(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मतपेटीच्या राजकारणामुळे पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशी घुसखोरीस मदत

    आपली व्होटबॅंक फुगवण्यासाठी ३० वर्षांपासून डाव्या आघाडीच्या राज्य सरकारांनी आणी तृणमूल काँग्रेसने  मागच्या १० वर्षात पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशी घुसखोरी मोठ्या प्रमाणावर  होऊ दिली. बंगालचे बांगलादेशीकरण करण्यासाठी डीजेएमआय व आयएसआयने मिळून गेल्या ४८ वर्षांपासून पश्चिम बंगालच्या लोकसंख्येची प्रतवारी बदलण्याचा पद्धतशीर प्रयत्न चालविला आहे. भारतीय नागरिक असल्याची कागदपत्रे, शिधावाटप पत्रिका, मतदार ओळखपत्रे मिळवून बांगलादेशी घुसखोर भारतात स्थायिक झाले आहेत.

      June 27, 2019


  • श्रीदत्तजयंती

    मार्गशीर्ष पौर्णिमेला अत्री ऋर्षीच्या आश्रमात ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा एकत्रित अवतार दत्त या नावाने झाला. म्हणून या पौर्णिमेला दत्तजयंती साजरी करतात.

      October 1, 2023


  • लुटारूंनी लुटारुंसाठी…!

    दारिद्र्य रेषा’ हा सरकारी भाषेतील एक नेहमी ऐकू येणारा शब्द. या रेषेचे काही निकष आहेत. हे निकष साधारणत: उत्पन्नाच्या संदर्भात असतात.

      November 6, 2005


  • गोष्ट सांगा आणि गणित शिकवा – ५

    नेहा, चिंट्या सायली तिघे ही चक्रावले… सॅमीने त्याचा खुर्चीच्या मागे, त्याला न दिसणाऱ्या दिव्याचा रंग कसा ओळखला असेल? कॅप्टन नेमोंच्या उत्तरात काय क्लु होता? काय दिसले असेल त्यांना?

      April 25, 2021


  • ऑक्टोबर ११ – जन्म-मृत्यू ११ ऑक्टोबर आणि ‘मंद’ कसोटी

    ११ ऑक्टोबर १९४३ रोजी खर्‍याखुर्‍या कॅलिप्सो खेळाडूचा जन्म झाला. (कॅलिप्सो हा आधी एकदा सांगितल्याप्रमाणे वेस्ट इंडीजमधील-विशेषतः त्रिनिदादमधील – तालबद्ध नृत्याचा एक प्रकार आहे.)

      October 5, 2010


  • मी धर्माचं रक्षण करीन, धर्माचं पालन करीन

    "मै दीनदार बुत-शिकन..!"
    "मै दीनदार कुफ़्र-शिकन..!"

    ("मी मूर्ती फोडीन, मी काफरांची कत्तल करीन आणि अश्या प्रकारे मी धर्माचं रक्षण करीन, धर्माचं पालन करीन!!")

    असं अत्यंत अभिमानानी जो स्वतःबद्दल बोलत होता.., त्याप्रमाणे त्यानी हजारो मूर्ती फोडल्या, अनेक काफरांची कत्तल केली, अनेक हिंदू स्त्रियांवर बलात्कार केले.. आणि त्याच्या परीने त्याची ही प्रतिज्ञा जितकी शक्य झाली तितकी पूर्णही केली..!

    असा अफजलखान पठाण हा केवळ सीमा विस्तारायला आला होता, त्याला धर्माचा प्रचारक म्हणून तुम्ही त्याची दुष्कीर्ती केलीत.. आणि शिवाजी महाराजांना घरात नेऊन बसवलंत !

    हे संतापजनक वक्तव्य ऐकलं..

    हिंदूंच्या विजयी इतिहासाचं नुसतं स्मरण आणि यथाशक्य अनुकरण करून हा देश विश्वविजयी होऊ शकतो इतका तो इतिहास प्रेरणादायी आहे..

    आणि म्हणूनच देशद्रोही, इतिहासाचं विकृतीकरण करू पाहतायत..
    त्याच देशधर्मबुडव्या पाप्यांच्या यादीत हा मुंब्र्याच्या गळ्यातला ताईत बसू पाहतोय..

    या इतिहासाचं विकृतीकरण व्हायच्या आत सगळ्या जगाला ओरडून सांगूया..!

    अफजलखान हा इस्लाम चा प्रचारकच होता..
    त्यासाठी त्यानी अतिशय क्रूर पद्धतीनी हिंदू स्त्री पुरुषांवर अनंत अत्याचार केले, अनेक देवळं फोडलीत, शेकडो गाईंचं रक्त सांडलं..

    आणि गोब्राह्मणप्रतिपालक, हिंदूधर्मसंरक्षक, शिवरायांनी त्याचा कोथळा बाहेर काढला आणि हा क्रूरकर्मा ठार केला..

    त्या शिवरायांना आम्ही नुसतं घरात नाही आमच्या देवघरात ठेवतो आणि त्याही पलीकडे त्यांची प्रतिष्ठापना आमच्या हृदयात करतो...
    आणि अशी प्रतिज्ञा करतो की ही शिवज्योत सदैव तेवत ठेवू आणि एका ज्योतीनी अश्या अनेक ज्योती पेटवत राहू.

    -- गीता उपासनी

      June 20, 2017


  • हजार तोंडांचा रावण – एक झलक !

    डायनासोरहून कितीतरी पटीने मोठा भीमकाय भ्रष्टाचार धावताधावता थांबला. तरी तो बराच पुढे आलेला होता. त्याच्या पायांना लाखो अश्वांचा वेग मिळालेला होता, तर अनेक हत्ती सामावतील एवढे मोठे पोट झालेले होते. स्वतःला आवरायला, सावरायला त्याने बराच वेळ घेतला. नंतर जागच्या जागी उभे राहून मोठ्या कष्टाने त्याने मान वळवली.

      August 27, 2023


  • पेढे घ्या पेढे

    गरमागरम चहाचा आस्वाद घेत असताना पेपरवाल्याने कधी नव्हे तो आज वेळेवर पेपर टाकला. पेपरच्या मुखपृष्ठावर एक मोठ्ठे छायाचित्र छापले होते. त्यात रस्त्याच्या कडेला खडी फोडत बसलेली मजूर स्त्री आणि तिच्या शेजारी नखशिखांत धुळीने माखलेला व रणरणत्या उन्हात मनसोक्त खेळत असलेला तिचा मुलगा दाखवला होता व त्या छायाचित्राखाली लिहिले होते- आज जागतिक महिला दिन ! अशा दिवसाची सर्वांना आठवण करून देण्यासाठी हताश, उदास, गरीब, अत्यंत कष्टप्रद काम करणा-या व नेसत्या वस्त्रांच्या चिंध्या झालेल्या महिलांचे भलेमोठे फोटो प्रसिद्ध करून या वर्तमानपत्रवाल्यांना त्यांच्या वाचकांपर्यंत नक्की कोणता संदेश पोहोचवायचा असतो, हे आजपर्यंत मला कळलेले नाही. आज जर ‘जागतिक महिला दिन’ आहे तर ‘जागतिक पुरुष दिन’ केव्हा साजरा करत असतील?, असा एक विचार विनाकारण मनाला चाळवून गेला. महिलांचे फोटो, त्यांच्या यशोगाथा व मुलाखतींने पेपरची सर्व पाने ओसंडून वाहत होती. टीव्हीवर काही वेगळे बघता येईल म्हणून प्रयत्न केला, तर ए नावाच्या चॅनेलपासून तर झेड नावाच्या चॅनेलपर्यंत एकूण एक वाहिन्या महिलांनी व्यापून टाकल्या होत्या. ‘कसा तुमच्या लक्षात राहत नाही आजचा दिवस तेच बघतो’, असा आज सर्वांनी चंगच बांधला असावा ! या सर्वांपासून दूर जाऊन एखादे आवडीचे पुस्तक वाचावे म्हणून उठणार, एवढ्यात दारावरची बेल वाजली आणि मी प्रचंड वैतागलो. आजची सुंदर सकाळ आपल्या मनाप्रमाणे घालवता येणार नाही याची खात्री पटल्यामुळे कपाळावर आठ्यांचे जाळे विणत अत्यंत अनिच्छेने दरवाजा उघडला, तर समोर आनंदाने निथळत असलेल्या चेह-याने हातात कसलातरी बॉक्स घेऊन तो उभा होता. दोन वर्षांपूर्वी इमारतीत वास्तव्यासाठी आलेल्या या व्यक्तीने कोणाशीही संबंध न ठेवल्यामुळे आज प्रथमच व अचानक तो स्वत: भेटायला आल्यानंतर माझा चेहरा प्रश्नचिन्हांनी भरून गेला. त्याने एकही क्षण वाया न घालवता तो बॉक्स माझ्या हातात ठेवला व त्याच्या तोंडातून दोन शब्द बाहेर पडले, ‘सर, पेढे !’ ‘अहो, पण कशाबद्दल?’ मीही वेळ वाया न घालवता प्रश्न विचारला. ‘मुलगा !’ त्याचे टेलिग्राफिक उत्तर ऐकून मी जवळपास ओरडलोच- ‘अहो, केव्हा झाला आणि इथे कोणालाच कसे माहीत नाही?’ गेली दोन वर्षे आमच्या फ्लॅटच्या बाल्कनीतून त्याची बायको आम्हाला सतत दिसायची व त्या काळात ती गर्भवती असल्याचे एकदाही लक्षण दिसले नव्हते. त्यामुळे त्याच्या तोंडून ‘मुलगा’ हा शब्द ऐकल्याबरोबर मी उडालोच. माझी अवस्था त्याच्या लक्षात आल्यामुळे तो म्हणाला, ‘सर, मुलगा अजून झाला नाही, होणार आहे. डिलिव्हरीला अजून काही महिने वेळ आहे.’ त्याच्या या वक्तव्यावर मी अवाक् होऊन आळीपाळीने एकदा त्याच्याकडे व एकदा त्या पेढ्यांच्या बॉक्सकडे बघू लागलो आणि त्यानंतर हळूहळू माझ्या डोक्यात प्रकाश पडू लागला. माझ्या कोणत्याही प्रश्नाची वाट न बघता त्याने बोलायला सुरवात केली.

    ‘सर, तुम्हाला तर माहीतच आहे की मला शाळेत जाणारी एक मुलगी आहे. आम्हाला मुलगा नाही म्हणून काही वर्षांपासून आम्ही दोघेही खूप दु:खी होतो. शेवटी मी निर्णय घेतला की, आता आपल्याला मुलगा झालाच पाहिजे. माझी बायको गर्भवती आहे असे कळले, की मी डॉक्टरांकडे जाऊन तिची टेस्ट करून घ्यायचो. मुलगी असल्याचे कळले की लगेच गर्भपात. गेल्या तीन वर्षांत तिचा चारदा गर्भपात केला. पाचव्या खेपेला मुलगा असल्याचे कळले आणि वेळ वाया न घालवता सर्वांना पेढे वाटण्यास सुरुवात केली !’

    त्याच्या बोलण्यातली सहजता व न लपवता येणा-या आनंदामुळे मला एका प्रचंड अस्वस्थतेने घेरून टाकले. माझ्याशी बोलत असलेला व स्वत:ला सुशिक्षित समजणारा एक माणूस पराकोटीच्या अशिक्षित व असंस्कृतपणाचे अत्यंत निर्विकारपणे प्रदर्शन करत माझ्यासमोर उभा होता. गप्प बसून ते सर्व सहन करणे अशक्य झाल्यामुळे माझ्या तोंडून नकळत प्रश्न निघून गेला, ‘साहेब, गर्भाचं लिंग ओळखण्याच्या चाचण्यांवर कायद्याने बंदी आहे, हे तुम्हाला माहीत आहे नं?’ तो मोठ्याने हसला व हसताहसता म्हणाला, ‘सर, अहो कुठल्या काळात जगताय तुम्ही? अशी बंदी आणल्याने का कधी काही गोष्टी थांबत असतात आपल्या देशात? तुमच्या दृष्टीने जी बंदी आहे ती अनेकांसाठी सुवर्णसंधी आहे. दारूबंदी असो की गर्भजल परीक्षेवर आणलेली बंदी, त्यात होत असते अनेकांची चांदी ! बंदी येण्याआधी ही चाचणी किती स्वस्त होती? पण बंदी आली आणि तिने अनेकांच्या बंगल्यांवर सोन्याची कौलं चढवली.’ माझ्या चेह-यावरील अविश्वास बघून त्याने नागपूर, औरंगाबाद, नाशिक, पुणे व मुंबईतील चाचण्यांची ‘रेट लिस्ट’च मला ऐकवली. मी सुन्न होऊन त्याच्या चेह-याकडे बघत असताना त्याने माझा केव्हा निरोप घेतला हे माझ्या लक्षातही आले नाही. पुत्रप्राप्तीसाठी चार मुलींचा गर्भावस्थेतच खून पाडणारा एक सुशिक्षित बाप जागतिक महिला दिनाच्या दिवशी बिनदिक्कत सर्वत्र पेढे वाटत फिरत होता !

    आपल्या महान देशाच्या उत्तरेकडील राज्यात मुलगी जन्माला येताच तिला दुधात बुडवून ठार मारण्यात येते, हे अनेक वर्षांपूर्वी ऐकल्यानंतर बसलेल्या धक्क्यातून सावरत नाही तोच राजस्थानात नवजात मुलींना मारण्यासाठी त्यांच्या तोंडात जळजळीत कॉस्टिक सोडा टाकण्यात येतो, तर काही स्त्रीलिंगी गर्भांना जन्म होताच यमसदनी पाठवण्यासाठी त्यांना गरम वाळूच्या पोत्यात भरून व त्या पोत्याचे तोंड करकच्च बांधून त्याला कडक उन्हात ठेवण्यात येते, हे वाचल्यानंतर माझा मनुष्यप्राण्यावरील विश्वास उडण्यास सुरुवात झाली. मला कळेना की या जगात सर्वात क्रूर नक्की कोण? या पृथ्वीवरील ज्यूंना नामशेष करण्यासाठी त्यांचा अनन्वित छळ करणारा हिटलर, की मुलीला आईच्या पोटातच संपवणारे किंवा तिचा जन्म होताच अत्यंत क्रूरपणे तिची हत्या करणारे तिचे सख्खे जन्मदाते, की त्या हत्या करण्यासाठी घसघशीत फी आकारून उत्साहाने मदत करणारे पांढ-या डगल्यातील सोफिस्टिकेटेड राक्षस?

    पेढे वाटणा-या शेजा-याचा आनंदी चेहरा माझ्या डोळ्यासमोरून हलत नव्हता. जागतिक महिला दिनानिमित्त सकाळपासून वर्तमानपत्रात व टीव्हीवर सावित्रीबाई फुले, मादाम क्यूरी, इंदिरा गांधी, मार्गारेट थॅचर, कल्पना चावला व अनेक जगप्रसिद्ध महिलांचे गायले जात असलेले गोडवे माझ्या कानांमधून मेंदूपर्यंत पोहोचत नव्हते. सतत गर्भपात करणे अत्यंत धोकादायक असते व त्यात स्त्रीला स्वत:चा जीवही गमवावा लागू शकतो, ही माहिती चार गर्भपातांनंतर मुलाला जन्म देण्याच्या तयारीत असलेल्या त्या गर्भवतीपर्यंत पोहोचवण्याचा मी जेव्हा प्रयत्न केला, तेव्हा तिचे उत्तर होते - ‘माझा जीव गेला असता तरी चाललं असतं, पण मलाही मुलगाच पाहिजे होता !’

    श्रीकांत पोहनकर
    98226 98100
    shrikantpohankar@gmail.com

      March 12, 2017


  • तेरवी गोडजेवण बंद करा

    काळाची आपली एक गती असते, एक प्रवाह असतो. हा प्रवाह सतत बदलत असतो. या बदलत्या प्रवाहाशी जुळवून घेतच आपली वाटचाल सुरू असते. काळासोबत अनेक गोष्टी बदलत जातात, हे बदल स्वीकारले जातात, स्वीकारावेच लागतात. काळाच्या प्रवाहात टिकून राहायचे असेल तर दूसरा पर्याय नसतो. प्रत्येक जीवमात्रात ही प्रवृत्ती आढळून येते. मानव त्याला अपवाद नाही. आपले अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल तर काळासोबत बदलावेच लागते. इतर प्राण्यांच्या तुलनेत मानवप्राणी बौद्धिकदृष्ट्या खूप अधिक विकसित असल्याने या बदलांचे स्वरूप त्याच्यासाठी बरेच व्यापक असते. या बदलांचा थेट संबंध त्याच्या जीवनशैलीवर पडतो. हजार-पाचशे वर्षांपूर्वी एखादी गोष्ट उपयुत्त* असेल तर ती त्या काळच्या संदर्भात उपयुत्त* असते, आज त्या गोष्टीची उपयुत्त*ता कायमच असेल असे नाही. अशा वेळी केवळ रूढी, परंपरांच्या नावाखाली या कालबाह्य गोष्टींना चिकटून राहण्यात अर्थ नसतो. बदलाचे हे सूत्र ज्यांना समजते ते काळाच्या वेगाशी जुळवून घेण्यात यशस्वी होतात. ज्यांना हे जमत नाही ते साहजिकच विकासाच्या दौडीत मागे पडतात.

    पृथ्वीतलावरील मानवाच्या बौद्धिक विकासाची सरासरी गती सारखीच असली तरी सगळेच आज प्रगतीच्या समान टप्प्यावर आहेत, असे म्हणता यायचे नाही. काही देश, तर एखाद्या देशातील काही विशिष्ट समाज इतरांच्या तुलनेत विशेषत: आर्थिकदृष्ट्या अधिक प्रगत दिसतात. काळाच्या गतीशी अधिक लवकर आणि अनुकूल दिशेने जुळवून घेण्यात ते इतरांपेक्षा वेगवान ठरले हे त्यामागचे एक महत्त्वाचे कारण आहे. मध्ययुगीन कालखंडात सातासमुद्रापलीकडून नवे नवे सागरी मार्ग शोधत युरोपीय व्यापारी भारताकडे येत होते त्याच काळात भारतात मात्र समुद्र ओलांडणे पाप समजले जायचे. या चुकीच्या धारणेने देशाचे खूप मोठे नुकसान झाले.
    जबरीने धर्मांतर करण्यात आलेल्यांना पुन्हा स्वधर्मात परतायचे असेल तर त्यालाही मोठ्या प्रमाणात विरोध व्हायचा. परतण्याचा हा मार्ग जवळपास बंदच होता. शिवाजी महाराजांनी या विरोधाला न जुमानता नेताजी पालकरांसारख्या मातब्बर सरदाराला पुन्हा स्वधर्मात प्रवेशित करून घेतले, परंतु असे उदाहरण अपवादात्मकच होते. विहिरीत खाण्याचा पाव (ब्रेड) टाकून ख्रिश्चन मिशनऱ्यांनी गावचे गाव धर्मांतरीत करून घेतले होते. पाव त्याकाळी निषिद्ध समजला जायचा. त्यामुळे जो कोणी त्या पाव पडलेल्या विहिरीचे पाणी प्यायचा तो बाटला, असे समजण्यात येई. अशाप्रकारे बाटलेल्यांना पुन्हा स्वधर्मात जागा नसायची. असल्याच असंख्य खुळचट समजुतीमुळे आपल्या समाजाचे खूप नुकसान झाले आहे, आजही होत आहे. काळासोबत बदलणे, काळाच्या गतीशी जुळवून घेणे आजही या समाजाला जमलेले नाही.

    आजही अनेक कालबाह्य रूढी, परंपरा आपल्या समाजात ठाण मांडून बसल्या आहेत. साधे मृत्युपरांत संस्कारांचेच उदाहरण घ्या. एखाद्या घरात मृत्यू झाला की त्या घरातल्या सगळ्यांनाच तेरा दिवसाचे सुतक असते. हे तेरा दिवस बाहेरचे सगळे व्यवहार बंद असतात. कुणी कामावर जात नाही, काही व्यवसाय असेल तर तोही बंद ठेवला जातो. एकेका मिनिटाला मोल असलेल्या आजच्या या जगात तेरा दिवसाची निष्क्रियता कोणत्या भावात पडत असेल? परंतु हे समजून घ्यायला कुणाची तयारी नाही. मराठी समाजातच हे कर्मकांड मोठ्या प्रमाणात चालते. इतर समाजातले मृत्युपरांत कर्मकांड फारतर दन, तीन दिवसात संपतात आणि चौथ्यादिवशी सगळ्यांची जगरहाटी पूर्ववत सुरू होते. मराठी समाजात मात्र अजूनही तेरा दिवसांचे सुतक पाळले जाते. ही प्रथा ज्याकाळात रूढ झाली त्या काळात ती योग्यच होती. तेव्हा दळणवळणाची, संवाद साधण्याची वेगवान साधने नव्हती. दूरवरून नातेवाईक यायचे, इतक्या लांबून आल्यावर ते काही दिवस थांबणारच. सांत्वनासाठी आलेली ही मंडळी घरात असताना घरच्या इतरांनी आपले कामधंदे करणे प्रशस्त वाटत नव्हते. शिवाय त्याकाळी वैद्यकीय सुविधा फारशा नव्हत्या. प्लेग, टी.बी. किंवा तत्सम दुर्धर आजारांना लोक बळी पडत. दवाखाने वगैर प्रकार नसल्यामुळे बहुतेक उपचार घरीच व्हायचे आणि मरणही घरच्या खाटेवरच यायचे. अशावेळी त्या व्यत्त*ीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या रोगाच्या विषाणूंचा संसर्ग इतरांना होण्याची शक्यता असायची. अशा परिस्थितीत त्या व्यत्त*ीच्या सतत संपर्कात आलेल्या त्या घरातील लोकांच्या माध्यमातून या विषाणूंचा प्रसार होण्याची शक्यता असायची. हे टाळण्यासाठी काही दिवस त्या घरातील लोकांनी इतरांच्या संपर्कात येऊ नये म्हणून सुतक पाळण्याची प्रथा पडली.

    मृत शरीर जाळताना शेणाच्या गोवऱ्या, कडुलिंबाचा पाला वगैरेंचा वापर व्हायचा त्यामागेही जंतुसंसर्ग रोखणे हेच मुख्य कारण असायचे. अनेक प्रकारच्या घातक विषाणूंचा फैलाव रोखण्याचे सामर्थ्य गाईच्या शेणात व मुत्रात तसेच कडुलिंबाच्या पाल्यात आहे. त्याचमुळे स्मशानातून आल्यानंतर कडुलिंबाची पाने खाण्याचा किंवा कडुलिंबाची पाने पाण्यात टाकून त्याने आंघोळ करण्याची पद्धत होती. तसेच घरात गोमुत्र शिंपडले जायचे. मृतकाच्या नातेवाईकांनी मुंडन करण्यामागेही जंतूप्रसाराला अटकाव करणे हाच उद्देश असायचा. हे सगळे प्रकार किंवा या सगळ्या रूढी त्याकाळी योग्यच होत्या. परंतु आज तेवढ्याच कर्मठपणे या सगळ्या गोष्टी पाळण्याची गरज नाही. कारण दुर्धर आजारी माणसे आजकाल रुग्णालयातच जीव सोडतात व अनेकदा रुग्णालयातुनच त्यांना स्मशानात नेले जाते. त्यामुळे जंतु घरात शिरण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. जेथे हे नसेल व रोगाचा प्रादुर्भाव असेल तेथे हे पाळणे समजण्यासारखे आहे. दळणवळणाची, संवादाची अतिशय वेगवान साधने आज उपलब्ध आहेत. त्यामुळे मृत्यु झाल्याबरोबर काही मिनिटात ती बातमी सर्वांना समजते. तसेच विमानाने सातासमुद्रापारचे नातेवाईक अगदी 24 तासात येऊ शकतात. आधुनिक वैद्यकीय सुविधा आज सहज उपलब्ध आहेत. शिवाय तेरा दिवस शोक करण्याइतका वेळही आज नाही. इतर समाजांनी हे सत्य स्वीकारून आपली मृत्युपरांत कर्मकांडे दोन-तीन दिवसात आटोपण्याचा मार्ग स्वीकारला. मराठी समाज तो केव्हा स्वीकारणार? बरेचदा केवळ लोक काय म्हणतील या विचारानेही 'शोक' लांबविला जातो. खरेतर आजच्या या आधुनिक युगात लोक काय म्हणतील याचा विचार करण्याइतकीही सवड लोकांकडे नाही किंवा घरातील वृद्ध व्यत्त*ीनेच त्या संदर्भात सविस्तर लिहून ठेवले तर प्रश्न आपोआपच सुटतो. कालबाह्य रूढींचा सगळ्यांनीच त्याग करायला हवा. प्रत्येक रूढीमध्ये, प्रत्येक परंपरेत काही विचार निश्चित असतो. तो विचार समजून घेणे आणि आजच्या युगात तो कितपत समर्थनीय आहे हे पाहून त्या रूढी आणि परंपरा सुरू ठेवायच्या, त्यचे स्वरूप बदलायचे की त्या बंदच करायच्या हे आपण ठरवायला हवे. प्रत्येक काळाची गरज वेगळी असते आणि त्या काळाच्या गरजेनुसार काही बदल स्वीकारावेच लागतात. विचार हे नहमीच प्रवाही असतात, उगाच त्यांचे डबके बनविण्यात अर्थ नाही. या पार्श्वभूमिवर आपल्या कृतीतून नव्या विचारांना जन्म दणार किंवा जुन्या विचारांना नवे वळण देणारे लोक समाजासाठी दीपस्तंभ ठरू शकतात.

    असे अनेक लोक आपल्या समाजात आजही आहेत. समाजप्रबोधनाचे कार्य ते आपल्या परिने करीतच असतात. फत्त* काही लोक प्रकाशात येतात तर काही कायम पडद्याआड असतात; परंतु त्याने काही फरक पडत नाही. दिवा खोलीत कुठे आहे यावरून त्याची अंधार दूर करण्याची क्षमता मोजली जात नाही. आमच्या आजोबांचा सत्यशोधक समाजाचा वारसा चालविणाऱ्या आमच्या वडिलांनी तर स्पष्टच सांगून ठेवले आहे की त्यांच्या मृत्यूनंतर तेरवी, गोडजेवण वगैरे प्रकार अजिबात करायचे नाही. त्यासाठी एरवी जो काही खर्च आला असता तो एखाद्या सामाजिक संस्थेला दान करा. लोक काय म्हणतील याचा विचार करण्याचीही गरज नाही. मी तसे मृत्युपत्रच करून ठेवतो. बाबांसारखी अशी साधी माणसंही बरेचदा आपल्या कृतीतून खूप मोठा संदेश देऊन जातात. खरेतर अशाच लोकांची आज समाजाला नितांत गरज आहे. बरेचदा कालबाह्य रूढी, परंपरा आपल्या पायातील बेड्या ठरत असतात. त्या बेड्या तोडण्याची हिंमत कुणीतरी आधी दाखवायला पाहिजे, मग त्याचे अनुकरण करायला इतर अनेक लोक पुढे येतील. गेल्या शे-दोनशे वर्षांत संपूर्ण जग झपाट्याने बदलले आहे. युरोपीय देशांनी हा बदल चटकन आत्मसात केला आणि ते विकासाच्या दौडीत खूप पुढे गेले. एकेकाळी समृद्ध असलेला आपला देश अजूनही कालबाह्य रूढी, परंपरांच्या जाळ्यातून म्हणावा तेवढा मोकळा झाला नाही आणि त्याचा अप्रत्यक्ष परिणाम आपल्या विकासावर झाला. याचा अर्थ सगळ्याच रूढी किंवा परंपरा कालबाह्य झाल्या आहेत असा होत नसला तरी बदलत्या परिस्थितीत त्यांचे स्वरूप बदलणे गरजेचे ठरले आहे.

    -- प्रकाश पोहरे

      July 8, 2007


  • दिठी’

    देवाची भक्ती या सगळ्या मध्ये आपला काही स्वार्थ असतो का? की नाही? असेल तर रामजी माणूस म्हणून बरोबर आहे आणि नसेल तर मग तो दु:खी का आहे?खूप वेळ विचार करत होते. स्वतःचे व अनेक लोकांचे अनुभव आठवले. आणि वाटले की आपण सामान्य माणसं हे सगळं नाही समजू शकत.

      January 10, 2022