वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
मुंबईची महालक्ष्मी. तमाम मुंबईकरांचं आराध्य दैवत. नवरात्रात महालक्ष्मीचा सोहळा अप्रतिम असतो आणि तो याची देह, याची डोळा बघण्यासाठी तमाम मुंबईकर मोठ्या भक्तिभावाने महालक्ष्मीच्या देवळात हजेरी लावतात..
October 17, 2016
क्षमा आपल्याला तेव्हाच मिळते, जेव्हा आपल्या मध्ये आपल्याकडून झालेल्या चुकीबद्दल पश्चातापाची भावना असते.
June 21, 2020
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानात तैनात असलेल्या आपल्या फौजा मागे घेण्याची केलेली घोषणा भारताएवढीच त्या क्षेत्रातील अन्य देशांची चिंता वाढविणारी आहे. सध्या त्या क्षेत्रात अमेरिकेचे १४ हजार सैनिक आहेत आणि त्यापैकी निम्मे लोक माघारी बोलाविण्याची ट्रम्प यांची तयारी आहे.
January 17, 2019
लाडू, चिवडा, शेव, करंज्या, शंकरपाळे, अनारसे.....वाढता वाढता वाढे असलेली फराळाच्या पदार्थांची यादी. त्यात वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले मिठाईचे बॉक्स आणि आता तर चॉकलेटस् चे डबेसुद्धा. दिवाळी आली म्हणजे आठवडा- पंधरा दिवसांत हे सगळे पदार्थ खाऊन पोटाचा घेर हा हा म्हणता वाढतो. वजनाच्या काट्याची तर गोष्टच निराळी. अशा माहौलात वजनावर नियंत्रण कसे ठेवावे याकरता पाच सोप्या टिप्स.
१. येता जाता सतत फराळाचे पदार्थ तोंडात कोंबू नका. हे पदार्थ पचायला जड असल्याने सकाळच्या वेळीच खाणे इष्ट.
२. दिवाळीचा फराळ करताना अधून मधून कोमट पाणी प्या; जेणेकरून हे पदार्थ पचण्यास मदत होईल आणि वजनात भर पडणार नाही.
३. बाजारातील मिठाई आणि चॉकलेट यांच्यापासून दूर रहा. घरी बनवलेल्या फराळाच्या पदार्थांनी होणार नाही इतके नुकसान या पदार्थांमुळे होत असते. (दिवाळीत मधुमेहींनी तर विशेष काळजी घ्या.)
४. चण्याच्या डाळीच्या पिठाचा कमीत कमी वापर करा. शक्य तिथे मुगाची डाळ वापरा. लाडू करतानादेखील बेसनापेक्षा रवा, मिश्र डाळीचे पीठ असे तयार करा.
५. नियमिटपणे व्यायाम आणि भूक नसताना काही न खाता भूक लागेपर्यंत अधून-मधून गरम पाणी पिणे या दोन मार्गांचा अवलंब या काळात केलात तर वजन वाढण्याची भीती राहणार नाही.
त्यातही हा फराळ आपापल्या प्रकृतीला लक्षात घेऊन केला तर किमान त्यानंतर होणारे त्रास शक्य तितके दूर ठेवण्यास मदत होईल.
१. वात:
अनारसे, शंकरपाळे, घेवर, ओल्या नारळाच्या करंज्या, दुधापासून घरीच बनवलेले गोड पदार्थ, रवा/ गव्हाचे पीठ/ डिंक यांचे लाडू इ.
२. पित्त:
ओल्या वा सुक्या नारळाच्या करंज्या, रवा/ मिश्र डाळी/ मूग यांचे लाडू, अनारसे, शंकरपाळे इ.
३. कफ:
शेव, चिवडा, कडबोळी, तिखट शंकरपाळे, (बेसनाऐवजी मुगाच्या डाळीचे पीठ वापरावे)
हे पदार्थ तारतम्याने घ्यावे इतकीच अपेक्षा आहे. थोड्क्यात; वातप्रकृतीच्या व्यक्तीला कडबोळी आवडत असली तरी त्यांनी ती वातप्रकृतीला चालणाऱ्या पदार्थांच्या तुलनेत कमी प्रमाणात खावीत; खाऊच नये असा अर्थ नाही. आपली प्रकृती कोणती आहे हे आपल्या जवळच्या वैद्यांकडून जाणून घ्यावे. या विषयीची अधिक माहिती #घरोघरी_आयुर्वेद या माझ्या पुस्तकात दिलेली आहे. (पुस्तक सर्व प्रमुख विक्रेते आणि बुकगंगा वर उपलब्ध.)
दीपावलीच्या आरोग्यपूर्ण शुभेच्छा!!
- © वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
October 27, 2016
हल्ली समाजात डायबिटीस झालेल्या व्यक्ती खूप जास्त प्रमाणात आढळतात. तरीही कोणतीही व्याधी किंवा आजार हा आपल्याला होणारच नाही, अशी समजूत बऱ्याच जणांची असते; परंतु एकदा का एखाद्या आजाराचं निदान झालं, विशेषतः डायबिटीसच, की अशी मंडळी घाबरून जातात.
July 1, 2023
प्रस्तुत लेखकानें १९९३ सालीं जागतिकीकरणातील धोक्यांविषयीं एक लेख लिहिला होता, व तो ‘जागतिक मराठी अकादमी, बडोदा चॅप्टर’ यांच्या ‘संवाद’ या अनियतकालिकात १९९४ मध्ये प्रसिद्ध झालेला होता. परिस्थितीत , या १९९३च्या लेखाची पुनर्भेट प्रस्तुत लेखकाला आवश्यक व उपयुक्त वाटली. कांहीं तत्कालीन कारणांनें हा लेख भाषणसदृश लिहिलेला आहे, हें ध्यानांत घ्यावें. तसेंच, परकीय जन हे कसे भारतीय विचारांवर परिणाम करत आलेले आहेत, याचा ऊहापोह इतिहासात जाऊन, लेखाच्या सुरुवातीच्या भागात, केलेला आहे, याचीही वाचकांनी नोंद घ्यावी.
March 20, 2019
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसच्या शब्दकोश विभागाचा ‘शब्द’ ब्रिटिश इंग्रजीकरिता अंतिम मानला जातो. याला कारणही तसेच आहे. ‘फिलॉलॉजिकल सोसायटी ऑफ लंडन’ या भाषाशास्त्राच्या संस्थेतील सभासदांनी १८५७ मध्ये तत्पूर्वीचे शब्दकोश अपूर्ण आणि सदोष असल्याने शब्दांचे पुनःपरीक्षण करून नवा शब्दकोश तयार करण्याचे ठरवले. प्रत्यक्ष कृती फार मंदगतीने होत गेली. अखेर १८७९ मध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसशी करार होऊन न्यू इंग्लिश डिक्शनरीच्या कामास सुरुवात झाली.
February 1, 2022
पाठदुखीने कारकीर्दीत बेजार झालेल्या प्रतिभासंपन्न डिऑन नॅशचा जन्म आणि सचिनने गाठला ३०,०००० आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा
November 18, 2010
संसर्गजन्य रोगांचा प्रादूर्भाव होणे ही बाब मानवी इतिहासात नवीन नाही. याआधीही अनेक साथीच्या रोगाचा सामना आपण केला आहे. आणि प्रत्येक वेळी आशा संकटांचा सामना करतांना माणसाची संयमी आणि संतुलित भूमिका कामी आल्याचे दिसून येते. मात्र दुर्दैवाने आपण इतिहासापासून बोध घेत नाही. सद्याच्या काळात तर माणसाची अवस्था कळतं पण वळत नाही, अशीच झाली आहे.
March 20, 2020
गोड , खारट , तुरट , कडू आणि तिखट या पाच चवींनी युक्त लसणाचे वैशिष्ट्य हे आहे कि खारट रस नैसर्गिकरित्या असणारा एकमेव कंद आहे … खरं पाहायला गेलं तर लसूण खरोखरच अमृत असावा ....
संस्कृत मध्ये याला रसोन म्हणतात. रस + ऊन म्हणजे एक रस उणे असणारा …
लसूण हे कांद्याच्या परिवारातील एक कंदमूळ आहे. एलियम सॅटायव्हम या वनस्पतीच्या कंदाच्या पाकळ्या म्हणजे लसूण होय. जगातील अर्जेटिना, बल्गेरिया, चीन, भारत, इटली, मेक्सिको, रशिया, अमेरिका आदी देशांत याची लागवड केली जाते. परंतु उत्पादनात चीनचा पहिला तर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. कांद्याप्रमाणे कच्च्या लसणाचा स्वाद आणि चव उग्र असते. परंतु शिजवला असता त्याची चव गोडसर होते. भारतीय मसाल्यांमध्ये, सॉस, चटण्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर वापर केला जातो. अशा या लसणाचे जीवाणूविरोधी, अँटिबायोटिक, अँटिसेप्टिक असे कितीतरी गुणधर्म आहेत. लसणात ऍलिसीन (dllicin) नावाचे सल्फर कंपाउंड आहे. या ऍलिसीनमुळे लसणात ऍण्टीबायोटिक व बुरशीजन्य आजारांना प्रतिबंध करण्याचा गुण दिसून येतो; परंतु या उडणशील द्रव्याचा फायदा मिळविण्यासाठी लसूण चिरणे किंवा चावून खाणे गरजेचे आहे. लसणाची पाकळी तशीच गिळल्यास औषधी गुणांचा फायदा मिळत नाही.
भारतीय जवळजवळ प्रत्येक घरात भाज्यांत लसूण वापरली जाते. पदार्थाची चव वाढविण्यासाठी लसूण हिचा गुणधर्म आहे. बहुतेक लोक फक्त अन्न शिजविण्यासाठी मसाले वापरत असले तरी लसूण वापरतात. लसूण ही औषध म्हणून फायदेशीर आहे. लसूण अनेक रोगांवर फायदेशीर ठरली आहे.
लसूण शरीराची प्रतिकार शक्ती वाढते. कर्करोग सारख्या गंभीर रोग लढण्यासाठी मदत करते. वैद्यकीयदृष्ट्या कोलोस्ट्रोल कमी करण्यास मदत करते. स्तनाचा आणि कर्करोग कमी करण्यासाठी लसूणीच्या कच्च्या पाकळ्या खाणे केव्हाही चांगल्या. शरीरातील टी-सेल्स, फॅगोसाईट्स, लिंफोसाई्टस आदी प्रतिरोधक तत्व वाढणिवण्यास लसूण मदत करते. प्रतिरोधक घटक आरोहित आणि शरीराची प्रतिकार वाढविण्यासाठी लसूण महत्वाची भूमिका बजावते. वाढता रक्तदाब नियंत्रणात आणण्यात लसूण उपयोगी ठरते.
लसूण खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. आपले हृदय नेहमी तंदुरुस्त ठेवण्यास लसूण मदत करते. शरीरात वाढणार कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल पातळी दूर करणे सोपे आहे. उच्च रक्तदाब आणि रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी लसणाच्या दोन कच्या पाकळ्या खाणे आवश्यक आहे.
आपल्या वायू पोटात तयार होतो किंवा आपण बद्धकोष्ठता समस्येने अस्वस्थ आहेत तर लसूण आपल्यासाठी खूप फायदेशीर असेल. काही काळ नियमितपणे लसूण खाण्यात समाविष्ट केले तर त्याचा लाभ चांगला होतो. लसूण बारीक करुन गरम दूध आणि गरम पिण्यातून पिणे चांगले. सांधे दुखी किंवा कमर दुखीवर हे पाणी अधिक गुणकारी आहे.
आपली श्रवण क्षमता वाढविण्यासाठी लसूण चांगली. तिळाच्या तेल्यात लसूण बारीक करुन ते गरम करायचे. थंड झाल्यावर ते तेलाचे काही थेंब कानात टाकल्यास कान दुखणे थांबतो. हे जर तुम्ही नियमित केल्यास तुमची ऐकण्याची क्षमता वाढते. कान दुखण्यावर आराम मिळतो. लसूण अनेक रोगांवर रामबाण उपाय आहे.
लसणाचे उपयोग :
१. कफाशी संबंधित आजार झाल्यास लहान मुलांची गळ्यात लसणीच्या कांड्याची माळ गळ्यात घालतात .
२. लसणाची पेस्ट करून त्याचा लेप आमवातासारख्या सूज असणाऱ्या व्याधीत करतात .
३. बरगडीत वेदना होत असतील लसणाचा रस चोळावा.
४. गजकर्णासारखा खाज असलेला त्वचारोग लसणाचा रस नियमित चोळला असता बरा होतो .
५. किडा चावल्याने वेदना आणि खाज येत असेल तर लसणाचा रस चोळावा .
६. कानात वेदना होत असेल तर कानात लसूण रस घालून आटवलेले गोडेतेल सोडावे . हेच तेलं छातीवर चोळले तर कफ असूनही कोरडा वाटणारा खोकला बरा होतो .
७. भूक न लागणे , तोंडाला चव नसणे, अजीर्ण, पोटात वेदना, जंत, अशा आजारात लसणाचे नित्य सेवन करावे .
८. भात खाल्ल्याने पोट फुगत असेल तर लसूण घालून शिजवलेला भात खायला द्यावा .
९. हृदयाची अतिउत्तेजना कमी करून हृदयाला आलेली सूज लसूण कमी करतो .
१०. ३० मि.ली. दुधामध्ये लसणाच्या पाच पाकळ्या घालून दूध चांगलं गरम करावं. दररोज असं दूध प्यायल्याने जुनाट खोकला, दमा, क्षयरोग यांचा नाश होतो .
११. लसूण मनाची मरगळ घालवतो .
१२. हाड मोडले असता लसूण घालून उकळलेले दुध दिले असता हाड लवकर सांधले जाते .
१३ . लसणामध्ये नैसर्गिक रित्या गंधक असते . कच्चा लसूण खाल्ला तर त्यातल्या गंधकाचे उत्सर्जन त्वचेतून घामावाटे होते . कुजणाऱ्या/ सडणार्या कुष्ठरोगात याचा विशेष फायदा होतो .
१४. तापावर औषध म्हणून लसूण वापरता येतो . जुनाट तापावर , किंवा थंडी वाजून येणाऱ्या तापावर लसूण चांगला आराम देतो ….
१५. लसूण कीटकनाशक असून दररोज लसूण खाल्याने टीबीचे विषाणू मरण पावतात.
१६. अँटिबायोटिक औषधांना लसूण हा एक उत्तम पर्याय आहे. लसणाच्या एका कांडीचे चार भाग करून दोन्ही वेळच्या जेवणानंतर अध्र्या तासाने त्यातील दोन तुकडे ठेवून चघळावे नंतर पाणी प्यावे.
१७. डोकेदुखीवरही लसूण हा रामबाण उपाय आहे. लसणाच्या चार पाकळ्या ३० ग्रॅम मोहरीच्या तेलात घालून ते तेल कोमट करून डोक्याला लावल्याने डोकेदुखी थांबते. कान दुखत असल्यास हेच तेल कानात घालावे. त्वरीत आराम पडतो.
१८. ज्वरनाशक असून हाडांतला तापही यामुळे बरा होतो.
१९. शरीरास हानिकारक असलेल्या रक्तातील कोलेस्ट्रॉलला नियंत्रित ठेवण्याचे काम लसूण करते. म्हणूनच दैनंदिन आहारात दोन ते तीन लसूण पाकळ्यांचा जरूर वापर करावा.
२०. संधिवात व आपवाताचा त्रास असणाऱ्यांनी त्यांच्या रोजच्या आहारात लसणाचा समावेश केल्यास “शूल’ कमी होण्यास मदत होते. लसूण खाल्ल्याने काही लोकांना ऍसिडिटी होते. अशांनी लसूण 2-3 तास दुधात भिजवून मग खावा व भरपूर पाणी प्यावे.
२१. लसूण हा कर्करोग प्रतिबंधकदेखील आहे. लसूण नियमित खाण्यात असल्यामुळे जठर व आतड्याच्या कॅन्सरचा धोका कमी होतो, असे एका शास्त्रीय पाहणीत आढळून आले आहे. प्राण्यांवर केलेल्या एका संशोधनात लसणामुळे ट्यूमर कमी झालेला आढळून आला.
काळजी :
लसूण तीक्ष्ण, उष्ण असल्याने पित्त प्रकृतीच्या व्यक्ती, गर्भिणी यांना तो वर्ज्य आहे …..
जास्त लसूण खाल्ल्याने त्रास झाला तर माठातील थंडगार पाण्यात धने पावडर भिजवून ते पाणी गाळून थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने पाजावे …
गृहिणींनी भाजी, वरण आमटी व चटणीत लसणाचा सढळ हाताने वापर करावा. त्यामुळे कुटुंबातील सर्वांचे आरोग्य उत्तम राहू शकेल.
आरोग्यदूत WhatsApp ग्रुपवरुन
March 4, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti