वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आज नवरात्रीचा रंग - गहन निळा
आजचा विषय निळ्या रंगाचे ब्ल्यूबेरी
आवळा, जांभूळ, स्ट्रॉबेरी, तुती, करवंद या बरोबरच ‘ब्ल्यूबेरी’ हे बेरीवर्गीय फळा मध्ये येते. भारतात हे फळ जास्ती वापरले जात नाही. ब्ल्यूबेरी हे पाश्चिमात्य फळ आहे. ब्ल्यूबेरीची लागवड प्रामुख्याने अमेरिकेत होते. या फळाची मूळ सुरुवात ही १९५० मध्ये ऑस्ट्रेलियात झाली होती. त्यानंतर १९७० मध्ये डेव्हिड जॉन नावाच्या माणसाने याच्या बिया अमेरिकेत आणून त्याची लागवड केली. हे फळ स्कॉटलंडमध्ये 'ब्लेबेरी', नॉर्वेत 'ब्लॅबर' ओळखले जाते. विविध जाम आणि केक्समध्ये हे फळ वापरतात. निळ्या रंगांचं हे फळ चवीला मधूर असते. ब्ल्यूबेरीची पानं हिरवीगार तर फुलं घंटेच्या आकाराची असतात. त्यांचा रंग पांढरा, गुलाबी आणि लाल असतो. फळाचा रंग अर्थातच निळा असतो मात्र कच्च्या फळाचा गर हा हिरवट रंगाचा असतो. असं हे फळ दिसायला अगदी बोरासारखं असून त्यात एक लहान बी देखील असते. जेली, जॅम, मफिन्स आणि स्नॅक्समध्ये वापरतात. पाश्चिमात्य देशांमध्ये पोषक ब्ल्यूबेरी फळाला चांगली मागणी आहे. हे फळ जास्त काळ टिकते. या फळाचे औषधी उपयोगही बरेच आहेत. मेंदूच्या विकारांवर मात करून स्मरणशक्ती वाढवण्याचं काम करतं. दररोज अर्धा कप ब्ल्यूबेरीचं सेवन केल्याने कर्करोगापासून संरक्षण करतं. त्वचेचा पोत सुधारते. त्यामुळे त्वचेवरील सुरकुत्यांचं प्रमाण कमी होतं. मूत्राशयाचं आरोग्य सुधारून लघवी साफ होते. उच्च रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राखते त्यामुळे हृदयविकारापासून बचाव करते. यात जीवनसत्त्व ए, सी आणि ईचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे तुमच्या शरीरात ऊर्जा निर्माण करण्याचं काम करते. डोळ्यांचं आरोग्य सुधारतं. शरीरावर साठलेली अतिरिक्त चरबी कमी करण्याचं काम करते. ब्यूर्बेरी ने पचनक्रिया सुधारते. बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांनी या फळाचं जरूर सेवन करावं. मेंदूचे कार्य उत्तम गतीने चालण्यासाठी आणि त्याचा विकास होण्यासाठी ब्लूबेरीचा रस आरोग्यदायक ठरतो, असे संशोधन नुकतेच समोर आले आहे. त्वचा रुक्ष होण्यापासून टाळण्यासाठी ब्ल्यूबेरी खाणं उपयुक्त ठरतं.
रोझमेरी ब्लूबेरी स्मॅश
साहित्य : ७-८ ब्ल्यूबेरी, रोझमेरीचे तुरे, २ चमचे मध, २ चमचे लिंबूरस, १ कप सोडा, बर्फ.
कृती : रोझमेरीचे तुरे, ब्ल्यूबेरी आणि मध एकत्र करून नीट वाटून घ्यावे. त्यात लिंबाचा रस आणि बर्फ घालून ते एकत्र कॉकटेल शेकरमधून शेक करून घ्यावे. एका उंच पेल्यात थोडा बर्फ घालावा त्यावर हे मिश्रण ओतावे. आता यावर शीतपेय घालावे आणि रोझमेरीच्या तुऱ्यांनी सजवावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
October 2, 2019
डासांच्या दंशाचा प्रतिबंध करण्यासाठी झोपताना अंगभर कपडे घालावे, उघड्यावर झोपू नये. शक्यतो कीटकनाशक द्रव्यात बुडवून मग सावलीत वाळविलेल्या मच्छरदाण्या वापराव्यात. सुतापेक्षा नॉयलॉन टिकते व त्यावर कीटकनाशकही टिकते त्यामुळे नॉयलॉन मच्छरदाण्या जास्त चांगल्या.
July 5, 2023
चांगल्या सवयी, चांगले विचार, चांगले संस्कार, चांगलं वळण हे विद्यार्थ्यांचं पुढील आयुष्य मनोहर करतं. केवळ भौतिक बाबतीत मनोहर नको, तर मानसिकतेतही मनोहर हवं. नाती जपणं ही मनोहरी अवस्था आहे. नाती दुरावली की मन उदास होतं. आपली मुलं परदेशात पैसा कमविण्यासाठी जातात हे मनोहर चित्र असलं तरीही पालकांना आपल्यापासून मुलं दुरावल्याची जाणीव उदास करते.
June 28, 2026
मराठीत बाळशास्त्री जांभेकर यांनी २१ जून १८३२मध्ये ‘दर्पण’ हे वृत्तपत्र सुरू केले. याच काळात हिंदी व अन्य भारतीय भाषांमध्ये अनेक वृत्तपत्रे सुरू झाली.
November 16, 2021
पाण्याची प्रशंसता भाग दोन
जेवणानंतर पाणी प्यायल्याने जाडी वाढते. असं वाग्भटजी म्हणताहेत. असं नव्हे तर व्यवहारातही तेच दिसते. जसं जेवायच्या अगोदर पाणी प्यायले की अग्नि कमी होतो, पचन मंदावते आणि कृश होतो. तसं जेवणानंतर पचन सुरू करण्याचे सिग्नल गेलेले आहेत, ( गाडीमधे प्रवासी जेव्हा पूर्ण क्षमतेने प्रवासी भरलेले आहेत, वाहकाने दोनदा घंटा वाजवलेली आहे, ) आणि आता आपल्याला काम सुरू केले पाहिजे असे वाटून पोटाने आतल्या आत स्वतः भोवती फिरायला सुरवात केलेली आहे. तेवढ्यात प्रचंड पाण्याचा धबधबा वरून आत येतो. काय होईल, जरा कल्पना करून पहा.
(गाडी सुरू झालेली आहे, दोन घंटा दिलेल्या आहेत. आतमध्ये माणसे दाटीदाटीने ठासून भरलेली आहेत, तेवढ्यात आणखी चार पाच माणसे हात दाखवून गाडी थांबवताहेत, तेव्हा जर चालकाने गाडी थांबवली तर बसलेले प्रवासी कसे कलकलाट करतात.)
सारंच बिघडून जातं. फिरणारी यंत्रणा सावकाश होते. मुख्य म्हणजे आतले तापमान बदलते. सुरू झालेली गाडी परत थांबते. कलकलाट सुरू होतो. कोणी का कशासाठी आधी येता येत नव्हतं का, आधीच उशीर झालाय, आणि इथे जागा तरी कुठेय, चला हो तुम्ही पुढे, येतील ती मागच्या गाडीने, या प्रकारचे उदगार गाडीत सुरू होतील. बरोबर आहे ना ?
अगदी तसंच पोटात सुरू होतं.
ऊर्ध्वम आमाशयात कफम् अंते करोति स्थूलत्वम् म्हणजे वरच्या पोटापासूनच चिकट कफाची संचिती म्हणजे साठवणूक सुरू होते. जाडी वाढायला इथेच सुरवात होते.
जेवणानंतर लगेचच पाणी ढोसल्याने हे परिणाम दिसतात. आणि हे पाणी जर फ्रीजमधले गारेगार असेल तर आणखीनच सत्यानाश. म्हणजे जेवणानंतर लगेच गरम पाणी प्यायले तरी नाही हो चालत. एकदा मिक्सर सुरू केला की आता मधे थांबणे नाही.
आणि पचनाला जेव्हा हवे तेव्हा पाणी देणार नाही, नको तेव्हा ते आत भरणार त्याचा काय उपयोग ?
म्हणजे मरताना उपयोगी पडावी म्हणून काशीहून गंगा आणून ठेवली होती. तहानेने जीव जायची वेळ आली तरी म्हणायचे, मरताना शेवटचा घोट गंगेचा जावा, म्हणून आणली आहे तर आत्ताच कशाला फोडा, नंतर उघडू. आता बाटली फोडली तर नंतर काय उपयोग ? हा विचार करेपर्यंत प्राण गेलेले असतात. आता बाटली फोडली तरी गंगा पोटात काही जात नाही. ज्यावेळी जी गंगा पोटात जायला हवी, त्याचवेळी ती पोटात गेली तर उपयोग.
घोडे नाचवून मजा बघायची असेल तर वराती मधेच घोडे नाचले पाहिजेत.
वराती मागून घोडे नाचवून काय उपयोग ?
वैद्य सुविनय दामले,
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
13.01.2017
January 13, 2017
एकदा कर्करोगाचे निदान झाले की, रोगी स्वतः व त्याचे नजिकचे कुटुंबिय दोघांवर प्रचंड तणाव येतो. कर्करोगाचा इलाजासाठी इतर काही रोगांच्या तुलनेत खूप जास्त खर्च येतो. देण्यात येणारी औषधे व रेडिएशन हेदेखील खर्चिक उपाय आहेत.
May 31, 2023
१) आवळा, शिकेकाई, रिठा हे सर्व २०० ग्रॅम घेउन एकत्र पाण्यात उकळावे. थोडा कापुर मिसळावा आणि शाम्पुसारखे हे पाणी डोके धुण्यास वापरावे.
२) उरलेली चहापावडर एका ग्लासमध्ये स्वछ पाण्यात रात्रभर भिजत ठेवावी. सकाळी पाणी गाळून त्यात लिंबु पिळवा हे पाणी शाम्पुसारखे वापरावे.
३) कडुनिबांची पाने पाण्यात उकळुन त्याने केस धुवावेत. त्यामुळे केस मजबुत तर होतातच शिवाय केस ही गळ्तही नाहीत.
४) जास्वंद जेलने केस गळ्त असल्यास मसाज व कोरफ़ड जेलने केसांना मसाज करावा .
५) शिकेकाई पाण्यात उकळुन हे पाणी शाम्पुसारखे वापरावे त्यामुळे केस चमकदार होतील.
६) मेहंदी पावडर एक पाकीट १०० ग्रॅम घेउन त्यात १चमचा चहापावडरचे पाणी उकळुन त्या मिश्रणात १ चमचा कॉफ़ी पावडरचे पाणी उकळुन त्यात १ चमचा काथा पावडर त्यात घालावी. ही मेहंदी केसांना २ तास ठेवावी. केस सोनेरी रंगाचे तर होतीलच. शिवाय मुलायम पण होतील .
7) कोरड्या केसांना मेहंदी, बदाम, एरंडेल तेल व तिळाचे तेल लावावे. त्यात स्निग्धपणा अधिक असतो. त्यातील एखादे तेल गरम करून लावावे.तेल लाउन झाल्यावर दोन - तीन तासात किंवा घरीच असाल तर ४-५ तासांनी केस धुवावेत म्हणजे धुळ, प्रदुषण केसात चिकटुन राहात नाही.य
घरात अॅलोव्हेरा असेल तर त्याचा गर काढुन लावला तर केस मऊ होतात.
8) शिकेकाई किंवा रिठ्याच्या पाण्याबरोबरच कोरड्या केसांना अंडे असलेला शाम्पू वापरावा.
9) मेहंदी डायमुळे केसांना कलरिंग होते. कंडिशनिंग होते. पांढऱ्या केसांना कलर येतो. मुळांना मेहंदी लावल्याने कोंडा निघतो. त्वचा स्वच्छ झाल्याने नवीन केस येण्यास मदत होते. म्हणून किमान महिन्यातून एकदा तरी मेहंदीचा केसांच्या मुळापासून शेंड्यापर्यंत डाय करावा.
10) मेहंदी भिजवताना केसांना पुरेल एवढी मेहंदी घ्यावी. केस काळे हवे असतील तर लोखंडी भांडे घ्यावे. एक कप चहापावडरचे पाणी घ्यावे. निलगिरी तेलाचे 3-4 थेंब, अंडे, लिंबू, आवळा पावडर घ्यावी.
11) मेहंदी डाय ज्या दिवशी करणार, त्याच्या आदल्या दिवशी एक ग्लास पाण्यात एक चमचा चहाची पावडर टाकावी. ते पाणी उकळावे. हे पाणी थंड झाल्यानंतर त्यात अंडे टाकावे. अंडे चांगले मिक्स झाल्यानंतर आवळा पावडर टाकावी. हे मिश्रण घट्ट असावे. तयार केलेली मेहंदी चार ते सहा तास भिजवली पाहिजे. जेव्हा मेहंदी लावणार तेव्हा त्यामघ्ये लिंबू व निलगिरी तेल टाकावे.
12) दुतोंडी केस हे आरोग्य चांगले नसल्याचंच लक्षण आहे. त्यामुळे पालेभाज्या, बीट , कडधान्य, अॅव्हाकाडो, फळं असा चौरस आहार ठेवला तर केसंसुद्धा निरोगी राहतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 25, 2017
हल्ली वेद मानणार्यांवर ब्राह्मणवादाचा आरोप करण्याची FASHION च झालीय. जो तो उठतो आणि स्वत:ची पातळी, अभ्यास वगैरे काहीही न बघता असले बिनबुडाचे आरोप करीत सुटतोय. कदाचित तो त्यांचा स्वत:ला “पुरोगामी” ठरविण्याचा मार्ग असावा. पण माझ्यासारख्या संशोधकासाठी मात्र त्यांच्या आरोपात किती तथ्य आहे हे शोधणे, आणि तथ्य नसेल तर सत्य काय ते सर्वांसमोर मांडणे क्रमप्राप्त ठरते, म्हणून हा लेखनप्रपंच.
February 6, 2019
यः श्लोकपंचकमिदं ललिताम्बिकायाः सौभाग्यदं सुललितं पठति प्रभाते।तस्मै ददाति ललिता झटिति प्रसन्ना विद्यां श्रियं विमलसौख्यमनन्तकीर्तिम्॥६॥
फलश्रुती स्वरूप असणाऱ्या या अंतिमत श्लोकात आचार्य श्री ललितांबेच्या कृपेचे वैभव सांगत आहेत.
ते म्हणतात,
यः - जो कोणी, श्लोकपंचकम् इदं - हे श्लोकपंचक. हा पाच श्लोकांचा समुदाय. ललिताम्बिकायाः- देवी ललितांबेतेच्या, प्रार्थना स्वरुप असलेला,
सौभाग्यदं - सौभाग्य दायक असलेला, सुललितं - लालित्यपूर्ण असलेला.
पठति प्रभाते- सकाळच्या वेळी पठण करतो.
तस्मै - त्याच्यावर ललिता झटिति प्रसन्ना - आई ललिता चटकन प्रसन्न होते.
आणि त्याला,
ददाति- प्रदान करते.
काय काय प्रधान करते ती सूची सादर करताना आचार्य श्री म्हणतात,
विद्यां - विद्या अर्थात अध्यात्मविद्या, मोक्षविद्या, आत्मज्ञान.
श्रियं- अर्थात वैभव विमलसौख्य- शुद्ध सुख. अर्थात इतर कोणाच्याही दुःखाला कारणीभूत न होणारे सुख.
सामान्य व्यवहारात माझे सुख कोणाच्या तरी दुःखावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, प्राध्यापक म्हणून मला सुख मिळायचे असेल असेल तर माझ्या विद्यार्थ्यांना वर्षभर अभ्यासाचे दुःख सहन करावे लागेल. मुलाला खाण्याचे सुख मिळायचे असेल तर आईला स्वयंपाक करण्याचे दुःख भोगावे लागते. त्यामुळे व्यवहारातील सुख निर्भेळ नाही. निर्भेळ सुख एकच. आत्मसुख. आईच्या कृपेने ते प्राप्त होते
अनन्तकीर्तिम्- कधीच न संपणारी कीर्ती.
हे अंतिम पद फार महत्त्वाचे आहे. जगात स्वार्थाने लोक समोर करतात ती स्तुती, प्रसिद्धी. पण आपल्या मागे लोक आपल्याबद्दल जे गौरवोद्गार काढतात ती कीर्ती. की खरी असते. कारण त्यात स्वार्थ नसतो.
आई ललितांबेच्या कृपेने साधकाला अशी कीर्ती प्राप्त होते. अशी कीर्ती मिळावी असे कार्य त्यांच्या हातून घडते. जी शाश्वत असते .चिरंतन असते.
त्यासाठी तिचे हे स्तवन आहे.
जय श्री ललितांबा !
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
April 2, 2020
एखाद्या प्रचंड आकाराच्या इमारतीची वा तत्सम बांधकामाची निर्मिती जशी आव्हानात्मक असते, तसेच त्या बांधकामाचे पाडकामही आव्हानात्मक असते. मोठे बांधकाम सुरक्षितपणे पाडताना, अनेक अडचणींवर मात तर करावी लागतेच; पण त्याचबरोबर पाडकाम करणाऱ्या तज्ज्ञांचे स्थापत्यशास्त्रातील ज्ञान, अनुभव, कौशल्य हे सर्वच पणास लागतात. अशी मोठी पाडकामे करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध पद्धतींची ही ओळख…
February 16, 2024
Copyright © 2025 | Marathisrushti