वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
डॉ. ब्लॅलॉक यांच्या जगप्रसिद्ध ‘ब्लॅलॉक-टॉऊसिग-थॉमस’ ही उपचारप्रणाली विकसित करण्यात ज्यांचे मोलाचे योगदान आहे ते व्हिविअन थॉमस! थॉमस, डॉ. ब्लॅलॉक यांचे शल्यचिकित्सेदरम्यान सहायक होते. चौतीस वर्ष डॉ. ब्लॅलॉक व थॉमस यांनी एकत्र काम केले. डॉ. ब्लॅलॉक यांच्या कित्येक संशोधनांचा पाया थॉमस यांनीच रचला होता. थॉमस कृष्णवर्णी-आफ्रिकन वंशाचे होते. त्यामुळे त्यांना वर्णद्वेषाचा सामना करावा लागत असे. ब्लॅलॉक यांच्याइतकेच किंबहुना कांकणभर सरस असे शल्यचिकित्सेतील कौशल्य थॉमसकडे होते. त्यांच्या हाताखाली शिकून विद्यार्थी निष्णात शल्यचिकित्सक झाले, इतके त्यांचे कौशल्य होते. हृदयशल्यचिकित्सेतील महारथी डॉ. डेंटन कूली हे थॉमस यांचेच विद्यार्थी. थॉमस यांच्याबद्दल बोलतांना डॉ. कूली यांनी म्हटले आहे की ज्यांनी शस्त्रक्रिया कधीही पाहिलीदेखील नसेल असा मनुष्य देखील थॉमस यांच्याकडून शिकून उत्तम काम करू शकतो कारण एकच, व्हिविअन ते इतके सहज सोपे करतो की ते आम्हाला जमते. परंतु थॉमस यांना जिवंत रुग्णावर कधीच शस्त्रक्रिया करावयास मिळाली नाही.
गरीबी व वर्णभेद यावर मात करून, वेगवेगळ्या सामाजिक अडथळ्यांची शर्यत पार करून थॉमस यांनी मिळविलेल्या उत्तुंग यशाची ही कहाणी आहे. बुद्धिमत्ता, अफाट परिश्रम करण्याची क्षमता व चिकाटीच्या जोरावर हृदयशल्यचिकित्सेच्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा अमीट ठसा उमटविणार्या माणसाची यशोगाथा म्हणजे व्हिविअन थॉमस.
२९ ऑगस्ट १९१० रोजी लुईसिआना प्रांतातील न्यूइबेरिआ येथे थॉमस यांचा जन्म झाला. त्यांचे आजोबा गुलाम होते. थॉमस यांना डॉक्टर होण्याची तीव्र इच्छा होती. परंतु १९२९ सालच्या मंदीमुळे त्यांना या स्वप्नास दूर सारावे लागले. त्याऐवजी डॉ. ब्लॅलॉककडे शस्त्रक्रिया-सहायक म्हणून त्यांनी कामास सुरुवात केली. पहिल्याच दिवशी डॉ. ब्लॅलॉक यांना एका श्वानावर प्रयोग करण्यास थॉमस यांनी मदत केली. थोड्याच दिवसांत थॉमस त्यांच्या कामात इतके निष्णात झाले की डॉ. ब्लॅलॉक येईपर्यंत थॉमस यांनी श्वानांवरील शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केलेली असे. व्हॅनडरबिल्ट विद्यापीठात थॉमस डॉ. ब्लॅलॉकच्या हाताखाली काम करीत. थॉमसच्या कामाचे स्वरूप व व्याप्ती कोणत्याही पोस्टडॉक्टरल संशोधकाच्या तोडीची होती परंतु त्यांना पगार मात्र साध्या हरकाम्याचा मिळत असे. तेव्हा जागतिक मंदी आली होती. थॉमस यांनी ज्या नॅशव्हिल बॅंकेत पैसे ठेवले होते ती मंदीमुळे बुडाली. अशा परिस्थितीत कमी पगाराची का असेना, नोकरी आहे याचेच थॉमस यांना अप्रूप होते.
थॉमस व ब्लॅलॉक यांनी ‘हेमरेज’ व ‘ट्रॉमा’ यावर बरेच संशोधन केले. दुसर्या महायुद्धकाळात या संशोधनाचा खूप उपयोग झाला. कित्येक जखमी सैनिकांचे प्राण वाचण्यास यामुळे मदत झाली. या संशोधनामुळे डॉ. ब्लॅलॉक यांना बरीच प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर ब्लॅलॉक यांनी रक्तवाहिन्या व हृदयावरील शस्त्रक्रियांच्या संदर्भात कामाला सुरुवात केली. मदतनीस अर्थातच थॉमस होते. १९४१ च्या सुमारास ब्लॅलॉकचे नाव सर्वतोमुखी झाले व जॉन हॉपकीन्सरुग्णालयामध्येत्यांना शल्यचिकित्सेचे प्रमुखपद देण्यात आले. तेव्हा थॉमस यांनी त्यांच्याबरोबर यावे म्हणून ब्लॅलॉकनी गळ घातली.
जेव्हा थॉमस, जॉन हॉपकिन्स येथे पोहोचले तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की यापूर्वी काहीच नाही असा तेथे वर्णभेद होता. कृष्णवर्णी लोक विद्यापीठात फक्त हरकामे गडी म्हणूनच नोकरीला होते. जेव्हा थॉमस पांढरा कोट घालून प्रयोगशाळेत येत तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या जात.
याच दरम्यान डॉ. ब्लॅलॉक यांना डॉ. टॉऊसिग भेटल्या. ‘टेट्रालॉजी ऑफ फॅलॅा’ म्हणजे जन्मतःच ज्या बालकांच्या हृदयाला छीद्र असते त्यामुळे त्या बालकांच्या शरीरावर निळसर झाक असते. या विकारास ‘ब्लू बेबी’ असेही संबोधिले जाते. डॉ. टॉऊसिग बालहृदयरोगतज्ज्ञ होत्या व त्यांच्याकडे या विकाराने ग्रस्त असे कितीतरी रुग्ण उपचारासाठी येत. त्यामुळे यावर तातडीने शल्यचिकित्सेद्वारे मार्ग काढण्यासाठी त्या उत्सुक होत्या. डॉ. ब्लॅलॉकना त्यांनी हा प्रश्न सांगितला. ब्लॅलॉकनी थॉमसची मदत घेतली. थॉमस यांनी पुढील दोन वर्षांत २०० श्वानांवर प्रयोग केले व ‘टेट्रालॉजी ऑफ फॅलॅा’ सदृश स्थिती तयार करण्यात ते यशस्वी झाले. त्यावरील शस्त्रक्रियाही त्यांनी विकसित केली. थॉमस यांनी ‘अॅना’ नावाच्या एका श्वानावर ही शस्त्रक्रिया करून दाखविली. ते पाहून डॉ. ब्लॅलॉक इतके प्रभावित झाले की, ‘हे तर ईश्वरी कृत्यच वाटते’ असे त्यांनी प्रशंसोद्गार काढले.
२९ नोव्हेंबर १९४४ रोजी एका १८ महिन्यांच्या बालकावर प्रथम ही शस्त्रक्रिया करण्यात आली. बालकांवर हृदयशल्यचिकित्सा करण्यास सुयोग्य अशी उपकरणे तेव्हा उपलब्ध नव्हती. थॉमस यांनी त्यावर देखील मार्ग काढला. प्रयोगशाळेत प्राण्यांवर काम करतांना ते ज्या उपकरणांचा वापर करीत त्यातील सुया, चिमटे यांचा त्यांनी प्रभावी वापर केला. शस्त्रक्रियेदरम्यान थॉमस, डॉ. ब्लॅलॉक यांच्या शेजारी एका लहानशा स्टुलावर उभे राहून सूचना देत होते. त्याचे कारण थॉमस यांनी ही शस्त्रक्रिया यापूर्वी शेकडो वेळा श्वानांवर केली होती तर ब्लॅलॉक यांनी फक्त एकदाच केली होती. यानंतर एका सहा वर्षांच्या मुलावर हीच शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया पूर्ण होताक्षणीच त्याच्या अंगावरील निळसर झाक नाहीशी झाली. १९४५ च्या मे महिन्यात ‘जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशनने’ (जामा) यावर एक लेख प्रसिद्ध केला. त्यात सारे श्रेय डॉ. ब्लॅलॉक व डॉ. टॉऊसिग यांनाच देण्यात आले. थॉमस यांचा उल्लेखही करण्यात आला नाही.
थॉमस यांनी कितीतरी शल्यचिकित्सकांना तसेच प्रयोगशाळा तंत्रज्ञांना प्रशिक्षण दिले. डॉ. डेंटन कूली यांच्यासारख्या हृदयशल्यचिकित्सेतील महारथींनी थॉमस यांचे ऋण मान्य केले; मुलाखतींमधून त्यांची प्रशंसा केली. असे असले तरी थॉमस ‘सहायक’च राहिले व तुटपुंज्या पगारावर काम करीत राहिले, इतका तीव्र स्वरुपाचा वर्णद्वेष तेव्हा अस्तित्वात होता. या संदर्भातील एक नित्य घटनाक्रम म्हणजे उत्पन्नास जोड देण्यासाठी थॉमस, ब्लॅलॉकच्या घरी समारंभात मदतीस जात. दिवसा विद्यापीठात ते ज्यांचे प्रशिक्षक असत त्या प्रशिक्षणार्थी व इतर शल्यचिकित्सकांपुढे ते अशा समारंभात ‘बारटेंडर’ म्हणून समोर येत. ब्लॅलॉक यांनी थॉमस यांच्यासाठी बरीच खटपट केल्यानंतर थॉमस यांच्या वेतनात वाढ करण्यात आली व विद्यापीठातील सर्वात जास्त वेतन मिळविणारे ते तंत्रज्ञ ठरले.
लहान असल्यापासून डॉक्टर होण्याचे थॉमस यांचे स्वप्न होते. बरीच वर्षे शल्यचिकित्सा-सहायक म्हणून काम केल्यावर त्या अनुभवाच्या आधारावर वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी प्रयत्न केले. मॉर्गन विद्यापीठाने त्यांना प्रवेश देण्याची तयारी दाखविली परंतु त्यांना सुरुवातीपासून अभ्यास करावा लागेल असे सांगितले. इतका अनुभव गाठीशी असूनही सुरुवातीच्या अभ्यासक्रमातून सूट देण्यास नकार दिला. हे सर्व पूर्ण होऊन डॉक्टरकीची पदवी मिळेपर्यंत थॉमस पन्नाशी गाठणार होते. त्यांनी प्रदीर्घ विचार करून डॉक्टर होण्याचा विचार रद्द केला.
ब्लॅलॉक यांच्याबरोबर थॉमस यांनी बरीच वर्षे काम केले. व्हॅनडरबिल्ट विद्यापीठात व नंतर जॉन हॉपकीन्स रुग्णालय येथे काम करीत असतांना वरिष्ठांशी ब्लॅलॉकनी प्रसंगी वादही घातला कारण त्यांना थॉमसच हवे होते. थॉमस यांना वेतनवाढ मिळावी म्हणूनही ब्लॅलॉकनी खटपट केली परंतु शोधनिबंध प्रकाशित करतांना अथवा इतरही ठिकाणी श्रेय देतांना थॉमस यांचा नामोल्लेखही टाळला. ब्लॅलॉकच्या निधनापर्यंत थॉमस त्यांच्यासोबत काम करत होते. पण त्यांच्यातील संबंध तणावपूर्ण झाले होते. १९६४ साली ब्लॅलॉकचे कर्करोगाने निधन झाले त्यानंतर १५ वर्षे थॉमस, जॉन हॉपकीन्स रुग्णालयात काम करीत होते. अखेरीस त्यांना ‘डायरेक्टर ऑफ सर्जिकल रिसर्च लॅबोरेटरीज’ असा हुद्दा देण्यात आला. जॉन हॉपकीन्स येथील पहिले कृष्णवर्णी हृदयशल्यविशारद लेव्ही वॅटकीन्स यांनीव्हिविअन थॉमस यांच्याकडे प्रशिक्षण घेतले.व्हिविअन थॉमस वलेव्ही वॅटकीन्स यांनी‘ऑटोमेटिक इम्प्लांटेबल डिफिब्रिलेटर’वर काम केले. थॉमस यांनी जॉन हॉपकीन्स येथे ३७ वर्षे काम केले. १९७६ मध्ये त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली व शल्यचिकित्सा प्रशिक्षक म्हणून त्यांचा अध्यापकवर्गात समावेश करण्यात आला. इतकेच नव्हे तर जॉन हॉपकीन्स येथील चार वैद्यकीय महाविद्यालयांना, ज्यांनी वैद्यकशास्त्रात मोलाची भर घातली आहे अशांची नावे देण्यात आली; त्यामधील एका वैद्यकीय महाविद्यालयास थॉमस यांचे नाव देण्यात आले. २६ नोव्हेंबर १९८५ रोजी थॉमस यांचे निधन झाले. १९९० मध्ये त्यांच्या जीवनावरील लेखास राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. २००३ मध्ये त्यांच्यावरील चित्रफीत ‘पार्टनर्स ऑफ हार्ट’ प्रकाशित झाली. २००४ मध्ये एच.बी.ओ. तर्फे त्यांच्या जीवनावर आधारित ‘समथिंग द लॉर्ड मेड’ प्रकाशित झाला.
१९९६ सालापासून ‘कौन्सिल ऑफ कार्डिओव्हॅस्क्युलर सर्जरी अॅण्ड अॅनॅसस्थेटॉलॉजी’तर्फे थॉमस यांच्या स्मरणार्थ पुरस्कार देण्यात येतो. १९९३ सालापासून थॉमस यांच्या स्मरणार्थ ‘ग्लॅक्सोस्मिथक्लाईन पुरस्कृत शिष्यवृत्ती’ देण्यात येते.
— डॉ. हेमंत पाठारे व डॉ. अनुराधा मालशे
May 16, 2019
आता जगण्यासाठी सुद्धा नियम करावे लागतील का ?
हो.
कसे जगावे, यासाठी जे नियम चुकीच्या पद्धतीने प्रस्थापित होत आहेत, झालेलेच आहेत, त्यातील दोष काढून त्यांना पुनर्स्थापित करावे लागणार आहे. शास्त्र न सोडता, आणि परंपराचा आदर राखून हे नियम बनवता आले तर जगणे सोपे होईल.
"मला असे वाटते" या सदराखालीच हे नियम बनवावे लागणार आहेत. कारण या नियमांना कोणताही ठोस आधार नाही.
हे नियम स्पष्टपणे कुठेही वर्णन केलेले नाहीत, पण नियम असल्याशिवाय इथे पानही हलत नाही, कुठे आहे रेफरन्स दाखवा पाहू, असे विचारले तर उत्तर देणे, पुरावा दाखवणे कठीण होईल, हे आधीच नमूद करतो.
नियम असतात ते अंदाज बांधण्यासाठी असतात. तेच खरं असंही काही नसतं. आरोग्याचे नियम म्हणजे कायदा नव्हे, आणि कायद्याने सर्व मिळतेच असे तरी कुठे आहे ना ?
एवढ्या उंचीला एवढे वजन असावे, असलेच पाहिजे असे नाही, रक्तदाब एकशेवीस बाय ऐशी असावा. तो तेवढाच असावा असे नाही. नियम केला की, एकशेवीस चे एकशे एकवीस झाले की रक्तदाब वाढला की नाही ? से येस ऑर नो. उत्तर द्यावे लागेल. हो. पण तारतम्याने आपण ठरवतो, एकने वाढ म्हणजे लगेच एक गोळी वाढवावी, असे नसते ना ! शेवटी तारतम्य आणि होणारा त्रास, दिसणारी लक्षणे, आणि नियम यांची योग्य सांगड घालता येणे महत्त्वाचे!
पण नियम म्हणून काही हवेत की नकोत ? म्हणून काही नियमांची क्रमशः चर्चा करू.
नियम एक.
पहिलाच नियम असा करू की, कोणताही नियम पाळू नये.
प्रत्येकाचे शरीर वेगळे, प्रत्येकाचे हातापायांच्या बोटांचे ठसे वेगळे, केसांची संरचना वेगळी, प्रत्येकाच्या डोळ्याची ठेवण वेगळी, प्रत्येकाचा आत्मा वेगळा, प्रत्येकाचे मन वेगळे, प्रत्येकाच्या इंद्रियांची क्षमता वेगळी, प्रत्येकाची प्रकृती वेगळी, प्रत्येकाची भूक वेगळी, प्रत्येकाची आवडनिवड वेगळी, प्रत्येकाचा कोठा वेगळा, प्रत्येकाचे प्रारब्ध वेगळे, प्रत्येकाचे कामाचे स्वरूप वेगळे, प्रत्येकाची धारण करण्याची क्षमता वेगळी, प्रत्येकाची शक्ती वेगळी, प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी........
एवढी विविधता इथे नांदत असताना, प्रत्येकाला होणारा आजाराचे स्वरूप वेगळे, त्याला होणारे त्रास वेगळे, प्रत्यःकाला बरे वाटण्याची कारणे वेगळी, त्याचे पथ्यापथ्य वेगळे, त्याची औषधे वेगळी......... हे फक्त आयुर्वेद सांगतो.
एवढी विविधता आपल्या अवतीभवती दिसत असताना, प्रत्येकाने पाळायचे नियम एकच कसे असतील ? यासाठी पहिलाच नियम, आपल्या आरोग्याच्या बाबतीत कोणताच नियम नक्की होऊ शकत नाही. अगदी एकाच प्रकृतीची, एकाच वेळी जन्माला आलेली, दोन जुळी माणसे किती भिन्न स्वभावाची असतात ? त्या दोघांमधे बाहेरून आतून थोडेफार साधर्म्य दिसेल पण तेवढ्यापुरतेच असते. कुंडलीशास्त्रानुसार देखील त्यांच्या अंशांश कुंडल्या बदलतात. असंच प्रत्येकाचे असते. त्यामुळे इथे प्रत्येकाचे नियम वेगळे.
हे नियम, थोडे तारतम्य वापरून, थोडा अनुभव वापरून, थोडा विवेक वापरून, थोडा ग्रंथांचा अभ्यास करून, थोडे व्यवहारज्ञान वापरून, थोडे थोरामोठ्यांनी सांगितलेले ऐकून, बदलायचे असतात.
जसे, दूध दही हा प्रमेहाचा हेतू म्हणजे मधुमेह होण्याच्या अनेक कारणातील एक कारण सांगितले आहे. याचा अर्थ लगेचच दूध दही कायमचे बंद करण्याची आवश्यकता नाही. आपल्या प्रकृतीला, आजच्या भाषेत काय "सुट" होते ते पहावे. अतिरेक नक्की टाळावा. चहामधे दूध चालेल, पण दुधाचाच चहा नसावा. गरज असेल तरच दूध घ्यावे. औषध म्हणून नको. अनुपान म्हणून दुध प्यावे, पण नियम म्हणून बोर्नव्हीटा खपवण्यासाठी दूध नको. म्हणजे बोर्नव्हीटा खाल्ला नाहीतर ताकद कशी येणार म्हणून दूध पाजवायचे, किंवा दुधामधे पूर्ण शक्ती असते, म्हणून दूध प्यायलाच हवे, पण दुधाचा वास चव आवडत नाही म्हणून त्यात काहीतरी टाॅनिकच्या नावाने विरघळून टाळूत ओतायचे, हा नियम नको.
इथे तारतम्य हवे, माझ्या मुलाला खरोखरच या सर्वाची गरज आहे का, हे एखाद्या जाणकार वैद्याला विचारून घ्यावे आणि नंतरच निर्णय घ्यावा. उगाचच कोणीतरी हिरो, खेळाडू, आपले खोटेनाटे सिक्रेट ओपन करत असतील तर भुलून जाऊ नये, इतकेच.
सांगायचा मुद्दा असा की, स्वतः ठरवून काहीही करू नये. सहजपणाने एखादी गोष्ट घडून जावी, नको त्या ठिकाणी असलेली बुद्धी संपवून टाकली तर हवी तिथे ती वापरता येत नाही.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
10.04.2017
April 10, 2017
स्वाती नक्षत्राच्या पावसाचे थेंब शिंपल्यामध्ये पडल्यास ते मोती बनतात, जर ते थेंब पानावर पडले तर दव आणि सापाच्या तोंडात पडले तर त्याचे विष बनते. थेंब पावसाचे आहेत, परंतु जशी सोबत मिळाली तसे रूप बनले. जर एखाद्या पारस दगडाने लोखंडाला स्पर्श केला किंवा त्यात मिसळले तर ते सोने होते आणि जर लोखंडाला पाणी लागले तर जंक पकडतो. आपल सुद्धा तसेच नाही का? जशी संगत धरू तसे जीवन बनवू. पण मनुष्य जीवन मौल्यवान आहे. त्याचे मूल्य आपण जाणून घ्यावे.
February 19, 2022
अमृता खंडेराव यांचं हे कथासंग्रह म्हणजे विदर्भाच्या मातीतून उगम पावलेलं, चुलीवर शिजवलेलं आणि बोलीभाषेच्या फोडणीने झणझणीत झालेलं साहित्यिक जेवण आहे. हे पुस्तक वाचताना वाटतं, आपण एखाद्या खेड्यातल्या अंगणात बसलो आहोत, समोर चुलीवर भाकरी भाजतेय, आणि आजूबाजूच्या बायका आपापल्या कहाण्या सांगतायत—कधी हसवणाऱ्या, कधी डोळ्यांत पाणी आणणाऱ्या, पण नेहमीच मनात घर करणाऱ्या.
July 16, 2026
लॉर्ड्सवर यॉर्कशायरविरुद्ध शेष इंग्लंड संघाकडून खेळताना चार्ल्स फ्राय यांनी या दिवशी १०५ धावांची ‘सुंदर खेळी’ (विज्डेन आल्मनॅक) केली. ओळीने सहा प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये शतके काढण्याचा त्यांचा हा विक्रम अद्याप मोडला गेलेला नाही. १२ सप्टेंबर १९३७ रोजी भयावह कॅरिबियन द्रुतगती गोलंदाजांच्या तांड्यातील आणखी एका सरदाराचा जन्म झाला. वेस्ली विन्फील्ड हॉल त्याचं नाव. त्याच्या काळपट गळ्यातील सोन्याची साखळी तो धावू लागताच अस्ताव्यस्तपणे हले.
September 11, 2010
पाणी शुद्धीकरण भाग सहा
काल काही प्रश्न विचारले गेले त्याची उत्तरे म्हणजेच आजची टीप होऊ शकेल.
शुद्ध पाणी आता दुर्मिळ होत चालले आहे. आता पाणीच दुर्मिळ होत चालले आहे, असे म्हटले तरी चुकणार नाही.
यावर्षी पाऊस चांगला झाला पण नियोजनाअभावी निसर्गातून आलेले पाणी तसेच वाया घालवले.
हेच नभज, आंतरीक्षज, ऐंद्रज म्हणजे ढगातून जन्मलेले, अंतरीक्षातून आलेले किंवा इंद्राने पाठवलेले पाणी, गरज म्हणून शुद्ध स्वरूपातील म्हणून किंवा देवाचे तीर्थ म्हणून त्याचा आदर सन्मान नको का करायला ???? वाराणसीहून गडूमधे भरून आणलेलं गंगाजल आपण आयुष्यभर साठवून ठेवतो. का ? तर अंतिम क्षणी तोंडात शुद्ध गंगाजल पडावे. एवढं याच महत्व, माहिती असून देखील, आमच्या डोळ्यादेखत हे पुण्यप्रदान करणारे तीर्थ, गटारात वाहून चालले आहे.
हेच शुद्ध पाणी जर योग्य त्या भांड्यात साठवून ठेवले तर ????
हो मी पावसाचे पाणीच म्हणतोय. सैराट झाल्यानंतर इंग्रजीत सांगितल्याशिवाय कळतच नाही. "रेन वाॅटर हार्वेस्टींग" विषयीच बोलतोय मी
!
ग्रंथकर्त्यांनी सुद्धा सांगितले आहे की, आकाशातून पडणारे पाणी जर योग्य प्रकारे साठवले तर त्यावर कोणत्याही संस्कारांची गरज नाही. ते पाणी आपण तसेच्या तसे पुढे नऊ महिने देखील स्नानपानासाठी वापरू शकतो. फक्त बाहेरची घाण साठवलेल्या पाण्यात येणार नाही ना याची काळजी घ्यावी लागेल.
बोअरवेलचे पाणी मात्र सूर्येंदुपवनम् अदृष्टम असल्याने परत अग्निसंस्कार आदि शुद्धीक्रिया करून पिण्यासाठी वापरावे लागेल. मूळ तत्व विसरले नाही तर काय करायला हवे ते "तो" आपोआपच सुचवित जातो.
विहीर देखील वरून उघडी असावी. कचरा, पालापाचोळा आत जाऊ नये, यासाठी त्यावर फक्त एखादे आच्छादन असावे.
पाण्यामधे सोन्याचे नाणे, चांदीची लगड किंवा कल्हई केलेला तांब्या पितळीचा तुकडा टाकून ठेवला तरी चालतो. उकळताना ठेवला तरी चालेल, किंवा नुसताच पाण्यात ठेवला तरी चालेल.फक्त सोने, चांदी, तांबे, पितळ पूर्ण शुद्ध असावे. मग अगदी गंगेतला गोटा असला तरी चालेल.
शुद्ध पाण्याची पण प्लॅस्टिकची बाटली घेऊन किती ठिकाणी फिरणार ? आणि ते शिळे पाणी किती दिवस पुरणार ? आणि ज्या ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्षच आहे, त्याठिकाणी कसले शुद्धिकरण आणि कसले काय ?
शक्यतो प्लॅस्टिकच्या बाटल्या, कळश्या, टब, बादल्या वापरू नयेत. त्यापेक्षा स्टील, तांबे पितळीची भांडी चांगली. माती आणि काचेपेक्षा तरी जास्त सुरक्षित सल्ला देतोय ना ! मग या धातुच्या भांड्यांची आतून थोडी स्वच्छता, थोडी मेहनत रोज करावीच लागेल ना !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
02.01.2017
January 2, 2017
काय करू काही समजत नव्हतं , कोणत्या स्थळाची / वराची निवड करू ? भल्या मोठ्या पगाराची शहरात नोकरी करणारा ,कि गेल्या तीनचार वर्षात स्वतःचा व्यवसाय सुरु केलेला , कि प्रगतिशील असलेल्या एखाद्या गावात स्वतःचा जमीन जुमला , बंगला , शेतकरी असलेला ग्रामीण भागात राहणारा .
August 5, 2023
पानाच्या उजव्या बाजूला असणाऱ्या तिखट पदार्थात उसळ, रसभाजी आणि आमटी हे पदार्थ मुख्य असतात. कडधान्ये, भाज्या आणि डाळी या क्रमाने हे पदार्थ बनवले जातात.
उसळ आणि आमटी मधे वापरले जाणारे मसाले, हे जर शिजवताना घातले, तर त्यातील औषधी गुणधर्म टिकून रहातील. पण जर फोडणीमधे मसाला घातला तर तो जळूनच जाईल.
फोडणीचे तेल हे गरम असते. त्यात प्रथम मोहोरी तडतवणे महत्वाचे असते. मोहोरीनंतर नंबर येतो हिंग किंवा मिरच्यांचा ! गरम तेलात हिंग फुलतो आणि शुद्ध होतो. हिंग वापरताना शक्यतो खडा हिंग आणावा. म्हणजे भेसळ कमी मिळते. आणून तो तूरडाळीमधे ठेवला तर डाळीला वास पण छान येतो आणि टिकते देखील.
सध्या पतंजलीचा हिंग चांगला आहे.
फोडणी करून झाली की त्यात
जी भिजवलेली कडधान्ये आहेत, ती घालावीत म्हणजे तेलाचा तडका आणि भडका कमी होतो नंतर हळद, उसळीचा मसाला, मिरचीपूड इ. घालावी, म्हणजे त्यातील औषधी गुण टिकून रहातील. नंतर थोडेसे परतून मग पाणी घालून शिजवावे.
यातील मसाले हे भूक निर्माण करतात, पचन घडवून आणतात किंवा वासाने सुद्धा पाचक स्राव वाढवतात. तिखट मिरची पूड नको असल्यास, आले, मिरी या मसाल्याचा वापर करावा.
पदार्थ शिजून झाला कि नंतर त्यात मीठ घालावे म्हणजे कमी पुरते. आणि उडून जात नाही.
युक्ती वापरून मसाल्याचा तीक्ष्ण उष्ण तिखट गुण कमी जास्त करावा. यासाठी प्रदेशानुसार नारळ किंवा शेंगदाणे कूट वापरावे.
कोणताही अन्नपदार्थ शिजवताना, त्यावर झाकण ठेवू नये, त्याला सूर्य, चंद्र, वारा, यापैकी कोणाचातरी स्पर्श व्हावा, असे विधान आहे. आणि पदार्थ शिजत असताना त्यातील काही घटक उडून जाणे देखील अपेक्षित असते. झाकण ठेवले तर आतील अन्नाला गरजेपेक्षा जास्त उष्णता लागते आणि जीवनसत्व नष्ट होण्याचीच शक्यता जास्त असते. झाकण ठेवून शिजवले असता, इंधन वाचेल पण पदार्थ अपेक्षेपेक्षा जास्ती लवकर शिजतो. आणि गडबड होते.
अपेक्षेपेक्षा जास्त लवकर वयात येणे धोकेदायकच असते ना !!!
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
13.11.2016
November 13, 2016
मला आठवते १९८०-९० दशकात मुंबईतल्या सिनेसृष्टीत '"दाऊद के इशारे के बिना यंहा पत्ता भी नहीं हिलता" अशी वाच्यता होती. तस्करी आणि उगाही (वसूली)चा पैसा दाऊद सिनेसृष्टीच्या माध्यमातून दुसर्या धंद्यात वळवायचा. दाऊद सारख्या तस्कारांमुळे आपल्या देश्यातील कोटीपेक्षा जास्त तरुण नशेच्या आहारी गेले, हजारोंच्या संख्येने अपराधी बनले, हे वेगळे. तरीही सिनेसृष्टीने दाऊदचे स्वागत केले. मोठे-मोठे मल्टी स्टारर् सिनेमे बनू लागले, त्यांत बहुतेक वसुली आणि तस्करीचा पैसाच लागत असे, अशी वाच्यता होती. नट आणि नट्यांना दाऊदच्या चरणी सर्वस्व अर्पित केल्याशिवाय सिनेसृष्टीत काम मिळत नाही, अश्या आशयाच्या गाॅसिप सिने पत्रिकांमध्ये वाचायला मिळायचे
१९९३ साली मुंबईत बॉम्बस्फोट झाले. शेकडोंच्या संख्येत मुंबईत लोक मारल्या गेले. दाऊद फरार झाला. आता वाटले होते, सिनेसृष्टीत दाऊदचा प्रभाव कमी होईल. पण तसे घडले नाही. दाऊदची पकड सिनेसृष्टीवर अधिक मजबूत झाली. देशप्रेम, स्वाभिमान इत्यादी विसरलेले, केवळ पैश्यांसाठी नट आणि नट्या परदेशात असलेल्या दाऊदच्या चरणी नाक घासण्यात आणि दरबारात ठुमके धन्यता मानू लागले.
आता प्रश्न येतो आपली जनता आणि सरकार काय करत होती. दुसरा कुठलाही देश असता, तर अश्या कलाकारांवर सिनेसृष्टीत काम करण्यावर कायम बंदी टाकली असती किंवा आतंकवादीशी संबंध ठेवण्यासाठी त्यांना जेलमध्ये धाडले असते. (आपली सरकारने अश्या कलाकारांवर का कार्रवाई केली नाही, हेच समजत नाही). जनतेने हि अश्या कलाकारांचा बहिष्कार केला पाहिजे होता. पण असे घडले नाही. मुंबईचे वाघ म्हणविणार्या नेत्यांनी अश्या कलाकारांचा बहिष्कार करण्याच्या धमक्या वैगरे दिल्या होत्या असे ऐकिवात आहे. बहुतेक त्यांच्या धमक्यांना दाऊद समर्थित सिनेसृष्टीने 'कुत्र्यांचे भुंकणे' याहून जास्त भाव दिला नसावा. ज्या मुंबईत शेकडों लोक मृत्युमुखी पडले, त्याच मुंबईत अनेक नेता किंवा दरबारात ठुमके लावणारे दाउदच्या आशीर्वादाने निवडणूक जिंकले अश्याही वाच्यता आहेत. (उत्तर प्रदेशातील गवर्नर श्री राम नाईक यांनी तर उघडपणे आरोप लावले आहेत).
यानंतर हि मुंबईत अनेक आतंकवादी घटना घडल्या. २००८च्या हल्ल्यात जनतेसोबत अनेक पोलीस अधिकारी हि मारल्या गेले. तरीही कराचीत बसलेल्या दाऊदचे नियंत्रण आपल्या सिनेसृष्टीवर कमी झाले नाही. आता तर पाकिस्तानी कलाकार हि सिनेसृष्टीत दिसू लागले. पण भारतात काम करीत असताना, इथे घडणाऱ्या आतंकवादी घटनांचा विरोध त्यांनी कधीच केला नाही. विषयांतर होईल, पण मला आठवते, अलिबाबा चालीस चोर मधले चोर हि ज्या घरात दरोडा टाकायचा असेल त्या घरातले मीठ खात नसे. इथले मीठ खाऊन हि, इथल्या आतंकवादी घटनांचा जर पाकी कलाकार विरोध करीत नाही, तर त्यांना इथे काम देण्यात काय अर्थ. खरे म्हणाल तर सिनेसृष्टीने जी मुंबईमध्ये आहे निदान त्यांनीतरी पाकी कलाकारांवर १९९३ नंतरच बहिष्कार टाकायला पाहिजे होता. आपल्या दुर्दैवाचे कारण असलेल्या दाऊदच्या कठपुतली कलाकारांना डोक्यावर घेऊन नाचणारी मुंबईकर/ देशातील सिनेप्रेमी जनतेला काय म्हणावे.
आज काश्मिरात आपले सैन्याचे जवान शहीद झाले. आपल्या देशाचे मीठ खाणार्या पाकी कलाकारांनी या घटनेची निंदा केली नाही. उलटपक्षी पाकिस्तानांत परतून, आपल्या देशाची निंदाच केली, असे ऐकिवात आहे. अश्या पाकी कलाकारांचा बहिष्कार करण्याएवजी, सिनेमा सृष्टीतील सर्व मोठे कलाकार, पाकिस्तानी कलाकारांचे समर्थन करीत आहे. कारण स्पष्ट आहे, हे सर्व कलाकार आतंकवादी मालकाच्या इशार्यावर नाचणाऱ्या बाहुल्या आहेत. पाकी कलाकारांसोबत अश्या बाहुल्यांचा हि बहिष्कार आपल्या सिनेसृष्टीने/ आपण केला पाहिजे, हीच आपल्या शहीद सैनिकांना खरी श्रद्धांजली असेल.
-- विवेक पटाईत
October 1, 2016
कोणता पक्ष सरकारी कर्मचाऱ्यांच्या खाबुगिरीवर नियंत्रण ठेवण्याची हिंमत बाळगून आहे? विशेष गरज नसताना विकासकामातील पैसा वळवून सरकारी कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करण्यात आला. या आयोगाच्या शिफारशी तुर्तास, राज्याची आर्थिक घडी नीट बसेपर्यंत लागू करणार नाही, असे म्हणण्याची हिंमत दाखवू शकतो?
October 4, 2009
Copyright © 2025 | Marathisrushti