(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती..!

    ज्ञानेश्वरांनी लिहीलेल्या ९९६ स्फुट रचनां मधली सर्वोत्कृष्ट रचना ही असावी … या गाण्यात विठ्ठलाच्या उत्पतीचा मागोवा घेतलाय ,गाणं तर अर्थपुर्ण सुंदर आहेच पण आशयाच्या दृष्टीने ही बहुअर्थसूचक ,शब्दांच्या पलीकडे जाऊन येणाऱ्या अनुभुती चं आकलन करुन देणारा आहे … ‘कानडाऊ विठ्ठलु कर्नाटकु येणे मज लावियेला वेधु …!’

      July 12, 2019


  • आव्हान चिनी ड्रॅगनचे

    आव्हान चिनी ड्रॅगनचे हे ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचे पुस्तक 1962 चे चिनी आक्रमण, भारत चीन संबंधाचे आजचे स्वरूप,- भविष्यात चीनसोबत युद्ध होईल का ? असे अनेक पैलू सांगणारे सुबोध पुस्तक आहे.

      October 17, 2013


  • धम्मचक्र प्रवर्तन दिन

    दीक्षाभूमीवर येणाऱ्यांमध्ये दरवर्षी ३० टक्के नवीन लोकांचा समावेश असतो. यामध्ये बहुतांश तरुणाई असते. ही तरुणाई बाबासाहेबांचे विचार समाजामध्ये पसरवण्यासाठी येथून प्रेरणा घेत असते.

      October 14, 2021


  • प्रमुख आहारसूत्र – प्रमेह भाग २४

    "दूध आणि दही सुद्धा डायबेटीस मधे चालत नाही म्हणजे काय ?"
    "आहो, आम्ही आमच्या लहानपणापासून ऐकतोय दूध पूर्णान्न आहे म्हणून.त्याचं काय ?"

    कच्च्या मालापेक्षा पक्का माल विकावा.त्यात जास्ती फायदा असतो. हे आजचे व्यापारशास्त्र पण सांगते. कृष्णाने सुद्धा द्वापारयुगात तेच केले होते. कृतीतही आणले होते. गोकुळातून दूध आणि दह्याची मडकी मथुरेत, कंसाच्या राज्यात जात होती. दूध आणि दही खाण्यापेक्षा त्यापासून बनणारे ताक, लोणी आणि तूप हे उत्तरोत्तर अधिक सुपाच्य, पौष्टिक आणि जास्त चलन मिळवून देणारे अमृत असे सहजपणे शत्रुला द्यायचे ? म्हणून तर कृष्णाने मथुरेत जाणारी दुधदह्याची मडकी फोडून टाकून, डेऱ्यातील ताक, लोणी तूप मात्र, चोरून का होईना, स्वदेशातच वाटून आपल्याच बांधवाना पुष्ट केले.

    आणि असे ताकद वाढवणारे ताक, लोणी आणि तूप हे प्रमेहातही अपथ्यकर नाही. उलट ताक पचायला हलके, सदा पथ्यकर, अग्निला विझू न देणारे, आणि गुणाने रूक्ष आहे. तूप हे तर पित्ताला कमी करून अग्निला वाढवणारे एकमेव द्रव्य असावे.

    आमच्या राज्यातील ताक लोणी आणि तुपाचं हे अमृत शत्रुपक्षाला विकण्यापेक्षा, दुधाची आणि दह्याची मडकी फोडून टाकणारा, प्रमेहाचे प्रतिकात्मक कारण नष्ट करणारा, भगवान श्रीकृष्ण आमचा आदर्श असला पाहिजे.

    आयुर्वेदानुसार डायबेटीसला म्हणे गुळ चालतो. कोणीतरी, काहीतरी चर्चेसाठी पिल्लू सोडून देतो झालं. ग्रंथकार इतक्या स्पष्ट शब्दात गुळाचा उल्लेख, प्रमेह होण्याच्या कारणांमधे करीत आहेत, त्याला कसे नाकारायचे ? केवळ गुळच नव्हे तर गुळापासून बनलेले पुढील सर्व पदार्थ देखील अपथ्यकर सांगितले आहेत.

    बरं आता जो गुळ बाजारात मिळतोय, तो फुल्ल ऑफ केमिकल. पिवळा आणि पांढरट रंगाचा गुळ हा चवीला खारटही लागतो, तो त्यातील घातक रसायनांमुळे. या रसायनांमुळे मधुमेह सोडाच, कॅन्सर सारखे जीवघेणे आजार पाठी लागताहेत. हे लक्षातच येत नाही. पूर्वी गुळाला मुंगळे यायचे, गुळाच्या ढेपीवर मधमाश्या फिरायच्या. आता त्यातील विषारी रसायनांमुळे किटकसुद्धा येईनासे झाले आहेत.

    तसं गुळ पूर्वी च्या तुलनेत कमीच वापरला जातोय म्हणा ! पूर्वी कसं, बाहेरून कुणी पाहुणं आलं की गुळपाणी विचारलं जायचं. आता पाणीही विचारत नाहीत, गुळ तर लांबच राहीला. पूर्वी चहामधे पण गुळ वापरला जायचा. आता गुळाचे अतिशुद्ध विषारी रूप म्हणून साखर वापरली जातेय. !

    गुळ अभिष्यंद उत्पन्न करणारा म्हणजे चिकटपणा करणारा आहे. शिवाय मधुररसाचा आहे. म्हणून प्रमेहामधे अपथ्यकर सांगितलेला आहे.

    मधुर चवीपेक्षा, चिकटपणा जास्त गडबड करतो. आता हेच बघा ना.
    आपल्या हातावर कोणीतरी साखर ठेवली. पटकन तोंडात टाकली. हात पुसुन मोकळे. हाताला साखर चिकटत नव्हती. पण हातावर साखर ठेवली. आणि हातातील साखरेवर अर्धा चमचाच पाणी घातले आणि सांगितले, "आता फक्त साखर खा" तर ????

    साखर खाल्ल्यानंतर हाताला जसा चिकटपणा उरतो, तसाच चिकटपणा पोटातही तयार होतो, जो काढायला जास्ती कष्ट पडतात. अग्नि लवकर संपतो. आणि प्रमेहाची लक्षणे दिसतात. हा चिकटपणा जेवढा कमी होईल तेवढा प्रमेह लवकर नियंत्रणात येईल.

    साखरेऐवजी वापरल्या जाणाऱ्या सॅक्रीनच्या गोळ्या, साखरेपेक्षा घातक ! अमेरिकेत कधीच बंद झाल्यात. अमेरिकेची अशी काही क्रेझ निर्माण झाली आहे ना, की उदाहरण देऊन पटवायचे झाले तरी अमेरीकाच आठवते. असो.

    सॅक्रीनपेक्षा दोन चिमूट साखरच परवडली. साखरेपेक्षा थोडी कमी रसायने खडीसाखरेत असतात.

    एकंदरीत प्रमेह हा भरपूर गैरसमजांनी भरलेला एक गोड आजार आहे, एवढे मात्र खरे !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    09.02.2017

      February 9, 2017


  • आयुष्यावर बोलू काही “ची … अठरा वर्ष..

    ३ ऑगस्ट २००३ ला सहज म्हणून सादर केलेला एक कार्यक्रम , संदीपच्या कविता आणि गाणी आणि मी आणि संदीपने केलेली गाणी , असा एक प्रयोग करून तर बघूया इतक्या सहज सुचलेली ही कल्पना . एक प्रयोग झाला. हाउसफुल्ल !! उत्तम दाद मिळाली . आम्हालाही मजा आली . बास्स्स ... आनंदाने आपापल्या घरी गेलो ... !!
    लगेच त्याचं BROUCHURE छापून सगळ्या जगभरातल्या मराठी माणसांना सांगूया कि असा असा एक कार्यक्रम सुरु झाला आहे , असं काहीही मनातच आलं नाही . आपली गाणी , कविता लोकांना आवडल्या आणि आपल्यालाही मजा आली एवढाच काय तो निष्कर्ष . त्यात तेव्हा कॉलेजकुमार असलेला आदित्य आठल्ये तबल्यावर , नितीन चंद्रचूड ह्यांचा साऊंड आणि मी आणि संदीप , असे एकूण चार जण , एवढी मोठी टीम!!:)
    जवळजवळ महिनाभराने संदीपशी फोनवर बोलणं झालं तेव्हा, अजून एकदा करूया का रे ? मजा आली होती त्या दिवशी , बघूया आले तर आले लोक, नाहीतर आपण काँट्रीब्युशन काढून करू एक प्रयोग" असं बोलणं झालं, पुन्हा हाउसफुल्ल !!
    मग तिसरा ... मग चौथा ...तुम्ही दाद देत राहिलात आणि आम्ही गात राहिलो .
    मग पुण्याबाहेर पहिला, कोल्हापूर मग सांगली ... मुंबईचा एक संगीतकार मला जळक्या ( ज्याला मुंबईत पुणेरी म्हणतात ) टोन मध्ये म्हणाला होता , हा कार्यक्रम पुण्यात वर्ल्ड फेमस आहे ना ? मी हसलो होतो ...
    १७ देशात कार्यक्रम झाले अगदी ,अमेरिकेत ४० हुन अधिक शहरात हाऊसफुल .... भारतात अनेक शहरात ... महाराष्ट्रात अगदी छोट्या गावांपासून ते शुक्रवार, शनिवार रविवार. ठाणे, दादर, पार्ले असे हाउसफुल्ल कार्यक्रम ...कोकण ,विदर्भ , मराठवाडा , नाशिक, सांगली, कोल्हापूर, बेळगाव, गोवा, बंगलोर, बडोदा, दिल्ली, इंदोर,भोपाळ ... सगळीकडे तेच प्रेम,तोच उत्साह
    शंभर शंभर वेळा आयुष्यवर बोलू काही बघणारे अनेक रसिक आहेत .आम्ही शब्द विसरलो तर गाणं पूर्ण करतील असे अनेक मित्र जोडले गेले. संपूर्ण थिएटर आमच्याबरोबर गातांना ऐकण्याचा योग वर्षानुवर्षे या कार्यक्रमाच्या पत्रिकेत आहे .
    १०० वा ... मग झी मराठीवर प्रक्षेपित झालेला ५०० वा ... मग ... १००० ... ११११... आणि आता १४०० च्या जवळ आलेली प्रयोगांची संख्या ...
    मधल्या काळात अत्यंत गुणी गिटार वादक, रितेश ओहोळ या कुटुंबात सहभागी झाला आणि आता कार्यक्रमाचा अविभाज्य भाग झाला. अजूनही तबल्याला आदित्य आठल्ये आणि साऊंड नितीन चंद्रचूड ह्यांचाच आहे , कॉलेजकुमार आदित्य आता `बाबा ` झाला आहे
    शुभंकरला कडेवर घेऊन कार्यक्रमाला गेलो होतो तो दिवस आठवतो, आणि आता शुभंकर अनेक कार्यक्रमात गायला. त्याच्या गाण्याच्या फर्माईशी मला येतात , एकटी एकटी घाबरलीस ना, करून करून काळजी माझी गायलाच हवं असं रसिक म्हणतात . एक मोठा प्रवास ! १८ वर्ष !!

    सातत्याने नवीन गाणी, कविता ... अगदी ... दिवस असे कि, हे भलते अवघड असते, अताशा असे हे , नामंजूर ... सांग सख्या रे .. पाऊस असा रुणझुणता, मोर्चा नेला नाही, मेघ नसता वीज नसता, तुझे नि माझे नाते काय ? ... इथपासून दिवा लागू दे रे देवा आणि संदीपच्या अनेक नवनवीन कविता ,अगदी नुकत्याच प्रकाशित झालेल्या ` मी आणि माझा आवाज ` ह्या पुस्तकातील कविता आणि आम्ही नुकतंच केलेलं , रुक जा जालीम आखरी बार पर्यन्त ... अग्गोबाई पासून दूर देशी गेला बाबा पर्यन्त आणि दमलेल्या बाबा पासून ऐसे काही व्हावे मन शांत निजावे ... प्रत्येक रचनेला तुम्ही आशीर्वाद दिला.

    खूप रसिक, संयोजक, वाहन चालक, ध्वनिसंयोजक , सगळ्यांचे हात मनापासून ह्यात सहभागी झाले म्हणून हा प्रवास इतका सहज सुंदर झाला .

    अजूनही ह्या कार्यक्रमाचं BROUCHURE नाहीये . कोणी AGENCY नाही. कार्यक्रम तुम्ही रसिकांनी मोठा केला ... तो तुमचा होता आणि तुमचाच राहील .

    - सलील कुलकर्णी.
    संकलन : संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      August 3, 2021


  • निरंजन – भाग ३० – माता कात्यायनी

    माता कात्यायनी हा दुर्गेचा सहावा अवतार आहे. महर्षी कात्यायन यांच्याकडे मातेने कन्या स्वरूपात येऊन काही काळ सहवास केला होता. त्यामुळे महर्षी कात्यायन यांच्या नावावरून मातेला कात्यायन हे नाव देण्यात आले.

      October 26, 2020


  • सामाजिक बांधिलकीची जाणीव

    सामाजिक बांधिलकीची जाणीव बालपणापासूनच लहान मुलांमध्ये निर्माण करणं जरुरीचं असतं, त्याचं भान त्यांच्याकडून राखलं जातं का? हे पाहणं गरजेचं असतं. आजची लहान मुलंच ह्या देशासाठी उद्याची संपत्ती असल्याचं आपण बोलतो, ऐकतो; त्यानुषंगाने मुलांचा विकास झाला तरंच राष्ट्राची प्रगती होईल.

      June 11, 2026


  • आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र ! : भाग २

    आज आर्थिक, वित्तीय व औद्योगिक क्षेत्रात परदेशियांनी (पाश्चिमात्यांनी) आपल्‍यावर आक्रमणच केलेलें आहे. ‘बळी तो कान पिळी’ या न्‍यायानें सगळीकडे आम्हांस ते त्‍यांच्‍या मर्जीप्रमाणें वाकवतात. शस्‍त्रास्‍त्रनिर्मिती करणार्‍या परदेशी कंपन्‍या चालाव्‍यात म्‍हणून अविकसित देशांना शस्‍त्र विक्री केली जाते . रासायनिक युद्धतंत्रविषयक  ( केमिकल वॉरफेअर ) ज्ञानातून कीटकनाशकांची ( पेस्टिसाइडस् ) निर्मिती होते , त्‍या हानिकारक उत्‍पादनांवर विकसित देशांत बंदी घातली जाते आणि इकडे तेच तंत्र भारतीय कंपन्‍यांना पुरवलें जातें.

      March 27, 2019


  • मेक बिलीव्ह – बरंच भ्रामक, किंचित खरं !

    चित्रपटाच्या पांढऱ्या पडद्यावर दिसणारे सगळे खरे आणि म्हणून भावनांना अपील करणारे असते या वयातून मी गेलोय.

      May 16, 2022


  • रायगडाला जेव्हा जाग येते

    रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाच्या पहिला प्रयोगाला ६० वर्षे झाली. या नाटकाचा २६ ऑक्टोबर १९६२ रोजी पहिला प्रयोग झाला.

      July 17, 2023