वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
सुरुवातीच्या काळात प्रवाशांकडे प्रवासासाठी कंपासही नव्हतं , त्यावेळी यांना अनेक अडथळे प्रवास करताना घ्यायचे. तेव्हा ते अनेक वेगवेगळ्या प्रकारे साधनांचा योग्य तो उपयोग करून प्रवास करायचे . सुरुवातीला दर्यावर्दी हे तेथील ठिकाणाच्या निसर्गा कसा आहे . त्याचा उपयोग करून तेथील ठिकाण ओळखत असे. दर्यावर्दी प्रवाशांसाठी पहिलं महत्त्वाचा साधन म्हणजे आकाशातील ग्रह , तारे असायचे . ग्रहताऱ्यांच्या खानाखुना वरून ते प्रवास करायचे . आकाशातील गोष्टींचा उपयोग करून पुढील डोंगरदऱ्यातून प्रवास करायचे. त्या ग्रहताऱ्यांच्यावरून तिथे कोणता परिसर आहे . याचा ते योग्यरीत्या अंदाज लावायचे . व त्यांचा प्रवास सुखकर करायचे.
August 19, 2022
मंदिराचे दाराशी एका कमानीला नऊ लहान मोठ्या घंटा टांगलेल्या आहेत. त्यांपैकी एका घंटेवर १८५७ असा आकडा कोरला आहे. अर्थात तो इंग्रजीत असून घंटेचा आवाज लोकांना आकर्षित करतो. देवीच्या सभामंडपावर एक शिलालेख दिसून येतो तो असा की एकवीरा देवीचे जुने मंदिर मुंबईचे नागा पोसू वरळीकर आणि हरिप्पा चरणवीर यांनी बाबूराव कुलकर्णी यांच्या मदतीने इ. सन १८६६ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार केला.
June 3, 2025
वेदनेला आणि दुःखाला गळ्याला लावायला कोणाला आवडेल? दुसऱ्यांचं दुःख पाहायला सुद्धा काही लोकांना आवडत नाही. रस्त्यावरच्या भिकाऱ्यांचे दुःखं समजून त्यांनी आणलेली भीक सुद्धा त्यांच्याबरोबर खाऊन त्यांना आपलेसे करणारे व असे काही भिकारी जे अनेक दिवस एका जागेवर सर्व विधी करणारे व त्यामुळे त्यांच्या हातापायांना संसर्ग झालेला असला तरी त्या हाताने खाणारे व संसर्ग हातात नसून मनात असतो असे मानणारे आगळे वेगळे डॉक्टर केवळ त्या भिकाऱ्याविषयी सहानुभूती दाखवत नाहीत तर त्यांच्या वर उपचार करून योग्य त्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून, त्यांनां नातेवाईकांनी सोडले असले तरीही पुन्हा आयुष्यात आणणारे व वेळ प्रसंगी एखाद्याला पुढील आयुष्य जगण्यासाठी स्वतःच्या पायावर उभा करणारे डॉक्टर अभिजीत सोनवणे हे झपाटलेलं व्यक्तिमत्व आजही कार्यरत आहे.
June 27, 2026
स्वप्नांना दृष्टिकोनाची गरज असते. दृष्टीहिनांनीही स्वप्न पाहून इतिहास घडविला आहे. भारतातील सगळ्यात तरुण उद्योजक श्रीकांत बोला २०२१ मध्ये फोर्ब्सच्या ३० अंडर ३० च्या यादीतही त्याला स्थान देण्यात आले आहे. ज्यांना वाटते की, शारीरिक अक्षमता एखाद्या व्यक्तीच्या यशाच्या मार्गात अडथळा ठरू शकते, त्यांच्यासाठी श्रीकांत बोला हे एक आदर्श उदाहरण आहे. श्रीकांत अंध असून ही कोट्यवधींचा मालक झाला आहे. श्रीकांतने हे खरं करुन दाखवलं आहे की, स्वप्न पाहण्यासाठी डोळ्यांची गरज नाही, स्वत:वरील विश्वास तुम्हाला तुमचं यश गाठायला मदत करु शकतो.श्रीकांत बोला याचा जन्म ७ जुलै १९९२ रोजी झाला. आंध्र प्रदेशातील सीतारामपुरम येथील मछलीपट्टणम येथे जन्मलेला श्रीकांत आयुष्याच्या सुरुवातीपासूनच अंध होता. त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही फारशी चांगली नव्हती.
June 23, 2026
नरेंद्र मोदी सरकारने नुकतेच संरक्षण क्षेत्रासंदर्भात नवे धोरण जाहीर केले. या धोरणानुसार परदेशी कंपन्या भारतात शस्त्रास्त्र निर्मितीसाठी शंभर टक्के गुंतवणूक करू शकणार आहेत. हे धोरण चांगले आहे की वाईट जाणून घेण्यापूर्वी सध्याची पद्धत काय आहे ती समजून घेणे आवश्यक आहे. सध्या आपण सैन्यासाठी जी शस्त्रास्त्रे वापरत आहोत त्यापैकी ७० टक्के शस्त्रास्त्रे आयात केली जातात.
June 12, 2014
जगात सुरक्षा आणि संरक्षणासाठी विविध उपाय योजना तयार केल्या व राबवल्या जातात. कोणताही प्रगत देश असो आता पर्यंत यातील कोणतीही यंत्रणा वा कार्यप्रणाली हा ठोस किंवा निश्चित उपाय होऊ शकला नाही. अमेरिका, चीन, ईस्रायल, जपान सारखे देश आजही पर्यायी उपायासाठी चाचपडत आहेत. यावर पुण्यातील शास्त्रज्ञ, टेलीकॉम्युनिकेशन इंजिनिअर तथा माजी तंत्रज्ञान सल्लागार भारत सरकार श्री. दिनकर बोर्डे यांनी तयार केलेल्या “डायल २६११” या परियोजनेमुळे जगाला एक कायमस्वरुपी नागरी, सामाजिक, विभागीय, अंतर्गत, सीमावर्ती, तटवर्ती, अवकाशीय आणि देशीय सुरक्षा आणि संरक्षणासाठीचा ठोस व परिणामकारक उपाय मिळणार आहे
August 9, 2010
एखाद्याची विटंबना करुन कधी कधी एखाद्याला खुप आनंद मिळत असतो. आणि आपल्या सर्वांना हा काही न घेतल्यासारखा अनुभव नाही किंवा अपरिचीत गोष्ट नाही.
July 2, 2020
आता तिसऱ्या प्रकारातल्या दोस्त्यांमध्ये मोडणाऱ्या दोस्तांना दोस्त म्हणणं तितकसं सयुक्तिक नसतं. कारण यामधल्या प्रत्येकाचं मनाने एकमेकांशी काहीही देणं घेणं नसतं. दारू, व्यसनं, या एकाच अजेंड्याखाली सगळे एकत्र आलेले असतात.
August 26, 2022
आश्विदन शुद्ध प्रतिपदेपासून देवीच्या नवरात्राला सुरवात होते. नवमी हा शेवटचा दिवस. दशमीला विजयादशमी किंवा दसरा म्हणतात. सुमारे तीन हजार वर्षांपासून देवीचे नवरात्र करीत असल्याचे संदर्भ आढळतात. आश्विेन महिन्याप्रमाणेच चैत्र महिन्यातदेखील देवीचं नवरात्र असून ते चैत्री पौर्णिमेपर्यंत असते. आश्वििनातील नवरात्रात दुर्गापूजा केली जाते. ही तेजस्वरूपाची, शक्तीची उपासना आहे. या पूजेच्या विविध पद्धती विविध ठिकाणी वेगवेगळ्या आढळतात. या नवरात्राला शारदीय नवरात्र म्हणतात. या नऊ दिवसांतील पहिले तीन दिवस महाकालीचे पूजन, नंतरचे तीन दिवस महालक्ष्मीचे पूजन आणि शेवटचे तीन दिवस महासरस्वतीचे पूजन केले जाते. नवरात्रीदरम्यान श्री दुर्गासप्तशती पाठ, कुंजिका स्तोत्र पठण, कुमारी पूजन, श्रीसुक्तपाठ भजन आदि कार्यक्रम केले जातात. नवरात्र म्हणजे नऊ दिवस असं म्हणतात; परंतु आश्विपन शुद्ध प्रतिपदेपासून महानवमीपर्यंत दुर्गादेवीला उद्देशून करावयाचे पूजन म्हणजे नवरात्र. म्हणून त्याचे दिवस नक्की किती येतात हा प्रश्न नसतो. नवरात्र म्हणजे नऊ दिवस असं आपण बोलतो.
श्री महालक्ष्मी ही मुख्य देवता असून श्री महाकाली, श्री महासरस्वती ही तिचीच प्रासंगिक रूपं आहेत. आदिशक्तीची उपासना मुख्य आहे. परंतु ज्या-ज्या रूपात, ज्या-ज्या ठिकाणी, ती प्रगट झाली त्या-त्या रूपात त्या-त्या ठिकाणी तिची पूजा केली जाते. चंद्रिका, भगवती, दुर्गा, शर्वी, त्रिपुरा, भुवनेश्व-री, श्यातमा, ललिता, चंडी, चामुंडा, शांतादुर्गा इ. नावांनी या त्रिशक्ती प्रसिद्ध आहेत. बंगालमध्ये दुर्गा आणि कालिमाता विशेष प्रसिद्ध आहे. तिथे दुर्गाउत्सव आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते पौर्णिमेपर्यंत साजरा केला जातो.
या दुर्गादेवीचे नऊ अवतार मानले जातात. १) शैलपुत्री, २) ब्रह्मचारिणी, ३) चंद्रघटा, ४) कुष्मांडा, ५) स्कंदमाता, ६) कात्यायनी, ७) कालरात्री, ८) महागौरी, ९) सिद्धीदात्री. या नऊ अवतारांमुळे तिला नवदुर्गा असेही म्हणतात. या नवदुर्गेची अनेक कुटुंबांत पूजा केली जाते.
नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाला स्वत:चे असे महत्त्व असते. पहिला दिवस घटस्थापना, पंचमीला ललितापंचमी म्हणतात. या दिवशी ललिता देवीची पूजा केली जाते. या देवीचे स्तोत्र श्रीमंत आदि शंकराचार्यांनी रचले आहे. अष्टमीच्या दिवशी काही ठिकाणी, विशेषत: देवीक्षेत्रात चंडीहोम करतात. काही कुटुंबांमध्ये अष्टमीला घरीदेखील होम करतात, तसेच देवीसमोर घागरी फुंकणे हादेखील एक पूजाविधी घरी किंवा देवी मंदिरात सामूहिकरीत्या केला जातो. या पूजेला तांदळाच्या पिठीची उकड घेऊन देवीचा मुखवटा तयार करतात. तिची साग्रसंगीत पूजा करतात. नवमीपर्यंत विविध कार्यक्रम नवरात्रात केले जातात. नवमीला खंडेनवमी असेही म्हणतात. या दिवशी अवजारांची, शस्त्रांची पूजा करतात.
सर्वांत महत्त्वाचा आणि पहिला दिवस म्हणजे घटस्थापना होय. नवरात्राच्या वेगवेगळ्या पूजाविधींमध्ये घटस्थापनेला विशेष महत्त्व आहे. यामध्ये वेदिका स्थापना आणि वरूण स्थापना हे महत्त्वाचे भाग आहेत. वेदिका याचा अर्थ शेत असा होतो. या वेदिकेवरच वरुणस्थापना म्हणजे घटस्थापना केली जाते, म्हणूनच घटस्थापनेपूर्वी वेदिका म्हणजे शेत तयार करावे लागते. याच्यासाठी शेतातील किंवा बागेतील माती आणतात. ती पत्रावळीवर किंवा वेताच्या टोपलीत पसरवितात. "वेदिकाय नम:' या मंत्राने शेताची पूजा करतात. त्यानंतर त्या शेतात सात प्रकारची धान्ये हळदीच्या पाण्याने भिजवून सप्तधान्यभ्यो नम: असे म्हणत पेरतात. नंतर पर्जन्याय नम: हा मंत्र म्हणत पाणी शिंपडतात. (शक्यय असल्यास वैदिक पौराणिक मंत्र म्हणावे.) हे सर्व पुरोहित पूजेच्या वेळी सांगतात. परंतु आजकाल बरेचदा गुरुजी मिळू शकत नाहीत अशावेळी आपण हे करू शकतो. ही वेदी तयार झाल्यावर वरुणस्थापना म्हणजे घटस्थापना केली जाते. हा घट मातीचा, तांब्याचा, चांदीचा वापरता येतो. पूर्वी सुवर्णाचादेखील घट वापरला जात असे, परंतु सर्वांना सोपा आणि सहजरीत्या मिळावा यासाठी मातीच्या घटाला मान्यता आहे. घटाला कलशदेखील म्हणतात, त्यामुळेच की काय नवरात्र आहे; याला घट बसलेत असे म्हणण्याची प्रथा बऱ्याच ठिकाणी आढळते. नऊ, पाच अशा विषम संख्येत घट घेऊन उतरंडीप्रमाणे त्याची रचना करून म्हणजे एकावर एक घट ठेवून, त्यावर स्वस्तिक काढतात. देवीच्या मूर्तीपुढे ठेवून त्याचे पूजन करतात. काही ठिकाणी कलशात ताम्हण ठेवून त्यात देवीचे टाक ठेवून, त्याची पूजा करतात. चांदीच्या पत्र्यावरील देवीच्या प्रतिमेला टाक म्हणतात. देवीच्या प्रतिमेवर किंवा घटावर येईल अशाप्रकारे नवरात्रीचे नऊ दिवस फुलांच्या जोड माळा वाहतात. यासाठी झेंडूची किंवा तिळाची फुले वापरतात. ही माळ जोडमाळ नवव्या दिवशीपर्यंत तशीच ठेवली जाते.
माळ तयार करताना रेशीम लोकर वापरली जाते. रिळाचा किंवा सुताचा दोरा वापरायचा असल्यास दोऱ्याला थोडी तेलहळद लावतात. घटावर देवीची स्थापना केली जाते. काही ठिकाणी घटावर नारळ ठेवून प्रतिष्ठापना करतात. देवीजवळ अखंड दिवा लावतात. हा नवरात्र पुजेतील महत्त्वाचा भाग आहे. ही तेलवात नऊ दिवस-रात्र तेवत राहावी यासाठी विशेष प्रकारे बनवली जाते. ती जोडवात एक वीत लांब असते. ती कुंकवाने रंगवतात. समईदेखील जाड धातूची वापरतात. दिव्यावर काजळी जमू नये याची काळजी घेतली जाते.
नवरात्रीच्या दिव्याचे तेलदेखील वेगळ्या भांड्यात दिव्याजवळ ठेवले जाते. या अखंड दिव्याकडे सर्वांचे लक्ष असते. त्या दिव्याचीदेखील पूजा केली जाते.
देवीच्या पूजेसाठी पुरोहित बोलाविण्याची पद्धत आहे. त्यामागील कारण हेच की देवीस्थापना शास्त्रोक्त, तंत्रोक्त पद्धतीने व्हावी; परंतु पुरोहित न मिळल्यास देवीची षोडशोपचारे पूजा करावी. विड्याची देठासकट पाने घेऊन हळद-कुंकवाने अष्टदल किंवा स्वस्तिक काढून त्यावर देवीचा टाक ठेवावा. पानाचे देठ देवाकडे करावे. देवीचे पाय आपल्याकडे येतील अशी मांडणी करावी. नवरात्राच्या दिवसात देवीचे टाक किंवा मूर्ती जागेवरून न हलविता फुलाने पाणी शिंपडून रोज षोडशोपचारे पूजा करावी.
नवरात्रात काही ठिकाणी नऊ दिवस उपवास केला जातो, तर काही ठिकाणी धान्य भाजून स्वयंपाक केला जातो. त्याला धान्य फराळ असं म्हणतात. रोज सकाळ-संध्याकाळ देवीची पूजा-आरती केली जाते. नवमीच्या दिवशी देवीला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखवितात. आपापल्या परंपरेप्रमाणे नवमीस किंवा दशमीस नवरात्र समाप्ती करण्याची पद्धत आहे. समाप्तीच्या दिवशी षोडशोपचारे पूजा करतात. माळ बांधतात. "मात: क्षमस्व' किंवा अंबा क्षमस्व म्हणून देवीवरून ईशान्य दिशेस एक फूल वाहतात. पेरलेल्या वेदिका व घट यांचे अक्षता वाहून विसर्जन करतात. उगवलेल्या धान्याचे अंकुर प्रसाद म्हणून घरात ठेवण्याची पद्धत आहे.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ : डॉ. र. रा. घाटे, पुणे / देवी भागवत स्कंध.
November 7, 2016
सकाळी पंधरा मिनिटात पूजा करून टाकतात आणि दिवसभर मौजमजा. संचितातले पुण्य भसाभस संपत जाते. काही पापही हातून घडत असते. पण मनात सतत अहंकार असतो की मी सकाळी पूजा केली आहे. एक हजार रुपये पगारावर उत्तम संसार होऊ शकतो का?
April 28, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti