(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आध्यात्माची आवश्यकता

    आध्यात्म म्हणजे आत्म्याची स्थिरता होय. जोपर्यत आत्मा स्थिर होत नाही, तोपर्यत कितीही पैसा, ऐषोराम, नोकर -चाकर सुख देवू शकत नाहीत. हे सुख फक्त आध्यात्मामुळेच मिळते. म्हणुनच ईश्वराचे नामस्मरण करणारा शेतकरी  दिवसभर काबाड कष्ट करूनही रात्री सुखाची झोप घेतो, तर पैसेवाला दिवसभर आरामात राहूनही रात्रीच्या रात्री जागून काढतो. 

      August 13, 2018


  • ओळख मूलांकाची – मूलांक ६

    अंकशास्त्र (NUMEROLOGY) हे संख्येद्वारे जीवनातील विविध पैलू समजून घेण्यास मदत करतो. अंकशास्त्र केवळ व्यक्तिमत्व आणि प्रवृत्तींबद्दलच सांगत नाही, तर भविष्याबद्दल अचूक अंदाजही लावते. त्यामुळेच आता अंकशास्त्र खूप लोकप्रिय झाले आहे. तसेच जे शतकानुशतके मानवी जीवनातील गुंतागुंत सोडविण्यात उपयुक्त ठरले आहे. ही विद्या जन्मतारीख, जन्मवर्ष किंवा नाव या अक्षरांवरून काढलेले आकडे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्याबद्दल सांगण्यासाठी विश्वासार्ह मानले जाते.

    अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या ६,१५ आणि २४ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ६ असतो.
    अंकशास्त्रात शुक्राला मूलांक ६ चा स्वामी मानले आहे. मूलांक ६ हा संख्याशास्त्रानुसार सर्वाधिक श्रीमंत अंक मानला जातो. पण हा सर्वाधिक यशस्वी मूलांकही मानला जातो. हा ग्रह सुख, वैभव, प्रेम, विलासी जीवन, कार्य सुख, धन, वैभव आणि ऐश्वर्य म्हणजेच भगवंत, नियंत्रक आणि दाता ग्रहाचा कारक मानला जातो. शुक्रामुळे लक्झरी वस्तू मूलांक ६ असलेल्या लोकांना अधिक आकर्षित करतात.

    मूलांक ६ च्या व्यक्तींचे स्वभाव आणि वैशिष्ट्ये:
    - स्वभाव: हे लोक स्वभावाने खूप हळवे आणि प्रेमळ असतात.
    - ते खूप स्टायलिश असतात आणि लोकांना आकर्षित करतात.
    - सौंदर्य, कला आणि साहित्याची त्यांना विशेष आवड असते.
    - स्वच्छता आणि नीटनेटकेपणा: त्यांना स्वच्छ राहायला आणि आजूबाजूला नीटनेटकेपणा आवडतो.
    - अहंकारी स्वभाव: काही वेळा ते मर्यादित लोकांशीच मिसळतात, त्यामुळे त्यांना अहंकारी समजले जाऊ शकते
    - करिअर: करिअर / पैसा अशा कोणत्याही करिअरची निवड करताना फॅशन मीडिया,डिझाईन ब्युटी प्रोडक्ट, एंटरटेनमेंट, ऍक्टिंग, डान्स, सिंगिंग, फोटो शूट ,रेडिमेड गारमेंट, जेम्स आर्टस् ज्वेलरी ह्या क्षेत्राशी किंवा ह्या क्षेत्रात लागणाऱ्या वस्तूंशी ह्यांना जास्त लगाव असू शकेल तेव्हा अशा क्षेत्री ह्यांना करिअर करण्याचा सल्ला दिला जातो. मेडिकल क्षेत्रात हार्ट रिलेटेड प्रॅक्टिस मध्ये ह्यांचा चांगला हात असतो. रायटर, धर्मगुरू, हॉटेल इंदूस्ट्रीज मध्ये सुद्धा मूलांक ६ वाल्या व्यक्ती प्रगती करताना दिसतात. नर्सिंग व्यवसायात सुद्धा ६ नंबर च्या व्यक्ति ह्या चांगले काम करतात.

    आयुष्यात अनेकदा प्रेमात पडतात :
    अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा मूलांक ६ असतो अशा जन्मतारखेचे लोक अनेकदा प्रेमात पडतात. तसेच, हे लोक दिसायला फारच सुंदर असतात. स्वभावाने हे लोक फार रोमॅंटिक असतात. आपल्या सौंदर्याने इतरांना आकर्षित करतात. त्याचबरोबर हे लोक पैशांचा अगदी सर्रास वापर करतात. आपलं प्रेम मोकळेपणाने व्यक्त करतात. तसेच, कोणालाही हे लोक अगदी सहजतेने प्रपोज करु शकतात इतकी हिंमत ते दाखवतात. तसेच, यांना फिरण्याची देखील खूप आवड असते. ६ नंबर च्या व्यक्ती नेहमी खाणे पिणे आपल्या मनाप्रमाणे करतात. स्वतःवर कोणत्याही मार्गाने खर्च करण्याची ह्यांची तयारी असते. दुसऱ्याची मदत करण्यासाठी नेहमी तत्पर दिसतात. दयाळू स्वभाव असतो. जनावरे, झाडे झुडपे ह्यांबद्दल लगाव असतो.

    वर्तमानात जगतात:
    मूलांक 6 असणारे लोक वर्तमानात जगतात. त्याचबरोबर भविष्याचा विचार न करता विनाकारण पैसे उडवण्याची यापैकी अनेकांची सवय असते. स्वभावाने हे लोक फारच दयाळू आणि शांत असतात. तसेच, इतरांप्रती सहानुभूती यांना जास्त असते. या' जन्मतारखेचे लोक असतात 'ओव्हरथिंकर'; विचार करुन करुन डोक्याचा करतात भुगा, इतरांनाही यांचा मनस्ताप.

    फार गोंधळलेले असतात:
    या जन्मतारखेच्या लोकांची सतत विचार करण्याची सवय असल्यामुळे हे लोक फार गोंधळलेले असतात. आणि कोणत्याच निर्णयावर ते ठाम राहात नाहीत. यामुळे यांचं अनेकदा नुकसान होतं. त्यामुळे यांच्यात आत्मविश्वासाची देखील कमतरता पाहायला मिळते. यासाठीच यांच्या आयुष्यात यश फार उशिराने येतं.

    कसं असतं आयुष्य?
    या जन्मतारखेच्या लोकांचं आयुष्य तसं फार चांगलं असतं. स्वत:च्या मेहनतीने हे पैसा कमावतात. त्यासाठी इतरांवर अवलंबून राहात नाहीत. तसेच, हे लोक जिथेही जातात तिथे आपली ओळख निर्माण करतात. देवाच्या कृपेने यांची आर्थिक स्थितीही चांगली असते. मात्र, ही स्थिती हळुहळू सुधारते.

    देवी लक्ष्मीची असते विशेष कृपा:
    मूलांक 6 च्या लोकांचं आर्थिक जीवनही चांगलं असतं. देवी लक्ष्मीची यांच्यावर विशेष कृपा असते. अनेकदा या जन्मतारखेच्या लोकांना आयुष्यात पैसा फार उशिरा मिळतो. मात्र, एकदा यांचं आयुष्य स्थिर झाल्यानंतर यांच्या आयुष्यात यश, पैसा आणि स्वातंत्र्य या तिन्ही गोष्टी टिकून राहतात.

    ६,१५ आणि २४ तारखेला जन्मलेले लोक तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला येतात, चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्म घ्यावा अशी एक म्हण आहे, ज्याचा अर्थ 'अत्यंत श्रीमंत कुटुंबात जन्माला येणे' असा होतो. येथे आम्ही एका विशिष्ट मूल्याच्या 3 तारखेला जन्मलेल्या अशा लोकांबद्दल बोलत आहोत, ज्यांचे पालनपोषण एखाद्या राजकुमारासारखे होते.

    - या क्षेत्रात ते खूप यशस्वी असतात मूलांक ६ असलेली लोकं सर्जनशील प्रतिभेने समृद्ध असतात आणि बऱ्याचदा केवळ कला, संगीत किंवा साहित्य यासारख्या क्षेत्रांमध्ये रस घेत नाहीत, तर व्यावसायिकरित्या बरेच पैसे आणि प्रसिद्धी देखील कमवतात. आकर्षणाचे केंद्र बनण्याचा ही त्यांना छंद आहे. हा शुक्र प्रभाव मानला जातो, जो सर्व ग्रहांमध्ये सर्वात तेजस्वी आहे.

    नोकरी नाही...तर बिझनेसमध्ये चिक्कार पैसा कमावतात, न्यायाचेही तितकेच असतात पक्के त्याचबरोबर यांचा ड्रेसिंग सेन्स फार चांगला असतो. यांच्या व्यक्तिमत्त्वात किंवा स्वभावात कोणताच असा वाईट गुण नसतो. त्यामुळे या जन्मतारखेचे लोक मनानेही तितकेच श्रीमंत असतात. त्याचबरोबर, या लोकांची अनेकदा परदेशवारी असते. यांना जीवनातील सर्व सुख समृद्धीचा लाभ घेता येतो.

    समाजात मिळतो मान-सन्मान:
    या जन्मतारखेच्या लोकांना समाजात मान-सन्मानही फार मिळतो. या लोकांना न्याय अतिशय प्रिय असतो. त्यामुळे न्यायाने दिलेली वागणूक यांना आवडते. यांचं ध्येय फार क्लिअर असतं. त्याचबरोबर या जन्मतारखेचे लोक व्यवसायात जोखीम घेऊन पैसा कमावतात. लीडरशीप क्वालिटी यांच्या फार असते. आपल्या व्यक्तिमत्त्वाने हे लोक इतरांना प्रभावित करतात.

    ६ क्रमांकाचे लोक शारीरिकदृष्ट्या मजबूत आणि दिसायला सुंदर असतात. या लोकांचे म्हातारपण लवकर दिसून येत नाही. त्यांचे आयुष्मान जास्त असते. ते शंभरीही पार करू शकतात.

    आपल्यातील कमीपणा आणि मार्गदर्शन:
    - ६ नंबर च्या प्रभावित असणाऱ्या व्यक्तींना समोरच्या व्यक्तीला ओळखताना उशीर होतो. प्रथम त्या व्यक्तीबद्दल हे एकदम शाश्वत असतात पण काही कालांतराने त्या व्यक्तीबद्दल हे हिरमुसले जातात. म्हणून कोणत्याही व्यक्तीवर किती ट्रस्ट करावा हे ह्यांनी प्रथम जाणून घ्यावे.

    - जीवनात ह्या व्यक्तींना एकदा तरी समोरच्या व्यक्तींकडून विश्वासघात होतो. दुसरी गोष्ट ह्या ६ नंबरच्या व्यक्ती स्वतःच्या बाहेरील विश्वात स्वतःला दाखविण्यासाठी एव्हढे मग्न असतात कि त्यांना त्यांच्या आतल्या स्किल चा मागमूस लागत नाही की ते काय काय करू शकतात. म्हणून केव्हा केव्हा करिअर मध्ये ह्यांना उशीर होतो. वाढत्या वयात आल्यावर त्याची जाण होते पण तेव्हा उशीर झालेला असतो.

    - तिसरा गुण ह्यांना दुसर्यांना मदत करण्याचा एक वाईट अनुभव असा येतो कि ती व्यक्ती ह्यांना नंतर दूर करते किंवा ह्यांना नंतर कळते कि आपण स्वतःकडे दुर्लक्षित झालो. त्यामुळे वरील सर्व मुद्द्यांवर आपण सावधान राहिले पाहिजे असा सल्ला दिला जातो.

    - खाण्यापिण्याच्या सवयीवर जास्त दुर्लक्ष नको कारण नंतर ह्यांना त्रास होताना पाहिले गेले आहे.

    शुभ रंग:- निळा सफेद आणि वांगी रंगाचा उपयोग शुभत्व देतो. गुलाबी रंग सर्वात चांगला.

    अशुभ रंग:- काळा आणि लाल

    भाग्यवान दिवस:- शुक्रवार

    लकी नंबर्स:- ६ काही वेळा ३ आणि ९, ५ सुद्धा चांगला जातो.

    शत्रू नंबर:- ४, ८ हे नंबर ह्यांना शत्रुत्व किंवा नुकसान दायक असू शकतात. ज्या वयाची/वर्षांची किंवा तारखांची बेरीज सुद्धा ४ किंवा ८ येते ती वर्षे सुद्धा जास्त त्रासदायक असू शकतील.१३,२२,३१,४०,१७,३५,४४

    महिन्याच्या शुभ तारखा:- ६,१५,२४

    जीवनातील शुभ वर्षे:- २१/२४/३०/३३/३९/४२ हि वयाची वर्षे विशेष असतील. आणि ज्या वर्षाची बेरीज हि ६ असेल उदारणार्थ २०२२= ६. किंवा २००४ वगैरे. ज्या वर्षाची बेरीज ६ येते किंवा ज्या वयाची बेरीज ६ येते अशी सर्व वर्षे आपल्याला शुभ असतात. ह्यात काही नवीन निर्णय सुरुवात करू शकता.

    आजार:- हार्ट डिसीज, छातीचे दुखणे, पाठ दुखी , गळ्याचे सर्व आजार, डायबिटीज, ९०% व्यक्तींना कोलोस्ट्रॉल ४०/५० नंतर जास्त होण्याचे दिसते. ह्यांना खाण्यापिण्यावर जर ताळतंत्र नसेल तर पुढे एका विशिष्ट सेवनाने जो त्रास होतो त्यावरील आजारांकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. स्किन बद्दल काळजी घेण्याचा सल्ला सुद्धा देण्यात येतो.

    मूलांक ६: २०२६ चे वार्षिक भविष्य:
    मूलांक ६ (६, १५, २४ तारखेला जन्मलेले) व्यक्तींसाठी २०२६ हे वर्ष सुख-सुविधा, प्रेमसंबंध आणि आर्थिक प्रगतीचे सुवर्णवर्ष ठरणार आहे. शुक्र व सूर्य यांच्या प्रभावामुळे करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि सुसंवाद वाढेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील, मात्र चैनीवर खर्च वाढू शकतो. नातेसंबंधात गांभीर्य आणि लग्नगाठ पडण्याचे उत्तम योग आहेत. करिअर आणि व्यवसाय: नवीन स्टार्टअप किंवा नोकरीत बढतीची शक्यता आहे. कला, डिझाइन, फॅशन किंवा लक्झरी क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना मोठी प्रसिद्धी आणि यश मिळू शकते. आर्थिक स्थिती: पैसा भरपूर येईल, पण खर्चही वाढू शकतो. महागड्या वस्तू किंवा मालमत्तेत गुंतवणूक कराल. आर्थिक नियोजनाची गरज राहील. प्रेम आणि नातेसंबंध: हे वर्ष प्रेमासाठी अत्यंत रोमँटिक आहे. अविवाहित लोकांचे लग्न ठरू शकते. जोडीदारासोबत सुसंवाद राहील आणि जुने गैरसमज दूर होतील.

    आरोग्य: आरोग्य मध्यम राहील. अति कामामुळे थकवा जाणवू शकतो. त्वचेचे विकार किंवा पचनाच्या समस्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

    टीप: २०२६ ची बेरीज (२+०+२+६ = १०, १+०=१) १ असल्याने सूर्याचा प्रभाव असेल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल.

    उपाय: शुक्रवारी लक्ष्मी देवीची पूजा करा आणि पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचा वापर वाढवा. अंकशास्त्रानुसार मूलांक ६ असणाऱ्यांसाठी २०२६ हे वर्ष संमिश्र फलदायी असले तरी प्रगतीकारक ठरणारे आहे. करिअरमध्ये विकासासाठी नवीन संधी मिळेल त्याचा लाभ घ्या. मूलांक ६ असणारे जे लोक फॅशन, डिझाईन, ब्युटी किंवा क्रिएटिव्ह क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांना विशेष फायदा मिळू शकतो. व्यवसायातही यशाचा मार्ग सुकर होईल मात्र, खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. २०२६ मध्ये उत्पन्न आणि खर्च यांच्यात समतोल राखणे आवश्यक आहे. सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल आणि तुमच्या कामाचे खास कौतुक होणार आहे. प्रेमसंबंधात गोडवा असेल तर वैवाहिक जीवनातही आनंद आणि समाधान असेल. तब्येतीच्या दृष्टीने पचनाशी संबंधित काही त्रास उद्भवू शकतो, त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.

    शुभ अंक : ३ आणि ६
    शुभ रंग : गुलाबी

    (डिस्क्लेमर: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

    डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
    मोबा: ९८८१२०४९०४
    ०८.०३.२०२६

      March 8, 2026


  • माझा जन्म… आत्म्याचा आनुवंशिक तत्व सिध्दांत – २

    सजीव, त्यांची पुनरुत्पादन यंत्रणा आणि त्यांचा जन्म, या विषयी विचार करता करता काही कवितां स्फुरल्या. त्यापैकी काही येथे देत आहे. कारण त्या, माझ्या … आत्म्याचा आनुवंशिक तत्व सिध्दांताशी संबंधीत आहेत.

    माझा जन्म.....
    माझा जन्म हा ….
    माझ्या आअीबाबांचा निर्णय होता.
    या पृथ्वीवर ….
    जन्म घेण्याशिवाय
    मला
    दुसरा पर्यायच नव्हता ....

    प्रत्येक सजीवाच्या बाबतीत हे अगदी खरं आहे. नराचा शुक्राणू आणि मादीचं पक्व बीजांड यांचं संयोग झाला म्हणजे अपत्य पिढीच्या सजीवाचा गर्भपिंड निर्माण होतो, मादीच्या गर्भाशयात त्याची वाढ होते आणि प्रजातीनुसार, ठरलेल्या काळानंतर, अपत्य पिढीचा अेक सजीव, मादीच्या शरीराबाहेर येअून, या पृथ्वीवर स्वतंत्रपणं जगू लागतो. यात, अपत्य पिढीच्या सजीवाला काहीही पर्याय नसतो. निसर्गनियमानुसार त्याचा जन्म होतो.

    वनस्पतींच्या बाबतीतही हे खरं आहे. पुंकेसर आणि स्त्रीकेसर यांचा संयोग होअून, फुलातून, त्या प्रजातीचं फळ निर्माण होत.
    जनक पिढीचा जन्मही याच प्रकारानं झालेला असतो. त्यांना तरी कोणता पर्याय होता? त्यांच्या आअीबाबांनी त्यांना जन्माला घालून या पृथ्वीवर आणलं होतं. मागच्या पिढीचा जन्म, मागच्याच्या मागच्या पिढीचा जन्म, मागच्याच्या मागच्याच्या मागच्या पिढीचा जन्म ……

    ही साखळी अशीच चालू होती.

    मागच्या पिढीशिवाय पुढच्या पिढीचा जन्म होत नाही हे विज्ञानीय सत्य आहे.

    आता कवितेचं दुसरं कडवं वाचा.

    बाबांचा शुक्राणू...
    त्यांच्या मातापित्यांच्या ....
    अनेक पूर्वपिढ्यांतील ....
    आनुवंशिक तत्वाचा ठेवा घेअून आला ...

    आअीचं बीजांड ...
    तिच्या मातापित्यांच्या .....
    अनेक पूर्वपिढ्यांतील ....
    आनुवंशिक तत्वाचा ठेवा घेअून आलं ...

    बाबांचा शुक्राणू ... आअीचं बीजांड
    ....माझा जन्म
    आणि …
    आअीबाबांच्या आनुवंशिक तत्वाचा ....
    पुनर्जन्म..

    मागच्या अनेक पिढ्यातून माझ्या पिढीपर्यंत अेक चेतना संक्रमीत होत आली हे ही विज्ञानीय सत्य आहे.

    सजीव, वयात आला … म्हणजे जननक्षम झाला …. म्हणजे तो पुढच्या पिढीला जन्माला घालतो. पुढची पिढी आणखी पुढच्या पिढीला जन्माला घालते, पुढच्याच्या पुढची पिढी, पुढच्याच्या पुढच्याच्या पुढच्याच्या पुढची पिढी ….. ही साखळी, जोपर्यंत या पृथ्वीवर, सजीवांच्या अस्तित्वाला पोषक अशी परिस्थिती आहे तो पर्यंत चालू राहणार आहे आणि तोपर्यंत दोन जिवंत शरीरातून अेक चेतना, तिसर्‍या जिवंत शरीरात संक्रमित होत राहणार आहे हे ही विज्ञानीय सत्य आहे.

    गजानन वामनाचार्य

    शनिवारचा सत्संग - 2
    शनिवार 3 डिसेंबर 2016 

      December 3, 2016


  • श्री शिव नामावल्यष्टकम् – ६

    एक मस्तक, हे असत्य वचन निघाल्यामुळे श्रीशंकरांनी कापले असे पुराणात वर्णन आहे. त्या मस्तकाची माळ गळ्यात धारण करणारे. संसारदुःखगहनाज्जगदीश रक्ष- अशा हे भगवान महादेवा ! या गहन संसार रुपी दुःखातून माझे रक्षण करा.

      August 10, 2020


  • आ लौट के आजा मेरे मित..

    १९५७ साली मुंबईत घडलेली ही गोष्ट आहे. आई वडील व मुलगा असं तिघांचं छोटं कुटुंब. वडील हिंदी चित्रपटांसाठी गीतलेखन करणारे प्रख्यात कवी. एके दिवशी सकाळीच बापलेकात किरकोळ कारणावरून वाद झाले.

      June 29, 2023


  • परशुराम जयंती

    हिंदू पंचागनुसार, वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्ष तृतीया तिथीला परशुरामाची जयंती साजरी केली जाते. धर्म ग्रंथांप्रमाणे याच दिवशी विष्णु देवाचे आवेशावतार परशुरामाचा जन्म झाला होता.

      May 3, 2022


  • एका पुतळ्याची ‘कर्म कथा’

    १३ जून १९६९ या दिवशी आ. अत्रे आपल्यातून निघून गेले, वरळीच्या ‘शिवशक्तीतून‘ दादरच्या स्मशानभूमीपर्यंत त्यांची जी प्रचंड अंत्ययात्रा निघाली ती आजही लोकांना आठवत असेल. आ. अत्रे गेले आणि मराठीचा अत्यंत अभिमानी असा महापुरूष निघून गेला. आ. अत्रे गेल्यानंतर १९७६ पर्यंत ‘मराठा‘ दैनिक चालू राहिले व ते नंतर बंद पडले. ‘शिवशक्ती‘ सुध्दा दुसर्‍यांच्या हातात गेली त्यामुळे आ.अत्रे यांचे नाव मराठी माणसांच्या स्मृतीपटलावरून हळूहळू नाहीसे होऊ लागले. ज्या महापुरूषाने मबईसह संयुक्त महाराष्ट्राची लढाई प्राणपणाने लढून जिंकली, त्याचे मराठी मनाला विस्मरण होऊ लागले याची टोचणी वृत्तपत्रव्यवसायात काम करणार्‍या माझ्या काही मित्रांनाही लागून राहिली.

      April 24, 2010


  • दिक्षित की दिवेकर – कोणाबरोबर जाऊ ?

    ह्या दोन्ही पद्धतीवरून असच नमूद करावं लागतंय कि वजन घटवण्यासाठी कोणत्याही आहार पद्धतीचा वापर करा, पण तो तुम्हाला कायम करता येईल असाच निवडा. कारण घटलेले वजन कायम घटलेले राहण्यासाठी तो उपयोगी ठरावा.

      April 8, 2019


  • साधता संवाद..संपतील वाद… !

    तंत्रज्ञानाचा सर्वात जास्त परिणाम कुटुंब व्यवस्थेवर होतॊय..काम शाळा नोकरी यामुळे आधीच वेळ मिळत नाही त्यातच तंत्रज्ञांच्या वापरामुळे नात्यातील संवाद कमी होतोय. त्यामुळे नातेसंबंध दृढ करण्यासाठी आता आपल्याला संवादाचे दरवाजे उघडावे लागतील. संवाद ही कला आहे. आपण काय बोलतो यावर नात्याचं भवितव्य अवलंबुन असतं. आपल्या बोलण्यानं एखाद्याला प्रेरणाही मिळू शकते किंवा एखाद्याचं मनही दुखू शकतं.

      February 11, 2019


  • श्री गजानन महाराज, शेगांव

    गजानन तो संत महात्मा ह्या भूतली आला असे
    मानव म्हणूनी जन्म घेतला सर्वासाठीं ईश्वर भासे ।।१।।

    आला होता गरिबांसाठीं कैवारी बनूनी त्यांचा
    आजही त्याचे स्मरण होतां नाश होई दुःखाचा ।।२।।

    कोठूनी आला, कसा आला कळले नाहीं कुणां
    जात पात धर्म बंधने त्यांच्यापाशीं नव्हत्या खुणा ।।३।।

    तो तर आला सर्वासाठीं मानवातील देव बनुन
    धन्य केले कित्येकांना संकटे दूर करुन ।।४।।

    संदेश घेवूनी आला होता प्रभूचा पृथ्वीवरी
    धर्म रक्षण्या सांगुन गेला महान कार्य तो करी ।।५।।

    नास्तिकतेची चढली होती धूळ विचारावरती
    झटकून देतां तिजला नविन ज्योत पेटविती ।।६।।

    जागृत केला भाव प्रभूचा प्रत्येक व्यक्तीचे मनीं
    आस्तित्व ईश्वर शक्तीचे दाखविले गजाननांनी ।।७।।

    कलियुगीचा असे हा काळ धर्म चालला विसरुन
    गजाननाच्या रुपामध्यें दिसले सर्वा देवपण ।।८।।

    प्रफुल्लित करिंता ज्ञानानी फुंकार मारुनी राखेवर
    भक्तीभावानें पुजितां तुम्हीं पावन होतो ईश्वर ।।९।।

    लेखक नव्हता, कवि नव्हता शिकविले नाहीं ज्ञान
    सामान्य अशा घटनानीं दाखवूनी दिले प्रभूपण ।।१०।।

    लोकांस वाटले चमत्कार गजाननाच्या जीवनाचे
    हे तर सहजची घडले आस्तित्व होते त्यांत प्रभूचे ।।११।।

    आजही त्याच्या नावामध्यें आहे शक्ति प्रभूची
    संसारातील दुःखे हरपती कृपा होतां गजाननाची ।।१२।।

    मानव म्हणून होता साधा उघडून देई मंदीरद्वार
    देई घालवूनी दुःखें सारी हलका केला पाप भार ।।१३।।

    बऱ्याच घडल्या घटना दिसले ज्यामध्ये चमत्कार
    प्रभूविषयीं श्रद्धा निर्मूनी केली ईशवृत्ती साकार ।।१४।।

    प्रभूसी पावन करण्या पाहिजे महान तपशक्ति
    कित्येक जन्माची त्याला लागत असते भक्ति ।।१५।।

    कठीण असते सारे पावन करण्या प्रभूला
    मोठ मोठ्या विभूती हार जाती त्याला ।।१६।।

    तुरळक कांही व्यक्ति प्रभूमय जे झाले
    शेगांवचे गजानन त्यांतलेच एक ठरले ।।१७।।

    त्यांच्याकडे असते दिव्य शक्तीचे बळ
    सहजतेनें ते जे करिती चमत्कार समजे सकळ ।।१८।।

    गण गण गणांत बोते मुखी घेत होते सतत
    तन्मय होऊन शब्दामध्यें ध्यान मग्न ते होऊन जात ।।१९।।

    आंता कांही प्रसंग सांगतो चमत्कार भासला त्यामध्यें
    ईश्वर चैतन्याची झलक दिसून आली आनंदे ।।२०।।

    प्रथम येतां शेगांवी कपडे नव्हते अंगावरी
    वेडा पिसा वाटूनी समजले त्यास भिकारी ।।२१।।

    एका घरा पुढतीं पडल्या उष्ट्या पत्रावळी
    गजानन बसून तेथें जमवी शिते सगळी ।।२२।।

    तुच्छ लेखले सर्वानीं प्रथम बघतां त्याला
    अन्नातील ब्रह्म जाणतां पाणी आले नयनाला ।।२३।।

    वृत्ती असते लोकांची बघण्या बाह्याकडे
    अंतरीच्या दिव्यत्वाची उमज त्यांना न पडे ।।२४।।

    नाल्यामधले थोडे पाणी मलीनतेने साचलेले
    हात लागतां गजाननाचा निर्मळ बनूनी वाहूं लागले ।।२५।।

    कित्येक रोगी त्रासून गेले दुर्धर अशा व्याधींनी
    आशिर्वाद मिळतां गजाननाचा सुद्दढ झाले शरिरांनी ।।२६।।

    शुष्क झालेल्या विहीरींमध्यें उचंबळूनी आले पाणी
    आनंदी झाले गांवकरी तहानलेल्यांची तहान भागूनी ।।२७।।

    अहंकारानी पेटलेले आले होते गोसाविजन
    अग्नीज्वालांत बघूनी त्यांना नतमस्तक झाले सारेजण ।।२८।।

    वांझोट्या एका गाईने उच्छाद फार मांडला
    क्षीर देण्यास लावूनी शांत केले तिजला ।।२९।।

    अंतःकरण जाणून भक्ताचे देई त्यांना तसेच दर्शन
    आनंदी केले कांहीना विठोबाच्या रुपांत येवून ।।३०।।

    नावेमध्यें जात असतां गजाननाच्या सहवासे
    संकट समयीं प्रत्यक्ष नर्मदा धावूनी आली असे ।।३१।।

    टिळकासम थोरांना आशिर्वाद मिळती गजाननाचे
    गीतारहस्य लिहूनी ज्यानी पांग फेडले भूमातेचे ।।३२।।

    येथे नव्हता जादूटोणा नव्हते कांहीं गंडे दोरे
    विश्वास ज्याचा प्रभूवर त्यांनाच मिळते सारे ।।३३।।

    जीवनाचे असून चक्र त्यांच्या असतात मर्यादा
    दिव्य शक्तीनें ओलांडतां चमत्कार भासतो सदा ।।३४।।

    असेंच बघूनी चमत्कार विश्वास ठेवतो प्रभूवरी
    श्रद्धा होण्या निर्माण चमत्कारच काम करी ।।३५।।

    एकदा बसतां श्रद्धा प्रभूस समर्पण होई
    प्रभूस पावन करितां चमत्कार विसरुनी जाई ।।३६।।

    गजाननाच्या जीवनांतील बघू नका चमत्कार
    श्रद्धा ठेवूनी त्यांचेवरी पावन करा ईश्वर ।।३७।।

    आजही येता भक्तमंडळी दूर दूर गांवाहूनी
    समाधान पावती सारे दर्शन त्यांचे घेवूनी ।।३८।।

    पावन होई नवसाला हीच त्याची महती
    आदर ठेवूनी भक्तजन प्रेमभावना अर्पण करती ।।३९।।

    गुरु त्यांना समजोनी पूजा करा त्यांची
    पारायण करा सतत गजाननाच्या पोथीची ।।४०।।

    सतत करितां पारायण गजाननमय तुम्ही व्हाल
    लय लागूनी ईश्वराची उद्धरुन तुम्ही जाल ।।४१।।

    अवतार कार्य करुनी देहयात्रा संपविली
    ईश्वर श्रद्धा मिळवून धार्मिक चेतना पेटविली ।।४२।।

    संवाद करुनी विठ्ठलाशी समाधीची घेतली अनुमती
    शेगांवी मुक्कामीं येवून सर्वासमोर समाधिस्त होती ।।४३।।

    अठराशे बत्तिस शके भाद्रपद शुद्ध पंचमीला
    समाधी घेऊनी गजाननांनी जीवन यात्रेस निरोप दिला ।।४४।।

    भव्य असे मंदीर उभारले गेले शेगांवी
    लाखो भक्त मंडळी त्यांचे दर्शन घेई ।।४५।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    १८- २२०१८४

      January 18, 2018