(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या व व्यायाम

    ज्येष्ठ नागरीक वयोमर्यादा ६५ ते ७५ वर्षापर्यत. अशा नागरिकांना असंख्य समस्या आड येतात. कधी कधी तर त्या आपल्याला समजतही नाहीत. साधारणपणे नेहमीची समस्या जवळजवळ सारखीच असते. या म्हणजे ज्येष्ठ नागरीकाला कधी कधी चक्कर येतात. याला आपण साधारणपणे व्हर्टिगो असे म्हणतो. तसेच पायाच्या पोटऱ्या प्रंचड दुखतात. तेल लावून अथवा औषध घेऊन त्यात उपाय सापडतील, असे नाही. या पोटऱ्याजवळ गुडघे दुखणे हीदेखील कायमची बाब असते.

      November 15, 2023


  • अमेरिकेतील “यु. एस. रुट नंबर ६” – भाग १

    यु.एस. रूट नंबर ६ हा अमेरिकेतील एक प्रसिद्ध रस्ता! मॅसेच्युसेट्स राज्यातल्या केपकॉड पासून ते कॅलिफोर्नियातल्या लॉंग बीच पर्यंत जाणारा. अटलांटिक आणि पॅसिफिक अशा दोन महासागरांना जोडणारा. ५१५८ कि.मी. (३२०५ मैल) लांबीचा आणि १४ राज्यांतून जाणारा. खर्‍या अर्थाने देशव्यापी किंवा खंडव्यापी असा रस्ता! (तुलनाच करायची झाली तर, भारतातील सर्वात मोठा हायवे, म्हणजे नॅशनल हायवे नंबर ७. हा उत्तर प्रदेशातील वाराणसी पासून तामीळनाडूतील कन्याकुमारी पर्यंत जातो आणि त्याची लांबी आहे २३६९ कि.मी.)

    हा यु.एस. रूट नंबर ६ मॅसेच्युसेट्स राज्यातून सुरू झाला की र्‍होड आयलंड, कनेक्टिकट, न्यू यॉर्क, पेनसिल्व्हेनीया, ओहायो, इंडियाना, इलीनॉय, आयोवा, नेब्रास्का, कोलोरॅडो, यूटाह, नेवाडा अशा राज्यांतून जात जात कॅलिफोर्नियात जाऊन संपतो. या चौदा राज्यांपैकी, पाच राज्यांच्या राजधान्यांमधून (प्रॉव्हिडन्स – र्‍होड आयलंड, हार्टफोर्ड – कनेक्टिकट, द मॉईन – आयोवा, लिंकन – नेब्रास्का आणि डेन्व्हर – कोलोरॅडो ) जाण्याचा मान त्याला लाभला आहे.

    ह्या यु.एस. रूट नंबर ६ ला “ग्रॅंड आर्मी ऑफ रिपब्लिक हायवे” असं देखील एक मोठं भारदस्त नाव आहे. अमेरिकेचा हा सर्वप्रथम खंडव्यापी आणि सर्वात लांब रस्ता! आता जरी हे त्याचं प्रथम स्थान (लांबीच्या दृष्टीकोनातून), इंटरस्टेट नंबर २० ने बळकावलं असलं, तरी देखील यु.एस. रुट नंबर ६ चा दिमाख आणि सौंदर्य थोडं देखील कमी झालेलं नाही. आपल्याकडे कशी शताब्दी आली, इंटरसिटी एक्सप्रेस आली तरीही डेक्कन क्वीन ती डेक्कन क्वीनच! १९८७ साली हारले – डेव्हीडसन या मोटरसायकलींसाठी जगप्रसिद्ध असलेल्या कंपनीने, ह्या यु.एस. रुट नंबर ६ ला, अमेरिकेच्या ५० सर्वोत्कृष्ट रस्त्यांच्या यादीमध्ये स्थान देऊन सन्मानित केलं होतं. तसंच ह्या यु.एस. रुट नंबर ६ चा पेनसिल्व्हेनीया राज्यातून जाणारा जो भाग आहे, त्याची “Car and Driver” ह्या मासिकाने, अमेरिकेतल्या १० सर्वोत्कृष्ट सृष्टीसौंदर्याने नटलेल्या रस्त्यांमध्ये गणना केली आहे.

    नवीन इंटरस्टेट हायवेज प्रमाणे यु.एस. रूट नंबर ६ हा काही सहा किंवा चार पदरी नाही, निदान मी फिरलेल्या भागात तरी तो दोन पदरीच आहे. त्याचं रूपही तसं जुन्या वळणाचं. सर्वसाधारण इंटरस्टेट हायवे प्रमाणे याच्यावर मोठमोठे फलक नाहीत किंवा Exit च्या मोठमोठ्या पाट्या नाहीत. हा आपला बर्‍यापैकी भारतीय रस्त्याचा भाऊबंद शोभेल असा आहे.

    नवीन इंटरस्टेट हायवेज जितके प्रशस्त, आखीव आणि काळजीपूर्वक जपलेले आहेत, तितकाच हा यु.एस. रूट नंबर ६, गरीब आणि बापुडवाणा! नवीन इंटरस्टेट हायवेज म्हणजे आपल्याच तोर्‍यात असणारे, कोरडे, काटेकोर, अलिप्त आणि रुक्ष; तर यु.एस. रूट नंबर ६ म्हणजे गबाळा, दिलखुलास आणि अघळपघळ. एखाद्या शिष्ठ माणसाने कपड्याची घडी मोडू नये म्हणून पोरांपासून दोन हात दूर रहावं तसे इतर इंटरस्टेट हायवेज, शक्यतो वस्तीपासून दूर, शहराला वळसे घालून जाणारे. तर एखाद्या आजीने दोन चार शेंबडी लेंबडी नातवंडं अंगाखांद्यावर खेळवावीत तसा यु.एस.रूट नंबर ६, छोट्या छोट्या गावांना, वस्त्यांना अल्लाद कुरवाळत जाणारा!

      July 23, 2015


  • जगन्नाथपंडितकृत गंगालहरी – स्वैर मराठी भावानुवाद भाग २

    भाग २ – गंगेची स्तुती व माहात्म्य अनेक कवी, विचारवंत, लेखक यांच्या कलाकृतीचा केंद्रबिंदू राहिलेले आहेत. या सर्व रचनांमध्ये जगन्नाथ पंडिताने रचलेले गंगालहरी हे आधुनिक संस्कृत काव्यांमधील  मुकुटमणीच म्हटले पाहिजे. गंगेच्या स्तवनपर हे काव्य अत्यंत रसाळ, पदलालित्यपूर्ण व भावपूर्ण आहे.

      December 28, 2019


  • पुतनामावशी – एक दंतकथा?

    श्रीकृष्णकथेत वर्णन केलेली ही पूतना खरंच कोणी राक्षसी होती की पूतना ग्रहाच्या वर्णनाचा विपर्यास होत ही दंतकथा तयार झाली?! दंतकथा तयार होण्यास फार काळ लागत नसतो. जिथे स्वामी विवेकानंद वा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील घटनांसंबंधी दंतकथा निर्माण होतात तिथे प्रत्यक्ष भगवंतांचीही काय कथा?! मात्र एका परीने आयुर्वेद हा भारतीय मनात किती रुजला आहे याची ही साक्षच नव्हे का?!

      August 25, 2016


  • गुरुचे महत्व

    गुरु एक तेज आहे. गुरूंचे एकदा आगमन झाले की मनातील संशयरूपी अंधःकार कुठल्याकुठे पळून जातो……

      December 30, 2020


  • आकाशवाणीची लोकप्रियता

    आकाशवाणीची लोकप्रियता

    भारतातल्या सर्वसामान्य नागरिकाला डोळ्यांसमोर ठेवून, तळागाळातल्या समाजाचा विचार करून स्त्रीसक्षमीकरणाला प्राधान्य देऊन आकाशवाणीचे कार्यक्रम केले जातात. शास्त्रीय, उपशास्त्रीय, सुगम आणि चित्रपट संगीत हा तर आकाशवाणीचा आत्मा आहे. अनेक दिग्गज कलाकारांची ध्वनीमुद्रणे, अभिजात रंगमंचीय नाटकांचे नभोनाट्य रूपांतर आकाशवाणीच्या संग्रहात आहेत. जेव्हा जेव्हा आकाशवाणीच्या संग्रहातल्या या कार्यक्रमांचे प्रसारण होतं तेव्हा ती खरं तर श्रोत्यांच्यासाठी मेजवानी असते.

      September 8, 2023


  • तुलजापुरवासिनीस्तोत्रम्

    नमोऽस्तु ते महादेवि शिवे कल्याणि शाम्भवि।
    प्रसीद वेदविनुते जगदम्ब नमोऽस्तु ते।।१।।

    जगतामादिभूता त्वं जगत्त्वं जगदाश्रया।
    एकाप्यनेकरूपाऽसि जगदम्ब नमोऽस्तु ते।।२।।

    सृष्टिस्थितिविनाशानां हेतुभूते मुनिस्तुते।
    प्रसीद देवविनुते जगदम्ब नमोऽस्तु ते।।३।।

    सर्वेश्वरि नमस्तुभ्यं सर्वसौभाग्यदायिनि।
    सर्वशक्तियुतेऽनन्ते जगदम्ब नमोऽस्तु ते।।४।।

    विविधारिष्टशमनि त्रिविधोत्पातनाशिनि।
    प्रसीद देवि ललिते जगदम्ब नमोऽस्तु ते।।५।।

    प्रसीद करुणासिन्धो त्वत्तः कारुणिको परा।
    यतो नास्ति महादेवि जगदम्ब नमोऽस्तु ते।।६।।

    शत्रून्जहि जयं देहि सर्वान्कामांश्च देहि मे।
    भयं नाशय रोगांश्च जगदम्ब नमोऽस्तु ते।।७।।

    जगदम्ब नमोऽस्तु ते हिते जय शम्भोर्दयिते महामते।
    कुलदेवि नमोऽस्तु ते सदा हृदि मे तिष्ठ यतोऽसि सर्वदा।।८।।

    तुलजापुरवासिन्या देव्याः स्तोत्रमिदं परम्।
    यः पठेत्प्रयतो भक्त्या सर्वान्कामान्स आप्नुयात्।।९।।

    इति श्री प. प. श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितं श्रीतुलजापुरवासिन्या देव्याः स्तोत्रं संपूर्णम् ।।

      May 1, 2020


  • श्रीमुद्गलपुराण – ११

    असे ज्ञान झाले की माणूस व्यापक होतो. त्याला सर्व जग समान दिसू लागते. साधकाच्या या अवस्थेला समब्रह्म असे म्हणतात. येथे व्यापकतेचा विचार असल्याने यालाच विष्णुब्रह्म असे म्हणतात.

      September 12, 2019


  • “कॉपीराईट” कायद्यावर नव्याने प्रकाश

    ख्यातनाम साहित्यिक वि. स. खांडेकर यांच्या साहित्याच्या प्रकाशनाचे, विक्रीचे अधिकार कोणाकडे असावेत याविषयी त्यांचे वारसदार आणि देशमुख आणि कंपनी यांच्यात काही वर्षांपासून वाद होता. सर्वोच्च न्यायालयाने हे अधिकार खांडेकरांच्याच वारसांकडे कायम राहणार असल्याचे जाहीर केल्याने या वादावर पडदा पडला. या निमित्ताने कॉपीराईट कायद्यातील तरतुदींवर नव्याने प्रकाश पडला आहे. त्यानिमित्ताने…

      September 17, 2010


  • मल्लखांब दिन – १५ जून

    मल्लखांब या खेळाचा उदय दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळात झाला. पेशव्यांच्या दरबारातल्या बाळंभट दादा देवधर यांनी कुस्तीला पूरक व्यायाम प्रकार म्हणून मल्लखांबाची मुहूर्तमेढ रोवली होती.

      June 15, 2021