वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
अहंतागुणे सर्वही दुःख होते | मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते |
सुखी राहता सर्वही सूख आहे | अहंता तुझी तूचि शोधूनि पाहे ||161||
अहंतागुणे नीति सांडी विवेकी | अनीतीबळे श्र्लाघ्यता सर्व लोकी |
परी अंतरी सर्वही साक्ष येते | पःमाणांतरे बुेि सांडूनि जाते ||162||
देहेबुेिचा निश्र्चयो दृढ झाला | देहातीत ते हीत सांडीत गेला |
देहेबुेि ते आत्मबुेि करावी | सदा संगती सज्जनाची धरावी ||163||
मने कल्पिला वीषयो सोडवावा | मने देव निर्गूण तो वोळखावा |
मने कल्पिता कल्पना ते सरावी | सदा संगती सज्जनाची धरावी ||164||
देहादीक पःपंच हा चिंतियेला | परी अंतरी लोभ निश्र्चीत ठेला |
हरीचिंतने मुक्तिकांता वरावी | सदा संगती सज्जनाची धरावी ||165||
अहंकार विस्तारला या देहाचा | स्त्रियापुत्रमित्रादिके मोह त्यांचा |
बळे भ्रांति हे जन्मचिंता हरावी | सदा संगती सज्जनाची धरावी ||166||
बरा निश्र्चयो शाश्र्वताचा करावा | म्हणे दास संदेह तो विसरावा |
घडीने घडी सार्थकाची करावी | सदा संगती सज्ज्नाची धरावी ||167||
करी वृत्ति जो संत तो संत तो संत जाणा | दुराशागुणे जो नव्हे दैन्यवाणा |
उपाधी देहेबुेिते वाढवीते | परी सज्जना केवि बाधू शके ते ||168||
नसे अंत आनंत संता पुसावा | अहंकार विस्तार हा नीरसावा |
गुणेविण निर्गूण तो आठवावा | देहेबुेिचा आठवो नाठवावा ||169||
देहेबुेि हे ज्ञानबोधे त्यजावी | विवेके तये वस्तुची भेट घ्यावी |
तदाकार हे वृत्ति नाही स्वभावें | म्हणोनी सदा तेचि शोधीत जावे ||170||
- श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)
January 22, 2016

इतिहासाचा शोध घेताना त्यासंबंधीच्या प्रत्येक वस्तूला महत्त्व द्यावं लागतं. कारण, ती वस्तू म्हणजे भूतकाळ आणि भविष्यकाळ यांना जोडणारा दुवा असते. एका संशोधकाला, चोवीस शतकांपूर्वीच्या इतिहासाशी नातं सांगणारा एक दुवा सापडला आहे. हा दुवा म्हणजे चक्क एक थडगं आहे. पण हे थडगं सामान्य व्यक्तीचं नाही. हे थडगं आहे ते पुरातन काळच्या ग्रीक साम्राज्यातल्या ॲथेन्सचा प्रख्यात तत्त्वज्ञ ॲरिस्टोटल याचं!
December 13, 2022
मोबाईल फोनच्या वापरामुळे बलात्कार आणि विनयभंगाच्या घटनांत वाढ होत असल्याचा निष्कर्ष काढून कर्नाटक विधानसभेच्या एका समितीने मोबाईल फोनवर बंदी घालण्याची शिफारस सरकारकडे केली आणि देशभरात …..
July 13, 2014
तुम्हाला कदाचित हे ऐकून नवल वाटेल की आजच्या धकाधकीच्या काळात पुरूषांच्या तुलनेत महिलांना मधुमेहाचा धोका अधिक प्रमाणात आहे. हल्लीची जीवनशैली, तणाव आणि लठ्ठपणा यांसारख्या कारणांमुळे हल्लीच्या जवळ जवळ सर्वच वयोगटातल्या महिलांमध्ये मधुमेहाची लक्षणं जास्त आढळून येत आहेत.
May 10, 2019
गुरुतत्त्व कधी, कुठे, कसे आणि कोणत्या स्वरुपात प्रकट होईल हे सांगता येत नाही. घरच्या बकऱ्या, मेंढ्या जंगलात चरायला नेणारा धनगर कुटुंबातील लहानगा मुलगा अंगभूत कर्तृत्वाने पुढे मोठा होऊन जगाच्या कल्याणासाठी धनगर समाजातील रूढी व अनिष्ट विकृतीच्या मार्गाने जाऊ पाहणाऱ्या समाजाला सन्मार्गावर आणले. ३ ऑक्टोबर १८९२ रोजी बेळगावनजीक चिक्कोडी तालुक्यातील “अक्कोळ” या खेडेगावात गुरुतत्त्व अवतरले. मायाप्पा-सत्यवा या पतीपत्नीचे अवघे आयुष्य समृद्ध झाले. सध्याच्या कागल-निपाणी राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या “आप्पाची वाडी" या खेडेगावातील “सत्यवा” हिला बालपणपासून पंढरीच्या विठूरायाची ओढ होती. घरचे वातावरण आध्यात्मिक होते. सत्यवा नित्यनेमाने एकादाशीचे व्रत करीत असे आणि विठ्ठल भजनात दंग राहत असे. पुढे सत्यवाचा विवाह मायाप्पासोबत झाला. धनगर कुटुंबात “सून" म्हणून दाखल झालेली सत्यवा लवकरच सासरच्या रीतिभातीमध्ये रुळली आणि भैरु, बाळू आणि भीमाप्पा या तीन लेकरांना जन्मास घालून तिच्या संसाराला पूर्णत्वही देती झाली.
थोरला आणि धाकला लेक चारचौघांसारखे असले तरी मधला बाळू मात्र त्याच्या विचित्र वर्तनाने अवतीभवतीच्या सर्वांचे लक्ष वेधून घेत असे. मातापिता-भावंडे-गणगोत-सवंगडी अन ग्रामस्थां पासून फटकून असलेला, कुणाच्या आल्या-गेल्यात नसलेला, एकांतवास प्रिय मानणारा आणि सदोदित स्वतःमध्येच मग्न राहणारा बाळू घरच्यांसाठी आणि गावकऱ्यांसाठीही चिंतेचा विषय बनला होता. त्याला लोक खुळ म्हणायचे.
आपला गुलगा इतर मुलांसारखा वागावा, राहावा यासाठी मायाप्पांनी त्यास गावातील चंदूलाल शेटजी जैन यांच्याकडे नोकरीस ठेवले. शेटजींच्या घरच्या बकऱ्या जंगलात चरावयास नेण्याचे काम बाळूवर सोपवण्यात आले. बाळू त्याचे काम व्यवस्थित करीत अतला तरी अनेकदा बाभळीच्या इतस्तहा पसरलेल्या झाडाची गादी करून त्यावर झोपत असे. बाभळीच्याच काटेरी जाळीदार कुंपणाला तो खुशाल टेकून बसत असे आणि इतकेच नव्हे तर त्यावर आरामात बसून “ही माझी खुर्ची आहे" असे सांगत असे. तिथून गुरुण दमदाटी करून उठवल्यास जवळच्याच एवाद्या झाडावर चढून उंच ठिकाणी बसत असे आणि "हे माझे शिखर आहे" असे सांगत असे.
“बाळु" मधील ईश्वरी अंशाची जाणीव त्याला स्वत:ला जरी पुरेपूर असली तरी इतर कुणाला असणे निव्वळ अशक्य होते. कधी कधी मनस्वी बाळू अनाकलनीय वर्तन करीत असे. स्वतःवर आसुडाचे फटकारे मारणे, तर कधी अल्लड, खेळकर, गमत्या स्वभावाने बघ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणे यामुळे हे एकलकोंडे, मनस्वी पोर गावकऱ्यांसाठी एकाच वेळी चेष्टेचा आणि कौतुकाचाही विषय होते. चंदूलाल शेटजींच्या गोठ्यातील एका कोपऱ्यामध्ये बाळू निवांत पडून रहात असे. शेटजींनी दिलेल्या फुटक्या थाळीत जेवत असे आणि जेवून झाले की, थाळी घासून पुसून स्वच्छ करुन ठेवत असे.
एकदा सहजच गोठ्यामध्ये गेलेल्या शेठजींच्या आईला बाळूच्या थाळीतून तेजस्वी प्रकाश परावर्तित होत असल्याचे दिसून आले. कुतूहलाने ती थाळी उचलती झाली तेव्हा थाळीच्या मध्यभागी पडलेल्या भोकातून तिला थाळीच्या पलीकडे तिच्या बस्तीचे (जैन मंदिराचे) दर्शन घडले. बाळु हा लग्न झाल्यावर सुधारेल म्हणून दरम्यान, मायाप्पा आणि सत्यावा यांनी बाळूचे लग्न लावून दिले. बाळू वरकरणी संसारात रमला असला तरीही त्याच्या अंतर्यामीचे गूज काहीतरी वेगळेच सांगत होते याचे कारण आता बाळूचा प्रवास "बाळूमामा” होण्यापर्यंतची वेळ नजीक येऊन ठेपली होती. योग्य त्या वेळी बाळूमामांना गुरुप्रात्पी झाली. श्री मुळे महाराजांच्या चरणकमलांचे दर्शन घडले आणि त्याच वेळी बाळूमामांच्या अतर्क्य- अवधूतस्वरूपी वागण्याला सांप्रदायिक शिस्तीची झालर लाभली. बाळूमामांची गुरुपरंपरा श्रीदत्त - श्रीनृसिंहसरस्वती - श्री स्वामी नारायण महाराज - श्रीमैनी महाराज (पाटगाव) आणि मुळे महाराज अशी होती. श्रीगुरुंचा अनुग्रह लाभल्यावर बाळूमामांचे आध्यात्मिक जीवन विलक्षण तेजाने झळाळून उठले. स्वस्वरूपाची ओळख झाली.
दिवसरात्र भजनामध्ये रममाण होणे, विविध तीर्थक्षेत्री भेट देणे, अन्नदान करून भोजनाच्या पंक्ती उठवणे, दर्शनार्थींना त्यांच्या अडी अडचणींवर मार्गदर्शन करणे, नामजपाचा महिमा सर्वदूर पसरविणे भोळ्याभाबड्या भक्तांमधील अंधश्रद्धा, अनिष्ट चालीरीती आणि रुढी-परंपरेमागील अवैज्ञानिक दृष्टिकोन यावर बाळूमामा लोकांना जागृत करीत असे. सामाजिक दंभाविषयी त्यांना विलक्षण तिटकारा होता. दरम्यान, बाळूमामांचे सांसारिक जीवन संपुष्टात आले. तेव्हापासून पंचक्रोशीतील गावांपासून दूर अंतरावर असलेल्या तीर्थक्षेत्र भेटीला बाळूमामा जात असे.
बाळूमामांच्या सहज बोलण्यातून-वागण्यातून अनेक लीला घडत असे. त्यांच्या हातून कळत-नकळत घडलेल्या अनेक चमत्कारांमुळे अनेकांचे जीवन ध्यान्य झाले. कित्येकांचे आयुष्य बहरास आले. कित्येकांच्या भौतिक समस्या दुर. मात्र “जे काही घडत आहे ते सारे विधिलिखित आहे, आपण केवळ निमित्त मात्र आहोत.” असे बाळूमामा सांगत असत. त्यांनी कोणत्याही यशाचे श्रेय स्वतःकडे कधीच घेतले नाही.
स्वच्छ धोतर, पूर्ण वाह्यांचा शर्ट, डोक्यावर रुमाल, पायात चामडी चपला, हातात धनगरी काठी, सडपातळ उंचपुरी देहयष्टी, सावळा वर्ण असलेले बाळूमामा कानडी व मराठी भाषा अस्खलीतपाणे बोलत, तर खेडूत मंडळींशी खेडवळ भाषेत बोलत असत. नीटनेटकी राहणी, गमतशीर बोलणे, भजन-कीर्तनाची आवड ही विशेष ओळख असलेले बाळूमामा प्रत्येकालाच आपलेसे वाटत. त्यांना वाचासिद्धी आणि योगसिद्धी प्राप्त होती. बाळूमामांनी त्यांच्यातील देवत्व कधी उघड केले नाही. बाह्य वर्तनावरून त्यांच्यातील सिद्ध सत्पुरुषाचा अंदाज बांधणे कठीण जात असे. माणसाने माणससारखं वागावं ही त्यांची शिकवण होती. “अखंड नामस्मरण" आणि "रामकृष्णहरी " चा जप हा साधासोपा मूलमंत्र प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये रुजविणारे संतश्रेष्ठ बाळूमामा ४ सप्टेंबर १९६६ रोजी आदमापूर येथे त्यांनी देह विसर्जित करते झाले.
–श्री संतोष शामराव जोशी
साभार – गुरुतत्व मासिक, वर्ष २ रे, अंक १२ वा, (अंक २४)
September 29, 2022
सध्या बीचवर फिरायला जायचे मोठे फॅड आहे. मजा करा पण थोडी स्वत:च्याजीवाचीही काळजी घ्या. या सूचना वाचा आणि अमलात आणा…
June 6, 2017
एक चिमणी एका शहरात रहात होती. तिच्या सोबत तिची मुलगी, म्हणजेच छोटी चिमणी (चिऊताई) सुद्धा होती. कधी एखाद्या बिल्डिंगच्या खिडकीच्या कोपर्यात त्यांचा निवास असायचा, तर कधी एखाद्या पाईपमध्ये.
March 15, 2020
सरकारची बहुप्रतीक्षित कर्जमाफी अखेर घोषित झाली आणि अपेक्षेप्रमाणे ती प्रचंड गोंधळाच्या स्वरूपात राहिली. साठ हजार कोटींच्या या कर्जमाफीमुळे चार कोटी शेतकरी लाभान्वित होतील असा सरकारचा दावा आहे, प्रत्यक्षात साठ लाख शेतकरी तरी कर्जमुत्त* आणि चितामुत्त* होतील की नाही याचीच शंका आहे. आत्महत्याठास्त भागातील शेतकऱ्यांना एकवार कर्जमुत्त* करावे ही मागणी सुरुवातीला 2001 सालापासून आम्हीच लावून धरली.
March 9, 2008
श्री गणेशा नमुनी तुला
नंतर नमितो कुलस्वामिनीला
मातापूरवासिनी रेणूकेला
कृपा प्रसादे ।१।
तुझा महिमा असे थोर
दुःख नष्ट होती सत्वर
कृपा करिसी ज्याचेवर
पावन होत असे ।२।
गणेश जन्मकथा सांगतो
तयाचा महिमा वर्णितो
आनंदीभाव समर्पितो
तुम्हासाठी ।३।
सर्व दुःखे दुर कराया
तुम्हांसी सुखे द्यावया
जन्म घेती गणराया
तुम्हां करिता ।४।
असतील देव अनेक
देवाधीदेव महादेव एक
सर्व विश्वाचा अधिनायक
तयामध्ये कैलासपती ।५।
शिवपत्नी पार्वती
रही कैलास पर्वतीं
माता जगताची ती
उमादेवी ।६।
उमाशंकर मिळून
सर्व जगाते सांभाळून
कैलासावरी राहून
पालनपोषण करताती ।७।
एके दिनी सकाळी
पार्वति निघाली अंघोळी
पुष्पे घेऊन निरनीराळी
पुजेसाठी ।८।
आनंदी उमादेवी
शिवप्रतिमा मनी वसवी
अंतःकरणी ती रमवी
रुप सदाशिवाचे ।९।
स्नानास निघाली पार्वती
पूजासाहित्य बाहेर ठेवती
मनी विचार करि
प्रेमभरे ।१०।
बेसोनी स्नानघराबाहेर
मनींते बहूत विचार
विचारांना देती आकार
आनंद रुपे ।११।
हाळद घेतली हातीं
चंदन मिश्रीत गोळी करी ती
बाळरुप प्रतिमा बनविती
तयापासून ।१२।
जगन्माता पार्वती
विश्वाची श्रेष्ठ शक्ति
कोतुके बाळ पाहे ती
हर्षभरे ।१३।
सचेतन केला बाळ
प्रेमे आलिंगुनी जवळ
घालितसे पुष्पमाळ
कंठी ज्याचे ।१४।
बाळाचे तेज निराळे
सुवर्णापरी रुप आगळे
तयाचा महिमा कुणा न कळे
पार्वतीविणे ।१५।
धावूं लागला छोटा बाळ
आनंदून गेली उमा सकळ
शिरी बांधली पुष्पमाळ
पार्वतीने ।१६।
बाळासंगे खेळली
स्नानाची तिज आठवण झाली
सांगतसे माय माऊली
बाळाते जवळी घेवूनी ।१७।
तू एक काम करावे
दारापाशी बसून राहावे
आंत कुणा येवू न द्यावे
आज्ञा माझी ।१८।
आनंदे लागला बागडूं
कुणासंगे ही लढू
परत जाण्या भाग पाडू
ह्या विचारी ।१९।
आज्ञा केली मातेने
पाळीन मी आनंदानें
रोकीन तयाते बळजबरीनें
बाळ बोले ।२०।
छोटे शस्त्र हाती देऊनी
पार्वती सांगे समजावूनी
वाट तयाची रोकूनी
धराविसी ।२१।
पार्वती गेली स्नानासी
बैसवुनी बाळा द्वारासीं
द्वारपाल तो बनलासी
बाळ माझा ।२२।
बाळ आनंदे फिरु लागला
तिकडून शिव आला
स्नानगृही जाऊ लागला
बाळ रोके त्यासी ।२३।
हांसु लागला बाळ बघोनी
कौतूक तयाचे करुनी
प्रेमभरे जवळ घेऊनी
सदाशिवे ।२४।
शिव चालला स्नानगृहात
बाळ त्याला रोखीत
तुम्ही न जावे आंत
सांगे बाळ ।२५।
प्रथम त्याचे कौतूक केले
आंत सोडण्या विनविले
वाकून बाळ आलिंगले
विश्वनाथे ।२६।
कोप आला शिवासी
पाहूनी बाळ हट्टासी
त्याच्या विरोधासी
बघुनिया ।२७।
बाळ असूनी लहान
मुर्ति गोंडसवानी छान
जगन्मातेची शक्ति अंगिकारुन
प्रतिकार करु लागला ।२८।
बाळाअंगी पार्वतीचे बळ
म्हणून झाला निश्चयी अवखळ
कांही सुचेना तये वेळ
विश्वेश्वरासी ।२९।
असे तो जगनेमातेचे बाळ
तयामध्ये विश्वाचे बळ
कठीण वाटली शिवे ती वेळ
तयासी पाहूनी ।३०।
बाळ हट्टाने पेटून
शिवाचा करिती अपमान
द्वारी त्याना रोखून
अडवितसे ।३१।
राग येवू लागला मनीं
समज न येई बाळा सांगुनी
संताप आला तत्क्षणी
क्रोधाग्नी पेटला ।३२।
हांती घेऊनी त्रिशूळ बनता बाळाचा काळ
शिरच्छेद केला तत्काळ बाळाचा ।३३।
बाळ पडला धारातीर्थी
धडावेगळे शरीर होती
तत् क्षणीं निश्चेष्ट पडती
जमिनीवर ।३४।
पार्वती आली बाहेरी
नजर आता बाळावरी
दुःख होतसे मनावरी
मृत बाळ बघूनिया ।३५।
एकदम निराश झाली
सारी स्वप्ने धुळीस मिळाली
हूरहूर मनी लागली
पार्वतीस ।३६।
शोक न तिजला आवरे
मृत बाळ बघूनी गोजिरे
ज्या पाही ती प्रेमभरे
पार्वती देवी ।३७।
खिन्न मनाने बैसली
दुःखाश्रु पडती खाली
अत्यंत निराश झाली
उमादेवी ।३८।
शिव झाले शांत
बघूनी उमेचा आकांत
तियेसी देवूनी हात
उठवितसे ।३९।
बघूनी शिवाचे शांत रुप
गेला होता त्यांचा कोप
सोडूनी द्यावे मनातील ताप
पार्वती बोले ।४०।
माझ्या बाळा जीवदान द्यावे
त्याच्या बालहट्टा क्षमावे
विनवितसे जीवेभावे
पार्वतीदेवी ।४१।
स्तुती केली ईश्वराची
पूजा करुनी शिवाची
विनंती करिसी त्याची
बाळप्राणा ।४२।
बघूनी पार्वतीभक्ति
पावला उमापती
बाळासी जीवदान देती
सदाशिव ।४३।
आज्ञा केली शिवगणा
कैलासतील जावे वना
दिसेल प्राण्याचे शिर आणा
प्रथम दर्शनी ।४४।
गेले आनंदे शिवदूत
शिर मिळवण्या वनांत
बघितला छोटा ऐरावत
सरोवरी बागडतसे ।४५।
गजराजाचे शिर छाटले
घेवूनी शिवदूत आले
शिवचरणी अर्पिले
ऐरावत शिर ।४६।
उठवोनी बाळ शरीर
घेऊनी गजराजाचे शिर
ठेवती तयाचे वर
बाळाचे शरिरी
शिवशक्ति प्राण घातले
पूर्ववत् ते सचेतन पावले
मानवी देही दिधले
गजराज शिव ।४७।
नवीन बाळ जन्मास आले
गजशिर मानव देह दिधले
माता-पित्यास वंदन केले
बाळ राजे ।४८।
शिवपार्वतीचे बाळ जाहले
गजानन तयाचे नांव ठेवले
शिवदूतें कौतूक केले
गणेशाचे ।४९।
शिवपार्वतीची अपूर्व शक्ति
गणेशाते मिळती
दोन्ही तेज एकरुप होती
गणेशामध्ये ।५०।
महादेव आशिर्वाद दिधला
गणेशाते श्रेष्ठ ठरविला
प्रथम पुजा मान तयाला
सर्व देवांमाजी ।५१।
प्रथम पुजा श्री गणेशाची
कार्ये होतील सार्थ नंतरची
हीच असेल प्रथा पूजेची
आज्ञा केली शिवे ।५२।
सर्व संकटे निवारसी
कार्ये नेती सिद्धीसी
दुःखापासून मुक्त करिसी
गणेश कृपें ।५३।
विघ्नहर्ता सुखकर्ता गणपती
कार्ये निर्विघ्न पार पडती
सुख समृद्धी घरी नांदती
त्यांचे आशिर्वादे ।५४।
तू होशील ज्ञानदेवता
सकळजण तुज वंदिता
प्रसन्न होऊनी ज्ञान देता
विद्वान होतील ।५५।
श्री गणेश जन्मसोहळा
सर्वाना भासे आगळा
आकाशातून वाहती पुष्पमाळा
सर्व देव मिळूनी ।५६।
पुष्पांची वृष्टी केली
पृथ्वीमाता पावन झाली
तिच्यावरील दुःखे शमली
श्री गणेशामुळे ।५७।
गणेश दैवत सुख समृद्धीचे
ज्ञानविज्ञानाचे
कार्य सिद्ध करिसी सर्वांचे
प्रथम मान तुला ।५८।
गणेश दैवत सुखसमृद्धीचे
ज्ञानविज्ञानाचे
कार्य सिद्ध करीसी सर्वांचे
प्रथम पुजामान तुला ।५९।
वंदन तुज गणराया
सर्वांचे भले कराया
सर्व समभाव मनीं यावया
कृपा करावी ।६०।
रोज एकदा स्त्रोत्र म्हणूनी
एकविस दुर्वा लाल फूल वाहूनी
गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवूनी
गणेशा पूजावे ।६१।
नित्यनियमे पठन करावे
चतुर्थीला एकविस आवर्तने
भक्तिभाव मनीं ठेवणे
भक्तासि पावतसे ।६२।
भाद्रपदमासे शुक्लपक्षे चतुर्थीला
श्री गणेशाचा जन्म जाहला
आनंदे सण उत्सावूं लागला
सकळजन ।६३।
।। शुभं भवतू ।।
डॉ. भगवान नागापूरकर
२- ०८०८८३
January 1, 2018
रामायणातील खलनायक म्हणून रावणाला ओळखले जाते. रावणाची ही एक वेगळीच ओळख वाचा
November 7, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti