वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आपल्याला स्वतःला बदलण्याची आवश्यकता आहे. ब्लेम गेम कितीही खेळले तरी हार मात्र आपलीच होते. म्हणून प्रत्येक परिस्थिती, व्यक्ति.. .. सर्वांकडून शिकून पुढच्या वर्गात जाण्याचा प्रयत्न करावा.
September 1, 2021
जे जे स्कूल ऑफ आर्टस मध्ये असताना मला 1984 ला अंतरराज्य फोटोग्राफी स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक मिळाले. दिल्ली येथे माझी फोटोग्राफी प्रदर्शनासाठी महाराष्ट्र राज्याने खास निवड केली. दिवस होता 28 ऑक्टोबर 1984 प्रदर्शनाचा विषय होता प्रौढ शिक्षा. या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यासाठी आल्या होत्या त्या वेळेच्या माननीय पंतप्रधान इंदिरा गांधी. त्यावेळी प्रत्येक राज्यातून आलेल्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन गौरव केला गेला. त्यात माझा समावेश होता
June 16, 2026
जगण्याची साधी सोपी सूत्रे - एकशे चौपन्न
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - भाग तेरा
सांगेन गोष्टी हिताच्याच चार - भाग बारा
जगण्याचे साधे सोपे नियम सांगताना ग्रंथकार पुढे म्हणतात,
बुडण्याचा भय असेल, अशा छिद्र असलेल्या किंवा फुटक्या नावेत बसू नये, किंवा जे झाड पडणारे असते, त्यावर चढू नये.
यात आपलेच नुकसान होणार हे नक्की असते.
आजच्या काळानुसार जी बॅक बुडणारी आहे, त्यात पैसे ठेवू नयेत, किंवा कमी काळात दाम दुप्पट वगैरे फसव्या योजनेत पैसे गुंतवू नयेत. मल्टीलिंक मार्केटिंग हा परदेशी फंडा आहे. आपली गुंतवणुक सोडवून घेण्यासाठी दुसऱ्याला आत गुंतवायचे असा सरळ सरळ अर्थ म्हणजे एम एल एम.
कमी पाणी असलेल्या एका विहिरीत पडलेल्या बोकडाला वर येण्यासाठी, एक बोकड धडपडत असतो. पण वर येता येत नाही. "व्वा, पाणी किती गोड आहे, पिऊन तर बघा !" असे आमिष इतरांना दाखवल्यावर, काठावरून जाणाऱ्या दुसऱ्या बोकडाला, पाणी चाखून बघावेसे वाटते. म्हणून दुसरा बोकड इतर कोणताही विचार न करता, आत उडी मारतो. त्याच्या डोक्यावर पाय ठेवून पहिला बोकड केव्हा विहिरीबाहेर पडतो, ते दुसऱ्याला कधी कळतच नाही, मग तीच युक्ती दुसरा बोकड, तिसऱ्या बोकडासाठी वापरतो याला म्हणतात, मल्टी लिंक !
यात प्राॅडक्ट म्हणून काहीही साधन वापरले जाऊ शकते. मग ती बदकाच्या पिसाची गादी असेल, नाहीतर भादरलेल्या बोकडाची दाढी असेल, नाहीतर एखादे लाॅकेट असेल वा लोहचुंबक असेल, खेळण्यातली गोल्डन डाॅल असेल वा एखादे दंतमंजन असेल. झटपट पैसे मिळवण्यासाठी काहीही फंडे वापरले जातात, पश्चात ताप होऊ नये, यासाठी सावध तो सुखी, हे सूत्र लक्षात ठेवावे.
मातीचे ढेकूळ, दगड वा फळ मारून, (आपल्या किंवा इतरांच्या ) झाडावरचे फळ तोडू नये.
हा मारलेला दगड परत आपल्याच डोक्यावर पडण्याचा संभव असतो, वा कुणाचे तरी नुकसान करणारा असतो. कुणा व्यक्तीचे नाही झाले तरी झाडाचे नक्कीच होते. गरज नसताना दुसरे कच्चे फळ पडणे, झाडावरील घरट्यातील पक्ष्यांच्या पिल्लांना धोका पोचणे, किंवा पलीकडील घराची कौले फुटणे यापैकी काहीही होऊ शकते. अगदीच काही नाही झाले तर असा शेजारी किंवा झाड मालक जेव्हा पाठ धरून बोंबलत येतो तेव्हा सैराट होऊन धावताना आपल्याला इजा होऊ शकते.
परवानगी घेऊन अथवा न घेता कोणाच्याही घरात, दाराचा वापर न करता अन्य मार्गाने घुसू नये.
दुसऱ्याच्या घरात आपण एकट्यानेच कोणाला सांगितल्या शिवाय, किंवा कोणी सांगितल्याशिवाय खुर्चीवर वा उच्च आसनावर बसू नये.
नंतर खुर्ची सोडावी लागली तर ते दुसरे दुःख कोणते नसते. विशेषतः व्यासपीठावर बसणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे.
झोपी गेलेल्यास उठवू नये, हे पण ग्रंथकार लिहितात. पण ही सूचना शाळा काॅलेजमधे वर्गात झोपा काढणाऱ्यांसाठी सांगितलेली नसून, अति श्रमाने जो दमलेला आहे, किंवा ज्याला खरोखरच विश्रांतीची गरज आहे, अशा मंडळींकरीता आहे हे सूज्ञांनी लक्षात घ्यावे.
रात्रभर वाॅटसप चालवून दमल्याभागल्यांसाठी हा नियम लागू होत नाही. अशा मंडळीना उठवताना नाकी नऊ येतात. यांना उठवण्यासाठी हळुच यांच्या कानात म्हणावे, "मोबाईलला लाॅक टाकायला विसरला आहेस, की स्वारी टुणकन उठून बसेल बघा !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
१२.०९.२०१७
September 12, 2017
जेव्हा कॅरमबोर्डावरच्या सोंगटीला आपण स्ट्रायकरचा वापर करून ढकलतो तेव्हा काय होतं हे बारकाईनं पाहिलं आहेत कधी?
September 21, 2011
आजची तरुण पिढी व लहान मुले पाण्याऐवजी कारबोनेटेड शीतपेय आवडीने पिताना दिसतात. अशा पेयात मोठ्या प्रमाणात पाण्याबरोबर इतर अनेक द्रव्ये असतात. शरीरात घडणाऱ्या प्रत्येक लहान मोठ्या प्रक्रियेसाठी योग्य प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. ही पाण्याची गरज इतर कोणतेही पेय भरून काढू शकत नाही. आपले शरीर पाण्याचा साठा करून ठेवू शकत नाही.
June 14, 2023
प्रभो नाम तुझे । विंझाई । सगुण रूप तव आई ।
भत्त* कैवारी । महिमा हा । गाती सर्व ही आई ।।धृ0।।
प्रभो नाम तुझे ।
निर्गुण परब्रह्य । अनाद्य । अनामवासी आद्य ।
विंद्यवासिनी । अवतीर्ण । परब्रह्याते स्फुरण ।।
ऋृषी माकर्ंडेय । अत्रेय । ब्रह्यानन्दी दंग ।।1।।
प्रभो नाम तुझे ।।धृ।।
पुर्ण चैतन्य । प्रेमळे । शशि सूर्याहून आगळे ।
कोटी रविचे । तेजासी । न लागे तुलनेसी ।।
देव नारदा । सदानन्द । चित्ती ब्रम्हानन्द ।।2।।
प्रभो नाम तुझे ।।धृ।।
वाघावर बैसे । अष्टभुजा । स्वरूप सुन्दर अनुजा।
विंध्यवासिनी । विझाई । ताह्मिणीची आई ।।
गणेश सुताला । आनन्द देई नित्यानन्द ।। 3।।
प्रभो नाम तुझे ।।धृ।।
गायीका - वृषाली घाणेकर
October 15, 2015
तरन्नुम या सौंदर्यवती बारबालेच्या आलिशान फ्लॅटवर धाड पडली आहे .एक कोटींची रक्कम ,सोनाटा गाडी , कित्येक लाखांचे दागिने हे सगळं अचानक एका रात्रीत तिला गिफ्ट करणारा कॅबिनेट मंत्र्याच्या मुलाचे फोटो … बातमी लीक झाली आहे आणि ती कव्हर करण्यासाठी इलेट्रॉनिक्स मीडिया टपून बसला आहे .
May 25, 2025
ATM मधून पैसे काढताना सावध रहायला पाहिजे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. खोट्या किंवा duplicate नोटा मिळण्याचा धोका या ATM मध्ये वाढलाय आणि अशा खोट्या नोटा मिळाल्यावर कोणाकडे तक्रारही करण्याची सोय राहिली नाही.
September 27, 2010
एकदा एका शेतकऱ्याने थेट इंद्रदेवाकडे धाव घेऊन आपल्यावरील अन्यायाविरुद्ध दाद मागितली. त्या शेतकऱ्याचा आरोप होता की, पर्जन्याचा स्वामी असलेल्या इंद्राला मुळात पाऊस केव्हा, कुठे आणि कसा पाडावा याचे प्राथमिक ज्ञानदेखील नाही. जेव्हा पिकाला पाण्याची गरज असते तेव्हा आकाशात एकही ढग नसतो आणि जेव्हा उघाड पाहिजे असते तेव्हा धो-धो पाऊस कोसळतो.
September 18, 2005
मला एक प्रश्न पडलाय…..उत्तर सापडलं, माझ्या पुरतं पटलं देखील……तरी पण एकदा तुमचंही मत घ्यावं म्हणून तुम्हालाही विचारतो..
“महाराष्ट्राचं दैवत.. प्रौढ प्रताप पुरंदर.. क्षत्रिय कुलावतंस.. सिंहासनाधीश्वर..गो ब्राम्हण प्रति पालक.. राजाधीराज ‘छत्रपती’ शिवाजी महाराज” यांच्या उपाधीतील ‘छत्रपती’ हा शब्द, ‘छत्रपती’ की ‘क्षेत्रपती’..?”
February 12, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti