वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आई व बाळाची काळजी घेणारी सुईण हा समाजातील महत्त्वाचा घटक आहे. स्त्री गरोदर असल्यापासून तर ती प्रसुत झाल्यावर स्त्री व बाळाची सुखरूपपणे नि:स्वार्थीपणे काळजी घेणारी सुईण असते.
May 5, 2022
लेखक – अतुल चौधरी – `आम्ही साहित्यिक’चे लेखक – सर्वसामान्यांच्या साहित्य संमेलनापासून काय अपेक्षा असतात; त्यांचा व्यासपीठावरील सहभाग महत्त्वाचा असू शकतो का?
October 13, 2019
इतरेजन जेव्हा योजना आखण्यात आणि स्वप्न पाहण्यात व्यस्त असतात, तेव्हा आपण आपल्या छोट्याशा प्रवासाचा आनंद घ्यावा. माझ्याभोवती खूप वैभव आहे, माझ्या क्षमता, दृष्टी आणि आकांक्षा यापेक्षा हे अधिक महत्त्वाचे आहे, मी सतत काहीतरी ‘करण्यापासून’ आता फक्त ‘असण्यात’ मग्न आहे, अस्तित्वात असलेल्या सगळ्या लहानथोर गोष्टींनी ,बदलत्या संक्रमित निसर्गाने मी चकित होत असतो, असं वाटणं स्वाभाविक असतं.
May 19, 2021
तो दिवस असाच ढगाळलेला होता आणि संध्याकाळी बातमी आली महंमद रफी गेले, सुन्न झाले होते.
August 9, 2021

पृथ्वीवरच्या जीवसृष्टीचं स्वरूप साफ बदलण्यास कारणीभूत ठरलेला हा आघात खगोलशास्त्र, भूशास्त्र, हवामानशास्त्र, जीवशास्त्र, अशा विविध शास्त्रांच्या दृष्टीनं महत्त्वाचा ठरला आहे. या विविध क्षेत्रांतील संशोधनातून या आघाताचं व त्याच्या परिणामांचं स्पष्ट चित्र हळूहळू उभं राहात आहे.
February 3, 2022
काश्मीर प्रश्न भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी चर्चेद्वारे सोडवावा, यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही’, असे सांगत संयुक्त राष्ट्र संघाने (यूएन) पाकिस्तानला झटका दिला. भारताचे दोन्ही प्रमुख शेजारी पाकिस्तान आणि चीन हे नेहमीच भारताच्या सीमा भागात गोळीबार व घुसखोरी करत असतात.
October 16, 2014
पाय आणि मांडी दुमडुन
जेवायला बसायची ही एक अनोखी, आरोग्यदायी, भारतीय पद्धत आहे. याची काही वैशिष्ट्ये आहेत.
दुमडून घेतलेली मांडी आणि समोर वाढलेले ताट यामध्ये किमान एक फूट अंतर असते. जे टेबलखुर्ची मध्ये नसते.
टेबलखुर्चीचा वापर करून जेव्हा जेवले जाते, तेव्हा टेबलाच्या जवळजवळ खाली खुर्ची जाते. साहाजिकच पोट टेबलाच्याही खाली जाते.(....... आणि पोट दिसतच नसल्याने किती पुढे आले आहे, हे पण कळत नाही.) त्यामुळे टेबलावरील वाढलेले ताट आणि टेबलाखाली वाढलेले पोट यातील अंतर कमी होते. ताटातील घास अंगावर सांडण्याची भीती बिलकुल असत नाही.
टेबलावर वाढलेले ताट आणि उघडलेले तोंड, यामधे फक्त काही इंचाचे अंतर उरते. ताटातील घास अगदी सहजपणे, विनासायास तोंडात जातो.
पण जेव्हा मांडी दुडली जाते, तेव्हा मात्र ताटातील घास अंगावर सांडू नये म्हणून, ताटापर्यंत पुढे वाकावेच लागते. जेवत असतानाच पोट हलते, दुडते, थोडेफार चिरडते, चेपले जाते, यामुळे आतड्यातील आतील भिंतीला चिकटलेले अन्न सुद्धा घसरते, हलते, खाली पडते.
अशा तर्हेने आतड्याच्या भिंतीवरून खाली पडलेले अन्न, पचनाच्या, घुसळण्याच्या प्रक्रियेमधे आणले जाते.
अन्न पोटात जात असताना अन्नाचा एक थर पोटात गेला आहे. मधे मधे पाणी पडत, पुनः अन्न. असे थरावर थर रचले जातात. जेवायला मधेमधे पुढे वाकल्याने पोट थोडे आवळले जाते. पोटातील अतिरिक्त वायु बाहेर पडतो. अन्न आणि पाणी यांचे पोटातील संचरण योग्य प्रमाणात होते. पुढे अन्न घुसळायला याची मदत होते.
पुढे वाकून जेवल्याने उजव्या बाजुला असलेले यकृत आणि डाव्या बाजूला असलेले, स्वादुपिंड, अग्न्याशय हे अवयव पण हलकेच दाबले जातात. या ग्रंथींवर थोडासा दाब निर्माण झाल्याने त्या ग्रंथीच्या आतील पाचकस्राव आणि इन्शुलीन, सहजपणे ग्रंथीच्या बाहेर पाझरतात, पचन आपोआपच सुधारते. आंबा पिळल्यानंतर कसा रस गळतो !!
पुढे वाकून जेवल्याचे असे काही फायदे लक्षात आले आहेत.
......आणि अन्नासमोर नतमस्तक होण्यात लाज ती कसली ?
कोणाही समोर जर आपण केव्हाही नतमस्तक झालो तर समोरून आशीर्वादाचा हात सहजपणे वर उचलला जातो.
आणि इथे तर समोर, साक्षात अग्निनारायण.! जेवताना जर त्यांच्यासमोर नतमस्तक झालो, तर अग्निनारायणांना "तथास्तु" म्हणावेच लागेल. नाही का ?
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
19.09.2016
September 19, 2016
कोणतीही पूर्वसूचना न देता विनायकराव ऊर्फ तात्या भेटायला आले. त्यांच्या अचानक येण्याने मला बऱ्यापैकी आश्चर्य वाटलं. कोणत्या तरी अनामिक कारणामुळे आलेल्या वैफल्याच्या झटक्याने त्यांचा चेहरा झाकोळून गेला होता. चेहऱ्यावरील विषण्णतेचे भाव त्यांना प्रयत्न करूनही लपवता येत नव्हते. अवघं आयुष्य उद्ध्वस्त झाल्यागत ते खुर्चीत जवळपास कोसळलेच. हातात घेतलेलं महत्त्वाचं काम बाजूला ठेवून त्यांची समस्या समजावून घेण्याशिवाय गत्यंतर नव्हते. तात्यांनी थोडाही वेळ वाया न घालवता तोंड उघडले.
‘‘या जगात कोणीही विश्वास ठेवण्याच्या लायकीचं राहिलेलं नाही. आपल्याला नावं ठेवणारी एकही व्यक्ती या पृथ्वीवर निर्माण होऊ नये यासाठी मी आयुष्यभर काय नाही केलं? स्वत:च्या मतांना तिलांजली दिली, तत्त्वांना मुरड घातली, प्रसंगी स्वत:च्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं, प्रगतीची काळजी केली नाही व अनेकदा आर्थिक झळही सोसली. हे सगळं काही केलं ते केवळ एका गोष्टीसाठी. सर्वांनी मला चांगलं म्हणावं, कोणीही मला नावं ठेवू नये यासाठी. ज्यांच्या भल्यासाठी मी स्वत:चं नुकसान करून घेतलं त्यांच्यापैकीच एकाने आज माझा ‘स्वत:ची मतं नसलेलं बिनबुडाचं भांडं’ असा उल्लेख केलेला ऐकून मला काय वाटलं असेल? या जगात आता जगण्यासारखं काहीही शिल्लक राहिलेलं नाही.’’ तात्या पूर्णपणे खचून गेले होते. त्यांच्याबद्दल कोणाचं वाईट मत असणं ही गोष्ट त्यांच्या कल्पनेपलीकडली होती. ते स्वप्नातही अशा ‘भयंकर’ घटनेचा विचार करू शकत नव्हते. आपल्याबद्दल सभोवतालच्या सर्वांचं मत चांगलंच असलं पाहिजे हा जगावेगळा अट्टाहासच त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करू लागला होता.
असे आम्ही कसे? समाजात एखाद्या व्यक्तीबद्दल सर्वांचं एकजात चांगलं मत असणं, टीका करणारी एकही व्यक्ती नसणं, उघड किंवा छुपा एकही शत्रू नसणं हे खरोखरच शक्य आहे का? या गोष्टी मानवीय प्रवृत्तीशी सुसंगत आहेत का? ज्यांना आयुष्यात प्रगती करायची आहे व यशस्वी व्हायचं आहे त्यांना सगळी कामं मिशनरी वृत्तीने पार पाडावी लागतात व हे करीत असताना ते सर्वांना एकाच वेळेस खुश ठेवू शकत नाहीत. कोणत्याही धडपड्या व यशस्वी व्यक्तीला मित्रांपेक्षा शत्रूच जास्त असतात व अशा शत्रूंचं त्या यशस्वी व्यक्तीबद्दल कधीच चांगलं मत नसतं. आपल्याबद्दल शत्रूंचं मत चांगलं नाही म्हणून यशस्वी व्यक्ती प्रगती करणे कधीच थांबवत नसतात.
या जगात सर्वांचं आपल्याबद्दल चांगलंच मत असलं पाहिजे यासाठी अविरत धडपड करणारी तात्यांसारखी माणसं सतत प्रचंड तणावाखाली वावरत असतात व शेवटी अपेक्षाभंगाच्या दु:खाने उद्ध्वस्त होतात. आयुष्यात खऱ्या अर्थाने यशस्वी व्हायचं असेल तर लोकांच्या वाईट मतांना भीक घालण्यात अर्थ नसतो. अखेर सगळं जग सलाम करतं ते उगवत्या सूर्याला म्हणजेच यशस्वी व्यक्तीला !
-- श्रीकांत पोहनकर
98226 98100
shrikantpohankar@gmail.com
October 26, 2016
बारीकसारीक व्याधींमध्ये पाय, कंबर, दात दुखणे असले प्रकार मोडतात. म्हटले तर या व्याधी असतात अगदी किरकोळ पण आपल्याला बेचैनी देण्यास त्या पुरेश्या ठरतात. दात दुखणारा माणूस अन्य कशातही लक्ष घालू शकत नाही तसेच कंबर दुखणारा कोणतीच हालचाल सहज करू शकत नाही. मात्र किरकोळ पण वेळच्या वेळी केलेल्या उपचारांमुळे या कटकट्या स्वरूपाच्या दुखण्यातून मुक्तता मिळविता येते.
पाय दुखणे मध्यमवयाच्या महिला, अशक्त मुले आणि मुली तसेच सरसकट सगळे वृद्ध यांना पायदुखीचा त्रास बरेचदा होताना आपण पाहातो. यावर पाव चमचा कच्चे तीळ चावून खावेत. महिनाभर हा उपाय केल्याने पाय दुखणे थांबते.
कंबर दुखी विशेषत महिलांची – रात्री झोपताना गरम पाण्याच्या पिशवीने कंबर शेकावी. रोज १ चमचा सुंठवडा आठ दिवस खाल्ल्याने कंबरदुखी बंद होते.
उसण भरणे कोठेही उसण भरली अथवा लचक आली तर मोहरीचे तेल मालिश करून लावावे व मग तो भाग शेकावा.
बारीकसा अस्थिभंग (हेअर क्रॅक) बर्याचचवेळा पडल्याने अथवा पाय मुरगळणे या सारख्या प्रकारात हाडाला बारीकशी चीर पडते. यामुळे वेदना होतातच पण बर्याेच वेळा अवयव सुजतो. या प्रकारात कच्च्या डिंकाचे लाडू खाण्याने ही चीर लवकर भरून येण्यास मदत होते.
दात दुखणे आजकाल अगदी बालवयापासून दातदुखी हा विकार आढळतो. त्रिफळा चुर्णाने दात घासल्याने दातदुखी थांबतेच पण दात आवळून येतात. मायफळाची पावडर हिरडयांना लावून अर्ध्या तासाने चुळा भराव्यात. हिरडयांना सूज असेल तरी त्रिफळा चूर्ण लावल्याने आराम मिळतो.
पोटदुखी ओवा व साखर गरम पाण्याबरोबर घेण्याने पोटदुखी कमी होते. लहान बाळांमधील पोटदुखी पोट शेकण्यानेही कमी होते. अगदी तान्हे बाळ असेल तर आईने ओवा चावून बाळाच्या बेंबीवर तोंडानेच वाफारा सोडला तरी पोटदुखी कमी होते. मात्र गॅसेसमुळे बाळाचे पोट दुखत असेल तर हिंग पाण्यात कालवून त्याचा लेप बेंबीभोवती दिल्याने आराम पडतो.
जुलाब जुलाब होत असतील तर खसखस तुपात परतावी व दुधात शिजवावी. २ चमचे खसखस घ्यावी. हे मिश्रण प्यायल्याने जुलाब थांबतात. अगदी लहान बाळाला जुलाब होत असतील तर जायफळ उगाळून साखरेबरोबर चाटवावे.
उलटी उलट्या होत असतील तर धने रात्री पाण्यात भिजत घालावेत. ते पाणी धन्यासकट उकळावे. यात साखर व मीठ घालून थोडे थोडे पाजत राहावे.
अपचन अपचनावर लंघन हा सर्वात्तम उपाय आहे. लिंबू ,मीठ घालून केलेले शरबत थोडेथोडे थोडया वेळाने पिण्यानेही फरक पडतो. अननसाच्या फोडी त्यावर साखर घालून खाव्यात त्यानेही पचन सुधारते.
शौचास खडा होणे ही सवय बर्याअच लोकांना असते.त्यासाठी वेगवगळी औषधे ही घेतली जातात. रात्री झोपताना हळद व आवळकाठी यांचे मिश्रण घेतल्यानेही खडा मोडतो. १ चमचा आवळकाठी अधिक १ चमचा हळद एकत्र करून त्याच्या सारख्या आठ पुडया कराव्यात व रात्री झोपताना रोज १ पुडी या प्रमाणे आठ दिवस घ्याव्यात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
January 12, 2017
दीर्घकाळ एकाच स्थितीत बसल्यानंतर किंवा झोपेतून उठताना मुंग्या येणे किंवा बधिरपणा जाणवू शकतो. हातापायाच्या एखाद्या शिरेवर बराच वेळ दाब आल्याने या संवेदना जाणवतात. हातपाय हलविणे किंवा हिंडू- फिरू लागले की त्रास जातो. झोपेतसुद्धा एकाच स्थितीत जास्त काळ राहण्याने असा शिरेवर दाब येणे संभवते. याकरिता निसर्गाने झोपेत कूस बदलली जावी, अशी एक यंत्रणा निर्माण केलेली आहे. समजा आपण डाव्या कुशीवर झोपलो आहोत. हळूहळू आपल्या डाव्या नाकपुडीतील अस्तर सुजू लागते. साधारण २ तासांनी नाकपुडी बंद होते. नाकपुडी बंद झाल्याची माहिती मेंदूकडे जाते व आपोआपच कूस बदलली जाते. दीर्घकाळ एकाच जागी बसणाऱ्या व्यक्ती आपले पाय आलटून पालटून असा दाब येणे टाळतात. शरीराच्या एकाच भागावर मधूनअधून किंवा सातत्याने मुंग्या येण्याची अथवा तो भाग बधिर असण्याची भावना येणे हे लक्षण तेथील संवेदना मेंदूत नेणाऱ्या चेतासंस्थेच्या भागातील दोषांचे आहे. शरीराच्या डाव्या अथवा उजव्या भागावर मुंग्या येणे हे लक्षण मेंदूत दोष निर्माण होत असण्याचे आहे. पक्षाघात (शरीराची उजवी अगर डावी बाजू शक्तीहीन होणे, लुळी पडणे) किंवा मेंदूला रक्तपुरवठा कमी पडणे, या आजाराची सुरवात अशी होते. डोक्यााला इजा झाल्यावर काही काळाने अशा मुंग्या येऊ लागणे हे मेंदूच्या वरच्या आभ्रयात रक्ताची गुठळी झाल्याचे (subdural nematoms) लक्षण आहे. मेंदूत गाठ होणे, मेंदूला सूज येणे, मेंदूत जिवाणू किंवा विषाणू यांच्यामुळे दाह होणे अशा अनेक मेंदूच्या आजाराची सुरवात झाल्याचे या मुंग्या येण्यापासून कळू शकते. एकाच हाताला मुंग्या येणे अथवा बधिरपणा जाणवणे हे मानेतील मणक्याकत दोष असल्याचे लक्षण असते. दोन मणक्यांवतील चकत्या झिजतात, त्या सरकतात, त्या सरकलेल्या भागाचा दाब मानेतून हातात येणाऱ्या शिरांवर येतो व मुंग्या येण्याचा त्रास सुरू होतो. असा त्रास बऱ्याच वेळा हाताला होतो तेव्हा पंज्याच्या करंगळी व अनामिका या बोटात होतो. जेव्हा मुंग्यांचा त्रास अंगठा व तर्जनी येथे होतो तेव्हा मनगटाजवळील "मीडियन' (median) शीर दाबली जात असते. कार्पल टनेल सिंड्रोम (carpal tunnel syndrome) काही साध्या व्यायाम व औषधांनी बरे न वाटण्यास शस्त्रक्रिया करून हा आजार पूर्ण बरा करता येतो. नर्व्ह कंडक्शान स्टडीज (nerve conduction studies) या तपासानंतर हे निदान निश्चिरत करता येते. मधुमेह या विकारात पायाच्या (व हातांच्यासुद्धा) शिरा कमजोर होऊ लागतात. (peripheral neuropethy). लघवीला वारंवार जावे लागणे, तहान लागणे, वजन कमी होणे, थकवा होणे अशी लक्षणे असली, तर लगेच रक्त-लघवी तपासून मधुमेहाचे निदान केले जाते. अनेक रुग्णांना तळपायाची आग होते. मधुमेहाखेरीज कोणत्याही कारणाने तळपायाला जाणाऱ्या शिरांवर दाब येत असला किंवा रक्ताचा पुरवठा कमी पडला तर तळपायांची आग होते. कॅपसॅसिन नावाचे एक द्रव्य मिरचीपासून काढतात. कॅपसॅसिन असणारे मलम तळपायावर चोळल्याने तळपायाची आग होण्याचा त्रास शमतो. (capsacin). काही रुग्णांना उभे राहिले किंवा चालू लागले की पायांना मुंग्या येऊ लागतात. चालताना मधेच उभे राहण्याची वेळ आली तर पायात होणारा त्रास असह्य होऊ लागतो. आपल्या कमरेच्या मणक्याहतील चकत्या झिजून सरकल्या म्हणजे मज्जारज्जूतून पायात जाणाऱ्या चेताशिरांवर दाब येऊ लागतो, त्यामुळे हा त्रास होतो.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 6, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti