(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • बाळाला द्या कॅल्शिअम

    बाळ उन्हात खेळतंय. खेळू दे की! बाळ खूप दूध पितंय. पिऊ दे की! बाळाच्या हाडांच्या बळकटीसाठी ते आवश्यकच आहे. आपलं बाळ जर सकाळच्या कोवळ्या उन्हात खेळत नसेल, दूथ प्यायचा कंटाळा करीत असेल तर तीच चिंतेची बाब समजा. बाळाला कॅल्शिअमची गरज आहे, हे वेळीच ओळखा.

    बाळाला दूध प्यायला आवडत नाही, खूप लवकर दूध पिणं सोडलं आहे बाळानं असं जेव्हा एखादी आई लाडानं सांगते, तेव्हा माझा चेहरा चिंताक्रांत होतो. बाळाच्या भविष्याच्या दृष्टीनं सर्वात वाईट गोष्टच ती आता लाडानं सांगत असते. बाळाची त्वचा गोरीपान राहावी म्हणून त्याला अजिबात उन्हात जाऊ देत नाही, असं जेव्हा एखादी आई प्रेमानं सांगते, तेव्हाही मी असाच हताशपणे तिच्याकडे पाहात राहतो. आपण बाळाची काळजी घेत नाही आहोत, तर त्याच्यासाठी काळजी करावी अशी परिस्थिती निर्माण करीत आहोत, हेच त्या आईला माहित नसतं.

    लहान मुलांमध्ये मुडदूस वाढतो आहे. गुडघ्याखालील पायाचा बाक व फ्रॅक्चरचे प्रमाणही वाढत चाललं आहे. याला मुख्यत्वेकरून आपल्या बदललेल्या खाण्याच्या पद्धती, राहण्याच्या पद्धती व गतीमान जीवन कारणीभूत आहे. आपण अकारण व अयोग्य रीतीनं बाळ वाढवत आहोत, हेही त्यामागचं एक कारण आहे. बाळाला त्याच्या वाढत्या वयात कॅल्शिअम पुरेशी मिळत नाहीत, हे यामागचं कारण असतं.

    बाळ पोटात असताना व जन्मानंतरही सहा ते नऊ महिन्यांपर्यंत बालकाला आवश्यक असलेलं कॅल्शिअम आईकडून दुधातून मिळतं. त्यानंतर मात्र ही गरज पोषक आहारातून भागवली जाणं गरजेचं असतं. त्यासाठी दूध, दही, पनीर, हिरव्या पालेभाज्या, नाचणी, सोया, मासे हे परिपूर्ण असतात. त्यामुळे बाळाला हा वरचा आहार सुरू करणं आवश्यक असतं. बालकाचं वय एक ते तीन वर्षे असताना त्याला दरदिवशी 500 मिलिग्रॅम कॅल्शिअमची गरज असते व हे कॅल्शिअम दोन कप दुधातून मिळू शकतं. मुलाचं वय चार ते आठ वर्षे असताना त्याला दर दिवशी 800 मिलिग्रॅम कॅल्शिअमची गरज असते व हे तीन कप दुधातून मिळू शकतं. वय 9 ते 18 वर्षे असताना त्याला दरदिवशी 1300 मिलिग्रॅम कॅल्शिअमची गरज असते व हे चार कप दुधातून मिळू शकतं. एवढं दूध एकाच वेळी घेण्याची गरज नाही. तर दिवसभरात तेवढं दूध घेणं आवश्यक आहे. प्रत्येक जण एवढं दूध दिवसभरात घेईलच असं नाही. जेवढं दूध घेणं शक्य आहे, तेवढं त्यानं घ्यावं. उर्वरित कॅल्शिअम मिळवण्यासाठी त्यानं आपल्या आहारात वर उल्लेखलेल्या इतर गोष्टींचा समावेश करावा. त्यामुळेही योग्य तेवढे कॅल्शिअम मिळू शकतील. कॅल्शिअमच्या गोळ्या घेण्याऐवजी अन्नातून ते मिळवण्याकडे कल असला पाहिजे.

    प्रामुख्यानं मुडदूस होण्यामागे "ड‘ जीवनसत्त्वाचा अभाव असतो. "ड‘ जीवनसत्त्वाच्या गोळ्या मिळतात. परंतु नैसर्गिक प्रकारात हे जीवनसत्त्व सूर्याच्या किरणांच्या माध्यमातून त्वचेखाली तयार होतं. त्यासाठी दररोज 15 ते 20 मिनिटे कोवळ्या उन्हात बसणं जरुरी आहे. मुलांनीच नव्हे तर मोठ्या माणसांनाही उन्हाचा स्पर्श व्हायला हवा. आपण कार्यालयातून वातानुकूलित वातावरणात दहा-बारा तास काम करतो. व्यायामाचा अभाव आहे. उन्हाची झळा लागू नये यासाठी आपण सकाळीच कडेकोट बंदोबस्तात बाहेर पडतो. असे करू नये. दुपारच्या उन्हाचा तडाखा डोक्याला लागू नये हे ठीक आहे, पण सकाळी कोवळे ऊन अंगावर घ्यायला हवे. सूर्यस्नानाची कल्पना यासाठीच आहे. पूर्वजांनी घातलेल्या रीती आपण किती सहजासहजी विसरून गेलो आहोत! "ड‘ जीवनसत्त्व हेच कॅल्शिअम शोषून घेण्यास व हाडांमध्ये स्थिर करण्यास मुख्यत्वेकरून कारणीभूत असते. त्यामुळे "ड‘ जीवनसत्त्वाची कमतरता होऊ देऊ नये.
    जसं वय वाढतं, तशी हाडांची घनता वाढत जाते. सर्वांत जास्त ती 15 ते 18 या वयात होते व नंतर ती हळूहळू कमी होत जाते. त्यामुळे जर लहानपणीच चांगला आहार ठेवून हाडं बळकट बनवली तर मोठ्या वयात फ्रॅक्चर व हाडांच्या ठिसूळपणाचं प्रमाण कमी होऊ शकतं.

    मुडदूस हे आहारात कॅल्शिअम व "ड‘ जीवनसत्त्व कमी झाल्यास किंवा मूत्रपिंडाच्या विकारानं होऊ शकते. मुडदूसमध्ये गुडघ्याखालील पायाच्या हाडाला बाक येणं, टाळू उशिरा भरणं, मनगटावर सूज येणं असं होऊ शकतं. असं आढळल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अशावेळी रक्ततपासणी व एक्सरेद्वारे याचं निदान होऊ शकतं व औषधांनी हे पूर्णपणे बरं होऊ शकतं.

    जवळजवळ सर्वच मुलांमध्ये एक वर्षापर्यंत व्ही लेग्ज (पायांमध्ये थोडी कमान) असते, जी दीड वर्षापर्यंत नाहीशी होते. दोन ते चार वर्षे वयोगटात नॉक नीज (गुडघे जवळ येऊन पावलांतील अंतर वाढणे) दिसून येतात. चार ते आठ वर्षांपर्यंत नैसर्गिकरीत्या सरळ होऊन जातात. या वयात, कुठल्याही टप्प्यावर जर कॅल्शिअम अथवा "ड‘ जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण झाली तर तो बाक तसाच राहतो. हे टाळायचं असेल तर दुधाला पर्याय नाही. म्हणून मुलांना लहान वयातच दूध पिण्याची चांगली सवय लावा. काही वेळा मुलांना दूध आवडत नाही, अशावेळी मिल्कशेक किंवा लस्सी मुलांना आवडत असेल तर द्या. पण आवश्यक तेवढे कॅल्शिअम त्यांना मिळू द्या.

      May 19, 2017


  • सर कोनार्ड हंट

    कोनार्ड हंट यांनी त्यांचा पहिला कसोटी सामना खेळला तो १७ जानेवारी १९५८ रोजी पाकिस्तानविरुद्ध किंगस्टन ओव्हल येथे त्यांच्या होम ग्राउंडवर . त्यांनी पहिले दोन चेंडू फजल मेहमूदला मारले आणि चार धावा काढल्या त्या इनिंगमध्ये त्यांनी १४२ धावा पहिल्या काढल्या. त्याच सिरींजमधील तिसऱ्या सामन्यात त्यांनी २६० धावा काढल्या आणि गारफिल्ड सोबर्सबरोबर ४४६ धावांची भागीदारी केली.

      August 12, 2021


  • पेंग्विनची वाटचाल

    सहा कोटी वर्षांपूर्वीच्या काळातले पेंग्विन हे आजच्या पेंग्विनपेक्षा खूपच वेगळे दिसत होते. त्या काळाल्या पेंग्विनचे पाय आणि चोची आताच्या पेंग्विनच्या तुलनेत खूपच लांब होत्या. तसंच त्यांचे पंखही सर्वसाधारण पक्ष्याच्या पंखासारखेच दिसत होते. उत्क्रांतीदरम्यान पेंग्विनच्या पिसांचा रंग लाल झाला. त्यानंतरच्या काळात हे पेंग्विन दोन पायांवर उभे राहू लागले. या पेंग्विनची उंची आजच्या सर्वांत मोठ्या पेंग्विनपेक्षाही अधिक होती.

      September 10, 2022


  • कोकणातील बोली भाषांचे सौदर्य

    प्रत्येक बोलीभाषेत एक वेगळे सौंदर्य असते, ती बोलण्याची खुबी असते, आपला असा एक बाज असतो, गोडी असते ती सारी कोकणातील या बाणकोटी व मालवणी बोलीभाषेत पुरेपूर आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शहरात राहणारे लोक आपसात बोलताना सर्रास बाणकोटी व मालवणी बोलीभाषेत बोलत असतात ते ऐकणाऱ्यांनाही गोड वाटते. थोडे फार कोळी-आगरी बोलीबाबत असेच बोलता येईल. एकूणच कोकण ही निसर्गसौंदर्याची खाण आहे

      November 29, 2022


  • थिएटर ॲ‍कॅडमीचा ‘तीन पैशाचा तमाशा’ या नाटकाचा पहिला प्रयोग

    डॉ.सदानंद मोरे घुमान येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. ‘तुकाराम दर्शन’ या त्यांच्या ग्रंथासाठी साहित्य अकादमीसह १५ संस्थांचे पुरस्कार मिळाले होते. तसेच डॉ.सदानंद मोरे यांच्या’उजळल्या दिशा’ या नाटकासाठी राज्य शासनासह १० संस्थांचे पुरस्कार मिळाले होते.

      June 25, 2022


  • आहारातील बदल भाग ५० – चवदार आहार -भाग ११

    आपल्याकडे तिखट म्हणजे फक्त मिरचीच असा समज आहे. पण असे अनेक पदार्थ आहेत, जे तिखट आहेत जसे सुंठ, मिरी, पिंप्पळी, आले, इ.इ.
    सर्व तिखट पदार्थ हे तेज म्हणजे अग्निमहाभूत प्रधान द्रव्य असतात.

    आपल्याकडे म्हणजे भारतात दोन प्रकारचे मसाले आढळतात.
    गोडा मसाला आणि यातच मिरचीपूड घातली की बनतो, तिखट मसाला. प्रदेशानुसार यांची नावे कदाचित बदलतील.

    भारतीय आहारात पंधरावीस प्रकारचे मुख्य पदार्थ मसाला बनवण्यासाठी वापरले जातात. मुख्यत्वेकरून मिरी, दालचिनी, लवंग, बडिशेप, खसखस, तमालपत्र, जायफळ, जायपत्री, धने, मोहोरी, हिंग, हळद, यासारखे सुके पदार्थ वापरले की सुका मसाला आणि कांदा, लसूण, नारळ, शेंगदाणे वापरून केलेला ओला मसाला होतो.

    मसाल्यातील एक दोन पदार्थ कमी जास्त केले की, मसाल्याचा स्वाद बदलत जातो. जिरे जास्ती वापरले की तो पावभाजीचा मसाला होतो, धनेपावडर जास्त वापरली की सांभार मसाला होतो. त्यामुळे प्रत्येक तिखट पदार्थ कमी जास्त प्रमाणात आपले परिणाम दाखवतात.

    गंमत अशी आहे, हे मसाल्याचे पदार्थ तर सर्वच गृहिणी वापरतात, पण हे सर्व मसाल्याचे पदार्थ, आयुर्वेदीय औषधी आहेत, त्यांचे वेगवेगळे गुणधर्म आहेत, त्यांचा युक्तीने वापर केला तर आपला आहार हेच परिपूर्ण औषध होऊ शकतो, हे ज्या गृहिणींना समजले, त्या सुगृहिणी !

    या प्रत्येक मसाल्यामधे एकतरी उडनशील तेल असते, जे त्या पदार्थाला विशिष्ट सुगंध, आणि विशिष्ट चव देते. हे तेल औषधी असते, औषध म्हणून पोटात जाणे अपेक्षित आहे.

    पण जीभेच्या चोचल्याच्या मागे लागून आपण खमंगपणा वाढण्यासाठी मसाले भाजून वापरायला सुरवात केली आणि मूळ औषधापासून, आहार लांब होत गेला.

    काही औषधी बनवताना भाजावी लागतात, शिजवावी लागतात, तळावी लागतात, त्यातील काही पदार्थांचे गुण वाढवायचे असतात तर काहींमधले दोष काढावयाचे असतात, जसे हिंग हा तुपात भाजून वापरावा, मोहोरी तेलात तडतडल्यावर शुद्ध होते. म्हणजे त्यातील उष्णतीक्ष्ण गुण थोडे कमी होतात.

    त्यामुळे हा अग्निसंस्कार करणे आवश्यक असते. पण काही ठिकाणी मात्र हे मसाले औषध पूर्ण तयार झाल्यावर कच्च्या स्वरूपात वरून घालायला सांगितले आहे. याला आयुर्वेदीय औषधांच्या परिभाषेतमध्ये प्रक्षेप म्हणतात.

    मसाल्याचे पदार्थ भाजले की त्यातील उडनशील तेल उडून जाते, जे पोटात जाणे अपेक्षित असते, त्यामुळे मसाला न भाजता आहारात वापरला तर आपले जेवणच औषधी होईल. म्हणजेच युक्ती वापरली तर आहार हेच औषध बनते.

    "आम्हाला वगळा गतप्रभ जणु होतील तारांगणे" च्या धर्तीवर हे मसाल्याचे पदार्थ वापरायचे नाहीत, असे ठरवले तर जेवणातील औषधी भाग जवळपास संपूनच जाईल.

    तिखट खाऊच नका, असे म्हणण्यापेक्षा युक्तीने तिखट खा, असे म्हणणे जास्त गोड वाटते ना !

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    11.11.2016

      November 11, 2016


  • फॅंड्री– एक सामाजिक चित्रपट

    कामावरून समाजात त्याची हेटालणी होत राहिली तर एक दिवस हे सारे असहय होऊन गुन्हेगारीकडे वळू शकतो हे दर्शविण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून केला गेलेला आहे. या चित्रपटात एका डुकराला पकड्ण्यासाठी स्वतःच्या जीवाची काळजी न करता पळापळ करणार्‍या संपूर्ण कुटूंबाच राष्ट्रगीत सुरू असताना स्तब्ध उभं राहणं जे काही सांगून जात ते केवळ शब्दात व्यक्त करण अशक्य आहे

      March 1, 2014


  • शिवस्वरूप खंडोबा -एकं सत् विप्राः बहुधा वदंति

    इंद्रं मित्रं वरुणं अग्निं आहुः अथो इति दिव्यः सः सुऽपर्णः गरुत्मान् l
    एकं सत् विप्राः बहुधा वदंति अग्निं यमं मातरिश्वानं आहुःl

    (ऋग्वेद१/१६४/४६)

    [सत्य स्वरूपी ईश्वर एकच आहे, पण ज्ञानीं लोक त्याला इंद्र, मित्र, वरुण आणि अग्नि असें म्हणतात. देवलोकीं राहणारा सुंदर पंखांचा पक्षीही तोच. जगातील विभिन्न जाती पंथातले लोक त्याला विभिन्न नावांनी ओळखतात. कुणी त्याला अग्नी, कुणी यम, कुणी खुदा, कुणीगॅाड, कुणी वाहेगुरू या नावाने ओळखतात. कुणी 'खंडोबा' या नावानेहि].

    आजकाल टीवीवर 'खंडोबा'च्या जीवन चरित्रावर मालिका सुरु आहे. मालिकेत खंडेराय हे महादेवाचे अवतार आहे, असे दाखविले जाते. खंडेराय हे धनगर समाजातले होते. काहींच्या मते देत्यांचा राजा बळी यांनी खंडेरायांना जेजुरीचे क्षेत्रपाल नेमले होते. एक मात्र खंर, शेकडों/ हजारों वर्षांपासून लोक त्यांची पूजा करतात,त्या अर्थी त्यांनी आपल्या आयुष्यात काही भव्य-दिव्य केल असेल. आपल्या प्रजेला निश्चित सुखी ठेवले असेल. काही तथाकथित पुरोगाम्यांना वाटते, मालिकेत खंडेरायाचे चरित्र विकृत करून दाखविले जात आहे. त्यांना हे सर्व ब्राह्मणी षड्यंत्र वाटते. पण मला तर वाटते या अतिविद्वान लोकांना देशाच्या मूळ सर्वसमावेषक संस्कृती बाबत कुठलेहि ज्ञान नाही.

    आसेतु हिमालय पर्यंत पसरलेला हा विस्तृत आणि विशिष्ट भू भाग भारत भूमी म्हणून वैदिक काळापासून ओळखला जातो. प्राचीन काळापासून विभिन्न जनजाती समूह इथे एकत्र नांदत आहे. त्यांची जात-पात भाषा वेगळी तरी त्यांचे आणि भारत भूमीचे भविष्य सर्वांनी एकत्र राहण्यातच आहे, हे प्राचीन वैदिक ऋषींनी ओळखले होते. एकत्र राहण्यासाठी सर्वाना आपल्यात समावून घेणे गरजेचे. त्या साठी सर्व जमाती आणि जातीय समूहांच्या परंपरेचा सम्मान करणेहि गरजेचे.

    ईश्वराची कल्पना सर्व जातीय समूहांनी आपापल्या परीने वेगवेगळी केली. कुणी आपल्या पूर्वजांना ईश्वर मानले, कुणी प्रकृतीला ईश्वर मानले, कुणी सर्पांची पूजा करायचे तर कुणी लिंग पूजा करायचे, तर कुणी वृक्षांना देवता मानायचे. हे सर्व पाहूनच तुलसीदास यांनी म्हंटले आहे, “जाकी रही भावना जैसी, प्रभु मूरत देखी तिन तैसी". पण सर्वांचा उद्देश्य एकच, सत्य मार्गावर जाण्यासाठी भगवंताच्या कृपेची प्राप्ती.

    हे ओळखूनच कदाचित् उपनिषदकरांनी, ईश्वराची नवीन संकल्पनापुढे आणली.

    यस्तु सर्वाणि भूतान्यात्मन्येवानुपश्यति ।

    सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते ॥

    (ईशान उपनिषद /६)

    जो सर्व प्राणीमात्रां मध्ये भगवंताला पाहतो, तो कुणाचा हि द्वेष करीत नाही. अर्थात प्रत्येक प्राण्यामध्ये ईश्वराचा निवास आहे. तात्पर्य ईश्वराच्या प्रत्येक स्वरुपाची पूजा उपासना करताना आपल्या इष्ट देवताची कल्पनात्या ईश्वरीय स्वरुपातहि करू शकतो.

    भगवंतानी गीतेत हीच भावना रोखठोक शब्दात सांगितली ते म्हणतात, अर्जुन, मीच सर्व जीवांचा आदि, मध्य आणि अंत आहे. मीच विष्णू आहे, मीच शंकर आहे, कुबेर आहे, अग्नि आहे, मेरू पर्वत आहे, कार्तिकेय आहे, महासागर आहे, वृक्षांमध्ये अश्वत्थ आहे, अश्वांमध्ये उचैश्रवा आहे, गजेंद्रामध्ये ऐरावत आहे आणि सुरभी गायहि आहे. मी सर्पांमध्ये वासुकी आहे, नागांमध्ये अनंत नाग आहे, वरुण आहे दैत्यांमध्ये प्रल्हाद आहे, .....अर्थात त्या काळी माहित असलेल्या सर्व ईश्वरी स्वरूपांमध्ये एकच ईश्वर आहे हि भावना लोकांमध्ये रुजवली.

    काळ पुढे गेला, भरतखंडात जनसंख्या वाढली,नवे नवे विचार जन्मले आणि त्या सोबत देवतांची संख्याहि वाढत केली. प्रत्येकाला आपला देव हा श्रेष्ठ वाटणारच. जिथे श्रेष्ठत्व तिथे भांडणेहि होणारच. आपल्या पुराणकारांनी, या वरहि उपाय शोधला. ब्रह्मा,विष्णू, महेश आणि आदिमायेची संकल्पना लोकांच्या मनात रुजवली. सर्व स्त्री देवता म्हणजे आदिमायेचे स्वरूप. पुरुष देवता म्हणजे विष्णू किंवा महेश. इंद्राला पराजित करणारा गवळी समाजातला गोवर्धन गिरधारी हा विष्णू अवतार म्हणून प्रसिद्धी पावला तर धनगर समाजातील खंडोबा हे महादेवाचे अवतार ठरले. अश्या रीतीने समाजाला एक सुत्रात बांधण्याचे कार्य आपल्या ऋषीमुनी आणि पुराणकारांनी केले. सर्वांच्या परंपरेंचा आणि उपासना पद्धतींचा सम्मान केला. नाव वेगवेगळे असले तरी ईश्वर एकच आहे, हि भावना जनतेत रुजवली.

    पण आज आपल्या देशाचे दुर्भाग्य, स्वत:ला पुरोगामी(????) म्हणविणारे लोक समाजात दुही माजविण्याचे कार्य, मोठ्या जोमात करतात आणि स्वत:ला धन्य मानतात. प्रत्येकाला तो दुसर्यापासून कसा वेगळा आहे, हे दाखविण्यातच आपली उर्जा व्यर्थ करतात. अश्या अतिविद्वान लोकांना ‘खंडेराय’ मालिकेतहि षड्यंत्र दिसेल. पण ईश्वराला मानणारे आणि श्रद्धावंत लोक ‘खंडोबा’च्या स्वरुपात महादेवाचे दर्शन करतात आणि महादेवात खंडेरायांचे'.

    कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। 

      October 16, 2015


  • पनीरचे आरोग्यदायी फायदे

    हॉटेलमध्ये गेल्यावर आपण बऱ्याचदा पनीर असलेल्या पदार्थांची ऑर्डर देतो. कारण पनीरचे सर्वच पदार्थ खूप चविष्ट असतात. मांस न खाणाऱ्या अनेक लोकांची पहिली पसंती पनीरच असते. पनीर प्रोटिनयुक्त असल्याने ते आरोग्यदायी आहे. पनीर हा चव आणि आरोग्य यांचा अप्रतिम संगम आहे.

    प्रोटिनचा सर्वोत्तम स्रोत
    काही शाकाहारी लोक मांस खात नाहीत, त्यामुळे त्यांच्यासाठी पनीर हा प्रोटिन्स मिळवण्याचा चांगला स्रोत आहे. 100 ग्रॅम पनीरमधून 18 ग्रॅम प्रोटिन्स मिळतात. यामुळे स्नायू बळकट होतात आणि वजन कमी होण्यासही मदत होते.

    भुकेवर नियंत्रण राहते
    पनीरमध्ये प्रोटिन्स असल्याने ऊर्जा हळूहळू वापरली जाते. यामुळे रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रित राहते. तसेच ती झटकन वाढून कमी देखील होत नाही. त्यामुळे पनीर असलेले पदार्थ खाल्याने बराच वेळ भुकेवर नियंत्रण राहते.

    दात मजबूत होतात
    पनीरमध्ये प्रोटिनबरोबरच कॅल्शियमही असते. यामुळे दात व हाडे मजबूत होण्यास मदत होते. हा दुग्धजन्य पदार्थ असला तरी पनीरमध्ये दुधापेक्षा जास्त पोषक घटक असतात. परंतु पनीर असलेले पदार्थ खाताना थोडा विचार करावा कारण त्यात कॅलरी जास्त असतात.
    फॅट्स बर्न होण्यास मदत होते

    प्रोटिन आणि कॅल्शियमबरोबरच पनीरमध्ये कॉन्ज्युगेट लिनोलीक अॅसिड नामक फॅटी अॅसिड असते. यामुळे शरीरातील फॅट्स कमी होऊन वजन घटण्यास मदत होते. वजन कमी करायचे असल्यास आहारात पनीर असलेल्या पदार्थांचा समावेश करावा.

    घातक आजारांपासून लांब ठेवते
    कॅन्सर, हृदय विकार यांसारख्या गंभीर आजारांपासूनही पनीरमुळे संरक्षण होते. पनीर असलेले पदार्थ खाल्याने शरीरातील कॅन्सरच्या पेशींची वाढ खुंटते. याचबरोबर रक्तवाहिन्यांमध्ये फॅट्स जमा होण्याचे प्रमाणही कमी होते. यामुळे हृदय विकाराचा धोका कमी होतो.

    पनीर शरीरासाठी पोषक असले तरी त्याच्या आरोग्यदायी गुणधर्मांबाबत काही मतभेद आहेत. काही लोकांच्या मते, पनीरमुळे वजन वाढत असल्याने ते खाऊ नये. 100 ग्रॅम पनीरमधून 292 ग्रॅम कॅलरी मिळतात हे खरे असले, तरी कष्टाची कामे करणाऱ्या लोकांनी पनीर खाल्ल्यास त्यातील कॅलरी सहज बर्न होऊन त्यांना पोषक घटक मिळू शकतात. म्हणून पनीर प्रमाणात खावे, अतिजास्त खाऊ नये किंवा खाणे टाळूही नये.

    कच्चे पनीरही चवीला स्वादिष्ट असते. त्यावर काळी मिरी आणि मीठ भुरभुरून खाल्यास चव चांगली येते. मात्र तुम्हांला पनीर मसाला किंवा पनीरचा कोणताही पदार्थ करायचा असेल तर त्यासाठी पनीर तळून घेऊ नका.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      December 24, 2016


  • औषधी वाळा – गरीबांचा A.C.

    वाळ्याला गरीबांचा A.C. म्हणतात. या बहुगुणी वाळ्याचा विशेषत: उन्हाळ्यात खूप उपयोग होतो.

    Chrysopogon zizanioides हे शास्त्रीय नाव असलेले Vetiver grass म्हणजेच वाळा, ज्याचा मूळ उगम आपल्या भारतातच आहे. वाळ्याला बेना, बाला, मुदीवाळा, कुरुवेल, सुगंधी-मूलक, उशीर, खर, बेकनम्‌, कसक्युकस ग्रास, व्हेटिव्हेरिया झिझॅनॉईडिस अशी अनेक नावं आहेत. विशेषत: पश्चिम आणि उत्तर भारतात "खस गवत" ह्या नावाने परिचीत असलेले हे गवत. वाळा या गवता या बहुवर्षायू गवताची उगवण दाट होते. हे गवत मृद्‌संधारणासाठी अतिशय चांगले आहे. लागवड स्लिप्स’पासून केली जाते. पिवळा वाळा, काळा वाळा असे वाळ्याचे दोन प्रकार आहेत. गवती बांध या तंत्रामध्ये समपातळीत उतारास आडवे मातीचे बांध टाकण्याऐवजी वनस्पतीची लागवड केली जाते व त्याचा बांधासारखा उपयोग करता येतो. याकरिता प्रामुख्याने मारवेल-८, मद्रास अंजन, खस गवत आणि सुबाभूळ अशा वनस्पतींची निवड करतात. उन्हाळ्यात माठात वाळा टाकल्यास पाण्याला मस्त सुगंध येतो आणि पाण्यातील दोष निघून जाण्यासही मदत होते. वाळ्याच्या मुळांच्या दोन जुड्या तयार कराव्यात. एक जुडी पिण्याच्या पाण्यामध्ये घालावी आणि दुसरी उन्हात वाळत ठेवावी. दुसर्याड दिवशी उन्हात वाळवलेली जुडी पिण्याच्या पाण्यात आणि पाण्यातील जुडी उन्हात ठेवावी. याप्रमाणे दररोज करावं. हे वाळ्याचे पाणी उष्णतेचे विकार दूर करणारे आहे. तसेच हे पाणी थंड व सुगंधी होते. त्या पाण्याने तहान भागते. वाळ्याचे पडदे करून त्यावर पाणी मारलं तर सभोवती गारवा वाटतो. म्हणूनच उन्हाळ्यात अनेक ठिकाणी वाळ्याचे पडदे लावण्याची पारंपरिक प्रथा आपल्याकडे आहे. वाळा हा अतिशय थंड आहे. अंगाची आग होणे, अंगातील उष्णता यावर वाळ्याचे चूर्ण घ्यावे. लघवीच्या, किडनीच्या आजारांवर वाळ्याचा चांगला उपयोग होतो. लघवीला आग, जळजळ होणे, लघवीचे प्रमाण कमी होणे यावर वाळ्याचा उत्तम उपयोग होतो. मुलांचा घोळाणा फुटणे, विशेषत: उन्हाळ्यात काही मुलांना हा त्रास खूप होतो. यावर वाळ्यापासून तयार केलेले 'उशीरासव' इतर औषधांबरोबर वापरतात. घामोळ्या, अंगावर पित्त येणे त्वचेवर लाल चट्टे येणे यावर वाळ्याच्या चूर्णाचा लेप लावतात. त्वचारोग, त्वचेची आग होणे, त्वचेची आग होणे, तारुण्यपिटीका यासाठी वाळा चूर्णाचा इतर चूर्णांबरोबर वापर करतात. त्यामुळे त्वचा टवटवीत होते. अंगाला घाम जास्त येत असल्यास, घामाला दुर्गंधी येत असल्यास वाळ्याचे चूर्ण अंगाला लावावे. खूप ताप, विशेषत: उन्हाळ्यातील ताप तसेच रक्तपित्त, त्वचेखाली रक्तस्त्राव यावर वैद्यांच्या सल्ल्याने वाळ्याचा उपयोग करतावा. वाळा अत्तर म्हणजेच खसचं अत्तर. वाळ्याचा वास मनाला उल्हसित करतो, आपल्या संवेदनकेंद्रांना चेतना देतो. त्यामुळे आपल्याला सुगंधाचं ज्ञान होतं. वाळ्याचं चूर्ण अंगाला चोळलं तर त्वचेचा दाह कमी होतो. घामाचं नियंत्रण होतं आणि घामाची दुर्गंधीही कमी होते. चूर्ण पाण्याबरोबर पोटात घेतलं तर "तृषा' शमते आणि पोटातली कडकी कमी होते. वाळ्याचे तेल बाजारात ८ ते १०००० रुपये किलो दराने विकले जाते. वाळ्याचे तेल उध्र्वपातन पद्धतीने काढताना खूपच काळजी घ्यावी लागते. नैसर्गिक सुगंधी तेल हे अनेक रासायनिक पदार्थाचे मिश्रण असते. यातल्या प्रत्येक पदार्थाचा उत्कलन बिंदू विशिष्ट असतो व इतरांपेक्षा भिन्न असतो. तसेच त्यांच्या स्पेसिफिक ग्रॅव्हिटी (सापेक्ष घनता)मध्येही फरक असतो. ऑईल सेपरेटरद्वारे तेल व पाणी वेगळे करताना जर पाण्यापेक्षा सुगंधी तेल जड असले तर ते तेल भांडय़ाच्या तळाशी राहते व हलके असले तर पाण्यावर तरंगते. वाळ्याच्या तेलाची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी .९९० ते १.०३२ असते. उध्र्वपातन प्रक्रियेने वाळ्याचे तेल काढण्याची प्रक्रिया सुरू केल्यावर सुरुवातीला येणारे वाळ्याच्या तेलातील काही घटक हे पाण्यावर तरंगतात तर नंतर येणारे काही घटक हे पाण्यापेक्षा जड असल्याने भांडय़ाच्या तळाशी राहतात. बाजारात वाळा मिळतो. छोट्या शहरांमध्ये तर मिळतोच पण पुण्या मुंबईलाही मिळतो. काष्ठौषधी असलेल्या दुकानात नक्की मिळतो.

    वाळ्याचे औषधी उपयोग
    वाळ्यामध्ये शीत, तृष्णाशामक, मुत्रल हे मुख्य गुणधर्म आहेत. मुळांचे चूर्ण थंड, उत्तेजक व मुत्रल आहे.
    वाळा पित्त व कफनाशक तसेच दुर्गंधीनाशक असून दमा, खोकला, उचकी, रक्तरोग, उलटी, तहान, हृदयरोग, मूत्ररोग, लघवीची आग, अंगाचा दाह, व्रण आणि ज्वर या विकारांवर उपयुक्त आहे. वाळा जाळून धुरी घेतल्यास तीव्र डोकेदुखी कमी होते. उन्हाळी लागल्यास वाळा चूर्ण पाण्यात उकळून थंड झाल्यावर घेतल्यास आराम मिळतो. थकवा कमी करण्यासाठी वाळा सरबत उत्तम आहे. उन्हाळ्यात उष्णता कमी करण्यासाठी वाळ्याच्या पडद्यांचा उपयोग करतात.
    वाळ्याचे तेल, अत्तरे, सौंदर्य प्रसाधने व खाद्य पदार्थात वापरतात. वाळ्यात रंगद्रव्ये, आयर्न ऑक्साेईड, आम्ल चुन्याचे प्रमाण असते. वाळ्याचे सरबत तर हिरव्या रंगामुळे व थंड गुणामुळे उपयोगी आहे.

    चंदन वाळा सरबत.
    साहित्य. चंदन पूड पाच ग्रॅम, वाळा पावडर पाच ग्रॅम, पाणी 50 मि.लि., साखर 100 ग्रॅम.
    कृती. पाणी उकळलेल्या पाण्यात चंदन व वाळा पावडर टाकून दोन तास झाकून ठेवावी. नंतर चमच्याने ढवळून गाळून किती होते ते मोजावे. एक वाटी मिश्रणास दोन वाटी साखर व एक वाटी पाणी याप्रमाणे घ्यावे. पाणी व साखर एकत्र उकळून फेस शांत झाला आणि मिश्रण स्वच्छ दिसू लागले, की गॅस बंद करून त्यात चंदन-वाळ्याचं तयार केलेलं मिश्रण घालून चांगलं चमचाने ढवळून गाळणीने गाळून बाटलीमध्ये भरून ठेवावे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ- इंटरनेट

      April 11, 2017