
खामगाव, जिल्हा बुलढाणा,
विदर्भ.
मोबाईल 9168147080
September 3, 2016
‘ऑगस्ट’ महिन्यामध्ये जन्म झालेल्या व्यक्ती ह्या नेतृत्वगुण असलेल्या, विचारी, प्रभावी संवादकौशल्य जपणाऱ्या असल्याचे मानले जाते. ‘ऑगस्ट’ महिन्यामध्ये जन्मलेल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठसा उमटवलेल्या अश्याच काही प्रमुख जागतिक क्रिकेटवीरांवर तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव नोंदवलेल्या लक्षणीय भारतीय / मराठी क्रिकेटपटूंवर दृष्टिक्षेप टाकूया.
August 11, 2025
तुरटीला कोणत्याही परिचयाची गरज नाही. हे एक असे संयुग आहे जे जवळजवळ प्रत्येक घरात सहज आढळते. त्याला इंग्रजीत अलम म्हणतात. हे एक पांढरे, स्फटिकासारखे संयुग असून (पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट) ते अत्यंत गुणकारी आहे.
May 17, 2026
प्रकाशशास्त्र म्हणजे ऑप्टिक्समध्ये कॅमेरा, दुर्बीण यांच्याखालोखाल सर्वांत लोकप्रिय उपकरण म्हणजे द्विनेत्री त्यालाच बायनॉक्युलर असे म्हणतात. बहुतांश लोक अशा बायनॉक्युलरचा वापर क्रिकेट सामने पाहताना किंवा पक्षी निरीक्षणसाठी करीत असतात. एका नेत्रिकेची दुर्बीण जे दाखवते त्यापेक्षा अधिक दोन नेत्रिका असलेल्या बायनॉक्युलरमुळे आपल्याला दिसत असते.
October 13, 2023
रोहिणी लोखंडे यांनी विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या उपक्रमांची डोंगराएवढी यादी बघूनच थक्क व्हायला होते; त्याचबरोबर, त्यांची विद्यार्थीहिताची तळमळ लक्षात येते. हे उपक्रम बघा हं-रंजक अध्यापन, संगीत कवायत, शाळेला रंगरंगोटी, शिक्षण महोत्सव, We learn English हा परिपाठ, वैदिक गणिताचे अध्यापन, स्पेलिंग बँक, इंग्रजी अंताक्षरी, ‘आम्ही वाचतो’ (मुले पुस्तके वाचून वहीत लिहीत असत), सामान्यज्ञान व प्रश्नमंजुषा, प्रश्नकुंभ, भाषा अभिव्यक्ती, मुलाखत, ग्लोबल क्लासरूम (केरळच्या संतोष तळपट्टी या शिक्षकांची घेतलेली मुलाखत), दिनांकांचा पाढा, लेझिम पथक, स्नेहसंमेलनातून निधीसंकलन (सात लाख रुपये), खाऊगल्लीची लज्जत (सहा हजार रुपयांची कमाई ), शाळेची कंपाउंड वॉल.. लोखंडेबाईंनी असे विविध उपक्रम शाळांमध्ये राबवले. त्यामुळे मुलांमध्ये शाळेविषयी गोडी निर्माण झाली. शाळेत येणाऱ्या मुलांची संख्या वाढली.
June 15, 2026
न पिबेत् पंक शैवालतृणपर्णाविलास्तृतम् ।
सूर्येन्दुपवनादृष्टमभिवृष्टं घनं गुरू ।।
फेनिलं जन्तुमत्तप्तं दन्तग्राह्यतिशैत्यतः ।
वाग्भट सूत्रस्थान 5-5/6
"चिखल, शेवाळ, गवत, व पाने यांनी व्याप्त व गढुळ झालेले, ऊन, चांदणे, व वायु यांचा जेथे कधीही प्रवेश झाला नाही अश्या ठिकाणचे, पावसाचे पाणी, नुकतेच मिळाल्यामुळे राड झालेले, जड, फेस आलेले, कृमीयुक्त, तापलेले, व दातास कळा उत्पन्न करण्यासारखे गार अशा प्रकारचे पाणी कधीही पिऊ नये."
हा झाला ग्रंथातील एक श्लोक आणि त्याचा शब्दशः अर्थ. छापील उत्तरासारखं. आता ग्रंथकारांना नेमकं काय म्हणायचंय ते पाहू.
अशा ठिकाणचे पाणी पिऊ नका, ज्या जलाशयामधे तळात खूप चिखल, गाळ साठलेला आहे. अशा जलाशयातील झरे या चिखलामुळे बंद झालेले असतात. झरे बंद झाल्यामुळे पाण्याचा पाझर आणि पुनर्रभरण नीट होत नाही, पाण्याचा उसपा आणि साठा याचे संतुलन बिघडते. आणि पाणी पचायला जड होते. हा चिखल किंवा गाळ जलाशयाच्या तळामध्ये असतो आणि शेवाळ, पाने पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत असतात. पाण्याचा पृष्ठभाग जर पूर्णपणे झाकला गेला असेल तर सूर्याचे प्रकाशकिरण तळागाळापर्यंत पोचू शकत नाहीत. सूर्याचे औषधी किरण जर पाण्यात पडले नाहीत तर पाण्यातील अशुद्धी दूर होत नाही, म्हणून असे आच्छादन असलेले पाणी देखील पचायला जड होते.
खालून चिखल वरून शेवाळ, पाण्यात पडलेल्या पानासारख्या कचऱ्याचे आच्छादन आणि मधे वाढणाऱ्या काही तृण वनस्पती यामुळे पाणी साठून रहाते. पाण्याचा नैसर्गिक वाहाणे हा गुण कमी होतो. पाणी गरजेपेक्षा जास्ती स्थिर होते. जिथे स्थिरपणा ( स्टॅग्नेशन)येते, जिथे गती कमी होते, तिथे पाण्यातील बुळबुळीतपणा वाढतो. शेवाळ जास्ती वाढते. पाण्यातील हालचाली मंद होतात. पाण्याची गुरूता, घनता हे गुण आणखीनच वाढतात.
गाळातील चिखल आणि वरील आच्छादन यामुळे पाण्याची घनता बदलते. आजच्या वैज्ञानिक भाषेत सांगायचे झाल्यास पाण्याची पीएच बदलते. त्याची अम्लता किंवा क्षारीयता बदलते. असे पाणी पचायला घन आणि गुरू होते. श्लोकातील दुसऱ्या ओळीतील शेवटच्या शब्दांकडे विशेष लक्ष दिले की शास्त्रकारांची सूक्ष्म दृष्टी लक्षात येते.
पाण्यात हा बदल नैसर्गिक स्थितीमुळे झालेला असतो. त्याच्या इच्छेनुसार झालेला असतो.
जरूरी नाही, कि प्रत्येक वेळी मानवाच्या हस्तक्षेपामुळेच प्रदूषण होते. आणि जे जे सर्व नैसर्गिक म्हणजे निसर्गदत्त, निसर्गाने दिलेले आहे, ते सर्व उत्तम गुणाचे आणि मानवाच्या आरोग्याला हितकरच असेल !!??
यासाठी त्याने मानवाला बुद्धी दिली आहे. ही बुद्धी, योग्य ठिकाणी वापरून आपले कल्याण कशामधे आहे, याचा विवेक मानवाने करावा अशी त्याची इच्छा असते. त्याच्या इच्छेनुसार, आपली बुद्धी हवी तिथे वापरता येणे, याला विवेक म्हणतात, सारासार विचार करणे !!!
हे योग्य हे अयोग्य असा विचार करणे ज्याला जमले तो निरोगी राहिलाच म्हणून समजा !
सूत्रस्थान 5-5/6 भाग एक. ( क्रमशः )
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
20.12.2016
December 20, 2016
November 23, 2013
Copyright © 2025 | Marathisrushti