(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • श्रीमुद्गलपुराण – ३

    महर्षी मुद्गलांनी दक्षप्रजापतींना दिलेला दिव्य उपदेश म्हणजे श्रीमुद्गलपुराण. महर्षी मुद्गल यांनी सांगितले म्हणून त्याला मुद्गल पुराण असे म्हणतात. ईश्वरी उपासनेचा आनंद देणाऱ्या या भारताला स्वर्ग पेक्षाही श्रेष्ठ मांडणाऱ्या महर्षी मुद्गलांनी आयुष्याचा स्वर्ग करण्याचा दिलेला राजमार्ग आहे श्रीमुद्गलपुराण.

      September 4, 2019


  • गोवा हिंदू असोसिएशन’ निर्मित ‘लेकुरे उदंड जाली’ ची पन्नाशी

    ३० ऑक्टोबर १९६६ रोजी दि गोवा हिंदू असोसिएशन’ निर्मित, वसंत कानेटकर लिखित व मो. ग. रांगणेकर दिग्दर्शित
    ‘लेकुरे उदंड जाली’ या म्युझिकल नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग मुंबईच्या रवींद्र नाटय़ मंदिरात सादर झाला.
    या घटनेला ३० ऑक्टोबर रोजी पन्नास वर्षे पूर्ण झाली.

    मराठी रंगभूमीवरील या आगळ्या नाटकाला संगीत पं. जीतेंद्र अभिषेकी यांनी खूप उत्तम प्रकारे नाटकातील सर्व गाण्यांच्या चाली बांधल्या होत्या. ताल, सूर व शब्द सगळे कसे चपखल बसवले होते. या नाटकातील मुक्तछंदातल्या संवादांना आणि छंदाला प्राधान्य असलेल्या गोव्यातल्या किरिस्तावांच्या तियात्रा या नाट्यप्रकारातल्या संगीताचा बाज त्यांनी वापरला होता.

    वसंत कानेटकर यांनी ‘मूल नसलेले दाम्पत्य’ हा गंभीर सामाजिक विषय अतिशय वेगळ्या पद्धतीने हाताळला होता. विषय गंभीर असला तरी त्याची मांडणी हलक्याफुलक्या पद्धतीने करण्यात आली होती. नाटक हलकेफुलके, गाणी असणारे असले तरी त्याचा मूळ विषय प्रेक्षकांपर्यंत सुंदर पणे पोहोचला. मा.श्रीकांत मोघे व मा कल्पना देशपांडे हे मुख्य कलाकार होते.

    ‘लेकुरे उदंड जाली’ या नाटकाचा पुनरुज्जीवित प्रयोग २५ मे १९७३ रोजी झाला. मूळ नाटकातील श्रीकांत मोघे यांच्यासह अन्य काही कलाकार या प्रयोगातही होते. मूळ प्रयोगात ‘मधुराणी’ची भूमिका कल्पना देशपांडे करत होत्या. पुनरुज्जीवित झालेल्या ‘लेकुरे..’मध्ये ही भूमिका मा.दया डोंगरे यांना मिळाली. गिरगावातील साहित्य संघ मंदिरात या पुनरुज्जीवित नाटकाचा पहिला प्रयोग झाला. ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’नेच हे नाटक दीर्घकालावधीनंतर पुन्हा एकदा नव्याने रंगभूमीवर सादर केले होते. भोलाराम आठवले (धटिंगण गुरुजी), बाबा महाडिक (डॉ. अष्टपुत्रे), प्रकाश इनामदार (गोरा), प्रवीण पाटील (मारोतराव), मोहनदास सुखटणकर (दासोपंत), कुमुद दामले (सोनुताई), श्रीपाद जोशी (व्यंकटराव), विजया धनेश्वर (तिलोत्तमा) आदी कलाकार नाटकात होते. सुरुवातीच्या प्रयोगात मंदाकिनी भडभडे या ‘सोनुताई’ करत होत्या, तर विठ्ठल पणदूरकर हे ‘दासोपत’ करत होते.

    दया डोंगरे या नाटकाची आठवण सांगताना म्हणतात.

    शिवाजी मंदिरच्या प्रयोगाच्या वेळची एक आठवण आहे. नाटकात –

    ‘मी बोलले तर होते वाईट,
    पण आहे का यांना त्याचे काही,
    तुम्ही माहेरचे म्हणूनच सांगते बाई
    यांना माणसांची पारखच नाही..’
    असे एक गाणे होते. शिवाजी मंदिरच्या त्या प्रयोगाला काहीतरी गडबड झाली आणि गाणे सुरू झाले आणि रेकॉर्डरमधून वायर निघाली. गाणे अचानक थांबले आणि मी क्षणभर ‘ब्लँक’ झाले. पण लगेचच पुढचे शब्द मी म्हणायला सुरुवात केली. त्याच वेळी तिकडे ध्वनिमुद्रित संगीत सुरू झाले. मी त्याचा अंदाज घेऊन पुढचे गाणे त्या ‘ट्रॅक’वर जुळवून घेऊन म्हटले. वसंत कानेटकर, सी. रामचंद्र, पं. जीतेंद्र अभिषेकी, दिलीपकुमार, वैजयंतीमाला अशा मान्यवरांनी आमचा हा ‘लेकुरे’चा प्रयोग पाहिला. नाटकाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या नाटकाबाबतची एक विशेष बाब आहे. अमेरिकेत न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, फिलाडेल्फिया, शिकागो, बोस्टन, डेट्रॉईट, टोरांटो या ठिकाणी आमच्या ‘लेकुरे’चे प्रयोग झाले. सातासमुद्रापार गेलेल्या या पहिल्या मराठी नाटकात मी होते याचा मला विशेष अभिमान आणि आनंद आहे. या दौऱ्यासाठी कोणीही प्रायोजक नव्हता. आम्ही सर्व कलाकारांनी स्वत:च्या पदरचे पैसे घालून हा दौरा ठरवला होता. येण्या-जाण्याचा खर्च आम्हीच करणार होतो. प्रयोगाची तांत्रिक व्यवस्था आम्ही कलाकारच सांभाळणार होतो. तेथील काही मराठी मंडळींकडून आमची निवासाची आणि जेवणखाणाची व्यवस्था केली जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. पण तिकडे गेल्यावर हे आश्वासन पूर्ण होऊ शकले नाही आणि आमची भलतीच पंचाईत झाली. ठरल्याप्रमाणे आम्ही पहिला प्रयोग केला आणि पुढचे प्रयोग करायचे की नाही, यावर चर्चा झाली. पण सर्वानुमते प्रयोग करायचे ठरले. आमचा सगळा खर्च भागविण्यासाठी प्रत्येक प्रयोगानंतर आम्ही प्रेक्षकांमध्ये ताट फिरवत होतो. त्यात जे पैसे जमा व्हायचे ती रक्कम प्रयोगातील सर्व कलाकारांमध्ये समान वाटप केली जायची. त्यामुळे कमावणे तर सोडाच; पण गमावण्याची वेळ आली होती. प्रयोगादरम्यान एका अमेरिकन महिलेने आम्हा सगळ्या कलाकारांना तिच्या घरी जेवायला बोलावले आणि चक्क श्रीखंड-पुरीचे जेवण करून घातले. हा अपवाद करता आमच्या या अमेरिकन दौऱ्याचा अनुभव विदारक होता.

    नंतर सुयोग’ नाटय़संस्थेतर्फे १९९५-९६ च्या सुमारास ‘लेकुरे उदंड जाली’ हे नाटक पुन्हा एकदा नव्याने रंगमंचावर सादर केले. यात मा.प्रशांत दामले आणि सुकन्या कुलकर्णी-मोने प्रमुख भूमीका केल्या होत्या.

    प्रशांत दामले यांनी एका मुलाखतीत सांगीतले आहे. त्यात जी गाणी होती ती जुन्या काळची आणि अवघड होती. त्याचबरोबर त्यातले पल्लेदार संवादही महत्त्वाचे होते. त्या नाटकाच्या एका प्रयोगाला पु. ल. देशपांडे आणि पंडित जितेंद्र अभिषेकी आले होते. त्यांच्यासमोर प्रयोग करताना आणि त्यांनी चाल लावलेली गाणी म्हणताना मला दडपण आलं होतं, पण मी प्रयोग नेमकेपणानं केला. पुलं. आणि अभिषेकी बुवांनी प्रयोग संपल्यानंतर माझं कौतुक केलं, तो क्षण मी कधीच विसरणार नाही.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      November 2, 2016


  • शॉपिंग कार्ट अर्थात ट्रॉली

    goldman-shopping-trolleyमॉलमध्ये गेल्यानंतर ट्रॉली ढकलत शॉपिंग करणं, हे आपल्यापैकी अनेकांना आवडतं. परंतु कोणे एके काळी या ट्रॉलींचा वापर करणं ग्राहकांना अपमान वाटत होता. चातुर्याने केलेलं प्रमोशन आणि बदल यांच्यामुळे ट्रॉली अर्थात शापिंग कार्ट आज कमालीच्या लोकप्रिय आहेत. अमेरिकेतील एका सुपरमार्केटच्या मालकाने आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी तयार केलेली ही कार्ट आता सर्वसामान्यांच्या हाती जाऊन विसावली आहे.

    अमेरिकेतील ओक्लोहोमा शहरात असलेल्या ' पिग्गली विग्गली ' या सुपरमार्केटचा मालक सिल्यान गोल्डमन आपल्या ग्राहकांच्या हितासाठी नेहमीच प्रयत्न करत असे. ग्राहकांना खरेदीचा पुरेपूर आनंद घेता यावा यासाठी विविध सुविधा उपलब्ध करण्यात तो नेहमीच पुढाकार घ्यायचा. ग्राहकांनी जास्त सामान घेतल्यानंतर ते सांभाळता येत नसल्याने एका क्षमतेपलीकडे ते खरेदीच करत नसल्याचं गोल्डमनच्या लक्षात आले. त्यासाठी काय उपाय करता येईल, याचा तो विचार करू लागला. बास्केट उपलब्ध करुन दिलं तरीही तीच समस्या कायम राहत असल्याचं त्याला माहिती होते.

    एके रात्री तो ऑफिसमध्ये बसून याच विषयावर विचार करत होता. त्यावेळी त्याच्या सुपरमार्केटमधील मेकॅनिक क्रेड यंग त्याच्या केबिनमध्ये आला. त्याचक्षणी गोल्डमनला एक युक्ती सुचली. त्याने त्याच्या केबिनमधील लाकडी खुर्चीला बास्केट लावण्यास सांगितलं. त्यानंतर त्या खुर्चीच्या चारही पायांना चाकं लावण्यास सांगितलं. ही चालतीफिरती खुर्ची पाहून गोल्डमन खूश झाला. त्याने अशाप्रकारच्या काही खुर्च्या तयार करुन सुपरमार्केटमध्ये ठेवण्यास सांगितलं.

    उत्साहाने दुसर्‍या दिवशी गोल्डमन आल्यानंतर त्यानं पाहिलं, तर एकही ग्राहक या खुर्च्या वापरत नसल्याचे त्याला दिसून आलं. आम्ही खरेदी केलेलं सामान अशा खुर्च्यावर ठेवून आम्ही फिरायचं का, असा प्रश्न ते विचारु लागले. गोल्डमनने मग वेगळा मार्ग अनुसरला. त्याने या खुर्च्या ओढण्यासाठी काही माणसं ठेवली. हळूहळू लोकांना ही सुविधा आवडू लागली. तोपर्यंत त्यात बरेच बदल होत गेले. ४ जून १९३७ साली गोल्डमनने सुरू केलेली ही फिरती खुर्ची नंतर शॉपिंग कार्ट म्हणून लोकप्रिय पावली.

    आज संपूर्ण जगात या कार्टचा वापर केला जातो. आता तर लहान मुलांना त्यावर बसवण्याची सोयही करण्यात आली आहे.

    कधी एके काळी खूळ म्हणून ज्याकडे पाहिलं जात होते, आता त्याकडे खरेदी करतानाची महत्त्वाची गोष्ट म्हणून पाहिलं जात आहे.

      October 9, 2016


  • कारगिल विजय दिवस

    हा विजय इतिहासात सोनेरी अक्षरात लिहण्यासारखा आहे. कारगिल-द्रास सेक्टरमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये लढले गेलेले चौथे युद्ध मे ते जुलै असे तीन महिने चालले होते.

      July 26, 2021


  • किंकर्तव्यमूढम् !

    मुंबईत तरी रस्त्यातून चालताना फुटपाथ शोधणे हा एक संशोधनाचा विषय झाला आहे. फेरीवाले व दुकानदारांचा असा समाज आहे की फुटपाथ हे नागरिकांना चालण्यासाठी नसून आपल्यासाठीच बांधण्यात आले आहेत. सर्व भारतीय नागरीकांस व्यवसाय करण्याचा हक्क आहे पण रस्त्यावर व फुटपाथ व्यापून किंवा त्यावर बसून नाही कारण तो कायद्याच्या चौकटीत बसत नाही.

      December 24, 2011


  • मनाचे श्लोक – १३१ ते १४०

    भजाया जनी पाहता राम येकु | करी बाण येकु मुखी शब्द येकु |
    क्रिया पाहता उेरे सर्व लोकू | धरा जानकीनायकाचा विवेकु ||131||

    विचारूनि बोले विवंचूनि चाले | तयाचेनि संतत्प तेही निवाले |
    बरे शोधिल्याविण बोलो नको हो | जनी चालणे शुे नेमस्त राहो ||132||

    हरीभक्त वीरक्त विज्ञानरासी | जेणे मानसीं स्थापिले निश्चयासीं |
    तया दर्शनें स्पर्शनें पुण्य जोडे | तया भाषणें नष्ट संदेह मोडे ||133||

    नसे गर्व आंगी सदा वीतरागी | क्षमा शांति भोगी दयादक्ष योगी |
    नसे लोभ ना क्षोभ ना दैन्यवाणा | इंही लक्षणी जाणिजे योगिराणा ||134||

    धरी रे मना संगती सज्जनाची | जेणे वृति हे पालटे दुर्जनाची |
    बळे भाव सद्बुेि सन्मार्ग लागे | महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे ||135||

    भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे | भयातीत ते संत आनंत पाहे |
    जया पाहता द्वैत कांही दिसेना | भय मानसी सर्वथाही असेना ||136||

    जिवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनि गेले | परी जीव अज्ञान तैसेचि ठेले |
    देहेबुेिचे कर्म खोटे टळेना | जुने ठेवणे मीपणे आकळेना ||137||

    भ्रमे नाडळे वित ते गुफ्त जाले | जिवा जन्मदारिद ठाकूनि आले |
    देहेबुेिचा निश्र्चयो ज्या टल्íना | ठ्ठजुने ठेवणे मीपणे आकळेना ||138||

    पुढे पाहता सर्वही केंदलेसे | अभाग्यास हे दृश्य पाषाण भासे |
    अभावे कदा पुण्य गांठी पडेना | जुने ठेवणे मीपणे आकळेना ||139||

    जयाचे तया चूकले प्राफ्त नाही | गुणे गोविले जाहले दुःख देही |
    गुणावेगळी वृति तेही वळेना | जुने ठेवणे मीपणे आकळेना ||140||

    - श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)

      January 16, 2016


  • असा पदर पदर

    असा पदर पदर

    माझं बऱ्याच लग्नसमारंभातून, सोशल गॅदरींगमधून किंवा अशाच काही विशेष घरगुती सोहळ्यांना जाणं होत असतं. बऱ्याच वर्षांपासून मला असं दिसतं की, अगदी फेटेबंद मराठमोळा असलेल्या या कार्यक्रमातून बऱ्याच कुमार-तरुण ललना मला गुजराती पद्धतीची साडी नेसून दिसतात.

      November 2, 2018


  • स्कंदमाता – पांचवी माळ

    स्कंदमातेने तिच्या भक्तांना विद्या प्राप्तीचं वरदान दिलेलं आहे. सहा वर्गांच्या कन्येचं स्वरुप मानून अशा कन्येला पूजा करवून गायीच्या तुपाचा नैवेद्य दाखविला जातो. स्कंदमातेने ती शिवस्वरुप असलेने या दिवशी तिला बेलपत्रांची माळ अर्पण केल्यास ती प्रसन्न राहते. तिला कालीमाता म्हणूनही ओळखतात.

      October 18, 2018


  • कल्याणवृष्टिस्तव – १२

    संपत्कराणि सकलॆन्द्रियनन्दनानि
    साम्राज्यदाननिरतानि सरॊरुहाक्षि ।
    त्वद्वन्दनानि दुरिताहरणॊद्यतानि
    मामॆव मातरनिशं कलयन्तु नान्यम् ॥ १२ ॥

    मान्ये- हे सगळ्यांना मान्य अर्थात वंदनीय असणाऱ्या आई जगदंबे! सर्वसामान्य मानवच नव्हे तर ईश्वर महेश्वर देखील जिच्या योग्यतेचा सन्मान करतात अशी.

    सरोरूहाक्षि- हे कमलनयने. सर म्हणजे तलाव. त्यात उरुह म्हणजे जन्माला येऊन वर येणारे. अर्थात कमळ. तसे जिचे अक्ष म्हणजे डोळे आहेत अशी.

    येथे केवळ आकाराच नव्हे तर गुणांचाही विचार आहे. ते कमळ जसे भुंग्यांना आकर्षित करते तशी जिची कृपादृष्टी साधकांना आकर्षित करते, अशी.

    त्वद्वंदनानि- तुला केलेली वंदने अर्थात नमस्कार, प्रार्थना.
    कशासाठी करायची ही प्रार्थना? तरीही प्रार्थना अलौकिक फलदायी आहे.
    ही प्रार्थना काय काय देते? याचे वर्णन करताना पूज्यपाद आचार्य श्री म्हणतात,

    सम्पत्कराणि- सकल संपत्तीला उपलब्ध करून देणारी. जिच्या कृपेने बाह्य जगतातील धनसंपत्ती आणि अंतर्मनातील शम,दम इत्यादी षट् संपत्ती, साधकांना प्राप्त होते अशी.

    सकलेन्द्रिय नन्दनानि- सकल इंद्रियांना आनंद देणारी. बाह्य जगतातील पंचकर्मेद्रिये, पंचज्ञानेंद्रिय आणि अंतर्गत इंद्रिय मन अशा अकराही इंद्रियांना आनंद देणारी.

    शब्द, स्पर्श इ. पाचही पद्धतीने प्राप्त होणारे सर्व आनंद प्रदान करणारी. त्या आनंदाला साधनीभूत होणारी साधने प्रदान करणारी.

    साम्राज्यदान विभवानि- आपल्या भक्तांना साम्राज्य दान देण्याचे वैभव असणारी.

    दुरिताहरणोद्यतानि- दुरित अर्थात पाप, वाईट ,अमंगल. त्याचे हरण करण्यास म्हणजे नष्ट करण्यास उद्यत म्हणजे कायम सिद्ध असणारी.

    अशी ही आईची वंदना,

    मामेव- माझ्यावरच, मलाच.

    मातरनिशं - हे माते अनिश अर्थात सतत.

    कलयन्तु- प्राप्त होत राहो.

    अर्थात अशा सर्व अद्वितीय गुणांनी युक्त असणारी ही वंदना सतत करण्याची शक्ती मला प्राप्त होवो.

    नान्यम् - मला अन्य काहीही नको.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      April 23, 2020


  • “गटारी” अमावस्या म्हणजे आपली “दीप अमावस्या”

    आपल्याकडे प्रत्येक प्रथेमागे, सणामागे काही ना काही सामाजिक आणि शास्त्रीय कारणे ही आहेतच. दीप अमावास्येच्या दुसऱ्या दिवशीपासून महाराष्ट्रात श्रावण सुरु होतो. ऊन-पावसाचा खेळ. अंधार देखील लवकर पडू लागतो. कदाचित म्हणूनच पूर्वी दीप अमावास्येच्या निमित्ताने घरातील सर्व दिवे बाहेर काढून त्या योगे त्यांची स्वच्छता व्हावी असे अध्यारूत असावे.

      July 20, 2017