वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
काचेतून आरपार निघून जाणार्या किरणांचं प्रमाण कमी करून तिच्यावरून परावर्तित होणार्या किरणांचं प्रमाण वाढवलं तर त्या काचेचा आरसा बनतो, हे ध्यानात आल्यावर मग काचेचं तसं रुपांतर करण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले. काचेच्या पाठी जर एखादा पदार्थ बसवला तर आरपार गेलेल्या किरणांना परत उलट्या दिशेनं वळवता येईल, हे तर स्पष्टच होतं.
June 24, 2011
साबण वापरत असलो तरी साबण व डिटर्जंट यात फरक असतो. साधारणपणे डिटर्जंट म्हणजे आपण कुठलीही गोष्ट धुण्यासाठी जे रसायनयुक्त द्रव वापरतो त्याला डिटर्जंट असे म्हणतात. ग्रीस किंवा इतर कुठलेही चिकट डाग त्यामुळे निघतात.
November 4, 2023
लॅबची कमाल, रिपोर्ट ची धमाल भाग 4
आपण अवलंबून रहात असलेल्या रिपोर्ट मधला फोलपणा आपल्याला काही वेळा दुसरे निदान करायला भाग पाडतो. निदानच बदलले तर चिकित्सा पण बदलत जाते, पथ्यपाणी बदलते.
आयुर्वेदाचा एखाद्या रोगाच्या चिकित्सेमागील दृष्टीकोन लक्षात यावा यासाठी हे लिहितोय.
म्हणून वैद्य जेव्हा रूग्णांची तपासणी करतात, तेव्हा रिपोर्ट तपासणे, हा कार्यक्रम सगळ्यात शेवट पार पाडतात. पण रूग्णांना काय कौतुक असते, रिपोर्ट दाखवण्याचे ! एवढ्याऽऽऽऽऽ तपासण्या केल्यात ! ही एवढी फाईल. ज्याचा खरंतर त्यावेळेस काऽऽही उपयोग नसतो.
हे सर्व रिपोर्ट का करायचे, तर त्यावेळेस रुग्णाची काय परिस्थिती होती, एवढंच समजण्यासाठी. तो रिपोर्ट " असा " का आला याचे उत्तर मात्र कोणाकडेच नसते. तो आत्ताच असा का आला, याचेही उत्तर कोणाकडे नसते. हे कमी आहे, आणि हे वाढले आहे, त्यासाठी आमच्याकडे हे औषध आहे, हे उत्तर मात्र सगळ्यांकडे असतं. फक्त कंपन्यांची नाव फक्त बदलतात. एवढंच !
आयुर्वेदात अश्या काही प्रयोगशालेय चाचण्या सांगितलेल्या नाहीत का ?
आयुर्वेदातील सारे निष्कर्ष हे संशोधनाअंतीच लिहिलेले आहेत. "इदं आगमसिद्धत्त्वात्" असे ग्रंथकर्ते स्पष्टपणे सांगतात. ते म्हणतात,
" हे आम्ही यापूर्वी तपासून बघितलेले आहे, आता यावर पुनः डोके खर्च करू नका. यापुढील संशोधन करा."
त्वचेची, रक्ताची रंग परीक्षा, लघवीची तेलबिंदू परीक्षा, मलाची परीक्षा करून निदान कसे करावे, हे सुस्पष्ट पणे मांडून ठेवलेले आहे. काळाच्या ओघात यातील काही तपासण्या मागेच राहिल्या, त्यातील मुत्राच्या तैलबिंदू परिक्षणा सारख्या परीक्षांचा वैद्यांनी पुनः अभ्यास करायला हवाय.
थोडं विषयांतर होतंय, पण मनात आलं ते लिहून टाकतो,
कावीळ झालेली नाही, काविळीचे एकही लक्षण रूग्ण सांगत नाही. पण रिपोर्टमधे कुठेतरी विकृती दाखवली जाते, कावीळ वाढू नये म्हणून उगाचच आयुष्यभर पथ्य करीत बसायचे असते का ? रोगापेक्षा रोगाची भीती ही आपल्याला मृत्युकडे लवकर नेणारी असते.
त्यापेक्षा कोणताही रोग होऊ नये यासाठी आपली प्रतिकारक्षमताच एवढी वाढवून ठेवावी, की चुकुन जरी काही वेळा अपथ्य झाले तरी, काहीही होता कामा नये.
चेक बाऊंस होऊ नये यासाठी कसं पुरेसा बॅलन्स अकाउंटमधे ठेवणे आवश्यक असते, तसं आपल्याकडील इंद्रियांच्या सर्व क्षमता एवढ्या वाढवून ठेवायच्या की, चुकुन एखाद्या वेळी एखाद्या रोगाचा सामना करायची वेळ आलीच तर पुरेसा शक्तीचा साठा आपल्याकडे तयार असेल. ऐनवेळी कुठे जाणार ना ! एनी टाईम मनी कधी मिळतील? पुरेसा बॅलन्स असेल तरच !
केवळ अॅण्टीऑक्सीडंटस् घेणे म्हणजे प्रतिकार क्षमता वाढवणे नव्हे हं !
हे सगळं पाश्चात्य डोकं. त्यांना सगळं कसं इन्स्टंट हवं असतं. पाणी विहिरीतून येतं, त्यासाठी ती जमिन खणावी लागते, विहिर बांधावी लागते, तरच विहिरीला असलेले पाणी हवे तेव्हा वापरता येते.
हे कोणाला कळेल ? ज्यांनी कायम टॅप वाॅटरच वापरले आहे त्यांना ? विहिरच बघीतली नाही त्यांना ? मग त्यांच्यासाठी वेगळी गरज निर्माण होते, त्याला ते इन्स्टंट म्हणतात.
एक गोळी टाकली तोंडात की आली एनर्जी. असं कुठाय ? ती काय हवा आहे का ? चाकाला ट्यूब जोडली आणि हवा भरली !
तसं शोधायला गेलं तर आयुर्वेदातील सगळी रसायन औषधे ही अॅण्टी ऑक्सीडंटच आहेत. सगळे मसाल्याचे पदार्थ अॅण्टीऑक्सीडंटच आहेत. असो. पाश्चात्यांची संशोधक वृत्ती मात्र अभ्यासण्यासारखी आहे. छोट्या छोट्या गोष्टींचाही ते अतिशय मनापासून अभ्यास करतात, आणि महत्त्वाचे म्हणजे आपले संशोधन लिहून ठेवतात, इतरांना सांगतात. त्यामुळे पुढील पिढीला त्याचा फायदा होतो. एकदा झालेली चुक टाळता येते.
भारतीय संशोधनातील एक मोठ्ठा दोष हा रहातो, की आमचं डाॅक्युमेंटेशन नीट होत नाही. ज्यावेळी जे गरजेचं आहे, ते केलंय. काहीवेळा, त्याचं महत्व लक्षात येत नाही, काही वेळा, कशाला लिहून ठेवायचं, राहातंय लक्षात. असं म्हटलं जातं.
मग कधीतरी गरज असते तेव्हा इसारलंय म्हटलं की झालं....
भारतीय संशोधक प्रत्येक वेळी चुकतात असं नाही,
आता इस्रोचीच गोष्टच बघा ना !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
18.02.2017
February 18, 2017
जगातील सर्वात मोठी लोकशाही आपल्या भारत देशाची मानली जाते. स्वातंत्र्यानंतर ७० वर्षात ही लोकशाही जिवंत आहे. ती जिवंत राहीली याचं कौतुक एवढ्यासाठीच, की स्वात्त्र्यापूर्वी १५० वर्ष या देशावर ब्रिटीशांच राज्य होतं. ब्रिटीश येण्यापूर्वी आपला देश असंख्य छोटी छोटी संस्थानं, राज्य आणि विविध शाह्यांमधे वाटला गेला होता.
March 10, 2017
आपला भारत कृषिप्रधान देश म्हणून सर्वत्र ओळखला जातो. महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या आत्महत्येच्या प्रश्न अनुत्तरीतच आहे व त्यावर अजून तरी काही ठोस पाऊले उचल्याची बातमी नाही. नुसते अनुदान देऊन प्रश्न सुटेल असे वाटत नाही.
April 18, 2011
प्रत्येक व्यक्तीच्या मनात घराच्या बाबतीत एक स्वप्न ‘घर’ करून राहिलेलं असतं. घर लहान असो वा मोठे, स्वप्न खरे झाले तर त्याच्या मनाला शांतता व समाधान मिळून त्याला त्याचा आनंद मिळतो
October 4, 2023
पंजाब मध्ये प्रमुख आहार घटक असलेले हे धान्य कधी आपण कोकण गोवा प्रांतीय मंडळींनी आपलेसे केले हे आपले आपल्यालाच
समझले नाही.
तरी आता आपल्या प्रदेशामध्ये देखील बरीच मंडळी वेगवेगळ्या स्वरूपात ह्याचे सेवन करताना पण पहातो.जसेरवा,सांजा,पिठ,खीर,पुरी, चपाती,पराठा,लाडू इ.
म्हणूनच ह्या गव्हाचे गुण धर्म आपण ह्या सदरात पाहुया.
गहू चवीला गोड,थंड,पचायला जड,स्निग्ध,सारक,वात पित्त नाशक,कफकर,बलकारक,वजन वाढविणारे,मोडलेले हाड सांधायला मदत करणारे असतात.
आता ह्याच गव्हापासून निर्मित वेगवेगळे पदार्थ व त्यांचे गुणधर्म आपण पाहुया:
१) गव्हाचा मंड:
उष्ण,मल बांधून ठेवणारा,गोड,पित्तनाशक आहे.
२) रोटगे:
गोड,बल्य,कफकर,वातपित्तनाशक,सारक,वजनवाढविणारे,वातानुलोमक,धातुवर्धक,रुचिकर असतात.
३) रोटगे (शेणीच्या थाळीत आग करून धुर नाहीसा झाल्यावर त्यात घालून भाजलेले रोटगे):
पौष्टीक,धातुवर्धक,पचायला हल्के,भुक वाढविणारे,कफनाशक,बल्य.
४) भाकरी:(तव्यावर भाजून मग निखाऱ्यावर भाजलेली):
पचायला जड,बलकर,रुचिकर,पौष्टीक,
धातुवर्धक,कफकर,वातनाशक.
५) सांजापोळी:
पचायला जड,शुक्रवर्धक,कफकर,वातपित्तनाशक
बल्य,वजन वाढविणारी.
६) घारगे:
पचायला जड,वृष्य,बलकारक,रुचिकर,पुष्टीकर,कफकर,वातपित्तनाशक.
७) घिवर:
पचायला जड,धातुवर्धक,हृदयाला बल देणारे,धातुवर्धक,वात पित्तनाशक,कफकर.
८) लाडू:
गोड,थंड,स्निग्ध,पचायला जड,वात पित्तनाशक,कफकर,शुक्रधातु वाढविणारे,बलकारक.
९) शीरा:
गोड,पचायला जड,कफकर,वात पित्त नाशक,बल्य,वजन वाढविणारे,श्रम हारक.
१०) गव्हाची खीर:
पचायला जड,कफकर,वजनवाढविंणारी, वातपित्तनाशक,वृष्य,धातुवर्धक,शुक्रवर्धक, हृदयाला हितकर आहे.
गव्हाचे पदार्थ खायचा अतिरेक केल्यास कफाचे विकार,स्थौल्य येऊ शकते.
(क्रमश:)
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
February 8, 2017
मंत्रालयाला लागलेल्या आगीत सरकारची आपत्कालीन संरक्षण यंत्रणा भस्मसात झाली. आणीबाणीच्या प्रसंगी ज्या यंत्रणेवर विसंबून राहावे, तीच आपत्तीची बळी ठरत असेल, तर मुळातच कुठेतरी भयंकर चूक होत असल्याचे मान्य करावे लागेल. हा संदर्भ केवळ मंत्रालयाच्या आगीपुरता मर्यादित नाही. या सरकारच्या धोरणाने संपूर्ण राज्य आणि त्यातही गरीब शेतकरी वर्ग अगदी नेमाने संकटाच्या आगीत होरपळत असतो. त्यातही विदर्भातील शेतकर्यांची दैना अधिकच अस्वस्थ करणारी आहे. सरकारने आपले अर्धे मंत्रालय नागपूरला हलविले, तर किमान या शेतकर्यांना हे सरकार आपल्यासाठी काही करू इच्छिते याचे समाधान तरी लाभेल.
July 2, 2012
भगवान शंकरांच्या या दिव्य नामावलीला पुढे सुरू ठेवताना जगद्गुरु आचार्यश्री म्हणतात, हे नीलकण्ठ – समुद्रमंथनाच्या वेळी निघालेले हलाहल नामक महाभयानक विष, समस्त ब्रह्मांडाच्या कल्याणासाठी प्राशन केल्यामुळे ज्यांचा गळा काळानिळा पडलेला आहे असे.
August 7, 2020
महाराष्ट्रामध्ये पसरलेल्या सह्याद्रीच्या डोंगर रांगात पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमा नदीचे उगमस्थान म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या निसर्गरम्य निवास करणारे भगवान शंकरांचे ज्योतिर्लिंग स्थान म्हणजे श्री भीमाशंकर.
September 12, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti