वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
भगवान श्रीविष्णूंच्या भुवयांचे वर्णन करताना आचार्य श्री पुढे म्हणतात,
January 14, 2021
आजच्या बदलत्या काळात व्यक्ती स्वातंत्र इतकं फाजील बोकाळलं आहे कि सतत एकमेकांवर कुरघोडी करण्या पलीकडे कोणताही संवाद होत नाही .जगण्यासाठी पैसा निश्चितच आवश्यक आहे पण जगण्याचे ध्येय पैसा असू नये . जीवन हे बंधन युक्त असेल तरच सुखी होऊ शकत.
August 22, 2023
सिंधुदुर्ग
जिल्ह्यामधील रेडी येथील श्री गणेश अखंड पाषणात घडवलेली ५-६ फुट उंचीची
मुर्ती आणी तिला शोभेल अशाच आकाराचा ऊंदीर. मंदिराचे बांधकाम अलिकडच्या काळातले आहे.
November 5, 2012
कोणतेही सोडायुक्त सॉफ्ट ड्रिंक फसफसते, ते का? कार्बन डाय ऑक्साइड वायू पाण्यात विरघळतो, तेव्हा त्या द्रावणाला कार्बोनिक आम्ल म्हणतात. खरं तर अशा द्रावणात कार्बोनिक आम्ल थोड्याच प्रमाणात असते. आपल्या उच्छ्वासावाटे कार्बन डाय ऑक्साइड वायू शरीराबाहेर टाकण्याच्या क्रियेतही कार्बोनिक आम्ल तयार होते. अंतराळात घन स्वरूपातील पाणी आणि कार्बन डाय ऑक्साइड यांच्यावर वैश्विक आणि अतिनील किरणांच्या प्रभावामुळे कार्बोनिक आम्ल तयार होऊ शकते, असा शास्त्रज्ञांचा कयास आहे.
February 21, 2023
‘जे होतं, ते चांगल्यासाठीच’ असं आपल्यात म्हणतात. कादचित जर काही वाईट किंवा मनाविरूद्ध घडलं, तर वाईट वाटू नये किंवा मनाला फार लागू नये म्हणून असे वाक्प्रचार आपल्या सांस्कृतीक पूर्वजांनी रुजवले असावेत, असं मला पूर्वी वाटायचं. पण आपल्या पूर्वजांनी जे काही आपल्या संस्कृतीत रुजवलं, त्यामागे त्यांचा काहीतरी अनुभव असावा हे नक्की, असंही मला आताशा वाटू लागलंय.
November 7, 2017
अमेरिकन शेती खात्याच्या (United States Department of Agriculture) २००७ सालच्या सर्वेक्षणाकडे नजर टाकली तर अमेरिकन शेती व्यवसाय व पशुसंवर्धनाच्या संदर्भात बरीच उद्बोधक माहिती मिळू शकते. २००७ साली अमेरिकेत सुमारे २२ लाख फार्म्स होते. मागे उल्लेख केल्याप्रमाणे अमेरिकन संदर्भात फार्म्स ही संज्ञा किंवा संकल्पना लवचिकपणे वापराय़ची आहे. प्रत्यक्ष कृषी उत्पादन तसेच पशुसंवर्धनाशी निगडीत सर्व व्यवसायांना त्यात समाविष्ट करायचे आहे.
त्यांच्या मालकांच्या जीवनपद्धतीमधे ’फार्मिंग’ला काय स्थान आहे यावरून हे फार्म्स वेगवेगळ्या प्रकारात मोडतात. यातील दोन सर्वात मोठ्या प्रकारात मोडणारे फार्म्स म्हणजे उपजीविकेसाठी वापरण्यात येणारे फार्म्स (३६%) आणि निवृत्ती फार्म्स (२१%).
उपजीविकेसाठी वापरण्यात येणारे फार्मस् – यांचे वार्षिक उत्पन्न २५०,००० डॉलर्सपेक्षा कमी असते आणि मुख्य मालक शेती शिवाय इतर काही तरी नोकरी /व्यवसाय उत्पन्नाचे साधन म्हणून दाखवतो.
निवृत्ती फार्मस् – यांचे देखील वार्षिक उत्पन्न २५०,००० डॉलर्सपेक्षा कमी असते आणि शेतीला निवृत्ती नंतरचा व्यवसाय म्हणून स्वीकारलेला असतो.
अनेक कुटुंबांमधे शेती व्यवसाय हा पिढ्यान पिढ्या चालत आलेला असतो. यातले बरेच फार्म्स आकारमानाने प्रचंड मोठे असतात. अशा या ‘मोठ्या खानदानी फार्म्स’ आणि ‘अतिशय मोठ्या खानदानी फार्म्स’चे वार्षिक उत्पन्न अनुक्रमे २५०,००० ते ५००,००० डॉलर्स आणि ५ लाख डॉलर्सपेक्षा अधिक असते.
वर उल्लेखल्या प्रमाणे पशुसंवर्धन तसेच शेतीच्या फार्म्सची घटत जाणारी संख्या, वाढत जाणारे आकारमान आणि थोड्याच परंतु सामर्थ्यवान फार्म्सच्या हातात होत चाललेले उत्पादनाचे आणि एकंदरीतच व्यवसायाचे केंद्रीकरण हा कल (trend) २००७ च्या सर्वेक्षणामधे पुन्हा एकदा अधोरेखीत झाला आहे. उदाहरणार्थ, २००२ साली १४४,००० फार्म्स मिळून सुमारे ३/४ अमेरिकन शेती मालाची (किंमतीच्या स्वरूपात) निर्मिती करत होते, तर २००७ साली केवळ १२५,००० फार्म्स मिळून तेव्हढ्याच उत्पादनाची निर्मिती करत होते. वर उल्लेखलेल्या ‘मोठ्या खानदानी’ आणि ‘अतिशय मोठ्या खानदानी’ फार्म्सची संख्या, एकूण फार्म्सच्या संख्येच्या केवळ ९% आहे; परंतु एकूण शेती उत्पन्नाच्या (किंमतीच्या स्वरूपात) जवळ जवळ २/३ (६६% हून अधिक) उत्पादन हे फार्मस् करतात. वेगवेगळ्या राज्यांच्या पातळीवर जाऊन दाखले द्यायचे झाले तर मिसुरी या राज्यातले केवळ ७% शेतकरी त्या राज्यातले ३/४ शेतीमालाचे उत्पादन करतात. कान्सास राज्यामधे २/३ शेती उत्पादन हे ३% हून कमी फार्म्सवर होतं. यावरून या प्रचंड मोठ्या फार्म्सच्या उत्पादन क्षमतेची कल्पना यावी.
डॉ. संजीव चौबळ
December 16, 2015
सुरुवातीला ज्यावेळी जगभरातील सिनेमा बघण्याची प्रचंड ओढ आणि भूक निर्माण झाली त्यावेळी फिल्म सोसायटीने चक्क पंचपक्वान्नांचे ताटच वाढून दिलं. चांगल्या वाईटचे कंगोरे माहीत नसताना सिनेमा निवडीसाठी तीच दिशादर्शक ठरली. त्यातूनच जागतिक सिनेमाने स्वतःकडे, भवतालाकडे बघण्याचे डोळस अंजन दिले.
January 27, 2024
ठाणे जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबीसागर पसरलेला आहे. या सागराला येऊन मिळणार्या नद्यामधील वैतरणा ही एक प्रमुख नदी आहे. सह्याद्रीमधे उगम पावलेली वैतरणा जेथे सागराला मिळते तेथे खाडीच्या मुखाजवळ अर्नाळ्याचा बुलंद जलदुर्ग उभारलेला आहे.
वसईच्या किल्ल्याइतकाच महत्त्वाचा अर्नाळ्याचा जलदुर्ग आहे. अर्नाळा येथे जाण्यासाठी वसईतून गाडीमार्ग आहे. वसई-नालासोपारा-निर्मळमार्गे आगाशी-अर्नाळा असे गाडीमार्गाने जाता येते. मुंबई-अहमदाबाद मार्गावरील शिरसाड फाटय़ावरुन विरार-अर्नाळा असेही येता येते. मुंबई-सूरत या पश्चिम रेल्वे मार्गावर विरार स्टेशन आहे. विरारला रेल्वेने पोहोचून तेथून आगाशी अर्नाळा गाठता येईल. विरार ते अर्नाळा हे साधारण पंधरा कि.मी चे अंतर पार करण्यासाठी बसेसची उत्तम सोय आहे.
बस स्टॉप पासून आपण कोळीवाडय़ातून सागर किनार्याला दहा मिनिटांमधे पोहोचतो. सागरात विस्तृत पसरलेले आणि झाडीने नटलेले अर्नाळ्याचे बेट आपल्याला उत्साहित करते. मात्र या बेटावर जाण्यासाठी बोटीची आवश्यता आहे. बेट आणि मुख्यभुभाग या मधे येण्याजाण्यासाठी फेरीबोटीची येथे सोय केलेली आहे. या फेरीबोटी ठरलेल्या वेळेनुसारच येजा करीत आसतात. त्यामुळे त्यांच्या वेळा पाहून आपले नियोजन केल्यास वेळ वाया जात नाही.
पंधरा मिनिटांचा जलप्रवास करुन आपण अर्नाळ्याच्या बेटावर पोहोचतो. या बेटावर होडीसाठी धक्का नाही त्यामुळे सागराच्या पाण्यातच उतरुन चालत किनार्यावर यावे लागते. अर्नाळ्याच्या बेटावर किल्ल्याव्यतिरीक्त इतर भूभागावर कोळीबांधवांची वस्ती असून काही भागात शेतीही केल्या जाते. या कोळीबांधवांनी किनार्यावर कालीका मातेचे मंदीर उभे केलेले आहे.
कालीकामातेला नमन करुन पुढे निघाल्यावर घरांच्या मधून जाणार्या वाटेने आपण दहा-पंधरा मिनिटांमध्ये अर्नाळा किल्ल्याच्या भल्याभक्कम दरवाजा समोर येवून थडकतो. दरवाजासमोरच्या वाळूच्या पुळणीवर दोनचार होडकीही विसावलेली असतात.
साधारण चौकोनी आकाराच्या अर्नाळ्रयाचा किल्ला आहे. याचा मुख्यदरवाजा उतराभिमुख आहे. या महादरवाजा शिवाय गडाला अजून दोन प्रवेशद्वारेही आहेत. महादारावर वाघ, हत्तींची शिल्पे तसेच फुलांची वेलबुट्टी काढलेली असून दरवाजाच्या माथ्यावर मराठी शिलालेख लावलेला आहे.
हा देवनागरी लिपीतील शिलालेख वाचता येतो. बाजीराव पेशवे यांनी हा किल्ला बांधून पुर्ण केल्याचा उल्लेख यात आहे. प्रवेशव्दाराच्या आत पहारेकर्यांच्या देवडय़ा आहेत. वरचा घुमट भव्य असून देखणा आहे.
या दरवाजाच्या आत दुसरा दरवाजा असून तेथून तटबंदीवर जाणार्या पायर्यांचा मार्ग आहे. तटबंदीवरुन गडाला फेरी मारता येते. पस्तिस-चाळीस फुट उंचीची भक्कम तटबंदी असून जागोजाग बुरुजांची गुंफण केलेली आहे. या बुरुजांमधे खोल्याही केलेल्या आहेत. त्यात जाण्यासाठी पायर्यांचा मार्गही केलेला आहे. तटबंदीवरुन दूरपर्यंतचा प्रदेश पाहायला मिळतो. मजबूत आणि उंच तटबंदी असल्यामुळेच बहुदा किल्ल्याभोवती खंदक केलेला नसावा. तटबंदीमधे जागोजाग मारगिरीसाठी बग्या केलेल्या आहेत.
अर्नाळ्याच्या तटबंदीच्या आत पाणी मुबलक आहे. त्यामुळे आतमधेही व्यवस्थीत शेती केल्या जाते. त्रंबकेश्वराचे मंदिर आणि हाजीअली आणि शहाअली यांची थडगी मधल्या भागामधे आहेत. किल्ल्यामधील वाडय़ांच्या जोत्यावरही शेती केली जाते हे पाहून आश्चर्य वाटते.
पश्चिमेकडील दरवाजा, चोर दरवाजा, भवानी मंदिर पाण्याची विहीर इत्यादी पहाण्यासाठी आणि गडफेरी साठी साधारण तास सव्वातासाचा अवधी पुरेसा होतो.
किल्ल्यापासून कि.मी अंतरावर टेहाळणीसाठी ३६ फूट उंचीचा बुरुज बांधलेला आह. या एकांडय़ा बुरुजावरुन बेटाच्या परिसरावर तसेच सागरावर लक्ष ठेवणे सोयीचे होते. बुरुजावर जाणारा मार्ग झाडीझाडोप्यामुळे बंद झाला आहे.
गुजरातच्या सुलतानांनी अर्नाळा बांधला पुढे यावर पोर्तुगिजांचा अंमल राहिला. मराठय़ांनी यावर अधिकार मिळवला त्यावेळी याची पुर्नबांधंणीही करण्यात आली. पुढे इंग्रजांनी हा किल्ला इतर किल्ल्याप्रमाणे जिंकूण घेतला.
अर्नाळा किल्ल्याचा भक्कमपणा आणि निसर्गसानिध्या बरोबरच सुखावणारे सागर दर्शन याचा मोह आवरीतच आपण पुन्हा जलप्रवासासाठी परतीच्या मार्गावर निघतो.
प्रमोद मांडे
(महान्यूज)
January 17, 2011
तो’ म्हणतो, तू इतर मुलींसारखी मेकअप करत जा… मोजकेच कपडे परिधान करत जा… केस कशाला वाढवतेस…. केस तू कापलेच पाहिजे. असा ‘त्याचा’ हट्टाहास असतो. एवढेच नव्हेच लग्नाअगोदर ‘एकत्र’ आलो तर बिघडतंय कुठे? असे म्हणून तो हळूहळू पाय पसरवत असतो. अन् ‘ती’ मात्र मन मारत त्याच्या भावनामध्ये अडकतच जाते. तिला ‘तो’ सांगतो, तसं करावंच लागतं….
June 7, 2010
सध्या स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याच्या बातम्या आहेत. स्वाईन फ्ल्यू होऊ नये म्हणून पुढील प्रमाणे फुलांचे पाणी प्यावे असा माझा अनुभव आहे
दोन ग्लास पाण्यात एका झेंडूच्या फुलाच्या पाकळ्या, निशीगंधाची 5-7 फुले, तुळशीची 5-7 पाने रात्रभर ठेवा सकाळी ते पाणी गाळून एक वाटी व संध्याकाळी एक वाटी प्यावे घरातील प्रत्येकाने. हे रोज करणे आवश्यक आहे.
ह्यात गलांडीचे फुल मिळाले तर ते पण घालावे
ही सर्व फुले हार व फुले विकणार्याकडे मिळतात
अरविंद जोशी B.Sc.
9421948894
(माझे पुणे परिसरात मिळणार्या 190 फुलांवर संशोधन आहे')
March 24, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti