लेखसंग्रह

सं-सा-र त्रिसूत्री

Category:

 

बऱ्याच कुटुंबातून सध्या, गृहकलह वाढत असल्याचे जाणवले. दोन पिढयांमधला संवाद संपत चालल्या मुळे त्यांच्यातील समन्वय देखील हरवत चाललेला दिसतो आहे. त्यामुळे विवाहित तरुणाई / प्रौढ मंडळी मानसिक तणावाखाली असल्याचे जाणवले.
कौटुंबिक कलह म्हटल्यावर बऱ्याचदा स्त्रियांनाच विशेषतः सुनांना जबाबदार धरले जाते, परंतु यामध्ये ज्येष्ठ सदस्य आणि कर्त्या पुरुषांची भूमिका देखील तितकीच महत्वाची असते.

  September 17, 2021


साहित्य - ललित

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

Category:

 

कोणतीही चळवळ जनमानसामध्ये घेऊन जाण्यासाठी जशी एखाद्या कुशल नेतृत्वाची आवश्यकता असते तशीच संवेदनशील साहित्यिकाची देखील आवश्यकता असते असे माझे स्पष्ट मत आहे. सर्व सामान्य जनतेच्या मनातील शल्य, त्यांचे प्रश्न समाजापुढे आग्रहाने मांडण्याचे महत्कार्य; एक झुंझार लेखणीचा साहित्यिकच करू शकतो असे मला वाटते. अश्याच झुंझार साहित्यिकांमधील एक अविस्मरणीय नाव म्हणजे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ” .

  August 1, 2021


साहित्य - ललित

जगण्याची कला शिकवणारे विद्यापीठ

Category:

 

शतकानुशतके ना कोणी आमंत्रण पत्रिका छापते, ना कुणी कोणाला एकत्र येण्याचे आवाहन करते, ना कोणाला एकत्र येण्याचे, काम करण्याचे मानधन मिळते, तरीही बरोबर ज्या त्या तिथीला, जो तो आपापल्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचतोच…. हे वैशिष्ठय कोणत्या सभेचे किंवा उपक्रमाचे नाही तर ही आहे आपली पंढरीची वारी….

  July 4, 2021


लेखसंग्रह

शिवजातस्य संभाजी महाराज : उत्तरार्ध

Category:

 

मागील भागामधून, छ. संभाजी महाराजांची जडण घडण कशी झाली ? त्यांच्या राज्याभिषेकाचे महत्व काय ? याबाबत माहिती पहिली. या भागामधून संभाजी राजांची छत्रपती, स्वराज्य रक्षक म्हणून कशी कारकीर्द होती या बाबत माहिती घेणार आहोत. हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, धर्मवीर छ. संभाजी महाराजांच्या व्यक्तित्वाचा धावता आढावा घेण्याचा एक प्रयत्न….

  June 11, 2021


लेखसंग्रह

शिवजातस्य संभाजी महाराज : पूर्वार्ध

Category:

 

छ. शिवाजी महाराजांनी अहोरात्र झटून राज्य साधनेची लगबग करून, सह्याद्रीच्या कुशीत एक स्वाभिमानी स्वराज्य उभे केले. त्यांच्या अकाली मृत्यूनंतर त्या स्वराज्याची जबाबदारी छ. संभाजी महाराजांनी तितक्याच ताकदीने उचलली आणि स्वराज्याचे रक्षण करताना अखेर स्वतः च्या प्राणांची आहुती दिली. हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, धर्मवीर छ. संभाजी महाराजांच्या व्यक्तित्वाचा धावता आढावा घेण्याचा एक प्रयत्न….

  June 8, 2021


साहित्य - ललित

गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला !

Category:

 

मनाला शांत करणाऱ्या या भजनाच्या ओढीने जेंव्हा ज्ञानमंदिराकडे मन धाव घेते तेंव्हा, अंगात चिंध्यांचा अंगरखा, एका कानात फुटक्या बांगडीची काच आणि डोक्यावर मडके घेतलेल्या एका पुरुषसिंहाचे दर्शन घडते…   ते म्हणजे राष्ट्रसंत गाडगे महाराज अर्थात संत गाडगेबाबा ….

  March 12, 2020


साहित्य - ललित

प्रभो शिवाजी राजा – उत्तरार्ध

Category:

 

खरे तर शिवरायांबद्दल “अगदी थोडक्यात” असे काहीच लिहिता येणार नाही, परंतु लेखन सीमेची मर्यादा पाळणे हे देखील अनिवार्यच असते, म्हणून मला उमगलेले छत्रपती शिवाजी महाराज आपणा पुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. खरं सांगू ! लेखनसीमेचे भय हे एक निमित्त पण अखंड महासागराला कधी कोणी ओंजळीत भरून घेऊ शकले आहे काय ? 

  February 22, 2020


साहित्य - ललित

प्रभो शिवाजी राजा – पूर्वार्ध

Category:

 

शिवनेरी गडावर जन्म आणि रायगडावर अंतिम श्वास असा जन्म मृत्यूचा गडकिल्ल्याशी संबंध असणारे, अलौकिक व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जनमानसामध्ये शासनकर्त्याप्रती विश्वास निर्माण करणारे, कुशल प्रशासक, शत्रूलाही मोह पडावा अशी कर्तबगारी, स्वतःच्या गैरहजेरीतही राज्याचा कारभार सुरळीत चालेल अशी जरब बसवणारा एक करारी शिस्तबद्ध राज्यकर्ता, सर्वसामान्य जनता आणि राज्यकारभारी यांना एकाच न्यायाने वागवणारा एक न्यायप्रिय परंतु प्रसंगी कर्तव्य कठोर असा छत्रपती शासक म्हणजे शिवाजी महाराज.

  February 19, 2020


साहित्य - ललित

गेल्या दहा हजार वर्षात… (उत्तरार्ध)

Category:

 

आचार्य अत्रे जसे उत्तम लेखक होते, वक्ते होते तसेच ते उत्तम पत्रकारही होते. मराठी भाषेवरच नव्हे तद्दम महाराष्ट्रावर त्यांचे अतोनात प्रेम होते. त्यांनी सुरु केलेले नवयुग साप्ताहिक आणि मराठा दैनिक हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.

  October 14, 2019