वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
उद्यद्भानु सहस्रकोटिसदृशां केयूरहारोज्ज्वलां
बिम्बोष्ठीं स्मितदन्तपंक्तिरुचिरां पीताम्बरालंकृताम् ।
विष्णुब्रह्मसुरेन्द्रसेवितपदां तत्वस्वरूपां शिवां
मीनाक्षीं प्रणतोऽस्मि संततमहं कारुण्यवारांनिधिम् ॥ १॥
मीन म्हणजे मासोळी. अक्ष म्हणजे डोळे. जिचे डोळे मासोळी प्रमाणे लांब, दोन्हीकडे निमुळते, त्यातही कानाकडे अधिक वाढलेले आणि मध्यभागी विशाल असतात ती मीनाक्षी. मासोळीचे डोळे टपोरे असतात. तसे जिचे नेत्र ती मीनाक्षी.
अशा प्रकारच्या सुंदर नेत्रांनी सुशोभित आई जगदंबे चे नाव आहे मीनाक्षी.
दक्षिण भारतात मदुराई नामक स्थानी देवी मीनाक्षीचे विश्व प्रसिद्ध मंदिर आहे.
या देवी मीनाक्षीच्या वंदनार्थ आचार्यश्रींनी मीनाक्षी पंचरत्नम् आणि मीनाक्षी स्तोत्रम् अशा दोन रचना केल्या आहेत.
या मीनाक्षी पंचरत्नम् स्तोत्रामध्ये आईचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात,
उद्यद्भानु सहस्रकोटिसदृशां- हजारो कोटी सूर्य एकाच वेळी उगवले तर ते तेज जसे असेल तशी तेजस्वी असणारी. तरीही उगवत्या सूर्याप्रमाणे आल्हाददायक.
केयूर- बाजूबंद
हार- गळ्यात,केसात शोभणाऱ्या मोत्यांच्या माळा.
उज्ज्वलां- अत्यंत तेजस्वी आहेत अशी. त्यांच्या सौंदर्याने अधिकच तेजस्वी दिसणारी.
बिम्बोष्ठीं- पिकलेल्या तोंडल्याप्रमाणे लाल बुंद ओठ असणारी. स्मितदन्तपंक्तिरुचिरां- किंचित् हास्य केल्यामुळे जिची दंतपंक्ती दिसून येत असल्याने अधिकच सुंदर दिसणारी.
पीताम्बरालंकृताम् - दिव्य असा पीतांबर धारण केलेली.
विष्णुब्रह्मसुरेन्द्रसेवितपदां - विष्णू, ब्रह्मदेव इत्यादि महेश्वर, सुरेंद्र अर्थात देवराज इंद्र. त्यांच्यासह समस्त देवतां जिच्या चरणांची सेवा करत असतात अशी.
त
त्वस्वरूपां - परब्रह्मस्वरूप असणारी.
शिवां- अत्यंत पवित्र, भगवान शंकरांची सहधर्मचारिणी.
मीनाक्षीं प्रणतोऽस्मि संततमहं कारुण्यवारांनिधिम्- कारुण्य सागर स्वरूप असणाऱ्या अशा देवी मीनाक्षी ला मी सतत वंदन करतो.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
May 10, 2020
या सृष्टीच्या व्युत्पत्तीपासून विश्वाच्या निर्मितीचे गूढ उलगडताना मानवाचे स्वत:च्या लौकिक..परमार्थिक प्रगतीसोबत या अवकाशगंगेतील तमाम घटकांचे अस्तित्व उजळून टाकण्यासाठी सातत्याने संशोधन चालू आहे. आदिम काळापासून माणसाचे स्वत:च्या मुलभूत गरजा भागविण्यासाठी मार्ग शोधणे चालू होते. आणि जसजसे ते मार्ग सापडत गेले तसतसे माणसाच्या जगण्याला नवनवीन कंगोरे प्राप्त होत गेले.
March 31, 2018
बाहुबली…..भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातला एक भवदिव्य चित्रपट म्हणून अजरामर होईल अशी एक कलाकृती.
चित्रपटाविषयी अधिक लिहिणार नाही. कारण तो माझा प्रांत नाही. पण आयुर्वेद हा केवळ माझा व्यवसाय-साधन इतकाच मर्यादित नसल्याने आणि तो नसानसांत भिनलेला असल्याने जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी दिसतो तो आयुर्वेदच. तसाच तो बाहुबली पाहतानाही दिसला. तुमच्या समोर तो मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.
बाहुबली आणि भल्लालदेव (की बल्लाळदेव?) यांच्यातील द्वंद्वयुद्धाचा प्रसंग आठवा. रक्तबंबाळ बाहुबली शिवाच्या पिंडीवरील भस्म उचलतो आणि आपल्या भळभळत्या जखमांवर लावतो आणि अल्पावधीतच रक्त वाहायचे कमी होऊ लागते. हा शिवाचा चमत्कार म्हणायचा, दाक्षिणात्य तडका म्हणायचा की अन्य काही?! हा चमत्कार नाही; रजनीकांत स्टाईल तडकादेखील नाही. हा आयुर्वेद आहे. आश्चर्य वाटलं ना? पण अगदी आयुर्वेदच आहे हा!
सुश्रुतसंहितेत अतिरिक्त रक्तस्राव थांबवण्यासाठी आलेली ही सूत्रे पहा;
चतुर्विधं यदेतद्धि रुधिरस्य निवारणम् |
सन्धानं स्कन्दनं चैव पाचनं दहनं तथा ||
व्रणं कषायः सन्धत्ते रक्तं स्कन्दयते हिमम् |
तथा सम्पाचयेद्भस्म दाहः सङ्कोचयेत् सिराः ||
(सुश्रुतसंहिता सूत्रस्थान १४/ ३९-४०)
चार प्रकारांनी रक्त वाहणे रोखता येते. संधान, स्कंदन, पाचन आणि दहन. यांतील संधान हे तुरट रसाच्या वनस्पतींच्या काढ्याने, स्कंदन हे थंड गुणाच्या गोष्टींचा वापर करून, पाचन हे भस्म वापरून तर दाह हा तापलेली शलाका वापरून केला जातो. यातील दाह हा प्रकार आजही शस्त्रकर्म करताना वापरतात; त्याला cauterisation असं म्हणतात. हा संदर्भ आयुर्वेदाला कालबाह्य समजणाऱ्या लोकांसाठी सहज नमूद करत आहे. आपल्यासाठी इथे महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे भस्म. रक्त थांबवण्यासाठी वापरण्यात येणारे हे भस्म म्हणजे औषध म्हणून वापरले जाणारे धातूंचे भस्म नसून इथे विशेषतः तुरट रसाच्या वनस्पती वा रेशीम, कापूस इत्यादी जाळून तयार केलेले भस्म अपेक्षित आहे. पूर्वी यज्ञ, होम हवन होत असत. त्यात वापरल्या जाणाऱ्या समिधा बहुतांशी औषधी वनस्पतींच्या असत. या भस्माचा उपयोग संध्यावंदनाच्या वेळी केला जात असे. आपल्याकडे भस्मस्नान हा एक स्नानप्रकारदेखील सांगितला आहे. सुश्रुत संहितेत वर्णन करण्यात आल्याप्रमाणे या भस्माचा वापर करून रक्तस्राव खरोखरच थांबवता येतो हे आम्ही आयुर्वेद शिकताना प्रत्यक्ष करूनदेखील पाहिले आहे. (कृपया आयुर्वेद वैद्यकीय सल्ल्याशिवाय हा प्रयोग कोणीही स्वतः करायला जाऊ नये. वैद्यांची देखरेख अत्यावश्यक आहे.) बाहुबलीच्या या एका दृश्यात हा आयुर्वेद अंश सामावला आहे. अन्य काही ठिकाणी नाडी परीक्षणाचे एक दृश्यही आहे. मात्र त्यात दाखवलेला वैद्य अभिनेता चुकीच्या बाजूला नाडी पाहतो आहे; काही चित्रपट वा मालिकांत डॉक्टरची भूमिका करणारे अभिनेते स्टेथोस्कोप उलटा लावत असतात; अगदी तीच गत इथे नाडी परिक्षणाची झाली आहे.
विषयाच्या अनुषंगानेच हेही आवर्जून नमूद करावेसे वाटते की; तलवार, भाला, गदा, मुद्गर, शक्ति आदि एक से बढकर एक घातक आयुधे वापरून ज्या काळात युद्ध होत असे त्यावेळी जखमींना केवळ मलमपट्टी करण्यास नव्हे तर त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यासही आयुर्वेदच होता. असे खंडीभर संदर्भ सुश्रुतसंहितेत मिळतील. जिथे ब्रिटिशांनी आमच्याकडच्या विणकारांचीदेखील बोटे छाटली तिथे शस्त्रकर्म आणि मर्मविद्या जाणणाऱ्या व्यक्तींची या परकीय आक्रमकांसमोर काय कथा? यामुळेच एकेकाळी प्रगत असलेल्या आयुर्वेदीय शल्यतंत्राचा आज थेट प्रत्यक्ष वापर फारसा दिसत नाही. कदाचित बाहुबलीच्या आगामी भागात शल्यतंत्रातील एखादा संदर्भ मोठ्या पडद्यावर पहायलादेखील मिळेल. तूर्त बाहुबली-२ पाहताना वर नमूद केलेले दृश्य पाहताना आयुर्वेदाला नक्की आठवा!
जय माहिष्मती!!
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
May 5, 2017
ताण-तणाव हे आपले पूर्वापार साथीदार आहेत. पिढ्यानपिढ्या ही भावना आपली सांगाती आहे. त्यांच्याशी जसे जमेल तसे जुळवून घेणे हळूहळू अंगवळणी पडते आहे. मात्र ताण-तणाव आता अधिक गंभीर, रौद्ररूप धारण करीत आहेत. आता ते वयोगटांवर अवलंबून नाही की आर्थिक परिस्थितीशी ताण-तणावांना काही देणे-घेणे नाही. ही समस्या आता विश्वव्यापी बनली आहे त्यामुळे त्यावर आता सर्वंकष लसीची गरज कधी नव्हे ते निर्माण झाली आहे.
March 20, 2022
भारत ब्रिटिशअंमलमुक्त झाल्यानंतरच्या कालचक्रातील 16 वार्षिक आवर्तने पूर्ण झाल्याच्या दिवशी कसोटी सामन्यांमधील गोलंदाजाचे पहिले त्रिशतक पूर्ण झाले. (सतरावा किंवा आजचा तथाकथित ’त्रेपन्नावा स्वातंत्र्यदिन’ असे म्हणणे ही शब्दांची क्रूर थट्टा तर आहेच…
August 15, 2010
उत्तर प्रदेशात नुकत्याच झालेल्या भीषण रेल्वे अपघातात समोर आलेली एक माहिती धक्कादायक आहे.
अपघात झालेल्या गाडीत ६९८ व्यक्तींचे रिझर्वेशन होते. आरक्षित व्यक्तींपैकी फक्त १२८ जणांनी विम्याचा पर्याय निवडला. ऑनलाइन रिझर्वेशन केल्यास रेल्वे प्रवाशाला फक्त एका रुपयात (92 पैसे) १० लाखाचा विमा मिळतो. यासाठी रिझर्वेशन करताना फक्त संमतीची खूण करायची असते.
हा विमा घेतल्यास अपघातात प्रवाशाचा मृत्यू झाल्यास नातलगांना 10 लाख, कायमचे संपूर्ण अपंगत्व आल्यावरही 10 लाख, कायमचे (पार्शल) अपंगत्व आल्यास 7.5 लाख, जखमी झाल्यास उपचारासाठी 2 लाख आणि अपघातस्थळापासून आपल्या घरी जाण्यास प्रवासासाठी 10 हजार रुपये मिळतील.
वेळ कधी सांगून येत नाही. त्यामुळे मित्रांनो यापुढे रिझर्वेशन करताना आपण ही बाब नक्की ध्यानात ठेवा इतरांनाही सांगा.
अधिक माहितीसाठी -http://contents.irctc.co.in/en/InsuranceTermCondition.pdf
January 7, 2017

ताऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या गाभ्यातली ऊर्जानिर्मिती थांबते व ताऱ्याचा गाभा कोणत्याही अडथळ्याविना, स्वतःच्याच गुरुत्वाकर्षणामुळे आकुंचन पावू लागतो. अतिवजनदार ताऱ्याच्या बाबतीत तर तो इतका आकुंचन पावतो की, त्याची घनता अनंत होते. या अनंत घनतेमुळे या वस्तूचं गुरुत्वाकर्षण इतकं प्रचंड असतं की, अशा वस्तूकडून प्रकाशही बाहेर पडू शकत नाही. दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर, ताऱ्याच्या गाभ्याचं रूपांतर कृष्णविवरात होतं.
June 12, 2022

अथ श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
विभूतियोगो नाम दशमोऽध्यायः ॥
इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
विभूतियोग नावाचा दहावा अध्याय
श्रीभगवानुवाच ।
भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः ।
यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया ॥ १
श्री भगवान म्हणाले,
महाबाहु पार्था तू असशी माझा प्रिय मित्र
म्हणुनि सांगतो तुझ्या हितास्तव परमज्ञानसूत्र १
न मे विदुः सुरगणाः प्रभवं न महर्षयः ।
अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः ॥ २
कळलो नाही मी देवाना वा महर्षिंनाही
मूळ मीच सार्या देवांचे आणि ऋषींचेही २
यो मामजन्मनादिं च वेत्ति लोकमहेश्वरम् ।
असम्मूढः स मर्त्येषु सर्वपापैः प्रमुच्यते ॥ ३
मज अजन्म अन् अनंत जाणी जो नर निर्मोही
मी जगदीश्वर कळते ज्या तो पापमुक्त होई ३
बुद्धिर्ज्ञानमसम्मोहः क्षमा सत्यं दमः शमः ।
सुखं दुःखं भवोऽभावो भयं चाभयमेव च ॥ ४
मति, ज्ञान, संशयनिवृत्ती, क्षमा, सत्य, निग्रह,
सुखदु:ख तसे जननमरण अन् भय, निर्भय भाव, ४
अहिंसा समता तुष्टिस्तपो दानं यशोऽयशः ।
भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः ॥ ५
समत्वबुध्दी, तृप्ति, अहिंसा, तप अन् दातृत्व,
यश, अपयश या साऱ्यांचा हो माझ्यातुनि उद्भव ५
महर्षयः सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा ।
मद्भावा मानसा जाता येषां लोक इमाः प्रजाः ॥ ६
चार महर्षी अन् सप्तर्षी तसे मनु समष्टी
(पाठभेद: सात महर्षी, चार पुरातन, तसे मनु समष्टी)
या सार्यांना जन्म मजमुळे, अन् त्यातुन सृष्टी ६
एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः ।
सोऽविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः ॥ ७
माझ्या कर्मांवर, सामर्थ्यावर धरि विश्वास
तो होतो ममभक्तिपरायण कर्मयोगी खास ७
अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते ।
इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विताः ॥ ८
उगमस्थान मी अन् सार्यांचा माझ्यातुन उपज
बुध्दिवंत हे जाणुनि भजती भक्तीपूर्वक मज ८
मच्चित्ता मद्गतप्राणा बोधयन्तः परस्परम् ।
कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च ॥ ९
भक्तिपूर्वक चित्त मजमधी गुंतवुनी सांगती
परस्परां मजविषयी, आणि स्वत: त्यात रमती ९
तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम् ।
ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते ॥ १०
प्रेमाने जे योगि भक्त मम सेवेमधि गर्क
त्यांना मी मजकडे यायचा दावितसे मार्ग १०
तेषामेवानुकम्पार्थमहमज्ञानजं तमः ।
नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता ॥ ११
त्यांवरती अनुकंपा म्हणुनी तदंतरी जातो
ज्ञानाच्या तेजाने तेथिल अंधारा हटवितो ११
अर्जुन उवाच ।
परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान् ।
पुरुषं शाश्वतं दिव्यमादिदेवमजं विभुम् ॥ १२
अर्जुन म्हणाला‚
अजर, अमर, आदिदेव, दिव्य तुम्हि आहा सर्वव्यापी
परब्रह्म तुम्हि, परमात्मा तुम्हि, परमधामही तुम्ही १२
आहुस्त्वामृषयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा ।
असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे ॥ १३
ऋषी असित, देवल, देवर्षी नारद, व्यासमुनी
असेच म्हणती आणि ऐकतो तुमच्याहीकडुनी १३
सर्वमेतदृतं मन्ये यन्मां वदसि केशव ।
न हि ते भगवन्व्यक्तिं विदुर्देवा न दानवाः ॥ १४
सत्य हेच मज मान्य, केशवा, तुम्ही सांगता ते
व्यक्तिमत्व तुमचे ना माहित देवदानवाते १४
स्वयमेवात्मनात्मानं वेत्थ त्वं पुरुषोत्तम ।
भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते ॥ १५
भूतमात्र निर्मिता सर्व तुम्हि जगत्पती माधवा,
तुम्हास अंतर्ज्ञाने कळते तुम्ही कोण, देवा १५
वक्तुमर्हस्यशेषेण दिव्या ह्यात्मविभूतयः ।
याभिर्विभूतिभिर्लोकानिमांस्त्वं व्याप्य तिष्ठसि ॥ १६
कळल्या ज्या तुम्हा, सांगाव्या मजला मधुसूदन,
प्रवृत्ती तुमच्या ज्यायोगे राहता जग व्यापून १६
कथं विद्यामहं योगिंस्त्वां सदा परिचिन्तयन् ।
केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया ॥ १७
कसे करावे चिंतन, तुम्हा कसे आळवावे?
मज सांगा कुठकुठल्या रूपे तुम्हा ओळखावे? १७
विस्तरेणात्मनो योगं विभूतिं च जनार्दन ।
भूयः कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मेऽमृतम् ॥ १८
अपुल्या शक्ती आणि महत्ता सांगा विस्तारून
अमृतमय ते बोल ऐकण्या आतुर मम कर्ण १८
श्रीभगवानुवाच ।
हन्त ते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतयः ।
प्राधान्यतः कुरुश्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे ॥ १९
श्री भगवान म्हणाले‚
हे कुरूश्रेष्ठा, तुला सांगतो ठळक ठळक माझ्या शक्ती
विस्ताराला अंत न माझ्या अशीच माझी प्रवृत्ती १९
अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः ।
अहमादिश्च मध्यं च भूतानामन्त एव च ॥ २०
मीच अंतरात्मा रे ब्रह्मांडातिल साऱ्या भूतांचा
कुंतिसुता मी आदि, मध्य मी, तसा अंतही मी त्यांचा २०
आदित्यानामहं विष्णुर्ज्योतिषां रविरंशुमान् ।
मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशी ॥ २१
मी आदित्यांतिल विष्णू, अन् मीच सूर्य तेजसांतला
वाऱ्यामधला मरिचि मी, तसा शशांक नक्षत्रांमधला २१
वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः ।
इन्द्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना ॥ २२
वेदांमध्ये सामवेद मी, देवांमधला देवेंद्र
इंद्रियांमधे मन, अन् भूतांतिल जीवाचे मी केंद्र २२
रुद्राणां शङ्करश्चास्मि वित्तेशो यक्षरक्षसाम् ।
वसूनां पावकश्चास्मि मेरुः शिखरिणामहम् ॥ २३
रूद्रगणांचा मी शंकर, अन् कुबेर मी यक्षांमधला
अष्टवसूतिल पावक मी, अन् मेरूही पर्वतांतला २३
पुरोधसां च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिम् ।
सेनानीनामहं स्कन्दः सरसामस्मि सागरः ॥ २४
पुरोहितांतिल मुख्य म्हणति ज्या तो मी आहे बृहस्पती
सेनानींमधि कार्तिकेय मी, जलाशयांमधि सरित्पती २४
महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरम् ।
यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः ॥ २५
महर्षींमधी भृगुऋषी मी, ॐकार असे ध्वनींत मी
यज्ञांमधला जपयज्ञ, हिमाचलहि तसा निश्चलांत मी २५
अश्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदः ।
गन्धर्वाणां चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः ॥ २६
वृक्षांमध्ये पिंपळ, तैसा नारद देवर्षींमधला
गंधर्वांमधि चित्ररथ, तसा कपिलमुनि सिध्दांमधला २६
उच्चैःश्रवसमश्वानां विद्धि माममृतोद्भवम् ।
ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपम् ॥ २७
सागरातुनी निर्मिति ज्याची तो अश्वांतिल उच्चश्रवा,
हत्तींमधि ऐरावत, तैसा नराधीप मी मनुज जिवां २७
आयुधानामहं वज्रं धेनूनामस्मि कामधुक् ।
प्रजनश्चास्मि कन्दर्पः सर्पाणामस्मि वासुकिः ॥ २८
शस्त्रांमध्ये वज्र, तसा मी कामधेनु गायींमध्ये
जीवनिर्मितीमधि मदन मी, अन् वासुकि सर्पांमध्ये २८
अनन्तश्चास्मि नागानां वरुणो यादसामहम् ।
पितॄणामर्यमा चास्मि यमः संयमतामहम् ॥ २९
नागांपैकी अनंत मी, अन् पाण्यासाठी वरूणहि मी
नियमनकर्ता यम मी आणिक, पितरांमधला अर्यम मी २९
प्रह्लादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहम् ।
मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणाम् ॥ ३०
नियंत्रकांतिल काळ मी, तसा दैत्यांमध्ये प्रल्हाद
पशूंमधी मी सिंह, आणखी पक्षिगणांमधला गरुड ३०
पवनः पवतामस्मि रामः शस्त्रभृतामहम् ।
झषाणां मकरश्चास्मि स्रोतसामस्मि जाह्नवी ॥ ३१
वेगवान वारा मी, आणि शस्त्रधरांमधि दाशरथी
मत्स्यांमधे मकरमत्स्य, अन् सरितांमध्ये भागिरथी ३१
सर्गाणामादिरन्तश्च मध्यं चैवाहमर्जुन ।
अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदतामहम् ॥ ३२
सृष्टीचा आरंभ, अंत, अन पार्था, मीच असे मध्य
विद्यांमधि अध्यात्म मीच, अन् वादींमधला मी वाद ३२
अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च ।
अहमेवाक्षयः कालो धाताहं विश्वतोमुखः ॥ ३३
अक्षरांतला ‘अ’कार मी, अन् समासांतला मी द्वंद्व
अक्षय ऐसा काल मीच, अन् ब्रह्मदेव मी चतुर्मुख ३३
मृत्युः सर्वहरश्चाहमुद्भवश्च भविष्यताम् ।
कीर्तिः श्रीर्वाक्च नारीणां स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा ॥ ३४
सर्वांसाठी मी मृत्यू, अन् येणार्यांस्तव जन्महि मी
श्री, कीर्ति, वाचा, बुध्दी अन् धृती, श्रुती, नारींमधि मी ३४
बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहम् ।
मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनां कुसुमाकरः ॥ ३५
स्तोत्रांमधला बृहत्साम मी, अन छंदांमधि गायत्री
मासांमधला मार्गशीर्ष, अन् ऋतूराज जो वसंत मी ३५
द्यूतं छलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् ।
जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्त्वं सत्त्ववतामहम् ॥ ३६
कपटींसाठी द्यूत मीच, अन् तेजस्वींचे मी तेज
व्यवसायांतिल यशही मी, अन् बलवानांचे मी ओज ३६
वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनञ्जयः ।
मुनीनामप्यहं व्यासः कवीनामुशना कविः ॥ ३७
वृष्णींचा वासुदेव मी, अन पांडवामधे धनंजय
मुनींमधी मी व्यासमुनी, अन् कवींमधी शुक्राचार्य ३७
दण्डो दमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषताम् ।
मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहम् ॥ ३८
दण्डकांतला दंड मी, तसा विजिगीषूंमधली नीति
गुपितांमध्ये मौन मीच, अन ज्ञानींमधली विज्ञप्ती ३८
यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन ।
न तदस्ति विना यत्स्यान्मया भूतं चराचरम् ॥ ३९
आणि अर्जुना मीच आहे रे बीज भूतमात्रांचे या
माझ्याविरहित नसे कुणिहि तुला या इथे आढळाया ३९
नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप ।
एष तूद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया ॥ ४०
ना गणती अन् अंतही तसा नाही रे माझ्या रूपा
तुज सांगितली ती तर केवळ थोडिच रूपे, परंतपा ४०
यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा ।
तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोंऽशसम्भवम् ॥ ४१
सुंदर अन् तेजस्वी ऐशा असती ज्या सार्या गोष्टी
माझ्या तेजाच्या अंशांतुन होते त्यांची उत्पत्ती ४१
अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन ।
विष्टभ्याहमिदं कृत्स्नमेकांशेन स्थितो जगत् ॥ ४२
तरी अर्जुना, हवे कशासाठी हे विस्तारित ज्ञान
अंश सूक्ष्मसा माझा राही जगताला या व्यापून ४२
इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
विभूतियोगो नाम दशमोऽध्यायः ॥
अशा प्रकारे येथे श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
विभूतियोग नावाचा दहावा अध्याय पूर्ण झाला.
-- मुकुंद कर्णिक
October 23, 2022
रस्त्यावर थुंकणे, कचरा टाकणे, लघुशंका/प्रातर्विधी करणे, आपला परीसर स्वच्छ न ठेवणे, सर्वच प्रकारचे प्रदूषण निर्माण करण्यास मदत करणे हे सगळे काश्याचे द्योतक आहे? तर अज्ञान, अंधश्रद्धा, आळस, शिस्त आणि संस्कारांचा अभाव, आपण राहतो त्या शहराप्रती आणि आपल्या देशाबांधवांप्रती कमी होत चाललेलं प्रेम, माया, आदरभाव म्हणावा लागेल.
February 28, 2015
अनुद्यल्ललाटाक्षि वह्नि प्ररोहै-
रवामस्फुरच्चारुवामोरुशोभैः |
अनंगभ्रमद्भोगिभूषाविशेषै-
रचंद्रार्धचूडैरलं दैवतैर्नः ‖ ३४ ‖
भगवान श्री भोलेनाथच्या ठायी असणाऱ्या अनन्य शरणतेला व्यक्त करताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज भगवान श्री शंकरांच्या विविध वैभवांचे वर्णन करीत आहेत. या वैभवांनी युक्त असे भगवान शंकर माझे दैवत आहे ही सांगण्याची त्यांची पद्धत मोठी मनोज्ञ आहे. ते म्हणतात,
अनुद्यल्ललाटाक्षि वह्नि- ज्यांच्या मस्तकावरील डोळ्यामधून अग्नीच्या लाटा उसळत नाहीत, प्ररोहैरवामस्फुरच्चारुवामोरुशोभैः - ज्यांच्या डाव्या अंगावर अद्वितीय सौंदर्यवती शक्ती विराजित नाही,
अनंगभ्रमद्भोगिभूषाविशेषै:- ज्यांच्या अंगावर भूषण स्वरूपात सर्प रुळत नाहीत,
अचंद्रार्धचूडै:- ज्यांच्या मस्तकावर चंद्रकोर विलसत नाही
अलं दैवतैर्नः - असे कोणतेही माझे दैवत नाही.
अर्थात अशी गुणवैशिष्ट्ये ज्यांच्या ठिकाणी नाहीत अशा कोणत्याही दैवतेला मी शरण जात नाही. हे सांगण्याच्या निमित्ताने आचार्य श्री वेगळ्या शब्दात भगवान श्री शंकराची वैभव मालिका आपल्यासमोर सादर करीत आहेत.
तृतीय नेत्रातून निघणारा अग्नी, मांडीवर बसलेली देवी पार्वती अंगावर रुळणारे सर्प आणि मस्तकावरील चंद्र या भगवान शंकराच्या सगळ्या गोष्टी वंदनीय आहेत. त्यांच्याशिवाय भगवान शंकरांची कल्पनाही करवत नाही.
या सगळ्या गोष्टींचे वैशिष्ट्य सांगण्याच्या निमित्ताने आचार्यश्री पूजना मध्ये असणाऱ्या ' सांगं सपरिवारं सशक्तिकम्' या दृष्टीचा विचार आपल्या समोर ठेवत आहेत. त्यासोबतच भगवान शंकरांच्या ठायी असणारी एकनिष्ठता अधोरेखित करीत आहेत.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
July 13, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti