(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • भुलभुलैय्या…. वास्तुशास्त्राची कमाल

    आजच्या प्रगत इंजिनिअरिंगला सुद्धा तोंडात बोट घालायला लावेल असा हा ‘भुलभुलैय्या’ लखनौच्या बडया इमामबाडयात आहे. नवाब आसफउद्दौलाने याच वास्तूत… सुरक्षिततेच्या दृष्टीने हा भुलभुलैय्या बांधला. यातल्या वास्तू-बांधकामशास्त्रातल्या योजना बघितल्या तर विश्वास बसत नाही. त्यातही इथे त्याने ध्वनीशास्त्रातल्या प्रतिध्वनीच्या उपयोगाची कमाल केली. अगदी आपल्या श्वासाचा देखील आवाज ऐकू येईल, इतकी जबरदस्त.

      October 17, 2019


  • आनंदाचे ठसे

    ब्रँचमधे स्टाफ तसा पुरेसा होता. जवळजवळ सगळेच अनुभवी. अपवाद फक्त रिसिव्हिंग कॅश काऊंटरवरची  सुजाता बोबडे. नुकतीच जॉईन झालेली. त्यामुळे कामाची फारशी माहिती नाही आणि त्यामुळे आत्मविश्वासाचाही अभाव. अर्थात हेडकॅशिअर श्री सुहास गर्दे नियमांवर बोट ठेवून काम न करता तिला स्वतःचे काम सांभाळून मदत करायचे म्हणून रोजचं रुटीन व्यवस्थित सुरू होतं एवढंच. एरवी सुजाताच्या वर्क-कॉलिटी बद्दल मी फारसा समाधानी नव्हतो.

      April 26, 2023


  • झपाटलेला’ या चित्रपटाला २९ वर्षे झाली

    अगदी समाजाच्या तळागाळापर्यंतच्या प्रेक्षकांना आपलासा वाटेल अशा हुकमी मसालेदार मनोरंजक चित्रपटाचा निर्माता, दिग्दर्शक, कथाकार आणि नायक महेश कोठारे याच्या ‘झपाटलेला ‘ ( रिलीज १४ एप्रिल १९९३) या यशस्वी चित्रपटाच्या प्रदर्शनास २८ सत्तावीस वर्षे पूर्ण झाली. या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे रामदास पाध्ये यांच्या बोलक्या बाहुल्यांचा उत्तमरितीने करुन घेतलेला मनोरंजक वापर हे आहे.

      April 14, 2022


  • स्त्रियांवरील वाढते अत्याचार – एक गंभीर आणि चिंताजनक वास्तव !

    भारतीय समाजातील स्त्रियांवरील वाढते अत्याचार हे चिंताजनक बाब आहे. समाजातील मानसिकता बदलण्यासाठी आणि स्त्रियांना त्यांचे अधिकार देण्यासाठी प्रयत्न होणे अत्यावश्यक आहे. यासाठी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी, शिक्षण, आर्थिक स्वायत्तता, आणि सामाजिक जागरूकता या सर्वांचा समन्वय साधणे गरजेचे आहे.

      October 2, 2024


  • श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – १३

    भगवान श्रीविष्णुंच्या चरणकमलांचे अलौकिकत्व वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात, भगवान श्रीविष्णु जगत पालक असल्याने त्यांना देव आणि दैत्य दोन्ही आपले आहेत. कोणत्याही एका समूहावर ते कधीच अन्याय होऊ देत नाहीत.

      December 16, 2020


  • काश्मीर एक जाणीव – भाग तीन

    कांद्याच्या गरमागरम भज्यांबरोबर , तुम्ही कधी वाफाळता चहा घेतला आहे ?
    हा काय प्रश्न झाला का ?
    असं कुणालाही वाटेल .
    आणि खरंच आहे ते .

    पण मंडळी , आता त्यात सुधारणा करतो .
    सभोवताली मायनस तापमान असताना , तलावाच्या पाण्यात हात घातल्यावर थंडपणामुळे बधिरता आलेली असताना , दातावर दात आपटत असताना , कुठल्याही वस्तूला हात लावल्यावर बर्फच हातात घेतल्याची भावना होत असताना , कांद्याची गरम भजी आणि वाफाळलेला चहा समोर आल्यावर काय होईल ?
    सुटलं ना तोंडाला पाणी ?

    थांबा मग जरा ...

    श्रीनगरला उतरल्यानंतर शिकाऱ्यातून हाऊसबोटीत गेल्यानंतर , जणू एखाद्या पंचतारांकित राजवाड्यात गेल्यावर होणारं स्वागत अनुभवायला मिळालं तर ...?
    आलिशान डायनिंग रूम , तेथील मंद दिवे , जुन्या काळातील डायनिंग टेबल , खुर्च्या , त्यावर नजाकतीने मांडून ठेवलेला भजी आणि चहाचा सरंजाम , अदबीनं सर्व्ह केलेल्या पदार्थांची कलात्मक डिश ...
    क्या बात है !
    असेच उद् गार तोंडून बाहेर पडतात न पडतात तोच ,
    " आप हॉल मे भी बैठ सकते है , या फिर ऐतराज ना हो तो दिवाण ए खास , याने बाहर भी बैठ सकते हो . बाहर का नजारा भी शायद आपको पसंद आ जाएगा . "
    अशी अदबशीर विनवणी ऐकल्यानंतर थेट बाहेरचा नजारा पाहण्याची इच्छा नाही झाली तरच नवल .

    खरं सांगतो यार ...

    बाहेरचं दृश्य बघितल्यावर भान हरपून गेलं .
    बाहेर छानपैकी सजवलेला कलात्मक सोफा , सहासात जणांना आरामात बसता येईल अशी बैठक व्यवस्था , समोरचं शांत गहिरं पाणी , जवळच्या रस्त्यावरच्या दिव्यांचं पडलेलं प्रतिबिंब , सजवलेल्या हाऊसबोटी वरचं लायटिंग आणि त्यामुळं अंधारलेल्या वातावरणात निर्माण झालेले सप्तरंग ...

    आम्ही सगळे मूक झालो होतो .
    नंदनवनात आल्याची जाणीव पुन्हा पुन्हा होत होती .
    आणि आम्ही सगळ्यांनी नव्या काळाला अनुसरून फोटोसेशन करून घेतलं.

    हातातला चहा थंड झाल्याची जाणीव म्हाताऱ्या मालकानं करून दिली , तेव्हा आम्ही भानावर आलो .

    " मैं फिरसे आप के लिये चाय लाता हूं ."

    तो पाठी वळून किचनकडे गेला .
    आणि पुन्हा एकदा गरम कांदा भजी आणि चहा असं सेशन झालं .
    कधी नव्हे इतका दोन मोठाले कप भरून चहा घेतला .
    सौभाग्यवती डोळ्याच्या एका कोपऱ्यातून पहात होती , कारण घरी दोन चमचे चहा , इतकंच माझं चहा घेण्याचं प्रमाण होतं , आणि आज मी चहा घेण्याचा कहर केला होता .

    जाने भी दो यारो ...
    अशी उन्मनी अवस्था घरी कुठे अनुभवायला मिळते ?

    मग सगळी हाऊस बोट म्हाताऱ्या मालकाच्या तोंडून ऐकत पाहू लागलो .
    एकेक पुराण्या वस्तू पाहताना , हाऊसबोटीची अंतर्गत रचना पाहताना , थकायला झालं .

    राहण्याची इतकी उत्तम व्यवस्था , कमर्शियल असूनही घरगुती संवादाचा आणि वागण्याचा दिलेला टच ...

    सारंच विलोभनीय होतं .
    सगळं अनपेक्षित होतं .

    आणि तरीही...

    काश्मीर मधली परिस्थिती...
    भूतकाळ...
    वर्तमानकाळ...
    तिथल्या निसर्गसौंदर्याला लागणारे गालबोट ...

    विसरता येत नव्हते .

    --रात्री अचानक केव्हातरी जाग आली .
    थंडी आणखी वाढली होती . बंदिस्त बेडरूममध्ये खूपच जाणवत होती .
    मी मोबाईल मध्ये पाहिले .
    रात्रीचे तीन वाजले होते .

    काय वाटलं कुणास ठाऊक .
    मी रुमचं दार उघडून बाहेर आलो .
    टपून बसल्यासारख्या असणाऱ्या थंडीने झडप घातली .
    मी आणखी काकडलो .

    हाऊसबोटीचं दार उघडून बाहेर आलो .
    पाचच मिनिटात परत रूममध्ये आलो .
    सुरक्षित जागी .

    पण बाहेर पाहिलेलं दृश्य डोळ्यासमोर तसंच होतं .
    त्या पाच मिनिटात , कडाक्याच्या थंडीत सैनिकांची एक गाडी गस्त घालण्यासाठी फिरत होती .

    थंडीची तमा न बाळगता .
    जिभेचे लाड न पुरवता .
    गरम चहाची अपेक्षाही न ठेवता .

    केवळ नागरिकांच्या सुरक्षेसाठी !
    काश्मीरचं अस्तित्व टिकवण्यासाठी .

    - मी पुन्हा अंतर्मुख झालो .

    तिन्हीसांजेला घेतलेल्या चहाची चव आता पूर्ण विसरायला झाली होती .

    ( क्रमशः)

    - श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
    ----------------------------------------

    लेखमाला आवडल्यास नावासह सर्वत्र पाठवायला हरकत नाही .

      May 2, 2023


  • किचन क्लिनीक – पालेभाज्या – मेथी

    किचन क्लिनीक – पालेभाज्या – मेथी

    ह्या भाजी बाबतीत आपल्याला मिश्र प्रतिक्रिया एकायला व अनुभवायला मिळतात.काहीजणांची अत्यंत आवडती तर काही जणांची अगदीच नावडती अशी हि भाजी(माझी सर्वांत आवडती आहे बुवा). आपण ह्याचे विविध प्रकार बनवून हिला खात असतो जसे मेथीचे पराठे,मेथी मलाई मटर,मेथीचे थेपले,मेथी आलू इ.पण प्रत्येक स्वरूपात हिच्यापासून बनविलेल्या व्यंजनांची लज्जतच काही निराळी आहे.

    अशा ह्या मेथींच्या भाजीचे लहान क्षूप असते.तसेच हि चवीला कडू तुरट आणि थंड असते,त्यामुळे शरीरातील पित्त व कफ कमी करते.

    हिचे देखील घरगुती उपचारांमध्ये बरेच उपयोग आहेत बरं का!चला तर मग आता ते पहायचे ना?

    १)ज्या मंडळींना शौचास साफ होत नाही त्यांनी मेथीची भाजी जेवणात घ्यावी.

    २)गळवांवर हिच्या पानांचा लेप लावावा म्हणजे वेदना व सूज कमी होते.

    ३)संडासला आव पडत असल्यास ५ चमचे पानांचा रस खडीसाखर घालून घ्यावा.

    ४)वारंवार लघ्वीला होत असल्यास १/४ कप मेथी पाल्यांचा रस+१/२ चमचा कात+३ चमचे खडीसाखर हे मिश्रण दिवसातून एकदा घ्यावे.

    ५)डोक्यात कोंडा झाल्यास आंघोळी पुर्वी पाच मिनिटे केसांच्या मुळांना मेथीच्या पानांचा रस लावावा व नंतर साबण न वापरता केस धुवावेत.केस मऊ व चमकदार होतात.

    ६)चेहरा तेलकट होत असल्यास मेथीच्या पाल्याचा लेप चेह-यांवर लावून १/२ तास ठेवावे व कोमट पाण्याने धुवावे.

    मेथीची भाजी जास्त प्रमाणात खाल्ल्यास संडासला पातळ व वारंवार होऊ शकते.

    -- वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      October 18, 2016


  • देवपूजा, अभिषेक आणि रिसायकलींग

    एका देवळात एका रिसायकल होणार्‍या तेल, फुलं, नारळ वगैरेची आर्थिक उलाढाल बघाल तर थक्क व्हाल. एका शनिवारी एका देवळात किमान १०० लिटर तेल वापरलं गेलं आणि रिसायकल झालं तर देशभरात किती लिटर तेल वाया जात असावं? आणि त्यावर किती जण “माया” कमवत असावेत? हीच गोष्ट दूध, फुलं यांचीसुद्धा !!

      November 29, 2017


  • विमानप्रवासाचे विज्ञान

    विमानप्रवास आता सामान्य माणसाच्या आवाक्यात आला आहे. विमानात बसण्याची पूर्वतयारी म्हणजे तारीख ठरवून तिकीट काढणे अशी बहुतेकांची समजूत असते. ‘मला विमान चालवायचे नाही. त्याच्या संबंधातील तांत्रिक गोष्टींचा मला काय उपयोग?’ असा प्रश्न रास्त आहे. पण यामागील विज्ञानासंदर्भात एक प्रश्न विचारून फक्त सुरुवात तर करून बघा? भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, अभियांत्रिकी, भूगोल वगैरे बाबतीतील कुतुहल वाढत जाईल. जसजशी उत्तरे मिळतील तसतसे प्रश्न वाढतील. करूया सुरुवात? ‘विमानप्रवास सुरक्षित आहे का?’ हा काहींचा पहिला प्रश्न असू शकतो.

      September 11, 2019


  • गुणसंपन्न बोर

    शुष्क, कोरड्या, पडीक जमिनीवर वाढणारी बोर आणि रुई यांच्यासारखी झाडं अनेक गुणांनी समृद्ध असतात.

      March 2, 2012