वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
साडी हा असा पोषाख आहे जो कुठल्याही प्रसंगी परिधान केला तरी चालतो. म्हणूनच वेस्टर्न कल्चरचा कितीही प्रभाव पडला तरी स्त्रियांच्या मनातील आणि कपाटातील आपले स्थान साडीने अजूनही कायम ठेवले आहे. २१ डिसेंबर हा आता जागतिक साडी दिवस म्हणून साजरा केला जातो.
December 27, 2018
जीवनात जर माणूस यशस्वी झाला तर तो समृद्ध होतो व सुख त्याच्या मागे लागते हे पल्याला मोठ्या लोकांच्या (मोठी झालेली लोकं) यांच्या वागणुकीतून दिसते.
May 12, 2024
एका देवळात एका रिसायकल होणार्या तेल, फुलं, नारळ वगैरेची आर्थिक उलाढाल बघाल तर थक्क व्हाल. एका शनिवारी एका देवळात किमान १०० लिटर तेल वापरलं गेलं आणि रिसायकल झालं तर देशभरात किती लिटर तेल वाया जात असावं? आणि त्यावर किती जण “माया” कमवत असावेत? हीच गोष्ट दूध, फुलं यांचीसुद्धा !!
November 29, 2017
November 23, 2013
सगळं काही “साथी हाथ बढाना ” टाईप. १०-१२ जणी मिळून तितक्याच घरांसाठी वाळवण आणि साठवण निगुतीने करायच्या. मेहनताना वर लिहिलाय तसा – किंचित चव. तुलना वगैरे नसायची. २-३ महिन्यात वर्षभराची बेगमी ! त्याकाळी हे सगळंच सर्रास दुकानांमध्ये मिळत नसे. त्यामुळे गृहिणी जिंदाबाद !
September 2, 2021
फ्लॅशबॅक – मराठीसृष्टीवरील एक नवीन सदर. क्रिकेटच्या या प्रवासामधील काही ठळक प्रसंगांचा, नाटकीय घडामोडींनी रंगलेल्या सामन्यांचा, केवळ मैदानावरीलच नव्हे तर ड्रेसिंग रूम आणि त्याच्यापलीकडेही घडलेल्या आणि खेळाला प्रभावित केलेल्या घटितांचा समावेश या सदरामध्ये असणार आहे. प्रामुख्याने कसोटी क्रिकेट, इंग्लंड आणि भारतातील प्रथम श्रेणीच्या क्रिकेटचे हंगाम यावर भर दिला जाणार आहे.
August 1, 2010
स्तुतिं - हे भगवान शंकरा आपली स्तुती अर्थात स्तवन कसे करावे?
ध्यानं- आपल्या दिव्य स्वरूपाचे ध्यान कसे करावे?
अर्चां - आपले अर्चन अर्थात पूजा इ. कसे करावे?
यथावद्विधातुं - याचे नेमके शास्त्रीय विधान काय आहे?
भजन् अप्यजानन्- हे न जाणता देखील आपले भजन करीत,
महेशावलंबे - हे भगवान महेशा !मी आपला आश्रय घेत आहे.
अर्थात काहीही समजत नसूनदेखील मी आपल्या चरणी शरण आलो आहे. कारण या चरणांनी अनेकांना वाचवल्याचे मी वाचले आहे. जसे,
त्रसंतं सुतं त्रातुमग्रे
मृकंडो:- अल्पायुत्वाने त्रस्त झालेल्या, मृकंड ऋषींचे सुत ,महर्षी मार्कंडेय यांचे संरक्षण करण्यासाठी अग्रेसर झालेल्या,
यमप्राणनिर्वापणं त्वत्पदाब्जम् - यमराजां पासून प्राण वाचवणार्या आपल्या चरणकमलांना, मी शरण येत आहे.
मृकंड ऋषींना संतती नसल्यामुळे त्यांनी भगवान शंकराची तपश्चर्या केली. तुझा पुत्र, अल्पायु पण ज्ञानी किंवा दीर्घायू पण मूर्ख होईल असे दोन पर्याय श्रीशंकरांनी त्यांच्यासमोर ठेवले. ऋषींनी पहिला पर्याय निवडला. त्या आशीर्वादाने झालेल्या मार्कंडेय ऋषींनी सप्तर्षी आणि श्रीब्रह्मदेवांच्या कृपाप्रसादाने महामृत्युंजय मंत्र प्राप्त केला. पुढे त्यांनी केलेल्या महामृत्युंजय मंत्राच्या अनुष्ठानाने त्यांच्या मृत्यू समयी , प्रसन्न झालेल्या भगवान श्रीशंकरांनी, नियतीच्या नियमाप्रमाणे मार्कंडेय ऋषींचे प्राण हरण करण्यासाठी आलेल्या यमराजांपासून आपल्या या अल्पायुषी भक्ताचे प्राण वाचवून त्यांना चिरंजीव पद दिले. अशी कथा पुराणांमध्ये पहावयास मिळते. या कथेचा संदर्भ घेत भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज आपल्या शरणागतीची कारण मीमांसा करीत आहेत.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
June 23, 2020
पुण्याचे भूषण असलेली संगीत क्षेत्रातील एक पूज्य वास्तू " पुणे भारत गायन समाज " आज १०७ व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. देवगंधर्व पंडित भास्करबुवा बखले यांनी १ सप्टेंबर १९११ साली स्थापन केलेली हि वास्तू पुढे अनेक दिग्गज कलावंतांच्या पदस्पर्शाने पुनीत झाली आणि आजही होत आहे. या संस्थेमार्फत संगीत प्रचार आणि प्रसाराचे काम गेली १०७ वर्ष अविरत पणे चालू आहे.
याच संस्थेच्या भास्कर संगीत विद्यालयामध्ये गायन,तबला,सतार,हार्मोनियम,व्हीयोलीन,कथ्थक, भरतनाट्यम इत्यादी कलाप्रकारांचे शात्रोक्त पद्धतीनी शिक्षण दिले जाते . यामध्ये मध्यमा,विशारद,पारंगत अशा १० वर्षाचा लिखित अभ्यासक्रमानुसार शिक्षण दिले जाते.
संस्थेच्या अभ्यासक्रमाला १९६२ मध्ये राज्यसरकारने मान्यता दिलेली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक संगीत विद्यालये भास्कर संगीत विद्यालयाशी संलग्न आहेत.सौ.शैला दातार या पुणे भारत गायन समाजच्या अध्यक्षा आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
संदर्भ.इंटरनेट
September 1, 2017
तुम्ही भलेही कट्टर ‘नास्तिक ‘ असाल , तरी तुम्हास एक विनंती आहे ,हे स्तोत्र (केवळ १०८ ओव्यांचे आहे . तुमचा फारसा वेळ घेणारे नाही ) किमान एकदा तरी वाचा , एक साहित्यिक प्रकार म्हणून किंवा एक चारोळ्याचा संग्रह म्हणून . तुम्ही एका वाचनात ‘आस्तिक ‘ होणार नाहीत ,पण वाचनातून मिळालेला आनंद अप्रतिम असेल याची खात्री मी देतो .
April 5, 2018
माझ्यासाठी तो कायम उंबरठ्याबाहेर राहिला. माझ्या प्रिय चित्रकलावंतांच्या मांदियाळीत मी त्याला स्थान देऊ शकलो नाही. त्याची नाटके बघायचा योग आला नाही की भाषणे ऐकण्याचा ! मात्र त्याला “ज्ञानपीठ “जाहीर झाले त्यावेळी माझ्या सासऱ्यांनी काहिसा निषेध नोंदविला आणि मग मी कुतूहलाने त्याची पूर्वपीठिका चाळली. ज्ञानपीठ मिळाले म्हणजे हा नक्कीच बाप माणूस असणार ही बांधलेली खूणगाठ तेंव्हा घट्ट झाली.
June 17, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti